Tumgik
#jay_shivray
obsessedwithcolour · 4 years
Photo
Tumblr media
Comment GANPATI BAPPA MORYA!🙏🙏 🌻🌺🌹🌸🌷🌼🌻🌺🌹🌸🌷🌼🌻🌺🌹🌸🌷🌼 @jayostute_mumbai @utsav_ganesha @ekbhaktofficial @vityacha_raja_official @bappa_official.43 @bappa_lover_official_ @bappa_fanclub @bappa_maza_official_ @bappa_our_best_buddy @bajrang_shiva @bappa_morya @tekno_boys_54 @bappa_lover8452 @ganpati_bappa_official_pune @ganpati_bappa_majha @ganesh_utsav_aapla @mumbai_cha_ ganesh utsav 67 @mumbai_cha_raja_fanpage @cute_ganesha @aaplich_mumbai @aapla_vighnaharta_official @tathastu_mumbai @only_bappa_clicks @kattar_chintamani_bhakt @majha_siddhivinayak_official @fakta_bappa #lalbaugkaranchanad #lalbaughcharaja #lalbaughchaganeshotsav #chinchpoklicha_chintamani #chintamanilovers #chintamani #chinchpoklichachintamani #chintamani_chinchpoklicha #chinchpokali_cha_chintamani_#utsavganesha #utsav_chintamanicha #jayostute_mumbai #jaighoshganrayacha #jaichintamani #jalloshganpatibappachyaaagmanacha #jay_shivray #jallosh_ganrayacha #mumbaiganeshutsav #mumbaiganesh #majhaganpati #mum_ganesha #mumbaiganeshnagri #bappafanclub #ganpati_bappa_clickography #ganpati #ganpatibappamorya_ #ganpatifestival #ganesh_utsav_mumbai #ganpati_bappa_morya ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow us for amazing photos! Tag us using #obsessed_with_colour to get a chance to feature! Also don't forget to follow @travelwiththedoctor & @charmigala14 (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/CEWuQz0FLik/?igshid=o9wwliougwj9
0 notes
Video
Prabho Shivaji Raja चित्रपटाचा “टीझर” - एक झलक!
चित्रपटा बाबतच्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी #Like #Share Prabho Shivaji Raja
Presented By: Ganraj Associates Inspire
Produced By: Infinity Visual and MeFAC
Directed By: Nilesh Muley
#PrabhoShivajiRaja #AnimationFilm #ComingSoon #05January2018 #Shivaji_Maharaj #Jay_Shivray #Marathi #MarathiFilm #MarathiMovie #MarathiCinema #MovieTeaser #Teaser #शिवाजी_महाराज #मराठी #जय_शिवराय
1 note · View note
Photo
Tumblr media
ऍनिमेशन चित्रपट म्हणजेच सचेतनपट बनविण्याची प्रक्रिया!
Composition/ रचना:
कम्पोजिशन अर्थात रचना म्हणजे कलाकृतीची रीतसर मांडणी. Prabho Shivaji Raja हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील ऐतिहासिक सचेतनपट असल्याने गडकिल्ले आणि महाल, सह्याद्री इत्यादी जुजबी बाबींच्या मांडणी आल्याच. ह्या मांडणी सचेतनपटात रीतसर आणि ऍनिमेशन च्या नियम आणि ठोकटाळ्यां प्रमाणे बसवणे या प्रकाराला Composition अर्थात रचना म्हणतात.
प्रभो शिवाजी राजा साठी सचेतनपट निर्मात्यांनी तोरणा, पुरंदर, राजगड, रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड इत्यादी किल्ल्यांचा व्यक्तीशः जाऊन अभ्यास करून, sketch अर्थात रेखांकन केले आणि ऍनिमेशनच्या नियमांनुसार composition करून कलेच्या आणि वस्तुस्थितीचा अनुरूप सुंदर आणि पूरक दिसतील अशी दक्षता घेतली आहे.
चित्रपटा बाबतच्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी #Like #Share Prabho Shivaji Raja
Presented By: @ganrajassociates
Produced By: @InfinityVisual and MeFAC
Directed By: @NileshMuley
#PrabhoShivajiRaja #AnimationFilm #ComingSoon #Shivaji_Maharaj #Jay_Shivray #Marathi #MarathiFilm #MarathiMovie #MarathiCinema #MovieTeaser #Teaser #शिवाजी_महाराज #मराठी #जय_शिवराय
0 notes
Photo
Tumblr media
ओळख “प्रभो शिवाजी राजा” चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची!
बहिरजी नाईक:
बहिरजींचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते छत्रपती शिवरायांचे जगप्रसिद्ध व प्रथीतयश हेरखाते.
बहिरजी हे सोंगे करून उपजीविका करीत असत. साधू, संत, फकीर, गोंधळी, राजे, बादशाह, सरदार यांची हुबेहूब सोंगे ते घेत असत. महाराजांनी एकदा बहिरजींना सोंगे करताना हेरले आणि त्यांच्या या गुणांचा स्वराज्यासाठी पुरेपूर वापर करता येईल हे जाणून त्यांना स्वतः जवळ ठेवून घेतले.
पुढे काही प्राथमिक मोहिमा त्यांनी चपखलपणे हेरगिरी करून यशस्वी केल्यावर, त्यांना हेरखात्याचा प्रमुख नेमले. बहिरजींनी आपले हेरांचे जाळे स्वराज्यात, तसेच मुघल साम्राज्यात आणि आदिलशाहीत पेरून ठेवले होते.
बहिरजींच्या हेरगिरीच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक योजना आखल्या व यशस्वी केल्या. त्यांच्या सर्वात विश्वासू आणि खासगी सल्लागारात बहिरजी अव्वल होते.
सुरत लुटीच्या वेळी केलेल्या नोंदीत एक इंग्रज अधिकाऱ्याने शिवरायांसोबतचा एक सरदार लुटीच्या पूर्वी दोन महिने इंग्रज वखारी जवळ भीक मागत असल्याचा उल्लेख आहे. तोच, बहिरजी होय. सुरत मधल्या सर्व वाटा, सर्व सावकार, त्यांची मालमत्ता, तेथील मुघल सैन्य, इत्यादी तपशील त्याने छत्रपती शिवरायांना कळवला होता. त्या माहितीच्या बळावरच महाराजांनी सुरत सारख्या परमुलुखात एवढी धाडसी मोहीम आखली होती.
जावळीचा विजय, अफझलखानाची मोहीम, साल्हेरचे युद्ध, पन्हाळा, करवीरची चढाई, इत्यादी सर्व मोठ्या मोहिमा बहिरजींच्या हेरगिरीमु��े महाराजांनी यशस्वी केल्या.
आग्रा कैदेत बहिरजी खुद्द औरंगझेब बादशहाच्या दरबारात सोंग घेऊन गेले आणि तो महाराजांना मारण्याचा कट करीत असल्याची खबर घेऊन आले. त्या माहितीच्या आधारावर छत्रपती शिवराय पुढील दोन-तीन दिवसातच आग्र्यातून निसटले.
छत्रपती शिवरायांनी स्वतः केलेली शेवटची मोहीम म्हणजे १६७९ची जालन्याची लूट. जालना बाजारपेठ फस्त केल्यावर मुघल सरदार रणमस्तखान १०००० ताज्या दमाचे घोडदळ घेऊन महाराजांच्या मागावर आला. छत्रपती शिवरायांजवळ फक्त हुजुरातीचे २५०० घोडस्वार वीर होते. अडीच-तीन कोटींच्या लुटीचे सामान घेऊन वेगाने स्वराज्य गाठणे शक्य नव्हते. तेव्हा, सिधोजी निंबाळकरांनी संताजी घोरपडेला सोबत घेऊन ५०० स्वारांनिशी रणमस्तखानाला झुलवत ठेवले व बहिरजी छत्रपती शिवरायांना बीडच्या जंगलातून एका गुप्त मार्गाने स्वराज्यात सुखरूप घेऊन आले.
धन्य ते बहिरजी नाईक आणि धन्य त्यांना अचूकपणे हेरणारे Prabho Shivaji Raja
#PrabhoShivajiRaja #AnimationFilm #ComingSoon #MarathiFilm #MarathiMovie #MarathiCinema #Jay_Shivray #मराठी #जय_शिवराय #शिवाजी_महाराज
1 note · View note