Tumgik
#नम्रता मल्ल योग करत आहे
loksutra · 2 years
Text
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
योगा करताना नम्रता मल्ला पहा व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022: आज संपूर्ण देश 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहे. अशा परिस्थितीत नम्रता मल्लाने योगा करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** निर्भया लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींचं डेथ वॉरंट जारी; येत्या २२ जानेवारीला फाशी ** कामगार संघटनांची आज भारत बंदची हाक; संपात सहभागी झाल्यास सरकारचा शिस्तभंग कारवाईचा इशारा ** राज्य विधीमंडळाचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन ** परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि ** नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; लातूरचा शैलेश शेळके उपविजेता **** नवी दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या चारही दोषींना येत्या २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी काल या चौघांचं डेथ वॉरंट जारी केलं. या चौघांना दिल्लीतल्या तिहार तुरुंगात २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फासावर चढवण्यात येईल. १२ डिसेंबर २०१२ च्या रात्री सहा जणांनी धावत्या बसमध्ये निर्भयावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला विकृतपणे गंभीर जखमी करून बसमधून फेकून दिलं होतं, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. सहा दोषींपैकी एकानं तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर एक अल्पवयीन आरोपी सुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा पूर्ण करून बाहेर पडला आहे. **** देशभरातल्या कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. कामगार कायदे, निवृत्तीवेतन योजनेसह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या बंदला डावे पक्ष आणि संघटना, काँग्रेस, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दर्शवला असून, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ मात्र या संपात सहभागी होणार नाही. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, जुनी पेन्शन योजना, महागाई भत्त्याची थकबाकी, पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारल्याचं, सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितलं. आजच्या संपात औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, बँक संघटना, हमाल कष्टकरी आणि माथाडी कामगार, सहभागी होत आहेत. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य शासनानं दिला आहे. संपात सहभागी होऊ नये, अशा सूचनेचं पत्र सरकारनं जारी केलेलं आहे. **** राज्य विधीमंडळाचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. नवीन वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. **** कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय लक्षात घेत, आतापर्यंतच्या नियुक्त्या प्रकरण परत्वे रद्द करण्याच्या निर्णयालाही, मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली **** उद्योगांना येणाऱ्या अडचणींचं जलद निराकरण करून, राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी, हे आश्वासन दिलं. शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी, उद्योजकांनी योगदान द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. **** राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळ तत्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आह���त. मुंबईत काल तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन, त्यांचा आर्थिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणला जाईल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. **** आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते, ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. निरामय, पब्लिक ओपिनियन आणि योग पोवाडा, या कार्यक्रमांच्या प्रवेशिका औरंगाबाद केंद्रानं यासाठी सादर केल्या होत्या. सहायक निदेशक तथा कार्यक्रम प्रमुख जयंत कागलकर यांच्या मार्गदर्शनात, कार्यक्रम अधिकारी जावेद खान, उन्मेष वाळिंबे आणि नम्रता फलके यांनी हे कार्यक्रम तयार केले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवलं आहे. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला विटेकर यांची अध्यक्षपदी तर अजय चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळं ही निवड बिनविरोध झाली. **** नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. या स्पर्धेच्या काल पुण्यात झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धननं लातूरचा मल्ल शैलेश शेळकेचा तीन – दोन अशा गुण फरकानं पराभव केला. अटीतटीच्या या लढतीत हर्षवर्धननं शेवटच्या २० सेकंदात तिहेरी पट काढून दोन गुण घेऊन हा विजय मिळवला. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा तर शैलेशला ढाल प्रदान करण्यात आली. हर्षवर्धनचं मूळ गाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभाळणे इथं विजयोत्सव साजरा करण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघ अव्वल ठरला आहे. काल अहमदनगर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत, मात्र स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॅटमिंटन पटूचा पुरस्कार महाराष्ट्राच्या रोहन थुल यानं पटकावला. दिल्लीचा शौर्य सिंग मुलांच्या स्पर्धेत तर दिल्लीच्या डीएव्ही कॉलेजची लिखिता श्रीवास्तव मुलींच्या स्पर्धेत अजिंक्य राहिली. **** भारत श्रीलंका टी ट्वेंटी मालिकेत कालच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं १४४ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं अठराव्या षटकातच पूर्ण केलं. अठरा धावांत दोन गडी बाद करणारा नवदीप सैनी सामनावीर ठरला. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तिसरा सामना परवा शुक्रवारी पुण्यात खेळवला जाणार आहे. **** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काल उस्मानाबाद इथं राज्यस्तरीय भित्तीचित्रण स्पर्धा घेण्यात आली. राज्यभरातले कलाकार शहरातल्या भिंतींवर रेखाचित्र, अक्षरचित्र, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती यांसह संतांचे मौलिक विचार रेखाटत आहेत. या स्पर्धेतल्या विजेत्यांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावरून गौरवण्यात येणार आहे. **** स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत जालना नगरपालिकेच्यावतीनं, प्लास्टिक कचरा संकलन आणि जप्ती मोहीम राबवली जात आहे. सेवाभावी संस्थांसह, शालेय विद्यार्थ्यांनी काल या मोहिमेत सहभाग घेवून प्लास्टिक कचरा गोळा केला. नगरपालिकेच्या पथकानं फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांकडून काल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. **** नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी, भाजपचे नगरसेवक दिपकसिंह रावत यांची काल निवड करण्यात आली. नांदेड महापालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. एकुण ८१ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात काँग्रेसचे ७३, भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक नगसेवक आहे. **** जालना जिल्ह्यात कालपासून महारेशीम अभियानास सुरुवात झाली. उप जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी या अभियानाच्या प्रचार रथास हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. जिल्ह्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशमी शेतीकडे वळावं, यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. **** हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या गणेशपूर इथं काल विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मंडप डेकोरेशनचं काम करत असताना मंडप जोडणीसाठी लावलेल्या सीडी मध्ये विदुयत प्रवाह उतरल्यानं ही दुर्घटना घडली. **** जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचं बचत आणि कर्जखातं अद्याप आधारक्रमांकांशी संलग्न नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारक्रमांकांशी संलग्न करुन घेण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे. **** राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच शांतीलाल मुथा फांऊडेशनच्या वतीनं औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मूल्यवर्धन मेळावा घेण्यात आला. या अनुषंगानं शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या साडेचार हजार चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. उद्या या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. **** परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथं काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थन फेरी काढण्यात आली. शहरातले नागरिक तसंच व्यापारी या समर्थन फेरीत सहभागी झाले. या कायद्याचं समर्थन करण्याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. **** हिंगोली इथं हळद प्रक्रिया आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावं अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी वाणिज्य समितीचे अध्यक्ष विजय साई यांच्याकडे केली आहे. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं काल झालेल्या संसदीय वाणिज्य समितीच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. ****
0 notes