Tumgik
#आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० जून  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
बुद्धिवंतांचं स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठांतले पदव्यूत्तर विभाग आणि संशोधन संस्था बळकट करण्याची गरज-राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस
ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं काल कोल्हापूरात वार्धक्यानं निधन
मराठवाड्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प वेगानं मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
जालना जिल्ह्यात बनावट खताचा मोठा साठा जप्त
नांदेड जिल्ह्यात काल दोन वाहनांच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
आणि
आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीला कांस्य पदक
सविस्तर बातम्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत, मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंजुरी दिली. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या विविध कामामध्ये, १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचं, महालेखापालाच्या विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदवण्याबाबत निवेदन दिलं होतं.
****
शिवसेनेच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटांचे काल मुंबईत मेळावे झाले. गोरेगाव इथल्या नेस्को संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी, आमच्यावरच्या आरोपांना कामाने उत्तर देणार असल्याचं सांगितलं. बाळासाहेबांचे आणि ज्वलंत हिंदुत्वाचे विचार सर्वदूर नेण्याचं काम आपण करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप महायुती म्हणून लढणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
तर मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सरकारनं सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च केला आहे, तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता, तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झालं असतं, असं ठाकरे  यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सध्याही विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात, मात्र आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, विविध योजनांमुळे मोंदींना जनाधार मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल कल्याण इथं मोदी अ‍ॅट नाईन महा-जनसंपर्क अभियानांतर्गत बोलत होते. देशाला मजबूत करायचं असल्यास महिलांना सक्षम करायची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली.
****
मागासवर्गीय कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये काळानुरूप बदल करण्याबाबत अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी मागासवर्ग आयोगाला नियमितपणे माहिती द्यावी, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी दिले आहेत. ते काल नागपुरात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागासवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मंजूर निधीचा विनियोग योजननिहाय प्रभावीपणे तसंच परिणामकारक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त उद्या २१ जून रोजी विधान भवनाच्या प्रांगणात, 'योगप्रभात विधान भवन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. राज्य विधिमंडळ सदस्यांसह सुमारे दोन हजार योगप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावात, शाळा, महाविद्यालयात, सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनामंध्ये योग कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलं आहे.
दरम्यान, कळंब इथं अंध योग शिक्षक शशिकुमार भातलवंडे हे मागील अनेक वर्षांपासून, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांना योगाचे धडे देत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना योगासनांचं महत्त्व सांगत योग हा जीवनशैलीचा भाग बनवण्याचं आवाहन केलं आहे.
Byte..
योगात प्रचंड शक्ती आहे. म्हणूनच एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारताने जगाला दिलेली एक अमृतमय भेट आहे. म्हणून नित्य योग करा, प्राणायम करा. नकारात्मकता दूर करा. या देशाची समृद्धी, वैभव म्हणजे या देशातली निरोगी आणि स्वस्थ विचारांची माणसं आहेत. स्वस्थ आणि निरोगी शरीराची माणसं आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी निरोगी रहावं आणि दवाखान्यात जाणारा अमूल्य वेळ आणि पैसा याच्यापासून मुक्ती मिळावी. धन्यवाद.
****
देशातल्या बुद्धिवंतांचं स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठांमधल्या पदव्यूत्तर विभाग आणि संशोधन संस्था बळकट करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन, राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ - बाटू चा पंचविसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी विदेशात जातात, यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आय आय टी तील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात हे थांबवण्यासाठी उद्योग आणि विद्यापीठांचं सहकार्य वाढलं पाहिजे असं राज्यपाल म्हणाले.
****
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं काल कोल्हापूरात वार्धक्यानं निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. तब्बल सात दशकं त्यांनी चंदेरी पडद्यावर चरित्रभूमिका साकारल्या. शांता तांबे यांनी रंगभूमीवरून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केलं. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
****
मृतदेह जाळून किंवा पुरुन नष्ट करण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणं, हे खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य आहे, यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन, नांदेडचे वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी केलं आहे. किनवट तालुक्यातल्या सविता माधव श्रीरामवार यांचा देहदानाचा संकल्प, त्यांच्या कन्या रुपाली श्रीरामवार यांनी काल पूर्ण केला, त्यावेळी डॉ.वाकोडे बोलत होते. समाजातल्या लोकांनी यांचा आदर्श समोर ठेवून देहदानाच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असं आवाहन डॉ.वाकोडे यांनी यावेळी केलं.
****
मराठवाड्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प वेगानं मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मराठवाडा तसंच नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पाच्या कामास गती देण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात आले. कृष्णा मराठवाडा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निरा खोऱ्यातलं पाणी भिमा नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक ३४१ कोटी रुपये रकमेस मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसंच गोदावरी मराठवाडा प्रदेशातल्या १२५ कोटी ९७ लाख रुपये रकमेचे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
****
शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पांजरपोळ मैदानावर येत्या २५ जून रोजी विशेष कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आढावा बैठक घेतली. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या.
****
औरंगाबाद इथं ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं तीन दिवसीय ‘शोध आणि बचाव कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात पोलिस दल, महानगरपालिका, अग्निशमन विभाग, तसंच गृहरक्षक दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथं बनावट खताचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तीर्थपुरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्य गुणवत्ता निरीक्षक पी.डी. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पुणे इथल्या पथकानं ही कारवाई केली.
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन वाहनांच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. नांदेडहून प्रवासी घेऊन भोकरकडे जाणारी जीप आणि मालवाहू टॅम्पो यांच्यात हा अपघात झाला.
****
परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत चंद्रकात कराड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
****
अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या गटानं विजय मिळवला आहे. कारखान्याच्या १९ जागा पैकी १८ जागांवर थोरात यांच्या पॅनलच उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ सुजय विखे यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे.
****
चीनमधल्या वुक्सी इथं सुरु असलेल्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीनं कांस्य पदक जिंकलं. महिला सेबर स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत काल भवानी देवीला उजबेकिस्तानच्या खेळाडूकडून १४ - १५ असा पराभव पत्करावा लागल्यानं, कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
लातूर जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प उमेद अंतर्गत जिल्ह्यातील ३५० बचत गटांना नऊ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलं असून, याचे मंजुरी आदेश बचत गटांच्या महिलांना, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल वितरीत करण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना वैयक्तिक विहीर, जनावरांचा गोठा आदी बाबींचे मंजुरी आदेश, ग्रामीण रस्ते मंजुरी आदेश, आदीचा समावेश आहे.
****
आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारात प्रत्येकानं भरडधान्याचा नियमित वापर करावा, तसंच दररोज पंधरा मिनिटं योगाभ्यास करावा, असं मत, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त, श्रीरामपूर इथं आयोजित मल्टिमिडिया प्रदर्शन आणि विशेष प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन काल आमदार कानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात भरडधान्याचे विविध प्रकार, त्यांचं आरोग्यातलं महत्त्व, तसंच विविध योग प्रकारांविषयी सचित्र माहिती मांडण्यात आली आहे. श्रीरामपूर मधल्या विविध बचतगटांनी भरडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉलही इथं लावण्यात आले आहेत‌.
****
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल उस्मानाबाद शहरात आगमन झालं. नागरिकांनी मोठ्या उत्साहात रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजवून पालखीचं स्वागत केलं. आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करेल.
