Tumgik
#शक्ती मोहन
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर-५२ हजार ३०० कोटीच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण 
खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली
आणि
मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित २९ हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, गोरेगाव- मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे - बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच, नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पणही तसंच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंडीयन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत.
****
प्राप्तिकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ७० हजार ९०२ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात २ लाख ६५ हजार ३३६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर, ३ लाख ६१ हजार ८६२ कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि १ हजार ४२६ कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजया विरोधात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राणे यांनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे, असा आरोप राऊत यांनी याचिकेत आरोप केला आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे ही याचिका केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची या संदर्भात भेट घेतली, त्यावेळी गोयल यांनी हे आश्वासन दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती तसंच एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या निर्माण कार्याचं सादरीकरण केलं. नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीकांत शिंदे,  सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जुलैला कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने कारगिल हेलिपॅडवर एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ‘अपनी सेना को जाने’ नामक या प्रदर्शनात विविध शस्त्र तसंच उपकरणं दाखवण्यात येत आहेत. परिसरातल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसंच अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली काढण्यात येत आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येत आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रस्त्यावर दाखल झाले आहेत. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत मंच उभारण्यात आले आहेत. दरम्यान, या रॅलीसाठी जरांगे यांचं शहरात आगमन होताच खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली आहे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ महिलांची नोंदणी ऑनलाईन तर ६२ हजार ४८८ महिलांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ग्रामीण भागात नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांकडून ही नोंदणी करून घेतली जात आहे.
लातूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचं चावडी वाचन आज जिल्ह्यातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलं. अर्जदाराची नावं, त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातल्या आलमला इथल्या चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. उदगीर नगरपरिषदेच्या चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते. जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यावेळी चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली.
अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. आज केडगाव परिसरातल्या मदत केंद्राचं जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ हा दोन दिवसीय उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणं तसंच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सावंगी इथं मतदारांशी संवाद साधला. सरपंच अश्विनी जगदाळे परिसरातील मतदार, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी तसच परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षवल्ली वाढवूया गाव हरित बनवूया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी कळवलं आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. सर्व वयोगटातील लोकांना या वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यात येणार असून, गाव तिथे घनवन, स्मृति उद्या निर्मिती, नदीकाठी बांबू लागवड करणे, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन���ी रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातले नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे पाण्याची धार लागल्याने दुसऱ्या मजल्यावर पाणी झालं आहे. हवामान विभागाने रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. डहाणू, पालघर, बोईसर, जव्हारसह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे.
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
असीम रियाझ आणि शहनाज गिल बिग बॉस OTT 2 होस्ट करणार आहेत
असीम रियाझ आणि शहनाज गिल बिग बॉस OTT 2 होस्ट करणार आहेत
Today TV News: प्रसिद्धीच्या बाबतीत टीव्ही स्टार्स बॉलिवूड स्टार��ेक्षा कमी नाहीत. एकही दिवस असा जात नाही की जेव्हा हे तारे मथळे घेत नाहीत. आजही छोट्या पडद्याच्या दुनियेत सकाळपासूनच खळबळ उडाली आहे. बिग बॉस OTT 2 मध्ये शहनाज गिल आणि असीम रियाझ यांची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याची बातमी आहे. त्याचवेळी संग्राम सिंह आणि पायल रोहतगी यांच्या लग्नाची तारीख लीक झाली आहे. एवढेच नाही तर मुनव्वर फारुकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
Raftaar चा रॅप आणि शक्ती मोहनचा धमाकेदार डान्स, दक्षिण भारतीय शैलीत रिलीज झालेले नवीन गाणे
Raftaar चा रॅप आणि शक्ती मोहनचा धमाकेदार डान्स, दक्षिण भारतीय शैलीत रिलीज झालेले नवीन गाणे
रास्कला गाणे: शक्ती मोहनच्या नृत्याबद्दल आपल्याला आधीपासूनच माहिती आहे आणि रॅपर रफ्तारच्या प्रतिभेला सर्वजण सलाम करतात आणि जर ते दोघे एकत्र आले तर नक्कीच आश्चर्यकारक असेल. असाच चमत्कार नव्याने रिलीज झालेल्या रास्कला या गाण्यात पाहायला मिळतो. हे गाणे नुकतेच द ग्रेट इंडियन मर्डर वेब सिरीजमध्ये जोडण्यात आले असून ते गुरुवारी रिलीजही करण्यात आले. शक्ती मोहनचा धमाकेदार डान्स आणि वेगवान रॅपने…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
गायक निती मोहन आणि अभिनेता निहार पांड्या यांचा विवाह होणार असून त्यापूर्वी नितीने आपल्या बहिणी शक्ती, मुक्ती आणि किर्ती मोहन यांच्यासह प्रि - वेडिंग फोटोशूट केला. प्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पादुकोण हिचा पूर्वी असलेला प्रियकर निहार पांड्या आणि निती मोहन यांचा विवाह १५ फेब्रुवारी ला हैद्राबाद येथे संपन्न होणार आहे.  . . . #Singer #NeetiMohan #NiharPandya #Marriage #PreWedding #Photoshoot #With #Sisters #ShaktiMohan #MuktiMohan #KirtiMohan #DeepikaPadukone #ExBoyfriend #Wedding #Hydrabad #NotWithoutmyMohans #MaharashtraToday https://www.instagram.com/p/Bt3AS9Vh-l3/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1ff74chi3sq9k
1 note · View note
darshanpolicetime1 · 3 years
Text
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान; अभिनेते दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ सहेजा सन्मानित
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान; अभिनेते दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ सहेजा सन्मानित
मुंबई, दि. २५ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सिने कलाकार, उद्योजक, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींना राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्र शक्ती फाऊंडेशनतर्फे आज (दि. २५) राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात सिने अभिनेते – दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ. सहेजा, उत्तराखंडचे उपमहाधिवक्ता डॉ. वीरेंद्र रावत, डॉ. गुरुमुख जगवानी,  महेश राठी,  प्रबोध डावखरे, मोहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान; अभिनेते दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ सहेजा सन्मानित
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान; अभिनेते दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ सहेजा सन्मानित
मुंबई, दि. २५ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सिने कलाकार, उद्योजक, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींना राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्र शक्ती फाऊंडेशनतर्फे आज (दि. २५) राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात सिने अभिनेते – दिग्दर्शक अरबाज खान, जैन साध्वी डॉ. सहेजा, उत्तराखंडचे उपमहाधिवक्ता डॉ. वीरेंद्र रावत, डॉ. गुरुमुख जगवानी,  महेश राठी,  प्रबोध डावखरे, मोहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
देशातील लोक म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है' - मोहन भागवत
देशातील लोक म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है’ – मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहेअस विधान केले आहे.
 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम ३७० मोदी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
मुंबईत दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांचं जोरदार शक्ती प्रदर्शन
पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवण्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं वचन तर अन्याय झुगारून टाकण्यासाठी उठाव करावा लागल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण
आपल्या नाराजीची चर्चा बंद करण्याचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं आवाहन
लोकसंख्या नियंत्रणासाठी समग्र धोरण तयार करुन काटेकोर अंमलबजावणी करा- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला येत्या १५ दिवसात मान्यता देण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत एकूण ८३ पदके जिंकत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम
आणि
भारत - दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला एक दिवसीय क्रिकेट सामना
****
मुंबईत काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादरमधल्या शिवाजी पार्क, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानावरुन, उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी दोन्ही गटांच्या नेत्यांनी केलेल्या भाषणात कोणतीही भीडभाड न ठेवता एकमेकांवर कठोर आरोपही केले. सामान्य शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा दोन्ही गटांनी आपल्या भाषणात केला. दोन्ही मेळाव्याला शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आपण साथ दिली तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवण्याचं वचन देत असल्याचं, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
“शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवरती आलेली संकटं बघत मोठा झालेलो आहे. आजसुद्धा माझ्या हातामध्ये काही नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावरनं चालण्याची तयारी पाहिजे. वाटेमध्ये काटे असतील, खडे असतील, टोचतील, पाय रक्तबंबाळ होतील. जसं मी माझ्या पित्यांना, शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं की आपल्याला मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल. तसंच मी तुम्हाला वचन देतोय की तुम्ही साथ सोबत भक्कमपणाने दिलेलीच आहे. ही जी तुमच्या मनातली आग आहे, या आगेतून उद्या हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा वणवा पेटलेलाच आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे गद्दार, यांची गद्दारी ही त्या रावणासारखी जळून भस्म होणार आहे. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी तुम्हाला पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल.’’
भारतीय जनता पक्षानं पाठीत वार केल्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडीसोबत गेल्याचं सांगताना ठाकरे यांनी, भाजप आणि शिवसेनेत अडीच- अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हे ठरलं होतं, हे आपण शपथ घेऊन सांगतो असं नमूद केलं.
देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण आमचाच आहे, देश हाच आमचा धर्म आहे, आम्ही हिंदूत्व सोडलेलं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. महागाई, बेकारी, गरीबी, विषमता याविषयी नवं सरकार काहीच बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, अशीही टीका त्यांनी केली.
****
वांद्रे कुर्ला संकुल मैदानावरच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असून, आमच्यावर होणारा अन्याय झुगारून टाकण्यासाठी आम्हाला उठाव करावा लागला, असं सांगितलं. आमदार, बाहेरील राज्यातले शिवसेनेचे नेते यांनी आम्हाला पाठिंबा दिला, यावरून उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं, अशी टीका शिंदे यांनी केली. ते म्हणाले,
‘‘बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व तुम्ही गुंडाळून टाकलं, तेव्हा मात्र आम्हाला भुमिका घ्यावी लागली आणि मग तेव्हा हा उठाव आम्ही केला. का सोडले, चाळीस आणि दहा पन्नास आमदारांचा, १२ खासदारांचा, देशातल्या १४ राज्यातले राज्यप्रमुख आहेत त्यांनी दिल्लीला येऊन मला पाठिंबा दिला. का? शेकडो पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, लाखो शिवसैनिक, याचा तुम्ही का फोडला गद्दार गद्दार असा टाहो फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरक्षण करा, का तुम्हाला यांनी सोडलं.’’
आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला, क्रांती केली, परिवर्तन केलं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी, आपल्या भूमिकेचं समर्थन करतांना सांगितलं. शिंदे यांच्या मेळाव्याला ठाकरे कुटुंबातले जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे उपस्थित होते.
****
संघर्षाला आपण घाबरत नसल्याचं सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराजीची चर्चा बंद करण्याचं आवाहन, कार्यकर्त्यांना केलं आहे. बीडमधल्या सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर पार पडलेल्या दस��ा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. आता आमदारांचा यादी आली तर माझे नाव घेऊ नका, आपण कोणावरही नाराज नसल्याचं त्या म्हणाल्या.
“कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे.मी इतके दिवस बोलले नाही. मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. माझा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. मी तुम्हाला असत्य कधी बोलणार नाही. मी सत्याचच बोलणार सत्य अस्वस्थ असतं पण पराजीत होत नाही. कधीच पराजीत होत नाही. त्यामुळे हा विषय संपलाय माझ्या लेखी. ज्यांना करायचंय ते क��तील तेव्हा करतील, आपण गपचुप २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे.’’
व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असल्याचा सांगत आपला त्यावर विश्वास असल्याचं मुंडे यांनी यावेळी नमूद केलं.
****
वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी समग्र धोरण तयार करावं आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांना संबोधित करताना काल ते बोलत होते. एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आणि पद्मश्री संतोष यादव यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. लोकसंख्येत पंथ, संप्रदायाचे प्रमाण असंतुलित झाल्यानं देश तुटतात, याचे परिणाम ५० वर्षांपूर्वी भारतानं भोगले आहेत. त्यामुळे या संतुलनाकडे लक्ष देण्याची आणि लोकसंख्येबाबत समग्र धोरण बनवण्याची आवश्यकता, तसंच त्यातून कुणालाही सूट न देण्याची गरज, भागवत यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, अर्थव्यवस्था, धार्मिक हिंसाचार यासह अन्य मुद्यांवर भाष्य केलं.
औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, नाशिकमध्येही काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शिस्तबद्ध पथ संचलन करण्यात आलं.
****
कोल्हापूरचा शाही दसरा सोहळाही काल मोठ्या उत्साहात पार पडला. शाहू महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्यासह संपूर्ण कुटूंब आणि मान्यवर, या शाही दसरा सोहळ्यात सहभागी झाले होते.
****
यवतमाळमध्ये रावण दहन कार्यक्रमाला आदिवासी समाज संघटनांनी विरोध करत चिपको आंदोलन केलं. महात्मा राजा रावण हे गोंड राजा असून, त्यांच्या पुतळ्याचं दहन करून समाजाच्या भावना दुखावू नयेत, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली. या मागणीसाठी आदिवासी समाजाचा गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाशी लढा सुरू आहे.
दरम्यान, नंदुरबारमधील तब्बल ३७ वर्षांची परंपरा असलेला रावण दहणाचा कार्यक्रम काही आदिवासी संघटनांच्या विरोधानंतर काल रद्द करण्यात आला.
****
मराठवाड्यात सर्वत्र पारंपारिक पद्धतीने विजयादशमी साजरी झाली.
औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा यात्रेची काल सांगता झाली. काल सायंकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत बालाजीचा रथ निघाला. यासोबतच सिमोल्लंघन करण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा काल पहाटेच मोठ्या उत्साहात पार पडला.
जालना इथं दशहरा महोत्सव समितीच्या वतीनं जेईस महाविद्याल्याच्या मैदानावर नयनरम्य आतशबाजी आणि रावण दहन कार्यक्रम पार पडला. रावण दहन पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
नांदेड इथं तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब गुरुद्वारा इथं पारंपारिक दसरा महल्ला हल्लाबोल कार्यक्रम घेण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथमध्ये आठवे ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथाचा पालखी उत्सव सोहळा रात्री उशिरा पर्यंत मोठ्या उत्साहात सुरु होता. दोन वर्षानंतर निघालेल्या या पालखी सोहळ्यास भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. 
****
दीक्षाभूमीला अ दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, त्याचप्रमाणे नागपूर सुधार प्रन्यास द्वारे १९० कोटी रुपयांच्या दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला देखील येत्या १५ दिवसात मान्यता दिली जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दीक्षाभूमीवरील ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच कमलताई गवई उपस्थित होत्या. बुद्ध विचार हा विश्व कल्याणाचा असून स्वातंत्र्य, समता, बंधुता हा त्याचा आधार आहे, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, नागपूरची दीक्षाभूमी ही जागतिक पर्यटन भूमी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्र शासनातर्फे बुद्धिस्ट सर्कीटद्वारे चांगले रस्ते बांधून, बुद्ध पर्यटन स्थळ जोडण्याचं काम सुरु आहे. इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकही लवकरच पुर्णत्वास येईल, अशी माहिती  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
****
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नसून, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं काम करतील असं पटोले यावेळी म्हणाले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४१६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २३ हजार २५५ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. काल ४७७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७२ हजार २५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर काल पहाटे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये ध��क होऊन हा अपघात झाला. सी-लिंकवर एका मोटारीला अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. रुग्णवाहिकेत रुग्णांना टाकत असताना याचवेळी मागून आलेल्या एका मोटारीनं अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली.
****
राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्तानं उस्मानाबाद डाक विभागानं येत्या ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत डाक विभागाच्या विविध योजना पोहचवण्यासाठी विविध खाती उघडणं, शिबिरं, टपाल जीवन विमा शिबिर, आधार कॅम्प, फिलाटली सेमिनार आणि सामाजिक सुरक्षा योजनांवरील शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये स्तन तसंच गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि उपचार याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी, लातूर जिल्ह्यात संजीवनी अभियाना���ी सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातल्या आशा, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत, संजीवनी अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. या पहिल्या टप्यात घरोघरी जावून ३० वर्षावरील सर्व महिलांना गर्भाशयमुख आणि स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती गोळा करण्यात आली.
****
गुजरातमध्ये सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. सशस्त्र दलाचा संघ पहिल्या स्थानावर कायम असून, हरयाणा दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत २४ सुर्वण, २२ रौप्य, आणि ४१ कांस्यपदकं अशी एकूण ८७ पदक मिळवली आहेत.      या स्पर्धेत महाराष्ट्राची घोडदौड कालही सुरु राहिली. राजकोट इथं सुरू असलेल्या डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामनं हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकून लागोपाठ दुसरं विजेतेपद मिळवलं. याआधी या स्पर्धेत तिने तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. याच प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या ईशा वाघमोडे हिने हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारातही कांस्य पदकाची कमाई केली.
टेनिसमधे, महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे यानं मनीष कुमार विरुद्ध पहिला सेट जिंकूनही पाठीच्या दुखण्यामुळे सुवर्णपदकाचं स्वप्न त्याला साकारता आलं नाही. टेनिसच्या एकेरीतल्या लढतीत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागले. मात्र मिश्र दुहेरीत त्यानं ऋतुजा भोसलेच्या साथीनं सुवर्णपदक पटकावलं.
****
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. लखनौत आज दुपारी दीड वाजता पहिला सामना होईल. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे. आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमुळे या मालिकेतून अनेक महत्वाच्या खेळाडूंना संघातून आराम देण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात पीक कर्ज वाटपात आतापर्यंत उद्दिष्टाच्या फक्त ७५ टक्के कर्ज वाटप झालं आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सर्वात जास्त ९० टक्के पीक कर्ज वाटप औरंगाबाद जिल्ह्यात, तर सर्वात कमी ६० टक्के कर्ज वाटप परभणी जिल्ह्यात झालं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.
·      केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे
·      जल शक्ती अभियान-कॅच द रेन मोहिमेचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुभारंभ
·      कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश
·      कोविड काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
·      राज्यात कोविड संसर्गाचे १०३ तर मराठवाड्यात तीन नवे रुग्ण
·      पाच कोटी रुपयांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम औरंगाबाद महानगरपालिकेला परत करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे पीएफ कार्यालयाला आदेश
आणि
·      राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाटेचा हवामान विभागाचा इशारा, मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ
****
केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल मागे घेतला. महाराष्ट्र वीज कार्मतारी संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी ही माहिती दिली. या संपाबाबत वीज कार्मचारी संघर्ष समितीची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी काल चर्चा झाली. ही चर्चा समाधानकारक झाली असून, राज्यातल्या ऊर्जा कंपन्यांचं खाजगीकरण होणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती, मोहन शर्मा यांनी दिली. तसंच वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर उर्जामंत्र्यांनी सकारात्मक मान्यता दिली असून, यावर पुढील तीन ते चार दिवसांत कारवाई होईल, असं ही ते म्हणाले आहेत. या सोबतच संप केल्यानं कोणत्याही कामगारावर कारवाई होणार नाही, असं आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.  
दरम्यान, संपाबाबत काल वार्ताहरांशी बोलताना ऊर्जामंत्री राऊत यांनी, महाविकास आघाडी सरकार खाजगीकरणाचं समर्थन करणार नाही, असा खुलासा केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बँक कर्मचाऱ्यांनी काल दुसऱ्या दिवशीही संपात सहभागी होत बँकेच्या शाखांसमोर निदर्शनं केली. तसंच नवीन कामगार कायदा आणि खासगीकरणाचं धोरण यासंदर्भात माहितीपत्रकाचं कर्मचाऱ्यांनी वाटप केलं.
आयटकच्या वतीनं पैठण इथं आशा, आणि गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार तसंच उमेद अभियानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.
नांदेड इथं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नांदेड शाखेच्या वतीनं खाजगीकरणाला विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
जल शक्ती अभियान-कॅच द रेन मोहिम २०२२ चा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय जल पुरस्काराचंही राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं. राज्य, संघटना आणि व्यक्तिगत पातळीवरील विविध स्तरात ११ श्रेणींमध्ये ५७ पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राने चार पुरस्कार पटकावले आहे. औरंगाबाद इथली ग्रामविकास ही बिगर सरकारी संस्था, सोलापूर जिल्ह्यातली सुर्डी ग्रामपंचायत, रत्नागिरी जिल्ह्यातली दापोली नगरपंचायत आणि दैनिक ॲग्रोवन यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.  उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेला, आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला, संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. औरंगाबादच्या दक्ष‍िणेस १२ किलोमीटर अंतराव��� असणाऱ्या चित्ते नदीचं पुनरूज्जीवन केल्याबद्दल संस्थेला गौरवण्यात आलं. दुष्काळ निवारणासाठी चित्ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास शिवपुरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
Byte….
२०१२ साली चित्ते नदी खोऱ्यामध्ये पुनर्जीवन अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आला. माथा ते पायथा या तत्वानुसार कम्पार्टमेंट फंडीग, नाला रुंदीकरण खोलीकरण, साखळी पद्धतीचे पंचवीस बंधारे, पाझर तलावातील सत्तर हजार घनमीटर गाळ काढण्याचा कार्यक्रम यामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. लोक सहभागातून एक जलक्रांती या भागामध्ये घडलेली आहे. या सर्व कामाची दखल घेऊन जलशक्ती मंत्रालयाने ग्रामविकास संस्थेला पुरस्कार प्रदान केलेला आहे. चित्ते नदी पुनर्जीवन अभियानासारख्या उपक्रमाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. दुष्काळ निवारणासाठी हा अत्यंत पथदर्शी आणि महत्वाचा पकल्प आहे. - नरहरी शिवपुरे
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० प��से प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. आठव्यांदा ही दरवाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात आता पेट्रोलचा दर ११७ रुपये ५० पैसे प्रती लिटर, तर डिझेलचा १०१ रुपये ७१ पैसे प्रती लिटर झाला आहे.
****
वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळा एप्रिल महिन्यात विनाकारण सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही, असा खुलासा राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केला आहे. काल एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, मांढरे यांनी, ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकलेल्या नाहीत, त्यांनाच एप्रिल महिन्यातही शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं. पुढील सत्र जून महिन्याच्या मध्यादरम्यान सुरु होणार असल्यानं, शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात आखलेले सुटीचे बेत बदलण्याची गरज नाही, असंही मांढरे यांनी सांगितलं.
****
राज्यात कोविड काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ७२२ झाली आहे. या संसर्गानं काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकुन संख्या एक लाख ४७ हजार ७८० झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १०७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २४ हजार ९८२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६०रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
औरंगाबाद महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलेला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जवळपास पाच कोटी रुपयांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला दिले आहेत. खंडपीठानं औरंगाबाद महानगरपालिकेकडून, भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं महानगरपालिकेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पीएफ योगदानापोटी साठी नऊ कोटी रुपये वसूल केले होते. महापालिकेनं यासंदर्भात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठानं रिट याचिकेला अंशतः परवानगी दिली आणि पी एफ कार्यालयाला पाच एप्रिल पर्यंत किंवा त्यापूर्वी ही रक्कम महापालिकेला परत करण्याचे आदेश दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात पोलिसांनी स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरला तांडा शिवारात हट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात, जिलेटीनच्या तब्बल ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले. ​​​​​​
****
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन ३१ मार्चला साजरा केला जातो. त्यानिमित्त दोन एप्रिल पर्यंत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद इथं तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणीचं विशेष शिबिर घेण्यात येत आहे. तृतीयपंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन असं आवाहन मुख्य निवडणूक अ��िकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात २२ तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा ३१ मार्च रोजी रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव इथं शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं सहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुखेड पंचायत समितीतून कालबद्ध पदोन्नतीचं फरकामधील मंजूर झालेल्या रक्कमेचं देयक मंजूर करुन देण्यासाठी लोकसेवक गजानन पेंढकर यानं शेख शादुल हबीबसाब याच्यामार्फत तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती सहा हजार रुपये लाच घेतांना शेख शादुल हबीबसाब याला अटक करण्यात आली.
****
हवामान -
राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा काल ४० अंशाच्या वर होता. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४२ पूर्णांक नऊ दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद, जालना, हिंगोली सह विदर्भात आजपासून ते दोन एप्रिल तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे. नागरिकांना उन्हापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव उत्साहानं साजरा करूया, यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीनं लवकरात लवकर प्रसिद्ध केलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत बोलत होते.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण.
·      फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं, त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचं, राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्र.
·      व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी.
·      अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात असल्याचं, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण.
·      राज्यात आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      औरंगाबाद आणि लातूरमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड चार तर उस्मानाबाद आणि परभणीत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू, बीडमध्ये ५६, जालना ४२ आणि हिंगोलीत सात नवे रुग्ण.
आणि
·      राखी पौर्णिमा देशभरात उत्साहात साजरी.
****
अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येत जाऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही काल जाहीर करण्यात आली. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी सहा तासांचा विशेष राम रचा अनुष्ठान आयोजित केलं जाणार आहे. पंतप्रधान नर��ंद्र मोदी हे उद्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यावेळी एकशे पस्तीस संत उपस्थित राहणार आहेत. अयोध्येमधे सध्या उत्सवाचं वातावरण असून लोक भूमीपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे, उद्धव ठाकरे नंतर कधीही अयोध्येत जाऊ शकतात, असं सांगत राऊत यांनी या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं, त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचं, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीत अशा विक्रेत्यांकडे उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून, शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या याचिकेसंदर्भात राज्य सरकारनं शपथपत्र दाखल केलं आहे. पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर आधीच अतिरिक्त ताण असून, असंघटीत क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, आवाक्याबाहेरचं असल्याचं शासनानं नमूद केलं.
****
उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार स्पा-साउनासह, बाष्प स्नान आणि जलतरण तलाव बंद ठेवावे लागणार आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाइजरसह तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर असणं बंधनकारक आहे. कोविड-19 संसर्गाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश देणं, साधनसामग्रीचं निर्जंतुकीकरण करणं, प्रत्येक व्यक्तीसासाठी चार चौरस मीटर जागा असणं, एकमेकांमध्ये सहा फुट अंतर राखणं, मास्क ऐवजी चेहऱ्यावर पारदर्शक आवरण-फेस शिल्ड घालणं बंधनकारक असणार आहे. ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्यांना याठिकाणी व्यायाम करता येणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिला आणि दहा वर्षांखालील मुलांना व्यायामशाळेत बंदी असेल. प्रतिबंधीत-कंटेनमेंट क्षेत्रातल्या व्यायामशाळा आणि योग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचं या मार्गदर्शक सूचनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात असल्याचं, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. या तपासकार्यात कायदेशीर बाबींचं योग्य पालन करण्याच्या सूचना त्यांनी बिहार पोलिसांना केल्या आहेत. सुशांतसिंह यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद असून, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध घ्यायचा असल्याचं, परमबीरसिंह म्हणाले. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही, तसंच आपल्या तपासात कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
या तपासासाठी बिहारहून आलेल्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेनं विलगीकरणात ठेवल्याप्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. या दोन्ही संस्थांची अशी भूमिका असल्यास, या प्रकरणाचा तपास कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत असल्याचं, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अजून टळलं नसून, अतिहत्वाच्या व्यक्तींनाही या विषाणूचा संसर्ग होत आहे, त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करत असून, लोकांनी अनावश्यक प्रवास, गर्दी आणि रहदारी कमी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. गावपातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
राज्यात काल आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ५० हजार १९६ झाली आहे. तर काल २६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार २२१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यं दोन लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक लाख ४७ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारामुळं आतापर्यंत ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात आणखी ३४१ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १४ हजार ८९४ झाली आहे. तर काल ३२८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार २२९ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, सध्या तीन हजार १७८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या १०३ झाली आहे. तर काल जिल्ह्यात एकूण ७८ नवे रुग्ण आढळले, यात ७२ रुग्ण हे अगोदरच्या रुग्णांच्या संपर्कातले आहेत तर सहा रुग्ण हे नवीन आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ५४७ झाली आहे. त्यापैकी चौदाशे रुग्ण बरे झाले असून, लातूर जिल्ह्यात सध्या सध्या एक हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या ९४ झाली आहे. तर काल आणखी २०३ रूग्णांची नोंद झाली. यातले १२४ रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर ७९ रुग्ण ॲन्टीजेन चाचणीत बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३५९ झाली आहे. तर काल जिल्ह्यात ६६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार २३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७५ झाली आहे. त्यापैकी ५२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७२० झाली आहे. तर काल तीन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३९५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ९६० झाली आहे. त्यापैकी ४२८ रुग्ण बरे झाले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
जालना जिल्ह्यात काल आणखी ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात अँटिजेन चाचणीत ११ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३७७ झाली आहे तर काल १२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५६२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७१६ झाली असून, सध्या २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परवा सहा ऑगस्टपासून १९ ऑगस्टपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी यांनी काल ही माहिती दिली. अनेक मोबाईल संदेशाद्वारे गैरसमज पसरत असल्यामुळे त्यावरही स्वयंस्फूर्��ीने प्रतिबंध घालावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
मुंबईत काल ९७० रुग्ण आढळले. पुणे जिल्ह्यात काल एक हजार ९९८ नवे रुग्ण आणि ४५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल आणखी एक हजार १८ रुग्ण आढळले, तर अकरा जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ३३२, अहमदनगर ४५३, रायगड ३८३, सांगली ३५४, नागपूर २४६, सोलापूर १९३, सातारा १४८, अमरावती ९६, वाशिम ९२, यवतमाळ ८९, गोंदिया २२, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.      
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के झालं असून, मृत्यूदरही कमी झाला असल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींसोबत कोविड19 परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती विकसित होत असल्यानं, रोगप्रतिकारक तपासणीसाठी सर्वेक्षण करुन चार ते पाच हजार निवडक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय- घाटीच्या प्रयोगशाळेत केली जाईल, असं ते म्हणाले. दिल्लीच्या धर्तीवर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी वाळूज-बजाज महानगर, महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण अशा तीन विभागांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सलग दुसऱ्यांदा उदगीर इथल्या युवकांनी प्लाझ्मा दान केला आहे. दात्यास कसलाही धोका नसल्यानं उत्स्फुर्तपणे प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असं आवाहन, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता, डॉक्टर मोहन डोईबळे यांनी केलं आहे.  
****
लातूर शहरात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथील करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा, लातूर जिल्हा शहर भारतीय जनता पक्षानं दिला आहे. जिल्ह्यात सततच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणारे कामगार, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. टाळेबंदीच्या काळात शहर परिसराअंतर्गतच कडक नियम करण्यात आले असून, जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी मात्र शिथिलता आहे. त्यामुळे आता शहराअंतर्गतही टाळेबंदी शिथील करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गमुक्त झाल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काल संध्याकाळी औरंगाबाद इथल्या खाजगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काल त्यांचा दुसरा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता.  
****
राखी पौर्णिमा अर्थात रक्षा बंधनाचा सण काल देशभरात उत्साहात साजरा झाला. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यावर मर्यादा आली, मात्र, डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण आणि संपर्कामुळे ��ात थोडासा दिलासा मिळाल्याचं दिसून आलं. नारळी पौर्णिमा म्हणून विशेषत: राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरच्या कोळी बांधवांसाठी महत्वाच्या या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन पूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी परवा ६ ऑगस्टपासून राज्यभरात विविध प्रकारची आंदोलनं छेडली जाणार असून, ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून आंदोलनं अधिक तीव्र होतील, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. नाशिक इथं काल मेटे यांच्या अध्यक्षतेखाली छावा युवा संघटना, छावा श्रमिक सेना, शिव क्रांती सेना, बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
****
औरंगाबाद शहरातील हर्सुल तलाव पूर्ण भरल्यानंतर पाणी खामनदी पात्रात न सोडता तलावाची क्षमता वाढवून, साठवलेलं पाणी फिल्टर करुन लगतच्या सर्व वार्डातील नागरीकांना पोहोचवण्यावर भर देण्यात यावा अशी चर्चा औरंगाबादचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसंच संबंधित अधिकाऱ्यांसोबत झाल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काल त्यांनी, तलाव भरल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या खामनदी पात्रालगतच्या हिलाल आणि जलाल कॉलनी भागाची पाहणी करुन स्थानिक लोकांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना युध्दस्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पातून तीन हजार ८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पूर्णा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं १४ दरवाजे बंद करण्यात आले असून, आता फक्त पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०९ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  इतर मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून वंचित, दुर्लक्षित आणि पिडीत घटकांचे प्रश्न सोडवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गोरगरीबांना दहा रुपयांत अन्नाची थाळी, एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या- शिवसेनेचं दसऱ्या मेळाव्यात आश्वासन  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ; सभा, मिरवणुका, पदयात्रा आणि मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर उमेदवारांचा भर आणि  धम्मचक्र प्रवर्तन उत्साहात साजरा **** इतर मागासवर्गीय आयोग स्थापन करून आणि त्याला घटनात्मक दर्जा देऊन केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं वंचित, दुर्लक्षित आणि पिडीत घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात सावरगाव घाट इथं दसरा मेळाव्यात काल ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराला एकप्रकारे प्रारंभ केला. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केवळ मतदार म्हणूनच या घटकांचा उपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारनं ३७०वं कलम रद्द करून जम्मू काश्मीरला देशाचं अविभाज्य राज्य बनवलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत राज्यातली जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. या मेळाव्याला विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, राम शिंदे, खासदार डॉक्टर प्रितम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. **** विजयादशमीचा उत्सव काल सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरमध्ये शाही दसरा राजेशाही थाटात आणि हजारो रयतेच्या साक्षीनं पार पडला. ऐतिहासिक दसरा चौकात सीमोल्लंघन सोहळा झाला, यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन आणि देवीची आरती होऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर राजवाडा इथून शाही सिमोल्लंघन मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार ठेवलेली पालखी पोवई नाका इथं आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी या तलवारीचं पूजन करत सिमोल्लंघन केलं. राज्याची कुलस्वामिनी तुळजापुरच्या तुळजाभवानी मातेचं सीमोल्लंघन, कु��कवाची उधळण आणि आई राजा उदो उदोच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी देवीला १०८ साड्या गुंडाळून देवीच्या मूर्तीला मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. या सीमोल्लंघनानंतर अहमदनगरहून आलेल्या पलंग पालखीवर देवीची निद्रा सुरु झाली. देवीच्या साडे तीन शक्तिपींठापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी जिल्हाभरात ठिकठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम झाला. हिंगोली इथल्या रामलीला मैदानावर ऐतिहासिक दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाचं दहन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ऐतिहासिक दसरा उत्सवाचं हे एकशे पासष्टावं वर्ष आहे. या महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा मंदिरात सकाळी देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दसऱ्यानिमित्त औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते तर ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते शस्त्र आणि वाहन पूजन काल करण्यात आलं. औरंगाबाद शहरात सिडको एन ७ इथल्या रामलीला मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नांदेड शहरातल्या बालाजी मंदीरात बालाजीचा अभिषेक, पुजाअर्चा करण्यात आली. सायंकाळी शहरात गाडीपुरा आणि नवा मोंढा भागात रावण दहनाचे कार्यक्रम पार पडले. गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब इथं दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या प्रतिकातमक हल्लाबोलमध्ये हजारो शीख भाविकांनी शस्त्रासह हल्लाबोल केला. यावेळी पंजाबच्या पथकानं चित्तथरारक कवायती सादर केल्या. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या सिमोल्लंघनासाठी निघालेल्या भव्य पालखी सोहळ्यानं नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. परिसरातल्या हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. **** मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला पक���ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गोरगरीबांना अवघ्या दहा रुपयांत अन्नाची थाळी, तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचा वीजदर ३० टक्क्यांपेक्षा कमी, राज्यात एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, तसंच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा अशी महत्वाची आश्वासनं ठाकरे यांनी यावेळी दिली. **** नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. या मेळाव्याला एच सी एल चे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग उपस्थित होते. यावेळी बोलतांना भागवत यांनी, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची प्रशंसा केली. एखाद���या समुदायातल्या काही लोकांनी इतर कोणावर अत्याचार केले, म्हणून संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही, असं ते म्हणाले. **** विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून राजकीय पक्षांनी सभा, कोपरा सभा, मिरवणुका, पदयात्रा तसंच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचं काल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं, यावेळी बोलतांना शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे पक्ष असले तरी भविष्यात त्यांचं विलिनीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरातून करण्यात आला. काँग्रेसमधील सर्व गटांचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी हरिपूरमध्ये पदयात्रा काढण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदार संघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी बोलतांना दिली. लातूर विधानसभेचे भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाला. या मेळाव्यानंतर भाजप पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख आणि लोकप्रतिनिधींच्या विजयी संकल्प मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी, विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असून, लातूरची जनता विकासाला साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. लातूरमधले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांनीही काल प्रचार सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी समाजातल्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण जमिनीवर राहून काम करणार असल्याचं आश्वासन दिलं. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जालन्यात प्रचारसभा घेतली. यावेळ बोलतांना त्यांनी देशात जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान आहे, तोपर्यंत भारताला कुणीही हिंदू राष्ट्र बनवू शकणार नाही, असं सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** धम्मचक्र प्रवर्तन दिनही काल सर्वत्र साजरा करण्यात आला. नागपूर इथल्या पवित्र दीक्षाभूमीवर ��३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल साजरा करण्यात आला. हजारो अनुयायी काल या सोहळ्यास उपस्थित होते. थायलंड इथले डॉक्टर परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक डेंग ग्यार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीक्षाभूमीवर एक हजार पुस्तकांची दालनं उभारण्यात आली होती. **** औरंगाबाद शहरातल्या बुद्धलेणीवरही भीमअनुयायांची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी परित्राणपाठ, ध्वजारोहण, मंगलमैत्री, धम्मदेसना आदी कार्यक्रम पार पडले. परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बौद्ध भिक्खू संघानं तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. यावेळी उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. **** विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण तीन लाख ९६ हजार ६७३ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सदूसष्ठ हजार २७९ दिव्यांगांची नोंद झाली असून, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी दोन हजार ३२९ दिव्यांग मतदरांची नोंद झाली आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०८ ऑक्टोबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतिक असून, जीवनात प्रामाणिकता आणि विश्वसनियतेच्या मूल्यांचा अंगिकार करायला ते प्रेरित करतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हे पर्व जगात शांती, सद्भाव आणि समृद्धी निर्माण करेल अशी भावना उपराष्ट्रपती नायडू यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त सर्वांना प्रगती आणि भरभराटीसाठी शुभेच्छा, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चौऱ्यान्नववा वर्धापन दिन आज साजरा करत आहे. त्यानिमित्त नागपूर इथं संघटनेचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. विविधता ही देशाची शक्ती असून उदारता ही ओळख आहे, असं भागवत आपल्या भाषणात म्हणाले. देशाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी झुंडीनं हिंसाचाराच्या घटना घडत अ���ल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नांदेड इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त आज संचलन करण्यात आलं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात नऊ सभा घेणार असून भाजपचे अध्यक्ष अमित शाह अठरा सभा घेणार आहेत. शाह यांची पहिली सभा लातूरला या आठवड्यात होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली. पंतप्रधांनांची पहिली सभा जळगाव इथं तेरा ऑक्टोबरला होणार आहे. **** भाजप-शिवसेना युती प्रमाणंच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस देखील धर्मनिरपेक्ष नाहीत, दोन्ही एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केला आहे. ते अमरावती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सुजात आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीनिमित्त अमरावतीमध्ये युवकांशी संवाद साधला. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –04 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; काल एका दिवसात एक हजार ४२३ उमेदवारांचे अर्ज दाखल ** सर्व पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन; भारतीज जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांचे उर्वरित जागांवरचे उमेदवार घोषित ** राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार- जयंत पाटील आणि ** विशाखापट्टनम क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात तीन बाद ३९ धावा **** राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभर जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यात विविध मतदारसंघांमध्ये काल एक हजार ४२३ उमेदवारांनी एक हजार ९६९ उमेदवारी अर्ज दाखल केल्याच�� अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितलं. उर्वरित उमेदवार आज आपले अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदार संघांत काल एकूण तीनशे सत्तावन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे अब्दुल गफ्फार कादरी, फुलंब्री मतदार संघातून महायुतीचे हरिभाऊ बागडे तर महाआघाडीचे कल्याण काळे, औरंगाबाद मध्य मतदार संघातून भाकपचे अभय टाकसाळ, एमआयएमचे नासेर सिद्धिकी, औरंगाबाद पश्चिममधून महायुतीचे संजय शिरसाट तर वैजापूरमधून महायुतीचे विजय बोरनारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून भाजपचे मोहन फड, परभणीतून शिवसेनेचे राहुल पाटील, गंगाखेडमधून शिवसेनेचे विशाल कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसुदन केंद्रे, जिंतूर - सेलुमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे, तर समाजवादी पक्षाचे दिलावर जमालसाब यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदार संघातून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल, घनसावंगीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे तर शिवसेनेचे हिकमत उढाण, भोकरदनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे तर बदनापूरमधून रुपकुमार चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. बीड जिल्ह्यात परळीतून महायुतीच्या पंकजा मुंडे तसंच महाआघाडीचे धनंजय मुंडे, बीडमधून महायुतीचे जयदत्त क्षीरसागर, यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदार संघातून महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर, हदगावमधून महायुतीचे नागेश पाटील आष्टीकर, किनवटमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष नाईक, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेच्या राजश्री पाटील, नायगावमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण, यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. लातूर शहर मतदार संघातून महाआघाडीचे अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा मतदार संघातून महायुतीचे ज्ञानराज चौगुले, तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकर चव्हाण, तर महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील, परंडातून महायुतीचे तानाजी सावंत, तर आघाडीचे राहुल मोटे, उस्मानाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हिंगोली जिल्ह्यात वसमतमधून महायुतीचे जयप्रकाश मुंदडा, कळमनुरीतून महायुतीचे संतोष बांगर, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संतोष टार्फे, वसमतमधून शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे, हिंगोलीमधून काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभेच्या सातारा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे श्रीनिवास पाटील यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला. **** शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर मधून महायुतीचे दिलीप माने, महाआघाडीच्या प्रणिती शिंदे, उत्तर सोलापूर मधून महायुतीचे विजय देशमुख, दक्षिण सोलापूरमधून महायुतीचे सुभाष देशमुख, पंढरपूर इथून राष्ट्रवादीचे भारत भालके तसंच शिवसेनेच्या बंडखोर शैला बोरसे, कराड उत्तर मतदार संघातून महाआघाडीचे पृथ्वीराज चव्हाण तर महायुतीचे डॉ अतुल भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी मतदार संघातून महायुतीचे शिवाजी कर्डिले, अकोले मतदारसंघातून महायुतीचे वैभव पिचड, कर्जत जामखेड मधून महाआघाडीचे र���हित पवार, सातारा विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे दीपक पवार, सांगलीतून महायुतीचे सुरेश खाडे, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदार संघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी तर जामनेर मतदार संघातून महायुतीचे गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. **** भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती तसंच रिपब्किन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं काल उर्वरित मतदार संघातल्या उमेदवारांची नावं घोषित केली. भारतीय जनता पक्षानं चौथी यादी जाहीर केली. यात शिरपूरमधून काशिराम पवार, रामटेक - मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली - परिणय फुके, तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेशसि���ग ठाकुर यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नाही, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं कार्यकर्त्यांशी बोलत होते. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं २० उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मतदार संघातून संतोष कोल्हे, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधून डॉ मधुसूदन केंद्रे, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधून बाळासाहेब आजबे, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून पंकज भुजबळ, जळगाव शहर - अभिषेक पाटील, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहेरी मतदार संघातून काँग्रेस पक्षानेही दीपक आत्राम यांना उमेदवारी दिलेली आहे. **** आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानंही काल २५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद पश्चिमसाठी प्रदीप त्रिभुवन, औरंगाबाद पुर्व - शिवप्रसाद पगार, सिल्लोड - सोयगाव - अनिल पालोदे, फुलंब्री - सुधाकर शिंदे, वैजापूर - ज्ञानेश्वर घोडके, पैठण - जयाजीराव सुर्यवंशी, उत्तर नांदेड - संदीप पांडे, तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून विजय राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** भारतीय रिपब्लीकन पक्ष आठवले गट महायुतीत विधानसभेच्या सहा जागा लढवत असून, काल त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड, माळशिरस - विवेक गुजर, फलटण - दिगंबर आगाव, नायगाव - राजेश पवार, भंडारा - अरविंद भालाधरे, तर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून गौतम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. **** काँग्रेस पक्षानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघाचे उमेदवार बदलले आहेत. पक्षानं काल जाहीर केलेल्या चौथ्या यादीत सिल्लोडमधून प्रभाकर पालोदकर यांची उमेदवारी रद्द करुन कैसर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातही मोहन सिंग यांची उमेदवारी रद्द करुन उदेनसिंग पडवी यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधार काँग्रेसनं आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमधून माधव पाटील जवळगावकर आणि नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचं सरकार आल्यावर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतला जाईल, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. जालना जिल्ह्यातल्या ��नसावंगी मतदार संघात राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात पक्षाकडे आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पाटील यांनी यावेळी टीका केली. **** दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं वातावरण पाहता परिवर्तन होईल, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं. लोक ज्यावेळी नाराज असतात तेव्हाच कलम ३७० आणि राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उचलले जातात, अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल गुन्ह्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी होती, असं ते म्हणाले. **** दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या विशाखापट्टणम इथ सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या २० षटकांत तीन गडी बाद ३९ धावा झाल्या आहेत. डीन एल्गर २७ धावांवर खेळत असून भारताकडून रविचंद्रन अश्विननं दोन तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला. त्याआधी भारतानं आपला पहिला डाव सात गडी बाद ५०२ धावांवर घोषित केला. सलामीवीर मयंक अग्रवालनं २१५ तर रोहित शर्मानं १७६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिका अद्याप ४६३ धावांनी पिछाडीवर आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची काल पाचव्या माळेनिमित्त मुरली अलंकार विशेष महापूजा मांडली होती. यामध्ये सिंह या वाहनावर आरुढ होऊन तुळजाभवानी माता बासरी वाजवत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 April 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.०० ****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी पश्चिम बंगालमधल्या सिलीगुडी इथे जाहीर सभा घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या सत्तर लाख शेतकऱ्यांच्या विकासात अडथळा आणल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केला. पंतप्रधानांनी कोलकाता इथेही प्रचार सभा घेतली. भाजपला विरोध करता करता, विरोधी पक्ष भारतालाच विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज उत्तराखंडच्या उत्तरकाशी इथे जाहीर सभा घेतली. या राज्यातल्या चारधाम यात्रेसाठीचे रस्ते भाजप सरकारनं आधुनिक बनवले असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथेही शहा यांनी आज सभा घेतली. काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचा कोणाचाही मनसुबा भाजप कधीही प्रत्यक्षात येऊ देणार नाही, असं सांगत, शहा यांनी, काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान देण्याची मागणी करणारे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर टीका केली. अब्दुल्ला यांच्या या सूचनेबाबत काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही शाह यांनी केली आहे.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ���ज आसामच्या गोलाघाटमध्ये जाहीर सभा घेतली. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्यासह पूर्वोत्तर राज्यांचा विशेष दर्जा पुन्हा लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बोकाहाट इथल्या सभेत बोलताना गांधी यांनी, न्याय या किमान उत्पन्न योजनेसाठीचा निधी गेल्या चार वर्षांत सरकारकडून पैसा गोळा केलेल्या चोर उद्योजकांच्या खिशातून येईल, असं म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****
दरम्यान, गांधी उद्या केरळमधल्या वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वायनाड इथले नेते विजयन चेरुकारा यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना, मैदानात उतरून निवडणूक कशी लढवतात, हे राहुल गांधी यांना दाखवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला.
****
भारतीय जनता पक्षानं, आज सहा जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये राज्यातल्या ईशान्य मुंबई मतदार संघातून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांना असलेला शिवसेनेचा विरोध लक्षात घेत, कोटक यांना उमेदवारी दिल्याचं, पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भाजपनं आज जाहीर केलेल्या उर्वरित पाच जागा उत्तर प्रदेशातल्या असून, यापैकी, आझमगड मतदारसंघातून भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव, मैनपुरी मतदार संघातून प्रेमसिंह शाक्य, आणि रायबरेलीतून दिनेशप्रताप सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज अनेकांनी अर्ज दाखल केले. पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अतिसंवेदनशील असलेल्या या मतदारसंघात तेवीस आणि एकोणतीस एप्रिल तसंच सहा मे अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे.
भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्रात, बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी तर पुणे मतदार संघातून महाआघाडीचे मोहन जोशी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्यासह मुकेश राजेश कुरील आणि सतीश भास्करराव पाटील या दोन अपक्षांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
औरंगाबाद मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या नावे, काँग्रेस पक्षानं आज बी फॉर्म दाखल केला.
दरम्यान, वेरुळ इथले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद आणि जालन्यासह इतर पाच मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. ****  पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; विदर्भातल्या सात मतदारसंघाचा समावेश  कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना- भाजप महायुतीच्या प्रचाराचा बिगुल वाजला; महाआघाडीची कराडमध्ये सभा तर युतीचं कोल्हापूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन  हिंगोलीतून काँग्रेसची सुभाष वानखेडेंना, भंडारा- गोंदियातून राष्ट्रवादी काँग्रेसची नाना पंचबुद्धे ,तर भाजपची सुनिल मेंढे आणि साताऱ्यातून शिवसेनेची माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी. आणि  औरंगाबादमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असतील तर माघार घेण्याची आमदार सुभाष झांबड यांची तयारी **** पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह ९१ मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात उद्या अर्जांची छाननी होईल तर येत्या गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. **** राज्यात काल कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना - भारतीय जनता पक्ष महायुतीनं लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरूवात केली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनं सातारा जिल्ह्यात कराड इथून तर शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं कोल्हापूरमधून ही सुरूवात केली. कराड इथं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. पवार आणि चव्हाण यांनी यावेळी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका केली. कोल्हापूरमध्ये झालेल्या शिवसेना - भारती जनता पक्ष युतीच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते. या सभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबाबत शंका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पवार यांच्या राजवटीत राज्य उद्ध्वस्त झाल्याची टीका केली. मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलेल्या या जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. **** काँग्रेस पक्षानं लोकसभेसाठीच्या आणखी दहा उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये राज्यातल्या चंद्रपूर मतदार संघातला काँग्रेसचा उमेदवार बदलण्यात आला असून आता शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार सुरेश धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी या मतदार संघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अकोला मतदार संघातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदार संघातून माजी खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वानखेडे यापूर्वी दोनवेळा याच मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसचा विजय साकारणारे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचंड संभ्रमाचे वातावरण पसरले होते. शिवसेनेचे माजी खासदार तथा भाजप नेते आणि मागील निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले सुभाष वानखेडे यांनाच काँग्रेसकडून आश्चर्यकारकरित्या उमेदवारी घोषित झाले. मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहेत. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, काँग्रेसकडून सुभाष वानखेडे आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत येथे रंगणार आहे. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्यांना आता एकमेकांना अलिंगन द्यावे लागणार आहे. आकाशवणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यातल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पंचबुध्दे यांना उमेदवारी दिली आहे. **** भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत लोकसभेसाठी ३०६ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्व मतदार संघांचा समावेश आहे. पक्षानं नऊ लोकसभा मतदारसंघांची यादी घोषित केली असून यात राज्यातल्या भंडारा - गोंदिया मतदार संघातून सुनील बाबूराव मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेनं नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरी करण्याची गरज नाही. औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल, तर आपण माघार घ्यायला तयार असल्याचं कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांनी काल जाहीर केलं. पक्षानं त्यांनाही जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी, असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसनं सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. शहरातल्या राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात काल जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. **** लोकसभेच्या निवडणुकीसाठी बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. मराठवाड्यातल्या या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघा बहिण भावांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर – बीड लोकसभा मतदार संघाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून, या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत होत आहे. भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने यानिवडणूकीत बजरंग सोनवणेच्या रूपाने नवीन उमेदवार दिला आहे. बीड लोकसभेत वंचित लोकसभा आघाडीच्या वतीने प्राध्यापक रवी जाधव कैकाडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मागील चार दिवसात केवळ एक अपक्ष उमेदवारी अर्ज या लोकसभा मतदार संघात दाखल झाला आहे. आकाशवाणी बातम्यासाठी शशी केवडकर, बीड **** अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय काल जाहीर केला. खासदार गांधी यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुवेंद्र यांनी ही घोषणा केली. भाजपनं डॉ. सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार संग्राम जगताप, बहुजन वंचित आघाडीनं सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे. अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर येथे नुकताच पार पडला. खासदार दिलीप गांधीचाही मेळावा झाला. त्यामूळे लोकसभेच्या निवडणुकीचे जोरात पडघंम सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या वतीने सर्वांना निरोप देण्यात आले होते. असं थोरात यांनी सांगितलं. त्यामुळे आता राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होत आहे. आकाशवाणी बातम्यासाठी, मनोज सातपूते, अहमदनगर. **** सांगलीचे काँग्रेस पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडल्याचं काल जाहीर केलं. सांगली इथं काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानं, नाराज झालेल्या पाटील यांनी हा निर्णय घेतला. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 November 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** • विशेष आर्थिक क्षेत्रातल्या जमीन व्यवहारांवर २५वर्ष मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ • जालना इथलं सीड पार्क कृषी विभाग उभारणार, तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार • विमुद्रीकरणाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण; भारतीय जनता पक्षाचा आज काळा पैसा ��िरोधी दिवस तर विरोधी पक्षांचा काळा दिवस आणि • जातीभेदविरहीत संघटित हिंदु समाज निर्मिती हेच संघाचं उद्दिष्ट - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत ***** राज्यातल्या विशेष आर्थिक क्षेत्रातल्या जमिनीचा पहिला व्यवहार किंवा भाडेपट्ट्यासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफीची सवलत २५ वर्षे करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे औद्योगिक विकासातून निर्यातीला चालना मिळण्यासह मोठ्या प्रमाणातल्या रोजगार निर्मितीसाठी मदत होणार आहे. राज्यातल्या काही विशेष आर्थिक क्षेत्रांना देण्यात आलेल्या मंजुरीस १० वर्ष पूर्ण झाल्यानं या धोरणातल्या सवलतींचा लाभ विकासकांना मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जालना इथल्या सीड पार्कची उभारणी कृषी विभागाकडून करण्याची तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. या उद्योगाची राज्यातली उलाढाल पाच हजार कोटी रूपयांची असून केवळ जालना परिसरात तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या प्रकल्पामुळे येत्या पाच वर्षात जालना परिसरातील बियाणे उद्योगाची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रूपयांहून सहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ६०० कोटी रुपयांपर्यंत वाढ होणं अपेक्षित आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा दिवस आज काळा पैसा विरोधी दिवस म्हणून साजरा करणार आहे. या निमित्तानं सरकारनं भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेला देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, डावी आघाडी आणि तृणमूल पक्ष हा दिवस देशभरात काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. या निमित्तानं विरोधी पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येणार आहेत. **** राज्य सरकारनं दिलेली शेतकरी कर्जमाफी ही अपमानित करणारी असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन बैठकीच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते. राज्य सरकारच्या जाहिरातींसंदर्भात बोलताना पवार यांनी, सत्तेच्या खुर्चीत बसलेले हे खरे लाभार्थी असल्याची टीका केली. चुकीच्या अर्थकारणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असून, शेती अर्थव्यवस्था संकटात सापडली असल्याचं, पवार यांनी नमूद केलं. **** अपघाताच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं आठवी ते बारावीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं, पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती यांना पत्र पाठवून तशा सूचना दिल्या आहेत. जालना इथल्या भागिरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विकास काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून तशी मागणी केली होती. **** मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेच्या लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून एक नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज बिलं देण्यात येत आहेत. त्यात थकबाकीची रक्कम किती आणि हप्त्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबादमधील वीज चोरी रोखण्यासाठी विविध धर्मातल्या धर्मगुरूंच्या माध्यमातून नागरिकांचं प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. २३ सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान वीज मी��र तपासणीत एकूण ६०० संशयित वीज मीटर पकडले असून त्यापैकी ४२९ मीटर हे सदोष आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** **** जात, भाषा आणि पंथ ही हिंदूंची ओळख नसून, जातीभेदविरहीत संघटित हिंदु समाज निर्मिती हेच संघाचं उद्दिष्ट असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जालना इथं आयोजित समरसता संगम सभेत मार्गदर्शन करताना काल ते बोलत होते. संघटित समाजच सर्व शक्ती प्राप्त करु शकतो म्हणून आपल्याला संघटीत होण्याची गरज असून, हे संघटन जातीवर नव्हे तर केवळ हिंदु याच संकल्पनेवर आधारित असायला हवं असं ते म्हणाले. समता आणि बंधुत्व हीच सामाजिक समरसता असून हाच भाव आपण जपला पाहिजे असं भागवत यांनी यावेळी सांगितलं. **** आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे, असं प्रतिपादन उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं आयोजित विद्यार्थी दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. औरंगाबाद इथंही काल शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. **** औरंगाबाद इथं येत्या ११ आणि १२ नोव्हेंबरला गुरू शिष्य परंपरेला समर्पित ‘तस्मै श्री गुरवे नम:’ या दोन दिवसीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा गांधी मिशन महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ऑरा औरंगाबाद या नृत्य श्रृखंलेचं पाचवं सत्र येत्या १८ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याचं दत्ता यांनी सांगितलं. **** वस्तु आणि सेवा कर- जीएसटी लागू झाल्यामुळेच देशाचा विकास झाला असल्याचं मत राज्य कर उपायुक्त जी.एस. गवंडी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर शहर प्रिंटर्स असोसिएशन आणि लातूर मुद्रक गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित जीएसटी विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना काल ते बोलत होते. जीएसटी मुळे कर रचनेत सुधारणा झाली आहे, असं ते म्हणाले. **** परिवर्तनवादी विद्यार्थी संघटनांच्यावतीनं उस्मानाबाद इथं काल विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांचं ‘आम्हीच खरे देशप्रेमी’ या विषयावर व्याख्यान झालं. यावेळी बोलतांना त्यानं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. स्वार्थासाठी सध्या देशात भगव्या रंगाचं राजकारण केलं जात असून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे वापरले जात आहेत असं प्रतिपादन केलं. **** जालना इथल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी रात्री अंबड चौफुली इथं एका जीपमधून ३० लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली. नाकाबंदी दरम्यान, वाहनांच्या तपासणीवेळी केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी अंबड इथल्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. **** नागपूर इथं सुरू असलेल्या ८२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीचा अंतिम सामना सायना नेहवाल आण�� पी.व्ही सिंधू यांच्यात होणार आहे. तर पुरूष एकेरीत के श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांच्यात लढत होणार आहे. **** तिरूअनंतपुरम इथं काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची ही मालिका २-१ नं जिंकली. पावसामुळं व्यत्यय आल्यानं हा सामना केवळ ८ षटकांचाच खेळला गेला. भारतानं प्रथम फलंदाजी करत ६७ धावा केल्या प्रत्युतरादाखल न्यूझीलंड केवळ ६१ धावा करू शकला. ****
0 notes