Tumgik
#लोटला
Text
वादळी झरा
निरंतर वाहे तो झराम्हणतो मी थांब जरा ।सोबतीला आहे पाऊसओली चिंब झाली धरा । वाटतो लोटला काळसूर्यही दिसेना कुठे जरा ।पावसानेही कहर केलायंदाची ही वेगळीच तऱ्हा । शहारा शहरात झाले पाणीरस्त्यावरून लोटल्या धारा ।शेत मळेही तुडुंब भरलेदुःख बळीचे त्याला विचारा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीशांकडून व्यक्त
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन काळात दोन दिवस कपात
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आजपासून प्रारंभ
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत मरीनड्राईव्हवर लोटला अफाट जनसागर
****
देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत रोखे अपीलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते. प्रत्यक्षातल्या तसंच आभासी माध्यमातून होणाऱ्या कामकाजासाठीही या सुविधांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भांडवली बाजाराचा बहुस्तरीय विस्तार झाला आहे. हे लक्षात घेता गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी न्यायाधिकरणाच्या अतिरिक्त शाखा असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
****
संसदेत नव्या खासदारांच्या शपथविधीच्या नियमात लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला यांनी बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेताना शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही. १८व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात अनेक सदस्यांनी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त घोषणाबाजी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना मतदारांसाठी सोयीस्कर आणि जवळच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.
****
सुधारित फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्र सूचना कार्यालयानं आज मुंबईत एक विशेष कार्यक्रम घेतला. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या कार्यक्रमात सुधारित कायद्यांबाबत मार्गदर्शन केलं. सुधारित कायदे हे शिक्षेऐवजी न्यायकेंद्रित आहेत, तसंच यामुळे पीडित आणि तक्रारदारांना तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपली तक्रार आणि जबाब नोंदवता येतील, असं डॉ. डोळे यावेळी सांगितलं.
****
राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून निवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना देण्याबाबत कार्यवा��ीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. नारायण कुचे, प्रकाश सोळंके आणि बबनराव लोणीकर यांनीही याबाबत उप प्रश्न विचारले होते.
****
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली, ते विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्ज केल्यानंतर दीड महिन्यात हे प्रमाणपत्र मिळेल, असं सावे यांनी सांगितलं. मृत झोपडीधारकाच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंत्री सावे यांनी दिली.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. सदनानं आवाजी मतदानानं तो मंजूर केला. त्यामुळे दानवे उद्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.
****
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या निर्णयाला, स्थगितीची मागणी करणारा अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं, फेटाळून लावला आहे. या बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि साडे बारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं केदार यांची शिक्षा निलंबित करून त्यांना जामीन दिला आहे.
****
ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली इथं शाह यांची भेट घेवून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही विखेपाटील यांनी शहा यांना दिली.
****
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला हिंगोली तालुक्यात आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आकांक्षित तालुक्यात करण्याच्या कामांची यादी वाचून दाखवत सर्व निकष मुदतीपूर्वीच पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. यासाठी हिंगोली तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत –
ह्या कार्यक्रमामध्ये सहा पॅरामीटर्स नीती आयोगाकडून निश्चित केलेले आहेत, त्याच्यामधलं १०० टक्के काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ह्याच्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने १०० टक्के प्रेगनन्ट लेडीजचं रजिस्ट्रेशन, महिलांच्या साठी असलेला १०० टक्के पोषण आहार, त्याच अनुषंगाने आपल्याकडच्या कृषी विभागाकडच्या असलेल्या कृषी आरोग्य कार्डचं डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या महिला बचत गटांना १०० टक्के रिव्हॉल्व्हिंग फंड देणे या चार पॅरामीटर्समध्ये १०० टक्के काम करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन आणि आराखडा आज समितीमध्ये मंजूर केला. आणि खऱ्या अर्थाने आकांक्षित तालुका ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण ह्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत, ते १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी इथंही आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन झाल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा केली.
****
बीड जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यातील १८ बँकांच्या २०९ शाखांना जिल्हा अग्रणी बँकेकडून १ हजार ७०७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलं आहे. या अंतर्गत जून २०२४ अखेर या सर्व बँकांनी बीड जिल्ह्यात ९५ हजार ५४३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी ४१ लाखांचं पीककर्ज वितरित केलं आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४४ टक्के आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचं आज मुंबईत वानखेडे क्रीडा संकुलावर भव्य स्वागत होत आहे. दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर हा संघ विशेष बसमधून मिरवणुकीने क्रीडासंकुलावर पोहोचणार आहे. या संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा अफाट जनसागर मरीनड्राईव्हवर लोटला आहे.
दरम्यान, बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर या संघाला दिल्लीहून सायंकाळी मुंबईत आणलेल्या विमानाचं विमानतळावर पाण्याचे फवारे उडवून स्वागत करण्यात आलं. सध्या हा संघ वानखेडे मैदानाकडे रवाना होत आहे.
****
निफाड तालुक्यातील सर्वेश कुशारे याची उंच उडी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणातील पंचकुलात झालेल्या चाचणीत सर्वेशने सव्वा दोन मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांकासह ऑलिम्पिक पात्रताही पटकावली. भारतीय लष्करी सेवेत असलेला सर्वेश हा अशी किमया करणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
****
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत राज्य शासनानं ‘संवादवारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विकासासंदर्भात खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा प्र��्न मार्गी लावावा, असं भुमरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
0 notes
karmadlive · 10 months
Text
करमाड येथील सत्कार समारंभात चोरट्याने साडे चारलाखावर मारला डल्ला
करमाड: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लाडसावंगी येथील सभेस जाण्यासाठी शनिवारी(२) रोजी दुपारी करमाड येथे आगमन झाले. त्याप्रसंगी जमलेल्या जनसागरात फिरून चोरट्यांनी सोने व रोख रकमेसह साडेचार लाख रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. या घटनेची माहिती अशी की जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी करमाड येथे जनसागर लोटला होता. त्यात महिला व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता स्वागतासाठी २१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
कोल्हापूर : शहरात देखावे पाहण्यासाठी जनसागर लोटला
https://bharatlive.news/?p=151405 कोल्हापूर : शहरात देखावे पाहण्यासाठी जनसागर लोटला
कोल्हापूर; पुढारी ...
0 notes
vaidyajyoti · 1 year
Text
किडनीफेल्युअरची कारणे आणि आयुर्वेद उपचार : भाग १
Tumblr media
मार्च महिन्यात जागतिक किडनीदिन साजरा केला जातो, उद्देश किडनीविकारांबाबत जनजागृती असा आहे. एकेकाळी तुरळक आढळणारे किडनी फेल्युअरचे रुग्ण आता सर्रास आढळतात, इतके की, अश्या रुग्णांसाठी शासकीय योजनासुद्धा अस्तित्वात येऊन काळ लोटला. आज जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना हा आजार अल्पावधीत निर्माण झालेला नाही, या लोकांची गेल्या १५ ते २० वर्षांची जीवनशैली लक्षात घेतली तर आपल्याला या आजाराची लहान मोठ्या सर्व कारणांची यादी करता येईल, ही यादी म्हणजे मारुतीची शेपटी ठरावी इतक्या चुका आपण नियमित करीत आहोत मात्र पुढीलप्रमाणे काही ठळक चुका रुग्णांना या आजाराकडे नेत असल्याचे दिसते आहे.
आपल्या पचनशक्तीचा विचार न करता खाणे, भूक नसताना चवीचे म्हणून जड पदार्थ खाणे, दिवसा कामात होतो आणि जेवायला वेळ नव्हता आणि शरीराला पोषण हवे म्हणून रात्री उशिरा पोट तुडुंब भरेस्तोवर जेवणे, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थांचा नियमित उपयोग करणे (मॅकडोनाल्ड सोयीचे म्हणून घरी केलेले ताजे अन्न न खाता बाहेरचे कृत्रिमरीत्या टिकवलेल्या पदार्थांचा नियमित उपयोग करणे.
हेल्थ फंडे या मथळ्याखाली प्रसिद्ध होणाऱ्या उप���यांचा उदा. सकाळी लिंबू-पाणी-मध पिणे, रोज ग्लासभर ताक पिणे, रोज बाऊल भरून कोशिंबीर खाणे, डिटॉक्सच्या नावाखाली दिवसच्या दिवस फक्त लिंबूपाणी अथवा फळांवर राहणे यासारख्या उपायांचा आपल्या वैद्यांशी सल्लामसलत न करता अवलंब करणे.
व्यायाम न करणे, नित्य कार्यमग्न राहून व्यायामासारख्या अत्यंत आवश्यक आरोग्यरक्षक सवयीपासून दूर राहणे, वेळ असताना देखील त्या वेळेचा योगासने, ध्यान-धारणा इ. आरोग्यपूर्ण कृतींसाठी वेळ न देता कमी महत्वाच्या आणि पर्यायाने नुकसान करणाऱ्या सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्ससारख्या निरर्थक बाबीत वेळ दवडणे. 
अनियंत्रित किंवा औषधी घेऊन आणि विशेषतः पथ्य न पाळता केवळ तपासण्यांच्या पातळीवर नियंत्रित केलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लिव्हरशी संबंधित आजार, संधिवात इ. आजार.  
दिवसा झोपणे ( सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत झोपणे हे दिवसा झोपणे या प्रकारात मोडते)
किरकोळ अथवा नियमित दुखण्यासाठी पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेली आणि फरक पडला होता म्हणून पाठ केलेली औषधे, अथवा स्वतःच्या मनाने तात्काळ अँटॅसीड (अॅसीडीटी कमी करणारी औषधे), अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधी यांचा नियमित वापर करणे.
      आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम मग तो परिणाम सकारात्मक असो की नकारात्मक, करण्याची मोठी शक्ती काही छोट्या छोट्या कृतींमध्ये असते. वारंवार घडणारी ही कृती च तर पुढे सवयींमध्ये रुपांतरीत होत जाते. आज तुम्ही आरोग्याच्या अथवा अनारोग्याच्या वळणावर असाल त्याचे सर्वात मोठे श्रेय या जीर्ण कृतीरुपी सवयींनाच तर जाते. उदाहरणार्थ मांसाहारी किंवा तत्सम पचायला जड आहार शरीर पचवू शकत नसल्याच्या अवस्थेतही अश्या आहाराचे सेवन करत राहण्याचा परिणाम म्हणून झालेला गुदार्श म्हणजे पाईल्स सारखा आजार ! वरील उदाहरणाच्या धर्तीवर आज मृत्युचे सर्वात मोठे कारण असणारे विविध आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसांचे विकार इत्यादी आजारांचे महत्वाचे कारण आपल्या सवयींमध्येच तर दडले आहे.
ग्रहण केलेल्या आहाराचे शरीर धातूंमध्ये परिवर्तन करणाऱ्या बाबींमध्ये ज्याप्रमाणे अग्नी ( पाचक अग्नी आणि धात्वाग्नी ), वायु, क्लेद, स्नेह आवश्यक असते त्याप्रमाणे आहाराचे परिणमन करण्यास आवश्यक असलेला काल हा अतिशय महत्वाचा घटक दुर्लक्षित आहे. खाल्लेल्या आहाराचे योग्य ते पचन पूर्ण होण्यास लागणारा काळ पाळल्याने अनेक विकार रोखण्यात मदत होते, पचनावर विनाकारण येणारा ताण एवढ्या साध्या पथ्यानेसुद्धा सहज टाळता येण्यासारखा आहे.
आयुर्वेद मुत्रवह संस्था ( किडनी व संबंधित इतर अवयव समूह ), मस्तिष्क आणि हृदय या तीन अवयवांना अत्यंत महत्वाचे म्हणून विषद करतो. या तीन अवयावांना उद्भवलेला व्याधी हा प्राणाचे हरण करू शकतो असेही स्पष्ट विवेचन आहे. आज या विषयावर मुद्दाम लेखन करण्याचे कारण हे की, या तीन अवयवांच्या बिघाडामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. शिवाय मधुमेहासारख्या आजाराच्या उपद्रव स्��रूपातही मोठा धोका ह्या तीन अवयव व त्यांच्या कार्यक्षेत्रास आहे. त्यामुळेच आज या अवयवांच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे.
अश्यातच अमेरिकेने काही विशिष्ट प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि प्रिझर्व्हेटीव्ह यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घोषित केला आहे कारण, या पदार्थांमुळे किडनी फेल्युअर आणि कर्करोग होतो हे सत्य त्यांनी मान्य केले आहे. आपल्याकडे मात्र पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत आहे. विचारांनी पुढारलेले असणे म्हणजे आपल्या नैसर्गिक सवयींशी फारकत घेणे असे नाही हे आपल्याला समजून घ्यावे ��ागेल अन्यथा जीवनशैलीशी संबंधित आजारांची त्सुनामी फार दूर नाही. आज आम्ही वैद्य मंडळी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि किडनी फेल्युअर असे सर्व आजार एकाच रुग्णामध्ये पाहतो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
 आपल्या स्वास्थ्याचे रक्षण आणि आजारांचे नियोजन वेळेत केलेले कधीही चांगले, आपली गाडी खटारा करून नंतर मेंटेन करण्याची धडपड करण्यासारखे केविलवाणे प्रयत्न कृपया करायला जाऊ नका ! आयुर्वेदाला अनेकदा पर्यायी उपचारपद्धती म्हणून उल्लेखले जाते. मात्र ही उपचारपद्धती पर्यायी नसून मुख्य उपचारपद्धती आहे. जे आधुनिक वैद्यक शास्त्र पदोपदी अडखळत, दररोज आधीच्या दिवसापेक्षा ३६० अंश वेगळे संशोधन पुढे आणत आहे त्या वैद्यक शास्त्राच्या तुलनेत हजारो वर्षांपूर्वी मांडलेले आयुर्वेदीय सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर आपले सोने बावनकशी असल्याचे सिद्ध करत आहे. आयुर्वेदीय चिकित्सा आपल्या आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करु शकतात, कसे ते पुढील भागात समजून घेऊया, तोपर्यंत मात्र आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन आरोग्य परत मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया !  
                                                      वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
                                                      एम. डी. आयुर्वेद
छत्रपती संभाजीनगर
मो. 9049603419  
1 note · View note
marathinewslive · 2 years
Text
बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले... | How idea of rebellion come to mind CM Eknath Shide gave answer rmm 97
बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले… | How idea of rebellion come to mind CM Eknath Shide gave answer rmm 97
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेऊन अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण बंडखोरी नेमकी कोणत्या कारणातून घडली? याबाबत अद्याप अनेक प्रश्न जनतेच्या मनात कायम आहेत. बंडखोरीचा विचार मनात कसा आला? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण : एक महिना लोटूनही मुख्य आरोपी अद्याप फरारच
भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण : एक महिना लोटूनही मुख्य आरोपी अद्याप फरारच
गोंदिया : मदतीचं आश्वासन देऊन  35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱा जिल्ह्यात घडली  होती. या घटनेला आज एक महिना लोटला आहे.  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर घडलेल्या सामूहिक बलात्कार (Bhandara rape case update) प्रकरणातला फरार आरोपी घटनेच्या एक महिन्यानंतरही फरार आहे. 30 जुलै संध्याकाळपासून ते 2 ऑगस्टच्या पहाटेदरम्यान पीडित महिलेवर आधी गोंदिया जिल्ह्यात आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तीव्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तीव्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट
उज्ज्वल निकम यांनी कोणतीही केस घेतली तरी त्याचा निर्णय अनेकदा सरकारच्या बाजूने जातो.शिवसेनेवरील दाव्यावरून सीएम शिंदे आणि ठाकरे कॅम्पमध्ये एससीमध्ये लढा सुरू आहे. उज्ज्वल निकम सीएम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
beednews · 2 years
Text
धारुर शहरात सकाळच्या प्रहरीच घडली हृदयद्रावक घटना; बालकाला ट्रॅक्टरने चिरडले. https://beed24.in/a-heartbreaking-incident-took-place-in-the-morning-vigil-in-dharur-city-the-child-was-crushed-by-the-tractor/
✅व्हाट्सअप ग्रुप join करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/HUeM3X7GyrGHnS8MEBLMzd
धारुरच्या कार्यकर्त्याचे अपघाती निधन; धारुर - माजलगाव रस्त्यावरील घटना. https://beed24.in/accidental-death-of-dharur-activist-incident-on-dharur-majalgaon-road/
अन क्षीरसागर कुटुंबियातील राजकीय दुरावे गळून पडले..! रेखाताईच्या निरोपासाठी जनसागर लोटला. https://beed24.in/political-distance-between-kshirsagar-family-fell-crowds-flocked-to-rekhatais-funeral/
*23 वर्षांपासून* संगणक प्रशिक्षणात विश्वसनीय नाव... *MS-CIT* प्रवेश सुरु...
*डिस्कव्हरी कॉम्प्यूटर्स,*
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर,
किल्ले धारूर जि.बीड.
मोबाईल - 9766202073
0 notes
Text
मित्र
एकेक लागला गळायलानी पाय माझे वळायला ।काळ लोटला वेळ लोटलीमित्रांसाठी लागलो हळहळायला । दिवस तेव्हाचे आठवतातभारी वाटायचे याच मित्रात ।शाळा सुटली नोकरी लागलीकाम काम तेच होतं कर्मात । आता थोडी मिळाली उसंतबोलावे भेटावे वाटत मित्रांना ।पण तेही निघालेत दूर आतासांगा थांबवू कसे मी सर्वांना ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह उत्साहात सुरू
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी
काँग्रेसची भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघासमोर लखनऊ संघाचं १६२ धावांचं आव्हान
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन मतदारांची नोंदणी वाढवणं आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मतदार जनजागृतीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला राज्यपाल बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं.
****
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं आणि राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभं करायला सुरुवात केली असून, नागपूरमधील दीक्षा भूमीचं जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर खरेदी करून त्याचं संग्रहालयात रूपांतर करून शासनानं बाबासाहेबाना खरी मानवंदना दिली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी कायमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला, ते समाजसुधारणेचे अग्रणी होते अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजानं दूर सारलेल्या घटकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्यात स्वाभिमान जागृत केला असं पवार यांनी या निमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यभरात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त विविध उपक्रम, फेऱ्या, मिरवणुका सुरू आहेत. शासकीय आस्थापनांत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरमध्येही डॉ. आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. संविधान चौक इथं काल रात्री बारा वाजता बाबासाहेबांचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागपूर आकाशवाणीत अभिवादन कार्यक्रम झाला. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज बाबासाहेबांच्या विचारांच्या अऩुषंगानं राष्‍ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादनासाठी जनसागर लोटला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील एनडीए आघाडीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रत्येकानं प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेले संविधान हे आज घडीला वाचवणं, लोकतंत्राला वाचवणं ही खरी गरज आहे. या संविधानामुळं सामान्य नागरिकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नागपूर इथं केलं. दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर सर्व चालतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसंच संविधान असेल तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव अमर राहील असंही खर्गे यावेळी म्हणाले.
****
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून `सब का साथ सब का विकास` या तत्त्वाच्या आधारे विविध योजनांची आश्वासनं देणारा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केला. गरिबांना शिधापत्रिकेवर मोफत अन्नधान्य देण्याची योजना पुढची पाच वर्षं चालू ठेवण्याचा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं बांधण्याचा, तसंच ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आय़ुष्मान भारत योजना पोहोचवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. एक देश एक निवडणूक, एकसामायिक मतदारसंघ, आणि पेपरफुटीविरोधी कायदा करण्याचं आश्वासनही भाजपनं याद्वारे दिलं आहे.