****
संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍‍वर महाराज यांचा पालखी सोहळा लोणंद इथल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज सकाळी तरडगावकडे मार्गस्थ होत आहे. या मार्गावर आज दुपारी चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण होणार आहे. उद्या सकाळी तरडगाव येथून पालखी फलटणकडे मुक्कामासाठी मार्गस्‍थ होईल.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022: आज संपूर्ण देश 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहे. अशा परिस्थितीत नम्रता मल्लाने योगा करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर;जाहीर सभेला संबोधित करणार 
चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात टक्क्यांपर्यंत राहण्याची आशा
खासदार शरद पवार यांना आलेल्या धमकीची राज्य सरकारकडून गंभीर दखल
रस्ता सुरक्षा उपक्रमांमुळे महामार्गांवरच्या अपघाती मृत्यूंमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत घट
संत नामदेव महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
औरंगाबाद जिल्ह्यातली एकोणीस महाविद्यालयं शैक्षणिक अंकेक्षणात अनुत्तीर्ण
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरराज्य वाहन चोर टोळीला अटक
आणि
दक्षिण मध्य रेल्वे तीन नव्या गाड्या सुरू करणार;नांदेड-मेडचल गाडीचा काचीगुडापर्यंत विस्तार
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. ते आज नांदेड इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास शाह यांचं गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन होईल. साडे पाच वाजेच्या सुमारास ते सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाऱ्याला भेट देऊन, पावणे सहा अबचलनगर मैदानावरच्या सभास्थळाकडे प्रयाण करतील. सभेला संबोधित केल्यानंतर रात्री आठ वाजेदरम्यान ते नांदेडहून प्रस्थान करणार आहेत.
दरम्यान, अबचलनगर मैदानावर होणाऱ्या या सभेच्या अनुषंगानं वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यासाठीची सूचना जारी केली. वाहतुक व्यवस्थेतला हा बदल आज सकाळी १० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत लागू राहील.
****
चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साडे-सहा, ते सात टक्क्याच्या जवळ राहील, अशी आशा, केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांनी वर्तवली आहे. ते काल लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते. अर्थव्यवस्थेमधली कंपन्यांची गुंतवणूक वाढली असून, डिजिटल पायाभूत सुविधांमधली प्रगती जास्तीतजास्त लोकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणत आहे, त्यामुळे हे शक्य असल्याचं ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची गती लक्षात घेता, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी सात पूर्णांक दोन टक्के विकास दराचा अंदाज हा कमीच ठरेल, असं ते म्हणाले.
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत, सहा पूर्णांक एक दशांश टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज वर्तवला होता, तिसऱ्या तिमाहीत तो  चार पूर्णांक पाच दशांश टक्के इतका  ��ोता. पुढल्या दशकासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबतचा हा आशावाद, कॉर्पोरेट क्षेत्राची सुधारलेली स्थिती, आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रानं केलेल्या प्रत्यक्ष गुंतवणुकीचा परिणाम असल्याचं, नागेश्वर यांनी सांगितलं.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं, 'आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडिओ अशा तीन गटात बावीस भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये एकूण तेहतीस पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. योगाभ्यासाची माहिती प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दुसऱ्या वर्षासाठी प्रसारमाध्यम सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेतल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं. यासाठी १० जून २०२३ ते २५ जून २०२३ या कालावधीत तयार केलेल्या, आणि प्रकाशित किंवा प्रसारित केलेल्या दृकश्राव्य सामग्रीचा विहित नमुन्यात तपशील सादर करणं आवश्यक आहे. प्रवेशिका दाखल करण्याची मुदत एक जुलै २०२३ पर्यंत आहे. या संदर्भातली माहिती पत्रसूचना कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आवश्यकता असल्यास पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी एका ट्विट संदेशातून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत, मात्र धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. कोणत्याही नेत्याला अशा प्रकारची धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पवार यांना एका व्यक्तीनं ट्विट संदेशाद्वारे ठार मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त आहे. हे ट्विटर हँडल अमरावती इथल्या सौरभ पिंपळकर या तरुणाचं असल्याची माहिती समोर आली आहे. तुमचा दाभोलकर करू, अशा शब्दात दिलेल्या या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली. राज्य आणि केंद्र शासनानं या धमकीची गंभीर दखल घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
****
काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची निवड झाली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षानं काल जारी केलं.
****
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतिकारी नाही, तर संविधानातल्या तरतुदी आणि नियमांनुसारच घेतला पाहिजे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. याबाबतीत क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच म्हटलं होतं, या पार्श्वभूमीवर लोंढे बोलत होते. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन महिना उलटला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, असं मतही लोंढे यांनी व्यक्त केलं.
****
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पहिल्या वर्षी स्वायत्त महाविद्यालयं, विद्यापीठातले विभाग आणि पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये, नवं शैक्षणिक धोरण लागू होणार असून, पुढच्या वर्षी राज्यभरात हे धोरण लागू होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. 
नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याच्या संदर्भात गतीनं काम सुरू असून, त्यासाठी आम्ही सगळी पुस्तकं मातृभाषेत, म्हणजे मराठीत छापली आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांना परिक्षेत मराठी भाषेत उत्तर लिहिण्याची मुभा राहील, असं ते म्हणाले. या धोरणात शिक्षण साचेबद्ध न राहता, कौशल्य विकासाचे विषयही शिकवले जातील, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
परिवहन विभागानं रस्ता सुरक्षेसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातल्या महामार्गांवरच्या अपघाती मृत्यूंमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी ही माहिती दिली. परिवहन विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या वाहनांच्या चाकं तपासणी उपक्रमाची सुरुवात काल समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंजच्या टोलनाक्यावर भीमनवर यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. महामार्गांवर वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांसाठी, समृद्धी महामार्गावर तीन ठिकाणी समुपदेशन केंद्रं उभारण्यात आल्याची, तसंच आतापर्यंत तीन हजारहून जास्त वाहनधारकांचं याबाबतीत समुपदेशन करण्यात आल्याची माहिती, त्यांनी दिली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी इतिहासात काल एक नवा अध्याय जोडला गेला. पुणे जिल्ह्यात सासवड ते नीरा या मार्गावर काल प्रथमच महिला चालकाने बस चालवली. अर्चना अत्राम असं या महिला चालकाचं नाव आहे. एसटीच्या या नव्या अध्यायाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर शेअर केली असून, महिला चालकाचं अभिनंदन केलं आहे.
****
आषाढी वारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथून नामदेव महाराजांच्या पालखीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं. या पालखीचा पाहिला रिंगण सोहळा हिंगोलीत रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. नामदेव महारांजांच्या मानाचा अश्वाने रिंगण मारुन या सोहळ्याला सुरुवात केली. हजारो भाविक रिंगण बघण्यासाठी जमा झाले होते. धावत्या अश्वांनी सर्वांची मनं जिंकत, हा परिसर भक्तिमय झाला होता, असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज पंढरपुरकडे प्रस्थान होणार आहे.
****
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध आगारातून पाच हजार बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये औरंगाबाद आणि पुण्याहून प्रत्येकी साडे बाराशे, नागपूरहून एकशे दहा आणि अमरावतीहून साडे सातशे गाड्या सोडल्या जाणार आहेत.
****
येत्या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सासवड, जेजुरी, नीरा आणि वाल्हे इथल्या प��लखी तळांना भेट देऊन, वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पालखी तळांवर आणि मार्गावर भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी २५ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेली औरंगाबाद जिल्ह्यातली एकोणीस महाविद्यालयं, ’अ‍ॅकडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात, ’नो ग्रेड’ म्हणजेच अनुत्तीर्ण ठरली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांचं मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा तपासूनच प्रवेश क्षमता स्थगित किंवा कमी करण्याचा निर्णय कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी घेतला आहे.
संलग्नित महाविद्यालयांचं हे शैक्षणिक अंकेक्षण तीन टप्प्यांत करण्यात आलं. एकूण तीनशे चौ-याण्णव महाविद्यालयांचं अंकेक्षण झालं, त्यात अ श्रेणीत ६१ महाविद्यालयं, ब श्रेणी ४८, क श्रेणी ५७, ड श्रेणी ९८ आणि नापास श्रेणीत एकशे तीस महाविद्यालयं आहेत.
****
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेनं आंतरराज्य वाहन चोर टोळीला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात वीसहून जास्त गुन्हे दाखल असलेला, आणि पाच जिल्ह्यांतल्या पोलिसांना हव्या असलेल्या गुन्हेगारासह, अन्य तीन जणांचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता भागातून चोरीला गेलेल्या ट्रकचा तपास करताना ही टोळी पकडली गेली. या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
****
समृद्धी महामार्गावर काल कार आणि कंटेनरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास, अहमदनगरहून नागपूरकडे जाणारी भरधाव कार, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला धडकली. जालना जिल्ह्याच्या हद्दीतल्या निधोना टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल रस्ता अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. चणई आडस मार्गावर काल दुपारी हा अपघात झाला. डॉ रवी सातपुते आणि डॉ प्रमोद बुरांडे अशी मृतांची नावं आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकून हा अपघात झाला.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन काचीगुडा ते पूर्णा, पूर्णा ते जालना आणि जालना ते नांदेड अशा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मेडचल-नांदेड डेमू गाडी काचीगुडा ते नांदेड अशी विस्तारित करण्यात आली आहे. ही विस्तारित गाडी उद्या, अकरा जूनपासून धावणार आहे. पूर्णा ते जालना विशेष गाडी तसंच जालना ते नांदेड ही विशेष गाडी आजपासून धावणार आहेत.
****
रेल्वेच्या नांदेड विभागातल्या सगळ्या स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची नि:शुल्क व्यवस्था केलेली असून, बिसलेरी तसंच बेलीसह आठ अधिकृत ब्रँड्सचं हवाबंद पिण्याचं पाणीसुद्धा, स्थानकांवरच्या उपाहारगृहांमध्ये आणि स्टॉल्सवर उपलब्ध आहे. या सर्व कंपन्यांच्या पाणी बाटलीची किंमत पंधरा रुपये असून, कोणी यापेक्षा जास्त दर आकारत असेल, तर प्रवाशांनी स्टेशन मास्तरांशी संपर्क करावा किंवा १३९ या क्रमांकावर दूरध्वनी करावा, असं विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी कळवलं आहे.
****
इंग्लंड इथं सुरु असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध २९६ धावांची आघाडी मिळवली आहे. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात चार बाद १२३ धावा झाल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव २९६ धावांवर संपुष्टात आला. अजिंक्य रहाणेनं ८९ धावा केल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. त्रिविक्रम मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक असून, महाराष्ट्रातल्या सर्वात प्राचीन इष्टिका मंदिर म्हणजे वीटेचं बांधकाम असलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराच्या बांधकामास तडे गेले असून, मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून पाठपुरावा सुरू होता.
****
औरंगाबाद इथं आज बारव संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्राचीन जलव्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या बारवांची संवर्धन मोहीम राज्यभरात राबवली जात असून, त्याअंतर्गत, गावोगावी बारवांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स आणि मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समिती, यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला असून, यामध्ये कार्यकर्त्यांचं अनुभवकथन आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबवण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्याचा रहिवासी असलेले आणि किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेले युवक यासाठी पात्र असतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पर्धा मिशन डॉट कॉम, या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला आणि देशाला सक्षम बनवू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आपल्या `मन की बात` कार्यक्रमामध्ये देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात कर्तव्य हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी असं त्यांनी म्हटलं. या महिन्याच्या पाच तारखेला देशातल्या युनिकॉर्नची संख्या शंभरवर पोहोचली असल्याचं तसंच याचं एकूण मूल्य ३३० अब्ज डॉलरपेक्षा म्हणजे पंचवीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त असल्याचं ते म्हणाले. देशात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांच्या उत्पादनांची माहिती गोळा करण्याचं आणि त्यांचा वापर करण्याचं तसंच त्याद्वारे `आत्मनिर्भर भारत मोहिमे`ला चालना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. `एक भारत, श्रेष्ठ भारत` या संकल्पने संदर्भात आदर्श असलेल्यांची उदाहरणं त्यांनी दिली. आता आपल्या देशात चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर यात्रा, जगन्नाथ यात्रा, अशा अनेक यात्रा होणार आहेत. आपण कुठंही गेलो तरी या तीर्थ क्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तिथली शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये, ते जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. आता काही दिवसांनी येणारा पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस तसंच २१ जून हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पर्यावरणाबाबत आपण सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणारं असलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी- “मानवतेसाठी योग” ही या योग दिवसाची संकल्पना आहे, असं त्यांनी सांगितलं. योग दिनाची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असं ते म्हणाले. कोरोनाविषयी काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. जपानमध्ये आपल्या परंपरांविषयी खूप माहिती आहे. त्यांचं आपल्या संस्कृतीबद्दलचं समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय असल्याचं मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवरुन सांगितलं. `मन की बात` या मालिकेचा हा एकोणनव्वदावा भाग होता.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ८१ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी २८ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ कोटी ४६ लाखांहून अधिक नागरिकांना पूरक मात्रा देण्यात आली आहे. दरम्यान, देशात काल नवीन २ हजार ८२८ बाधित रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या १७ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाचे सात नव्या रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं आज घरी पाठवण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सात पैकी सहा रुग्णांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या दोन्हीही मात्रा घेतलेल्या होत्या त्यामुळंच त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. सर्व सातही रुग्ण हे पुणे शहरातील असून ४ ते १८ मे या कालावधीत ते आढळून आले आहेत. यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार पुरुष आणि तीन महिला आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटंस आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम इथं रात्री आठ वाजता ह्या सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटंस हा संघ पहिल्यांदाच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर राजस्थान रॉयल्स संघानं २००८ च्या विजेतेपदा नंतर आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ७३ सामने खेळवले गेले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २१ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिलं असून गेल्या आर्थिक वर्षात भारतामध्ये त्र्याऐंशी अब्जांहून अधिक अमेरिकी डॉलरची; थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी परदेशी गुंतवणूक आहे.
****
केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यमंत्री मुंजापारा महेन्द्र आणि सिक्किमचे मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी आ़ज सिक्किमच्या गंगटोक इथल्या बौध्द विहारात योग उत्सवाचं नेतृत्व केलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२२ च्या तयारीच्या संदर्भात हा उत्सव घेण्यात आला.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत कोकण विभागात या वर्षी ऑनलाईन पध्दतीनं एक लाख ७९ हजार ५९१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी एक लाख एक्केचाळीस हजार २८५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. कोकण विभागात अव्वल कामगिरी झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली.
****
बिहार राज्यात अवकाळी वादळ - वारा आणि वीज पडून झालेल्या नुकसानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं तसंच राज्यातल्या परिस्थितीवर प्रशासनाचं ���क्ष असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची चा २१ - १५, २० - २२, २१ - १३ असा पराभव केला.
****
राज्यात मराठवाडा तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून येत्या २४ तारखे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, अन्यत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जून २०१८ सकाळी ६.५० मि. ****  चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा  व्यावसायिक पदवी, पदविका, आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २९ जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा आणि  पावसाशी निगडित विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू **** योग सरावात सातत्य असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त उत्तराखंडची राजधानी देहरादून इथं आयोजित योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. नियमित योग सरावा मुळे आरोग्य उत्तम राहून, वैद्यकीय खर्चात बचत होते, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. या वेळी झालेल्या योग सरावात पंतप्रधानांनी सहभागी होत, प्राणायाम आणि योगासनं केली. राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र साजरा झाला. मुंबईत आयोजित योग प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय तसंच राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री सहभागी झाले. औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अनेक शाळांचे विद्यार्थी तसंच योग अभ्यासक या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी झाले. हिंगोली इथं जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित योग दिन कार्यक्रमात योग अभ्यासकांनी योगासनं सादर केली. **** योग क्षेत्रातल्या योगदानासाठी दिले जाणारे २०१८ सालचे पंतप्रधान योग पुरस्कार नाशिक इथले योग गुरू विश्वास मंडलिक आणि मुंबईची योग संस्था यांना जाहीर झाले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयानं काल ही घोषणा केली. २५ लाख रुपये, सन्मान चिन्ह, आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** देशभरातल्या शेतकऱ्यांशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नमो ॲपच्या माध्यमातून संवाद साधला. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं काम करत असल्याच्या वचनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. कच्च्या मालाचा खर्च कमी करणं, शेतमालाला योग्य भाव देणं, नैसर्गिक आपत्तीं मुळे होऊ शकणारं नुकसान टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांना शेती सोबतच उत्पन्नाचे अन्य पर्याय उपलब्ध करून देणं, या चार मुद्द्यांवर सरकार विशेष लक्ष देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. **** राज्य पुरस्कृत नवीन फळबाग लागवड योजना या वर्षापासून सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फलोत्पादन योजनेला उत्तेजन देण्याच्या दृष्टीनं ही योजना राबवली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेसाठी यंदाच्या वर्षासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या फळझाडांच्या लागवडी साठी सरकार कडून मदत करण्यात येणार आहे. या शिवाय काही नवीन वृक्ष आधारित फळपिकांचा समावेश करण्याचं तसंच त्यासाठी आर्थिक मापदंड निश्चित करण्याचे अधिकार कृषी विभागास देण्यात आले आहेत. **** व्यावसायिक पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशा साठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रि मंडळानं घेतना आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लेखी हमी घेण्यावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली असल्यानं, प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित कायद्या मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश, आदिवासी विकास विभागास देण्याचा निर्णय राज्य मंत्रि मंडळानं काल घेतला. या निर्णयाचा वैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, आदी २० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काल मर्यादा शिथील करण्याचा हा निर्णय फक्त या वर्षापुरताच असल्याचं, सरकारकडून सांगण्यात आलं आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदांमधील ६१६ कार्यव्ययी- रोजंदारी कर्मचाऱ्यांना मारुफ करारा ऐवजी, कालेलकर करारातील तरतुदी लागू करणं, अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर देवस्थानाच्या व्यवस्थापना साठी स्वतंत्र कायदा करणं, राज्यातल्या १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार - ई-नामच्या पोर्टलशी जोडणं, आदी निर्णयही कालच्या राज्य मंत्रि मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. **** मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या २९ जून पासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. काल तुळजापूर इथं झालेल्या सकल मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५८ मूकमोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्यांची सरकारनं दखल घेतली नाही, त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी आक्रमक मोर्चे काढणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार असून, राज्याच्या इतर भागातही अशी आंदोलनं करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. **** बँक ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या सह बँकेचे कार्यकारी संचालक माजी अध्यक्ष आणि विद्यमान विभागीय व्यवस्थापक यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकल्पा साठी अस्तित्वात नसलेली आभासी संपत्ती तारण ठेवून बेकायदा ८० कोटी रुपयांचं कर्जवाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डीएसकेडीएल या कंपनीतल्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्यानं डी एस कुलकर्णीचे सनदी लेखापाल, कंपनीचे मुख्य अभियंता आणि उपाध्यक्षानाही अटक करण्यात आली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली तसंच राज्यात अनेक भागात काल पाऊस झाला. या पावसाशी निगडित विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, सेनगाव परिसरात तासभर दमदार पाऊस झाला. गोरेगाव, कडोळी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्या मुळे विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. सेनगाव तालुक्यात सिनगी खांबा इथं अंगावर वीज पडून एक जण मरण पावला तर एक जण जखमी झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, सेलू भागात काल आठवडाभराच्या खंडानंतर पाऊस झाला. जिल्ह्यात खळी इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर जिंतूर मधल्या सावळी इथला एक शेतकरी नदीच्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यातही काल दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात मीठसागरे इथे वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. अहमदनगर, धुळे, सातारा या जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. **** वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल, डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत, अशी मागणी करत, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद इथं झालेल्या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ भालचंद्र कानगो यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. **** खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपा साठी जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय मेळाव्यांमधून आता पर्यंत सव्वा पाच कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ही माहिती दिली. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कोतवाल भानुदास पवार याला दीड हजार रुपयांची लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल अटक केली. *****
0 notes