Tumgik
#खड्डे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सूर्याचा स्फोट होतोय… अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झालेत, पृथ्वीबद्दल मोठा इशारा… पाहा NASAचे फोटो
सूर्याचा स्फोट होतोय… अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झालेत, पृथ्वीबद्दल मोठा इशारा… पाहा NASAचे फोटो
सूर्याचा स्फोट होतोय… अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झालेत, पृथ्वीबद्दल मोठा इशारा… पाहा NASAचे फोटो नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सुर्यात महाकाय काळे खड्डे तयार होत आहेत. हे खड्डे एखाद्या मोठ्या दरीसारखे खोल आणि मोठे आहेत. इतके मोठे की त्यात अनेक पृथ्वी बसू शकतात. त्यांच्या आतून अतिशय वेगाने गरम सौर लहरी बाहेर पडत आहेत. शास्त्रज्ञांनी नुकतेच ताजे विवर पाहिले होते. ज्याचा प्रभाव येत्या 2…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 17 days
Text
PCMC : स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे होणार शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण
एमपीसी न्यूज – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका लवकरच रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम सुरू करणार आहे. हा अभिनव उपक्रम रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, खड्डे असलेले परिसर ओळखण्यासाठी आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
लद्दाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावर ही घोषणा केली. यानुसार लद्दाखमध्ये आता जांस्कर, द्रास, साम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली असून, मंदीरांसह घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जन्माष्टमीनिमित्त जुहूच्या राधा रासबिहारी इस्कॉन मंदिरात आज भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आरती केली.
****
भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ४४ जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली. या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तिनही टप्प्यांची मतमोजणी चार ऑक्टोबरला होणार आहे.   
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा पराभव केला होता. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला.
वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख असं नेतृत्व खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे गमावलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
****
राज्यभरातल्या सर्व बाजार समित्या उद्या २७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. द ग्रेन राइस अॅड ऑइल सीड मर्चंट असोसिएशन - ग्रोमा चे सचिव भिमजी भानुशाली यांनी आज ही माहिती दिली. अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू करण्यात आल्याने बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर - सेस रद्द करण्यात यावा, जीएसटी कायदा सुटसुटीत करुण्यात यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुपारी मुंबईत बैठक होणार असून, या बैठकीत उद्याच्या बंद बाबत निर्णय होणार असल्याचंही भानुशाली यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग रस्ते वाहतूकीसाठी तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना, केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार बालासाहेब ठेंग यांनी संबंधितांना दिल्या आहेत. गणोशोत्सवाच्या काळात अनेक लोक या मार्गाने कोकणाकडे जातात, त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी हा मार्ग खड्डे मुक्त करुन त्याची दुरुस्ती केली जावी, असं निवेदन मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं, त्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात काल सर्वदूर पाऊस झाल्याने, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४६ टक्क्यांवर गेली आहे. धरणात ९३ हजार ३३८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे राधानगरी धरण १०० टक्के भरलं असून, धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुर आला आहे. गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
****
0 notes
newschakra · 2 months
Text
कोटपूतली : सडकों पर खड्डे, कीचड़, गंदगी, अधिकारियों को ‘AC ’ भा रही 
परिषद् खुद ही कर रही नालियां ब्लॉक, फिर जबाबदेह कौन ? न्यूज़ चक्र, कोटपूतली। शहर की सफाई व्यवस्था ‘ कचरा’ हो चुकी है। नाले- नालियां गंदगी से इस क़दर बजबजा रही हैं कि राहगीरों का निकलना और स्थानीय बाशिंदों का रहना मुश्किल हो रहा है।  … और अधिकारी AC में बैठ कर समय निकाल रहे है। जिला कलेक्टर कल्पना अग्रवाल शहर की सड़कों पर निकलती हैं तो अधिकारी ‘अभी’ व्यवस्था दुरस्त करने की हामी भरते है। लेकिन…
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
bandya-mama · 5 months
Text
एक माणूस खड्डे खोदत असतो. त्याच्या मागून दुसरा बुजवत येत असतो.
हे पाहून Bandya विचारतो, “तुम्ही हे काय करत आहात?
खड्डे खोदणारा म्हणतो, “हा वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.मला खड्डे खोदण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिले आहे.मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.आम्ही आमचे काम करत आहोत.”
😂😂😂🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
gitaacharaninmarathi · 5 months
Text
17. चार प्रकारचे ‘भक्त’   
श्रीकृष्ण म्हणतात की भक्तांचे चार प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील भक्तांना आयुष्यात ते तोंड देत असलेल्या अडचणी आणि दु:ख यातून सुटका हवी असते. दुसर्‍या प्रकारातील भक्तांना भौतिक सुखसुविधा आणि संपत्ती हवी असते. संस्कृती, लिंग आणि विश्वास पद्धती कोणतीही असो, बहुतांश भक्त याच दोन प्रकारात मोडतात.
श्रीकृष्ण म्हणतात, या दोन प्रकारातील भक्त हे विविध देवतांची आराधना करतात आणि कर्मकांड करीत असतात. आपल्याला होत असलेल्या शारीरिक त्रासाकरिता संबंधित डॉक्टरांना गाठण्यासारखेच हे आहे. या भक्तांच्या श्रद्धेमुळेच त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होत असतात. थोडक्यात तो शरण जाण्याचा एक प्रकार आहे.
खालील उदाहरणातून श्रद्धेची संकल्पना स्पष्ट होईल. दोन शेतकर्‍यांची एकमेकांच्या आजूबाजूला शेते होती आणि त्यांनी एक दिवस सिंचनाकरिता विहीर खोदायचे ठरवले. पहिला शेतकरी एक-दोन दिवस खोदत असे आणि पाणी न लागल्यास नव्या ठिकाणी खोदायला सुरुवात करीत असे.  दुसर्‍या तकर्‍याने मात्र सातत्याने एकाच ठिकाणी खोदणे सुरूच ठेवले. महिन्याअखेरीस पहिल्या शेतकर्‍याच्या शेतात अनेक ठिकाणी केवळ खड्डे झाले होते आणि दुसर्‍या शेतकर्‍याला विहीरीतून पाणी मिळू लागले होते. एखादी प्रत्यक्ष वस्तू आपल्या हाती लागत नसली तरीही (जसे की या उदाहरणात विहीरीचे पाणी), आपल्या श्रद्धेमुळे आपण पुढे चालत राहतो, जसे दुसर्‍या शेतकर्‍याच्या बाबतीत झाले. श्रद्धा ही एक निर्भय सकारात्मक शक्ती आहे आणि ती शंकामुक्त आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धेच्या मागे तो स्वत: आहे आणि त्यामुळे अंतिम निकाल हा यशाचाच मिळतो. आपली नाती, कुटुंबातील संबंध आणि व्यवसाय यावरील श्रद्धेमुळेच आपल्याला चमत्कार घडवून आणण्याची शक्ती मिळते.
तिसर्‍या प्रकारातील भक्तांना आकांक्षांची सीमारेषा ओलांडायची असते. असे भक्त हे चौकस असतात आणि त्यांना स्वत:बद्दलचे ज्ञान प्राप्त करायचे असते. चौथ्या प्रकारचे भक्त हे ज्ञानी असतात आणि त्यांनी इच्छा-आकांक्षांची सीमारेषा खरोखरच ओलांडलेली असते. त्यांना प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसतो आणि ते परमतत्त्वाशी एकरुप झालेले असतात.
0 notes
Video
youtube
शिवसेनेचे उपनगर येथे खड्डे पुजन आंदोलन..
0 notes
Text
पीडब्ल्यूडी का गड्ढा मुक्त ऐप की अपार सफलता के बाद अब कूड़ा मुक्त एप की तैयारी लगता है महाराज जी दून को दुबई बनाकर छोड़ेंगे
देहरादून उत्तराखंड के कैबिनेट मंत्री सतपाल महाराज दूरदर्शी सोच के व्यक्ति हैं वह अक्सर विदेशों में भ्रमण करते रहते हैं और नित्य वहां की नई नई टेक्नोलॉजी अपने प्रदेश में लागू करने के प्रतिदिन प्रयास करते रहते हैं अब वह अलग बात है कि उनकी टेक्निक उनके अधिकारियों के पल्ले नहीं पड़ती और सिर के ऊपर से गुजर जाती है राजधानी देहरादून में ही जगह-जगह सड़कों पर गड्ढे नहीं खड्डे से बुरा हाल है हालांकि महाराज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
पुणे-सोलापूर महामार्गावर जागोजागी खड्डे
https://bharatlive.news/?p=163007 पुणे-सोलापूर महामार्गावर जागोजागी खड्डे
पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
6nikhilum6 · 21 days
Text
Alandi : आळंदी-पुणे रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाआधीच पालिका प्रशासनाने बुजवले; नागरिकांनी मानले आभार
एमपीसी न्यूज : आळंदी मधील देहूफाटा सिग्नल ते (Alandi) धाकटी पादुका पर्यंतच्या आळंदी – पुणे रस्त्यावर ठिकठिकाणी पुन्हा लहान मोठे खड्डे पडले होते. त्या खड्यांमुळे दुचाकी पासून ते चारचाकी वाहनांना रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. आळंदीमध्ये 29 ऑगस्ट रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळे व शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
****
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा, राज्यातल्या ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
हिंगोली तसंच वाशिम जिल्ह्यातल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता वितरीत
आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार जाहीर
****
देश आज आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य राष्ट्रीय सोहळ्यात थोड्याच वेळात ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, त्यानंतर पंतप्रधान देशवासियांना संबोधित करतील. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातून समाजातल्या विविध क्षेत्रातल्या नागरिकांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या १२३ जण असून, त्यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सारिका धन्यकुमार जैन, जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील, परतूर तालुक्यातले रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर यांचा समावेश आहे.
ध्वजारोहण समारंभाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सकाळी सात वाजेपासून प्रसारित होईल.
**
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात, तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधान भवन इथं, सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. राज्यभरात सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटं ते नऊ वाजून पस्तीस मिनिटं, या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असं राजशिष्टाचार विभागानं कळवलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार आवश्यक असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीचं सांगितलेलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या...
“हमें संविधान निर्माता डॉक्टर बी.आर. आंबेडकर के शब्दों को भी सदैव याद रखना चाहिए। उन्होंने ठीक ही कहा था, ‘हमें अपने राजनीतिक लोकतंत्र को सामाजिक लोकतंत्र भी बनाना चाहिए। राजनीतिक लोकतंत्र तब तक नहीं टिक सकता ज�� तक कि उसके आधार में सामाजिक लोकतंत्र न हो।’’
कृषी, क्रीडा, अंतराळशास्त्र, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, आदी विषयांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. जागतिक तापमान वाढीवर उपायासंदर्भात भारत करत असलेल्या उपायांचं त्यांनी कौतुक करत, नागरिकांनाही या क्षेत्रात योगदान देण्याचं आवाहन केलं.
****
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या एकंदर एक हजार ३७ कर्मचाऱ्यांना, शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा काल करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुज तारे यांना शौर्यपदक जाहीर झालं आहे. तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परमसेवा पदक घोषीत झालं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक द्वारकादास भांगे यांना प्रशंसनीय सेवेसाठीचं पदक जाहीर झालं आहे.
****
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गांवरचे खड्डे तातडीने बुजवावेत, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, आदी निर्देशही त्यांनी दिले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही पथकर माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.
****
अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसात ई-पॉस यंत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना धान्य वितरण होऊ शकत नव्हतं. याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या दुकानदारांनी निदर्शनही केली होती. तांत्रिक अडचणीमुळे हे लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या सवना इथल्या अनुराधा नायक, कुशर्वता नायक या दोघांच्या खात्यावर जमा झाला आहे. याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
“मी अनुराधा पद्माकर नायक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मला आज तीन हजार रुपये हप्ता जमा झाला आहे. योजनेनुसार आम्हाला घर ग्रहस्थी सांभाळण्यास मदत होणार आहे, म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. काही महिलांचे फॉर्म भरायचे राहीलेले आहेत, त्यांना सुद्धा मनापासून आवाहन करते की त्यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घ्यावा.’’
वाशिम जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये काल तीन हजार रुपये जमा झाले. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन यांच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या अनुदानामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना, आणि स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना, तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा यांना जाहीर झाला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं अमृत योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत मंजूर नवीन पाणी पुरवठ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या योजनेमुळे शहराला दररोज पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत काल बीड जिल्ह्यातल्या चिंचपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं पंचाहत्तर मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली.
परभणीतही शहर महानगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तिरंगा अभियानाची शपथ दिली. महानगरपालिका आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
**
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आला, प्रत्येकानं देशाला सर्वतोपरी मानून देशाप्रति आपलं कर्तव्य बजावण्यास प्राधान्य द्यायला हवं असं मत स्वामी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
विभाजन विभिषिका स्मृती दिनाच्या औचित्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने काल नांदेड रेल्वे स्थानकावर फाळणीसंदर्भात माहिती देणारं प्रदर्शन लावण्यात आलं होतं. विभागीय प्रबंधक नीती सरकार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. अनेक नागरिकानी या प्रदर्शनाला भेट दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा काल लातूर जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवत, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यानंतर अहमदपूर इथं देखील सुळे यांची सभा सुरु असताना मराठा आंदोलक थेट मंचावर चढले आणि माईकचा ताबा घेऊन, ही मागणी केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. लोहा पंचायत समितीने केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी ही जिल्ह्यातली दुसरी पंचायत समिती ठरली आहे.
****
जलशक्ती अभियानातंर्गत सुरु असलेल्या "कॅच द रेन" मोहिमेत सर्व यंत्रणांनी सहभागी होवून, धाराशिव जिल्हयात ती सक्षमपणे राबवावी, असे निर्देश जलशक्ती अभियानाचे संचालक अशोककुमार यांनी दिले आहेत. काल धाराशिव इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलताना त्यांनी, या मोहिमेला गती प्राप्त करुन देण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याची गरजही व्यक्त केली.
****
श्रमजीवींचं मन आणि जगणं वामनदादा कर्डक यांनी आपल्या लेखणीतून मांडलं, असं मत ज्येष्ठ समीक्षक ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. कर्डक यांच्या जयंतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ��राठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र संचालक दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देवून त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचवण्याकरता धाराशिव जिल्यात तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मेळावा आजपासून तीन सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
गुरुद्वारा चौकातील पादचारी उड्डाणपुल धोकादायक ; खड्डा पडला
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात बनविण्यात आलेला दक्षीण ते उत्तर असा पायी उड्डाणपुल आज घडीमध्ये अत्यंत घातक झाला आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने त्या पुलातील पदचारी रस्त्यावर खड्डे पडून लोखंड बाहेर आले आहे. यामुळे काही घातपात झाला तर त्याचा जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरूद्वारा चौरस्ता येथून दक्षीण-उत्तर हा रस्ता पार करण्यासाठी एक उड्डाणपुल तयार करण्यात आला. जेणे करून श्री.सचखंड हजुर साहिब आणि गुरूद्वारा लंगर साहिब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा व्हावा. परंतू ज्यावेळेस हा पुल तयार करण्यात आला. त्यावेळेस या कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण शासनाचे काम होते आणि त्याच हिशोबाने ते झाले पण. पण या उड्डाणपुलाचा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही एक उपयोग झाला नाही. वर्षभरातून हजारो, लाखोंच्या संख्येत भाविक नांदेडला येतात. बऱ्याच सणांच्यावेळेस हल्ला-महल्ला ही निवडणुक निघते, काही वेळेस नगर किर्तन काढले जाते. त्यावेळी या पुलावर जास्त संख्येत लोकांनी उभे राहु नये म्हणून पोलीसांनाच मेहनत घ्यावी लागते. तरी पण तर काही लोक जातातच. काही वर तर काही पुलाच्या खाली अशा पध्दतीने या पुलाचा उपयोग झाला. जून महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने जुलै महिना मात्र धुवून काढला.त्यामुळे सततधार पाऊस आणि कामाचा दर्जा या दोघांची जोड जमली नाही आणि या उड्डाणपुलावर आता खड्डा पडला आहे. सततधार पाऊस कधी थांबेल याचाही काही नेम नाही. म्हणजे पाऊस आणि पुलाच्या कामाचा दर्जा याला जोडून विचार केला तर भविष्यात या पुलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणाचा घात पातपण होवू शकतो अशा प्रकारचे अनेक पुल खाली पडले आणि त्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर असतांना आता तरी प्रशासनाने हा पुल काढून घ्यावा आणि लोकांना भविष्यातील अपघातापासून वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tumblr media
Read the full article
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
hamslivehindi · 1 year
Link
राजस्थान के हनुमानगढ़ जिले में गांव झांसल-छानीबड़ी के बीच दो कारें खड्डे में गिरने से पांच युवकों की मौत हो गई तथा पांच घायल। सभी मृतक और घायल हरियाणा के कुरुक्षेत्र तथा यमुनानगर जिले के निवासी हैं। आपस में यह सभी दोस्त हनुमानगढ़ जिले में गोगामेडी में लोक देवता गोगा पीर मंदिर के दर्शन करने के लिए आ रहे थे। पुलिस ने बताया कि मृतकों की पहचान चतरसिंह उर्फ सोनू सैनी निवासी गंदापुर थाना छपर,विकास उर्फ विक्की जाट निवासी जीवरेडी, सचिन, राजन निवासी धनगोरी तथा नरेंद्र निवासी लाडवा के रूप में हुई है। घायलों में साहिल, राहुल, आकाश, अरविंद तथा विमल शामिल हैं। पुलिस के अनुसार यह दोनों कारें कल रात हरियाणा से राजस्थान सीमा में प्रवेश करने के कुछ ही देर बाद झांसल- छानीबड़ी के बीच एक मोड़ पर अनियंत्रित हो गईं। दोनों कारें एक दूसरे के पीछे काफी तेज गति से चल रही थीं। मोड पर बेकाबू होकर कारें सड़क से दूर गहरे खड्डे में जा गिरीं। घटना की सूचना मिलते ही भिरानी थाना से सब इंस्पेक्टर रामकरण दलबल सहित मौके पर पहुंचे। पुलिस के मुताबिक तीन युवकों की मौके पर ही मौत हो गई। सात घायलों को प्राथमिक उपचार के बाद हिसार जिले के अगरोहा में स्थित महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल में भर्ती करवाया गया। दो युवक बात में दम तोड़ गये।
0 notes
Text
Sign in Join.. WANI BHUSHAN NEWS INDIA
RNI.Registration No.1313159/mah/17
*Registerd under Publication Act*
And Copyright Registeration Act.
Global Publication Nagpur
Lifestyle:---- Corporate Regd.ACT
Fashion:-- Worldwide
Gaming Always
Fitness Anytime
Video s Anytypes Ready
More than Better than Others.
your username Rajendra G.
Welcome in Ours Corporate Registered. Media Group Always Right?
Welcome!Register for an account
your username Rajendra G.
your email- [email protected]
Homeवणी
वणी
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
By.Suraj Chate
November 22, 2022
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी कायर या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था *
लाखों रुपये खर्च करून बांधला रस्ता *
शासनाला लक्ष देण्याची गरज
सुरज चाटे वणी – वणी ते पुरड या रस्त्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही दिवसांतच संपूर्ण रस्त्याची वाट लागून गेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नागरिकांमध्ये या रस्त्याच्या बांधकामात बाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असल्याने लवकरच रस्ता उखडला अशी चर्चा ऐकिवात येत आहे . प्रत्यक्षात वणी ते पुरड रस्त्याच्या डांबरीकरनासाठी 5875.00लक्ष खर्च करण्यात आले आहे परंतु बांधकाम केलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून रस्त्यावर पसरट खोल दोन दोन चार चार फुटांचे खड्डे पडल्यामुळे ये जा करणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वणी कायर पुरड ,मानकी, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक असून हा मार्ग आंध्रप्रदेश राज्यात जाण्यासाठी जवळचा आहे. या मार्गावर अनेकदा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून आताच रस्त्याचे बांधकामासाठी दिलेला निधी खर्चून बांधकाम पूर्ण केले परंतु जडवाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे त्यामुळे रोज या रस्त्यावर 14 व्हीलर ट्रक चा अपघात होऊन कडेला पडलेले दिसून येत आहे . कारण नुकतेच बांधकाम पूर्ण झाल्याचे बोर्ड लागले आहे. वणी तालुक्यात 19 कॉर्पोरेट कंपन्या असून, एम.पी.बिर्ला कंपनी सह. पैनगंगा, अरूणावती, नवरगांव, बेंबळा, आदी महाप्रकल्पकोळसा खाणी, चुनखडी, ‘डोलामाईट , मॅगनिज, लाईमस्टोन, अभ्रक, सिमेंट आता मोठी रिलायन्स कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतुक होत आहे. त्या जडवाहतुकीच्या टनानुसार रस्त्याचे बांधकाम असायला पाहिजे असे नागरिकांतून बोलल्या जात आहे त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. तसेच या रस्त्यावर बरेच पूल बांधण्यात आले आहे .परंतु या रस्त्यावरून दररोज 500 ते 700 ट्रॅक, बसगाड्या, अठरा व्हीलर, चौदा व्हीलर, ऑटो, ट्रॅक्स, कालिपिवली, तसेच क्षमतेपेक्षा जास्त भरलेली ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे या वाहतुकीमुळे रस्ता उखडला जात आहे. अपघाताचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर अनेकदा डागडुजी करून लाखो रुपये खर्च केले आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ झाले आहे. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी उखडला जात आहे . व उखडविल्या जात आहे.येणा-या निवडणुका लक्षात घेता, बोगस, मांडवली करणारे जनप्रतीनिधी, भ्रष्टाचाराने आकंठ पि.डबलु.डी.व संबंधित अधिकारी, व बेवडे कर्मचारी, यांना लाथा मारून बदडने हे होण्यापुर्वी, , त्वरीत लक्ष घालुन तेव्हा लायकी व थोडीसी लाजलज्जा असेल तर शासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
PREVIOUS ARTICLEराज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
 सर्व हक्क संपादक, मुद्रक, प्रकाशक.. कॉपीराईट
मिडीया मालक:- ब्रम्हाणी दत्ता..(गुंडलवार)
अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार -- मुख्य संपादक
*निवासी संपादक:- नितीन शिंदे*
��� प्रकाशक व मुद्रक:- ग्लोबल पब्लीकेशन, विदर्भ
@ नरेश भाऊ निकम-- सहसंपादक
@ प्रसिद्धी प्रमुख-- प्रविण बेारकर
@उपसंपादक---- अनुप रडके
@विधी सल्लागार--- अॅड.प्रविण पुरी
RELATED ARTICLES
शासनादेश:- प्रलेख, दराडे साहेब, रिटायर्ड कलेक्टर.
वणी विभागीय कार्यालय:- वणी भुषण, न्युज पेपर्स गृप, व भुषण टि.व्ही, न्युज, नटराज चौक, मेन यात्रा रोड, बाजार चौकापुढे, वणी, जि.यवतमाळ.
कायदेे लेखन.व तपासणी- अॅड.कातकडे साहेब.
वणी, मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही* दिवसातच झाली दुरवस्था
Tumblr media
 
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
Tumblr media
 
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
Tumblr media
LEAVE A REPLY
Comment: always welcome
Name:* WANI-BHUSHAN Papers.
BHUSHAN-T.V. CHANNELS.
Website:- www.wanibhushan.org.com
 Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
STAY CONNECTED
0FansLIKE
3,587FollowersFOLLOW
0SubscribersSUBSCRIBE
- Advertisement -
LATEST ARTICLES
वणी
वणी,मानकी, पेटूर ,उमरी , कायर, मुकूटबन या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
UNCATEGORIZED
वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड  
वणी
अडेगाव येथील कोंबड बाजारावर मुकुटबन पोलिसाची धाड….
Load more
RECENT NEWS
वणी
वणी ,मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची काही दिवसातच झाली दुरवस्था
November 23, 2022
वणी
राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध  
November 23, 2022
वणी
कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
November 23, 2022
UNCATEGORIZED
वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड  
November 22, 2022
वणी
अडेगाव येथील कोंबड बाजारावर मुकुटबन पोलिसाची धाड….
November 21, 2022
Load more
wanibhushan, news is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry. Fashion fades, only style remains the same. Fashion never stops. There are always projects, opportunities. Clothes mean nothing until someone lives in them.
Contact- Always us: [email protected]
© Copyright - wanibhushan
Blog wanibhushan.updates
About @wani, vidarbha
1 note · View note