Tumgik
#करतोय
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सलमान खान पूजा हेगडेला करतोय डेट? जवळचा मित्र भडकला- ती मुलीच्या वयाची...
सलमान खान पूजा हेगडेला करतोय डेट? जवळचा मित्र भडकला- ती मुलीच्या वयाची…
सलमान खान पूजा हेगडेला करतोय डेट? जवळचा मित्र भडकला- ती मुलीच्या वयाची… Salman Khan Dating Rumors: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या डेटिंगची चर्चा आहे. ही चर्चा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या दोघांच्या रिलेशनशिपबाबत सलमानच्या जवळच्या मित्रानं मोठा खुलासा केला आहे. Salman Khan Dating Rumors: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान आणि पूजा…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 4 days
Text
बायको : तो पहा!
तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता.
Pradip : बापरे! अजून सेलिब्रेट करतोय.
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
bandya-mama · 4 days
Text
बायको : तो पहा!
तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता.
Bandya : बापरे! अजून सेलिब्रेट करतोय.
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
marathicelebscom · 1 month
Text
अरबाजच्या भावना गेल्या आहेत दुखावल्या; भांडी फोडून व्यक्त करतोय राग
*बिग बॉस मराठी दिवस एकतिसावा* *Bigg Boss Marathi New Season Day 31*: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक महिना पूर्ण होताच सदस्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये बदल जाणवू लागले आहेत. कालच्या भागात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांच्या रूपात एकत्र केलं आहे, आणि निक्की व अभिजीतची जोडी बनवली आहे. या नवीन समीकरणामुळे त्यांची मैत्री तुटणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, ��ा मैत्रीने अरबाजच्या भावना…
0 notes
Video
youtube
गरिबांच्या नावाखाली ठेकेदार लूट करतोय..
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी
राज्यात १०८ रुग्णवाहिकांच्या संख्येत दुपटीनं वाढ करण्याचा शासनाचा निर्णय
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षणाला प्रारंभ
आणि
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातला ठराव शिवसेनेच्या नाशिक अधिवेशनात मंजूर
****
थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजी बोस यांना आदरांजली वाहिली. नेताजींच्या कार्याचं देश कायम स्मरण करेल, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी नवी दिल्लीत संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात नेताजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
पराक्रम दिवसाच्या औचित्यानं पराक्रम पर्व या नऊ दिवसांच्या उपक्रमाची आज संध्याकाळी पंतप्रधान सुरुवात करणार आहेत. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात हा उपक्रम होणार असून यात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेसंबंधी माहिती देणारे विविध कार्यक्रम तसंच छायाचित्रं आणि दस्तावेजांचं प्रदर्शन, यांचं आयोजन होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं आखण्यात आलेल्या भारत पर्व या नऊ दिवसांच्या उपक्रमाचंही पंतप्रधान आज उद्घाटन करणार आहेत. या पर्वात भारताचं समृद्ध वैविध्य दर्शवणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हे पर्व दिल्लीच्या रामलीला आणि माधवदास पार्क, या मैदानांवर आयोजित होत आहे. पराक्रम पर्व आणि भारत पर्व ही दोन्ही पर्वं येत्या एकतीस जानेवारीपर्यंत सुरू राहतील.
****
प्रजासत्ताकाचं पंचाहत्तरावं वर्ष साजरं करण्याचा एक भाग म्हणून 'आमचं संविधान-आमचा सन्मान' या देशव्यापी अभियानाला उद्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. आपल्या राष्ट्राला बांधून ठेवणारी सामायिक मूल्यं साजरी करणं आणि भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा ठाम पुनरुच्चार करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे.
****
शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमीट ठसा उमटवणारे बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीनं वाढणार असून, या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका आणि बोट अँब्युलन्सचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्यानं ३६ बोट अँब्युलन्स विविध अपघाती समुद्र किनारे आणि नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्यानं येणार आहेत. सध्या १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिक�� राज्याच्या विविध भागात कार्यरत असून, या पुढे अशा एक हजार सातशे छपन्न रुग्णवाहिका सेवा देणार आहेत.
****
मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. ३१ जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण ३६ जिल्हे, २७ महानगरपालिका आणि ७ कॅन्टॉन्मेंट बोर्डांमधे होणार आहे.
दरम्यान, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कुणबी नोंदीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा आणि आंदोलन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -
मागासवर्ग आयोग 24 बाय 7 काम करतोय. आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही कायदा करायचा आहे, तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे. आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, हे सरकार निर्णय घेणारं आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघाला आहे. या मोर्चेकऱ्यांची २५ जानेवारीच्या रात्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पंचवीस तारखेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले पाचही बाजार बंद राहणार असून २६ जानेवारीलाही सार्वजनिक सुट्टी असल्यानं सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे.
दरम्यान, या मोर्चातल्या आंदोलकांच्या निवास आणि जेवणाचं नियोजन करण्यासाठी वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या मराठा मोर्चाच्या कार्यालयात वॉर रूम सुरू करण्यात आली असून, या वॉर रूम मधून नवी मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांच्या व्यवस्थेचं नियोजन केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणारे ठराव आज शिवसेनेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं, त्यात हे ठराव संमत करण्यात आले. यावेळी पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि भारत मातेच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह राज्यभरातले पदाधिकारी उपस्थित होते. दानवे यांनी यावेळी बोलताना सरकारकडून सर्व सामान्य शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू असल्याची टीका केली. नाशिक जिल्ह्यात कांद्याचं गेल्या काही दिवसांत प्रचंड नुकसान झालेले असले तरीही उत्पादकांना कसल्याही प्रकारचं शासनाकडून अनुदान मिळालं नसल्याचं दानवे यांनी नमूद केलं. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरही दानवे यांनी टीका केली.
****
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेसची जिल्हानिहाय आढावा बैठक पुण्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. कोल्हापूर इथल्या रेणुका सावंत आणि सतीश सावंत यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - रेणुका सावंत आणि सतीश सावंत, जि.कोल्हापूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला आजपासून सुरुवात झाली. अभ्यासक डॉ विजय कुमार वावळे यांनी 'द प्रॉब्लेस ऑफ द रूपी ग्रंथ आणि आजची प्रासंगिकता', या विषयावर भाष्य केलं. विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्र विषयावर अधिक संशोधन करावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीत नाव उलटून ६ महिला नदीपात्रात बुडाल्या. चामोर्शी तालुक्यात गणपूर जवळ आज सकाळी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह सापडले असून, अन्य महिलांचा शोध सुरू आहे.
****
0 notes
sattakaran · 9 months
Text
आम्ही Hardik ला कॅप्टन करतोय! MIनं रोहित शर्माला सांगितलं; अशी होती हिटमॅनची रिऍक्शन
0 notes
advika060322 · 1 year
Text
Watch "ठाण्याचा वाहतूक विभाग करतोय ठाणेकरांची लूट.." on YouTube
youtube
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
मासिक पाळी - (ती , तो आणि आपण)....
निसर्गाने महीलांना दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्व, आणि या मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी तिला दर महिन्याला जावं लागतं त्या या ५ दिवसातून. त्या ५ दिवसातील वेदना त्यातून होणारा रक्तस्त्राव, पोटातील दुखणे यापेक्षा जास्त वेदना समाज देतो तिला प्रत्येक वेळी.
मासिक पाळी म्हणजे नक्की काय???
गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते त्याला आपण मासिक पाळी म्हणतो.
---------------------------------------
समाजाचा दृष्टिकोन
आता बराच काळ झालं आहे, स्त्रिया पॅड चा वापर करतात, यावर काही लोकांकडून मोकळेपणाने बोलले ही जाते, जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जातेय. मध्यंतरी यावर पॅड मॅन सारखा चित्रपट ही येऊन गेला आणि त्याला चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण तरीही सर्व सुरळीत अजून तरी झालेले नाही...
आजही दुकानात मेडिकल मधे मुली सॅनिटरी पॅड घ्यायला गेल्यावर हळूचपणे शरमेने काका whisper , stayfree द्या अस्स बोलतात . आणि जर तिचा आजूबाजूला कोणी पुरुष असेल किंवा एखादा समवयीन मुलगा असेल तर जरा घाबरतच घेते ,ती जणू काही तरी पापच करतेय या भावनेने. दुकानदारही काळया पिशवीत किंवा मग एका newspaper मधे तिला गुंडाळून देतो. इतकं केल्यानंतरही ती गुपचूप त्याला लगेच बॅगेत, तिचा जवळचा पिशवीत आत टाकते, का??? काय गरज या सगळ्यांची ??? का? ती बिनधास्तपणे बोलू शकत नाही की मला पॅड द्या, का? ती हातात कुठलही आवरण न लावता सगळ्यांना दाखवत घरी नेऊ शकत नाही? या सर्वांना जबाबदार कोण? पुरुष की मग महिला? ज्या स्वतः या परिस्थिती तून गेलेल्या असतात किंवा जात असतात...
मासिक पाळीत पुरुषांनी काय करावे यावर बोलण्याबरोबर बायकांनी बायकांसाठी काय करावे ? यावर ही बोलायला हवं!
प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा वेगळा असतो तसाच प्रत्येक स्त्रीचा तिचा पाळीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि अनुभव वेगळे असतात. उगीच होणारी चिडचिड त्यातून येणारे नैराश्य, कधी आनंद होणे, तर कधी दुःख अशा अनेक समस्यांना तिला तोंड द्यावे लागते . अशा वेळी तिचा सोबत असणाऱ्या स्त्रीने तिला समजून घेणे तितकेच महत्वाचे. आपण सहन केलं किंवा आपल्याला समजून घेणार कोणी नव्हतं तरी आपण सगळं सुरळीत केलं किंवा करतोय म्हणून तिचा वेदनांना दुर्लक्ष करणे मुळातच चुकीचं. तिची तुलना आपल्याशी न करता तिला स्नेहाने आणि आपुलकीने वागून समजून घेणे तितकेच महत्वाचे मग तुम्ही तिची आई, सासू,बहीण, मैत्रीण, काकू, मामी किंवा कुठल्याही नात्याचे असाल...
पुरुषांनी ही पाळी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला पाहिजे. तिला म्हणजे बहिणीला, मुलीला, बायकोला ,आईला ,मैत्रिणीला आपुलकी दाखवून तिच्याशी सहज या विषयावर बोलता यायला पाहिजे. तिला या काळात त्रास झाल्यावर दवाखान्यात जायची वेळ आल्यास तिचा सोबत निसंकोष पणे सोबत जाता येईल इतकं मोकळीक होता यावे... खरंतर पुरुषत्व सारख्या भिकार गोष्टी शिवाय आपल्याकडे त्यांना विशेष देण्यासारखं आहे तरी काय??? त्यामुळे तिचा हा त्रास संपायला हवा, किमान कमी तरी करता यावा...
पण मुळात असं काहीही होत नाही आणि झालं तरी अगदी मोजकेच उदाहरण सांगता येतील.
मुळात गडबड आहे ती इथल्या सडक्या मेंदूत.
आपण असे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषांचा मागे एक स्त्री असते , आज तिचं गरज आहे एका आनंदी यशस्वी स्त्रीचा मागे पुरुषाने उभे राहण्याची. बाईला फक्त भोग वस्तू म्हणून वापरत असलेल्या मानसिकतेला बदलवण्याची.
-वैभव वैद्य....
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘पठाण’च्या यशासाठी शाहरुख खान करतोय देवदर्शन; मध्यरात्री पोहचला ‘वैष्णो देवी’च्या दरबारात
‘पठाण’च्या यशासाठी शाहरुख खान करतोय देवदर्शन; मध्यरात्री पोहचला ‘वैष्णो देवी’च्या दरबारात
‘पठाण’च्या यशासाठी शाहरुख खान करतोय देवदर्शन; मध्यरात्री पोहचला ‘वैष्णो देवी’च्या दरबारात मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या आगामी “डँकी’ चित्रपटाचं सौदी अरेबिया मधील शूटिंग पूर्ण केलं आहे. दुसरीकडे आजच शाहरुखच्या बहुचर्चित अश्या ‘पठाण’ चित्रपटातील पहिले ‘बेशरम रंग’ हे संपूर्ण गाणे रिलीज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 9 days
Text
Pradip : माझी नजर कमकुवत व्हायला लागली आहे. चष्मा बनवायचा विचार करतोय.
बायको : कशाला पैसे वाया घालवायचा विचार करताय. या शहरात माझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही.
😀😀😀😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
bandya-mama · 9 days
Text
Bandya : माझी नजर कमकुवत व्हायला लागली आहे. चष्मा बनवायचा विचार करतोय.
बायको : कशाला पैसे वाया घालवायचा विचार करताय. या शहरात माझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही.
😀😀😀😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
खासदार उदयनराजे यांनी एक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. बलात्कार या विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना इतर देशांमध्ये कायदे किती कडक आहेत. आपल्याकडे देखील असे कायदे लागू करून चोरी करणाऱ्यांची बोटे छाटून टाकावीत तर बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका बघू कोण असे असे गुन्हे करण्याचे धाडस करतोय ? असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
छगन भुजबळ तुतारीचे काम करतोय ? कांदे
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यशासनाकडून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
कला केंद्रांवर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी, नियमित तपासणीचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा निश्चित करावी- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
आणि
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन
****
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यशासनाकडून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, तसंच २३ ठिकाणी ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर्स - स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र सुरु करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले -
आपण एक ॲटोमॅटीक फिटनेस सिस्टीम जी आहे, ती तेवीस ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट सेंटर देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. ॲडव्हान्स त्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे, ती आपण राबवू. कारण फिटनेस हे महत्वाचं आहे. फिटनेस नसेल, दाखला नसेल तर गाड्या रस्त्यावर आणल्यानंतर ॲक्सिडेंट होतायत. लोकांचे बळी जातायत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून फिटनेस संपायच्या अगोदर आपण त्यांना कळवण्याची व्यवस्था देखील त्यापद्धतीनं एक ॲप डेव्हलप करावं लागेल.
****
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृतीदल तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज विधानपरिषदेत बोलत होते. या विभागाला राष्ट्रीय कृती दल म्हणून एकत्रितपणे कारवाई करता येईल, अशी व्यवस्था उभारण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आता आपण निर्णय घेतलाय, ॲन्टी नोर्कोटीक टास्क फोर्स निर्माण करण्याचा आणि हा टास्क फोर्स जो आहे त्याला आपण सगळ्या पोलिस स्टेशन पर्यंत नेत आहोत. सगळ्या राज्यांना या सूचना आहे, की सगळ्या राज्यांनी टास्क फोर्स तयार करावे. आपण पुढे आहोत, आपला झाला आहे. आतापर्यंत राज्य स्वत: पुरतं कारवाई करत होते, आता राष्ट्रीय टास्क फोर्स म्हणून एकत्रितपणे कारवाई करतील, अशा प्रकारची व्यवस्था होईल.
****
छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना राबवण्यासाठी खाजगी वसतीगृह भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चार जिल्ह्यांसह राज्यात एकूण २७ जिल्ह्यांसाठी खासगी वसतीगृहं सुरू करण्यासाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत, उर्वरित जिल्ह्यांसाठी जाहिराती डिसेंबरअखेरपर्यंत प्रसिद्ध होतील, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहं सुरू होतील, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले -
प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे मुलांचे आणि पाचशे मुलींचे हॉस्टेल त्या ठिकाणी आपण करतोय. त्याचेही कामं आपण चालु केलेली आहे, बहुतेक ठिकाणी टेंडर प्रोसिजर झालेली आहे. आणि ती कामं करायला काही वेळ लागणार आहे. परंतू तोपर्यंत मुलामुलींचे नुकसान होऊ नये, म्हणून वसतिगृह आपण भाडे तत्वावर घेत आहोत. आणि तिथं मुलामुलींना ॲडमिशन त्याठिकाणी देण्याचे काम करतोय.
कांदा आणि इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ते विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. दूध दर प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
****
कला केंद्रांवर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी, कला केंद्रांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधान भवनात या संदर्भात आज गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण तसंच पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर ठराविक मुदतीत मदत मिळेल, यासाठी कालमर्यादा निश्चित केली पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. नैसर्गिक संकट आल्यानंतर २४ किंवा ४८ तासात केंद्रीय पथकानं पाहणी करायला हवी, राज्य सरकारने केंद्राला सांगून हे निकष बदलण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
राज्यात आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विधीमंडळ परिसरात आंदोलन केलं, त्यावेळी दानवे बोलत होते. नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कळवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या मृत्यूंना आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
****
सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातले १७ लाख कर्मचारी परवा १४ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी आज सोलापूर इथं ही माहिती दिली. संघटनेनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सादर केलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, शिवसेने रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधी प्रश्न उपस्थित केला. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
देशातून अॅनिमियाचे उच्चाटन करण्यासाठी, एक लाख ६० हजार आयुष्मान आरोग्य मंदिरात महिलांची तपासणी देशभरात केली जात आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत ही माहिती दिली.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यातील, विविध विद्यापीठांचे एकूण ११० संघ सहभागी होणार आहेत. विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनोज रेड्डी यांनी ही माहिती दिली. या स्पर्धा विद्यापीठात क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या मैदानावर तसंच इनडोअर हॉल इथं, दिवस-रात्र प्रकाशझोतात होणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज जालना जिल्ह्यातल्या थेरगाव, खापरखेडा, मार्डी, हिवरा रोशनगाव, पाचनवडगाव या ठिकाणी पोहचली. संकल्प यात्रेच्या रथाचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसंच एलईडीस्क्रीनवर केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची चित्रफित दाखवण्यात आली.
ही यात्रा यात्रा आज छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात पोहचली आहे. नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेत अनेक लाभार्थींनी आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांविषयी माहिती दिली.
बाईट - लक्ष्मण बिडकर आणि महानंदा गवळी, परभणी
****
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आज परळी इथं गोपीनाथ गडावर मोठी गर्दी केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी परळी शहरात तसंच गोपीनाथ गडावर ��्रमदानासह सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. विविध मतदान केंद्रावर मतदारांना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासंदर्भात, व्हीव्हीपॅट बाबत माहिती देवून सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत असल्याचं तहसीलदार पल्लवी लिगदे यांनी सांगितलं. ही मोहीम २९ फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
खासदार उदयनराजे यांनी एक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. बलात्कार या विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना इतर देशांमध्ये कायदे किती कडक आहेत. आपल्याकडे देखील असे कायदे लागू करून चोरी करणाऱ्यांची बोटे छाटून टाकावीत तर बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका बघू कोण असे असे गुन्हे करण्याचे धाडस करतोय ? असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes