Tumgik
#अजित मंडल
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
शिवचरित्राच्या प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य-वाघनखांच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही-काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांचा इशारा
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरविरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरात फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची १६ पथकं तैनात
आणि
महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ;आज भारत-पाक सामना
****
शिवचरित्राच्या प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सातारा इथल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात लंडनहून आणलेल्या वाघनखांचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, या वाघनखांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या वाघनखांचं दर्शन हे एकप्रकारचं शिवदर्शनच ठरेल, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले-
बलाढ्य शत्रूला चितपट करून भारताच्या इतिहासात पट बदलणारी ही वाघनखं आहेत. आणि म्हणून ही वाघनखं नुसती धातुची नाहीयेत. ती शिवरायांच्या युद्‌धनीतीचा हुंकार होता. अफजलखानाच्या वधामुळे तर ते पराक्रमाचं प्रतीक ठरलंय. हा शिवकालीन इतिहास याचा साक्षीदार असलेल्या गोष्‍टीचं जतन हे आपलं कर्तव्य आहे.
ही वाघनखं पुढील सात महिने साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात पाहता येणार आहेत. दरम्यान, शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्‌घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रतापगड प्राधिकरण स्थापनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. खासदार उदयनराजे भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, यासाठी दीडशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षादेश झुगारून इतर उमेदवारांना मतदान केलं, त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत त्याची माहिती मिळेल, असं वेणुगोपाल म्हणाले. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असून, आघाडीतले प्रमुख तीन पक्ष एकत्र बसून जागावाटपाची चर्चा करणार असल्याचं, वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातलं सरकार डबल नाही, तर ट्रबल इंजिनचं सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यातल्या महायुती सरकारच्या कार्यकाळावर आधारित, 'महायुतीचे काळे कारनामे' या पुस्तिकेचं पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून १५ ऑगस्टपर्यंत 'माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र' ही मोहीम राबवण्यात येणार असून, यात मिळणाऱ्या प्रतिसादानुसार आपण आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करू, असं पाटील यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत मित्रपक्षांबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कालच्या बैठकीबाबत माध्यमांमधून अनेक चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप जवळपास ९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, असं बावनकुळे म्हणाले.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या १९३ स्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी तालुक्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी बसस्थानकाचं लोकार्पण सामंत यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. बसस्थानकं, स्वच्छतागृहं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून, सर्वांनी त्याचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल तपासणीत, पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी आणि ईमेल तसंच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. या गैरवर्तनाबद्दल त्यांची उमेदवारी रद्द का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीसही आयोगानं खेडकर यांना बजावली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावत उद्या २० जुलैला हजर राहण्यास सांगितलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेडकर यांनी छळाचे आरोप केले होते, त्यासंदर्भातला जबाब नोंदवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
****
मायक्रोसॉफ्ट क्लाऊड सेवा बंद पडल्याने, देशांतर्गत विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या अडचणीमुळे विमानांना सरासरी ५१ मिनिटं उशीर होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज तीनही सैन्यदलाचे अधिकारी तसंच सैनिकांना तसंच निमलष्करी दलाच्या सैनिकांना शौर्यपदकं देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये परमविशिष्ट सेवा पदक तसंच अतिविशिष्ट सेवा पदकं, आदी ९४ पदकांच�� समावेश होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रम मालिकेचा तिसऱ्या टप्प्यातला दुसरा भाग, येत्या २८ जुलै रोजी प्रसारित होणार आहे, या कार्यक्रमासाठी मिळणारा प्रतिसाद आनंददायी असल्याचं, पंतप्रधानांनी आज सामाजिक संपर्क माध्यमावर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरात मागील काही दिवसांपासून फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची १६ पथकं सज्ज आहेत, विभागीय वनाधिकारी सूर्यकांत मंकावार यांनी ही माहिती दिली आहे. ते आज आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलत होते. नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळावं, लवकरच या बिबट्याला पकडण्यात येईल, असं मंकावार यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजूर झालेल्या सुमारे ८ हजार ४२६ विविध घरकुल लाभार्थांनी पहिला हप्ता मिळूनही घरकुल बांधकाम सुरु न केल्याचं आढळून आलं आहे. अशा लाभार्थांनी ३१ जुलैपर्यंत बांधकाम सुरु करावेत अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना वितरित केलेल्या हप्त्याची रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेतून ५५ हजार ९६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलं असून, यापैकी ५० हजार ६३८ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आल्याची माहिती खांडेकर यांनी दिली.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगड परिसरातल्या गाजापूर इथं मशीद, दर्गा आणि मुस्लीम वस्तीवर हल्ला प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं आज माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. आपल्या मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना सादर करण्यात आलं.
दरम्यान, बीड शहरातही आज एमआयएम पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.
****
महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
मुंबई उपनगरात नागरिकांचं जीवनमान उंचावणं आणि झोपडपट्टी भागातील सुधारणांसाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक हजार १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
0 notes
countryinsidenews · 2 years
Text
भागलपुर सांसद अजय मंडल का गमछा घुमा -घुमा कर डांस करने का वीडियो काफी तेजी से हो रहा सोशल मीडिया पर वायरल
भागलपुर सांसद अजय मंडल का गमछा घुमा -घुमा कर डांस करने का वीडियो काफी तेजी से हो रहा सोशल मीडिया पर वायरल
अजित सिंह की रिपोर्ट :भागलपुर के सांसद महोदय शहर में तो दिखते नहीं लोगों को क्या परेशानियां हैं उनको सुनते नहीं लेकिन भक्तिमय होकर गमछा घुमा घुमा कर खूब डांस करते दिख रहे हैं, भागलपुर के सांसद अजय मंडल सोशल मीडिया पर उनका गमछा घुमा घुमा कर डांस करना सोशल मीडिया पर काफी तेजी से वायरल हो रहा है ।भक्ति संगीत चल रहा है और भागलपुर सांसद पहले तो ठुमके लगा रहे हैं उसके बाद अपना आपा खोते हुए उन्हें जो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अक्षरा सिंगचे नवीन गाणे 'मेकअप' रिलीज, काही वेळातच इतके व्ह्यूज मिळाले
अक्षरा सिंगचे नवीन गाणे ‘मेकअप’ रिलीज, काही वेळातच इतके व्ह्यूज मिळाले
अक्षरा सिंग भोजपुरी गाणी: अक्षरा सिंगने तिचे नवीनतम भोजपुरी गाणे ‘मेकअप’ यूट्यूबवर चाहत्यांमध्ये रिलीज केले आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडते. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
jainyupdates · 3 years
Text
गगन मंडल में उड जाऊं - Jain Bhajan Lyrics
गगन मंडल में उड जाऊं – Jain Bhajan Lyrics
गगन मंडल में उड जाऊं, तीन लोक के तीर्थ क्षेत्र सब वंदन कर आऊं ॥   प्रथम श्री सम्मेदशिखर पर्वत पर मैं जाऊं, बीस टोंक पर बीस जिनेश्‍वर चरण पूज ध्याऊं ॥   अजित आदि श्री पार्श्वनाथ प्रभु की महिमा गाऊं, शाश्‍वत तीर्थराज के दर्शन करके हर्षाऊं ॥   फ़िर मंदारगिरि पावापुर वासुपूज्य ध्याऊं, हुए पंचकल्याणक प्रभु के पूजन कर आऊं ॥   ऊर्जयंत गिरनार शिखर पर्वत पर फ़िर जाऊं, नेमिनाथ निर्वाण क्षेत्र को…
View On WordPress
0 notes
its-axplore · 4 years
Link
Tumblr media
तेघड़ा भाजपा ग्रामीण एवं नगर मंडल के कई एवं भाजपा कार्यकर्ताओं की बैठक गौड़ा गांव में अरुण सिंह की अध्यक्षता में आयोजित की गई। बैठक में सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि कार्यकर्ताओं की भावना के साथ खिलवाड़ करने वाले नेताओं को बहिष्कार होना चाहिए एवं भाजपा संगठन को मजबूती प्रदान करने के साथ साथ आम जनता को हरेक तरीका से विभिन्न योजनाओं का लाभ दिलाने का कार्य किया जाएगा।
बैठक में उपस्थित कार्यकर्ताओं ने कहा कि ग्रामीण मंडल अध्यक्ष अविनाश कुमार शम्भु के अध्यक्ष बनने के बाद कभी भी किसी भी प्रकार का संगठन कार्य नहीं किया गया एवं ना ही उन्हें कार्यकर्ताओं से कोई मतलब है। बावजूद मंडल अध्यक्ष द्वारा तानाशाही तरीका से कुछ पार्टी के मंडल पदाधिकारी को गलत तरीका से पार्टी के पद से पदमुक्त कर दिया गया।
भाजपा नेता राजेश कुमार गुड्डू ने कहा कि कुछ लोग पार्टी के टिकट की चाहत रखने वाले नेताओं के द्वारा जब तेघड़ा विधानसभा का सीट जदयू को दे दिया गया एवं वर्तमान विधायक वीरेंद्र महतो को ही उम्मीदवार बनाया। जिसके बाद भाजपा कार्यकर्ताओं को आगे करके वीरेन्द्र कुमार का विरोध करने का निर्णय लिया गया। बावजूद कार्यकर्ताओं के स्वाभिमान के साथ खिलवाड़ किया गया है जिसकी निंदा की जानी चाहिए।
वहीं राम चरित्र महतो ने कहा कि हम सभी कार्यकर्ता एक थे एवं एक रहेंगे। जबकि मनोहर कुमार ने कहा कि मंडल अध्यक्ष द्वारा बहुत ही तानाशाही रवैया अपनाया गया है। कामिनी कुमारी ने कहा कि मंडल अध्यक्ष ने हमें किस अधिकार के पार्टी के पद एवं सदस्यता से मुक्त किये हैं। ये कार्य अध्यक्ष के किसी दबाव में आकर निर्णय लेने का मामला दिखता है।
