Tumgik
#टी २० विश्वचषक
marathinewslive · 2 years
Text
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
T20 विश्वचषक टीम इंडिया: टी २० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे विरोधात आता सलामीवीर रोहितसह विजयी मैदानात उतरणार अशा चर्चा रंगत आहेत. यावरून उत्तर देत अलीकडेच रोहित शर्माने के. एल राहुलच सलामीवीर असेल असे सांगितले होते. पण तरीही विजयाचा सुधारित फॉर्म शेवटच्या शेवटच्या क्षणी रोहित भिन्न विचार मांडणी अशी सुरुवात आहे. या चर्चांमध्ये भारतातील एका हिंदी वृत्तवाहिनीवर मात्र…
Tumblr media
View On WordPress
#2022 टी20 विश्वचषक भारताचा संघ#ICC T20 WC 2022#ICC T20 WC भारताचे वेळापत्रक#ICC T20 WC भारतीय संघ#ICC T20 विश्वचषक 2022 टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध#t20 विश्वचषक 2022 भारतीय संघाचे लाइव्ह स्ट्रीमिंग#T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ#T20 विश्वचषक भारताचा संघ#T20 विश्वचषक संघाची घोषणा#आयसीसी#आयसीसी टी २० विश्वचषक#आयसीसी टी २० विश्वचषक २०२२#ऑस्ट्रेलिया टी-२० साठी भारतीय संघ#टी २० विश्वचषक दक्षिण आफ्रिका#टी २० विश्वचषक पत्रकार#टी विश्वचषक ऑस्ट्रेलिया#टीम इंडिया टी-20 विश्वचषक संघ#दक्षिण आफ्रिका टी-२० भारतीय संघ#भारत T20 विश्वचषक 2022#भारत टी20 विश्वचषक 2022 संघातील खेळाडूंची यादी#भारत-पाकिस्तान सामना#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 खेळत आहे 11#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 ची घोषणा तारीख#भारताचा T20 विश्वचषक संघ थेट#भारताच्या टी२० विश्वचषक संघ २०२२ चा अंदाज#भारतीय संघ विश्वचषक २०२२#राहुल गांधी#राहुल गांधी क्रिकेट#रोहित शर्मा T20 विश्वचषक#विराट कोहली T20 विश्वचषक
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 06 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात दहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९३ मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, माढा, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार ११५ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी काल जि��्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातल्या विविध कक्षांना भेट देवून मतदानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच त्यांनी लातूर शहरातल्या बार्शी रोडवरील शासकीय महिला निवासी तंत्रज्ञान इथल्या, मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला देखील काल भेट दिली. याठिकाणी मतदान यंत्र वितरण आणि जमा करून घेण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी जय्यत तयारी केली असल्याचं, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी, ओआरएस, प्रथमोपचार पेटी, सावलीसाठी मंडप, खुर्च्यांची व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सोयी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित अर्थात थीम बेस ७३ मतदान केंद्रं असून, विधानसभा मतदारसंघनिहाय युवा, महिला आणि दिव्यांग मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत.
****
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारानं वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
बीड लोकसभा मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे प्रचारासाठी, उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, अंबाजोगाई इथं सभा होणार आहे. शहरातल्या कृषि महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर उद्या दुपारी ही सभा होईल. याशिवाय पंतप्रधान मोदी यांची अहमदनगर इथं, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील, आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे, यांच्या प्रचारासाठी देखील उद्या सभा होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.
तर निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात सात राज्यांमधल्या ५७ मतदारसंघात २५ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, नऊ मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५७ मतदारसंघात उद्यापासून ते १४ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. सातव्या टप्प्यात एक जून रोजी मतदान होणार आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा निहाय एकूण दोन हजार ३५५ केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ११ केंद्रांवर दिव्यांग तर २२ मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.
****
मतदार जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन येत्या  बुधवारपर्यंत सर्व नागरिकांसाठी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे.
****
आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधल्या चार बाय ४०० मीटर रिले स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पात्र ठरला आहे. बहामादमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये दुसर्या फेरीत दुसरं स्थान मिळवून भारतीय महिलांच्या संघानं ही पात्रता मिळवली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना - आयसीसीने काल जाहीर केला. येत्या तीन ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेशात ही स्पर्धा होईल. भारताचा समावेश अ गटात असून, सोबत न्यूझीलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत. भारताचा सलामीचा सामना चार ऑक्टोबरला सिल्हेट इथं होणार आहे.
****
0 notes
Text
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली Team India : आशिया कप, टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर बांगलादेमधील लाजीरवाणा पराभव, भारतीय संघाची कामगिरी ही निराशाजनक होत आहे. पण आता टीम इंडियापुढे एक टार्गेट आले आहे आणि त्यांना ते पूर्ण करावे लागणार आहे. पण हे टार्गेट नेमकं आहं तरी काय आणि त्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावे लागेल, जाणून घ्या… Team India :…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
इऑन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर जोस बटलरला इंग्लंडचा नवीन व्हाईट बॉल कर्णधार म्हणून नियुक्त केले
इऑन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर जोस बटलरला इंग्लंडचा नवीन व्हाईट बॉल कर्णधार म्हणून नियुक्त केले
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी सांगितले की, जोस बटलरची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो इऑन मॉर्गनची जागा घेणार आहे. इंग्लंडचा 2019 50 षटकांचा विश्वचषक विजेत्या कर्णधाराने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बटलर एक दशकाहून अधिक काळ इंग्लंडच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा सदस्य आहे. 2015 पासून तो उपकर्णधार होता.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलियामध्ये २०२०मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकांमध्ये १२ संघाचा सहभाग असणार आहे. टी-२० क्रमवारीतील अव्वल आठ संघाना सरळ प्रवेश देण्यात आला आहे. इतर चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे.
असं आहे वेळापत्रक –  ऑक्टोबर २४- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ऑक्टोबर २४- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
गुजरातला चॅम्पियन बनवल्यानंतर हार्दिकने ‘काहीही झाले तरी टी-२० वर्ल्ड कप जिंका’
गुजरातला चॅम्पियन बनवल्यानंतर हार्दिकने ‘काहीही झाले तरी टी-२० वर्ल्ड कप जिंका’
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या मोसमात इतिहास रचला आहे. आयपीएलच्या पदार्पणाच्या मोसमात जिंकणारा राजस्थान रॉयल्सनंतरचा तो पहिला संघ ठरला आहे. कर्णधार म्हणून आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याला इथेच थांबायचे नाही. आयपीएल जिंकल्यानंतर त्याने यावेळी आपले लक्ष्य भारतासाठी विश्वचषक जिंकणे असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतासमोर विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य आहे कर्णधार…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
मोदींनी धोनीला फोन करुन टी-२० विश्वचषक खेळायची विनंती करावी – शोएब अख्तर १५ ऑगस्ट रोजी त्याने निवृत्ती जाहीर केली | #MSDhoni #ShoaibAkhtar #NarendraModi #T20WorldCup http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/the-indian-prime-minister-may-call-ms-dhoni-and-request-him-to-play-the-t20-world-cup-says-shoaib-akhtar/?feed_id=7528&_unique_id=5f3d129e2cd3e
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
मुंबई - कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना शुक्रवारी भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. हा निर्णय अपेक्षित होता आणि कर्णधार विराट कोहलीचा याला पाठिंबा होता. २०२१ टी -२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत शास्त्री यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. #tarunbharatnews ,#tarunbharat https://www.instagram.com/p/B1Oq3nEhVHZ/?igshid=1114grtdac79o
0 notes
theinvisibleindian · 5 years
Text
तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार
तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार #hellomaharashtra
मुंबई | २०२३ ची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र २०१६ साली भारतात आयोजित केलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत टीडीएस म्हणून कापलेल्या १६० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अन्यथा २०२३ च्या यजमानपदाला मुकावे लागेल, असा इशाराच आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. ही रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे.
आयसीसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आता बीसीसीआयकडे अवघे १० दिवस उरले आहेत. सध्या बीसीसीआय सर्वोच्च…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ICC T20 पुरुषांच्या विश्वचषकात मोहम्मद शमीचा संघात समावेश न केल्याने काँग्रेस नेते संतापले, एफबी पोस्टवरून इशारा
ICC T20 पुरुषांच्या विश्वचष��ात मोहम्मद शमीचा संघात समावेश न केल्याने काँग्रेस नेते संतापले, एफबी पोस्टवरून इशारा
ICC T20 पुरुष विश्वचषक निवड: आगामी आयसीसी टी २० विश्वचषक २०२ ​​साठी भारतीय संघाची घोषणा होती सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया सुधारत आहेत. निर्णायक संकटे फार वापरत नाहीत अगदी सुरक्षित संघ निवडला पण भारताचा अनेक मातब्बरांना मात्र जागा दिली नाही. मोहम्मद, कुलदीप यादव शमी यांचे म्हणणे समाविष्ट न झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावरून आपले उमेदवार निवडले जात नाहीत, तर…
Tumblr media
View On WordPress
#2022 टी20 विश्वचषक भारताचा संघ#ICC T20 WC 2022#ICC T20 WC भारताचे वेळापत्रक#ICC T20 WC भारतीय संघ#ICC T20 विश्वचषक 2022 टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध#t20 विश्वचषक 2022 भारतीय संघाचे लाइव्ह स्ट्रीमिंग#T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ#T20 विश्वचषक भारताचा संघ#T20 विश्वचषक संघाची घोषणा#आयसीसी#आयसीसी टी २० विश्वचषक#आयसीसी टी २० विश्वचषक २०२२#आयसीसी टीम इंडिया सिलेक्शन फाईट्स#ऑस्ट्रेलिया टी-२० साठी भारतीय संघ#टी २० विश्वचषक दक्षिण आफ्रिका#टी २० विश्वचषक पत्रकार#टी विश्वचषक ऑस्ट्रेलिया#टीम इंडिया टी-20 विश्वचषक संघ#दक्षिण आफ्रिका टी-२० भारतीय संघ#भारत T20 विश्वचषक 2022#भारत टी20 विश्वचषक 2022 संघातील खेळाडूंची यादी#भारत-पाकिस्तान सामना#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 खेळत आहे 11#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 ची घोषणा तारीख#भारताचा T20 विश्वचषक संघ थेट#भारताच्या टी२० विश्वचषक संघ २०२२ चा अंदाज#भारतीय संघ विश्वचषक २०२२#मोहम्मद शमी#रोहित शर्मा T20 विश्वचषक#विराट कोहली T20 विश्वचषक
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 09 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरस्थ पद्धतीने सध्या संवाद साधत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथं, तर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या आसेगाव इथून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कैलास नगर इथं पोहोचली. गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज सकाळी या यात्रेला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांनी विविध योजनांची माहिती दिली.
****
महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या घोडेगाव इथून काल विकसित भारत संकल्प यात्रेचं नेतृत्व केलं. जिल्ह्यात आतापर्यंत यात्रेने ८८ गावांना भेट दिली आहे.
****
भारतामध्ये प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकदारासाठी आणि कंपन्यांसाठी वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आर्थिक तंत्रज्ञानाशी संबंधित इन्फिनिटी फोरममध्ये आज दूरस्थ पद्धतीने सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. देशवासियांचं हित हे आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी असल्यावर काय होऊ शकतं, हे भारताच्या आर्थिक विकासानं दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांतल्या परिवर्तनात्मक सुधारणांमुळे जगाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
****
आयसिसशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं आज महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ४५ ठिकाणी छापे मारले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक -  एटीएसच्या मदतीने एनआयए अनेकांना अटक करुन चौकशी करत आहे. हे आरोपी आयसिसकडून देशात दहशतवादी कट रचण्याच्या प्रयत्नात होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे खाजगी अर्ज भरण्याची मुदत अतिविलंब शुल्कासह ११ ते २० डिसेंबर दरम्यान वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रति दिन प्रति विद्यार्थी २० रूपये विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नवमतदारांच्या जागृतीसाठी ब्लॉगर्स, व्लॉगर्स, युट्यूबर्स, विविध समाज माध्यमात कार्यरत सोशल मिडिया स्टार्स यांनी जनजागृतीसाठी पुढे यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्याची लोकसंख्या ३३ लाखांपेक्षा अधिक आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता नवमतदार युवकांची संख्या ही ६० हजारांपेक्षा अधिक असायला पाहिजे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निवडणूक विभाग ग्रामपातळीपासून प्रयत्नशील असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. सर्वांच्या प्रयत्नातून मतदानाला पात्र असूनही ज्यांनी अजून मतदान कार्ड तयार केलेले नाहीत त्यांनाही या प्रक्रियेशी जुळून घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
पौष्टिक तृणधान्याचं आहारातलं महत्व युवकांना पटवून देण्यासाठी, त्याचा वापर दैनंदिन आहारात वाढवण्याच्या दृष्टीने बीड इथं जिल्हा युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडे आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही रॅली निघेल. जिल्ह्यातली कृषी महाविद्यालयं, कृषी विद्यालयं, कृ��ी कार्यालय, शाळा आणि इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाही होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केलं आहे.
****
राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर इथं राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. आजपासून ११ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी आठ विभागातून ३२०, खेळाडू आणि ३२ क्रीडा मार्गदर्शक तसंच संघ व्यवस्थापक सहभागी होत आहेत.
****
मलेशियात सुरु असलेल्या एफआयएच हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा साखळी सामना कॅनडा सोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मुंबईत खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. इंग्लंडचा संघ मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र आजच्या कामकाजाच्या यादीत ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नसून, उद्याच्या यादीत समावेशासाठी ठाकरे गटाला पुन्हा विनंती करावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर देखील उद्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणं, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.
***
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटानं आज विधीमंडळात शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्याचं वृत्त आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार यावेळी उपस्थित होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
भाजप आणि शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण ठरलेलं असून, योग्य वेळी ते जाहीर करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये, असं फडणवीस यांनी नमूद केलं.
***
रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात २०२३ - २४ या वर्षात रेल्वेविकासासाठी सुमारे १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन म्हणून तर विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. औरंगाबाद तसंच जालना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी अनुक्रमे ३९० आणि १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अमृत स्थानकांमध्ये औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, आणि अहमदनगरसह भोकर, गंगाखेड, धर्माबाद, हिमायत नगर, मानवत रोड, मुदखेड, परळी वैजनाथ, परतूर, पुर्णा, रोटेगाव, सेलू, उमरी, किनवट, आदी स्थानकांचा समावेश आहे.
***
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोविड नंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून दोन लाख ६० हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने रद्द केला असून, परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटं देण्यात येणार आहेत. परीक्षेचं साहित्य केंद्रांना वितरीत झालं असून, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं, असं आवाहन शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागीय सचिव व्ही व्ही जोशी यांनी केलं आहे.
***
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातली १३ विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांतल्या कर्मचाऱ्यांना सापत्न वागूणक दिली जात असल्याच्या विरोधात हा बेमुदत संप करण्याचा निर्धार कर्मचारी महासंघानं केला असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे.
***
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा साखळी सामना आयर्लंडसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत भारत आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून ग्रूप बी मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
***
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी के. एल. राहुल तसंच जसप्रित बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. राहुलला कसोटी संघाच्��ा उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. इंदूर आणि अहमदाबाद इथं हे सामने खेळले जाणार आहेत.
***
राज्यभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं आज आणि उद्या कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाळा लवकर आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.
***
औरंगाबाद शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या विटांच्या वाहतुकीवर शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. विटांची वाहतूक आता पहाटे चार ते सकाळी साडे सात या साडेतीन तासांतच करता येणार आहे.
//*************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून विधिज्ञ हरीश साळवे युक्तिवाद करत आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना त्यांनी, आमदारांना २५ जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असं नमूद केलं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला, असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. कायदा पक्षांतर बंदीसाठी आहे, मतभेदांसाठी नाही, असा युक्तीवाद साळवे यांनी केला. पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही, असं ते म्हणाले. सुनावणीच्या काल पहिल्या दिवशी घटनापीठानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकला. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, नबाम राबिया प्रकरण, आमदारांची अपात्रता या मुद्यांवर हा युक्तिवाद केंद्रीत होता.
***
देशात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण असून, तरुणांनी पुढील पिढीच्या औद्योगिक क्रांतीसाठी नवनवीन शोध घेण्याचं आवाहन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. बंगळूरुमध्ये सुरू असलेल्या एअरो शोच्या मंथन कार्यक्रमात ते आज बोलत होते. मंथन हे व्यासपीठ संरक्षण आणि एअरो स्पेस क्षेत्रातल्या नवकल्पना, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, गुंतवणुकदार या सर्वांना एकाच छताखाली आणत असून, भारत पुढच्या २५ वर्षात जगातली सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनेल, त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर राहील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
***
अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित महागाईच्या वार्षिक दरात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात घट झाली आहे. डिसेंबर २०२२ हा दर चार पूर्णांक ९५ शतांश टक्के होता, तो जानेवारी महिन्यात चार पूर्णांक ७३ शतांश टक्के % झाला आहे. जानेवारी महिन्यात महागाईच्या दरात प्रामुख्याने खनिज तेल, रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, कापड, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू, वस्त्रं आणि अन्न उत्पादनांमुळे घट झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्य इमारतीसमोर काळ्याफिती लाऊन निदर्शनं केली. कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातल्या सर्व विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी यावेळी मांडली.
***
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातल्या महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी तुळजापूर इथल्या स्थानिक महिलांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकार पूजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी दोन दिवसांपूर्वी केली आहे.
***
औरंगाबाद नजिक जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र कचनेर इथं उद्या १६ ते २४ फेब्रुवारी दरम्यान, नऊ जैन तीर्थंकराच्या मूर्तींचा पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव तसंच महामस्तकाभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आर्ष मार्ग संरक्षक प्रज्ञा योगी जैनाचार्य आचार्य गुप्तिनंदी गुरुदेव संघाच्या पावन सानिध्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
***
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात आज सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. "आरोग्यासाठी सायकल, सर्वांगीण निरोगी आरोग्याचं ध्येय निश्चीत गाठू" असं यंदाच्या सायक्लोथॉनचं घोषवाक्य आहे. तुळजापूर तालुक्यातल्या माळंब्रा इथल्या आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात या सायक्लोथॉनचा शुभारंभ करण्यात आला असून, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
***
दुबई मध्ये सुरू असलेल्या यंदाच्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारतानं काल ‘ब’ गटातल्या आपल्या पहिल्या लढतीत कझाकस्तानवर पाच - शून्य असा विजय नोंदवला. भारताचा आजचा सामना यजमान यू ए ई विरुद्ध होईल. तर पीव्ही सिंधू आणि तिचे सहकारी उद्या मलेशियाविरुद्धचा अंतिम सामना खेळतील.
***
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला ��ोता.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
 विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता शांततेत मतदान
 संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं आवाहन
 उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभर अभिवादन
आणि
 टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर 
****
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होवून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदानाची चार वाजेची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसून आल्या. नदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुलच्या केंद्रावर चार वाजेनंतर तीनशेहुन अधिक मतदार रांगामध्ये असल्यानं त्यांना चिठ्ठी देण्यात आली. मतदानाची अंतिम वेळ उलटुन गेल्यानंतरही याठिकाणी मतदान सुरु होतं. दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी प्राप्त झाली असून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी २८ टक्के मतदान झालं. नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या ६ जिल्ह्यांमध्ये साठ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं. नाशिक पदवीधर मतदार संघात ३१ पूर्णांक ७१ टक्के तर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात ५८ पूर्णांक २७ टक्के मतदान झालं. अमरावती पदवीधर मतदार संघात ३० पूर्णांक ४० टक्के मतदान झालं आहे.
****
संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. अधिवेशनादरम्यान सरकार कुठल्याही मुद्द्यावर या अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामरम करीम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, आम आदमी पक्षीचे संजय सिंह आदी नेते यावेळी उपस्थित होते.
      संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्याच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कक्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. आणि दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण पटलावर मांडण्यात येईल. केंद्रीय अर्थसंकल्प परवा १ फेब्रुवारीला सादर होईल.
अधिवेशनाचं पहिलं सत्र १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात संसदेच्या विविध विभागांच्या समित्यांना वित्त मागण्यांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक त्या बैठका होणार आहेत. त्यानंतर अधिवेशनाचं पुन्हा सुरु होणारं दुसरं सत्र ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे.
***
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७५ व्या पुण्यतिथी निमित्त आज देशभर अभिवादन करण्यात आलं. त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान तसंच लष्कराच्या तिन्ही विभागाचे प्रमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना राजघाट इथल्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवनमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी तसंच हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ‘महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटी’ या विषयावरील माहितीपट दाखवण्यात आला.
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन श्रध्दांजली वाहण्यात आली.
***
मुंबईत आयोजित पहिल्या मॉडेल जी २० शिखर परीषदेचं भारताचे जी २० शेर्पा अमिताभ कांत आणि इंडोनेशियाचे मंत्री समुपदेशक एको जुनोर यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक जयंत कुलकर्णी आणि मॉडेल जी २० चे संचालक देवेंद्र पै उपस्थित होते. रामभाऊ म्हाळगी प्रबधिनीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रॅटिक लीडरशिप भारतात पहिल्या मॉडेल जी २० चं आयोजन करून भारताचं अध्यक्षपद साजरं करत आहे.
एकूण १६१ प्रतिनिधींनी जी २० देश, निरीक्षक राष्ट्रे आणि संघटना यांची भूमिका गृहीत धरून जागतिक शांतता, शाश्वत विकास, जागतिक अर्थव्यवस्था आणि सर्वसमावेशकता या विषयांवर चर्चा केली. या पहिल्या मॉडेल जी २० शिखर परिषदेत ‘जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हानं’ या संकल्पने अंतर्गत लिडर ट्रॅक, शेर्पा ट्रॅक, फायनान्स ट्रॅक आणि सिव्हिल ट्रॅक या ४ ट्रॅकद्वारे चर्चा करण्यात येईल.
***
भारतीय जनता पक्षा��ं आपल्या राजकीय फायद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचं काम केलं. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा प्रेमानं जोडलं आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं आहे.
महागाई, बेरोजगारी तसंच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा चार हजार किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आज पोहोचली. श्रीनगर इथे ध्वजारोहण करून या यात्रेचा समारोप झाला.
 या यात्रेच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयात नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.
***
भारताच्या १९ वर्षांखालच्या भारतीय महिला संघानं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानं, संघाला पाच कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडू देशातल्या युवकांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणा ठरल्या आहेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर, हे यश उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी म्हटलं आहे.
***
शेत जमीन मोजण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मारुती घाटोळ या भूमापकासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज दुपारी ही कारवाई केली. वसमत शहरातील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात घाटोळ हा भूमापक म्हणून कार्यरत आहे. त्यानं शेत जमीन मोजण्यासाठी एका शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारण्यासाठी मदत करणारा घाटोळचा मित्र चंदू भेदेवाड यालाही पथकानं ताब्यात घेतलं आहे.
***
भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून अन्न पदार्थ म्हणून त्याची निवड करणं ही काळाची गरज आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये आयोजित दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेत आज ते बोलत होते. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचं  मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
***
नांदेड -एर्नाकुलम नांदेड  आणि पूर्णा ते तिरुपती या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. नांदेड ते एर्नाकुलम ही विशेष गाडी नांदेड इथून ३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता नांदेडहून सुटेल. एर्नाकुलम इथं शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता पोहोचेल. तर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटानी एर्नाकुलम इथून निघून रविवारी सकाळी साडे सात वाजता ती नांदेडला पोहोचेल.
//***********//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन
दाओसमध्ये विविध उद्योगांशी संबंधित एक लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील- मुख्यमंत्र्यांना विश्वास
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान; नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना  परळी न्यायालयाकडून ५०० रुपये दंड, अटक वॉरंट रद्द
महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी औरंगाबादचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
रायगड जिल्ह्यात माणगावच्या रेपोली गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू  
आणि
शुभमन गिलच्या रोमांचक द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारताचा पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, १९ वर्षांखालील मुलींच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताची स्कॉटलंडवर ८३ धावांनी मात
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतल्या २० नवीन दवाखान्यांचं लोकार्पण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सात मल जल प्रक्रिया केंद्रांचं भूमिपूजन, महानगरपालिकेच्या तीन रुग्णालयांच्या इमारतींचं भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंभ, तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, त्यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचं उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दाओस दौऱ्यात विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दाओस दौऱ्यावरून परतल्यावर ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. हा दौरा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले..
दावोसची जी व्हिजीट होती, त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे. खऱ्या अर्थाने जे फलित आहे, दावोसच्या दौऱ्याचं, त्याच्यामधून राज्यासाठी जवळपास एक लाख सदोतीस हजार कोटीचे एम ओ यू झालेले आहेत. आणि हा दौरा जो आहे तो अतिशय फ्रुटफुल ठरलेला आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आणि आपल्या भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमि फोरमवर छाप पहायला मिळाली
****
नदीमार्गे जलप्रवास करणारं जगातलं सर्वाधिक लांबीचं गंगा विलास हे जहाज काल बिहारमधल्या मुंगेर इथं पोहचलं. मूळ नियोजित प्रवास आराखड्यानुसार हे जहाज बेगूसराय मधल्या सिमरिया इथं जाणार होतं, मात्र सुधारित आराखड्यांत मार्ग बदलण्यात आला आहे. या जहाजातल्या प्रवाशांनी काल बिहार योग विद्यालयासह मुंगेर परिसरातल्या अन्य ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.
****
इच्छामरणाबाबतचा निर्णय 'व्यावहारिक' असण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. यासंदर्भात २०१८ च्या न्यायालयीन निकालात रुग्णांच्या राहणीमानात मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी 'किंचित सुधारणा' करण्याची गरज असल्याचं, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठानं म्हटलं होतं. मृत्यूपत्र बनवून ठेवलेल्यांना, सन्मानानं मृत्यू मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, तसंच ज्या गंभीर आजारी रु��्णांना उपचार नको आहेत, त्यांच्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी विधिमंडळांवर आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे.
****
राज्यात पुण्यातल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. याठिकाणी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, दोन मार्च ला मतमोजणी होणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या जागा रिक्त झाल्या आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगानं नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित केल्या आहेत. याबरोबरच विविध राज्यांच्या विधानसभेच्या सहा आणि लक्षद्वीप लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुकीची घोषणाही निवडणूक आयोगानं केली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे पुत्र फराज यांच्या विरोधात बनावट व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात मुंबई विशेष गुन्हे शाखेकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ५०० रुपये दंड ठोठावत परळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. चिथावणीखोर वक्तव्यप्रकरणी परळी न्यायालयानं ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. यासाठी ते काल परळी न्यायालयासमोर हजर झाले होते. या प्रकरणावर आता २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ठाकरे यांनी परळी दौऱ्यात गोपीनाथ गडावर जाऊन माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली.
****
महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी औरंगाबादचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले आहेत. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र काल जारी केलं. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार हे निलंबन करण्यात आलं असून, जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तो पर्यंत विशाल ढुमे याला औरंगाबाद पोलीस मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
मुंबई - गोवा महामार्गावर प्रवासी मोटार आणि मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात माणगावच्या रेपोली गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला.
****
राज्यात सरल प्रणालीद्वारे शालेय विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची असून, सप्टेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या अहवालानुसार २६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड वैध असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यासंदर्भात काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत ही संख्या शून्यावर आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे चार महिन्यात २६ लाख विद्यार्थ्यांचे अवैध आधार वैध कसे झाले, अशी विचारणा न्यायालयानं केली आहे. या आदेशात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. या संदर्भात पुढची सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.
****
औरंगाबाद शहरात अवैध होर्डिंग्ज लावल्याबद्दल आकारला जाणारा दंड वाढवण्यासंदर्भात महानगरपालिकेनं नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत खंडपीठाने, बेकायदा होर्डिंग्जचा शोध घेण्यासाठी वॉर्डनिहाय किती भरारी पथकं स्थापन केले, याची माहिती देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात पुढची सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार असून, त्यावेळी महापालिकेने शहरात होर्डिंगसाठी कुठे आणि किती जागा निश्चित केल्या, याची माहिती सादर करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
****
संगीतकार, गायक, अभिनेते पद्मभुषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं आजपासून दोन दिवसीय संगीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याच महोत्सवात फुलंब्रीकरांच्या १२६ व्या जयंती दिनी म्हणजेच उद्या २० जानेवारीला संत सावता माळी शैक्षणीक संकुलात फुलंब्रीकरांच्या नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पणही भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. फुलंब्री इथल्या संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर देश एकसंघ ठेवून त्याला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, असं मत, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नाटककार तथा प्रसिद्ध विचारवंत, प्रा.दत्ता भगत यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली इथं बौद्ध संस्कृती मंडळाच्या वतीनं आयोजित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत, "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातील राहून गेलेल्या गोष्टी", या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना भगत काल बोलत होते. सर्वसामान्य जनतेतून लोकप्रतिनिधी निवडले जावेत आणि सर्वसामान्य जनतेला एकाच मताचा अधिकार असावा ही मांडणी डॉ आंबेडकर यांनी केल्याचंही भगत यांनी सांगि���लं.
****
मेळघाटातल्या आदिवासी समाजाचं प्रेम ही कार्याची प्रेरणा ठरली, असं  पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितलं. औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विवेकानंद व्याख्यानमालेत, मेळघाटातील प्रबोधन पर्व या विषयावर ते काल बोलत होते. आपल्यावर झालेले समाजसेवेचे संस्कार पालक, शिक्षक आणि चांगल्या पुस्तक वाचनातून झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी डॉ. कोल्हे यांच्या संस्थेच्या कार्यासाठी विवेकानंद शिक्षण संस्था आणि कर्मचार्यांच्या वतीने दोन लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.  
****
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास, नवी पिढी सक्षम भविष्य घडवेल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला आहे. मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांना ग्रंथालयाचे सभासद होण्याचा उपक्रम, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे, काल कुसुम माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचा आरंभ घुगे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रपुरुषांची चरित्रे, प्रवास वर्णन, तसंच विज्ञान, कला, संस्कृती या विषयावरील गोष्टीरूप पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत, असं त्यांनी  यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी बेटी बचाव-बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कालपासून ते येत्या २४ जानेवारी या राष्ट्रीय बालिका दिनापर्यंत, जनजागृती सप्ताह राबवला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. लिंग निवडीस प्रतिबंध करणं, मुलीच्या शिक्षणाबाबत आणि त्यांच्या जीवनमानाच्या सुरक्षितेबद्दल खात्री देणं हा या जनजागृतीचा उद्देश असल्याचं त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत सांगितलं.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी परीक्षा भवनात डिजिटल व्युक्यूबेशन सेंटरचं उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते काल झालं. या केंद्रात १५ संगणकावर तीन हजार उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन होईल. या प्रक्रियेमुळे निकालात अधिक पारदर्शकता, गतीमानता आणि सुसूत्रता येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरु येवले यांनी यावेळी दिली.
****
आगामी जी-20 परिषदेनिमित्त औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या विविध सुशोभीकरण आणि सौंदर्यकरणाच्या कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी काल पाहणी केली.
दरम्यान, चौधरी यांनी काल एका बैठकीत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या आढावा घेतला. नवीन जलवाहिनी टाकताना बाधित होणारी मालमत्ता, विजेचे खांब आणि जमिनीच्या खालून गेलेले केबल स्थलांतर करण्याबाबत त्यांनी आढावा घेतला.
****
शुभमन गिलच्या रोमांचक द्वी-शतकी खेळीच्या बळावर भारतानं पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय मिळवला. काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत ३४९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या शुभमन गिलने १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकारांच्या सहाय्याने द्वीशतक झळकावलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ शेवटच्या संघात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद सिराजनं चार, शार्दुल ठाकूर आणि कुलदिप यादवनं प्रत्येकी दोन, तर हार्दिक पंड्यानं एक गडी बाद केला. 
शुभमन गिल द्वीशतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, आणि ईशान किशन या भारतीयांनी एकदिवसीय सामन्यात द्वीशतकी खेळी केली आहे.
या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी रायपूर इथं खेळला जाणार आहे.
****
१९ वर्षांखालील मुलींच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं काल स्कॉटलंडचा ८३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचा करत भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत भारतानं चार बाद १४९ धावा करत, स्कॉटलंड संघाला दीडशे धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना, स्कॉटलंडचा संघ तेरा षटकं आणि एका चेंडूत ६६ धावांवर सर्वबाद झाला. चार षटकांत बारा धावा देऊन चार बळी घेणारी मन्नत कश्यपनं सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
****
औरंगाबाद इथलं शासकीय नेत्र रुग्णालय चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. हे नेत्र रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत स्थलांतरित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमखास इथल्या नेत्र रुग्णालयाच्या जागेवर कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी शासनस्तरावरुन यापूर्वीच नविन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानं नेत्र रुग्णालय स्थलांतरण करणं गरजेचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या आसना आणि कयाधू या दोन नद्यांची निवड करण्यात आली आहे. जनतेला या उपक्रमात सामावून घेण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नदी पुनरुज्जीवनाच्या चळवळीतील लोकसहभाग वाढेल असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२२-२३ ची ई-पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी आजपासून तीन दिवस विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून या विशेष मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन, १०० टक्के ई-पीक नोंदणी करावी, असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी काल पत्रकार परिषदेत केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी
जी 20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक पुण्यात सुरू
दूरस्थ मतदान यंत्र वापरण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांचा विरोध 
पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास प्रभाग अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना
जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला पोहोचले. एक लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार होणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी
मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळा प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू
आणि
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी विजय
****
विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यात पाच जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या जागांसाठी ३० जानेवारीला मतदान होणार असून, मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. काल डॉ.गणेश शेटकर या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, भारतीय जनता पक्षाचे किरण पाटील, वंचित बहुजन आघाडीचे कालिदास माने, यांच्यासह १४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोळुंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पक्षाने सूचना देऊनही त्यांनी अर्ज मागे न घेतल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
कोकण शिक्षक मतदार संघात आठ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्यासह विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात असून, काल पाच जणांनी माघार घेतली. या मतदारसंघातून विद्यमान आमदार ना. गो. गणार यांना भाजपानं पाठिंबा दिला आहे. नागपूर शिक्षक मतदार मतदार संघातले राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश इटकेलवार यांना  अर्ज मागे घेण्याची सूचना पक्षाने केली होती. मात्र त्यांनी अर्ज मागे न घेतल्यानं, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
नाशिक पदवीधर मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात असून, सहा जणांनी माघार घेतली. शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिला आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी भाजपासह महाविकास आघाडीतल्या पक्षांकडे पाठिंब्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. भाजपानं याठिकाणी एकाही उमेदवाराला अजून पाठिंबा जाहीर केलेला नसून ��ोग्यवेळी निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अमरावती पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक २३ उमेदवार रिंगणात असून दहा जणांनी माघार घेतली आहे. विद्यमान आमदार रणजीत पाटील यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीनं धीरज लिंगाडे यांना पाठिंबा दिला आहे.
****
जी 20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक कालपासून पुण्यात सुरू झाली. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं. जी 20 परिषदेच्या माध्यमातून देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असल्यानं, जागतिक विकासाच्या पातळीवर देश पाचव्या स्थानापर्यंत पोहोचण्यास त्याचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास, राणे यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. आगामी तीन वर्षात देश जगातल्या पाच प्रमुख राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
या परिषदेत काल शहरीकरण या विषयावर विविध परिसंवाद झाले, तर संध्याकाळच्या सत्रात सावित्रीबाई फुले विद्यापीठात, जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जागतिक भरड धान्य वर्षानिमित्त बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचं महत्त्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे पर्यटन उपक्रम, सहलींविषयीचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
कोविड लसीकरण मोहिमेला काल दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली मोहीम ‘सबका प्रयास’ या मंत्रामुळे यशस्वी झाली असून, ही लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील, असं मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर, तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं. देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या दोनशे वीस कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.
लसीकरण मोहिमेमुळे जगाला भारताच्या सामर्थ्याचा आणि लोकसहभागाचा परिचय झाला असल्याचं मत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं.
****
गंगाविलास या जहाजाचा प्रवास निर्विघ्नपणे सुरू असून, हे जहाज नियोजित वेळापत्रकानुसार काल पाटणा इथं पोहोचलं. हे जहाज गंगापात्रात कमी पाण्याच्या भागात अडकल्याच्या बातम्या निराधार असल्याचं आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बंडोपाध्याय यांनी सांगितलं. २२ जानेवारीपर्यंत हे जहाज बिहारमधल्या विविध स्थळांना भेटी देणार आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, पंजाबसह देशातल्या काही शहरांमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची दाट शक्यता, गुप्तचर संस्थांनी वर्तवली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आणि इस्लामिक स्टेट अल कायदा या संघटनांनी षडयंत्र रचल्याची माहिती, आयबी या गुप्तचर संघटनेनं दिली आहे. अन्सार उल बांगला आणि जमात उल मुजाहिदीन या दोन बांगलादेशी संघटनांसह शीख दहशतवादी गट आणि रोहिंग्यांचे हस्तक यासाठी सक्रीय असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना या संघटनांवर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
****
दूरस्थ मतदान यंत्र वापरण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. या यंत्रांबाबत चर्चा करण्यासाठी आणि या यंत्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आयोगानं, काल सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि महासचिवांची नवी दिल्लीत बैठक बोलावली होती. शहरी भागात मतदान होण्याचं प्रमाण कमी आहे, तिथल्या मतदारांची उदासीनता दूर करण्यासाठी आयोगानं प्रयत्न करावे, असं विरोधकांनी म्हटलं आहे.  
****
पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास संबंधित महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यालाच यापुढे जबाबदार धरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. दुकाने आणि पदपथावरील अतिक्रमणाचे अडथळे दूर करण्याच्या धोरणाबद्दल माहिती सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले असून, याबाबतची सुनावणी दोन आठवड्यांकरता तहकूब केली आहे. मुंबईतल्या काही दुकानदारांनी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत केलेल्या या याचिकेच्या कालच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं ही याचिका स्युमोटो याचिकेत रुपांतरित केली. पदपथ हे काही फेरीवाला क्षेत्र नाहीत, त्यामुळेच त्यांना फेरीवाला धोरण लागू होत नाही, असं परखड निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. मुंबईसारख्या शहरात रस्त्यांवरचे पदपथ चालण्यायोग्य नसणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
स्वित्झर्लंड मधल्या दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोस इथं पोहोचले. या परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत एक लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न राहील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली असून, आज त्यावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मागच्या सुनावणीवेळी शिंदे गटातर्फे खासदार महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली होती, आज ठाकरे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या पेरमिली उपपोलिस ठाण्यांतर्गत येडमपल्ली गावानजीकच्या जंगलात विशेष अभियान पथकाच्या जवानांची काल नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावत त्यांची काही शस्त्रं आणि अन्य साहित्य जप्त केलं.
****
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची काल सक्तवसुली संचालनालय - ईडीनं चार तास चौकशी केली. कोरोना काळातील कंत्राट मंजूर प्रकरणी आणि कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करु अशी प्रतिक्रिया चहल यांनी दिली आहे.
****
मराठवाड्यात गेल्या वर्षी झालेल्या तीस-तीस घोटाळा प्रकरणाची सक्तवसुली संचालनालय-ईडीने माहिती मागवली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान गुन्हे शाखेला या प्रकरणातला मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडलेल्या डायरीत अनेक राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाव असल्याचं समोर आलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचं अमिष दाखवून संतोष राठोडने 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवण्याची योजना आणली. या योजनेद्वारे बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज मिळण्याच्या अपेक्षेनं लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले होते. यातील मुख्य आरोपी संतोष राठोड अजूनही औरंगाबाद इथल्या हर्सूल कारागृहात असून, त्याला जामीन मिळालेला नाही. दरम्यान, या डायरीत राजकीय नेत्यांमध्ये अंबादास दानवे यांचंही नाव समोर आलं आहे, मात्र दानवे यांनी हा आरोप फेटाळून लावला.
****
दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात आणले जाणार आहेत. मध्य प्रदेश सरकारने सामाजिक माध्यमावर ही माहिती दिली. या चित्त्यांना २५ जानेवारीला दिल्लीहून ग्वाल्हेरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर ग्वाल्हेरहून २६ तारखेला हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात येणार आहे. यामध्ये सात नर, तर पाच मादी चित्त्यांचा समावेश आहे. हे चित्ते आणण्यासाठी केंद्रीय वन महासंचालक चंद्र प्रकाश गोयल, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण सदस्य सचिव एसपी यादव आणि केंद्रीय वन मंत्रालयाचे इतर अधिकारी दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातले डॉ. शुभम धुत यांना २०१९-२० यावर्षीचा केंद्र सरकार तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्नाटक राज्यात हुबळी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते काल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या औरंगाबाद इथल्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याला प्रथम न्याय वर्ग दंडाधिकार्यांनी २५ हाजर रुपयांच्या जातमुचलक्यावर काल जामीन मंजूर केला. ढुमे याच्यावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल मुंबईला पाठवण्यात अल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना इथल्या एका मुख्याध्यापकाचा काल अपघाती मृत्यू झाला. रामदास जावळे असं त्यांचं नाव असून, औरंगाबाद मार्गावरील गेडार टी-पाईंटवर जावळे यांच्या दुचाकीची भरधाव ट्रकशी धडक झाली, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
परभणी इथं येत्या एक फेब्रुवारीपासून सय्यद शाह तुराबुल हक ऊर्स भरणार आहे. या काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. उर्सच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे ऊर्स काळात महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधांचं शुल्क वक्फ बोर्डाला भरावं लागणार आहे. यापूर्वीची थकबाकी आणि यावर्षीचं शुल्क मिळून १४ लाख रुपये महानगर पालिकेकडे जमा करण्याचं आवाहन मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी या बैठकीत वक्फ बोर्डाला केलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे तीन वर्षाच्या खंडानंतर हा ऊर्स भरणार आहे.
****
भारताला महासत्ता बनवण्यासाठी भेदाभेद नीती टाळली पाहिजे, असं मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विवेकानंद व्याख्यानमालेचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. यात 'बदलते विश्व' या विषयावर व्याख्यान देताना केतकर बोलत होते. देशात दोन प्रदेशांमधला, दोन धर्मांमधला कथित अस्मितेचा संघर्ष असाच सुरु राहीला, तर भारताचे तुकडे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या व्याख्यानमालेत आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं 'स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
दक्षि�� आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा १२२ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारत ड गटात अव्वल स्थानावर आहे. विजयासाठी २२० धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या युएई संघाला वीस षटकात ५ बाद ९७ धावांपर्यंत मजल मारता आली. तत्पूर्वी भारतानं तीन बाद २१९ धावा केल्या. श्वेता शेखावतनं ४९ चेंडूत ७४ धावा केल्या. कर्णधार शेफाली वर्मानं ३४ चेंडूत ७८ धावा केल्या तर रिचा घोषनं ४९ धावा केल्या.
****
हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत काल दुपारी राउरकेला इथं बिरसा मुंडा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मलेशियानं चिलीवर तीन-दोन अशी मात केली. तर, दुसऱ्या सामन्यात नेदरलँडनं न्यूझीलंडचा ४-० असा पराभव केला.
****
0 notes