Tumgik
#करणाऱ्यांवर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात पुण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उदयन राजे यांनी कारवाईची मागणी केली. Udayanraje Bhosale : छत्रपती…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
रावणाचे दहन करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
रावणाचे दहन करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
देशात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा असल्याने अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी देखील होतात. शेकडो फुटाचे रावण साकारून रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे. दसऱ्याची वाट पाहत या कार्यक्रमासाठी मोठ्या पद्धतीचे नियोजन देखील करण्यात येते मात्र रावण दहन प्रकरणावर आदिवासी संघटनेने आक्षेप नोंदवला असून रावण दहन करण्यास विरोध दर्शवला आहे. रावणाचे दहन न करता पूजा करावी अशी मागणी संघटनांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता    
स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
मुंबईतल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना अटक
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के-नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप-२९ पदकांसह भारत पदकतालिकेत १६ व्या स्थानी
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं चार हजार २०० कोटी रुपये अनुदान येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या दहा जिल्ह्यात सुमारे आठ लाख ४८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कापूस, सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून, त्यासाठीच मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबीयांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले...
‘‘नई जो शिक्षा नीती लेकर आए हैं प्राथमिक शिक्षा मातृभाषा मे कंप्लसरी करने का काम हमने किया है. मै आप सभी से अपील करना चाहता हूं, निवेदन करना चाहता हूं कि घर मे कम से कम अपनी भाषा मे बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाएंगे.’’
दरम्यान, गृहमंत्री शाह आज लालबागचा राजा, त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.
****
वारकरी पंथाचं आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या रकमेपैकी ३० लाख रुपये हवाला मार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री, क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के झाला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून, विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरीकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती.
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं.
****
श्रोते हो, विविध देशात कशारितीने गणेशोत्��व साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत, तिथे राहणार्या, मीनल रेणावीकर,
‘‘श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं. इथल्यां कारुगराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल पथकांच्या सहाय्याने ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, कोलंबो, येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येनी उपस्थित होतेच, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरीकही उपस्थित होते.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनाने पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष ॲण्ड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. २०२८ च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे ४० दशलक्ष घनमीटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांचं यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाषय झालं. सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.
****
0 notes
Video
youtube
सिन्नर पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ..
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
mdhulap · 1 year
Link
एसटीच्या बसस्थानकांवर जादा दराने चहा नाश्ता नाथजल ची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार ! 'Nath Jal', tea and snacks - ST bus stands!
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करा - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : “येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. विविध कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा,” असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले. खरीप हंगाम -2023 साठी युरिया आणि डीएपी खताच्या नियोजनाबाबत आज…
View On WordPress
0 notes
cinenama · 1 year
Text
''त्या' दुचाकी चालकांवर कारवाई करणार का?'
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गोव्याचे पोलीस महासंचालक दखल घेऊन सर्व उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीयो जारी करुन,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
चिचगड पोलीसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणाऱ्या ३२ जनावरांची सुटका, 10 लाखांचा मुददेमाल जप्त
गोंदिया, दि.24 : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला ताब्यात घेत 32 जनावरांसह 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई चिचगड पोलिसांनी 23 फेबुवारी रात्री नाकाबंदी दरम्यान केली. गोंदिया जिल्हयातील पोलीस स्टेशन चिचगड हद्दीत अवैधरित्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध्द धंदयाचे समुळ उच्चाटन व आळा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांची कारवाई
५ महिला आणि ३ पुरुषांना अटक नाशिक : देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 3 इसम आणि ५ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.गुप्त बातमी दारामार्फत मुंबई नाका पोलिसांना वडाळा नाका भागात असलेल्या कोर्ट यार्ड या हॉटेल च्या शेजारी एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकत ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई
https://bharatlive.news/?p=173525 विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई
पिंपळनेर: (ता.साक्री) ...
0 notes
punerichalval · 2 years
Text
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही - काँग्रेसचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही – काँग्रेसचा सवाल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून, भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता
समाज घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप, स्पर्धेत २९ पदकांची कमाई करत भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सरकारने या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना कृषिमंत्री मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र त्याही परिस्थितीत राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी, चार हजार २०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं आहे. येत्या दोन-तीन दिवसात या अनुदानाचं थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
समाज घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते आज बोलत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचं अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठं असल्याचं नमूद केलं.
आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यापैकी अनेक निर्णय काहीसे झाकोळले गेले, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी निमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील. १८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे.
गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपती दर्शन घेतील. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाह भेट देणार आहेत.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज साजरा केला जात आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृति ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, सर्वत्र भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन आज होत आहे. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीचं आज सकाळपासून विसर्जन सुरु आहे. देगलूर इथं लेंडी नदीच्या काठी देगलूर नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. या तलावामध्ये भाविक आपल्या मूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात तीन हजार ५२० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. त्यामध्ये नांदेड शहरात एक हजार ३९८ तर ग्रामीण भागात दोन हजार १२२ सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे या समारोप समारोहात भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. या स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद के��ी.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण वि��ाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. यामध्ये सर्व बाबींमध्ये नळदुर्ग महाविद्यालयाने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. या मोहिमेत वेगवेगळ्या जल संरक्षण पद्धतीच्या अवलंबनाने अंदाजे ४० दशलक्ष घन लिटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. उद्या अंबाजोगाई इथं सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Video
youtube
नाशिक शहरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांची कारवाई
0 notes
news-34 · 10 months
Text
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
रावणाचे दहन करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
रावणाचे दहन करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
देशात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा असल्याने अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी देखील होतात. शेकडो फुटाचे रावण साकारून रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे. दसऱ्याची वाट पाहत या कार्यक्रमासाठी मोठ्या पद्धतीचे नियोजन देखील करण्यात येते मात्र रावण दहन प्रकरणावर आदिवासी संघटनेने आक्षेप नोंदवला असून रावण दहन करण्यास विरोध दर्शवला आहे. रावणाचे दहन न करता पूजा करावी अशी मागणी संघटनांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes