airnews-arngbad · 11 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०९ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथं, तर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या आसेगाव इथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
गेल्या नऊ वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये साधारण २१ हजार किलोमीटरचे नवीन ट्रॅक जोडले असून, त्यामुळे गाड्यांना अधिक थांबे मिळतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली. अमृत ​​भारत स्थानक योजनेंतर्गत १ हजार ३०९ हून अधिक रेल्वे स्थानक विकासासाठी निश्चित केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी असलेली गव्हाची साठवणूक मर्यादा दोन हजार मेट्रिक टनांवरून एक हजार मेट्रिक टन इतकी केली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी ही साठवणूक मर्यादा दहा मेट्रिक टनांवरून पाच मेट्रिक टन करण्यात आली आहे.
****
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले. जीएसटी कायद्यातली ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची व्याख्या, तसंच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ धार��शिव इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांक खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर इथंही भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादवे यांच्या नेतृत्वात खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
****
बीड इथं काल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनात वाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अडीच हजारावर अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
मुंबई लोकलमध्ये मोठा कट, रेल्वे ट्रॅकवर ड्रम ठेवण्यात आला, मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
मुंबई लोकलमध्ये मोठा कट, रेल्वे ट्रॅकवर ड्रम ठेवण्यात आला, मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
मुंबई लोकलच्या सीएसएमटी ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर कोणीतरी दगडांनी भरलेला ड्रम ठेवला होता. मोटरमन अशोककुमार शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. मुंबई लोकल रेल्वे ट्रॅकवर लोखंडी ड्रम प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter मुंबई लोकल ट्रेन मोठ्या अपघाताचा डाव टळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर कोणीतरी खोडकरपणे दगडांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर
Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर
Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर तुम्ही भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी ऐकल्या असतील, पण भारतात असा एक रेल्वे ट्रॅक आहे, जिथे चारही बाजूंनी ट्रेन येतात हे तुम्हाला माहित आहे का? या अनोख्या गोष्टीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. ज्याला ही गोष्ट पहिल्यांदाच कळते, त्या��ा धक्काच बसतो. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या ट्रॅकवर…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
कोचीवली - भावनगर एक्सप्रेस च्या धडकेत तीन गुरे ठार
कोचीवली – भावनगर एक्सप्रेस च्या धडकेत तीन गुरे ठार
जनशताब्दी एक्सप्रेस 20 मिनिटे मध्येच थांबवली ट्रॅक वरील मृत गुरे बाजूला केल्यानंतर जनशताब्दी मार्गस्थ कणकवली: मडगाव हुन मुंबईच्या दिशेने जा��ाऱ्या कोचिवली – भावनगर एक्सप्रेस ची जोरदार धडक बसून तीन गुरे ठार झाली. या एक्सप्रेसची ��डक एवढी जोरदार होती की यात काही गुरांचे अनेक अवयव अक्षरशा छिन्न – विच्छिन्न स्थितीत रेल्वे ट्रॅक वर पडले होते. मडगावहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या एक्सप्रेसची साकेडी –…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
पंचवटी पोलिस ठाण्यातील हवालदाराची आत्महत्या
पंचवटी पोलिस ठाण्यातील हवालदाराची आत्महत्या
नाशिक । प्रतिनिधी पंचवटी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार ( ब नं १०९३) अनिल तानाजी जमदाडे यांनी आज दुपारी ओढा रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या केली. या घटनेने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. जमदाडे हे मुळचे दिंडोरी तालुक्यातिल मातेरेवाडी येथील रहिवाशी असून सध्या रासबिहारि लिंकरोड परिसरात स्थायिक होते. १ जून १९९१ ला ते पोलिस दलात भरती झाले होते. त्यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातल्या कॉन्स्टेबल पदासाठीची परिक्षा १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात मंत्रालयानं ट्विटरवरुन माहिती देताना, या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढेल, असं म्हटलं आहे. हा निर्णय प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता दर्शवतो, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. एक जानेवारी २०२४ पासून हा निर्णय लागू होईल. 
***
जुन्या पु��े - मुंबई महामार्गावर रायगड जिल्ह्यात खोपोली जवळच्या घाटामध्ये आज पहाटे खाजगी बस दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १२ झाली आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, १६ जणांना सुखरुप बाहेर काढल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या बस मध्ये मुंबईच्या गोरेगाव इथल्या बाजीप्रभु वादक गटातले कलाकार होते, ते पुण्याचा कार्यक्रम संपवून आज परतत असताना पहाटे हा अपघात झाला.
***
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी, शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा, आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये, संपूर्ण राज्यातून जवळपास २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार आहे. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जावं लागतं, मात्र "जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची', या उपक्रमात, एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली, कमीत कमी कालावधीत देण्यात येणार आहे. आजपासून महिनाभर नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचवली जाईल, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.
***
श्री अमरनाथ यात्रा यावर्षी एक जुलै रोजी सुरू होणार असून, ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेसाठी येत्या १७ एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रा एकाच वेळी सुरू होईल.
***
व्हॉटसअप, टेलिग्राम वगैरे समाजमाध्यमा��वर आयआरसीटीसीच्या नावानं उपलब्ध असलेल्या लिंक किंवा संदेशांवर क्लिक करु नये, असं आवाहन भारतीय रेल्वे आणि खानपान महामंडळानं केलं आहे. या लिंकमधून डाऊनलोड होणारं अॅप ग्राहकांच्या बँक खात्याची, क्रेडिट आणि डेबिट कार्डची तसंच युपीआयची माहिती चोरत असल्याचा इशारा महामंडळानं दिला आहे. केवळ गुगल प्ले स्टोअर वरुनच आयआरसीटीसीचं अधिकृत, आयआरसीटीसी रेल कनेक्ट, हे मोबाइल अॅप डाउनलोड करावं, अशी सूचना करण्यात आली आहे.  
****
देशात काल कोरोना विषाणूचे नवे दहा हजार ७५३ रुग्ण आढळले, २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ६२८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६९ टक्के आहे. देशात सध्या ५३ हजार ७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार ४५३ कामगारांनी ई श्रम कार्ड साठी नोंदणी केल्यामुळे जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यासाठी चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे त्रेचाळीस असंघटित कामगाराच्या नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मराठवाड्यात आतापर्यंत अडतीस पूर्णांक बारा टक्के ई श्रम कार्ड नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं रॉलय चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होइल. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज दरम्यान संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल.
***
हवामान -
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
//**********//
0 notes
loksutra · 2 years ago
Text
व्हायरल फोटो: देशात उष्मा एवढा, की रेल्वे ट्रॅकला आग! धक्कादायक फोटो व्हायरल झाले
व्हायरल फोटो: देशात उष्मा एवढा, की रेल्वे ट्रॅकला आग! धक्कादायक फोटो व्हायरल झाले
लंडनमध्ये कडक उन्हामुळे ट्रॅकला आग लागली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter Railway Track Burst into Flames: ब्रिटन सध्या उष्णतेच्या विळख्यात आहे. लंडनमधील वँड्सवर्थ रोड आणि लंडन व्हिक्टोरिया दरम्यान रेल्वे ट्रॅकवर आग लागल्याची ही घटना घडली. रेल्वे रुळाखालील जंगलात आग लागली. सध्या देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. मात्र या पावसाने देशवासीयांना उन्हाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
शिमला-कालका हेरिटेज रेल्वे ट्रॅकवर भूस्खलन, ड्रायव्हरने वेळीच ब्रेक लावला
शिमला-कालका हेरिटेज रेल्वे ट्रॅकवर भूस्खलन, ड्रायव्हरने वेळीच ब्रेक लावला
सतर्क चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. चंदीगड: हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी भूस्खलनामुळे शिमला-कालका हेरिटेज रेल्वे ट्रॅकवरील रेल्वे वाहत��क विस्कळीत झाली. 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन एक ट्रेन सोलन जिल्ह्यातील पट्टा मोरजवळ पोहोचली तेव्हा डोंगरावरून मोठे दगड पडू लागले. सतर्क चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. ट्रॅक साफ झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू होतील. Source link
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मुंबई रेल्वे अपघाताचे महत्त्वाचे अपडेट्स; स्लो ट्रॅक सुरू, 'या' एक्स्प्रेस रद्द
मुंबई रेल्वे अपघाताचे महत्त्वाचे अपडेट्स; स्लो ट्रॅक सुरू, ‘या’ एक्स्प्रेस रद्द
मुंबई रेल्वे अपघाताचे महत्त्वाचे अपडेट्स; स्लो ट्रॅक सुरू, ‘या’ एक्स्प्रेस रद्द Mumbai Train Accident Latest Updates: दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान दोन एक्स्प्रेसची धडक होऊन अपघात झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. जलद मार्ग अजून बंद असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. Mumbai Train Accident Latest Updates: दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान दोन…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
मरूसागर एक्सप्रेस च्या धडकेने 5 गुरे ठार
मरूसागर एक्सप्रेस च्या धडकेने 5 गुरे ठार
कणकवली: मडगाव हुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मरूसागर एरणाकुलम अजमेर जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे ची जोरदार धडक बसल्याने तब्बल पाच गुरांचा जागीच मृत्यू झाला. या रेल्वेची धडक एवढी जोरात होती की यात मोठ्या दोन बैलांचा ��र अक्षरशः चेंदामेंदा होत सुमारे अर्धा किलोमीटर रेल्वे ट्रॅक वर अक्षरशः रक्त व मांसाचा सडा पडला होता. यासंदर्भात रेल्वे च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रेल्वे मार्गस्थ होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
२ तासानंतर काजीपेठ-दिल्ली मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत चंद्रपूर/हैदराबाद  : कागजनगर दरम्यान विहीरगावजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने दक्षिण-उत्तर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील विहीरगाव स्थानकाजवळ घसरलेले डबे हटवण्यात रेल्वे प्रशासनाला ३२ तासानंतर यश आले आहे. त्यामुळे आता दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. डाऊनलाईन ट्रॅक पहाटे ३ वाजता सुरू करण्यात आला. त्यानंतर काही तासांनी अपलाईन ट्रॅकही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे ३०० कामगार या कामासाठी लावण्यात आले  होते. तब्बल १४० टन क्षमतेच्या दोन क्रेन आणि सात जेसीबीदेखील मदतकार्यात लावण्यात आले होते. मालगाडीमधील कोळसा ट्रॅकवर पडल्यामुळे विलंब झाला. या अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलवण्यात आले होते. तर अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर हजारो प्रवाशी अडकून पडले होते.
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातल्या कॉन्स्टेबल पदासाठीची परिक्षा १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात मंत्रालयानं ट्विटरवरुन माहिती देताना, या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढेल, असं म्हटलं आहे. हा निर्णय प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता दर्शवतो, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. एक जानेवारी २०२४ पासून हा निर्णय लागू होईल. 
***
जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर रायगड जिल्ह्यात खोपोली जवळच्या घाटामध्ये आज पहाटे खाजगी बस दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १२ झाली आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले असून, १६ जणांना सुखरुप बाहेर काढल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या बस मध्ये मुंबईच्या गोरेगाव इथल्या बाजीप्रभु वादक गटातले कलाकार होते, ते पुण्याचा कार्यक्रम संपवून आज परतत असताना पहाटे हा अपघात झाला.
***
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी, शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा, आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये, संपूर्ण राज्यातून जवळपास २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार आहे. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जावं लागतं, मात्र "जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची', या उपक्रमात, एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली, कमीत कमी कालावधीत देण्यात येणार आहे. आजपासून महिनाभर नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचवली जाईल, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.
***
श्री अमरनाथ यात्रा यावर्षी एक जुलै रोजी सुरू होणार असून, ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेसाठी येत्या १७ एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रा एकाच वेळी सुरू होईल.
***
व्हॉटसअप, टेलिग्राम वगैरे समाजमाध्यमांवर आयआरसीटीसीच्या नावानं उपलब्ध असलेल्या लिंक किंवा संदेशांवर क्लिक करु नये, असं आवाहन भारतीय रेल्वे आणि खानपान महामंडळानं केलं आहे. या लिंकमधून डाऊनलोड होणारं अॅप ग्राहकांच्या बँक खात्याची, क्रेडिट आणि डेबिट कार्डची तसंच युपीआयची माहिती चोरत असल्याचा इशारा महामंडळानं दिला आहे. केवळ गुगल प्ले स्टोअर वरुनच आयआरसीटीसीचं अधिकृत, आयआरसीटीसी रेल कनेक्ट, हे मोबाइल अॅप डाउनलोड करावं, अशी सूचना करण्यात आली आहे.  
****
देशात काल कोरोना विषाणूचे नवे दहा हजार ७५३ रुग्ण आढळले, २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ६२८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६९ टक्के आहे. देशात सध्या ५३ हजार ७२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार ४५३ कामगारांनी ई श्रम कार्ड साठी नोंदणी केल्यामुळे जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यासाठी चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे त्रेचाळीस असंघटित कामगाराच्या नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मराठवाड्यात आतापर्यंत अडतीस पूर्णांक बारा टक्के ई श्रम कार्ड नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं रॉलय चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ल��� कॅपिटल्स यांच्यात सामना होइल. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज दरम्यान संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल.
***
हवामान -
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
//**********//
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र : ठाण्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला रुळावरून ढकलून एका पोलीस कर्मचाऱ्याने वाचवला जीव, काही सेकंदात एक्स्प्रेस गाडी पुढे गेली.
महाराष्ट्र : ठाण्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला रुळावरून ढकलून एका पोलीस कर्मचाऱ्याने वाचवला जीव, काही सेकंदात एक्स्प्रेस गाडी पुढे गेली.
पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी रुळ ओलांडण्यासाठी उडी मारतो पण रुळावर उडी मारताच तो खाली पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यानंतर तो शांतपणे ट्रॅकवर उभा राहतो. तेवढ्यात एक पोलीस रुळावर पोहोचतो आणि त्या किशोरला रुळावरून ढकलून देतो. ठाण्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला रुळावरून ढकलून पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले जीव. महाराष्ट्र (महाराष्ट्र) ठाणे (ठाणे) जिल्ह्यातील विठ्ठलवाडी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
ई-केटरिंग सेवा 10 महिन्यांनंतर पुन्हा गाड्यांमध्ये सुरू होईल, प्रवासी आवडीचे अन्न मागण्यास सक्षम असतील - चांगली बातमीः 10 महिन्यांनंतर ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सेवा सुरू होईल, प्रवासी आवडीचे भोजन विचारू शकतील
ई-केटरिंग सेवा 10 महिन्यांनंतर पुन्हा गाड्यांमध्ये सुरू होईल, प्रवासी आवडीचे अन्न मागण्यास सक्षम असतील – चांगली बातमीः 10 महिन्यांनंतर ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सेवा सुरू होईल, प्रवासी आवडीचे भोजन विचारू शकतील
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका आयआरसीटीसी 10 महिन्यांनंतर ट्रेनमध्ये ई-केटरिं��� सेवा सुरू करणार आहे. फूड ऑन ट्रॅक मोबाइल अ‍ॅपद्वारे सध्या देशातील 57 प्रमुख स्थानकांवर 250 विशेष गाड्यांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. आयआरसीटीसीने गेल्या वर्षी 22 मार्च रोजी कोरोनाच्या संकटामुळे ही सेवा बंद केली होती. या गाड्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
अशी अनोखी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? निवासी इमारतीच्या आत जातो, व्हिडिओ पहा
अशी अनोखी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? निवासी इमारतीच्या आत जातो, व्हिडिओ पहा
तुम्ही कधी चिनी गाड्या पाहिल्या आहेत का? इथल्या मानवी वस्तीजवळ सोडा, ट्रेन निवासी इमारतीतून जाते. होय, इमारतीच्या आतून. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, पण हे अगदी खरे आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी अनोखी ट्रेन तुम्ही कधी पाहिली आहे का? प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter तुम्ही पाहिलं असेल की रेल्वे ट्रॅक अनेकदा रहिवासी भागांपासून आणि विशेषत: मानवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Amravati track breaks down : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना, दोन प्रवासी रेल्वेंचे वेळापत्रक लांबले
Amravati track breaks down : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना, दोन प्रवासी रेल्वेंचे वेळापत्रक लांबले
Amravati track breaks down : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटला, वलगाव रेल्वे गेटवरील घटना, दोन प्रवासी रेल्वेंचे वेळापत्रक लांबले अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली. अमरावती शहरापासून दहा किमी अंतरावरील वलगाव रेल्वे गेट वर ही घटना घडली. एक मालगाडी रेल्वे रुळावरून गेल्यानंतर रेल्वेचा रूळ तुटून वेगळा झाला. अमरावती : अमरावतीजवळ रेल्वेचा ट्रॅक तुटल्याची घटना घडली. अमरावती शहरापासून दहा किमी…
View On WordPress
0 notes