Tumgik
#आदरांजली
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune :वैज्ञानिक दृष्टिकोन हा डॉ. अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार;आदरांजली सभेत आठवणींना उजाळा
एमपीसी न्यूज – डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्याआधारे किती नावीन्यपूर्ण, समरसून, सर्जनशीलपणे जगता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अभ्यंकर होते, अशा शब्दात डॉ. अभ्यंकर यांना आदरांजली वाहण्यात आली. विज्ञानवादी लेखक, लोकविज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वय 60) यांचे गुरुवारी (ता. 15) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.…
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Tumblr media
Veer Savarkar Jayanti 2024 Wishes: From Bandya Mama
विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली!
0 notes
pradip-madgaonkar · 4 months
Text
Tumblr media
Veer Savarkar Jayanti 2024 Wishes: From Pradip Madgaonkar
विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून द्या विनम्र आदरांजली!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैन्यातील जवानांना भावपूर्ण आदरांजली!
0 notes
mahavoicenews · 7 months
Text
प्रमुख मराठी लोगो: सांस्कृतिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक
प्रमुख मराठी लोगो हे एक प्रतिष्ठित चिन्ह आहे जे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मराठी भाषिक समुदायाची भाषिक ओळख दर्शवते. क्लिष्ट तपशील आणि दोलायमान रंगांसह डिझाइन केलेला, हा लोगो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता, इतिहास आणि परंपरा यांचे सार दर्शवतो.
प्रमुख मराठी लोगोमध्ये मराठी संस्कृतीत महत्त्व असणारे अनेक घटक आहेत. तिच्या केंद्रस्थानी देवनागरी लिपी आहे, जी मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. मराठी साहित्य आणि कवितेची अभिजातता आणि सुसंस्कृतपणा प्रतिबिंबित करणारी स्क्रिप्ट सुंदर शैलीत आहे.
देवनागरी लिपीभोवती पारंपारिक मराठी आकृतिबंध आणि चिन्हे आहेत, जसे की कमळाचे फूल, आंब्याची पाने आणि मोराची पिसे. ही चिन्हे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत आणि समृद्धी, शुभ आणि सौंदर्य यासह विविध अर्थ धारण करतात.
प्रमुख मराठी लोगोचे रंग पॅलेट अभिमान, उत्कटता आणि एकतेच्या भावना जागृत करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहे. भगवा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या दोलायमान छटा अनुक्रमे धैर्य, वाढ आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जातात, तसेच भारतीय राष्ट्रध्वजाला आदरांजली वाहतात.
प्रमुख मराठी लोगो केवळ दृश्य प्रतिनिधित्वापेक्षा अधिक काम करतो; हे सांस्कृतिक अस्मितेचे आणि मराठी भाषिक समुदायासाठी अभिमानाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे मराठी लोकांच्या लवचिकता, सर्जनशीलता आणि लवचिकतेला मूर्त रूप देते, ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिदृश्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
लोगो सरकारी कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध संदर्भांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केला जातो. तिची उपस्थिती मराठी भाषा, साहित्य, कला आणि परंपरांना साजरी आणि प्रोत्साहन देते, जगभरातील मराठी भाषिकांमध्ये आपुलकी आणि एकतेची भावना वाढवते.
शिवाय, प्रमुख मराठी लोगो वेगाने बदलणाऱ्या जगात भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे व्यक्तींना त्यांच्या मुळांचा अभिमान बाळगण्यासाठी, त्यांचा वारसा स्वीकारण्यासाठी आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रोत्साहित करते.
शेवटी, प्रमुख मराठी लोगो हे केवळ प्रतीकापेक्षा बरेच काही आहे; हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्रीचा आणि तेथील लोकांच्या चिरस्थायी भावनेचा पुरावा आहे. हा प्रतिष्ठित लोगो स्वीकारून आणि त्याचा उत्सव साजरा करून, मराठी भाषिक समुदाय पुढील पिढ्यांसाठी आपली खास ओळख आणि वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
अधिक माहितीसाठी:-
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
raje7777777 · 9 months
Text
Tumblr media
लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, समन्वयवादी वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाला स्मृति दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#laalbahadurshastri ...
1 note · View note
Text
नारीशक्तीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली !
https://bharatlive.news/?p=86278 नारीशक्तीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली ...
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
गंगाबाई रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात
गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात मंगळवार, 11 एप्रिल 23 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस बाई गंगाबाई महिला  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी पुष्पहार घालून आदरांजली अर्पित केली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, उपेक्षितांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years
Photo
Tumblr media
कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेला संवेदनशील कल्पकतेची जोड लाभली होती. त्या प्रतिभेचा साज ल्यालेल्या अनमोल कविता साहित्यप्रेमींच्या हृदयाचा नेहमीच ठाव घेत राहतील. मराठी साहित्याचा मानबिंदू, साहित्यिकांचे प्रेरणास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र आदरांजली.
1 note · View note
kokannow · 2 years
Text
सावरकरांचे जाती निर्मूलनाचे काम निखळ व क्रांतिकारक.डॉ मिलिंद कुलकर्णी.
सावरकरांचे जाती निर्मूलनाचे काम निखळ व क्रांतिकारक.डॉ मिलिंद कुलकर्णी.
सहशिक्षण, सहपूजन, सहभोजन ही त्यांची त्रिसूत्री. प्रथम सहभोजनाच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने अनादि मी अनंत मी मंचाची आदरांजली. कणकवली : सावरकर ही धगधगीत वीज. प्रचंड विरोध पत्करून जातीभेदाच्या उच्चाटनासाठी क्रांतिकारक प्रयत्न त्यांनी केले असे प्रतिपादन डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी रत्नागिरी येथे 16 नोव्हेंबर 1930 ला झालेल्या पहिल्या सहभोजनाच्या 92 व्या वर्धापनदिनी अनादि मी अनंत मी , सिंधुदुर्ग या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mmulnivasi · 2 years
Photo
Tumblr media
*बामसेफ के संस्थापक सदस्य यशकायी डी. के. खापर्डे साहब की पत्नी इंदुमती खापर्डे जी का आज दु:खद निधन हुआ..* *भावपूर्ण आदरांजली* 💐💐💐🙏🙏🙏 https://www.instagram.com/p/CktBCK4MM9a/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैन्यातील जवानांना भावपूर्ण आदरांजली!
0 notes
nashikfast · 2 years
Text
भारताची सीमा वाढवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी...
भारताची सीमा वाढवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी…
 इंदीरा गांधी ! भारताच्या कणखर पंतप्रधांपैकी एक असणाऱ्या पंतप्रधान. लाल बहादूर शास्त्री यांचा तास्कंद शहरात संशयास्पद मृत्यू झाल्यावर,  भारताच्या कायम पंतप्रधानपदी आलेल्या तिसऱ्या व्यक्ती म्हणजे इंदीरा गांधी . येत्या सोमवारी त्यांची ३८ वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. इंदीरा गांधीच्या कर्तृत्वाबाबत बोलताना कायम बांगलादेशाचे उदाहरण दिले जाते.मात्र पाकिस्तानचे दोन तूकडे करण्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
raje7777777 · 2 years
Text
लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, समन्वयवादी वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाला स्मृति दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#laalbahadurshastri ... @nasa
Tumblr media
1 note · View note
shepheredsblog · 3 years
Photo
Tumblr media
#अमर_शहीद #भगतसिंह_सुखदेव_राजगुरु के बलिदान को #शेफर्ड_फैमिली_ट्रस्ट की और से #आदरांजली https://www.instagram.com/p/Cbbh-smou0L/?utm_medium=tumblr
0 notes