बैठक में ये ये लाेग थे माैजूद
बैठक में राजीव पासवान, शिव कुमार चौरसिया, अमरेश कुमार पप्पू, प्रमोद मिश्रा, सुनील सिंह, कारेलाल सिंह, संदीप कुमार लोली, अनिल राय, भरत कुमार, सनातन कुमार, राम कृष्ण झा, बनारसी दास, शंकर महतों, टूनटून महतों, कारू सिंह, निलेश कुमार घन्टू, भोलेशंकर कुमर, सुधीर कुमार, रौशन कुमार, अजित सहनी, नरेश सहनी, सुभाष पासवान, अजीत सहनी, दयानंद कुमार, योगेन्द्र कुमार सहित अन्य मौजूद थे।
Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Tumblr media
Meeting of activists to protest the release of many Teghda BJP Rural Officers
from Dainik Bhaskar https://ift.tt/3kbsaVV
0 notes
vsplusonline · 4 years
Text
कांग्रेस ने बढ़ाई उद्धव की मुश्किलें, महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में उतारे 2 प्रत्याशी
New Post has been published on https://apzweb.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%a2%e0%a4%bc%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%95/
कांग्रेस ने बढ़ाई उद्धव की मुश्किलें, महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में उतारे 2 प्रत्याशी
Tumblr media
उद्धव के निर्विरोध चुनाव लड़ने के अरमानों पर फिर जाएगा पानी
महाराष्ट्र में विधान परिषद की 9 सीटों पर 21 मई को होंगे चुनाव
महाराष्ट्र विधान परिषद चुनाव के लिए कांग्रेस ने दो उम्मीदवारों को मैदान में उतारकर सूबे के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का सिर दर्द बढ़ा दिया है. इस चुनाव में शिवसेना ने उद्धव ठाकरे और नीलम गोरे को मैदान में उतारा है. नीलम गोरे वर्तमान में महाराष्ट्र विधान परिषद की उपाध्यक्ष हैं. एनसीपी भी दो सीटों पर अपने उम्मीदवार उतारने की तैयारी कर रही है.
वहीं, भारतीय जनता पार्टी ने विधान परिषद चुनाव के लिए प्रवीण ददके, गोपीचंद पडलकर, अजित गोपछड़े और रणजीत सिंह पाटिल को प्रत्याशी बनाया है. महाराष्ट्र की सत्ता पर काबिज महाविकास अघाड़ी गठबंधन में शिवसेना, कांग्रेस और एनसीपी शामिल हैं. अगर एनसीपी भी चुनाव में अपने दो उम्मीदवार उतारती है, तो 9 विधान परिषद सीटों के लिए 10 उम्मीदवार चुनाव मैदान में होंगे. इससे उद्धव ठाकरे के निर्विरोध चुने जाने के अरमानों पर पानी फिर जाएगा.
महाराष्ट्र में 9 विधान परिषद सीटों पर 21 मई को चुनाव होने हैं. इस चुनाव के लिए महाराष्ट्र विधानसभा के 288 सदस्य निर्वाचक मंडल का काम करेंगे यानी वोट देंगे. उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में 28 नवंबर को शपथ ली. उन्होंने शिवसेना, एनसीपी और कांग्रेस के महाविकास अघाड़ी के प्रमुख के तौर पर मुख्यमंत्री पद की शपथ ली थी.
इसे भी पढ़ेंः अपने आदेश के विरुद्ध जाकर महाराष्ट्र सरकार ने बीएमसी के​ कमिश्नर प्रवीण परदेशी को हटाया
संविधान के मुताबिक अगर कोई विधानमंडल का सदस्य नहीं हैं और मुख्यमंत्री पद की शपथ लेता है, तो उसको 6 महीने के अंदर विधानमंडल के किसी भी सदन की सदस्यता लेनी होती है. ऐसा नहीं करने पर मुख्यमंत्री की कुर्सी चली जाती है.
सत्ता पक्ष और विपक्ष दोनों को क्रॉस वोटिंग का खतरा
अगर महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में 10 प्रत्याशी मैदान में उतरते हैं, तो मतदान होना लाजमी है. एमएलसी का चुनाव गुप्त मतदान से होता है, ऐसे में क्रॉस वोटिंग की संभावना बढ़ जाती है. महाराष्ट्र में सत्ता पक्ष और विपक्ष दोनों ही क्रॉस वोटिंग का खतरा मोल नहीं लेना चाह��ंगे. यह तभी हो पाएगा जब कांग्रेस और एनएसपी में से कोई एक पार्टी एक सीट पर लड़ने को राजी हो जाएं.
दरअसल महाराष्ट्र के कुल 288 सदस्यीय विधानसभा में सत्ताधारी महाविकास अघाडी को 170 विधायकों का समर्थन हासिल है, जिनमें शिवसेना के 56 विधायक, एनसीपी के 54 विधायक, कांग्रेस के 44 विधायक और अन्य 16 विधायक हैं. वहीं, बीजेपी के पास 105 विधायक हैं, जबकि 2 विधायक AIMIM और एक मनसे के विधायक हैं. इसके अलावा 10 अन्य विधायक हैं.
इसे भी पढ़ेंः औरंगाबाद की घटना पर उद्धव ठाकरे बोले- आहत हूं, मुंबई में सेना लाने की बात अफवाह
विधान परिषद की एक सीट के लिए करीब 29 वोटों की प्रथम वरियता के आधार पर जरूरत होगी. महाविकास आघाड़ी की 5 सीटें और बीजेपी की तीन सीटें पूरी तरह से सेफ है, लेकिन बीजेपी की चौथी और महाविकास अघाड़ी की छठी सीट के लिए जोड़तोड़ की आजमाइश होगी.
आजतक के नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट और सभी खबरें. डाउनलोड करें
Tumblr media Tumblr media
!function(e,t,n,c,o,a,f)e.fbq(window,document,"script"),fbq("init","465285137611514"),fbq("track","PageView"),fbq('track', 'ViewContent'); Source link
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर कृती दल गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** औरंगाबाद आणि अमरावती इथं भारतीय खाद्य महामंडळाची विभागीय कार्यालयं तत्काळ कार्यान्वित होणार
** पंतप्रधान निधीतून औरंगाबादला मिळालेले १५० व्हेंटिलेटर बोगस - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
** रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी अहमदनगर इथं चौघांना तर बीड इथं एकास अटक
आणि
** रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात टाळेबंदी निर्बंध दोन दिवसांसाठी अंशत: शिथील
****
कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार महिला आणि बाल विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची बालकामगार किंवा तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असल्यानं त्यांचं सरंक्षण आणि संगोपनाच्या यादृष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
औरंगाबाद आणि अमरावती इथली भारतीय खाद्य महामंडळ एफसीआयची दोन विभागीय कार्यालये तत्काळ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी, पीडीएस लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यात भारतीय खाद्य निगमची बोरीवली, पनवेल, पुणे, मनमाड, नागपूर आणि गोवा अशी ०६ विभागीय कार्यालये आहेत. त्यामध्ये औरंगाबाद आणि अमरावती या दोन विभागीय कार्यालयांची भर पडणार असून औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान निधीतून औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आलेले १५० व्हेंटिलेटर हे बोगस असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. कोविड प्रादुर्भावासंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आज आढावा बैठक झाली. त्यानंतर खासदार जलील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली. शहरातली काही खाजगी रुग्णालयं जास्तीची देयकं आकारत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं रिक्षा चालकांसाठी घोषित केलेली मदत, अजूनही मिळाली नसून ती देण्याची मागणीही खासदार जलील यांनी य���वेळी केली.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतल्याची माहिती, परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. परीक्षेच्या पुढच्या तारखा यथावकाश कळवण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी फेब्रुवारीत होणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा यंदा प्रथम एप्रिलमध्ये आणि त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचा निर्णय झाला होता, आता मात्र या परीक्षा पुढे ढकलत असल्याचं आज जाहीर करण्यात आलं. या शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत, तर आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यभरातून सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेनं दिली आहे.
****
दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा तसंच विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का? यावर अभिप्राय मागवला जात आहे. उद्या रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. रविवारपर्यंत राज्यातल्या जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर २ लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचं, शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी येत्या बुधवारी १० मे पासून २२ मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सुविधांची आणि किराणा दुकानं दुपारी बारा वाजेपर्यंत खुली राहणार असून खाजगी आस्थापना आणि सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.  
****
अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत सहा इंजेक्शन सह ४ मोबाईल, दोन वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ७० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामहरी घोडेचोर, आनंद थोटे, पंकज खरड, सागर हंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून राकेश मंडल हा आरोपी फरार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी रहमान खान लिखायत खान नावाच्या इसमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १६ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, अहमदनगर पाच आणि नाशिक इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद  जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ७६६ जणांचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ५४४ झाली असून आठ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. कोविन ॲपवर नोंदणी केलेले १८ ते ४४ वयांचे आणि त्यापुढील सर्वच नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान, कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करतांना अडचणी येत असून नोंदणी न झालेल्या बऱ्याच जणांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचं, संबंधितांकडून सांगण्यात आलं आहे.
नांदेड इथंही अनेक लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध नसल्याचे फलक दिसून आले. त्यामुळे अनेक पात्र नागरिक लसीविनाच घरी परतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार २९५ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक ३०४ रुग्ण बीड ��ालुक्यात त्याखालोखाल के�� २१५, अंबाजोगाई १६५, धारुर १३३, गेवराई ११८, आष्टी ७७, परळी ७३, माजलगाव ६४, शिरुर ६३, पाटोदा ५५ आणि वडवणी इथल्या २८ रुग्णांचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. उद्या मंगळवार आणि बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत नागरिकांना किराणा, सुका मेवा, मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे. १२ तारखेला सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत या सर्व साहित्याची हातगाडीवरून विक्री करता येईल. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोविड सुश्रुषा केंद्राचं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याहस्ते फित कापून या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रात सर्व सोयींनी सुसज्ज १०० रुग्णखाटांची व्यवस्था आहे.
****
वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश उत्तम डहाके यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं नागपूर इथं निधन झालं. ते ७० वर्षाचे होते. डहाके यांनी सलग १५ वर्ष कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसंच काही काळ विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं.  
****
जनता दलाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं आज पुण्यात वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. काकडे हे प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यात आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली तसंच सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलं. डहाके तसंच काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
//*********//
0 notes
countryinsidenews · 2 years
Text
लातेहार /होटवाग खुशबू ढाबा से डोडा के साथ एक तस्कर को किया गिरफ्तार
लातेहार /होटवाग खुशबू ढाबा से डोडा के साथ एक तस्कर को किया गिरफ्तार
अजित सिंह -झारखण्ड -लातेहार : सदर थाना क्षेत्र के होटवाग के खुशबू ढाबा के पास से लातेहार थाना पुलिस ने शनिवार को छापेमारी कर डोडा के साथ एक तस्कर को गिरफ्तार कर मंडल कारा भेज दिया गया। रविवार को लातेहार पुलिस निरीक्षक सह थाना प्रभारी अमित कुमार गुप्ता ने बताया कि पुलिस अधीक्षक अंजनी अंजन को गुप्त सूचना मिली थी कि होटवाग के आस पास के ढाबों में आपके लिए बहुत ही होटल चलाने की आड़ में अफीम एवं डोडा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indianfasttrack · 4 years
Text
Maharashtra: ST महामंडल के लिए 550 करोड़ दिए जाने का उप मुख्यमंत्री अजित पवार का निर्णय!
Maharashtra: ST महामंडल के लिए 550 करोड़ दिए जाने का उप मुख्यमंत्री अजित पवार का निर्णय!
नितिन तोरस्कर मुंबई- मंगलवार 4 अगस्त राज्य के उप मुख्यमंत्री अजित ने Maharashtra राज्य मार्ग परिवहन मंडल (ST) को 550 करोड़ रुपये की निधी देने का महत्वपूर्ण निर्णय सुनाया! उप मुख्यमंत्री अजित पवार ने इस मौके पर जानकारी देते हुए बताया, कि ‘कोरोना संकट और राजस्व में गिरावट के कारण एसटी के सामने बढ़ती चुनौतियों के मद्देनजर एसटी महामंडल को यह फंड दिया जा रहा है!
Maharashtra: पुणे-नाशिक हाई स्पीड डबल…
View On WordPress
0 notes
sanmarglive · 4 years
Text
कोरोना महामारी में बीजेपी नेता असहाय लोगों की कर रहे हैं मद्द
कोरोना महामारी में बीजेपी नेता असहाय लोगों की कर रहे हैं मद्द
अमृतेश कुमार सिन्हा की रिपोर्ट मुंगेरः- कोरोना महामारी में दाने-दाने को मोहताज हो रहे लोगों के बीच भाजपा के पूरी जोश के साथ मैदान में डटे हुए हैं। बीजेपी के समाजसेवी संजीव मंडल, बेबी चंकी, अजित कुमार छोटु आदि दर्जनों कार्यकर्ताओं द्वारा लोगों के बीच राहत कार्य में जुटे हुए हैं। वही संजीव मंडल द्वारा लगातार लोगों के बीच खाद्य सामग्री का वितरण किया जा रहा है। संजीव भाजपा नेता होने के नाते राजनीतिक…
View On WordPress
0 notes
bansgaonbhim · 4 years
Video
youtube
बॉसगाँव सांसद कमलेश पासवान ने मास्क सेनेटाइजर और साबुन  कराया वितरण सांसद ने मास्क सेनेटाइजर और साबुन  कराया वितरण  गोला गोरखपुर ।  गोला विकास खण्ड के अंतर्गत बेबरी चौराहे पर बांसगांव लोकसभा के सांसद कमलेश पासवान के दिशा-निर्देश पर चरगावां विकास खण्ड के ब्लाक प्रमुख सुनील पासवान ने जरूरतमंद लोगों को कोरोना से बचाव के लिए मास्क सेनेटाइजर और साबुन वितरण किया गया।   इस अवसर लोकसभा  ��ंयोजक नित्यानंद मिश्र रतन प्रकाश दुबे अनिल भट्ट विनोद तिवारी भाजपा मंडल अध्यक्ष देवेश निषाद व संतोष त्रिपाठी पूर्व जिला पंचायत सदस्य रामबृक्ष यादव मीडिया प्रभारी संतोष श्रीवास्तव नवनीत राय संजय सिंह जिलाउपाध्यक्ष देवरिया  डाक्टर इन्द मणि भट्ट डाक्टर देवानंद अजित पासवान सुरेंद्र पासवान ओमप्रकाश यादव पप्पू यादव सहित सामाजिक दुरी का ख्याल रखते हुए मौजूद रहे ।
0 notes
its-axplore · 5 years
Link
नाथनगर के पूर्व विधायक तालिब अंसारी 1980 से 85 तक नाथनगर के विधायक रहे। 2006 से 2015 तक जिला कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष रहे। वह स्पष्टवादी नेता थे अाैर किसी के दबाव में नहीं आते थे। वह 1966-71 तक सोशलिस्ट पार्टी के महामंत्री व भागलपुर प्रमंडल के प्रभारी थे। जिला कांग्रेस कमेटी के जिला उपाध्यक्ष अभय आनंद ने बताया कि सोशलिस्ट पार्टी में रहते हुए 1971 में वर्तमान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान को उन्हाेंने अलौली विधानसभा से टिकट दिया था। पासवान अलौली से पहली बार विधायक बने थे। उन्होंने कहा कि डॉ. जगन्नाथ मिश्र के कहने पर 1972 में तालिब अंसारी ने कांग्रेस ज्वाइन किया था। वह बिहार बुनकर समिति का डिप्टी चेयरमैन व बिहार स्टेट हैंडलूम एंड हैंडीक्राफ्ट के भी चेयरमैन रहे थे। लाॅकडाउन के कारण उनके कई अपने और रिश्तेदार नहीं अा पाएंगे। अभय अानंद ने बताया कि तालिब बाबू के बेटे परवेज सालेह अंसारी की 8 साल पहले अपराधियों ने हत्या कर दी थी। विराेध में सड़क जाम कर दिया गया था, लेकिन लाेगाें की परेशानी को देखते हुए यह कहते हुए जाम हटवाया कि उनके बेटे के हत्यारे को कानून सजा देगी। जिलाध्यक्ष कार्यकाल के दौरान एक युवा कांग्रेस के नेता ने बिजली के लिए तथाकथित आंदोलन के नाम पर विद्युत विभाग के प्रबंधक के मुंह पर कालिक पोत दी थी, जिसमें उक्त नेता की गिरफ्तारी हुई थी। विरोध में बंद का ऐलान था। लेकिन तालिब समर्थन नहीं किया था। नगर विधायक अजित शर्मा सहित कई कांग्रेसी नेताओं ने शोक प्रकट करते हुए पार्टी व भागलपुर के लिए अपूर्णीय क्षति बताया। नाथनगर के पूर्व विधायक तालिब लोगों की परेशानी का रखते थे ध्यान बड़े भाई के समान थे तालिब : सदानंद कहलगांव के विधायक सदानंद सिंह ने कहा कि तालिब अंसारी मेरे बड़े भाई के समान थे। धर्मनिरपेक्षता और सांप्रदायिक सौहार्द में उनका अटूट भरोसा था। वे बड़े ही विनम्र और मृदुभाषी नेता थे। उन्होंने राजनीति में हमेशा मेरा साथ दिया। एक जनप्रिय नेता खो दिया : बुलो पूर्व सांसद बुलो मंडल ने कहा कि भागलपुर ने एक जनप्रिय नेता काे खाे दिया है। वा राजद के प्रदेश प्रवक्ता अरुण कुमार यादव ने भी पूर्व विधायक तालिब अंसारी के निधन पर शोक संवेदना व्यक्त की है। इन्हाेंने भी जताया शाेक : संजय सिन्हा, कोमल सृष्टि, मामून रशीद, चक्रपाणि हिमांशु, रबिया खातून, तिरुपतिनाथ यादव, सलाउद्दीन अहसन।
Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Bhagalpur News - the son was murdered and the protesters were removed from the road
from Dainik Bhaskar https://ift.tt/2QLmOVv
0 notes
thedailygraph-blog · 6 years
Photo
Tumblr media
सुप्रीम कोर्ट ने सिर्फ कीमत ही तो पूछी है टेक्नोनॉजी तो नही, तो इससे देश की सुरक्षा को खतरा कैसे है ? राजीव गांधी के पास डोभाल नहीं था, इसलिए उन्होंने बोफोर्स तोप की कीमत संसद को बता दी और देश को बोफोर्स घोटाले के बारे में पता चल गया. वाह मोदी जी वाह ! अगर बोफोर्स तोप, ऑगस्टा वेस्टलैंड हेलीकॉप्टर, स्कॉर्पीन सबमरीन, बराक मिसाइल इन सबकी कीमत न पता होती, तो देश में आज तक कोई रक्षा सौदा घोटाला न होता. अहा कितना सुंदर देश होता. न कीमत, न कमीशन, न घोटाला. भ्रष्टाचार मुक्त भारत जिंदाबाद। क्या सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस देश के लिए खतरा हैं ? सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस की बैंच ने जब ये कहा कि सरकार राफेल विमान सौदे की कीमत एक सीलबंद लिफाफे में कोर्ट को सौंप दे, जिसे वे किसी को नहीं देंगे. ये सिर्फ न्यायाधीशों के लिए होगा, तो सरकारी वकील ने कहा कि ये संभव नहीं है. इसके पीछे सुरक्षा कारण बताए जा रहे है। इस सौदे के बारे में सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को जानकारी होने से भी अगर देश को खतरा है तो फिर देश कौन है ? अजित डोभाल ? नरेंद्र मोदी ? अमित शाह ? अनिल अंबानी ? सिर्फ कीमत पूछ रहे हैं. ये नहीं कि विमान में क्या टेक्नोनॉजी लगी है. इससे देश की सुरक्षा को खतरा कैसे है ? दिलीप सी मंडल
0 notes
onlineadspost · 7 years
Text
NGO के निदेशक मंडल में केंद्रीय मंत्री; राहुल का वार
NGO के निदेशक मंडल में केंद्रीय मंत्री; राहुल का वार
अजित डोवाल के बेटे को लेकर भाजपा पर राहुल का वार #भाजपा की नई पेशकश – अजित शौर्य गाथा- राहुल गांधी #शाह-जादा की ‘अपार सफलता’ के बाद भाजपा की नई पेशकश – अजित शौर्य गाथा #कपिल सिब्बल ने कहा, ‘प्रधानमंत्री मोदी को उन चार मंत्रियों को हटा देना चाहिए#अजित डोवाल के बेटे को लेकर चौंकाने वाले खुलासे # श्री गांधी ने कहा कि भाजपा अध्यक्ष अमित शाह के पुत्र जय शाह की कंपनी के बहुत कम समय में 16 हजार गुना…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खातेवाटपाबाबतची चर्चा पूर्ण; सर्व मंत्र्यांची खाती आज जाहीर होण्याची शक्यता ** विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर १�� रुपयांची वाढ ** डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडीतून बाहेर आणि ** उस्मानाबादच्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीताचं लोकार्पण **** राज्यातल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल खातेवाटपाला अंतिम रुप देण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खातेवाटपाबाबत वार्ताहरांशी बोलतांना यासंदर्भातली चर्चा पूर्ण झाली असून आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील, असं सांगितलं. दरम्यान, राज्यातल्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांमधे खाते वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही असं कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यातला वस्तू आणि सेवा कर महसूल कसा वाढवता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. **** काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या एकोणीस कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. थोपटे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातल्या कार्यालयात काल तोडफोड केली होती. दरम्यान, कोल्हापूरचे कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. काल पाटील समर्थकांचा मेळावा फुलेवाडी इथं पार पडला. या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सामुहिक राजीनामे द्यावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला. **** विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर १९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत ६९५ वरुन ७१४ झाली आहे. सप्टेंबर २०१९ पासून ही सलग पाचवी दरवाढ आहे. सार्वजनिक वितरण सेवेच्या माध्यमातून विकण्यात येणाऱ्या केरोसिनच्या किमतीतही मुंबईत २६ पैशांची वाढ होऊन, ते प्रति लिटर ३५ रुपये ५८ पैसे झालं आहे. विमान इंधनातही दोन पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतींमधे वाढ झाल्यानं ही वाढ झाली आहे. काँग्रेस आणि माकपानं या दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली. **** राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. सरकारनं जनादेशाचा विश्वासघात केला असून, तीन पक्षांचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. **** नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे येत्या दहा तारखेला राज्यभरात समर्थन फेऱ्या काढण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकता कायदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला क्रांतिकारक निर्णय असल्याचं सांगत, या कायद्याला समर्थन देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात आपला पक्ष समर्थन फेऱ्या काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय नागरिकांसाठी नसून,पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असं भारतीय जनता पक्षाचे खासदार सत्यपाल सिंह यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या कायद्याबाबत काही पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. **** पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा इथं, विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसंच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले या नेत्यांनीही काल शौर्यस्तंभाला अभिवादन केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडला आहे. या पक्षाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी काल कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आघाडीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, तसंच मातंग समाजातल्या कोणालाही उमेदवारी दिली नाही, या कारणांमुळे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. **** पोलिस स्थापना दिन आज राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आजपासून आठ जानेवारीपर्यंत पोलिस विभागाच्या कामकाजाबाबत आणि विविध शाखांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी दहा वाजता आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. **** उस्मानाबाद इथल्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीताचं काल लोकार्पण करण्यात आलं. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून गीताचं प्रसारण करून लोकार्पण झालं. साहित्य संमेलनाची माहिती जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रानं ”जागर साहित्याचा” ही विशेष मालिका कालपासून सुरू केली आहे. दरम्यान, संमेलनातल्या विविध कार्यक्रमांची माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहोचवण्यासाठी साहित्य ज्योत काढण्यात येत आहे. तीन आणि चार जानेवारी या दोन दिवसात ही साहित्य ज्योत जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातून फिरवण्यात येणार आहे. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून समाजाच्या वाढलेल्या अपेक्षा विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या सहकार्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असं कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. काल विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत आणि विद्यार्थी केंद्रीत कारभार यामुळे समाजात विद्यापीठाचा नावलौकीक निर्माण झाला असल्याचं कुलगुरू म्हणाले. **** परभणी शहरातल्या औद्योगिक वसाहतीतली अग्रवाल इंडस्ट्रीज ही कंपनी विनापरवाना व्यवसाय करत असल्याचं आढळून आल्यानं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल कपंनीवर छापा टाकून चार लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची ही कंपनी असून, परवाना नसल्यानं प्रशासनानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. **** औरंगाबाद शहरालगतच्या देवगिरी किल्ल्याजवळ काल पहाटे दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. नववर्षाची पार्टी करून परत येताना या तरुणांच्या चारचाकी गाडीचं नियंत्रण सुटून गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली, या अपघातात सौरभ नांदापूरकर आणि विर्भास कस्तुरे या दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. **** राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृषाली यादव सारंग यांना, सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार पुणे इथले महाराष्ट्र टाईम्सचे सचिन वाघमारे यांना, रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कल्याणकर यांना, अनिल कोकीळ सामाजिक पत्रकारिता पुरस्कार साम टिव्ही���े मंगेश चिवटे यांना, तर औरंगाबाद टाईम्सचे संपादक शोएब खुसरो यांना मिर्झा अहेमद अली बेग चुखताई ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेड इथं येत्या पाच जानेवारीला दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. **** महावितरणच्या लातूर परिमंडळातर्फे उत्कृष्ठ ग्राहक सेवेसह विजेच्या बिलाची थकबाकी शून्यावर आणणाऱ्या उत्कृष्ट मंडल, विभाग, उपविभाग आणि उत्कृष्ट शाखा कार्यालयास पुरस्कार देण्यात येणार आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर.कांबळे यांनी काल लातूर इथं ही घोषणा केली. कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नानं महावितरणच्या तुळजापूर आणि अंबाजोगाई विभागातल्या वाणिज्यक कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. **** सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातल्या मुंडे गावाचे लष्करात मराठा लाईफ इन्फन्ट्रीमध्ये सेवेत असलेले जवान संदीप रघुनाथ सावंत, हे काल सकाळी काश्मीरमधे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. नौशेरा सेक्टरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यावरून जंगलात शोध मोहीम सुरु असताना ही चकमक झाली. नाईक संदीप सावंतांसह गोरखा जिल्ह्यातले रायफलमन अर्जुन थापा मगर हेही या चकमकीत शहीद झाले. **** मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेसच्या वेळेत केलेला प्रस्तावित बदल रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी सध्याच्या वेळेनुसारच धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. **** पनवेल ते नांदेड या मार्गावर आठ साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. या महिन्याच्या चार ते सव्वीस तारखांदरम्यान या विशेष गाड्या चालणार असून, नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तर पनवेलहून नांदेडला जाणारी गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता सुटणार आहे. **** वीज वितरण अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कुठल्याही कामासाठी पैसे मागितले तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ते काल लातूर जिल्ह्यात औसा इथं वीज वितरण कंपनीच्या आढावा बैठकीत बोलत होते. ****
0 notes
countryinsidenews · 2 years
Text
रांची /मुख्यमंत्री श्री हेमन्त सोरेन से आज भगवान बिरसा मुंडा स्मारक समिति, चकला, ओरमांझी, रांची के प्रतिनिधि मंडल ने मुलाकात कर ज्ञापन सौंपा
रांची /मुख्यमंत्री श्री हेमन्त सोरेन से आज भगवान बिरसा मुंडा स्मारक समिति, चकला, ओरमांझी, रांची के प्रतिनिधि मंडल ने मुलाकात कर ज्ञापन सौंपा
अजित सिंह, झारखण्ड हेड /मुख्यमंत्री श्री हेमन्त सोरेन से आज भगवान बिरसा मुंडा स्मारक समिति, चकला, ओरमांझी, रांची के प्रतिनिधि मंडल ने मुलाकात कर ज्ञापन सौंपा । उन्होंने मुख्यमंत्री से भगवान बिरसा जैविक उद्यान ,ओरमांझी में धरती आबा भगवान बिरसा मुंडा की प्रतिमा स्थापित करने और उनकी जीवनी तथा वीरता-शौर्य गाथा को दर्शाने की व्यवस्था करने की दिशा में पहल करने का आग्रह किया। इस मौके पर उन्होंने…
Tumblr media
View On WordPress
0 notes