Tumgik
#अभिनेत्रीचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राखीला सोड नाहीतर... अभिनेत्रीचा भयंकर अवतार अन् किरण मानेंनी फुंकला मंत्र!
राखीला सोड नाहीतर… अभिनेत्रीचा भयंकर अवतार अन् किरण मानेंनी फुंकला मंत्र!
राखीला सोड नाहीतर… अभिनेत्रीचा भयंकर अवतार अन् किरण मानेंनी फुंकला मंत्र! Rakhi Sawant Ghost Video: अभिनेत्री राखी सावंत बिग बॉस मराठी सीझन ४ च्या घरात आल्यापासून घरातील ड्रामा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ज्या अवतारात राखी दिसतेय, तो खरंच भयंकर आहे. Rakhi Sawant Ghost Video: अभिनेत्री राखी सावंत बिग बॉस मराठी सीझन ४ च्या घरात आल्यापासून घरातील ड्रामा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ज्या…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शहरी नाही, माही श्रीवास्तवला अडाणी वर हवा आहे, वापरकर्ते म्हणाले - 'तुझ्या फायद्यासाठी...'
शहरी नाही, माही श्रीवास्तवला अडाणी वर हवा आहे, वापरकर्ते म्हणाले – ‘तुझ्या फायद्यासाठी…’
माही श्रीवास्तवचा लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिला शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच कोणताही देश पुढे जाऊ शकतो, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात ते आज बोलत होते. नमो ड्रोन दिदींनी सादर केलेली कृषी ड्रोन प्रात्यक्षिकं त्यांनी पाहिली. देशभरातल्या विविध ११ ठिकाणांहून नमो ड्रोन दिदी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी, एक हजार नमो ड्रोन दिदींना, ड्रोन हस्तांतरित केले. विविध क्षेत्रात महिलांनी मिळवलेल्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, एकविसाव्या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व देशातल्या महिला करु शकतात, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी, नारी शक्तीचा गौरव केला.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, बडनेरा इथली रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्याबरोबरच पंतप्रधान, देशभरातल्या विविध ठिकाणांवरुन सुरु होणाऱ्या दहा वंदे भारत गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
लातूरचा हा रेल्वे बोगी कारखाना हा महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रोचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोचही तयार केले जाणार आहेत.
****
भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची, भारतीय स्टेट बँकेची मागणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बॅंकेला, उद्या १२ मार्चला कामकाजाची वेळ संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयानं निवडणूक आयोगाला देखील, १५ मार्चपर्यंत एसबीआयकडून आलेली निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे.
****
यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेत लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये आज पार पडला. या सोहळ्यात सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले. यावेळी ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत टिना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेक जणांची नावं या यादीत होती.
****
मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड म्हणजेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या, वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिणवाहिनी मार्गिकेचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या किनारी रस्त्याला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाचं उद्घाटन आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणलीच्या माध्यमातून झालं. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह कला क्रीडा आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशासाठी तसंच समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य करावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. येत्या १५ तारखेपर्यंत चालणार्या या महोत्सवात, २४ विद्यापीठांचे ८७५ कलावंत सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या प्रारंभी आज सकाळी विद्यापीठ परिसरात शोभायात्रा काढण्यात आली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पाहणी केली. लोहा इथल्या पाच मतदान केंद्रांना देखील भेट देऊन त्यांनी, आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Hello
Tumblr media
Filmfare awards 2023 Ceremony Highlights and Winners Updates : नुकताच मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडलाय. या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिला मिळाला आहे.
मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे आयोजन मुंबईतील बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये करण्यात आले. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाने देखील फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बाजी मारलीये. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आज रात��री 9 वाजता हा फिल्मफेअर अवॉर्ड्स कॅलर्स टिव्हीवर बघायला मिळणार आहे. गोविंदाचा धमाकेदार असा डान्स देखील पार पडलाय. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे मैदान हे आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने मारले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे. बधाई दो चित्रपटाने देखील सर्वांना मोठा धक्का देत अनेक अवॉर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा देखील जलवा बघायला मिळाला. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटाला कोणता फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाला आहे. 68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा (Filmfare Awards 2023 Winners List)  सर्वोत्कृष्ट अभिनेता – राजकुमार राव (बधाई दो) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट चित्रपट – (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा सर्वोत्कृष्ट संवाद – प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (जुग जुग जियो) सर्वोत्कृष्ट पटकथा – अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो) सर्वोत्कृष्ट कथा – अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो) Congratulations! The Filmfare Award for Best Film goes to #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/bpJKuXrCm5 — Filmfare (@filmfare) April 27, 2023 आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकून बाजी मारली आहे. फक्त आलिया भट्ट हिला नाही तर चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड्स मिळाला आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स न मिळाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावावर करत एक इतिहास निर्माण केलाय. सोशल मीडियावर चाहते हे फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाल्याबद्दल आलिया भट्ट हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"शहनाज गिल माझ्याशी लग्न करेल?": अभिनेत्रीचा एका चाहत्याला LOL उत्तर
“शहनाज गिल माझ्याशी लग्न करेल?”: अभिनेत्रीचा एका चाहत्याला LOL उत्तर
शहनाज गिलने हा फोटो शेअर केला आहे. (शिष्टाचार: shehnaazgill) नवी दिल्ली: नेटफ्लिक्स इंडियाने जारी केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, शहनाज गिल आणि मसाबा गुप्ता यांनी केवळ आनंददायक उत्तरे मिळविण्यासाठी चाहत्यांच्या प्रश्नांना एकमेकांवर फेकले. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांच्या शोच्या दुसऱ्या सीझनची जाहिरात करण्यासाठी ही क्लिप अपलोड करण्यात आली आहे मसाबा मसाबा. सीझन 29 जुलै रोजी प्रसारित करण्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
नाव द स्टार: चित्रात कंटाळलेली ही मुलगी आजची बॉलिवूडची लेडी सुपरस्टार आहे, तुम्हाला माहिती आहे का?
नाव द स्टार: चित्रात कंटाळलेली ही मुलगी आजची बॉलिवूडची लेडी सुपरस्टार आहे, तुम्हाला माहिती आहे का?
अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल इंटरनेटच्या युगात कोणत्याही स्टारच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती गोळा करणे ही काही मोठी गोष्ट नाही. मग ते एखाद्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो शोधणे असो किंवा त्यांच्या कोणत्याही सवयी. अशा परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याचा बॉलिवूडशीच संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रात ही मुलगी तिच्या भावासोबत बेडवर पडलेली…
View On WordPress
0 notes
emarathinews-blog · 4 years
Text
The Husband of this Marathi Actress is Investigating the Death of Sushant Singh Rajput - E Marathi News
ह्या मराठी अभिनेत्रीचा नवरा करत आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी चौकशी
1 note · View note
hometips-marathi · 2 years
Text
वडिलांसोबत मस्ती करणाऱ्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत का? तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतून मिळवली प्रसिद्धी…
वडिलांसोबत मस्ती करणाऱ्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत का? तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतून मिळवली प्रसिद्धी…
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि नामांकित हिंदी मालिका म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.हिंदी मालिकांमधील सर्वात जास्त प्रसिद्ध मालिका आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो एका अभिनेत्रीचा बालपणीचा आहे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी…
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना 51 व्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण आज दिल्लीत करण्यात आले. 
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'त्याने इतकं मारलं की....', प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘त्याने इतकं मारलं की….’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘त्याने इतकं मारलं की….’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा Flora saini: आता श्रद्धा वालकर हत्येप्रकरणानंतर अभिनेत्रीच्या वेदना पुन्हा ताज्या झाल्या आहेत. Flora saini: आता श्रद्धा वालकर हत्येप्रकरणानंतर अभिनेत्रीच्या वेदना पुन्हा ताज्या झाल्या आहेत. Go to Source
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
माही श्रीवास्तवने किलर कृत्यांसह चाहत्यांना थक्क केले, वापरकर्ते म्हणाले - 'ले डूबी......'
