Tumgik
#घसरला
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-the-reason-for-the-drop-in-voting-percentage-is/
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
mhlivenews · 11 months
Text
साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरला, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रित घडलं
जळगाव: जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२ रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) असे मयताचे नाव आहे.जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमकं काय घडलं?
https://bharatlive.news/?p=184657 फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमक��� काय ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी कुशल तरुणांना संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. स्वत:मधला विद्यार्थी कायम जागृत ठेवा, असा सल्ला त्यांनी उमेदवारांना यावेळी दिला. संरक्षण सामग्री आणि मोबाईल संच यासारख्या वस्तुंची आयात करणारा भारत आज यांची निर्यात करणारा देश बनला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
मुंबईत केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, तर नांदेड इथं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.
नागपूर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी २१० उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान केली. नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपलं ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासाचा जीवनात तसंच समाजासाठी उपयोग, कठोर परिश्रम आदींवर लक्ष देणं आवश्यक असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं.
***
आनंदाचा शिधा आणि विविध शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी चार वाजता दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून सहभागी होणार आहेत.
***
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, यांनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचं स्वागत केलं. 
***
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महात्मा गांधी भवन इथं विशेष अभिवादन सभा संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत आणि वर्तमान परिस्थिती, या विषयावर मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसंच छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं आज संध्याकाळी साडे सहा वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं उद्या सकाळी नऊ वाजता भडकल गेट इथल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अभिवादन सभा होणार असल्याची माहिती, उत्सव समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेरॉय यांनी दिली.
***
यंदा साखर उतारा कमी आल्यानं साखरेचं उत्पादन कमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेल्या हंगामात साखरेचा उतारा दहा पूर्णांक ४२ शतांश टक्के होता, तो यंदा नऊ पूर्णांक ९८ शतांश टक्क्यापर्यंत घसरला आहे. २०४ साखर कारखान्यांचं गाळप बंद झालं असून, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, बीड आणि सातारा इथल्या सहा साखर कारखान्याचं गाळप अद्याप सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयानं दिली आहे.
***
नांदेडमध्ये येत्या सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी रविंद्र जाधव यांनी काल ही माहिती दिली. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या मराठवाडा विभागानं या संमेलनाचं आयोजन केलं आहे.
***
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ३८ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी दाखल ५९ अर्जांची छाननी काल करण्यात आली. वैध अर्जांची यादी आज संध्याकाळपर्यंत घोषित करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या २५ एप्रिलला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
***
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या देऊळवाडी इथल्या विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीनं मराठी भाषेतल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथले डॉ. रामकिसन दहिफळे आणि लातूरचे कवी ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे. पुढच्या महिन्यात एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी सांगितलं.
//**********//
0 notes
marathinewslive · 2 years
Text
रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाला ८० च्या खाली ठेवल्याने परकीय चलन साठा २ वर्षांच्या नीचांकावर आला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाला ८० च्या खाली ठेवल्याने परकीय चलन साठा २ वर्षांच्या नीचांकावर आला आहे.
परकीय चलन साठा $564.053 अब्ज पर्यंत घसरला भारताचा परकीय चलन गंगाजळी दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली, सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण नोंदवली, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या शब्दावर खरे उतरून, एका आठवड्यात रुपयाला 80 प्रति डॉलरच्या पुढे कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. दोन दशकांहून अधिक उच्चांक. RBI च्या साप्ताहिक सांख्यिकीय आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 19 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारत पुन्हा घसरला, नेपाळ अनेक पटींनी पुढे
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारत पुन्हा घसरला, नेपाळ अनेक पटींनी पुढे
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारताची पुन्हा घसरण झाली असून जगातील वेगवेगळ्या देशात माध्यमांना असलेल्या स्वातंत्र्याबाबत हा निर्देशांक महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षीच्या 142 व्या स्थानावरून आत्ता भारत थेट 150 व्या नंबरवर आलेला आहे. नेपाळ वगळता भारताच्या सर्व शेजारील देशांच्या निर्देशकांत घट झालेली असून नेपाळने यामध्ये 76 वे स्थान पटकावले आहे. भारतातील नोकऱ्यांची संख्या कमी होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारत पुन्हा घसरला, नेपाळ अनेक पटींनी पुढे
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारत पुन्हा घसरला, नेपाळ अनेक पटींनी पुढे
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांत भारताची पुन्हा घसरण झाली असून जगातील वेगवेगळ्या देशात माध्यमांना असलेल्या स्वातंत्र्याबाबत हा निर्देशांक महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षीच्या 142 व्या स्थानावरून आत्ता भारत थेट 150 व्या नंबरवर आलेला आहे. नेपाळ वगळता भारताच्या सर्व शेजारील देशांच्या निर्देशकांत घट झालेली असून नेपाळने यामध्ये 76 वे स्थान पटकावले आहे. भारतातील नोकऱ्यांची संख्या कमी होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला
https://bharatlive.news/?p=182151 नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - इपीएफओनं यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये सुमारे १७ कोटी सदस्य जोडले आहेत. यात सुमारे नऊ कोटी ३४ लाख नवीन सदस्यांचा समावेश आहे. इपीएफओनं जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या माहिती मध्ये, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर मध्ये निव्वळ सदस्यत्वामध्ये नऊ पूर्णांक चार टक्क्यांची वाढ झाल्याचं म्हटलं आहे. नवीन सदस्यांमध्ये १८ ते २१ वयोगटातल्या सर्वाधिक दोन कोटी ९४ लाख म्हणजे जवळपास ५९ टक्के सदस्यांची नोंदणी झाली आहे. प्रथमच नोकरी शोधणारे त्यांचं शिक्षण संपवून मोठ्या संख्येनं संघटित क्षेत्रातल्या कर्मचार्‍यांमध्ये सामील होत आहेत तसंच संघटित क्षेत्रातलया नवीन नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर, देशातल्या तरुणांपर्यंत पोहोचत आहेत, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती. राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यावर्षी मे पासून तिसऱ्या निवडणूक आयुक्तांचं पद रिक्त होतं.  
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अर्थसंकल्प-पूर्व बैठकांची दूरस्थ पद्धतीनं सुरुवात केली. यात उद्योग जगतातले नेते, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलातील तज्ञ सहभागी झाले आहेत. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्याकरता या बैठका होणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुबंईत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताचं आर्थिक यश ठळकपणे उठून दिसणारं आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत २१ व्या जागतिक लेखापाल महासभेला संबोधित करताना ते बोलत होते. जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे विकासाला चालना देण्यासाठी तसंच जगाला मार्ग दाखवण्यासाठी’ म्हणून मोठ्या आशेनं पाहत आहे, असं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी औरंगाबाद शहरात देण्यात आलेल्या विविध जमिनींची, महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी काल पाहणी केली. हर्सूल, सुंदर वाडी, चिकलठाणा, तिसगाव आणि पढेगाव इथल्या जमिनींची पाहणी करुन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
****
नांदेड इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल असलेल्या तक्रार अर्जामध्ये मदत करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन जणांना काल औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं नांदेड इथं सापळा रचून अटक केली. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दहा हजार रुपये लाच मागणीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. त्यावर कारवाई टाळावी म्हणून खाजगी व्यक्ती शकिल आजिमसाब आणि सय्यद ईस्माईल यांनी तक्रारदराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती ६० हजार रुपये लाच घेतांना या दोघांना अटक करण्यात आली.
****
मीरा भाईंदरमध्ये उभारण्यात येणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल झालं. सर्व सुविधांनी सज्ज असं हे भवन भावी पिढीला प्रेरणा देईल, असं आठवले यावेळी म्हणाले. सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंगचं आणि स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.
****
स्पेनच्या ला नुसिया इथं सुरु असलेल्या युवा पुरुष आणि महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत, आठ भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप-उपांत्यपूर्व फेरीत विश्वनाथ, वंशज, जादुमणी सिंग, आशिष, दीपक, भावना शर्मा आणि तमन्ना या भारतीय खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून अंतिम आठ टप्प्यात प्रवेश केला.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या फिफा - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध इराण आणि अमेरिका विरुद्ध वेल्स हे सामने होणार आहेत. भारतीय वेळेनुसार अनुक्रमे संध्याकाळी साडे सात आणि रात्री साडे बारा वाजता हे सामने होतील.
****
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी हंगामातली निच्चांकी नोंद झाली आहे. ग्रामीण भागात अति थंडीमुळे द्राक्ष पिकाला धोका निर्माण होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
//***********//
0 notes
prashantmmodi · 2 years
Text
Tumblr media
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंद�� पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या रानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म्हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या ��वैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातून दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्रवास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes · View notes
loksutra · 2 years
Text
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल - VIDEO
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल – VIDEO
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडून वाहून जाते. या अपघातात त्यांचा जीव वाचला, मात्र हा व्हिडिओ प्रत्येकासाठी धडा घेण्यासारखा आहे. म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram पाऊस नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ते गुदमरतात आणि रस्ते जलमय होतात हे तुमच्या नेहमी लक्षात आले असेल. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
गोंदियात रेल्वे गाडीला भीषण अपघात; 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी
गोंदियात रेल्वे गाडीला भीषण अपघात; 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी
गोंदिया, दि.17 : रायपूरकडून नागपूरच्या दिशेने धावणार्‍या ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीला गोंदिया शहराजवळ अपघात झाला. या गाडीने पुढे जात असलेल्या मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला. यात 50 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात आज बुधवार, 17 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडला. मालगाडीला धडक दिल्यानंतर ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीचा एक डब्बा रुळाखाली घसरला. रेल्वे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असून त्यामुळे देशात आयात होत असलेल्या वस्तु प्रचंड महाग झालेल्या आहेत. 2014 पासून आत्तापर्यंत रुपया सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे अशी माहिती खुद्द केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेली आहे मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी सरकारची जबाबदारी झटकत रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष यासह जागतिक घटक यासाठी जबाबदार आहेत असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असून त्यामुळे देशात आयात होत असलेल्या वस्तु प्रचंड महाग झालेल्या आहेत. 2014 पासून आत्तापर्यंत रुपया सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे अशी माहिती खुद्द केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेली आहे मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी सरकारची जबाबदारी झटकत रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष यासह जागतिक घटक यासाठी जबाबदार आहेत असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
२०१४ पासून रुपया तब्बल २५ % घसरला , निर्मला सीतारामन म्हणतात की यासाठी ..
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असून त्यामुळे देशात आयात होत असलेल्या वस्तु प्रचंड महाग झालेल्या आहेत. 2014 पासून आत्तापर्यंत रुपया सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे अशी माहिती खुद्द केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेली आहे मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी सरकारची जबाबदारी झटकत रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष यासह जागतिक घटक यासाठी जबाबदार आहेत असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes