Tumgik
#सीमा सिंग
airnews-arngbad · 4 months
Text
 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ६९ पूर्णांक १६ शतांश टक्के मतदान झालं. निवडणूक आयोगानं ही सुधारित आकडेवारी काल जाहीर केली. १३ तारखेला झालेल्या चौथ्या टप्प्यात पुरुष मतदारांचं प्रमाण ६९ पूर्णांक ५८ शतांश टक्के, महिला मतदारांचं प्रमाण ६८ पूर्णांक ७६ टक्के, तर तृतीयपंथी मतदारांचं प्रमाण ३४ पूर्णांक २३ शतांश टक्के इतकं आहे.
****
फ्रान्समध्ये ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात, ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अर्थात इफ्फीच्या अधिकृत पोस्टरचं अनावरण, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते काल झालं. यावर्षी पहिल्यांदाच कान चित्रपट महोत्सवात भारत पर्वाचं यजमानपद भारत भूषवत आहे.
****
नायगाव - जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरीवली, कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते काल मुंबईत कांदिवली इथं कोकणवासियांच्या मेळाव्यात बोलत होते. हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सीमा शुल्क विभागाने १३ ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विविध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
मुंबईतल्या घाटकोपर इथं फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी फलकाचा मालक भावेश भिंडे याला दंडाधिकारी न्यायालयानं २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
आषाढी वारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, पालखी मार्गावरील तसंच पंढरपूर शहरातले बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत, तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश, सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढ वारी पूर्वनियोजनाबाबत झालेल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी  केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी  केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
खेसारी लाल यादव दोन भोजपुरी सुंदरींमध्ये अडकला, पाहा व्हिडिओ
खेसारी लाल यादव दोन भोजपुरी सुंदरींमध्ये अडकला, पाहा व्हिडिओ
अंगुरी से ना चूवे पायबू गाण्यात सीमा सिंग आणि अक्षरा सिंगसोबत खेसारी लाल यादवचा रोमान्स, पाहा व्हिडिओ खेसारी लाल यादवचे भोजपुरी गाणे: खेसारी लाल यादव भोजपुरी चित्रपट ‘साथिया’ मधील ‘अंगूरी से ना छुए’ या गाण्यात दोन सुंदरींवर रोमान्स करताना दिसत आहेत. खेसारी लाल यादव यां��े भोजपुरी गाणे: भोजपुरी सिने अभिनेता आणि गायक खेसारीलाल यादव तो त्याच्या भोजपुरी म्युझिक व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Strange Love Story: न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन; 18 वर्षाचीआसिया आणि 61 वर्षाचा शमशाद; पाकिस्तानातील निकाह चर्चेत
Strange Love Story: न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन; 18 वर्षाचीआसिया आणि 61 वर्षाचा शमशाद; पाकिस्तानातील निकाह चर्चेत
Strange Love Story: न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन; 18 वर्षाचीआसिया आणि 61 वर्षाचा शमशाद; पाकिस्तानातील निकाह चर्चेत न उम्र की सीमा हो, न जनम का हो बंधन… जगजीत सिंग यांची ही गझल अत्यंत लोकप्रिय आहे. या गझलप्रमाणे खरोखरच प्रेमकहानी पाकिस्तानात घडली आहे. 18 वर्षाची आसिया(Asiya) आणि 61 वर्षाचा शमशाद(shamshad). पाकिस्तानातील(Pakistan) या दोघांचा निकाह चांगलाच चर्चेत आला. या निकाहच्या…
View On WordPress
0 notes
vividuttarakhand · 3 years
Photo
Tumblr media
उत्तराखंड के त्योहार और परंपराओं की अलग ही सुंगंध। इगास लोकपर्व को राजपत्र में मिला स्थान इससे पूर्व हरेला को भी राजपत्र में स्थान मिल चुका है. कुमाऊँ अंचल में ही प्रचलित हरेला, राजपत्र में स्थान मिलने पर पूरे उत्तराखण्ड का पर्व बन गया। इगास / बूड़ी दीपावली सम्पूर्ण उत्तराखण्ड में मनाया जाता है (जौनसार-बाबर में पन्द्रह दिन बाद). बरसात के हरेला और बग्वाळ के इगास के बाद बसंत के फुलदेई पर्व को भी राजपत्र में स्थान मिल जाए तो कह सकते हैं कि पृथक राज्य आंदोलन की अवधि में जिस उत्तराखण्ड का स्वप्न देख कर मांग की जाती थी, उसके सांस्कृतिक स्वरूप की अनुहार राजपत्र में दिखने लगी है. इगास के राजपत्र में शामिल होने और इस सीमा तक राज्याश्रय मिलने से कम से कम दो लाभ साफ दिखते हैं – पहला, आधुनिकता की चकाचौंध में विलुप्ति की कगार पर खड़ा एक स्थानीय लोकपर्व को जीवनदान मिला है. दूसरा, इससे पृथक राज्य के सांस्कृतिक आधार को भी जस्टिफिकेशन मिला है. इगास की परम्परा को लेकर एक भ्रम भी चिंता का विषय है. भ्रम ये कि इसको मनाने की शुरुआत सत्रहवीं सदी के गढ़-सेनापति माधो सिंह भण्डारी की दापा-विजय के बाद, इगास को श्रीनगर लौटने से हुई. गढ़वाली लोकगीतों में बारह और कुमाऊंनी लोकगीतों में बीस बग्वाळ का वर्णन मिलता है। माधो सिंह भण्डारी से सम्बंधित एक लोकगीत की पंक्तियाँ इस तरह हैं – बारा ऐन बग्वाळी माधो सिंग. सोळा ऐन सराद माधो सिंग. ज़ाहिर है सत्रहवीं सदी में दापा की लड़ाई से जब तक माधो सिंग वापसी नहीं कर पाये थे, तब तक श्राद्ध पक्ष के सोलह दिन और बग्वाळ (दीपावली) के बारह दिन बीत चुके थे. बग्वाळ के ये बारह दिन दीपावली के पूर्व दिवस से इगास तक होते हैं. माधो सिंह भण्डारी का विजयोपरांत राजधानी श्रीनगर आगमन एकादशी या इगास की मध्यरात्रि को हुआ था, ये सत्य है, और ये भी कि तब से इगास के उत्साहपूर्वक आयोजन का एक और आधार मिल गया था. पर ये कहना उचित नहीं कि इगास की शुरुआत उसी दिन से हुई थी. इगास के कणसी और बूड़ी बग्वाळ जैसे नाम भी इसके लोकपर्व होने की पुष्टि करते हैं, राजाज्ञा आधारित राजपर्व नहीं. टिहरी में मनायी जाने वाली रिख-बग्वाळ जरूर राजपर्व है जो लोदी रिखोला की विजय और घर वापसी की खुशी में मार्गशीर्ष अमावस्या को मनाया जाती है। इगास का संदेश स्पष्ट है – सफलता और उपलब्धि के सहयोगियों के प्रति ���ृतज्ञता प्रकट करना, वंचितों के आंचल में भी हर्ष-उल्लास व पकवान-मिष्ठान्न सुनिश्चित करना और सर्वोपरि ये कि अंधकार को दूर करने के लिए अंत तक प्रयास करना Join:- @vivid_uttarakhand #vividuttarakhand (at Uttarakhand) https://www.instagram.com/p/CWUa-gZBl9O/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 01 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या घटनांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आज इंफाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याची घोषणाही शहा यांनी यावेळी केली आहे.                                       ***
जम्मू-काश्मीरमध्ये, आज पहाटे सांबा जिल्ह्यातल्या मंगुचक चौकीजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं. सांबा भागातून तो आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत होता. 
***
येत्या २१ जून रोजी असलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आपण सज्ज होऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या निमित्त आपण एक अधिक निरोगी आणि आनंदी समाज निर्माण करूया असं आवाहनही त्यांनी आयुष मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना केलं आहे.                                       ***
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता पाच कोटींच्या पुढे गेली आहे. या रुग्णांच्या देयकांची एकूण रक्कम ६१ हजार ५०१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. आयुष्मान कार्डधारकांची संख्या २३ कोटींच्या वर गेली असून, या योजनेत समाविष्ट असलेली २८ हजार ३५१ रुग्णालयं आणि १२ हजार ८२४ खासगी रुग्णालयं यांच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत.
                                      *** केरळमधल्या कन्नूर रेल्वे स्थानकावर आज सकाळी एका एक्सप्रेस रेल्वेच्या डब्यात आग लागली. सर्व प्रवासी रेल्वेतून उतरल्यानंतर ही घटना घडली, त्यामुळं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान, आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य डबे वेगळे करण्यात आले आहेत.
***
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास ८४ रुपयांची कपात झाली आहे. आत हा सिलेंडर एक हजार ८५६ रुपये ५० पैशांऐवजी एक हजार ७७३ रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
***
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्षे होत असून त्यानिमित्त शासनातर्फे दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या सोहळ्याचं उद्धघाटन होईल. रायगड जिल्हा प्रशासनाकडून या समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पुणे इथं येत्या १२ ते १४ जून दरम्यान जी २० च्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची बैठक होणार आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पुण्याच्या प्रगतीचं प्रदर्शन करतानाच, महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन परिषदेच्या सदस्यांना घडवावं, अशी सूचना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक कारभार विभागाचे अपर सचिव अभिषेक सिंग यांनी दिली आहे. या बैठकीच्या नियोजनासंबधी काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
***
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या संकेतस्थळावर कारवाई करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 'इंडिक टेल्स'नं प्रसिद्ध केलेल्या लेखाबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
***
पंढरपूर इथल्या आषाढी वारीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं तीस लाख रुपये मंजूर केले असून, वारीच्या दरम्यान विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितलं.
***
स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा ग्रामपंचायतीमध्ये काल घंटागाडीचं लोकापर्ण गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
                                      *** ओमानमध्ये सलालाह इथं सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.                                      *** नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन - तीन दिवसांत तो काही अंशी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल झाल्याचं ट्विट भारतीय हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.                          //************//
0 notes
vartha24-blog · 5 years
Photo
Tumblr media
लायनेस क्लब ने बेेटियों को सिखाए आत्मरक्षा के गुर भिलाई। लायनेस क्लब भिलाई ने महिला व बालिका सुरक्षा के लिए अपनी जि़म्मेदारी को निभाते हुए जागरूकता की व्यापक पहल की है। इसके अंतर्गत बालिकाओं को आत्म रक्षा के गुर सिखाने लायनेस क्लब भिलाई ने 17 अगस्त को वैशाली नगर शासकीय कन्या विद्यालय में कार्यशाला का आयोजन किया। जिसमें मार्शल आट्र्स के गुरु मॉरिस ने बालिकाओं को विभिन्न परिस्थितियों मे आत्मरक्षा के तरीकों से अवगत कराया। इस दौरान बालिकाओं ने भी बेहद उत्साह के साथ हिस्सा लिया एवं आत्मरक्षा के गुर सीखे। मार्शल आटर््स गुरू मॉरिस ने स्कूली बच्चियों को बगैर हथियार अपने पास उपलब्ध हेयर पिन, पर्स व अन्य साधनों से आत्मरक्षा के उपाय बताए। स्कूल के शिक्षक एवं शिक्षिकाओं ने इस आयोजन को वर्तमान समय के बेहद उपयोगी बताया। इस अवसर पर लायनेस क्लब की प्रेसिडेंट सुषमा उपाध्याय,सचिव सविता श्रीवास्तव,सीमा यादव,तृप्ता कौर कैम्बो,अनिता सहगल,नंदिनी हिवसे,शोभा डोगरा,पुष्पा सिंग,उषा ठाकुर,जया त्रिवेदी उपस्थित थे।
0 notes
onlinekhabarapp · 6 years
Text
अख्तियारसँग के आशा गर्ने ?
अख्तियार दुरुपयोग अनुसन्धान आयोगले कहिले उजुरी आउला र छानबिन एवं कारवाही गरौंला भनेर बस्ने हो भने भ्रष्टाचार न्यूनीकरण सम्भव छैन । राजनीतिक-प्रशासनिक क्षेत्रका शक्तिशाली हुन् वा अर्थमा रजगज गर्ने र ठेक्कापट्टाका सिन्डीकेट सञ्चालक, उनीहरुमाथिको छानविन एवं कारवाहीमा अख्तियार ‘प्रो एक्टिभ’ बन्नैपर्छ ।
भ्रष्टाचार नियन्त्रणका नीतिगत निर्णय र त्यसको कार्यान्वयन सजिलो छैन । त्यसमा लिने पहलमा अख्तियारका पदाधिकारीहरुको मूल्यांकन हुन्छ । लोकमानसिंह कार्की र दीप बस्नेतकालीन आयोगको धब्बा मेट्न अहिलेका प्रमुख आयुक्त नविनकुमार घिमिरेलाई हम्मे नै छ ।
विगतमा भएका सूचना चुहावट र फाइल अव्यवस्थापनले आयोगलाई अहिले पनि बाधा पारेको बुझ्न सकिन्छ । संसद तहसम्म पुगेको छानबिनले भने घिमिरेको आत्मवल उच्च नै देखाउँछ ।
सरकार, संसद र सरकारी सेवाको उपल्लो तहसँगै ठेकेदार र कन्सल्टयान्टसम्मको ‘क्लस्टर’ बनाएर छानविन एवं कारवाही नगरेसम्म अख्तियारको प्रभावकारिता देखिन्न । सरकारका नीतिगत निर्णयहरुमा समेत चासो देखाउन सक्दा सुशासनमा मद्दत नै पुग्छ ।
नेपाली जनताले राजनीतिक हिसाबले संघीय लोकतान्त्रिक शासन व्यवस्था , संबैधानिक सर्वोच्चता र न्यायिक स्वतन्त्रता जस्ता मूल्य-मान्यतासहितको संविधान त पाए, तर भ्रष्टाचाररहित र विकासको आकांक्षासहितको कानुनी शासन प्रत्याभूत भएको सुशासनको चाहनामा आज पनि तगारो नै लागेको छ ।
हरेक क्षेत्रमा बेथितिले सीमा नाघिसक्यो । सुरक्षामासमेत गम्भीर चुनौती देखिँदैछ । निर्मला पन्तका लागि न्यायको खोजी गर्ने उनका मातापिताको समेत जीवन रक्षाको माग गर्नुपर्ने अवस्था सिर्जना भैसक्यो ।
सुशासनकै सन्दर्भमा पनि अख्तियार दुरुपयोग अनुसन्धान आयोगको मात्र प्रभावकारिता हेरेर नहुने रहेछ । भ्रष्टहरुले कानुनका छिद्र-छिद्र पहिल्याएर न्यायालयबाटै उन्मुक्ति लिँदै हाम्रो न्याय प्रणालीमाथि नै व्यंग्य गरिरहेका छन् । मानव अधिकारको स्थिति पनि कहालीलाग्दो अवस्थामा छ । स्थिर र बलियो मानिएको सरकारबाट शान्ति सुरक्षा, मानव अधिकार, सुशासन र समृद्धिजस्ता क्षेत्रमा काम हुन नसक्दा राजनीतिक स्थायित्वमाथि नै प्रश्नचिन्ह खडा भएको छ ।
सुशासन, भ्रष्टाचार नियन्त्रण र दिगो विकास जस्ता विषय विश्वब्यापी शासकीय सोचका रुपमा विकास भएको भएता पनि नेपाल जस्तो देशमा सुशासन शासकीय शैलीमा रुपान्तरण हुन सकेको छैन । जवाफदेही र पारदर्शीता जस्ता विषय सुशासनका आधार स्तम्भ हुन् । तर विकासको अनिवार्य पूर्वशर्तका रुपमा रहेको सुशासन कायम हुन नसक्दा जनताको बलिदानीपूर्ण संघर्षबाट प्राप्त ब्यवस्था समेतमा प्रश्न चिन्ह खडा हुन पुग्छ, जुन आज सुरु भैसकेको छ ।
प्रेस स्वतन्त्रता, निश्पक्ष न्यायालय, सरकारका नीतिगत निर्णयहरुमा पारदर्शिता, स्थानीय तह सुदृढीकरण, बजेटमा पारदर्शिता जस्ता विषयको प्रभावकारिताले भ्रष्टाचार न्यूनीकरणमा मद्दत पुर्‍याउने हो । मन्त्रिपरिषदका निर्ण�� सार्वजनिकीकरणमा रोक, प्रेसमाथि अंकुश, न्यायालयमै विचौलियाको रजगज, अधिकारसम्पन्न निकायलाई छलेर निर्णय गराउन मन्त्रिपरिषदमा प्रस्ताव पठाउने जस्ता जाली कामले सुशासनमा टेवा पुर्‍याउँदैन । तर, दुर्भाग्य, भटाभट त्यस्तै काम भैरहेका छन् ।
यतिबेला सुशासन भन्ने विषय नै ‘स्यालको सिंग’ बन्दैछ । दुनियाँमा ठूला भ्रष्टाचार नीतिगत तहमै हुने गरेको छ । त्यस्ता भ्रष्टाचार वा अनियमिततामा बिरलै कारवाही हुने गरेको छ । लोभ, डर र दबावमध्ये कुनै एकमा परेर गरिने भ्रष्टाचारको कुनै सीमा छैन । भ्रष्टाचार उन्मूलन र सदाचार निर्माण भनेको कानुनी वा आदर्शको कुरा मात्रै नभएर समृद्धि निर्माण गर्ने पक्ष पनि हो । यी र यस्ता सैद्धान्तिक/नीतिगत पाटोमा एक्लो अख्तियार दुरुपयोग अनुसन्धान आयोग कति कामयाव होला भन्ने प्रश्न पनि उत्तिकै जटिल छ ।
राष्ट्रसेवक भनिएका एकाथरी कर्मचारीले लोकसेवा आयोग पास गरेलगत्तैबाट अर्थ/भौतिक मन्त्रालय छाडेका छैनन् । पेशागत संघ/संगठनका नेताहरुले आफ्नो सम्पत्ति छानविनमै प्रभाव पार्दै आएका छन् । सस्तोमा घर/घडेरी किनेर महंगोमा बिक्री गरेको देखाएर अबैध कमाइलाई बैध बनाउनु कर्मचारीको मुख्य खेलोमेलो बनेको छ ।
राज्य संयन्त्रका राजनीतिक नेतृत्व, उच्च प्रशासक र ‘राष्ट्रिय गौरवका’ भनिएका आयोजनामा कार्यरतदेखि कन्सल्टयान्ट सम्मको सम्पत्ति छानविन नगरिँदासम्म भ्रष्टाचारको वास्तविक तस्वीर बाहिर आउनै सक्दैन । राष्ट्रिय गौरवको आयोजनाभित्रको एउटा मेलम्ची खानेपानी आयोजनालाई नै हेर्ने हो भने पनि अनियमितताको कहालीलाग्दो तस्वीर देखिन्छ । अख्तियार भने पहिला काठमाडौंमा पानी झरोस् भन्ने पर्खाइमा रहेको बुझ्न कठिन छैन ।
सरकारले जग्गाको कित्ताकाट रोक्ने निर्णय गरेकैबेला एउटै कित्तामा १९ पटक कित्ताकाट गरिएको समाचार बाहिर आयो । यी र यस्ता विषयको लेखाजोखा सहितको फाइल अख्तियारमा तयार भएकै हुनुपर्छ । त्यसक्रममा आयोगमाथि बाहृ्रय प्रभाव परेकै छैन होला भनेर मानिहाल्ने अवस्था  छैन । ठूला अनियमितताहरुमा संलग्न राजनीतिक नेतृत्व र उच्च प्रशासकबाटै भोलि आफ्नो वृत्तिविकासमा सहयोग लिनुपर्ने हुँदा अख्तियारका कर्मचारीले जमेर बयान लिन सक्ने अवस्था पनि रहँदैन ।
अख्तियारको प्रभावकारिताले सुशासनसँगै समृद्धिको यात्रामा टेवा पुर्‍याउने हो । सुशासनविना शान्ति, विकास र समृद्धि सम्भव छैन । आज राजनीतिक दलहरुका नेता-कार्यकर्ताको महंगो जीवनशैली, आम्दानीको अपारदर्शी श्रोत, महंगो चुनावी अभियान, लाभको पदमा नियुक्ति र अतिरिक्त आम्दानी हुने ठाउँमै कर्मचारीको पदस्थापना तथा नियुक्तिजस्ता कार्यले समाजलाई भ्रष्टीकरण गर्दै लगेको छ ।
हतियारदेखि हवाइ क्षेत्रसम्मका माफियाले राज्यबाट आफू अनुकुल निर्णय गराउने खुलेआम बताउन थाल्नु सरकार स्वयंम पनि भ्रष्टीकरणको बाटोमा हिँडिसकेको थप प्रमाण बनेको छ । यस्तो स्थितिमा अख्तियारले साहसिक कार्यसम्पादन गर्न सक्दा सुशासनसँगै संघीय गणतन्त्रले स्थायित्व पाउन सक्ला । अन्यथा नेपाली जनताको बलिदानीपूर्ण संघर्षवाट प्राप्त उपलब्धीहरु नै अतिवादीहरुको सिकार नबन्ला भन्न सकिन्न ।
0 notes
aslihindustan-blog · 8 years
Text
कॉंग्रेस के नेता दिग्विजय सिंग ने इसरो द्वारा एक साथ 104 सेटेलाइट छोड़े जाने पर बयान दिया की इसरो की इस कामयाबी का श्रेय नेहरू को जाता है
मतलब इतनी बेशर्मी! माना की नरेंद्र मोदी से कांग्रेस के नेताओं को बहुत ज्यादा नफरत है, हर चीज में ही विरोध करना है पर इतनी बेशर्मी जिसकी कोई सीमा ही नहीं अभी हाल ही में भारत ने एक नया कीर्तिमान स्थापित किया हमारे इसरो के वैज्ञानिको के मेहनत और काबिलियत के कारण हमने नया वर्ल्ड रिकॉर्ड बनाया और एक साथ 104 उपग्रह स्थापित किये अब इसका मुख्य श्रेय किसी भी नेता को नहीं बल्कि हमारे वैज्ञानिको को ही जाता है हां इस वक़्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है, तो उनको भी थोड़ा श्रेय तो जाता ही है, इस से पहले भी जो जो प्रधानमंत्री रहे उनको भी श्रेय जाता है पर कांग्रेस के नेता दिग्विजय सिंह ने तो हद ही कर दी, मतलब मोदी विरोध के लिए ऐसी नीचता दिग्विजय सिंह ने कहा की, इसरो के पीछे मोदी का कोई योगदान नहीं है, इसरो की सफलता का सारा श्रेय जवाहर लाल नेहरू को जाता है कोई इस महान कांग्रेसी नेता को बताये की इसरो की स्थापना 1969 में हुई थी और नेहरूजी 1964 में मर गए थे। वाह रे कांग्रेसी चापलूसता
1 note · View note
amhikastkar · 4 years
Text
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका 
[ad_1]
पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग दूषित होऊ न देण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने ठोस पावले उचलावी लागतील. कारण, चिनी बियाणे दहशतवादाने सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर मुद्दा बियाणे उद्योगाने पुढे आणला आहे. 
भारतीय बियाणे संघटनेचे संचालक (एनएसएआय) इंद्रा शेखर सिंग यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले की, ‘‘भारतीय बियाणे कंपन्यांना चीनमध्ये मनाई आहे. मात्र, चीनी कंपन्या भारतात सर्व…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
नागरिकांचं आयुष्य सुकर करणं हे सरकारचं ध्येय - ई-गव्हर्नन्स परिषदेत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचं संघटनात्मक बांधणीसाठी नांदेड इथं अधिवेशन.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि खतं पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा - सहकारमंत्री अतुल सावे यांचं आवाहन.
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर तीनशे शहाऐंशी धावांचं आव्हान.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमाल प्रशासन आणि किमान शासन हा मंत्र दिला असून त्याचं ध्येय नागरिकांचं आयुष्य सुकर करणं हे आहे, असं मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. मुंबईत ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेत ते आज बोलत होते. हे माहितीचं युग आहे आणि डिजिटायझेशनमुळे कामकाजात सुलभता येते, खर्च कमी होतो, वेळ वाचतो आणि माहितीची बॅंक तयार होते, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेला संबोधित केलं. राज्य सरकार उत्तम प्रशासन जिल्हा पातळीपर्यंत पोचवेल आणि प्रत्येकाच्या हितासाठी प्रशासनाचा निर्देशांक तयार करेल, असं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मुलांशी आज संवाद साधत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल विज्ञान भवनात या मुलांना पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. कला, संस्कृती, शौर्य, शोध, समाज सेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या असामान्य योगदानाबद्दल ११ मुलांना हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातल्या राजुरी नवगण इथल्या रोहन बहीर याचा समावेश आहे. रोहनने गावातल्या डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने वाचवलं, त्याच्या या शौर्यासाठी त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 
****
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव - केसीआर यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी केसीआर यांनी नांदेड इथं पक्षाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भारत राष्ट्र समिती’ बीआरएस हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची शक्यता असून, त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी हा पक्ष युती करणार असल्याची चर्चा आहे. नांदेड इथल्या सभेनंतर केसीआर हे पुण्यात आणि त्यानंतर औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. सध्या सीमा भागातील किनवट, बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि माहूर या तालुक्यांमध्ये पक्षवाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात लोकसभेच्या आठ आणि विधानसभेच्या २२ जागांवर तेलगू भाषिकांचा प्रभाव असल्यामुळे केसीआर यांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या युती संदर्भात अद्याप ‘बीआरएस’ शिवसेनेचा ठाकरे गट किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पैकी कुणीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
****
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. नवे मित्र जोडण्याला कुणाचा विरोध नाही परंतु मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
****
आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, आयुष मंत्रालयाकडून, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल. आयुर्वेद आणि इतर चिकित्सा प्रणालींमध्ये वैद्यकीय पर्यटनाला वाव देण्यासाठी या कराराचा त्याला लाभ होऊ शकेल.
****
भारतीय प्रजासत्ताकाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येत्या सव्वीस जानेवारीला मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज करण्यात झाली. मागच्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या समारंभात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना आज पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
सामान्य शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेला असताना मोदी सरकारनं देशातल्या फक्त एकवीस उद्योजकांचं सुमारे साडेदहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं असून, संसदेत दिलेल्या माहितीत या उद्योजकांची नावं दडवण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाशिक इथे आज काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाचा शुभारंभ नाना पटोले यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद इथे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून या अभियानाची सुरवात करण्यात आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची उद्दिष्टं आणि संदेश देशातल्या जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राबवण्यात येत आहे.
****
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि खतं पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. पणन महासंघ अधिमंडळाची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन राबवत असलेल्या योजनांची माहिती देत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळावा, यासाठी पणन महासंघानं पुढाकार घ्यावा, असंही सावे यांनी म्हटलं. वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहकारी संस्था आणि पणन महासंघातले उत्कृष्ट काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं आज कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर तीनशे पंचाऐंशी धावा केल्या. इंदूर इथं सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहितनं ८५ चेंडूत एकशे एक धावा तर शुभमननं ७८ चेंडूत ११२ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पंड्याने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या. विराट कोहली ३६ आणि शार्दुल ठाकूरच्या २५ धावा वगळता, अन्य फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघाची सुरवात अडखळत झाली. पाहुण्या संघाचा सलामीचा फलंदाज हार्दिक पंड्याच्या चेंडूवर शून्यावरच बाद झाला.
****
मेलबर्न इथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी श्रेणीत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज लाटवियाच्या येलेना ओस्तापेंको आणि स्पेनच्या डेविड वेगा हर्नांडिज या जोडीनं उपान्त्यपूर्व फेरीत भारतीय जोडीला पुढे चाल दिल्यानं मिर्झा-बोपन्ना जोडीचा उपान्त्य फेरीत प्रवेश झाला.
****
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं, २०२३ हे वर्ष “हरित संकल्प बळकट करण्यासाठी” समर्पित केलं असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांनी दिली आहे. औरंगाबाद इथल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर एक्स्ट्राग्रीन डिझेल विक्रीचं औपचारिक उद्घाटन आज झालं, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडियन ऑईलकडून राज्यात विविध सुविधांच्या विकासासाठी दोन हजार ३२६ कोटी रुपये खर्च होणार असून पुढील ३-४ वर्षांत राज्यात सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही अनिर्बन घोष यांनी यावेळी केली.
****
लातूर इथे शासकीय निवासी शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये लातूर, अहमदपूर तालुक्यातल्या मरशिवणी आणि उदगीर तालुक्यातल्या तोंडारपाटी इथल्या, मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि रेणापूर तालुक्यातल्या बावची तसंच निलंगा तालुक्यातल्या जाऊ इथल्या, मुलींच्या शासकीय निवासी शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक; पहिल्या वीर बाल दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विधीमंडळात विरोधक आक्रमक; राज्य सरकार उद्या ठराव मांडणार.
व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक.
आणि
कचनेर इथून पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद.
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या ४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो अतीत से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कायर्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले –
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती क�� एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
दरम्यान, मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकारकडून ठराव मांडण्यात आला नाही. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले –
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक सरकार, तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी करत, सरकारने ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले –
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
महाराष्ट्राची एक इंचही जमीन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं. अधिवेशनात आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं. 
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मधे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देताना अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी सीबीआय ही चौकशी करत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपी मध्य प्रदेशातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून मुर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत आज ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. १९८२ पासून विद्यार्थ्यांना ४० रुपये विद्यावेतन मिळत असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात हंगरगा आणि दापका या दोन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं, या विरोधात आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचं निलंबन केल्यासंदर्भात सदस्य राजेश पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महाजन उत्तर देत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील उत्तर देत होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका टेकडीची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती -एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली. मंदा खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर केला होता. सर्व प्रकारचे नियम उल्लंघन करून याबाबतच्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आणि सुमारे चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
तंत्रज्ञान हे देशातल्या सामान्य नागरीकांना सशक्त बनवण्याचं माध्यम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “तंत्रज्ञान आधारित विकास” या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात केलेल्या तरतुदींविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. वैद्यकीय क्षेत्र देखील तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आहे, भारतीय खेळण्यांची बाजारपेठ खूप विस्तृत असून, मुलांसाठी तंत्रज्ञानानं युक्त खेळण्यांवर भर देण्यात येत आहे, तसंच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक कचऱ्याशी संबंधित समस्या सोडवणं शक्य होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूस्थानिक प्रणाली, ड्रोन, सेमीकंडक्टर, जीनोमिक्स, स्पेस टेक, स्वच्छ तंत्रज्ञान, यावर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला असल्याचं ते म्हणाले. विज्ञान सर्वत्र आहे, परंतू तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर देखील असलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
****
युक्रेनमध्ये अडकलेल्या २०० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन सिक्स ई-8387 हे विशेष विमान आज दिल्लीत दाखल झालं. यात महाराष्ट्रातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाची रणनिती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स���कारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अन्यथा विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
****
विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिलं जाईल पण ते येणार नाहीत, मात्र विरोधकांनी चहापानाला यावं, चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली असल्याचंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात निवासी आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी - नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ, आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सोहळ्यात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित आहेत. वातावरणातील प्रदूषण कमी करुन, माफक दरात सीएनजी आणि घराघरात घरगुती गॅस पोहोचवण्याची ही योजना आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं हे काम करण्यात येत आहे.  
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला परवा चार मार्चपासून सुरुवात होत आहे. राज्य शिक्षण मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत नियमित शुल्कासहित ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे परीक्षांबाबतच्या अनिश्चिततेचा सामना केल्यानंतर आता या परीक्षा नियमित सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा, महाविद्यालय तिथं केंद्र’ असणार आहे. याचा मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. बैठे भरारी पथक म्हणून दुसऱ्या शाळेतले एक शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. त्याचबरोबर माध्यमिक, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी यांची सहा भरारी पथकंही परीक्षांवर लक्ष ठेवणार आहेत.
दरम्यान, दहावीची परिक्षा १५ मार्चपासून सुरु होत आहे.
****
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त काल महिला आणि बालकल्याण विभागानं तयार केलेल्या नव्या घोषवाक्याचा प्रांरभ करण्यात आला. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातल्या लहान मुलांशी संवाद साधला. सीमा सुरक्षा दलातर्फे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. स्वातंत्र्य सैनिकांच्या कथांचं चित्रण या प्रदर्शनात केलं असून, त्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख मुलांना सहजगत्या होईल असं इराणी यावेळी म्हणाल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
** रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नसल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून लोकसभेत स्पष्ट
** जात वैधता प्रमाणपत्रांसंदर्भात येत्या ३० मार्चपर्यंत विशेष मोहीम
** राज्य सरकारकडून वीज ग्राहकांच्या आंदोलनाची मुस्कटदाबी - माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांचा आरोप
आणि
** औरंगाबाद इथं आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू ; जालन्यात ३०४ तर बीड जिल्ह्यात आज २८३ नवे कोविडग्रस्त
****
रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नसल्याचं, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं. रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती असून ती कायम तशीच राहील, असं त्यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्राला रेल्वेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर राष्ट्राच्या हितासाठी त्यांचं स्वागत असेल, खाजगी क्षेत्रामुळे रेल्वेची वाटचाल अधिक गतिमान आणि प्रभावी होऊ शकते, असं गोयल यांनी सांगितलं.
****
देशात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ३८६ इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रं कार्यान्वित झाली आहेत. केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. देशात सुमारे ३६ कोटी ७१ लाख एल इ डी दिव्यांचं माफक दरात वितरण करण्यात आलं असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात घट होणं अपेक्षित आहे, असं ही त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने विकास वित्त संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २० हजार कोटी रुपये भांडवलाच्या विकास वित्त संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली होती. या संस्थेचं प्रारंभी अनुदान पाच हजार कोटी रुपये असेल, पुढच्या काही वर्षांत तीन लाख कोटी रुपये या माध्यमातून उभारले जाण्याची शक्यता अर्थमंत्र्यांनी वर्तवली आहे.
****
महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातल्या घटनांचं वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेनं व्हावं, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. त्या आज या अनुषंगानं घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या. अशा घटनांचं वार्तांकन करताना, यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षाने पालन करावं, तसंच पोक्सो कायदा, बाल न्याय सुधारित अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याशी निगडित घटनांचं वृत्तांकन करतानाही, पीडीतांबाबत पुरेपूर संवेदनशीलता जपण्यात यावी. माध्यम प्रतिनिधींसाठी यासंदर्भात विशेष जागृती कार्यशाळांचं आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.
****
पुणे इथल्या बार्टी कार्यालयानं सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना येत्या ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२० -२१ या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणुक, तसंच इतर कारणांकरता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असलेल्या अर्जदारांचं नुकसान होवू नये, यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत समितीकडे ६ महिन्यापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित सर्व प्रकरणं निकाली काढण्याच्या तसंच त्रुटी असलेल्या अर्जांबाबत अर्जदाराकडून त्रुटींची पूर्तता करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्रुटी अभावी जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या अर्जदारांनी संबंधित जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रासह संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेत सुरू असलेलं विविध प्रकल्पावरचं संशोधन आणि चाचणीचं काम कालबध्दरित्या पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते आज या संस्थेच्या ५९ व्या नियामक परिषदेच्या बैठकीत बोलत होते. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला हाफकिन संस्थेच्या संचालक सीमा व्यास, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या प्रस्तावित औषध चाचणी प्रयोगशाळेच्या स्थापनेला गती देण्यात यावी तसंच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच.डी करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात यावं, असंही देशमुख म्हणाले.
****
राज्य सरकार कोविड बाबत भावनिक आवाहनाचा फार्स करून तर कधी एकतर्फी कायद्याचा बडगा दाखवून वीज ग्राहकांच्या आंदोलनाची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ७२ लाख घरगुती तर ४२ लाख शेतकऱ्यांची  वीज जोडणी खंडीत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कोविड काळातही जनतेला रस्त्यांवर उतरण्यास राज्य सरकार बाध्य करत असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं. कोविडचा प्रादुर्भाव पाहता, वीजबीलाविरोधातल्या आंदोलनाचं स्वरुप बदलेल, पण भाजप आंदोलन करेलच असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
****
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'एससीईआरटी'च्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे. यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीची तर १४ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही सराव प्रश्नपेढी तयार केली जात आहे. परीक्षेत यापैकीच प्रश्न विचारले जातील, असं नाही, असं परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज आठ कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या एका महिलेचा समावेश आहे. उर्वरित सात मृतांमध्ये औरंगाबाद इथले पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळी कोविड संसर्ग झालेले ६१ नवीन रुग्ण दाखल झाले, तर २६ रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ३०४ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १९ हजार १३३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३९३ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १७ हजार ४५७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या १हजार २६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज २८३ नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ९४ रुग्ण बीड तालुक्यात, त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात ५८, माजलगाव ४१, परळी २४, आष्टी तसंच गेवराई तालुक्यात प्रत्येकी १५, केज १४, पाटोद १०, धारुर ५, वडवणी ४, तर शिरुर तालुक्यात ३ कोविडग्रस्त आढळले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या ६२२  ग्रामपंचायतींनी विविध विकास कामांच्या विकास निधीचे आराखडे  शासनाने दिलेल्या मुदतीत १५ मार्चपर्यंत पूर्ण करून प्लॅन प्लस या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकावर तर राज्यातून तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी ही माहिती दिली.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तयार झालेली कृषी अवजारं तसंच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात विकसित झालेली विविध सौर उपकरणं शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. ही सर्व अवजारं शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, या दृष्टीनं नाशिक जिल्ह्यातल्या इन्वेन्टीव्ह सोल्युशन्स कंपनीसोबत विद्यापीठाने व्यावसायिक सामंजस्य करार केला आहे.
****
परभणी महानगर पालिका हद्दीतील थकित मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीच्या व्याजात ३१ मार्चपर्यंत १०० टक्के सूट द्यायचा निर्णय महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी घेतला आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं, आयुक्त पवार यांनी सांगितलं. नागरिकांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा, आणि मालमत्ता तसंच पाणीपट्टीची थकबाकी जमा करावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
****
अहमदनगर इथं सावेडी इथल्या श्री दत्त देवस्थानात श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांचा जयंती उत्सव आज कोविड नियम पाळून साधेपणाने साजरा झाला. भाविकांना दर्शनासाठी येण्याची परवानगी नसल्याने, संस्थानच्या वतीनं सकाळी झालेल्या महापुजेचं ऑनलाईन प्रसारण करण्यात आलं.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या परभणी इथून प्रथमच सोयाबीनची किसान रेल्वेने मालवाहतूक करण्यात आली. ४२ बोगींमधून २ हजार ६६१ टन सोयाबीन गुजरातमध्ये गांधीधाम इथं पाठवण्यात आले. नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी ही माहिती दिली.
****
हिंगोली इथल्या एका दरोड्यातला मुख्य आरोपी विनोद अशोक मस्के याला परभणी पोलिसांनी सापळा रचून अटक करत, हिंगोली पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्याकडून दोन चार चाकी वाहनंही पोलिसांनी जप्त केली.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
//********//
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १९ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राज्यात पुन्हा आजपासून सुरू होणार आहे. मंगळवार - बुधवार आणि शुक्रवार - शनिवार असे आठवड्यातले चार दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख यांनी ही माहिती दिली. सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांत ‘को विन’ ॲपवर माहिती ‘अपलोड’ करण्यासाठी; तसंच इतर सरकारी कामं मार्गी लावण्यासाठी लसीकरण होणार नाही. राज्यासह देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारी प्रारंभ झाला, रविवार, सोमवार हे दोन दिवस लसीकरण करण्यात येणार नसल्याचं आरोग्य खात्याने जाहीर केलं होतं.
****
कोविड संबंधीच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोर पालन करून राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचं आयोजन करण्यास संमती देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली.
****
राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाला मानाचे तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामंडळाचं अभिनंदन केलं आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वंयपूर्ण बनवतांनाच त्यांना उपजिविकेचं शाश्वत साधन उपलब्ध करून देण्याचं काम, महामंडळाकडून केलं जातं. फिक्की या उद्योग क्षेत्रातल्या नामांकित संस्थेतर्फे, ‘सॅनिटेशनसाठी सर्वोत्तम पुरस्कार’, ई बिजनेस प्लॅटफॉर्मसाठी सलग दुसऱ्या वर्षी देशातला मानाचा ‘सिल्व्हर स्कॉच अॅवार्ड’ आणि कोविड काळातही सातत्यानं कार्यरत राहून सामाजिक दायित्व पार पाडल्याबद्दल महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांना, “झी युवा सन्मान”, असे तीन विविध पुरस्कार महामंडळाला यंदा मिळाले आहेत.  
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभाळणे या आदिवासी गावात राहणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे आज दुपारी लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत. संसदीय अभ्यास आणि प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉक्टर सीमा कौल सिंग यांनी ही माहिती दिली. गावराण बियाण्याचं संवर्धन आणि बीज बँक या आपल्या उपक्रमाबद्दल त्या सविस्तर माहिती उलगडून सांगणार आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ब्रिस्बेन इथं सुरु असलेला सामना जिंकण्यासाठी भारताला १३९ धावांची आवश्यकता आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद १८३ धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारा ४३, तर रिषभ पंत १६ धावांवर खेळत आहे.
****
0 notes