माही श्रीवास्तवने किलर कृत्यांसह चाहत्यांना थक्क केले, वापरकर्ते म्हणाले – ‘ले डूबी……’
माही श्रीवास्तवचा नजरिया ना लागे वर डान्स- माही श्रीवास्तवने किलर परफॉर्मन्सने चाहत्यांना थक्क केले, वापरकर्ते म्हणाले- ‘ले डूबी…….’ – बॉलीवुडलाइफ हिंदीमध्ये वाचा भोजपुरी अभिनेत्री माही श्रीवास्तवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा अभिनय पाहण्यासारखा आहे. द्वारे अभय , अद्यतनित: 13 जुलै 2022 5:19 PM IST माही श्रीवास्तव व्हिडिओ: भोजपुरी अभिनेत्री माही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान;ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव
समलैंगिक विवाहासाठी विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बनावट शेतकरी दाखवून पीक विम्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचे कृषीमंत्र्याचे संकेत
आणि
कर थकवलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय
****
सिनेमा हा समाजाचा दस्ताऐवज असतोच तसंच तो समाज घडवण्याचा माध्यमही असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत दिमाखदार समारंभात वितरित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याशिवाय, आर. माधवन दिग्दर्शित 'रॉकेट्री' या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा, 'पुष्पा' या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी आलिया भट आणि 'मिमी' चित्रपटासाठी कृती सॅनॉन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सह अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या 'नर्गिस दत्त पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार 'गोदावरी' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना प्रदान करण्यात आला. 'चंद सांसे' या हिंदी लघुचित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी प्रतिमा जोशी यांना आणि निर्मितीसाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना 'रजत पदक' देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एम जी एम स्कुल ऑफ आर्ट आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'एकदा काय झालं' या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी सलील कुलकर्णी यांना 'रजत कमळ' प्रदान करण्यात आलं. शेखरबापू रणखांबे यांना 'रेखा', या मराठी लघुचित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल विशेष परीक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
समलैंगिक विवाह कायदेशीर करण्यासाठी विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यांच्या पीठानं समलैंगिक विवाहासंदर्भात केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाला सहमती दर्शवत, समलैंगिक विवाहासाठी या कायद्याचं चौथं कलम रद्द करण्यास न्यायालयानं नकार दिला. या कायद्यात बदल केल्यास इतर कायद्यांवर अकल्पनीय परिणाम होतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. संभाव्य समलैंगिक जोडप्यांशी संबंधित शिधापत्रिका, निवृत्तीवेतन, उत्तराधिकारी अशा बाबींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला.
****
भारतानं अंतराळक्षेत्रात नवी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टं गाठण्याचं ध्येय ठेवावं, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गगनयान मोहिमेचा आढावा आणि इतर मोहिमांची रूपरेषा ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक निर्माण करावं आणि २०४० पर्यंत चंद्रावर पहिली भारतीय व्यक्ती पाठवावी, मंगळ आणि शुक्र ग्रहांसाठीही मोहिमा आखाव्यात, असं पंतप्रधान म्हणाले.
****
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरु झालेलं 'मेरी माटी मेरा देश' अभियान आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. देशभरातल्या अडतीसशेहून जास्त विकासखंडांमधे 'वीरों को नमन' अभियानाअंतर्गत गावोगावी हुतात्म्यांना आदरांजली वाहणारे शिलाफलक बसवण्यात आले तसंच, देशाच्या कानाकोपऱ्यातून अमृतकलश यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणची स्थानिक माती आणि मूठभर तांदूळ अमृत कलशात गोळा करण्यात आले आहेत. दिल्लीत कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या या वाटिकेत या कलशातली माती अर्पण केली जाणार आहे.
****
सरकारचं नुकसान होईल, असा निर्णय आपण कधीही घेतला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात पुण्यात एका भूखंडाबाबत अजित पवार दबाव आणल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या केला आहे. या आरोपामध्ये काही तथ्य नाही, असं पवार म्हणाले. या भूखंडाबाबत निर्णय होऊनही प्रकल्प रखडल्यामुळे त्याबाबत आपण फक्त विचारपूस केली होती, असा खुलासा पवार यांनी केला.
****
बनावट शेतकरी दाखवून पीक विम्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा रबी हंगामात हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे, जवस-तीळ-करडई यासारख्या तेलबियांचं क्षेत्र वाढवण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. या तेलबियांसह रब्बी ज्वारीलाही योग्य भाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशपत्र सादर करण्याच्या उर्वरित कालावधीत, म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी तीन ऐवजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
सांगलीच्या 'अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती' या संस्थेचं 'विष्णुदास भावे गौरव पदक' यावर्षी प्रख्यात नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झालं आहे. पाच नोव्हेंबर या रंगभूमीदिनाचं औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं हे छपन्नावं वर्ष आहे. गौरव पदक, पंचवीस हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रतिष्ठेचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉक्टर गणेश देवी, तसंच सामाजिक कार्यकर्ते आमदार जिग्नेश मेवाणी यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत "बलुतं" हा पुरस्कार "काळ्या निळ्या रेषा" या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. येत्या सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये या पुरस्कारांचा वितरण सोहळा होणार आहे.
****
तरुणांना रोजगाराची संधी तसंच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचातींमध्ये 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' सुरु करण्यात येत आहेत, येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्रांचं उद्‌घाटन होणार आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्या दृष्टीने ही कौशल्य केंद्रं महत्वाची असून भविष्यात या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल, असंही लोढा यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मालमत्ता कर थकवलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. शहरात मालमत्ता कर थकवल्याची २१९ प्रकरणं समोर आली असून, या सर्व प्रकरणात मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्या विकण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त नांदेडमध्ये येत्या १९ आणि २० तारखेला "रानभाजी आणि मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवा"चं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होणार असलेल्या या महोत्सवाला भेट देऊन ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून रानभाज्या आणि इतर शेतमाल खरेदी करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. या महोत्सवात १९ तारखेला रानभाज्यांच्या पाककृतींची स्पर्धा घेण्यात येणार असून, यात मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
0 notes
headlinemarathi · 3 years
Photo
Tumblr media
‘पाठीवर खरोखर वितळलेलं गरम मेण ओतलं’, ‘पौरषपुर’मधील इंटिमेट सीनविषयी अभिनेत्रीचा खुलासा सीन शूट करणे माझ्यासाठी कठिण होते | #AshmitaBakshi #Paurashpur #LovemakingScene #AnnuKapoor https://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/paurashpur-actress-ashmita-bakshi-on-the-lovemaking-scene-with-annu-kapoor-actual-hot-molten-wax-was-put-on-my-back/?feed_id=42145&_unique_id=603a03a7766ad
0 notes
marathinewslive · 2 years
Text
विकी कौशल मालदीवमध्ये त्याच्या मुलांसोबत पूल टाईम एन्जॉय करत आहे. चित्रे पहा
विकी कौशल मालदीवमध्ये त्याच्या मुलांसोबत पूल टाईम एन्जॉय करत आहे. चित्रे पहा
विक्की कौशलने हा फोटो शेअर केला आहे. (शिष्टाचार: vickykaushal09) विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या मालदीवमध्ये अभिनेत्रीचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सरदार उधम अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या मुलांसोबत पूल टाइम एन्जॉय करताना नवीन फोटो शेअर केले आहेत. प्रतिमांमध्ये, विकी, त्याचा भाऊ सनी कौशल, कबीर खान, आनंद तिवारी, कतरिनाचा भाऊ स���बॅस्टिन लॉरेंट मिशेल आणि मिखाईल यावलकर त्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
सुंदर, सुंदर असे शब्द निक्की तांबोळीसमोर फिके पडतील
सुंदर, सुंदर असे शब्द निक्की तांबोळीसमोर फिके पडतील
खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने तिच्या हिरव्या रंगाच्या सूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने तिचे खूप बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लीडिंग मॅगझिनसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा किलर लूक पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळीचे हे रूप तुम्ही याआधी पाहिले नसेल. या फोटोशूटसाठी निक्की तांबोळीने शर्टलेस ब्लेझरसह उंच कमर पॅन्ट घातली…
View On WordPress
0 notes
rahulshevarethings · 4 years
Photo
Tumblr media
कमलाबाई गोखले Kamalabai Gokhale कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रथम स्त्री कलाकार होत्या. दादासाहेब फाळके यांच्या ‘ मोहिनी भस्मासुर’ या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमला बाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपान, रुपेरी पडद्याला एका स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला.
0 notes