Tumgik
#चिखल!;
6nikhilum6 · 18 days
Text
Wakad : अंगावर चिखल उडाल्याने एकावर खुनी हल्ला
एमपीसी न्यूज – अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी(Wakad) मिळून एका वाहन चालकाला कोयता व लोखंडी रॉडने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास शिवराज नगर, रहाटणी येथे घडली. विशाल नथू गायकवाड (वय 30, रा. रहटणी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर पांचाळ (वय 20), करण उर्फ मुन्ना गजानन चोपवाड…
0 notes
Text
थांब थांब तू जरा पावसा
नको वाटतो पाऊस आताफिटली ना रे हाऊस आता ।निरोप घे ना तू जरासायेशील नंतर जाता जाता ।रस्ते भरले नाल्या भरल्याधरा ही थकली पिता पिता ।पाणी पाणी चिखल साराहोईल कसा तो असाच रीता ।थांब थांब तू जरा पावसाशेत पिकू दे आमचे आता ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
कुंद हवेचा पावसाळी दिवस
माझ्या वहीतल्या एका पानावर मी एका पावसाळी दिवसाची आठवण लिहून ठेवली होती. बाहेरचं आकाश निस्तेज आणि राखाडी रंगाचं आहे, गवतावर पाण्याचे थेंब पडत आहेत जे हळूहळू जमलेल्या पाण्याचा चिखल होण्यात प्रवृत्त होत आहेत.दरवाजाला स्वच्छ काचा असलेल्या खिडकीच्या मागे बसून मी बाहेर एकटक पाण्याच्या छुटपूट पडणाऱ्या थेंबाची गंमत घेत आहे.मोठ्या जोरदार पावसाच्या जरी सरी पडत नसल्या तरी हवेत गारवा आला आहे. मला ती ओलसर…
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता विकसित मराठवाडा २०४७ या परिषदेतून व्यक्त.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या समर्थनात गंगाखेड तहसील कार्यालयासमोर सकल ओबीसी समाजाची निदर्शनं.
जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमातून जनजागृती.
आणि
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रावर कारवाई.
****
सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनासाठी ‘जिल्हा’ हा महत्त्वाचा घटक मानून प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं ‘मित्र’, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘विकसित मराठवाडा २०४७’ या एक दिवसीय विकास परिषदेत परदेशी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यात पाणी, कृषी, रोजगार, उद्योग आणि पर्यटन वाढीसाठीचं नियोजन आवश्यक असून, मित्र च्या माध्यमातून मराठवाड्यासाठी नविन धोरण तयार करून शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याचं, परदेशी यांनी सांगितलं. खाजगी गुंतवणुकीच्या वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक असून, सकल उत्पादनात कमी सहभाग असलेल्या जिल्ह्यांना केंद्रीत करून त्यांचा सहभाग वाढवावा लागेल, याकडेही परदेशी यांनी लक्ष वेधलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी त्यांना केली असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलतांना, राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात ही अभिनंदन आणि धन्यवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
****
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पक्षाच्या वतीनं, आज मुंबईत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीत तर उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
****
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवल्याचा आरोप करत, त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एका नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातील आणि केंद्रातील भाजप प्रणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने परवा २१ तारखेला राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ‘चिखल फेक‘ आंदोलन केलं जाणार आहे. सरकारचं शेतकरी-कष्टकरी-अल्पसंख्याक याबाबतचं धोरण, स्पर्धा परीक्षांची अनियमितता,  नीट परीक्षेतले कथित गैरप्रकार, शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल ओबीसी समाजाच्यावतीने यावेळी देण्यात आला.
दरम्यान, हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने आज वडीगोद्रीला रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन परवा साजरा होत आहे. योग हा निरंतर अभ्यासाचा विषय असल्याचं, धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथले शशीकुमार भातलवंडे यांनी दाखवून दिलं आहे. २००५ पासून त्यांनी योग साधना करत, आतापर्यंत ५०० योग प्रशिक्षकांना तयार केलं असून दोन लाख विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या कार्याचा आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी आढावा घेतला…
स्वतः प्रज्ञाचक्षू असून देखील योगसाधनेमध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे. या योग साधनेमुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. व्यसनमुक्ती, रोगमुक्ती यासाठी योगाभ्यासातून समुपदेशनाचे कामही ते करतात. योगशिक्षक शशी कुमार भातलवंडे यांनी अंधत्वावर मात करत सुरू ठेवलेली ही योगसाधना प्रत्येकाला आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग साधना करण्याची प्रेरणा देत आहे.
-देविदास पाठक,आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
युवकांनी योग आत्मसात करून योगाचा प्रचार करावा असं मत माजी मुख्यमंत्री खासदार  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं मल्टीमिडीया चित्रपट प्रदर्शनात ते बोलत होते. हे प्रदर्शन २१जूनपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे, प्रदर्शनस्थळी तीन दिवस योग शिबाराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -मिफमध्ये आज पाचव्या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले माहितीपट, तसंच शॉर्ट फिक्शन, बेलारूस, रशिया आणि फ्रान्स या देशांचे, तसंच ऑस्करसाठी निवडले गेलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आशियाई महिलांचे विशेष चित्रपट, दिव्यांगजनांसाठी तयार केलेले विशेष चित्रपटही पाहता येणार आहेत. याशिवाय लघुपट,ॲनिमेशन, माहितीपट, वेबसीरीज आणि ओटीटी मंच या विषयांवरची चर्चासत्रं, परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रंही होणार आहेत.
****
जागतिक सिकलसेल दिन आज सर्वत्र पाळला जात आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात चौका या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सिकलसेल या आजाराबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली, तसंच या नागरिकांनी रक्ततपासणी करून या रोगाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होणाऱ्या प्रसाराला आळा घालण्याचं आवाहन केलं...
चाळीस वर्षाच्या आतील जेवढेपण पण नागरिक आहेत, महिला आणि पुरुष, त्या सगळ्यांनी सिकलसेलची रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. कारण हा अनुवांशिकतेने आजार पसरतो. आजार आणि वाहक जे असतील, त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी नॉर्मलम्हणजे जे वाहक नाही किंवा आजारी नाही अशा व्यक्तीशी लग्न केले तर ह्या आजाराला आपण तिथेच अटकाव आणु शकतो, म्हणचे हा पुढच्या पिढ्यामध्ये ट्रांसफर होणार नाही.
****
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकानं धडक कारवाई केली आहे. यापैकी आठ केंद्रांचे परवाने तात्पुरते तर तीन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीत पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. आषाढी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत सोलापूर इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पालखी तळांवर आवश्यक सोयी सुविधा तसंच सुरक्षेसाठी साडे २५ हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, सार्वजनिक तसंच खाजगी अशी सुमारे २४ हजाराहून अधिक शौचालयं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
****
दरम्यान, आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबतचे मानाचे अश्व आज कर्नाटक इथल्या अंकली इथून आळंदीकडे रवाना झाले. हे अश्व अकरा दिवसांचा प्रवास करून २६ जून रोजी पुण्यात आणि त्यानंतर २८ जूनला आळंदीला पोचणार आहेत. माऊलींची पालखी २९ जूनला आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
****
आषाढी एकदशीसाठी पंढरपूरला निघालेल्या अकोला जिल्ह्यातल्या शेगांव इथल्या  संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळी १० वाजता वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं भव्य स्वागत करण्यात आलं. या पालखी समवेत ७०० वारकरी आणि पताकाधारी आहेत. या पालखीचे वाशिम जिल्ह्यात चार मुक्काम होणार असून आजचा पहिला मुक्काम डव्हा इथे होणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात धारासूर इथं वीज कोसळून मरण पावलेले अक्षय राठोड आणि येळेगाव इथले नरेंद्र शेळके यांच्या वारसांना राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते आज त्यांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादा���ाव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्ह���ल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
darpandhirajdiksha · 2 years
Text
हरिश्चंद्र गडाला जाता जाता......
एखाद्या MIDC तल्या इंजिनिअर साठी १५ ऑगस्ट ची NATIONAL HOLYDAY ची सुटी रविवार ल जोडून येणे म्हणजे मोठी पर्वणीच. त्यात आम्ही भटके म्हणजे हे तर ठरलेलंच की फिरायला कुठे तरी जाणं होतच. त्याहिशोबने आमच्या प्लॅनिंग अगदी महिना आधीच सुरू झालेल्या. सुरवातीला नाही म्हटल तरी १०-१२ जणांचा मोठा ताफा ह्या प्लॅन साठी उत्सुक होता. सगळ्यांनी मिळून नियोजनाचे असे मोठमोठे काल्पनिक बुरुज उभे करून ठेवलेले. अन् जायचं कुठे तर म्हणे कोकण....पण जसजसे दिवस जवळ येऊ लागले आमचे एक एक करून सगळे बुरुज ढासळू लागले. अन् आमचा कोकणचा प्लॅन गंडला. एक एक करून आमचे सगळे कार्यकर्ते कमी झाले अन् नेहमीप्रमाणे शेवटी आम्ही उरलो फक्त तीन मी, ओम्या अन् निखिल. मी काहीसा नाराज झालेला पण निखिल चा उत्साह मात्र ढगात भाई म्हणतो," तिघात आणि एखादा घ्यायचा अन् बाईक ने वाटेल तिथे जायचं... मज्याच मज्या" नंतर मग तो आणि एखादा पण त्यानेच शोधून आणला. किरण, सॉरी सॉरी... किरण्या. हा कीरण्या पण तोडीस तोड. आता चौघात जायचं कुठे ते पण ऐन पावसात???
आमचं ठरलं हरिश्चंद्र गड. आदल्या दिवशी निघायचं अन् दुसऱ्यादिवशी हरिश्चद्रगड फिरून माघारी यायचं.
ठरल्याप्रमाणे मी अन् ओम्या पुण्यातून आणि निखिल अन् कीरण्या जेजुरीवरून निघणार होते अन् मंचर मध्ये भेटणार होते. आणि इथून च आमचं प्लॅन गंडतोय की काय असं वाटायला लागलेलं, कारण निखिल ने मंचर गाठायलाच १२ वाजवलेले. अन् झालेला उशीर बघता आम्ही आधल्या दिवशी भंडारदरा बघायचं ठरवलं.ओझर - ओतूर - कोतुल मार्गे भंडारदरा असा काहीसा प्रवास सुरू झाला. डोक्यावरून कोसळणारा पाऊस अन् रेनकोट घातलेले आम्ही. आमच्यात जणू deal झालेली, जोवर आम्ही गाडी चालवतोय तोवर पाऊसही त्याचा पट्टा चालवत राहील. रस्त्यात आम्हाला रंधा चा धबधबा लागलेला. तिथपर्यंत आम्हाला लहानमोठ्या धबधब्याचं पण मोठ कुतुहल. पण इथून पुढे ते कुतुहल मावळत गेलं. रंधा चा धबधबा ह्या दिवसांत वेगवेगळ्या रंगाचं पाणी घेऊन कोसळत असतो. जेव्हा हे पाणी दगडांवरून कोसळत तेव्हा ते शुभ्र अगदी काचेसारख. जेव्हा ते दरीतून वाहत अगदीच गढूळ जणू किती अन् काय चिखल अन् गाळ ढवळून काढतं. इथे आम्ही आमच्यातल्या एका लहान बाळाला फोन केला ज्याला पाणी बघून चेव चढतो त्याला व्हिडिओ कॉल ने सगळं काही दाखवलं अन् एवढं करून आम्हाला काय भेटलं तर चार दोन शिव्या...दिवसभराचे उपाशी आम्ही चहा अन् मक्याच्या भुट्ट्यांवर ताव मारून भंडारदरा धरण बघण्याम्हणून पुढे निघालो.......
To be contineued....
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra Rain : डोंबिवलीतील रस्त्यावर काय ते पाणी, काय खड्डे अन् काय तो चिखल… अधिकारी आणि ठेकेदार मात्र ओकेमध्ये!
Maharashtra Rain : डोंबिवलीतील रस्त्यावर काय ते पाणी, काय खड्डे अन् काय तो चिखल… अधिकारी आणि ठेकेदार मात्र ओकेमध्ये!
Maharashtra Rain : डोंबिवलीतील रस्त्यावर काय ते पाणी, काय खड्डे अन् काय तो चिखल… अधिकारी आणि ठेकेदार मात्र ओकेमध्ये! Dombivali : डोंबिवलीमधील रस्ता पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंबिवली : डोंबिवलीमधील रस्ता (Dombivli Road) पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोलन करणार असा इशारा कल्याण जिल्हा…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार -विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तारदरवाडी तलाव फुटला; आपत्ती निवारण दल तैनात.
आणि
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर.
****
राज्यातल्या दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत आपल्या निवेदनातून ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली, ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश याबैठकीत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्घटना घडल्यानंतर, दोन तासांत प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. मदतकार्यात पाऊस, चिखल आणि धुक्याचा मोठा अडथळा होता, मात्र तरीही एकशे नव्व्याण्णव लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मदतकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचं निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करत, शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इर्शाळवाडीतल्या नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या वेळी सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांनी मतभेद विसरून एकत्र प्रयत्न केले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान, विकासाच्या नादात निसर्गाशी छेडछाड करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालायला हवा, असं मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात विधानसभेत बोलताना व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान, या सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातंही जबाबदार असून, या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारने रुग्णवाहिका, तसंच वैद्यकीय पथकांचं कार्यक्रमस्थळी नियोजन केलं होतं तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
****
राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सहाशे एकसष्ट खाजगी शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात हरिभाऊ बागडे, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न केला होता.
****
मुंबई शहर आणि परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यानं उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर वाढला असून, दुपारपर्यंत ४३ पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरी भागात तसंच वाशी परिसरातल्या सखल भागात पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रायगड जिल्ह्यातही चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांची पडझड झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या दुथडी भरून वहात असल्यानं नदीकाठच्या तसंच दरडग्रस्त भागातल्या सातशे सहासष्ट लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
सातारा जिल्ह्यातल्या सातारा, वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या दरडप्रवण तालुक्यांमधल्या तीनशे एकसष्ट कुटुंबांचं तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव, पुसद आणि उमरखेड परिसरात काल रात्री मोठा पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये नाल्यांचं पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा शोधावा लागला, तसंच पिकं पाण्याखाली बुडाली.
चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सततच्या पावसामुळे अनेक तालुक्यातली शेती पाण्याखाली आली आहे. काही घरांची पडझड झाल्याचं वृत्त असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड मधील तारदरवाडी इथला तलाव अतिवृष्टीमुळे आज फुटला. याठिकाणी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आलं आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी देगलूर आणि मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी गावकरी आणि शेतकऱ्यांना धीर देत प्रशासन नागरिकांच्या सोबत असल्याचं सांगितलं.
****
औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत २२९ मिली मीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली आहे. पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असून ८८ पूर्णांक आठ टक्केच पाऊस पडला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १६८ मिली मीटर पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात २७७, लातूर २४१, परभणी २०८, जालना २०४ आणि औरंगाबाद जिल्ह्यात २०२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३५ पूर्णांक २७ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये आज न्यायालयानं तक्रारदार पूर्णेश मोदी, गुजरात सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून, याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या चार ऑगस्टला होणार आहे.
****
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वार उद्घाटन आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे आणि पद्मश्री डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, ना.धो.महानोर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. तसंच दिवंगत पद्मश्री फातेमा झकेरिया आणि पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार असून हा सन्मान त्यांचे कुटूंबीय स्वीकारणार आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्या सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे.
****
जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली इथं जैन समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला तसंच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आलं.
****
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
' रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ', नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ' नको ते ' घडलं
‘ रेडियमवर चिखल आणि पथदिवे बंद ‘, नगर मनपा कार्यालयासमोर अखेर ‘ नको ते ‘ घडलं
सध्याच्या परिस्थितीत नगर शहरात पावसाचे वातावरण असून नेहमीप्रमाणे पाऊस येण्याचे संकेत मिळताच वेगवेगळ्या परिसरातील वीज गुल होत असते त्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रात उभे करण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या विजेचा देखील समावेश आहे मात्र त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढलेले असून अशीच एक घटना नगर औरंगाबाद रोडवर महापालिका कार्यालयासमोर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबादवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes