Tumgik
#ढाका
aryasamaj0 · 10 months
Text
Tumblr media
0 notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या ���स्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघां��ा एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
techahad · 2 years
Text
दूसरा टेस्ट, दूसरा दिन: भारत ने पहली पारी में बनाए 314 रन, बांग्लादेश अभी भी 80 रन पीछे
दूसरा टेस्ट, दूसरा दिन: भारत ने पहली पारी में बनाए 314 रन, बांग्लादेश अभी भी 80 रन पीछे
1 of 1 khaskhabar.com : शुक्रवार, 23 दिसम्बर 2022 6:09 PM ढाका | मीरपुर में शेर-ए-बांग्ला नेशनल क्रिकेट स्टेडियम में खेले जा रहे दूसरे टेस्ट के दूसरे दिन शुक्रवार को ऋषभ पंत और श्रेयस अय्यर के अर्धशतक के दम पर भारत 314 रन बनाने में सफल रहा। इस तरह से बांग्लादेश के खिलाफ 87 रन की बढ़त हासिल की। वहीं, दूसरे दिन का खेल खत्म होने तक बांग्लादेश ने छह ओवर में बिना कोई विकेट गंवाए सात रन बना लिए है।…
Tumblr media
View On WordPress
6 notes · View notes
rightnewshindi · 5 days
Text
बांग्लादेश पुलिस ने पूर्व योजना मंत्री एमए मन्नान को किया गिरफ्तार, अब तक 32 नेता, मंत्री और सांसद पहुंच चुके हैं जेल
बांग्लादेश पुलिस ने पूर्व योजना मंत्री एमए मन्नान को किया गिरफ्तार, अब तक 32 नेता, मंत्री और सांसद पहुंच चुके हैं जेल #news #viral #trending #update #newspaper #breakingnews #currentaffairs #dailynews #newsletter #newspapers #newsupdate #People #Media
Bangladesh News: बांग्लादेश में पूर्व योजनामंत्री एमए मन्नान को कल रात गिरफ्तार कर लिया गया। वह फिलहाल पुलिस हिरासत में हैं। अपदस्थ प्रधानमंत्री शेख हसीना के पांच अगस्त को देश छोड़ने के बाद से अब तक करीब 32 पूर्व मंत्रियों, सांसदों और अवामी लीग के शीर्ष नेताओं को गिरफ्तार किया जा चुका है। ढाका से छपने वाले बांग्ला अखबार (अंग्रेजी संस्करण) प्रोथोम अलो की खबर के अनुसार, सुनामगंज के पुलिस अधीक्षक…
1 note · View note
deshbandhu · 12 days
Text
Pramukh Kshetron Mein Sudhaar ke lie Bangladesh ki Antarim Sarakar ne Pesh ki Yojana
ढाका। बांग्लादेशी अंतरिम सरकार के मुख्य सलाहकार मुहम्मद यूनुस ने पदभार संभालने के बाद से देश में कानून की रक्षा और संकटग्रस्त अर्थव्यवस्था को मजबूत करने के लिए कार्रवाई की है। सिन्हुआ समाचार एजेंसी की रिपोर्ट के अनुसार, बांग्लादेश में सुधार के अपने प्रयासों के तहत, यूनुस ने बुधवार को घोषणा की कि सरकार ने न्यायपालिका, चुनाव प्रणाली, प्रशासन, पुलिस, भ्रष्टाचार विरोधी आयोग और संविधान में सुधार के लिए छह आयोग बनाने का फैसला किया है।
Read More: https://www.deshbandhu.co.in/news/bangladesh-interim-government-presents-plan-for-reforms-in-key-sectors-493779-1
0 notes
subkuz00 · 14 days
Text
हेलीकॉप्टर दुर्घटना में अपना बलिदान देने वाले कुलदीप सिंह की पत्नी
यश्विनी ढाका, अब सेना का हिस्सा बन गई हैं। उन्हें सेना में लेफ्टिनेंट के पद पर नियुक्त किया गया है। इस उपलब्धि पर उनके पूरे परिवार में खुशी का माहौल है। यश्विनी का कहना है कि यह तो बस एक प्रारंभ है। वर्ष 2021 में सीडीएस जनरल बिपिन रावत का हेलीकॉप्टर स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह द्वारा उड़ाया जा रहा था।
Tumblr media
0 notes
countryinsidenews · 16 days
Text
पटना /सदस्यता अभियान में भाजपा से बड़ी संख्या में लोग जुड़ रहे : डॉ. दिलीप जायसवाल
पटना, 8 सितंबर। भाजपा के प्रदेश अध्यक्ष सह बिहार के राजस्व और भूमि सुधार मंत्री डॉ. दिलीप जायसवाल ने आज प्रदेश के कई जिलों में सदस्यता अभियान किट के वाहनों को पार्टी का झंडा दिखाकर रवाना किया। भाजपा प्रदेश कार्यालय से चार वाहनों को रवाना किया गया जो प्रदेश के मुजफ्फरपुर, सीतामढ़ी, शिवहर, ढाका, बेतिया, रक्सौल और बगहा भेजा गया है। इस मौके पर भाजपा के प्रदेश अध्यक्ष सह बिहार के मंत्री डॉ. जायसवाल ने…
0 notes
Text
बांग्लादेश में इन शहरों में भारतीय वीजा आवेदन केंद्र शुरू; हालात ठीक होने तक सीमित रहेंगी सेवाएं
बांग्लादेश में जारी तनाव के बीच प्रमुख शहरों में भारतीय वीजा आवेदन केंद्रों ने तत्काल चिकित्सा और छात्र वीजा की आवश्यकता वाले बांग्लादेशी नागरिकों के लिए सीमित अपॉइंटमेंट स्लॉट की पेशकश शुरू कर दी है। यह सेवा ढाका, चटगांव, राजशाही, सिलहट और खुलना में शुरू की गई। बांग्लादेश में भारतीय वीजा एप्लीकेशन सेंटर (आईवीएसी) ने एक बयान जारी कर इसकी जानकारी दी।  आईवीएसी ने कहा, “इन पांच केंद्रों ने तत्काल…
0 notes
dainiksamachar · 24 days
Text
भारत की तरह बांग्लादेश के पास भी चिकन नेक, गर्दन मरोड़ी तो टूट जाएगा चटगांव से कनेक्शन
ढाका: भारत के चिकन नेक के नाम से मशहूर सिलीगुड़ी कॉरिडोर अक्सर सुर्खियों में छाया रहता है। यह वही कॉरिडोर है, जो शेष भारत को पूर्वोत्तर से जोड़ता है। दशकों से इस कॉरिडोर पर चीन की बुरी नजर है। इसी कारण भारत और चीन में जून 2017 में डोकलाम सैन्य गतिरोध की शुरुआत हुई थी। चीन की कोशिश इस कॉरिडोर के नजदीक पहुंचने की है, जहां से वह भारत के इस संकरे गलियारे पर कब्जा जमा सके। लेकिन, बहुत कम लोगों को पता है कि भारत की तरह बांग्लादेश में भी एक चिकन नेक है, जो सिलीगुड़ी कॉरिडोर की तरह ही संकरा है। यह बांग्लादेश की मुख्य भूमि से उसके सबसे बड़े बंदरगाह शहर चटगांव को अलग करता है। बांग्लादेश का चिकन नेक कितना महत्वपूर्ण बांग्लादेश की इस संकरी पट्टी को बंद करने से उसकी 20 प्रतिशत भूमि देश के बाकी हिस्से से अलग हो सकती है। अगर यह गलियारा कभी बंद हो जाता है तो उसका सबसे बड़ा बंदरगाह और शहर चटगांव अलग-थलग पड़ सकता है। हालांकि, इस गलियारे का महत्व भारत के सिलिगुड़ी कॉरिडोर की तरह उतना गंभीर नहीं है। इसका प्रमुख कारण बांग्लादेश की मुख्य भूमि का चटगांव से समुद्री संपर्क ज्यादा होना है। चटगांव का यह इलाका घने वनों और पानी की धाराओं से भरा हुआ है। अपने भूभाग और द्वीपीय प्रकृति के यह भारत, बांग्लादेश और म्यांमार के विद्रोहियों को सुरक्षित पनाहगाह भी प्रदान करता है। भारत के सिलीगुड़ी कॉरिडोर को जानें भारत का सिलीगुड़ी कॉरिडोर पश्चिम बंगाल में सिलीगुड़ी शहर के पास स्थित है। यह बेहद संकरा गलियारा है, जो शेष भारत को पूर्वोत्तर के राज्यों से जोड़ता है। इस गलियारे के कई संकरे हिस्सों में इसकी चौड़ाई 20 से 22 किमी ही है। यह गलियारा तीन देशों से भी सटा हुआ है। जिसमें नेपाल, बांग्लादेश और भूटान शामिल हैं। पहले सिक्किम साम्राज्य इस गलियारे के उत्तरी किनारे पर स्थित था, हालांकि, 1975 में उसका भारत में विलय हो गया। पश्चिम बंगाल में सिलीगुड़ी शहर इस क्षेत्र का प्रमुख शहर है। http://dlvr.it/TCg1Q2
0 notes
pniindia · 27 days
Text
Bangladesh Journalist Suspicious Death: बांग्लादेश की पत्रकार की हुई रहस्यमय मौत, मौत से पहले फेसबुक पर किए थे 2 रहस्यमय पोस्ट
Bangladesh Journalist Suspicious Death: बांग्लादेश के ढाका में एक महिला पत्रकार सारा रहनुमा का शव एक झील से बरामद हुआ है, जिस के कुछ घंटे पहले ही उन्होंने फेसबुक पर दो रहस्यमय पोस्ट भी किए थे. बांग्लादेश में 32 वर्षीय महिला पत्रकार का शव बुधवार को एक झील में बरामद किया गया. स्थानीय मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक मृतका की पहचान सारा रहनुमा के रूप में की गयी है, जो कि एक बांग्ला-भाषा के न्यूज चैनल में न्यूजरूम एडिटर थीं.
Tumblr media
0 notes
livenews24x7hindi · 1 month
Text
शेख हसीना के पास 26 दिन और हैं, 11 साल पहले उन्होंने भारत के साथ क्या डील की थी? जो गले की हड्डी बन गयी
बांग्लादेश की अंतरिम सरकार ने पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना का राजनयिक पासपोर्ट रद्द कर दिया है। बांग्लादेश के गृह मंत्रालय ने शेख हसीना और उनके कैबिनेट मंत्रियों, सलाहकारों और सांसदों से तुरंत अपने राजनयिक पासपोर्ट पेश करने को कहा है। ढाका ट्रिब्यून की एक रिपोर्ट के मुताबिक, पूर्व प्रधानमंत्री के परिवार से भी अपने राजनयिक पासपोर्ट सौंपने के लिए कहा गया है. आपको बता दें कि तख्तापलट के बाद न सिर्फ…
0 notes
teesrijungworldnews · 1 month
Video
youtube
बांग्लादेश : अंतरिम सरकार के प्रमुख डाॅ.यूनुस ढाका के ढाकेश्वरी मंदिर पह...
0 notes
news-trust-india · 1 month
Text
Bangladeshi Hindus : बांग्लादेश की अंतरिम सरकार ने हिंदू समुदाय से मांगी माफी
Bangladeshi Hindus :  बांग्लादेश में शेख हसीना के नेतृत्व वाली सरकार के तख्तापलट के बाद अशांति और अस्थिरता बनी हुई है। कई इलाकों में हिंदुओं पर हमला किया गया है। उनके पूजा स्थलों को निशाना बनाया गया है। इसके खिलाफ रविवार राजधानी ढाका की सड़कों पर हजारों प्रदर्शनकारी उतरे और अल्पसंख्यक समुदाय के लिए सुरक्षा की मांग की। इस बीच, देश की अंतरिम सरकार में गृह मामलों के सलाहकार ब्रिगेडियर जनरल…
0 notes
asr24news · 1 month
Text
शेख हसीना ने तख्तापलट के पीछे अमेरिका को ठहराया जिम्मेदार
ढाका, 12 अगस्त 2024। बांग्लादेश की पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना ने अपने हालिया बयान में एक बड़ा खुलासा करते हुए अमेरिका पर तख्तापलट की साजिश रचने का गंभीर आरोप लगाया है। हसीना ने कहा कि उन्हें सत्ता से हटाने के पीछे अमेरिका की बड़ी साजिश थी, जिसका कारण सेंट मार्टिन द्वीप को लेकर उनकी सरकार का फैसला था। शेख हसीना का कहना है कि उन्होंने सेंट मार्टिन द्वीप की संप्रभुता अमेरिका के हवाले करने से इनकार…
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
बांग्लादेश में हिंसा की जांच करने पहुंचा यूएन का दल, शेख हसीना का राजनयिक पासपोर्ट रद्द; अब तक 45 मामले हुए दर्ज
Bangladesh News: बांग्लादेश की अंतरिम सरकार ने गुरुवार को अपदस्थ प्रधान मंत्री शेख हसीना का राजनयिक पासपोर्ट रद्द कर दिया। एएफपी की ओर से दी गई जानकारी के अनुसार सरकार का यह फैसला उस वक्त आया है, जब संयुक्त राष्ट्र की एक टीम यह आकलन करने के लिए ढाका पहुंची थी कि कथित मानवाधिकार उल्लंघन की जांच की जाए या नहीं। इधर पीटीआई की रिपोर्ट के अनुसार बांग्लादेश में अपदस्थ प्रधानमंत्री शेख हसीना के खिलाफ…
0 notes
deshbandhu · 29 days
Text
बांग्लादेश में पिछले कई वक्त से हालात सामान्य नहीं हुए है। शेख हसीना के सत्ता से जाने के बाद अभी भी शांति नहीं आई है। बांग्लादेश में अंतरिम सरकार का गठन हो चुका है उसके बाद भी हिंसक प्रोटेस्ट जारी है।
बांग्लादेश में बवाल थमने का नाम नहीं ले रहा है। एक बार फिर ढाका में बीती रात अंसार सदस्यों और छात्रों के बीचहिंसक झड़प हुई। झड़प में दोनों पक्षों की ओर से कई दर्जनों लोग घायल हुए। अंसार सदस्य पिछले दो दिनों से अपनी मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे थे। आश्वसन के बावजूद उन्होंने प्रदर्शन नहीं खत्म किया। Visit: https://www.deshbandhu.co.in/news/chaos-again-in-bangladesh-interim-government-and-students-clashed-489024-1
0 notes