Tumgik
#श्रीकांत जाधव
trendingwatch · 2 years
Text
जयपुर पिंक पैंथर्स 26-9 बंगाल वॉरियर्स लाइव, प्रो कबड्डी 2022: बंगाल के खिलाफ जयपुर का दबदबा; मध्यांतर तक 17 अंकों की बढ़त
जयपुर पिंक पैंथर्स 26-9 बंगाल वॉरियर्स लाइव, प्रो कबड्डी 2022: बंगाल के खिलाफ जयपुर का दबदबा; मध्यांतर तक 17 अंकों की बढ़त
शनिवार को हैदराबाद में जयपुर पिंक पैंथर्स बनाम बंगाल वारियर्स के बीच प्रोकबड्डी मैच के स्पोर्टस्टार के कवरेज में आपका स्वागत है। अंक पढ़ेंगे जयपुर बनाम बंगाल: 35-17 34-17 शुभम शिंदे और श्रीकांत जाधव की जोड़ी से एक सुपर टैकल ने अर्जुन देशवाल को दो अंकों के लिए पकड़ा। 34-15 जाधव, बंगाल के लिए अकेला आदमी, छापे में आता है और उसने जयपुर को तीसरा ऑल-आउट होने से इनकार करने के लिए अभिषेक केएस के टचपॉइंट…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर
महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य च��णक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो. ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मा��िकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
****
0 notes
telnews-in · 9 months
Text
Bengal Warriors' Shrikant Jadhav not bogged down by losses, says still early days
प्रो कबड्डी लीग के 10वें सीजन में बंगाल वॉरियर्स के रेडर श्रीकांत जाधव के नौ मैचों में 47 अंक हैं। कभी-कभी खेल में, फिल्म स्क्रिप्ट के अनुसार नहीं चलती है, और यह अनिश्चितता बड़े पैमाने पर गिरावट का कारण बन सकती है। ऐसा लगता है कि प्रो कबड्डी लीग 10 में पिछले दो हफ्तों में बंगाल वॉरियर्स के साथ ऐसा ही हुआ है। पुनेरी पलटन के खिलाफ 19-49 से हार के बाद टीम ने अपना संतुलन खो दिया है और तब से जीत दर्ज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Pune gramin : “मुळशी पॅटर्न’ हा अभ्यासातून दाखवावा
Pune gramin : “मुळशी पॅटर्न’ हा अभ्यासातून दाखवावा
Pune gramin : “मुळशी पॅटर्न’ हा अभ्यासातून दाखवावा पिरंगुट – मुळशी पॅटर्न हा गुन्हेगारीतून न दाखवता तो अभ्यासातून दाखवावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षा देण्याची क्षमता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे. यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्‍वास बाळगावा, असे प्रतिपादन पौडचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी केले. पिरंगुट (ता.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
parichaytimes · 3 years
Text
पीकेएल: यूपी योद्धा ने मैच के आखिरी रेड से पटना पाइरेट्स को हराया | प्रो-कबड्डी-लीग समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
पीकेएल: यूपी योद्धा ने मैच के आखिरी रेड से पटना पाइरेट्स को हराया | प्रो-कबड्डी-लीग समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
बेंगलुरू: यूपी योद्धा धार पटना समुद्री डाकू 36-35 मैच के अंतिम चरण में अपने में बहुत जरूरी पांच अंक हासिल करने के लिए प्रो कबड्डी लीग (पीकेएल) शनिवार को प्रतियोगिता। पटना ने सोचा कि वे मैच के आखिरी कदम में अपनी जगह वापस टाई करने में कामयाब रहे, जब उन्होंने मुकाबला किया सुरेंदर गिल लेकिन यूपी रेडर ने सुनिश्चित किया कि उसे एक अंक की बढ़त बनाए रखने के लिए इस प्रक्रिया में एक बोनस अंक मिले। पटना के…
View On WordPress
0 notes
Text
Pro Kabaddi PKL 8: Match 44 Highlights: UP Yoddha gives Bengaluru Bulls reality check; Pawan, Pardeep struggle
Pro Kabaddi PKL 8: Match 44 Highlights: UP Yoddha gives Bengaluru Bulls reality check; Pawan, Pardeep struggle
यूपी योद्धा की रक्षा ने एक मास्टरक्लास का उत्पादन किया क्योंकि इसने रविवार को प्रो कबड्डी लीग (पीकेएल 8) में बेंगलुरु बुल्स पर 42-27 से जीत दर्ज की। यूपी योद्धा गाने पर था क्योंकि उसने छह सुपर टैकल और कुल 22 टैकल पॉइंट्स का दावा किया और टीम को पॉइंट टेबल पर छठे स्थान पर पहुँचाया। श्रीकांत जाधव ने सुपर 10 (तीन टैकल पॉइंट सहित कुल 15 अंक) बनाए, जबकि सभी रक्षकों ने टैकल किया। यह पीकेएल के इतिहास में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
बैडमिंटन : इंडिया ओपन 11 मई से, दर्शकों के बिना होगा आयोजन Divya Sandesh
#Divyasandesh
बैडमिंटन : इंडिया ओपन 11 मई से, दर्शकों के बिना होगा आयोजन
नई दिल्ली| योनेक्स सनराइज इंडिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट का आयोजन 11 से 16 मई तक यहां के. डी. जाधव इंडोर हॉल में दर्शकों के बिना आयोजित किया जाएगा। यह टूर्नामेंट ओलंपिक क्वालीफायर इवेंट है जिसमें 114 पुरुष और 114 महिला सहित कुल 33 देशों के 228 खिलाड़ी हिस्सा लेंगे। इस साल होने वाले टोक्यो ओलंपिक को देखते हुए यह उन चुनिंदा टूर्नामेंट में से एक है जो ओलंपिक का क्वालीफाईंग इवेंट है। हालांकि देश में बढ़ते कोरोना वायरस के मामले को देखते हुए यह टूर्नामेंट बायो बबल प्रोटोकॉल के तहत दर्शकों के बिना आयोजित किया जाएगा। दक्षिण अफ्रीका, ब्राजील, मध्य पूर्व और ब्रिटेन सहित यूरोपियन देशों से आने वाले खिलाड़ियों को तीन मई को यहां पहुंचना होगा और सात दिन क्वारेंटीन में रहना पड़ेगा जबकि अन्य देशों के खिलाड़ियों को चार दिन का क्वारेंटीन पीरियड करना पड़ेगा।
दिल्ली सरकार तीन, छह, नौ और 14 मई को आरटी पीसीआर टेस्ट कराएगी।भारतीय बैडमिंटन संघ (बाई) के महासचिव अजय सिंघानिया ने कहा, “हमें खुशी है कि अंतत: बैडमिंटन की शुरीआत हो रही है और हम दुनिया के शीर्ष बैडमिंटन खिलाड़ियों की मेजबानी करेंगे लेकिन हाल में कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए हमें ध्यान देने की जरूरत है। खिलाड़ियों की सुरक्षा हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।”
यह खबर भी पढ़ें: बियर की बोतलें हरें और भूरे रंग की क्यों होती है? जानिए हैरान कर देने वाली वजह  
इस टूर्नामेंट में भारत 27 महिला और 21 पुरुषों सहित कुल 48 खिलाड़ियों के साथ सबसे बड़ा दल उतारेगा। इंडिया ओपन में तीन बार की विश्व चैंपियन कैरोलिना मारिन, भारत की पीवी सिंद्धू और पूर्व नंबर एक सायना नेहवाल महिला एकल वर्ग में चुनौती पेश करेंगी। विश्व के नंबर-1 जापान के केंतो मोमोता, गत विजेता डेनमार्क के विक्टर एक्सेलसन, ऑल इंग्लैंड चैंपियन मलेशिया के जी जिया ली, पूर्व नंबर एक भारत के श्रीकांत किदांबी, बी. साई प्रणीत, एचएस. प्रनय और परूपल्ली कश्यप पुरुष एकल वर्ग में मुकाबला करेंगे। भारतीय पुरुष युगल जोड़ी की चुनौती चिराग शेट्टी और सात्विकसाईराज रैंकिरेड्डी संभालेंगे जबकि महिला युगल वर्ग का दारोमदार अश्विनी पोनप्पा और एन. सिक्की ���ेड्डी पर होगा। — आईएएनएस
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
trendingwatch · 2 years
Text
प्रो कबड्डी 9 लाइव स्कोर: बेंगलुरु बुल्स बनाम बंगाल वॉरियर्स - 7 से शुरू, भविष्यवाणियां, दस्ते, लाइव स्ट्रीमिंग विवरण
प्रो कबड्डी 9 लाइव स्कोर: बेंगलुरु बुल्स बनाम बंगाल वॉरियर्स – 7 से शुरू, भविष्यवाणियां, दस्ते, लाइव स्ट्रीमिंग विवरण
बेंगलुरू बैल हमलावर: Vikash Kandola, Bharat, Neeraj Narwal, More G B, Harmanjit Singh, Nageshor Tharu, Lal Mohar Yadav, Harmanjeet Singh, रक्षक: Mayur Kadam, Mahender Singh, Aman, Saurabh Nandal, Rajnesh, Yash Hooda, Naik, Rohit Kumar., Sudhakar Krishant हरफनमौला: Rahul Khatik, Sachin Narwal, Rajesh Narwal, Narender Hooda बंगाल योद्धाओं हमलावर: मनिंदर सिंह, श्रीकांत जाधव, आकाश पिकलमुंडे, असलम…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 01 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. या निर्णयाचा पंजाबातल्या काही जातींना लाभ होणार आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते आज लोकसभेत चालू आर्थिक वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेच्या परिचालनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
****
विमान प्रवासात छायाचित्रासह ओळखपत्र तपासलं जात असून, बोर्डिंग पासवरील नाव आधार कार्डशी पडताळून घेतलं जात असल्याचं, नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. प्रवाशाचं नाव आणि चेहरा याची पडताळणी झाल्यावरच त्याला प्रवासाची परवानगी दिली जात असल्याचं, नायडू यांनी सांगितलं.
****
हिंदकेसरी ठरलेल्या मल्लांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या ११ वर्षांपासून मिळालेलं नाही, या मुद्याकडे राज्यसभेत शून्यकाळात खासदार रजनी पाटील यांनी लक्ष वेधलं. कोणताही खेळाडू असो, त्याचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं, यासाठी विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी रजनी पाटील यांनी केली.
****
देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्षांवरून २१ वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे. शून्यकाळात बोलतांना चढ्ढा यांनी, तरुणांनी सक्रीय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा बदल करावा, असं म्हटलं आहे.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन ��ेलं. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेघदूत या शासकीय निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळ पासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शहरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
प��रिस ऑलिम्पिकम��्ये आज सहाव्या दिवशी महिला आणि पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत आज खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाची आज गतविजेता बेल्जियमसोबत उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. बॅडमिंटनमध्येही एच.एस.प्रणॉय आणि पी.व्ही.सिंधू यांचे सामने होणार आहेत. तर पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील. यासोबतच तिरंदाजी, नौकानयन, नेमबाजी गोल्फ या क्रीडा प्रकारतही भारतीय खेळाडूंचे आज सामने होणार आहेत.
****
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांची महिला शिवसैनिकानं कॉलर धरली? काय आहे प्रकरण?
Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांची महिला शिवसैनिकानं कॉलर धरली? काय आहे प्रकरण?
Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांची महिला शिवसैनिकानं कॉलर धरली? काय आहे प्रकरण? पोलिसांनी आशा रसाळ आणि इतर शिवसेना कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलून त्यांची चौकशी केली. ही पोस्ट राजकीय वाद वाढवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने करण्यात आल्याची तक्रार आशा रसाळ यांनी दिली. सुनिल जाधव (कल्याण) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत…
View On WordPress
0 notes
gujarati9-blog · 4 years
Text
पूर्व चीफ सिलेक्टर का ध��नी पर तंज: के श्रीकांत बोले- धोनी हर वक्त प्रॉसेस की बात करते हैं, उनका सिलेक्शन प्रॉसेस ही गलत- उन्हें जाधव-चावला में क्या नजर आता है
पूर्व चीफ सिलेक्टर का धोनी पर तंज: के श्रीकांत बोले- धोनी हर वक्त प्रॉसेस की बात करते हैं, उनका सिलेक्शन प्रॉसेस ही गलत- उन्हें जाधव-चावला में क्या नजर आता है
[ad_1]
Tumblr media
इंडिया टीम के पूर्व सेलेक्टर के श्रीकांत ने चेन्नई सुपर किंग्स के कप्तान महेंद्र सिंह धोनी की युवाओं को मौका नहीं देने पर आलोचना की है। उन्होंने प्लेइंग इलेवन में केदार जाधव और पीयूष चावला को भी टीम में शामिल किए जाने पर सवाल उठाए हैं।
श्री कांत ने स्टार स्पोर्ट्स तमिल से बात करते हुए कहा- मैं स्वीकार नहीं करूंगा कि धोनी क्या कह रहे हैं। आप हर वक्त प्रोसेस की बात करते हैं, लेकिन आपका…
View On WordPress
0 notes
gokul2181 · 4 years
Text
IPL 2020 CSK vs MI Photo Gallery Jasprit Bumrah MS Dhoni 200 Sixes IPL UAE Pictures Updates | बुमराह-बोल्ट ने चेन्नई का टॉप ऑर्डर तोड़ा; चाहर ने धोनी का विकेट लेकर उम्मीदों पर पानी फेरा
New Post has been published on https://jordarnews.in/ipl-2020-csk-vs-mi-photo-gallery-jasprit-bumrah-ms-dhoni-200-sixes-ipl-uae-pictures-updates-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%9f/
IPL 2020 CSK vs MI Photo Gallery Jasprit Bumrah MS Dhoni 200 Sixes IPL UAE Pictures Updates | बुमराह-बोल्ट ने चेन्नई का टॉप ऑर्डर तोड़ा; चाहर ने धोनी का विकेट लेकर उम्मीदों पर पानी फेरा
Tumblr media
3 मिनट पहले
कॉपी लिंक
Tumblr media
मुंबई इंडियंस के जसप्रीत बुमराह (2 विकेट) और ट्रेंट बोल्ट (4 विकेट) ने शुरुआती ओवरों में चेन्नई सुपर किंग्स के टॉप-ऑर्डर को पवेलियन वापस भेज अपनी टीम को जीत की राह दिखाई।
आईपीएल में शुक्रवार को मुंबई इंडियंस ने चेन्नई सुपर किंग्स को 10 विकेट से हरा दिया। मुंबई के तेज गेंदबाज ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह ने चेन्नई के टॉप ऑर्डर को ध्वस्त कर दिया। दोनों ने 6 ओवर में चेन्नई के 5 बल्लेबाजों को पवेलियन का रास्ता दिखाया। कप्तान महेंद्र सिंह धोनी को आउट कर राहुल चाहर ने चेन्नई की प्ले-ऑफ की उम्मीद पर भी पानी फेर दिया। सैम करन ही मुंबई के गेंदबाजों के सामने टिक पाए और शानदार फिफ्टी लगाई।
चेन्नई के प्रदर्शन को लेकर धोनी ने पिछले मैच में युवा खिलाड़ियों में स्पार्क न दिखने की बात कही थी। इसके बाद श्रीकांत ने धोनी के बयान पर सवाल उठाए थे कि जाधव, पीयूष और वॉटसन को बार-बार क्यों मौका दिया जा रहा है। धोनी ने मुंबई के खिलाफ इन तीनों सीनियर प्लेयर्स प्लेइंग इलेवन में जगह नहीं दी। युवा रितुराज गायकवाड़ और एन जगदीशन को टीम में जगह मिली, लेकिन दोनों अपना खाता भी नहीं खोल सके।
Tumblr media
चेन्नई ने पहली बार पावरप्ले में 5 विकेट गंवाए। दोनों युवा खिलाड़ी रितुराज गायकवाड़ और एन जगदीशन खाता खोले बिना ही आउट हो गए।
Tumblr media
महेंद्र सिंह धोनी आईपीएल में 200 छक्के लगाने वाले पहले कप्तान बने। धोनी ने लीग में दो टीमों (चेन्नई सुपरकिंग्स और राइजिंग पुणे सुपरजाएंट्स) की कप्तानी की है।
Tumblr media
धोनी ने 16 बॉल पर 16 रन बनाए। राहुल चाहर की बॉल पर छक्का लगाने के प्रयास में वे क्विंटन डिकॉक को कैच दे बैठे।
Tumblr media
राहुल चाहर ने 4 ओवर में 22 रन देकर 2 विकेट अपने नाम किया।
Tumblr media
राहुल चाहर ने अपने भाई दीपक चाहर को शून्य के निजी स्कोर पर आउट किया।
Tumblr media
चेन्नई के लिए सैम करन ही रन बना पाए और 47 बॉल पर 52 रन की पारी खेली।
Tumblr media
सैम करन को ट्रेंट बोल्ट ने पारी की आखिरी बॉल पर यॉर्कर डालकर बोल्ड किया।
Tumblr media
ताहिर ने नौवें विकेट के लिए सैम करन के साथ 43 रन की साझेदारी की। यह आईपीएल में इस विकेट के लिए पार्टनरशिप का रिकॉर्ड है।
Tumblr media
क्विंटन डिकॉक और ईशान किशन ने 116 रन की नाबाद साझेदारी की। यह 2018 के बाद मुंबई की ओर से पहले विकेट के लिए शतकीय साझेदारी है।
Tumblr media
मुंबई ने सिर्फ 12.2 ओवर में लक्ष्य हासिल कर लिया। यह उसका दूसरा सबसे तेज चेज है।
Tumblr media
मैच के दौरान मस्ती के मूड में हार्दिक पंड्या।
Source link
0 notes
Text
Pro Kabaddi PKL 8: UP Yoddha's defence ousts Bengaluru Bulls, Puneri Paltan stuns Bengal Warriors
Pro Kabaddi PKL 8: UP Yoddha’s defence ousts Bengaluru Bulls, Puneri Paltan stuns Bengal Warriors
यूपी योद्धा की रक्षा ने एक मास्टरक्लास का उत्पादन किया क्योंकि इसने रविवार को प्रो कबड्डी लीग (पीकेएल 8) में बेंगलुरु बुल्स पर 42-27 से जीत दर्ज की। यूपी योद्धा गाने पर था क्योंकि उसने छह सुपर टैकल और कुल 22 टैकल पॉइंट्स का दावा किया और टीम को पॉइंट टेबल पर छठे स्थान पर पहुँचाया। श्रीकांत जाधव ने सुपर 10 (तीन टैकल पॉइंट सहित कुल 15 अंक) बनाए, जबकि सभी रक्षकों ने टैकल किया। यह पीकेएल के इतिहास में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
बैडमिंटन : इंडिया ओपन 11 मई से, दर्शकों के बिना होगा आयोजन Divya Sandesh
#Divyasandesh
बैडमिंटन : इंडिया ओपन 11 मई से, दर्शकों के बिना होगा आयोजन
नई दिल्ली| योनेक्स सनराइज इंडिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट का आयोजन 11 से 16 मई तक यहां के. डी. जाधव इंडोर हॉल में दर्शकों के बिना आयोजित किया जाएगा। यह टूर्नामेंट ओलंपिक क्वालीफायर इवेंट है जिसमें 114 पुरुष और 114 महिला सहित कुल 33 देशों के 228 खिलाड़ी हिस्सा लेंगे। इस साल होने वाले टोक्यो ओलंपिक को देखते हुए यह उन चुनिंदा टूर्नामेंट में से एक है जो ओलंपिक का क्वालीफाईंग इवेंट है। हालांकि देश में बढ़ते कोरोना वायरस के मामले को देखते हुए यह टूर्नामेंट बायो बबल प्रोटोकॉल के तहत दर्शकों के बिना आयोजित किया जाएगा। दक्षिण अफ्रीका, ब्राजील, मध्य पूर्व और ब्रिटेन सहित यूरोपियन देशों से आने वाले खिलाड़ियों को तीन मई को यहां पहुंचना होगा और सात दिन क्वारेंटीन में रहना पड़ेगा जबकि अन्य देशों के खिलाड़ियों को चार दिन का क्वारेंटीन पीरियड करना पड़ेगा।
दिल्ली सरकार तीन, छह, नौ और 14 मई को आरटी पीसीआर टेस्ट कराएगी।भारतीय बैडमिंटन संघ (बाई) के महासचिव अजय सिंघानिया ने कहा, “हमें खुशी है कि अंतत: बैडमिंटन की शुरीआत हो रही है और हम दुनिया के शीर्ष बैडमिंटन खिलाड़ियों की मेजबानी करेंगे लेकिन हाल में कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए हमें ध्यान देने की जरूरत है। खिलाड़ियों की सुरक्षा हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।”
यह खबर भी पढ़ें: बियर की बोतलें हरें और भूरे रंग की क्यों होती है? जानिए हैरान कर देने वाली वजह  
इस टूर्नामेंट में भारत 27 महिला और 21 पुरुषों सहित कुल 48 खिलाड़ियों के साथ सबसे बड़ा दल उतारेगा। इंडिया ओपन में तीन बार की विश्व चैंपियन कैरोलिना मारिन, भारत की पीवी सिंद्धू और पूर्व नंबर एक सायना नेहवाल महिला एकल वर्ग में चुनौती पेश करेंगी। विश्व के नंबर-1 जापान के केंतो मोमोता, गत विजेता डेनमार्क के विक्टर एक्सेलसन, ऑल इंग्लैंड चैंपियन मलेशिया के जी जिया ली, पूर्व नंबर एक भारत के श्रीकांत किदांबी, बी. साई प्रणीत, एचएस. प्रनय और परूपल्ली कश्यप पुरुष एकल वर्ग में मुकाबला करेंगे। भारतीय पुरुष युगल जोड़ी की चुनौती चिराग शेट्टी और सात्विकसाईराज रैंकिरेड्डी संभालेंगे जबकि महिला युगल वर्ग का दारोमदार अश्विनी पोनप्पा और एन. सिक्की रेड्डी पर होगा। — आईएएनएस
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes