Tumgik
#सर्बानंद सोनोवाल
airnews-arngbad · 22 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
महायुती सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध-वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांकडून क्षमायाचना-विरोधकांची टीका
देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
आणि
पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारताला चार पदकं-नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध
****
केंद्रातील एनडीए सरकार तसंच राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बंदराचं, पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय बंदर-नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीवरंजन सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्वप्रथम, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली –
सिंधुदुर्ग मे जो हुआ मेरे लिये, मेरे सभी साथियों के लिये छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव है। और मै आज सर झुका कर के, छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों मे सर रखके माफी मांगता हूं। और इतना ही नही, जो जो लोग छत्रपती शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते है, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मै उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं।
वाढवण हे आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याची गणना होईल. या बंदरामुळे किमान १२ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. देशातील सर्व बंदरातून एकत्रित रीत्या होणाऱ्या कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होणं अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात नव्यानं विकसित होणारं दिघी औद्योगिक क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात महिला करत असलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले. २१८ मत्स्यपालन विकास योजना तसंच विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत आज जगभरातला दुसरा मोठा मत्स्य उत्पादक देश झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी मच्छीमार बांधवांचं यात मोलाचं योगदान असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
साथियों, जब समुद्र से जुडे अवसरों की बात होती है, तो इसमें सबसे अहम्‌ भागीदार हमारे मछुआरे भाई बहन है। मच्छिमार बंधु भगिनींना आपल्या पाचशे सव्वीस मच्छिमारांची गावे, कोळीवाडे आणि पंधरा लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या मत्स्यपालन क्षेत्राचे योगदान खूप मोठे आहे.
मोदी यांनी स्थानिक मच्छीमारांना ट्रान्सपॉण्डर्सचं वाटप केले. बोटीवर लावण्याच्या या यंत्रामुळे संपर्क व्यवस्था प्रस्थापित करणं सहज शक्य होणार आहे. देशातल्या १ लाख बोटीवर इस्रोने विकसित केलेले हे ट्रान्सपॉण्डर्स लावले जाणार आहेत. मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचं प्रातिनिधिक वाटपही यावेळी करण्यात आलं.
मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, जगभरातले जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं युपीआय हे ॲप, फिन्टेकचं जगभरातलं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फिन्टेक अर्थात वित्तीय तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुघर्टनेसंदर्भात माफी नसते, मात्र ही माफी मागण्यासाठी सुद्धा बराच उशीर झाल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित करून ही टीका केली. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज मालवण इथं संबंधित परिसराला भेट देऊन पाहणी केली, हे सरकार पुतळा कोसळण्याचं खापर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली.
****
देशातून पेट्रोल आणि डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती इथं एका वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटन सोहळ्यात बोलत होते. चालकानं दिवसभरात फक्त आठ तास वाहन चालवण्यासंबंधी नियम लवकरच करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
****
निवृत्तीवेतन धारकांसाठी केंद्र सरकारने एकल सरलीकृत अर्ज जारी केला आहे. भविष्य पोर्टलचंही ई-एचआरएमएस सोबत डिजिटली एकीकरण करण्यात आलं आहे. निवृत्तीवेतासंबंधीची प्रक्रिया यामुळे अधिक सुलभ होणार आहे.
****
वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासाकरता नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. यामध्ये मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल उलेमा संघटनांचे प्रतिनिधी समितीसमोर आपलं म्हणणं मांडत आहेत.
****
दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शासनमान्य ग्रंथालयाच्या अनुदान दरात ४० टक्के वाढ तसंच प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहकार्याने डिजिटल ग्रंथालय उभारता येतील का यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सोपवला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले अंतापूरकर यांनी, गेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केल्याचा आरोप काँग्रेस पक्षातून केला जात होता. काँग्रेसनं अशा आमदारांना पुन्हा तिकीट न देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
****
पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवत आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एस एच वन प्रकारात अवनी लेखरा हिने सुवर्णपदक तर मोना अग्रवालने कांस्य पदक पटकावलं. अवनीने २४९ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत सुवर्ण तर मोनाने २२८ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत कांस्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत प्रीती पाल हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात मनीष नारवालने रौप्‍यपदक जिंकलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने अमृत महा आवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना जिल्हास्तरीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आलं.
****
महिला बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू उपलब्ध होतील, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज महसूल तसंच पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक झाली. संवाद, समन्वय आणि प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास गणेशोत्सव हा आनंददायी आणि निर्विघ्न होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केला.
****
लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठीच निवडणुका पुढे ढकलण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी पैसे नसल्याचं सरकार सांगतं, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून येतात असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
****
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबरपासून राज्यव्यापी “आमरण उपोषण” पुकारण्यात येणार आहे.
****
0 notes
mynokari · 8 months
Text
CMSGUY Distribution Tractor Yojana : 70% सब्सिडी पर मिलेगा नया ट्रैक्टर?
CMSGUY Distribution Tractor Yojana: “नया ट्रैक्टर यूनिट का वितरण” योजना भारत सरकार द्वारा “मुख्यमंत्री समग्र ग्राम उन्नयन योजना (सीएमएसजीयूवाई)” की छत्र योजना के तहत एक घटक है। असम का. CMSGUY 5 फरवरी 2017 को गुवाहाटी में माननीय मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल द्वारा शुरू की गई एक ग्राम विकास योजना है। यह योजना असम के सभी गांवों में एक मेगा मिशन मोड में लागू की जा रही है। सीएमएसजीयूवाई को प्रत्येक…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
Text
0 notes
rajeshnews33 · 1 year
Text
लोकसभा चुनाव 2024: पूर्वी-पूर्वोत्तर राज्यों में कैसे जीतेंगे, मंथन को जुट रही भाजपा, ये नेता रहेंगे शामिल
गुवाहाटी : पूर्वी और पूर्वोत्तर भारत के 12 राज्यों के भारतीय जनता पार्टी (BJP) के वरिष्ठ नेता 2024 में होने जा रहे लोकसभा चुनाव 2024 (Lok Sabha Election 2024) के संबंध में रणनीति बनाने के लिए आज गुवाहाटी में बैठक कर रहे हैं. बैठक में भाजपा के राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, असम के मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा, त्रिपुरा के मुख्यमंत्री माणिक साहा, पार्टी के सांसद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hamslivehindi · 1 year
Link
आयुष मंत्रालय ने आयुष क्षेत्र में अनुसंधान को प्रोत्साहन देने के लिए भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आईसीएमआर) के साथ एक समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए हैं। आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल तथा स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री मनसुख मांडविया की उपस्थिति में गुरुवार को यहां किए गए इस समझौता ज्ञापन से आयुष क्षेत्र में तथ्य आधारित अनुसंधान को प्रोत्साहन मिलेगा। इससे भारतीय चिकित्सा पद्धतियों और चिकित्सा प्रक्रियाओं पर विश्वसनीयता और भरोसा बढ़ेगा। यह समझौता ज्ञापन आयुष शोधकर्ताओं के प्रशिक्षण के माध्यम से अनुसंधान क्षमता को भी मजबूत करेगा। समझौता ज्ञापन पर आयुष मंत्रालय के सचिव वैद्य राजेश कोटेचा, और आईसीएमआर के महानिदेशक डॉ. राजीव बहल‌ ने समझौता ज्ञापन पत्र हस्ताक्षर किए। इस अवसर पर केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, नीति आयोग के सदस्य डॉ. वीके पॉल भी मौजूद थे। श्री सोनोवाल ने इस अवसर पर कहा, “आईसीएमआर के सहयोग से आज आयुष और स्वास्थ्य मंत्रालय दोनों ने इस दिशा में एक बहुत दूरगामी कदम उठाया है।” उन्होंने कहा कि हमारी पारंपरिक चिकित्सा प्रणाली के सामने वैज्ञानिक साक्ष्य उत्पन्न करने की एक बड़ी चुनौती है। एकीकृत चिकित्सा में अनुसं��ान सहयोग इस चुनौती का समाधान प्रदान करने और लोगों का विश्वास जीतने की दिशा में एक और कदम है। निकट सहयोग से बड़े पैमाने पर जनता लाभान्वित होगी। श्री मांडविया ने कहा, “आयुर्वेद हमारी सदियों पुरानी ज्ञान प्रणाली, हमारी विरासत है। आधुनिक चिकित्सा ने अपनी एक अलग पहचान बना ली है। दोनों प्रणालियों के बीच यह समझौता ज्ञापन पारंपरिक ज्ञान को एक जगह बनाने में मदद करेगा। इस एमओयू के जरिए हम आयुर्वेद को साक्ष्य आधारित विज्ञान के रूप में और विकसित कर सकेंगे। यह एमओयू दवाओं की आयुष प्रणाली को समृद्ध करने में बहुत महत्वपूर्ण साबित होगा।”
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प मुंबई, दि. २१ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय…
View On WordPress
0 notes
cuttykajal · 2 years
Text
Tent City Varanasi :पीएम मोदी ने दी गंगा किनारे बसी टेंट सिटी की सौगात, मिलेंगी ये आलीशान सुविधाएं
Tent City Varanasi Opens Tent City Varanasi: शुक्रवार को, सूरज उगने से ठीक पहले, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने उत्तरवाहिनी गंगा के वाराणसी के पूर्वी तट पर तंबुओं के शहर को अनिवार्य रूप से इसका आधिकारिक उद्घाटन किया। रविदास घाट पर आयोजित भव्य कार्यक्रम में मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ और केंद्रीय जल बंदरगाह मंत्री सर्बानंद सोनोवाल भी मौजूद थे. 15 जनवरी से टेंट सिटी के पूरी तरह से जीर्णोद्धार के बाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Ganga Vilas:वाराणसी पहुंचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, बोले- गंगा विलास क्रूज आत्मनिर्भर भारत की मिसाल - Union Minister Sarbananda Sonowal Varanasi Visit Said Ganga Vilas Cruise Is Example Of Aatmnirbhar Bharat
Ganga Vilas:वाराणसी पहुंचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, बोले- गंगा विलास क्रूज आत्मनिर्भर भारत की मिसाल – Union Minister Sarbananda Sonowal Varanasi Visit Said Ganga Vilas Cruise Is Example Of Aatmnirbhar Bharat
काशी विश्वनाथ धाम में केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल – फोटो : अमर उजाला विस्तार गंगा विलास क्रूज आत्मनिर्भर भारत की मिसाल है। नदी में चलने वाला दुनिया का सबसे बड़ा पूरी तरह स्वदेशी यह क्रूज भारतीय मेधा की पहचान है। यह क्रूज आने वाले समय में भारतीय तकनीक का लोहा मनवाएगा। उक्त बातें केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल ने गुरुवार को रविदास घाट पर कहीं। केंद्रीय मंत्री ने कहा कि जलमार्ग संख्या एक से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loktantraudghosh · 2 years
Text
5वां प्राकृतिक चिकित्सा दिवस पूरे देश में भविष्य के लिए स्वास्थ्य देखभाल प्रणाली के रूप में मनाया
5वां प्राकृतिक चिकित्सा दिवस पूरे देश में भविष्य के लिए स्वास्थ्य देखभाल प्रणाली के रूप में मनाया
5वें प्राकृतिक चिकित्सा दिवस के अवसर पर केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल ने नई दिल्ली में आज आयुष मंत्रालय के सहयोग से अंतर्राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संगठन (आईएनओ), सूर्य फाउंडेशन द्वारा आयोजित एक कार्यक्रम में भाग लिया। इस अवसर पर श्री सोनोवल ने कहा,  “प्रकृति भगवान का स्वरूप है, हमें उसमें मौजूद शक्ति, क्षमता और समृद्धि को समझना चाहिए लेकिन कभी-कभी हम इन चीजों को महत्व नहीं देते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samvadprakriya · 2 years
Text
सर्बानंद सोनोवाल ने हिंद महासागर की नीली अर्थव्यवस्था की क्षमता का उपयोग करने के लिए विभिन्न पहलों के लिए की घोषणा
सर्बानंद सोनोवाल ने हिंद महासागर की नीली अर्थव्यवस्था की क्षमता का उपयोग करने के लिए विभिन्न पहलों के लिए की घोषणा
नई दिल्ली, 5नवंबर। केंद्रीय पत्तन, पोत परिवहन और जलमार्ग तथा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल ने शुक्रवार को चेन्नई, तमिलनाडु में भारतीय समुद्री विश्वविद्यालय (आईएमयू) के सातवें दीक्षांत समारोह में कई पहलों की घोषणा की। केंद्रीय मंत्री ने आईएमयू के समुद्री अध्ययन नीति अनुसंधान केंद्र (सी-पीआरआईएमईएस) का भी उद्घाटन किया। सी-पीआरआईएमईएस केंद्र समुद्री अध्ययन करने के साथ समुद्री अर्थव्यवस्था के विकास के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
पूर्वोत्तर में भाजपा का सबसे बड़ा कार्यालय कल गुवाहाटी में खुलेगा
पूर्वोत्तर में भाजपा का सबसे बड़ा कार्यालय कल गुवाहाटी में खुलेगा
गुवाहाटी में भाजपा के नए कार्यालय में एक गेस्ट हाउस और मीडिया सेंटर है गुवाहाटी: पूर्वोत्तर में भाजपा के सबसे बड़े कार्यालय का उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा कल गुवाहाटी में करेंगे। यह कार्यालय क्षेत्र में पार्टी के मुख्यालय के रूप में कार्य करेगा। इस अवसर पर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल और असम के पार्टी के अन्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
आणि
, आज तीन ऍथलीट पदकासाठी उतरणार मैदानात
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पेमेंटस कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात ७६ हजार कोटी रूपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल, असा विश्वास, केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं.
****
ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.
उसाचा रस,  बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानं राज्यातल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
****
पेसा क्षेत्रातल्या भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.  आदिवासी भागातल्या पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
दरम्यान, काल मुंबईत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पन्नातला वाटा सर्वाधिक असल्याचं नमूद केलं. राज्याची एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलतांना, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं.
****
राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना परवा घडली, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात हे मत व्यक्त केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचं अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश, राज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं सर्व सरकारी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या चार तालुक्यात पिकविम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही, याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं काल पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे यांनी काल गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत, हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या तीन सप्टेंबरला मुंबईत विधान भवनात 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. विधान परिषद आणि विधान सभा अशा दोन्ही सभागृहांतल्या सन २०१९ ते २०२४ या कालावधीतले हे पुरस्कार आहेत. यावेळी "वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व" या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीनं काल मुंबईत झालेल्या ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये एक टक्का मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली असून, याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते.
****
नांदेड इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
पॅरालम्पिकमध्ये नांदेड जिल्हयाचा गौरव करणाऱ्या भाग्यश्री जाधव तसंच लता उमरेकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटी च्या वतीनं काल नागपूर इथं संविधान चौकात नारी न्याय आंदोलन करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरता देशातल्या अनेक राज्यात हे आंदोलनं करण्यात येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीनं, क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत वाहन फेरी काढण्यात आली.
****
मालवण मधल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
****
लातूर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. बार्शी रस्त्यावर नवीन एमआयडीसी भागात जवळपास ११२ एकर जागेत बाजार समिती उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आठ लिलाव कक्ष, सुमारे चौदाशे गाळे, सुसज्ज वाहनतळ आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशमुख यांनी या सर्व कामांची पाहणी करून आवश्यकत्या सूचना केल्या.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं आजपासून एक सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान���ये या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात शितल देवी आणि राकेश कुमार यांनी संयुक्तरित्या १३९९ गुणांसह नवा विक्रम नोंदवला. दोन सप्टेंबर रोजी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी लेखरा १० मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळणार आहे.
 ऍथलेटीक्समध्ये तीन पॅरा ऍथलीट आज पदकासाठी खेळतील.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हिडिओ: केंद्रीय मंत्री इराणमधील भारत-संचालित मोठ्या बंदराची पाहणी करत आहेत
व्हिडिओ: केंद्रीय मंत्री इराणमधील भारत-संचालित मोठ्या बंदराची पाहणी करत आहेत
इराणचे चाबहार बंदर हा भारतासाठी भूपरिवेष्टित प्रदेशात समुद्र प्रवेशासाठी अत्यंत आवश्यक असलेला प्रकल्प आहे नवी दिल्ली: जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी इराणमधील भारताद्वारे संचालित मोठ्या बंदराची पाहणी केली. इराणचे चाबहार बंदर हा भारताला भूपरिवेष्टित प्रदेशात समुद्रात प्रवेश मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला प्रकल्प आहे. ही सुविधा क्षेत्रासाठी एक व्यावसायिक संक्रमण केंद्र म्हणून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
"एशिया के उभरते युग का हिंद महासागर केंद्र": केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
“एशिया के उभरते युग का हिंद महासागर केंद्र”: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
एशियाई संगम नदी सम्मेलन 2022 के विशेष सत्र में सर्बानंद सोनोवाल गुवाहाटी: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल ने शनिवार को सतत विकास के लिए दक्षिण पूर्व एशियाई क्षेत्र में समुद्री संसाधनों और पारिस्थितिक रूप से जिम्मेदार आर्थिक विकास के दोहन पर जोर दिया। उन्होंने कहा कि भारत “समुद्र आधारित नीली अर्थव्यवस्था के विकास के माध्यम से क्षेत्र के लिए अधिक सहकारी और एकीकृत भविष्य” की तलाश कर रहा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
parichaytimes · 2 years
Text
दिल्ली: नरेंद्र मोदी रोंगाली बिहू कार्यक्रम में वाद्य यंत्र बजाते हैं | समाचार - टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
दिल्ली: नरेंद्र मोदी रोंगाली बिहू कार्यक्रम में वाद्य यंत्र बजाते हैं | समाचार – टाइम्स ऑफ इंडिया वीडियो
अप्रैल 23, 2022, 10:09 PM ISTस्रोत: एएनआई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्बानंद सोनोवाल के आवास पर आयोजित रोंगाली बिहू कार्यक्रम में शामिल हुए. रोंगाली बिहू सात दिनों के लिए मनाया जाता है जो 14 अप्रैल से शुरू होता है, असमिया नए साल की शुरुआत। पीएम मोदी ने वहां ढोलक और अन्य वाद्य यंत्र बजाए। . Source link
View On WordPress
0 notes
mrdevsu · 3 years
Text
सर्बानंद सोनोवाल, एल मुरुगन और TMC की सुष्मिता देव राज्यसभा के लिए निर्विरोध चुने गए
सर्बानंद सोनोवाल, एल मुरुगन और TMC की सुष्मिता देव राज्यसभा के लिए निर्विरोध चुने गए
राज्यसभा उपचुनाव: केंद्रीय मंत्री एल मुरुगन (एल मुरुगन) और केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल (सुष्मिता देव) को निष्क्रिय की सुष्मिता देव। केंद्रीय मंत्री सर्ब मनोबल से संबंधित घोषित किए गए हैं। इस पद पर रहने के लिए चुने गए सदस्य के रूप में निर्वाचित सदस्य घोषित होने के बाद। एल मुरुगन से संचार के लिए अक्षम हैं. ट्वायल बैट से चलने वाले इंटरनेट में शामिल होने के लिए सुविज्ञाता देव को इंटरनेट से…
View On WordPress
0 notes