Tumgik
#नाहीतर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य!
“मला सिंगल घ्यायला सांगत राहा, नाहीतर मी…”, ईशान किशनचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य! भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज ईशान किशनने ( Ishan Kishan ) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने द्विशतक ठोकले आणि सर्वांच्यात चर्चेत ईशान किशनचा उल्लेख होऊ लागला. त्याच्या या जबरदस्त खेळीबाबत अनेकांनी त्याचे जोरदार कौतुक देखील केले आहे. त्याच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sameeroak · 2 years
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्‍ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes · View notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट��य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेट��ात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
Video
youtube
एक तर तू राहशील नाहीतर मी राहील ठाकरे..
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Bandya : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत.
इथं तर एकच भाजी दिसतेय.
बायको : ऑप्शन्स दोनच आहेत –
१. खायचं असेल तर खा!
२. नाहीतर बोंबलत जा!
🤗🤗🤗😩😩😩🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😛😛😛
0 notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
Pradip : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत.
इथं तर एकच भाजी दिसतेय.
बायको : ऑप्शन्स दोनच आहेत –
१. खायचं असेल तर खा!
२. नाहीतर बोंबलत जा!
🤗🤗🤗😩😩😩🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😛😛😛
0 notes
shobha12sblog · 4 months
Text
हीच वेळ आहे भक्ती ची, नाहीतर पश्चातापा शिवाय काहीही हाती येणार नाही | Sa...
youtube
0 notes
vishnulonare · 4 months
Text
हीच वेळ आहे भक्ती ची, नाहीतर पश्चातापा शिवाय काहीही हाती येणार नाही | Sa...
youtube
अवश्य एक हा शार्ट सत्संग: हीच वेळ आहे भक्ती ची, नाहीतर पश्चातापा शिवय काहीही हटी येणार नाही. | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
vidyamsdiary7 · 6 months
Text
Post 3
फ्लॅट मध्ये दोन प्रकारची माणसं रहातात. माणूस हवा असतो नाहीतर माणूस घाणी यांच्या कडे पैश्याची श्रीमंती असते फक्त मनाची नाही. शेजारी कोण रहात हे पण माहित नसतं. दरवाज्यावर गेलो काम असतं म्हणून शेजारी ला काका काकी म्हणतात की तर आमच्या इथल्या society च्या सेक्रेटरी ची बायको कोण साहेब हवेत का इथपासून सुरुवात ..पाणी वगैरे विचारण तर दूरच.
यांच्या मुलांकडे  मित्र मंडळी नसतात पण कुत्रे असतात फिरवायला   .
आपल्या इथे तसही प्राण्यांना दान देणारे जास्त असतात पण रस्त्यातला गरिबाला मदत करणारे कमीच. का तर तो माणूस म्हणून जन्माला आला.
©
#vidyamslife
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
शास्त्रीय संगीतातील स्वरप्रभा निमाली– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १३ :  आपल्या प्रतिभासंपन्न गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले, अशी शास्त्रीय संगीतातील स्वर प्रभा निमाली, अशा भावना व्यक्त करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित अशा डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन ही राज्याच्याच नाहीतर देशाच्या कला व संगीत सृष्टीची फार मोठी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल
स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल
स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल स्ट्रोकला अनेकदा ब्रेन अटॅक देखील म्हटलं जातं. मेंदूमध्ये गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होतो त्यावेळी ब्रेन स्ट्रोकची समस्या जाणवते. किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या नसा फुटतात तेव्हा ही समस्या जाणवते. हा त्रास होणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येण्याची दाट…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 9 months
Text
विरंगुळा घ्या, नाहीतर निराश व्हाल.
बऱ्याच लोकांना हे समजत नाही की दीर्घ कालावधीसाठी काम करणं तितकंच वाईट असतं.मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामादरम्यान खरोखरच विश्रांती घेतली पाहिजे.हे करणं निश्चितपणे तुमची तणाव पातळी तसंच तुमची निराशा कमी ठेवण्यास मदत करतं.मेंदूवर खूप अनावश्यक ताण टाकणं ही एक अतिशय वाईट कल्पना आहे. एकदा,काही वर्षांपूर्वी, मी काही लेखावर सुमारे तीन तास सतत काम करत होतो.यामुळे मला खूप त्रास झाला. मुख्य गोष्ट जी…
View On WordPress
0 notes
advika060322 · 1 year
Text
फटाके बाप्पा पासून लांब वाजवावेत नाहीतर अशा दुर्घटना होतात.. अतिउत्साह आ...
0 notes
Video
youtube
50 खोके आम्ही देतो धोके बंडाची नाहीतर गद्दारीचे नोंद..
0 notes
bandya-mama · 3 months
Text
एक म्हातारी व्यक्ती रस्त्यानं चालताना
आकाशाकडे बघत चाललेली असतात…
नेमके ते Bandya गाडीसमोर येता.
Bandya : आजोबा ! जिथं ‘जाताय’ तिथं बघा.
नाहीतर… जिथं ‘बघताय’ तिथं जाल.
😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣😂😂😂
0 notes
pradip-madgaonkar · 3 months
Text
एक म्हातारी व्यक्ती रस्त्यानं चालताना
आकाशाकडे बघत चाललेली असतात…
नेमके te Pradip chya गाडीसमोर येत
Pradip : आजोबा ! जिथं ‘जाताय’ तिथं बघा.
नाहीतर… जिथं ‘बघताय’ तिथं जाल.
😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣😂😂😂
0 notes