****
निवडणुका आल्यानं भारतीय जनता पक्षाला शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांची आठवण झाली असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना भाजपनं सत्तेत असताना दहा वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. समान नागरी कायद्याचं आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिलं होतं मग आतापर्यंत भाजपनं त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपनं जे सांगितलं तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला लवकरात लवकर इतर मागास वर्ग- ओबीसीमधून आरक्षण नाही दिलं तर येत्या पाच जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करायचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज चैत्यभूमी इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. मराठा समाजही विधानसभा निवडणुकीची तयारी करेल, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना शहर तसंच जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांग लागली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी, फराळ वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. जयंतीनिमित्त आज शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
****
लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी बाबासाहेबांनी सामान्य नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि प्रबळ लोकशाही करीता मतदानाचं महत्त्व', या विषयावर व्याख्यान झालं, त्यावेळी डोळे बोलत होते. मतदान निर्भयपणे करता यावं, अशी सुद्धा तरतूद बाबासाहेबांनी केली असल्याचं ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जयंतीनिमित्त डॉ. अरविंद गायकवाड यांचं 'राष्ट्रनिर्माते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर व्याख्यान झालं. बाबासाहेबांनी घटना निर्मीतीबरोबरच ऊर्जा, विद्युत, जल धोरण देखील ठरवल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यावेळी अध्यक्षस्थानी होते.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं शिताफीनं केलेल्या एका कारवाईमध्ये वन्यजीवांच्या अवशेषांची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये घोरपडीच्या ७८१ `हात जोडी` तसंच साडे १९ किलोहूऩ अधिक वजनाचे प्रवाळ याचा समावेश आहे. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून नाशिक जिल्ह्यामध्ये नंदगाव रेल्वेस्थान परिसरात तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या कारवाईत ही अटक केली. महसूल गुप्तचर संचालनालयाला स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांचं यात सहकार्य मिळालं. तस्करांनी आदिवासी वस्तीवर बोलावून या पथकावर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून तस्करा��ा अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
आज १४ एप्रिल, हा दिन 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' म्हणूनही पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्यानं पेट घेतला होता. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन विभागातर्फे आज मुंबईमध्ये सेवा बजावताना आजवर वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी आणि सैनिकांना श्रद़धांजली अर्पण करण्यात आली.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं लखनऊ सुपर जायंटस संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी १६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापासून थोड्यावेळापुर्वी कोलकाता संघानं चौथ्या षटकात दोन बाद ४२ धावा केल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना वानखेडे मैदानावर होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर तुळशी यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. महावितरणचे दक्षता अधिकारी प्रशांत तुळशी आणि दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक गणेश तुळशी यांचे ते वडील होत. आज संध्याकाळी सात वाजता त्यांच्या पार्थिव देहावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
0 notes
karmadlive · 10 months
Text
करमाड येथील सत्कार समारंभात चोरट्याने साडे चारलाखावर मारला डल्ला
करमाड: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लाडसावंगी येथील सभेस जाण्यासाठी शनिवारी(२) रोजी दुपारी करमाड येथे आगमन झाले. त्याप्रसंगी जमलेल्या जनसागरात फिरून चोरट्यांनी सोने व रोख रकमेसह साडेचार लाख रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. या घटनेची माहिती अशी की जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी करमाड येथे जनसागर लोटला होता. त्यात महिला व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता स्वागतासाठी २१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय
IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय
IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मानं (Tilak Varma) आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली. या यशानंतरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मानं (Tilak Varma) आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली. या यशानंतरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. Go to Source
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
विद्यमान जिल्हा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : ऍड. अनिल निरवडेकर
विद्यमान जिल्हा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : ऍड. अनिल निरवडेकर
जिल्हा मंडळाला संत रविदास भवनाचे संकल्प चित्र केले प्रदान कणकवली : संत रविदास भवन हे समस्त चर्मकार बांधवांचे एक स्वप्न आहे. यापूर्वीच्या सर्वच जिल्हा पदाधिकारी यांनी यासाठी निश्चितच प्रयत्न केले. आपल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कालावधीत मंडळाचे नावे सन २०१६ मध्ये जागा खरेदी झाली. त्यानंतर त्या जागी भवन व्हावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असताना मधला कालावधी असाच लोटला. परंतु, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
नवीन टर्फ वॉर दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, सहकारी दिल्लीला रवाना
नवीन टर्फ वॉर दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, सहकारी दिल्लीला रवाना
बघेल हे हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक आहेत. रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि प्रतिस्पर्धी टीएस सिंग देव, ज्यांनी नुकतेच त्यांचे एक मंत्रिपद सोडले, ते शनिवारी संध्याकाळी दिल्लीला काँग्रेस हायकमांडला भेटण्यासाठी रवाना झाले. विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्रात सर्व ठीक आहे का? सगळी कामे सोडून फडणवीस दिल्लीत पोहोचले, शिंदे आजारी पडले
महाराष्ट्रात सर्व ठीक आहे का? सगळी कामे सोडून फडणवीस दिल्लीत पोहोचले, शिंदे आजारी पडले
महाराष्ट्र सरकारचे पहिले चाक म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत गुरुवारच्या सभेचे सर्व कार्यक्रम रद्द केले. दुसरीकडे, दुसरे चाक म्हणजेच देवेंद्र फडणवीसही आपली सर्व कामे सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्र मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु कॅबिनेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes