Tumgik
#लव्ह जिहाद
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'लव्ह जिहाद' विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले नागपूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत इतर राज्यांनी केलेल्या कायद्याचा अभ्यास करेल, मात्र राज्यात तसा कायदा आणण्याचा निर्णय तूर्तास घेतलेला नाही.   विमानतळावर पत्रकारांनी ‘लव्ह जिहाद’वर फडणवीस यांना राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी…
View On WordPress
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
nashikfast · 10 months
Text
गैरकृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : हर्षदा ठाकूर; येवल्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा
येवला : शहर व परिसरामध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, लव्ह जिहादच्या घटना संस्कृतीला व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरामध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक असून, यातील संशयित नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हर्षदा ठाकूर यांनी केले आहे. शहरामध्ये नुकत्याच घडलेल्या संतापजनक घटनेविरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
****
महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्याचं शासन समर्थन करणार नाही -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
हेमोफेलिया आजारावरच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व ३६ जिल्ह्यांत `डे केअर` केंद्र सुरू करण्याची सरकारची घोषणा
मणिपूरमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपतींची भेट
महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग - जी 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाच्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन
आणि
महसुल सप्ताहानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रम
****
महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं तर त्याचं समर्थन शासन करणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात त्यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं.
विधानसभेत काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी दिलेला संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरचा स्थगन प्रस्ताव, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. त्यावेळी फडणवीस यांनी, भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या आवाजाचा नमुना घेतला जात आहे, त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. ते म्हणाले,
‘‘अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिनांक २९ जुलै २०२३ रोजी संभाजी भिडे गुरूजी व अन्य दोन व्यक्तींविरूद्‍ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय मी या सभागृहात पुन्हा सांगतो, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल. त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल.’’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या शिदोरी या मासिकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं देखील फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही ते याबाबत उत्तर देताना फडणवीस म्हणाले.
****
औरंगजेबाचं उदात्तीकरण करून दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करण्यात येईल, गरज पडल्यास विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल असं देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य नितेश राणे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथल्या धर्मांतराच्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल, असं फडणवीस यांनी, हरीभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. 'लव्ह जिहाद' बाबत विविध राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास सुरू असून, याबाबतचा कायदा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचं, ते म्हणाले.
****
राज्यातल्या सर्व शासकीय बांधकामांसाठी केवळ दगडातून तयार केलेल�� वाळूच वापरण्याचं बंधन घालण्याचं धोरण जाहीर केलं जाईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत दिली. आमदार प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. अनेक अडचणींमुळे सरकारने आणलेलं वाळू धोरण सुरळीत होण्यासाठी वेळ लागत आहे, राज्यात २८ लाख ४७ हजार ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
****
दरम्यान, विधानसभेत काल समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत विरोधी पक्ष सदस्यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. या महामार्गावर अनेक अपघात होत असून, हा रस्ता तातडीनं बंद करून त्यावर तज्ज्ञांची समिती स्थापन करावी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या सदस्यांनी केली होती, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव नाकारला.
****
अनुवांशिक रक्तदोषामुळे होणाऱ्या हेमोफेलिया या आजारावरच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व ३६ जिल्ह्यांत, जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये `डे केअर` केंद्र सुरू करण्याची घोषणा, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत केली. भारतीय जनता पक्षाच्या उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. सध्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यांत हेमोफेलिया या आजारावरची उपचार केंद्रं आहेत. भविष्यात सर्वच जिल्ह्यात ही केंद्रं होतील आणि या केंद्रांमध्ये डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी आणि प्रशिक्षणासाठी पथक उपलब्ध करुन देण्यात येईल, राज्यभरात या आजारासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेण्यात येईल, असं मंत्री सावंत यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी या आजारासाठी २७ कोटी रुपये तर या वर्षासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याची टीका, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांतर्फे सभागृहाबाहेर अभियान राबवणार असल्याचं त्यांनी काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
मणिपूरमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या राज्यातली हिंसक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली असल्याचं, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं गेल्या महिन्यात मणिपूरचा दौरा केला, त्यावेळी जे पाहिलं, ते राष्ट्रपतींसमोर मांडलं, असं ते म्हणाले. मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावं, या मागणीबाबतही या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींकडे निवेदन दिलं, त्यावर योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचं खरगे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत, पंतप्रधानांनी या मुद्यावर निवेदन द्यावं अशी मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरुन घोषणा दिल्या. या गोंधळातच प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचे प्रयत्न पीठासीन अधिकाऱ्यांनी केले, मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना मणिपूर हिंसाचारावर स्थगन प्रस्ताव मांडायला परवानगी नाकारली. सदनात निवेदन करणं हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार असल्यामुळे त्यांना सदनात येण्याचे आदेश देऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षांच्या भूमिकेनं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
****
महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जी - 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाची मंत्रिस्तरीय बैठक कालपासून गुजरातमधये गांधीनगर इथं सुरु झाली. त्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान बोलत होते. सहकार क्षेत्रात विशेषतः दुग्धव्यवसायात महिलांनी बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. महिलांच्या विकासाकरता सरकार वचनबद्ध असून, मुद्रा योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं "India @ 75: Contribution of Women’ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख ६० हजार कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विक्री केली जात आहे. ई-पोस्ट ऑफिस या सुविधेच्या माध्यमातूनही नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करता येणार आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला प्रचंड यश मिळालं होतं. २३ कोटी कुटुंबांनी त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवला, तर सहा कोटी जणांनी हर घर तिरंगा वेबसाइटवर सेल्फी अपलोड केले होते.
****
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी वाढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात एक कोटी ४३ लाख टन इतकं दूध उत्पादन झालं आहे. दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी देशातल्या सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी राज्यांना सोळा गोकुळ आणि दोन राष्ट्रीय कामधेनू प्रजनन केंद्रांच्या स्थापनेसाठी निधी जारी करण्यात आला असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या नागपूर दौऱ्यावर असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतक महोत्सवी समारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसंच, रेशीमबागेतल्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक केंद्रालाही ते भेट देणार आहेत. त्यानंतर, उपराष्ट्रपती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत, `प्राणिती’ या भारतीय महसूल सेवा विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील करणार आहेत.
****
मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेला `सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग उपचार केंद्र` हा प्रकल्प राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा या केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत केली. हा प्रकल्प जून २०१६ मध्ये सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता.
****
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेहाचं काल मुंबईत जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, उद्या देसाई यांच्या एन डी स्टुडिओत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नितीन देसाई यांनी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या एन. डी. स्टुडिओत आत्महत्या केली, ते ५८ वर्षांचे होते. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन तर बालगंधर्व या मराठी चित्रपटाची निर्मीतीही केली आहे.
देसाई यांच्या अकस्मात मृत्यूबद्दल सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्यानं एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचं काम करतांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासोबतच दर्जेदार आणि गतीनं काम करण्याचे निर्देश औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिले आहेत. त्यांनी काल जायकवाडी धरणातल्या उद्भव विहीरीच्या सुरू असलेल्या कामाला भेट देऊन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल महसुल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. पैठण इथं महसूल कार्यालयात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यालयातल्या तलाठी, मंडळ अधिकारी, अव्‍वल कारकून यांच्यासह चाळीस महिला आणि तीस पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच रक्तदान शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केलं.
दरम्यान, युवा संवाद कार्यक्रमात जिजामाता कन्या विद्यालयातल्या विद्यार्थिनींनी कार्यालयाला भेट देऊन महसूल कार्यालयाच्या कामाकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
खुलताबाद तहसिल कार्यालयात तहसिलदार स्वरूप कंकाळ यांच्‍या हस्ते गल्लेबोरगाव इथल्या नाथ विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचं वाटप करण्‍यात आलं.
****
महसूल सप्ताहानिमित्त काल लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयात युवा - संवाद कार्यक्रम, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर माहिती आणि ज्ञानासाठी करावा, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. शिक्षणासाठी प्रवेश घेताना आवश्यक शासकीय कागदपत्रांसंबंधी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी काही विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.
बीड इथं महसूल सप्ताहानिमित्त के. एस. के महाविद्यालयात युवासंवाद या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आजपासनू टी -ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे. पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा मैदानावर होणार असून, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं याआधी झालेली वेस्ट इंडिज विरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका एक - शुन्यनं, आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन - एक नं जिंकली आहे.
****
जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातल्या मौजे अंभोरा शेळके इथल्या ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. ग्रामसेवक महबुब अमिन मसुलदार यानं तक्रारदाराच्या वडीलांचं घर, वारसा हक्काने नावावर करण्यासाठी ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचं उदिष्‍ट असलेल्या तीनशे अठ्ठावीस गावांमधली अपूर्ण कामं २४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत. याबाबतच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. उप अभियंता, शाखा अभियंता, गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी समन्वय ठेवून ही कामं पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.  
****
कडधान्य आणि गळीत धान्य पीक स्पर्धेसाठी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज  स्विकारण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर ही स्पर्धा होत आहे. सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तुर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या अकरा पिकांसाठी स्पर्धा होत आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत फरार , लव्ह जिहादचा संशय
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बिकानेर येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली असून दोन्ही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने बिकानेरमध्ये वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणात लव जिहाद अँगल असल्याचा आरोप केला जात असून सोशल मीडियावर त्या दोघींनी एक व्हिडिओ शेअर करत आमच्यामुळे आता फक्त दंगली करू नका असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nbi22news · 2 years
Video
youtube
#nbinewsmarathi: श्रद्धाची हत्या प्रकरणात लव्ह जिहाद चा संबंध असेल तर श्...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा…
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा…
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा… पाटणः हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन असा इशारा लव्ह जिहाद प्रकरणी पाटणमध्ये आज महाआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी दिला आहे. आपल्या इथे हिंदूंची संख्या जास्त असूनही आणि मूठभर जिहादी असूनही ते आपल्याला भारी पडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्याची कुवत आहे का…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
प्रश्न लव्ह जिहाद युवतीचा एकटा प्रवास पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती ysh 95
प्रश्न लव्ह जिहाद युवतीचा एकटा प्रवास पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती ysh 95
अमरावती : शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे. हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी :  हिंदुत्ववादी संघटनांचा विधानभवनावर  मोर्चा 
नागपूर :   हिवाळी अधिवेशनावर बुधवारी  लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला. श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत. भारतातील आणखी फाळणी टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती व इतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी नागपूर विधानभवनावर ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
पर्यावरण संरक्षणासाठी ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त.
सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; औरंगाबाद इथल्या निरंकारी सत्संगात मुख्यमंत्री सहभागी.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची तयारी पूर्ण-मतदान पथकं साहित्यासह मतदान केंद्रावर दाखल.
आणि
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात वडीकाळ्या इथं जनजागृती फेरी.
****
पर्यावरण संरक्षणासाठी ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ९७ वाव्या भागातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे १७ प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल यांचाही समावेश आहे. त्यामुळे ई- कचऱ्याचा योग्य वापर झाला पाहिजे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
भरड धान्ये आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निरोगी जीवनासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात योगासह भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्हीबाबतचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
देशातल्या पाणथळ जागांची संख्या आता ७५ झाली असून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक समुदायांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचही पंतप्रधानांनी आजच्या मन की बातच्या माध्यमातून अभिनंदन केलं.
प्रजासत्त्ताक दिनाच्या औचित्यानं सादर झालेल्या दिमाखदार पथसंचलनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
****
प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा- बिटींग द रिट्री�� ला नवी दिल्लीत प्रारंभ झाला आहे. विजय चौकात सुरू असलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सैन्य दलाची विविध बॅण्डपथकं भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित सुरावटी या सोहळ्यात सादर करत आहेत.
****
सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक इथं श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेले पाच दिवस सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, जिल्ह्याचे पा��कमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना औषधी वनस्पतींची माहिती मिळते, शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळतं, तसंच पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठं पाठबळ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. राज्यातील अडचणीत असणाऱ्या ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन इथं आयोजित ५६ व्या निरंकारी वार्षिक संत सत्संग सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हजेरी लावली. या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. निरांकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबईत ’हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‘लव्ह जिहाद, तसंच धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, आशिष शेलार, नितेश राणे, सदा सरवणकर, किरण पावसकर आदी नेत्यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
दरम्यान, लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असून, त्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून जातीजातीत तेढ निर्माण केली जात आहे, असं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कासेगाव इथं विरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचं उद्धाटन आज पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. धर्मनिरपेक्ष या शब्दाला आज तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, हे देशाच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रानं जाती निर्मूलनामधे महत्त्वाची भूमिका बजावली असून राज्यातील प्रत्येक जातीने, धर्माने या निर्मूलनात सहभाग घेतल्याचं प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केलं आहे. वंचितांचे वर्तमान या आपल्या पुस्तकावरच्या एका चर्चासत्रात ते नागपूर इथं आज बोलत होते. या पुस्तकात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय घटकांची मुद्देसूद माहिती असून भारत सरकारच्या राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणाची माहिती आणि आकडेवारी वापरात घेऊन वाचकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
नाशिक पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिक इथं माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. हा निर्णय पक्षाच्या वतीने नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर घेण्यात आला असल्याचं, विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथकं साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचली आहेत. निवडणुकीसाठी जिल्हानिहाय पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान उद्या ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. विभागात असलेल्या २२७ मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाही. मतदान प्रक्रियेचं  अखंडीतपणे व्हिडीओग्राफी तसंच वेबकास्टींग केले जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांनी मतदानासाठी मतपत्रिकेसोबत दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करावा. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एक हा अंक नमूद करावा. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शवणं ऐच्छिक आहे. एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर एक हा अंक नमूद करू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत महिनाभरापासून साखळी उपोषण करत असलेल्या जालना जिल्ह्यातल्या वडीकाळ्या इथल्या ग्रामस्थांनी आज गावातून आरक्षण जनजागृती फेरी काढली. गावातील बालगोपालांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं या पायी फेरीत सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, वडीकाळ्या ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळानं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु यावर काहीच तोडगा न निघाल्यानं वडीकाळ्या ग्रामस्थांनी येत्या पाच फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बेहिशोबी मालकत्तेची चौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी यासंदर्भात न्यायलयात याचिका दाखल केली होती, लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुनही तक्रारीची चौकशी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आंधळकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघात सध्या अंतिम सामना सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंड संघाच्या १० षटकांत पाच बाद ३९ धावा झाल्या होत्या.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज सायंकाळी सात वाजेपासून लखनऊ इथं खेळला जाणार आहे. रांची इथं झालेला पहिला सामना जिंकून न्यूझीलंड संघ मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
बीएससीच्या विद्यार्थ्याला पळवून लावल्यानंतर नववी पास मुस्लिम मुलाने लग्न केले, भाजप खासदाराने लव्ह जिहादला सांगितले
बीएससीच्या विद्यार्थ्याला पळवून लावल्यानंतर नववी पास मुस्लिम मुलाने लग्न केले, भाजप खासदाराने लव्ह जिहादला सांगितले
हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला आहे मात्र पोलिस दोघेही विवाहित असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्राचा अमरावती एका नववी पास मुस्लिम व्यक्तीने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीचे बळजबरीने अपहरण करून तिच्याशी लग्न केले आहे. आता त्या मुलीला तिच्या पालकांकडे जायचे आहे, म्हणून तिला जाऊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
योगी आदित्यनाथांना घटनेचा अभ्यास करण्याची गरज, माजी अधिकाऱ्यांनी सुनावले खडे बोल
योगी आदित्यनाथांना घटनेचा अभ्यास करण्याची गरज, माजी अधिकाऱ्यांनी सुनावले खडे बोल
लखनऊ : भारतीय प्रशासकीय सेवेतील १०० हून अधिक माजी अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केलीय. राज्यात परसत चाललेल्या घृणा आणि कट्टरतेबद्दल या अधिकाऱ्यांनी काळजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांना राज्यघटनेतील तरतुदींचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. उत्तर प्रदेश हे राज्य द्वेष, भेदभाव आणि धर्मांधपणाचं केंद्र बनल्याचं माजी अधिकाऱ्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes