Tumgik
#जागतिक योग दिन
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता विकसित मराठवाडा २०४७ या परिषदेतून व्यक्त.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या समर्थनात गंगाखेड तहसील कार्यालयासमोर सकल ओबीसी समाजाची निदर्शनं.
जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमातून जनजागृती.
आणि
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रावर कारवाई.
****
सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनासाठी ‘जिल्हा’ हा महत्त्वाचा घटक मानून प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं ‘मित्र’, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘विकसित मराठवाडा २०४७’ या एक दिवसीय विकास परिषदेत परदेशी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यात पाणी, कृषी, रोजगार, उद्योग आणि पर्यटन वाढीसाठीचं नियोजन आवश्यक असून, मित्र च्या माध्यमातून मराठवाड्यासाठी नविन धोरण तयार करून शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याचं, परदेशी यांनी सांगितलं. खाजगी गुंतवणुकीच्या वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक असून, सकल उत्पादनात कमी सहभाग असलेल्या जिल्ह्यांना केंद्रीत करून त्यांचा सहभाग वाढवावा लागेल, याकडेही परदेशी यांनी लक्ष वेधलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी त्यांना केली असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलतांना, राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात ही अभिनंदन आणि धन्यवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
****
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पक्षाच्या वतीनं, आज मुंबईत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीत तर उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
****
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवल्याचा आरोप करत, त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एका नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातील आणि केंद्रातील भाजप प्रणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने परवा २१ तारखेला राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ‘चिखल फेक‘ आंदोलन केलं जाणार आहे. सरकारचं शेतकरी-कष्टकरी-अल्पसंख्याक याबाबतचं धोरण, स्पर्धा परीक्षांची अनियमितता,  नीट परीक्षेतले कथित गैरप्रकार, शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल ओबीसी समाजाच्यावतीने यावेळी देण्यात आला.
दरम्यान, हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने आज वडीगोद्रीला रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन परवा साजरा होत आहे. योग हा निरंतर अभ्यासाचा विषय असल्याचं, धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथले शशीकुमार भातलवंडे यांनी दाखवून दिलं आहे. २००५ पासून त्यांनी योग साधना करत, आतापर्यंत ५०० योग प्रशिक्षकांना तयार केलं असून दोन लाख विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या कार्याचा आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी आढावा घेतला…
स्वतः प्रज्ञाचक्षू असून देखील योगसाधनेमध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे. या योग साधनेमुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. व्यसनमुक्ती, रोगमुक्ती यासाठी योगाभ्यासातून समुपदेशनाचे कामही ते करतात. योगशिक्षक शशी कुमार भातलवंडे यांनी अंधत्वावर मात करत सुरू ठेवलेली ही योगसाधना प्रत्येकाला आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग साधना करण्याची प्रेरणा देत आहे.
-देविदास पाठक,आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
युवकांनी योग आत्मसात करून योगाचा प्रचार करावा असं मत माजी मुख्यमंत्री खासदार  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं मल्टीमिडीया चित्रपट प्रदर्शनात ते बोलत होते. हे प्रदर्शन २१जूनपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे, प्रदर्शनस्थळी तीन दिवस योग शिबाराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -मिफमध्ये आज पाचव्या दिवश��� राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले माहितीपट, तसंच शॉर्ट फिक्शन, बेलारूस, रशिया आणि फ्रान्स या देशांचे, तसंच ऑस्करसाठी निवडले गेलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आशियाई महिलांचे विशेष चित्रपट, दिव्यांगजनांसाठी तयार केलेले विशेष चित्रपटही पाहता येणार आहेत. याशिवाय लघुपट,ॲनिमेशन, माहितीपट, वेबसीरीज आणि ओटीटी मंच या विषयांवरची चर्चासत्रं, परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रंही होणार आहेत.
****
जागतिक सिकलसेल दिन आज सर्वत्र पाळला जात आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात चौका या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सिकलसेल या आजाराबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली, तसंच या नागरिकांनी रक्ततपासणी करून या रोगाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होणाऱ्या प्रसाराला आळा घालण्याचं आवाहन केलं...
चाळीस वर्षाच्या आतील जेवढेपण पण नागरिक आहेत, महिला आणि पुरुष, त्या सगळ्यांनी सिकलसेलची रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. कारण हा अनुवांशिकतेने आजार पसरतो. आजार आणि वाहक जे असतील, त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी नॉर्मलम्हणजे जे वाहक नाही किंवा आजारी नाही अशा व्यक्तीशी लग्न केले तर ह्या आजाराला आपण तिथेच अटकाव आणु शकतो, म्हणचे हा पुढच्या पिढ्यामध्ये ट्रांसफर होणार नाही.
****
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकानं धडक कारवाई केली आहे. यापैकी आठ केंद्रांचे परवाने तात्पुरते तर तीन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीत पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. आषाढी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत सोलापूर इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पालखी तळांवर आवश्यक सोयी सुविधा तसंच सुरक्षेसाठी साडे २५ हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, सार्वजनिक तसंच खाजगी अशी सुमारे २४ हजाराहून अधिक शौचालयं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
****
दरम्यान, आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबतचे मानाचे अश्व आज कर्नाटक इथल्या अंकली इथून आळंदीकडे रवाना झाले. हे अश्व अकरा दिवसांचा प्रवास करून २६ जून रोजी पुण्यात आणि त्यानंतर २८ जूनला आळंदीला पोचणार आहेत. माऊलींची पालखी २९ जूनला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
****
आषाढी एकदशीसाठी पंढरपूरला निघालेल्या अकोला जिल्ह्यातल्या शेगांव इथल्या  संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळी १० वाजता वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं भव्य स्वागत करण्यात आलं. या पालखी समवेत ७०० वारकरी आणि पताकाधारी आहेत. या पालखीचे वाशिम जिल्ह्यात चार मुक्काम होणार असून आजचा पहिला मुक्काम डव्हा इथे होणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात धारासूर इथं वीज कोसळून मरण पावलेले अक्षय राठोड आणि येळेगाव इथले नरेंद्र शेळके यांच्या वारसांना राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते आज त्यांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022: आज संपूर्ण देश 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहे. अशा परिस्थितीत नम्रता मल्लाने योगा करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Text
सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी…
View On WordPress
0 notes
aksharkshudha · 2 years
Photo
Tumblr media
२१ जून जागतिक योग दिन #जागतिकयोगदिन #21stjune #internationalyogaday #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CfDMCAKPnp9/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
shubhthakare · 4 years
Photo
Tumblr media
🚩जागतिक ऑलिम्पिक आणि हँडबॉल दिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा🏁 🚩Happy World Olympic & Handball Day🏁 🚩 जागतिक ऑलिम्पिक तथा हँडबॉल दिन की शुभकामना🏁 --------------------------------------- 🛑 *STOP & THINK InfoConnect Limited* 🌐www.stopNthinks.com 📱 +91-9595939264 #Indian #world #olympic #handball #tradition #Maharashtra #India #trending ##Vidarbha #GreenIndia #Wish #instagram #facebook #youtube #linkedin #tiktok #Celebration #Pinterest #SMS #quotes #nation #linkedin #facebook #instagram #Today #News #Updates #योग #ऑलिम्पिक #हँडबॉल #shubh #शुभ #stopNthink (at STOP & THINK InfoConnect Limited) https://www.instagram.com/p/CBwJ6xuFukE/?igshid=12a6d23qdzx
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
या वर्षी उच्चशिक्षण संस्थांमधले प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा हस्तांतरित केल्यास त्या संस्थांना पूर्ण शुल्क परत द्यावं लागणार असल्याचा निर्णय, विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं घेतला आहे. यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं असून, त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेश रद्द केल्यास किंवा ते मागं घेतल्यास शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर यूजीसीनं हे धोरण जाहीर केलं. केंद्रीय किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था, यूजीसीनं मान्यता दिलेल्या संस्था, अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर अर्ध चक्रासनावरील एक चित्रफीत प्रसारित केली आहे. निरोगी हृदय आणि रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी या आसनाचा सराव करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या २४ तारखेपासून सुरु होणार असून, संसद सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि सदस्यांसह एकत्र काम करण्यास सरकार उत्सुक असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्य भारतीय संसदेची समृद्ध परंपरा राखण्यासाठी योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांनी ट्विट संदेशात व्यक्त केली. 
****
साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या किमान विक्री दरात ३१ वरून ४२ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढ करण्याची मागणी, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी, साखर उद्योगासंदर्भात महासंघाच्या बैठकीनंतर, काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून उसाच्या एफआरपीमध्ये सातत्यानं वाढ केली जात आहे; मात्र त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत कायम आहे, त्यामुळे साखर कारखान्यांचं आणि पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंही नुकसान होत असल्याचं ते म्हणाले. साखर उद्योगाच्या वाटचालीशी संबंधित आगामी दहा वर्षांचा व्यापक आराखडा तयार करण्याचं काम महासंघ सध्या करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
उन्हाळी सुट्यानंतर आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव शशांक मिश्रा यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या विविध विकास कामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जोडवाडी इथं १२ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी उपलब्ध ६० एकर शासकीय जमिनीची मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ, चित्ते पिंपळगाव तसंच खोडेगाव उपकेंद्रांमार्फत परिसरातल्या शेतकऱ्यांना ‍दिवसा दिली जाणार आहे.
****
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू या आरोग्यविषयक समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिम राबवण्यात येणार असल्याचं, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी म्हटलं आहे. विशेष चौकशी पथकाकडून, धारणी तालुक्यातल्या गर्भवती आणि तिच्या बालकाच्या मृत्यूची चौकशी केली जात असून, दोषीवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या सुमित नागलचा उपान्त्य फेरीचा सामना आज स्पेनच्या बर्नाबे जपाता मिरालेस सोबत होणार आहे. सुमितनं काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या खेळाडुचा सहा - चार, सात - पाच असा पराभव केला होता.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना कॅनडासोबत होणार आहे. फ्लोरिडा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. तर दुसरा सामना रात्री साडे दहा वाजता इंग्लंड आणि नामिबिया दरम्यान होणार आहे.
आज झालेल्या अन्य सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेनं नेपाळचा केवळ एका धावेनं, तर न्यूझीलंडनं युगांडाचा नऊ गडी राखून पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ जून  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ जून  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल;नवव्या जागतिक योग दिनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
देशभरात योग दिवस उत्साहात साजरा;राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करण्याची घोषणा
राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय
आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
मुबलक पावसाशिवाय शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या करू नये-कृषी आयुक्तांचं आवाहन
ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांकडून सहा जणांना अटक
आणि
दक्षिण आशियाई सॅफ फुटबॉल स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी
सविस्तर बातम्या
योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमेरिकेत न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाच्या प्रांगणात, योगाभ्यासादरम्यान पंतप्रधान बोलत होते. योग ही भारताची प्राचीन संस्कृती असून, तिचा जगभर प्रसार व्हावा, या उद्देशानं नऊ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाला जागतिक योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत २१ जून हा दिवस जागतिक योगदिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर सलग नऊ वर्षे हा दिवस संपूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा केला जात असल्याचा आनंद वाटतो, असं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात १३५ देशांतले प्रतिनिधी सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येनं इतक्या देशातल्या नागरिकांनी एकाच ठिकाणी योगाभ्यास केल्याची घटना विक्रमी ठरली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने या विक्रमाची नोंद घेतली आहे.
****
भारतात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा केला.
मुंबईत राजभवनातही राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला. योग ही भारताची जगाला भेट असून या वारशाचं जतन करण्याची तसंच जगात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची सामुहिक जबाबदारी भारतीयांवर आहे, असं राज्यपाल म्हणाले. विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.
****
राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी, या चिकित्सापद्धतींचा अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांत, योग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत वरळी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या योगकेंद्रांमुळे रुग्णालयातले डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना नियमित योगाभ्यास करता येईल, त्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्र��� अतुल सावे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद इथं बालगृहातल्या बालकांसोबत योगाभ्यास केला. बालोन्नती फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह विविध सामाजिक संस्थासह, शालेय विद्यार्थी, युवक तसंच शहरातले नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते.
हिंगोली इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगाभ्यास करण्यात आला.
उस्मानाबाद इथं भाजप, पतंजली योग समिती तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग साधना केली.
जालना शहरातही जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आणि जेईएस महाविद्यालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी योगसत्रात सहभाग घेतला. योगाचा वारसा जतन करण्‍यासाठी योग दिन मोठया प्रमाणावर साजरा करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
बीड इथं जिल्हा न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या, तर चंपावती क्रीडा मंडळ इथं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिकं करण्यात आली.
अंबाजोगाई इथं खोलेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात योग शिबीर घेण्यात आलं. शालेय समितीचे अध्यक्ष डॉ अतुल देशपांडे यांनी या शिबीराच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना, आरोग्यसंपन्नतेसाठी सर्वांनी योगासनं आणि प्राणायाम करण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रीय कैडेट कोर- एन सी सी नं नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ११ लाखांपेक्षा जास्त कॅडेटनी यात सहभाग घेतला होता.
****
पुण्यात जी - 20 च्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास विभाग तसंच राज्यातली सर्व विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्यानं, गुरूपौर्णिमाचं औचित्य साधून, येत्या तीन ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात तीन लाख ५० हजार शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी, विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचं अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये, तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.
****
आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी विविध साधु संताच्या पालख्यांचं पंढरपूर आणि परिसरात आगमन होणार आहे. २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. तर चार जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विविध सेवा सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला भाविकांसाठी जवळपास तीन हजार ठिकाणी स्नानगृहं उभारण्यात आली असून, साडे आठ हजार ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर्स आणि त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. औषधोपचार केंद्र, गॅस वितरण व्यवस्था, तसंच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
****
गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी २२६ कोटी ९८ लाख, बीड १९५ कोटी तीन लाख, जालना १३४ कोटी २२ लाख, उस्मानाबाद १३७ कोटी सात लाख, तर परभणी जिल्ह्यासाठी ७० कोटी ३७ लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे.
****
मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीने काल मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत तब्बल १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केलेली नसल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा, तर रश्मी आणि तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरवण्यात येत आहे.  वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आलेले नाहीत, असं ��ाबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्र���ादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याचं परखड मत, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्ष झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पक्षात बरेचजण मंत्री झाले, पण दुसऱ्यांना निवडून आणू शकत नाहीत, मुंबईत पक्षाची ताकद कमी आहे, त्यामुळे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा, प्रयत्न केला जात असून, त्यामागचा सूत्रधार शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचार होत आहेत, ते थांबले पाहिजेत. आपली पोलिस यंत्रणा चांगली आहे, मात्र राज्यसरकार कमी पडत असून, अशा प्रकारांमुळे राज्याची प्रतिमा बिघडते आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
****
नद्यांना अमृत वाहिनी केल्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते काल गडचिरोली इथं ‘चला जाणुया नदीला’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. वाढतं अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे नद्यांचं आरोग्य बिघडत चाललं असून, ते रोखण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, असं ते म्हणाले. ‘चला ज���णुया नदीला’ हा उपक्रम राबवण्यासाठी प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचं कौतुक केलं.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातल्या पीक पेरणीचं नियोजन करताना मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय धूळ पेरणी तसंच सर्वसामान्य पेरणी करू नये, लवकर उगवणाऱ्या तसंच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी, पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाण्यांचा वापर करावा, आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, जमिनीतील ओलाव्याचं संवर्धन करण्यासाठी आच्छादन मल्चिंग सारख्या तंत्राचा वापर करावा, आदी सूचनाही कृषी आयुक्तांनी केल्या आहेत.
****
एक सप्टेंबर पासून जर विलगीकृत कचरा नाही आणला तर पगार केला जाणार नाही, असा इशारा, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचा चमू इंदूरला दोन दिवसीय कचरा व्यवस्थापन अभ्यास दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याबाबत आयुक्तांनी माहिती घेतली. आपलं शहर इंदूरसारखं किंवा इंदूर पेक्षा जास्त स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल, तर शंभर टक्के कचरा विलगीकरणाशिवाय पर्याय नाही, असं आयुक्तांनी नमूद केलं. प्रत्येकाने विचार करून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
विविध कंपन्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे चोरीच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना काल औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केली. शेख इरफान, वसीम शेख, शेख कानित, अब्बास शेख, अमोर करपे, आणि कृष्णा करपे, अशी यांची नावं असून, शहरातल्या एका हॉटेलमधून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून विविध २० कंपन्यांच्या बँक खात्याची तसंच इंटरनेट बँकिंगची माहिती असलेली कागदपत्रं हस्तगत करण्यात आली. हे सर्वजण सुमारे ११० कोटी रुपये चोरून या रकमेचं क्रिप्टो करन्सीत रुपांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं, पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
नांदेड इथं येत्या रविवारी शासन आपल्या दारी हे अभियान राबवलं जाणार आहे. या भव्य उपक्रमाच्या तयारीचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी या संदर्भात आढावा बैठकही घेतली. दरम्यान, शंखी गोगलगाय निर्मुलनासह अन्य मार्गदर्शनासाठी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या कृषी रथाला सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार - शून्य असा विजय मिळवला. सुनिल छेत्री यानं तीन तर उदांता सिंग यानं एक गोल केला. या स्पर्धेत भारताचा पुढता सामना २४ तारखेला नेपाळ विरुद्ध होणार आहे.
****
भारतानं २३ वर्षांखालील महिलांच्या इमर्जिंग आशिया करंडक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हाँगकाँग इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं बांग्लादेशचा ३१ धावांनी पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
जागतिक योग दिवस उत्साहात साजरा; संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगाभ्यास.
राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करणार -वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा.
आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू.
आणि
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
****
जागतिक योगदिवस आज साजरा होत आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित योगसत्रात सहभागी होत आहेत. मुख्यालयाच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून या योगसत्राला प्रारंभ होत आहे.
देशात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमत्त संयुक्त राष्ट्र संघामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, ही गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत विधान भवनात योगाभ्यासादरम्यान ते बोलत होते. योग दिनानिमित्त संपूर्ण राज्यात ३५ लाख लोकांना एकाच वेळेस योगाभ्यास करण्याचं नियोजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
योग ही भारताची जगाला भेट असून या वारशाचं जतन करण्याची तसंच जगात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची सामुहिक जबाबदारी भारतीयांवर आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज मुंबईत राजभवन इथं झालेल्या योगसत्रात ते बोलत होते. भावी पिढ्यांना योग शिकवण्यासाठी भारतानं जगाला उत्कृष्ट योग प्रशिक्षक द्यावेत असं आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केलं. तणावमुक्तीसाठी आणि जीवनशैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग उपयुक्त ��िद्ध होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी चिकित्सापद्धतीचा अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत वरळी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या योगकेंद्रांमुळे रुग्णालयातील डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना नियमित योगाभ्यास करता येईल, त्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.
****
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार इथं योगाभ्यास केला.
सोलापूरात डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं उद्घाटन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातही आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्हा आरोग्य प्रशिक्षण पथकाकडून योग दिन साजरा करण्यात आला. गडचिरोलीच्या एटापली तालुक्याच्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल भागात योगदिवस साजरा झाला.
अकोल्यातील वसंत देसाई जल तरणतलावात जय श्री राम समूहाने पाण्यावर योगाभ्यास केला.
****
औरंगाबाद इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे या कार्यक्रमात सहभागी झाले.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद इथं बालगृहातल्या बालकांसोबत योगाभ्यास केला. बालोन्नती फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह विविध सामाजिक संस्थासह, शालेय विद्यार्थी, युवक तसंच शहरातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
हिंगोली इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा करण्यात आला. नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगाभ्यास करण्यात आला.
उस्मानाबाद इथं भाजप, पतंजली योग समिती तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग साधना केली.
जालना शहरासह जिल्ह्यातही जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आणि जेईएस महाविद्यालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी योगसत्रात सहभाग घेतला. योगाचा वारसा जतन करण्‍यासाठी योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.गौतम कांबळे यांनी यावेळी बोलताना, सदृढ आरोग्यासाठी योग हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय कैडेट कोर- एनसीसीनं आज ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ११ लाखांपेक्षा जास्त कॅडेटनी यात सहभाग घेतला. एनसीसी चे महानिदेशक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात योग आणि वसुधैव कुटुम्बकम साठी योगाभ्यासाचं महत्त्व सांगत योग अंगीकारण्याचं आवाहन केलं.
****
पुण्यात जी - 20च्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांस पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.
****
आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी विविध साधु संताच्या पालख्यांचे पंढरपूर आणि परिसरात आगमन होणार आहे. २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. तर चार जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विविध सेवा सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिला भाविकांसाठी जवळपास तीन हजार ठिकाणी स्नानगृहं उभारण्यात आली असून साडे आठ हजार ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर्स आणि त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. औषधोपचार केंद्र, गॅस वितरण व्यवस्था, तसंच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
****
गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी २२६ कोटी ९८ लाख, बीड १९५ कोटी ३ लाख, जालना १३४ कोटी २२ लाख, उस्मानाबाद १३७ कोटी ७ लाख, तर परभणी जिल्ह्यासाठी ७० कोटी ३७ लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे.
****
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन नांदेडचे सहायक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं काल दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेच्या शिफारशी जारी केल्या. अलीकडच्या दशकात सरकारने व्यवसाय सुलभ करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. ट्राय ने २०२१ मध्ये दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेवर एक मार्गदर्शक पत्रिका तयार केली होती. यात वापरकर्ता-अनुकूल, पारदर्शक आणि प्रतिसादात्मक डिजिटल एक खिडकी आधारित पोर्टल सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे पोर्टल आंतर-विभागीय ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्याकरता नवीन डिजिटल तंत्रज्ञानासह सक्षम केलं जाईल, असं म्हटलं आहे.
****
भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली त्यांची भूमिका यावर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. "अधिकारांचे भविष्य घडवणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य" ही यंदाची पत्रकार स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ७२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सात हजात ६९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार १७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के आहे.
****
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलट गणतीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगानं योग दिनाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार विभागानं काल “योग महोत्‍सव” आयोजित केला होता. आंतराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या ५० दिवस आधी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाटक, पथनाट्य अशा माध्यमातून योगासनाचं सादरीकरण करण्यात आलं. सोलापूर, पालघर याठिकाणीही केंद्रीय संचार विभागानं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
****
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगानं काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेतली. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत देशातल्या सगळ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला क्रमांक मिळावा, या उद्दिष्टानं ही बैठक घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये नदी आणि नाल्यांची स्वच्छता, कचरा प्रक्रिया केंद्राचं व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा मुक्त शहर, सांडपाणी व्यवस्थापन, हेल्पलाईन, दंड आकारणी, सार्वजनिक शौचालयं, या मानकांवर गुण दिले जातील, अशी माहिती स्वच्छ भारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आस्थापना कर लागू केल्यास शहरातले सगळे व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे. या करासंदर्भातला व्यापाऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री, सहकारमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पारधी समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशीव इथं काल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. धाराशीवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार हे शिबिर घेण्यात आलं. पारधी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि इतर कागदपत्रं अद्ययावतत करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
kokannow · 2 years
Text
नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल, नडगिवे येथे जागतिक योग दिन उत्साहात
नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल, नडगिवे येथे जागतिक योग दिन उत्साहात
सिंधुदुर्ग: नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल, नडगिवे येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे येथे जागतिक योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मौन ध्यान, प्राणायाम, विलोम अनुलोम, भ्रामरी यासारखी आसने विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर कु. नील लोकरे कु. झोया पटेल, कु. महविष मुल्ला यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर साजरा, योगानं जगाला आरोग्याची नवी दिशा आणि मानवाला निरोगी बनवण्याचा विश्वास दिल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना
·      राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत हंडोरे पराभूत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
·      भारतीय लष्करात अग्निवीरांची भरती करण्याबाबतची अधिसूचना जारी, ४० हजार सैनिकांची भरती होणार
·      शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३५४ रुग्ण, मराठवाड्यात २० बाधित
·      औरंगाबाद जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये भरतीपूर्व सर्व रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक
·      संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखींचं टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान
आणि
·      सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या
 सविस्तर बातम्या
आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे. कर्नाटकात म्हैसुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगदिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, योग मानवतेसाठी असून, योगानं जगाला आरोग्याची नवी दिशा आणि मानवाला निरोगी बनवण्याचा विश्वास दिला असल्याचं नमूद केलं. योग केवळ लोकांसाठी नाही, तर जागतिक शांततेसाठी सहायक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
 Byte …
योग की ये अनादी यात्रा नंत भविष्य की दिशा मे ऐसे ही अनवरत चलती रहेगी. हम सर्वे भवन्तु सुखीन: सर्वे सन्तु निरामय: के भाव के साथ एक स्वस्थ और शांतीपूर्ण विश्व को योग के माध्यम से गती भी देंगे.
 केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह १५ हजार नागरीकांनी यावेळी योगाभ्यास केला.
मानवतेसाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. देशात प्रमुख ७५ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं अनेक केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर इथं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत, पुणे इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे, तर नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत योगाभ्यास कार्यक्रम घेण्यात आला.
 देशातल्या ७५ ��तिहास वारसा स्थळांवर देखील योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत  वेरुळ - अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी -का - मकबरा इथं पहाटे योगाभ्यास करण्यात आला. पर्यटन विभागाचे कर्मचारी, सैन्यदलातले कर्मचारी, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना- एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना- एनएसएसचे विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.
नांदेड इथं आज गुरूद्वारा सचखंड परिसरातल्या महाराजा रणजितसिंघ यात्री निवास मैदानावर योग शिबीर घेण्यात आलं. पतंजली योग समितीनं या शिबीराचं आयोजन केलं होतं. राज्यात अन्य सर्व जिल्ह्यातही योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं सहावीत शिकणाऱ्या हिंदवी चौरे हिनं राष्ट्रीय स्तरावरील योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ ते अकरा वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. योगविद्येत उस्मानाबादचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या हिंदवी चौरेच्या कार्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte …
हिंदवी चौरे हिनं वयाच्या पाचव्या वर्षापासून योगासनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आठव्या वर्षी तिने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरले. आज पर्यंत तिने २६ हजार नागरिकांना योगाचे चे धडे दिले आहेत. कर्नाटक राज्यातल्या मैसूर येथील विवेकानंद योगा शिक्षण आणि संशोधन संस्थेत आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ ते अकरा वर्षे वयोगटात हिंदवी चौरे हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स या स्पर्धेतही प्रथम क्रमांक तसंच जोडीदारासह योग प्रकारातही तिला सुवर्णपदक मिळालं आहे.
****
राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार अपेक्षेनुसार विजयी झाले. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. काँग्रेसचे जगताप आणि भाजपचे लाड वगळता अन्य सर्व उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी झाले. १० जागांसाठी काल मुंबईत विधानभवनात २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी दोन मते अवैध ठरली. महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची कालच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली.
दरम्यान, भाजप आमदार जगताप आणि टिळक यांनी मतदानासाठी सहाय्यकांची मदत घेतल्यानं निवडणूक नियमांचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसनं केली होती. काँग्रेसच्या आक्षेपांवर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली होती.
****
भारतीय लष्करात अग्निवीरांची भरती करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. भरतीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी जॉईन इंडियन आर्मी ॲट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. निवड झालेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी साडे ३६ हजार रुपये पगार आणि भत्ते तर चौथ्या वर्षी ४० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सुमारे १२ लाख रुपये सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि दहावी उत्तीर्ण अग्निवीरांना इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. याशिवाय अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्याही मिळणार आहेत.
****
शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी या घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात येणार आहेत. या सर्व उमेदवारांना यापुढे टीईटी ला बसण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल तब्बल आठ महिन्यांनी लावला होता. या कालावधीतच परीक्षा परिषदेतले अधिकारी- कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे संचालक यांच्यात मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या. आणि निकालात मोठे फेरफार करुन अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३५४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ३८ हजार १०३ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८८८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल एक हजार ४८५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ६५ हजार ६०२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ६१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या १३, औरंगाबाद पाच आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं काल झालेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणावर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यावेळी म्हणाले.
****
यंदाच्या आषाढी वारीसाठी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने काल टाळ मृदुंगाच्या गजरात देहू गावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होईल. या निमित्तानं हजारोच्या संख्येनं वारकरी तसंच शेकडो दिंड्या आळंदी परिसरात दाखल झाल्या आहेत.
पैठण इथल्या संत श्री एकनाथ महाराजांच्या पालखीचंही काल पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. भानुदास एकनाथच्या जयघोषानं यावेळी पैठण नगरी दुमदुमून गेली.
****
वीज महावितरण कंपनीने राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केली असून, आणखी दोन हजार ३७५ चार्जिंग स्टेशन प्रस्तावित केली आहेत. सध्या सुरू केलेल्या चार्जिंग स्टेशनमध्ये ठाणे तसंच पुण्यात प्रत्येकी पाच, नवी मुंबई दोन, आणि नागपूर इथल्या एका स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामं प्रगतीपथावर आहेत. यामध्ये औरंगाबाद इथल्या दोन स्टेशनसह नवी मुंबई दहा, ठाणे सहा, पुणे १७, नागपूर सहा, तर नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, तसंच अमरावती इथल्या दोन चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. २०२५ पर्यंत बृहन्मुंबईत दीड हजार, पुणे ५००, नागपुर १५०, नाशिक १००, तर औरंगाबाद इथं ७५ चार्जिंग स्टेशन्स सुरू होणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे मार्ग पूर्णत: इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार असल्याचं, महावितरण कडून सांगण्यात आलं. चार्जिंग स्टेशनची माहिती देण्यासाठी महावितरणने पॉवरअप ईव्ही हे मोबाईल ॲपही विकसित केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या दिव्यांग व्यक्तींना येत्या स्वातंत्र्य दिनापूर्वी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र -यु डी आय डी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात सात हजार ५०० दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी ७५ शिबीराद्वारे विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
****
सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथं काल एकाच घरातल्या नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. डॉ. माणिक वनमोरे यांच्या घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले. पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत काही नावं आणि आकडेवारी आहे. गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्यानं या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
****
औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात काल काही भागात पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात एका तरुणाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. शिरोडी बुद्रूक शिवारात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण काकासाहेब साळुंके असं या तरुणाचं नाव असून, वामन रामराव साळुंके हे ज्येष्ठ नागरिक या घटनेत जखमी झाल्याचं, वृत्त आहे.
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड शहरात तसेच भोकर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर धान्य गैरव्यवहार प्रकरणातला आरोपी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल त्यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांचा जामिन अर्जही फेटाळून लावला.
****
जालना - शिर्डी- जालना ही विशेष अनारक्षित गाडी आता नगरसोल रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे. ही रेल्वे गाडी तिच्या निर्धारित वेळेत आठवड्यातून तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी जालना - श्रीसाईनगर शिर्डी - जालना अशी धावणार होती, मात्र ती आता जालना-नगरसोल-जालना अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्या एका तरुणाला औरंगाबाद इथं पोलिसांनी काल अटक केली. शेख इस्माईल असं या तरुणाचं नाव असून, त्याच्या ताब्यातून सुमारे एक लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
अग्नीपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्नीवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल - सी ए पी एफ आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयानं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. अग्नीवीरांना या दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा तीन वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट असेल, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
पर्यावरणीय दृष्ट्या जागरूक जीवनशैली ही लोकचळवळ झाली पाहिजे, असं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय आघाड्यांकडे जमिनीचा र्हास होत असल्याच्या मुद्दा मांडण्यात भारत आघाडीवर राहिला असल्याचं यादव यांनी नमूद केलं. भारत आणि जगभरातच सर्व पर्यावरणीय आणि आर्थिक चिंतेच्या मुद्यांमध्ये जमिनीची प्रमुख भूमिका समजून घेण्यासाठी व्यापक प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मंत्रालयातर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.
****
येत्या मंगळवारी २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा होत आहे. यंदाच्या योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात म्हैसुरू इथं योगाभ्यासाचं नेतृत्व करतील. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘मानवतेसाठी योग’ हा या वर्षीच्या योगदिनाचा विषय आहे. योगदिनाच्या अनुषंगाने सोनोवाल यांनी यावेळी मार्गदर्शिका जारी केली.
****
भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिली खासगी रेल्वेगाडी कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर काल धावली. या रेल्वेला ‘साऊथ स्टार’ असं नाव देण्यात आलं असून, दोन दिवसांच्या प्रवासानंतर सुमारे ८२० साईभक्तांना घेऊन शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. ही रेल्वे दर मंगळवारी कोईम्बतूर इथून निघून, गुरुवारी शिर्डीला पोहोचेल, तर शुक्रवारी शिर्डीतून निघून, रविवारी कोईम्बतूरला पोहचणार आहे. भारत गौरव योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेकडून भाडेतत्वावर गाड्या देण्यात आल्या आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषित होईल अशा प्रकारचे कोणतेही व्यवसाय आळंदी आणि नजीकच्या परिसरात सुरु ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. नदी आणि नदीकाठच्या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी न करणं, पालखी सोहोळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांनी आणि भाविकांनी कोरोना लसीच्या पुरेशा मात्रा घेतल्याची खात्री करावी, कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार असल्यास आळंदीत येण्याचं टाळावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
दरम्यान, येत्या सोमवारी आणि मंगळवारी देहू आणि आळंदीतून निघणाऱ्या आषाढी पायी वारीच्या ड्रोन द्वारे होणाऱ्या चित्रीकरणावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं बंदी घातली आहे. अचानक येणाऱ्या ड्रोनमुळे भविकांमध्ये अफवा पसरुन गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
****
मनमाड रेल्वे स्थानकावरुन सुटणारी मनमाड - सिकंदरा��ाद अजंठा एक्स्प्रेस, श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरुन सुटणारी श्रीसाईनगर शिर्डी - सिकंदराबाद एक्स्प्रेस आणि पाटणा रेल्वे स्थानकावरुन सुटणारी पाटणा - पूर्णा एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
दक्षिण कोरिया इथं सुरू असलेल्या आशिया ओसियन पॅरा भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या अशोक मलिकनं सुवर्णपदक पटकावलं. तीन लिफ्टमध्ये एकूण ४९१ वजन उचलत अशोकनं ही कामगिरी केली.
****
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉयनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रणॉयनं डेन्मार्कच्या रासमस गेमके याचा २१ -१४, २१ - १२ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत आज त्याचा सामना चीनच्या झाओ जुग पेंग बरोबर होणार आहे.
****
४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे. यंदा प्रथमच ऑलिम्पिक खेळांच्या दर्जाची बुद्धिबळाची मशाल रॅली काढण्यात येणार आहे. येत्या २८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलीम्पियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० वर्षांनंतर आशियात आणि भारतात प्रथमच या स्पर्धाचं आयोजन करण्यात येत असून, १८९ देशांचे खेळाडू यात सहभाग घेणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला आणि देशाला सक्षम बनवू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आपल्या `मन की बात` कार्यक्रमामध्ये देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात कर्तव्य हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी असं त्यांनी म्हटलं. या महिन्याच्या पाच तारखेला देशातल्या युनिकॉर्नची संख्या शंभरवर पोहोचली असल्याचं तसंच याचं एकूण मूल्य ३३० अब्ज डॉलरपेक्षा म्हणजे पंचवीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त असल्याचं ते म्हणाले. देशात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांच्या उत्पादनांची माहिती गोळा करण्याचं आणि त्यांचा वापर करण्याचं तसंच त्याद्वारे `आत्मनिर्भर भारत मोहिमे`ला चालना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. `एक भारत, श्रेष्ठ भारत` या संकल्पने संदर्भात आदर्श असलेल्यांची उदाहरणं त्यांनी दिली. आता आपल्या देशात चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर यात्रा, जगन्नाथ यात्रा, अशा अनेक यात्रा होणार आहेत. आपण कुठंही गेलो तरी या तीर्थ क्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तिथली शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये, ते जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. आता काही दिवसांनी येणारा पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस तसंच २१ जून हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पर्यावरणाबाबत आपण सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणारं असलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी- “मानवतेसाठी योग” ही या योग दिवसाची संकल्पना आहे, असं त्यांनी सांगितलं. योग दिनाची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असं ते म्हणाले. कोरोनाविषयी काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. जपानमध्ये आपल्या परंपरांविषयी खूप माहिती आहे. त्यांचं आपल्या संस्कृतीबद्दलचं समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय असल्याचं मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवरुन सांगितलं. `मन की बात` या मालिकेचा हा एकोणनव्वदावा भाग होता.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ८१ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी २८ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ कोटी ४६ लाखांहून अधिक नागरिकांना पूरक मात्रा देण्यात आली आहे. दरम्यान, देशात काल नवीन २ हजार ८२८ बाधित रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या १७ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाचे सात नव्या रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं आज घरी पाठवण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सात पैकी सहा रुग्णांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या दोन्हीही मात्रा घेतलेल्या होत्या त्यामुळंच त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. सर्व सातही रुग्ण हे पुणे शहरातील असून ४ ते १८ मे या कालावधीत ते आढळून आले आहेत. यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार पुरुष आणि तीन महिला आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटंस आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम इथं रात्री आठ वाजता ह्या सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटंस हा संघ पहिल्यांदाच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर राजस्थान रॉयल्स संघानं २००८ च्या विजेतेपदा नंतर आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या स्पर्धेत आ���ापर्यंत एकूण ७३ सामने खेळवले गेले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०७ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
जागतिक आरोग्य दिन आज साजरा होत आहे. ‘आपली वसुंधरा आपले आरोग्य’ ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत योग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. योग आणि भारतीय चिकित्सा पद्धती जगात सर्वोत्तम असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी म्हणाले. आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या जनतेला आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धावपळीच्या युगात स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका, आपण आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली या त्रिसूत्रीचं पालन करू या, असं टोपे यांनी म्हटलं आहे.
****
देशाच्या खाद्यान्न अनुदान कार्यक्रमामुळे भारतात कोरोना काळात दारिद्र्य निर्मुलन व्हायला मदत झाली, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं भारताच्या खाद्यान्न कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. या संदर्भातला एक अहवाल काल जारी करण्यात आला. या अहवालात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचीही प्रशंसा केली आहे. या योजनेमुळे प्रत्येकाला खाद्यान्नाची शाश्वती मिळाली. खाद्यान्न कार्यक्रमामुळे दारिद्र्यं आठ शतांशच्या खाली राहिलं, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
****
थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमार, मोनिका, गोविंद साहनी आणि वरिंदर सिंग यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इतर गटांमध्ये भारताचे अमित पंघाल आणि भाग्यवती कचरी उपांत्य फेरीत पोचले आहे तर रोहित मोर याला उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागलं.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
0 notes
Photo
Tumblr media
जागतिक योग दिनानिमित्त कळमेश्वर येथे योग दिन उत्साहात साजरा #Yoga #WorldYogaDay #Nagpur #OrangeCity #Nagpurgramin #Vidarbha #कळमेश्वरब्राह्मणी #वऱ्हाड #saam #esakal #live #fb #sys #facebook #yinforchange #young #yin #younginspiratorsnetwork #quarantine #trending #viral #golive #stayhomestaysafe #motivation #motivatinaltalk #youthgathering #youth #inspire #network #delivery (at Nagpurian Orange City - NOC) https://www.instagram.com/p/CQaUgcuD1To/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात ३० वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविड साथीशी लढताना योग हा एक आशेचा किरण  - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** जगातल्या अनेक भाषांमध्ये योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ असलेले एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा  
** इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत- मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका
** मराठा समाज आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाच नाशिक शहरात दुसरं मौन आंदोलन
आणि
** औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज प्रत्येकी तीन कोविड बाधितांचा मृत्यू, बीड जिल्ह्यात १२४ नवे बाधित
****
सगळं जग कोविड साथीशी लढत असताना योग हा एक आशेचा किरण राहिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जनतेला संबोधित करत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेली दोन वर्षे योगदिनाचे मोठे समारंभ आयोजित केले गेले नसले, तरी योगाबाबतचा उत्साह कमी झालेला नाही, कोविड १९शी आपण लढू शकतो, हा विश्वास योगानं दिला असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी कुणीही मानसिक दृष्ट्या तयार नसतांना योग हे आत्मविश्वासाचं माध्यम ठरलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यामधे योग प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहक भूमिका यापुढंही बजावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी यावेळी एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा केली. या ॲपमधे जगातल्या अनेक भाषांमध्ये योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ उपलब्‍ध असून, त्याद्वारे भारताचा ‘एक विश्‍व- एक आरोग्य’ हा विचार पुढं नेता येईल, असं मोदी म्हणाले.
****
औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या मुख्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबीर घेण्यात आलं. सकाळी ७ ते ८ या वेळेत पतंजली योग समितीच्या सदस्यांनी  उपस्थितांना योगा बद्दल प्रशिक्षण दिलं.
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं योग शिबीर घेण्यात आलं. जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही आज योग दिनाचे विविध कार्यक्रम पार पडले.  
****
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडली असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसंच बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागपूर इथं आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, तसंच संघटना यांची चिंतन बैठक आयोजित करण्यात येणार असून या बैठकीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नाला कुठलाही पक्षीय रंग न देता तोडगा काढण्यात येईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला कोणताच धोका नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासह अन्य मागण्यांसाठी आज सकल मराठा समाजानं नाशिक शहरात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली दुसरं मौन आंदोलन केलं. सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विलोकन याचिकेसह अन्य मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे, मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीतील मागण्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत असं संभाजी राजे म्हणाले. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मराठा समाजाचं आरक्षण अडचणीत आलं, तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षणही संपलं, त्यामुळे आता न्यायालयीन लढ्यासाठी केंद्र शासनानं, स्पष्ट भूमिका घेऊन साथ दिली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. मराठा आरक्षणासाठी विधी मंडळाच्या अधिवेशनात आपलं पूर्ण सहकार्य राहील असं विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. तर राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार लवकरच दिलासा देईल असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
दरम्यान, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णया विरोधात उद्या औरंगाबाद इथं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. ज्यांच्यासाठी हे आंदोलन आहे असे आजी माजी ओबीसी सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन या परिषदेनं केलं आहे.
****
आज जागतिक संगीत दिवस. जगभरातल्या १२० देशांमध्य��� आज हा दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम फ्रान्स मध्ये १९८२ मध्ये संगीत दिन साजरा करण्यात आला होता. रस्त्या रस्त्यांवर तसंच उद्यानांसारख्या खुल्या जागांवर नि:शुल्क संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन हा यामागचा मुख्य उद्देश होता. जगभरातल्या संगीत प्रेमींसाठी हा एक विशेष दिवस असून संगीतकार, गीतकार, आणि गायकांना सन्मानित करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.
****
मुंबईचा कोरोना विषाणू संसर्गाचा बाधित रुग्णदर ३ पूर्णांक ७९ टक्के तर ऑक्सिजन खाटा व्याप्तीचा दर २३ पूर्णांक ५६ टक्के इतका आहे. या निकषानुसार मुंबई सध्या पहिल्या गटात आहे. मात्र मुंबईतलं लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण, भौगोलिक रचना, उपनगरातून मुंबईत लोकलनं दाटीवाटीनं प्रवास करुन दररोज मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि कृती दलानं वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता या कारणांमुळे मुंबईत  येत्या २७ जूनपर्यंत तिसऱ्या गटातील निर्बंध लागू राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं परिपत्रकाद्वारे आज ही माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड संसर्गानं आतापर्यंत तीन हजार ३९० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजार ४७६ झाली असून एक लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातही आज दिवसभरात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार १३७ झाली आहे.  आज दिवसभरात जालन्यात २४ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ३५ इतकी झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ६११ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २८७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १२४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये आष्टी २४, बीड २०, पाटोदा १८, केज १४, शिरुर १३, गेवराई १०, अंबाजोगाई आणि वडवणी प्रत्येकी सात, धारुर सहा, माजलगाव चार आणि परळी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
इतर मागासवर्गीय- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांच्यावतीनं आज परभणीत वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भवनासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलनकर्त्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन पाठवलं.
****
मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांविषयी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओमप्रकाश वर्मा यांच्या विविध मागण्यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. परभणी - मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम कालबद्ध पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं, मुदखेड ते मनमाड विद्युतीकरणासह दुहेरीकरण, रोटेगाव ते कोपरगाव हा २२ किलोमीटर रेल्वे मार्ग, औरंगाबाद - चाळीसगाव ८८ किमीच्या रेल्वे मार्गास मंजुरी द्यावी यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*********
0 notes