Tumgik
#नोव्हेंबरअखेर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल
राज्य उत्पादन शुल्कात तब्बल 32.86 टक्के वाढ; नोव्हेंबरअखेर ‘इतके’ हजार कोटींचा महसूल मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन 2022-23 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 952.82 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 December 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, दिपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याचा विचार केला जाईल, तसंच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणखी सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या सोहळ्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि टोल फ्री क्रमांकाचं अनावरण करण्यात आलं.
****
राज्यातल्या वाळू लिलाव प्रक्रियेचं नवीन धोरण लवकरच अमलात आणलं जाणार असल्याचं, महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं बोलत होते. वाळू लिलाव धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अनाधिकृत दगडखणी बंद करून दंडात्मक कारवाई करावी, इटीएस मशीनद्वारे सर्व दगडखाणींची मोजणी करून अहवाल तयार करावा, तसंच अनधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीस आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना विखे-पाटील यांनी यावेळी केल्या.
****
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने यंदा खरिपाचं मोठं नुकसान केलं आहे. तर राज्यात दमदार पावसामुळे रब्बी हंगामातील पेरा यंदा वाढला आहे. नोव्हेंबरअखेर ४० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, डिसेंबरअखेपर्यंत रब्बीचं क्षेत्र ६५ लाख हेक्टरवर जाईल, अशी माहिती, कृषी विभागाने दिली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात ३९ लाख २९ हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती विकास आणि विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील यांनी दिली.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं कुख्यात दहशतवादी हरप्रीत सिंह याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. हरप्रीत सिंह हा लुधियाना इथल्या न्यायालयावर बॉम्बहल्ला करण्यामध्ये मुख्य आरोपी आहे. तो पाकिस्तानातल्या आयएसवायएफ या संघटनेचा प्रमुख लखबीर सिंह रोडे यांचा सहकारी असून, त्याने पाकिस्तानातून आणलेली शस्त्रास्त्रं भारतात आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचवली होती, असं एनआयएनं सांगितलं. 
****
देशातल्या एफएम वाहिन्यांनी मद्यपान, अंमली पदार्थ, शस्त्र, गुंडगिरीचं उदात्तीकरण करणारी गाणी किंवा मजकूर प्रसारित करु नये, असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. अशा मजकुरांमुळे वाढत्या वयातल्या मुलांवर वाईट परिणाम होतो, गुंडगिरीला प्रोत्साहन मिळतं, ��शी गाणी किंवा मजकूर प्रसारित करणं हे आकाशवाणी कार्यक्रमांचं उल्लंघन आहे, असं झाल्यास संबंधित वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयानं दिला आहे.
****
जल जीवन सर्वेक्षण २०२३ अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानास कालपासून सुरुवात झाली. ३१ डिसेंबर पर्यंत चालणार्या या अभियानात जिल्ह्यातल्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक आणि रासायनिक तपासणी करण्यात येणार असून, त्याचे अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसंच जिल्ह्यातल्या जलस्त्रोतांचं जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.  महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आलं असून, त्यांच्या माध्यमांतून पिण्याच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या  वतीनं आज संत एकनाथ रंग मंदिरात ‘विद्यार्थ्यांची सुरक्षा - शाळा, महाविद्यालय, प्रशासनाची जबाबदारी’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातले प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यपक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांना या चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसात संध्याकाळी साडे आठ वाजता दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, आणि घाना विरुद्ध उरुग्वे हे सामने, तर रात्री साडे बारा वाजता सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड आणि ब्राझिल विरुद्ध कॅमेरुन हे सामने होणार आहेत.
****
थायलंड इथं सुरु असलेल्या आशिया कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या १७ वर्षांखालील गटात भारताच्या उन्नति हुडानं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तीनं थायलंडच्या खेळाडुचा २१ - ११, २१ - १९ असा पराभव केला.
//**********//
0 notes
amhikastkar · 4 years
Text
खानदेशात ९० टक्के केळीची काढणी पूर्ण
खानदेशात ९० टक्के केळीची काढणी पूर्ण
जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू आहे. ही काढणीदेखील येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे केळीची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे.  कांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपूर भागात अधिक होत असते. याच भागात गेल्या वर्षी  नोव्हेंबरअखेर अनेक बागांची लागवड झाली होती. ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात ३५ दिवसांत १३ टक्क्यांची घट
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात ३५ दिवसांत १३ टक्क्यांची घट
औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५ दिवसांत जवळपास १३ टक्‍के घटला आहे. २० नोव्हेंबरअखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांत ९३ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा २५ डिसेंबरअखेर ८० टक्‍क्‍यांवर आला आहे.   मराठवाड्यातील ८७६ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, मांजरा, तेरणा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २० नोव्हेंबर अखेर ९३.६३ टक्‍के होता. त्यामध्ये मोठ्या ११…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी : केंद्र सरकार
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी : केंद्र सरकार
Tumblr media
[ad_1]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप हंगामातील ३१८ लाख टन धान खरेदी केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही खरेदी १८.५८ टक्के जास्त आहे, सरकारकडून बुधवारी (ता.२) ही माहिती देण्यात आली.
कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, एकूण धान खरेदीत पंजाबचा वाटा सर्वाधिक ६३.७६ टक्के इतका म्हणजे २०२.७७ लाख टन इतका आहे. त्या खालोखाल हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 November 2020 Time 07.10 to 07.25 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१० ****
·      पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·      बँक कर्मचारी, शेतकरी तसंच कर्मचारी संघटनांच्या देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद.
·      कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद.
·      महात्मा फुले समता परिषदेचा ‘समता पुरस्कार’ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर.
·      राज्यात काल नव्या सहा हजार ४०६ कोविडग्रस्तांची नोंद; मराठवाड्यात नवे साडे चारशे रुग्ण.
·      मराठवाड्यात काल दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू.  
आणि
·      लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष उत्पादन.
****
पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य पोलीस महासंचालनालयात काल झालेल्या हुतात्मा दालनाचं उद्‌घाटन तसंच कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करताना, मुख्यमंत्र्यांनी, पोलिसांची कामं जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्यानं, अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसंच महाराष्ट्रात सर्वत्र राबवण्यात यावी, अशी सूचना केली.
गृहमंत्री अनिल देशमुख, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण राज्य शासन पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक असून, विभागाच्या इतर मागण्यांचाही लवकरात लवकर विचार होईल, असं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
१९६४ ते २०१९ या कालावधीत विविध घटनांमध्ये हुतात्मा झालेल्या, ७९७ हुतात्म्यांची एकत्रित माहिती, या दालनात प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्याचं नियोजन असून, भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे.
****
बँक खासगीकरणाच्या विरोधात देशभरातल्या चार लाखांवर बँक कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप केला. सरकारच्या या चुकीच्या धोरणांना संपाच्या माध्यमातून संघटना विरोध करत असल्याचं, कर्मचारी संघटनेचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विदेशी बँकांमध्ये विलीनीकरण झालं, तर भारतीय बँकिंग विदेशी भांडवलदारांच्या हातात जाईल, जे देशाच्या हिताचं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कालच्या या संपात राज्यभरातल्या दहा हजारावर शाखांमधले, जवळपास तीस हजार कर्मचारी संपावर होते, अशी माहिती तुळजापूरकर यांनी दिली.
बँक कर्मचाऱ्यांसह शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी काल देशव्यापी संप पुकारला होता. शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी, हे आंदोलन करण्यात आल्याचं, संघटनांकडून सांगण्यात आलं.
औरंगाबाद इथं चौकाचौकांत मानवी साखळी करून कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. विविध कामगार संघ���नांच्या संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. लातूर इथं कामगार संघटनांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शनं केली.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण संचालनालयानं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानसेवेवर असलेली बंदी, ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा मात्र सुरूच राहणार आहे. त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय या सेवेचा लाभ घेऊन देशात परत येऊ शकणार आहेत. या सेवेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक विदेशातून परतले आहेत, तर या मोहिमेच्या सातव्या टप्प्यात, नोव्हेंबरअखेर आणखी २४ देशांतून एक लाख ९५ हजार नागरिक भारतात परतणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात ‘सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’ला भेट देणार आहेत. या भेटीत ते ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी २९ नोव्हेंबरला, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सैन्यदलाच्या शीघ्र कृती दलावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात, दोन सैनिक काल हुतात्मा झाले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथले सैनिक यश देशमुख यांचा समावेश आहे.
****
संविधान दिन काल सर्वत्र पाळण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करत, संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधानाचा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान म्हणून आदरानं उल्लेख केला जातो, संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या निवासस्थानी, ७१ संविधान ग्रंथांचं वाटप करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून, संविधानाचा आपल्याला अभिमान असल्याचं आठवले म्हणाले. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा संविधानातला भारत साकार केला, तर भारत जागतिक महासत्ता होईल, असं आठवले यांनी नमूद केलं.
 औरंगाबाद इथं भडकल दरवाजा परिसरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पांजली अर्पण करून, संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.
जालना जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन करून तसंच बाबासाहेबांना अभिवादन करून संविधान दिन साजरा केला.
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात ��ंविधान दिन साजरा करण्यात आला.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘समता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीला पुण्यात फुले वाडा इथं, हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राज्यात काल आणखी सहा हजार ४०६ कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २ हजार ३६५ झाली आहे. काल ६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार हजार ८१५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या राज्यात ८५ हजार ९६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  
****
मराठवाड्यात काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४५० रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात पाच कोविडग्रस्तांचा, औरंगाबाद जिल्ह्यात चार तर हिंगोली जिल्ह्यात काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १५७ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात ९१, बीड ७४, जालना ३६, नांदेड ३५, उस्मानाबाद २९, हिंगोली २२ तर परभणी जिल्ह्यात काल नव्या सहा रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी राबवलेल्या अष्टसुत्रीची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाली आहे, कोविड प्रतिबंधाबाबत काल राष्ट्रीय स्तरावर वेबिनार घेण्यात आलं, त्यावेळी पाण्डेय यांनी या अष्टसुत्रीबाबत माहिती दिली. सिटी बसचा वापर, मोबाईल स्वॅब कलेक्शन, संकलित माहितीच्या विश्लेषणासाठी वॉर रुम, मोबाईल फिव्हर क्लिनिक यासारखे उपक्रम पांडेय यांनी राबवले.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर काल ८६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर औरंगाबाद विमानतळावर ३२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
****
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यात काल कार आणि टँकरच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. लातूरहून औरंगाबादकडे जाणारी ही कार, टायर फुटल्यानं दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेनं येणाऱ्या टँकरवर धडकली. गेवराई नजीक वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात कारमधून प्रवास करणारे दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या दाती शिवारात काल लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ट्रक चालक आणि सहाय्यक अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नांदेड - हिंगोली मार्गावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्यालगतच्या नाल्यामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक हैदराबादहून इंदूरकडे जात होता. दोघंही मयत इंदूर इथले रहिवासी आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्यासह आढावा बैठक घेवून, प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात मराठवाड्यातल्या तरुणांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्यानं या जागा भरल्या जाणार असून, त्यामुळे मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागेल, असं खासदार श्रृंगारे यांनी सांगितलं.
****
गेल्या काही वर्षात ऊसासाठी पाण्याचा बेसुमार वापर आणि पर्यावरणाचा -हास झाल्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात पाणीबाणी अटळ आहे, असं जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी म्हटलं आहे. वातावरणातील बदल आणि जल व्यवस्थापन या विषयावर काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे  वेबिनार घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मुलबक पाणी असताना, त्याचं नियोजन होत नसल्याचं ते म्हणाले.
****
वाढीव वीज देयक माफी तसंच महिला बचत गटांची कर्ज माफी या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं काल ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीड, जालना, उस्मानाबाद इथंही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधाच्या त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र नर्सी इथं संत नामदेव महाराज यांचा साडे सातशेवा जन्मोत्सव सोहळा काल भक्तिमय वातावरणात साजरा झाला. काल सकाळी सहा वाजता नर्सीसह पंचक्रोशीतल्या मंदिर परिसरामध्ये हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव करण्यात आला.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. काल औरंगाबाद इथं मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या निवडणुकीसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
****
लातूर शहरात प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिकेनं तीन पथकांची नियुक्ती केली आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांकडून तक्रारी आल्यास त्यांचं तत्काळ निवारण करण्याच्या सूचनाही, स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. प्लास्टिकबंदी राबवण्यासाठी दररोज शहरातल्या आस्थापनांना भेटी दिल्या जाणार असून, बंदी असलेलं प्लास्टीक आढळल्यास, संबंधितांना दंड ठोठावला जाणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना २९ नोव्हेंबरला तर तिसरा सामना दोन डिसेंबरला होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी मर्यादित स्वरुपात फटाके वाजवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन; सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मनाई.
·      ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक - केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी.
·      मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी आरक्षणाचा अभ्यास असलेले वकिल, विद्वान आणि अभ्यासकांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी.
·      राज्यात आणखी पाच हजार ९२ तर मराठवाड्यात ४२६ नवीन कोविड बाधितांची नोंद.
आणि
·      पंढरपूरच्या कार्तिकी वारीवर प्रतिबंध घातल्यास, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार- कार्तिकी वारी समन्वय समितीचा इशारा.
****
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी मर्यादित स्वरुपात फटाके वाजवण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते. दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीचे आणि त्यानंतरचे १५ दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे असून, नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. दिवाळी हा प्रकाश पर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोना विषाणूला आत येऊ देऊ नये, कोविडच्या काळात आतापर्यंत कमावलेलं यश फटाक्यांच्या धुरात वाहून जाऊ नये, याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. कोविड संदर्भातल्या आरोग्य सुविधा पुढचे किमान सहा महिने कायम राहू देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं असं सांगतानाच ज्येष्ठ नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळीनंतर मंदीरं उघडण्याचे संकेतही त्यांनी दिले, मात्र त्यावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मास्क लावणं, हात धुणं आणि शारीरिक अंतराचं पालन करणं या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकानं करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण करण्यात आलं. मीरा भाईंदर इथं उभारलेल्या कोविड रुग्णालयाचं तसंच प्रयोगशाळेचं ई लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. शहर आणि जिल्ह्यातल्या प्रत्येकी दहा हजार तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात, त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.
****
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सरकारनं आरक्षणाचा अभ्यास असलेले वकिल, विद्वान आणि अभ्यासकांना सोबत घेऊन एक स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलत होते. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४२० विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का दिलेल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. सकल मराठा समाज आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातल्या विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
****
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि राज्य सरकार संवेदनशील नसल्याची टीका, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुंबईत मातोश्रीवर केलेलं आंदोलन हे प्रामाणिक आंदोलन होतं, मात्र सरकारनं मेटे यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्याची टीका दरेकर यांनी केली. मुंबईतल्या विकास कामांच्या अनुषंगानं बोलताना, प्रत्येक वेळी केंद्रावर टीका करून अथवा प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून, राज्य सरकारला पळ काढता येणार नाही, असंही दरेकर यावेळी म्हणाले.
****
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत आणि इतर अनेक मागण्या, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांनी केल्या आहेत. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल झालेला संभ्रम दूर करण्यासाठी, पाटील यांनी काल औरंगाबाद इथं विद्यार्थी आणि पालकांची बैठक घेऊन चर्चा केली, यावेळी राज्य सरकारकडे या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधला व्यवस्थापन कोटा राज्य सरकारनं ताब्यात घ्यावा आणि विशेष बाब म्हणून सुपर न्यूमररी - जादा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या जनजागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
****
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तुरूंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी, तसेच फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना काल सकाळी अलिबाग इथून तळोजा कारागृहात हलवण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं आणि उच्चभ्रू व्यक्तींचं प्रकरण असल्यानं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा इथं हलवण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना २६ नोव्हेंबरपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या निशुल्क क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ९२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख १९ हजार ८५८ झाली आहे. राज्यभरात काल ११० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४५ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आठ हजार २३२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ९६ हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४२६ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू, तर नवे ३५ रुग्ण, बीड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे १२१ रुग्ण, जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७६ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ९३, औरंगाबाद जिल्ह्यात ६४, नांदेड जिल्ह्यात ३५, उस्मानाबाद जिल्ह्यात २८, परभणी जिल्ह्यात पाच, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या चार रुग्णांची नोंद झाली.  
****
मुंबईत काल आणखी एक हजार तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २३ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५१२ नवे रुग्ण, तर १५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४२० रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात १९६, सातारा १५०, सोलापूर १४१, गडचिरोली ९१, बुलडाणा ५३, सांगली ५०, यवतमाळ ४८, जळगाव ३५, धुळे २६, वाशिम १२, सिंधुदुर्ग नऊ, तर रत्नागिरी जिल्ह्यात नव्या दोन रुग्णांची नोंद झाली.
****
पंढरपूरच्या कार्तिकी वारीवर प्रतिबंध घातल्यास, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर वारकरी ��ंप्रदाय बहिष्कार टाके���, असा इशारा, कार्तिकी वारी समन्वय समितीच्यावतीनं रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला आहे. ते काल पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आषाढी वारीदरम्यान वारकरी संप्रदायानं राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य केलं होतं, मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे, कार्तिकी वारीवर कोणतेही निर्बंध चालू देणार नाही, अशी भूमिका या समितीनं घेतली आहे  
****
जालना तालुक्यातल्या नोव्हेंबरअखेर मुदत संपत असलेल्या १२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काल जालना तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये ६९ ग्रामपंचायतींचं सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३३, अनुसूचित जातींसाठी १९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी दोन जागा राखीव झाल्याची माहिती, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. महिला उमेदवारांसाठी सरपंच पदाच्या ६० जागा राखीव असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सायकल्स फॉर हेरिटेज हा उपक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत काल शहरातल्या प्रसिद्ध बिबी का मकबरा, पाणचक्की आणि ऐतिहासिक दरवाजांना भेट देणारी २० किलोमीटर अंतराची सायकल फेरी काढण्यात आली. औरंगाबाद सायकल्स फॉर चेंज या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सायकलिस्टस असोसिएशन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी केलं आहे.
****
जालना इथल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या परिसरात काल सकाळी पक्षी निरीक्षण करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि परभणी इथली वन्यजीव संवर्धन संस्था, यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या या उपक्रमात, पर्यावरण प्रेमींनी सकाळी तीन तास पक्षी निरीक्षण केलं. यावेळी १३ पाणपक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या. या परिसरात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येणारे पाणघार, करकोचा, फ्लेमिंगो आदी हिवाळी स्थलांतरीत पक्षी अद्याप आले नसल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्याची माहिती, वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात देवसिंगा इथं महिला बचत गटाला नैसर्गिक वनस्पती वापरुन सुगंधी उटणे तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या व्यवसायामुळे १० महिलांना रोजगार मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
नागरमोथा, कापूर कचली, कचोरा, ब्राम्ही या आयुर्वेदिक वनस्पतींपासून हे नैसर्गिक पद्धतीनं उटणं तयार केलं जात आहे. या उटणं निर्मित व्यवसायामुळे १० महिलांच्या हाताला काम मिळालं आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मितीसह पॅकिंग, मार्केटींग या कौशल्याला वाव मिळाला आहे. ‘आत्मनिर्भर भारता’साठी या महिलांनी टाकलेलं पाऊल इतर महिलांनाही प्रेरणादायी ठरत आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
लातूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना पॅकेजेसच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी परिपत्रक काढलं आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगातून ग्रामविकासाच्या औसा पॅटर्नची संकल्पना मांडली होती. यामुळे आता मनरेगाअंतर्गत प्रस्ताव मंजुरींना गती मिळेल आणि शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक लाभ मिळतील, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.
****
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी काल तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. भूम तालुका अध्यक्षपदी रुपेश शेंडगे, वाशी तालुका अध्यक्षपदी राजेश शिंदे, परंडा तालुका अध्यक्षपदी हनुमंत वाघमोडे, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी अजय खरसाडे, तर परंडा शहर काँग्रेस अध्यक्षपदी रमेश सिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
अंबाजोगाई इथल्या पेशवा युवा संघटनेच्या वतीनं काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात ३४ जणांनी रक्तदान केलं. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय इथल्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याची कमतरता असल्यानं हे शिबीर घेण्यात आलं.
****
परभणी तालुक्यातल्या सय्यदमिया पिंपळगांव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी जप्त करत दोघांना ताब्यात घेतलं. शनिवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या कारवाईत टिप्पर आणि वाळू असा एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या सेलू शहरातून पोलिसांनी काल ७५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करत दोन जणांना अटक केली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनाई
** ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
** जालना जिल्ह्यात ५४९ तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात १०४ कोविडग्रस्तांवर उपचार सुरू
आणि
** एनसीबीचे आज मुंबईत पाच ठिकाणी छापे- सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त
****
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनाई केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळी हा प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदुषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये, कोविडच्या काळात आतापर्यंत कमावलेलं यश फटाक्यांच्या धुरात वाहून जाऊ नये, याची दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड संदर्भातल्या आरोग्य सुविधा पुढचे किमान सहा महिने कायम राहू देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं असं सांगतानाच ज्येष्ठ नागरिकांनी मुळीच घराबाहेर पडू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळीनंतर मंदीरं उघडण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले, मात्र त्यावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, विदेशी कंपन्यांसोबत केलेले औद्योगिक करार तसंच मुंबई मेट्रोसंदर्भात सुरू असलेल्या कामाबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड प्रतिबंधित क्षेत्र, पूर्व घोषित शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. परवा दहा नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहिल.
****
ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शक�� काय, यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.
****
नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण, आयकर प्रक्रियेत नियमितता, तसंच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नोटबंदी निर्णयाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात या बाबी नमूद केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी चलनात असलेल्या पाचशे तसंच एक हजार रुपयांच्या नोटा, चलनातून बाद केल्या होत्या.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९९ झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार ३२७ झाली आहे. दरम्यान, उपचारानंतर कोविडमुक्त झालेल्या ५१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जालना जिल्ह्यातले दहा हजार ४७९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले तीन नवीन रुग्ण दाखल झाले. सध्या घाटी रुग्णालयात १०४ कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज नवे चार कोविड बाधित रुग्ण आढळले तर १२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता सुमारे ९६  टक्क्यांवर पोहोचलं आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यातल्या एकूण दोन लाख २६ हजार ७६९ कोविडग्रस्तांपैकी दोन लाख १७ हजार ३१९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने आज मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त केले. मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पाच संशयीत अंमलीपदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचीही या कारवाईदरम्यान झडती घेण्यात आली असून, त्यांच्या घरातूनही अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या नोव्हेंबरअखेर मुदत संपत असलेल्या १२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज जालना तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये ६९ ग्रामपंचायतींचं सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३३, अनुसूचित जातींसाठी १९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी दोन जागा राखीव झाल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. महिला उमेदवारांसाठी सरपंच पदाच्या ६० जागा राखीव असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
परभणी तालुक्यातल्या सय्यदमिया पिंपळगांव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी जप्त करत दोघांना ताब्यात घेतलं. मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत टिप्पर आणि वाळू असा एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी केलं आहे.
****
प्रसिद्ध कलावंत पुरुषोत्तम लक्ष्मण ऊर्फ पु.ल.देशपांडे यांच्या एकशे एकाव्या जयंती निमित्ताने त्यांची सर्व साहित्यसूची संगणकाच्या एका ‘क्लिक’वर रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी ही माहिती दिली. pldeshpandebibliography या संकेतस्थळावर ही सूची उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुलंची पुस्तकं, चित्रपट, नाटक या सर्वांविषयी माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे.
****
जालना इथल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या परिसरात आज सकाळी पक्षी निरीक्षण करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि परभणी इथली वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी सकाळी तीन तास पक्षी निरीक्षण केलं. यावेळी १३ पाणपक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या. या परिसरात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येणारे पाणघार, कारकोचा, फ्लेमिंगो आदी हिवाळी स्थलांतरीत पक्षी अद्याप आले नसल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्याची माहिती वन्यजीव छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात देवसिंगा इथं महिला बचत गटाला नैसर्गिक वनस्पती वापरुन सुगंधी उटणे तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. नागरमोथा, कपूर कचली, ब्राम्ही या आयुर्वेदिक वनस्पतींपासून या महिलांनी उटणं तयार केलं आहे. उटणे निर्मिती व्यवसायामुळे दहा महिलांना रोजगार मिळाला आहे.
**////**
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 OCT. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
**** छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमध्ये आज सुमारे दहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केल्याबद्दल, वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत. दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचं तिवारी यांनी स्वागत केलं आहे. नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं तिवारी यांनी म्हटलं आहे. **** यावर्षीच्या जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या, महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे धनादेश पालकमंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते देण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सात व्यक्तींनाही प्रत्येकी पंचाहत्तर हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले. **** पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दहा भारतीय नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीरच्या पूंच्छ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्ताननं आज सकाळपासून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू केला आहे. भारतीय सैन्य या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. **** श्रीलंकेतल्या हिंदू तमिळ नागरिकांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली असून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. **** ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांना निलंबित करण्यात येईल आणि त्यांच्या जागी हंगामी कर्मचारी नेमण्यात येतील, असा इशारा एसटी महामंडळ प्रशासनानं दिला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून ऐन दिवाळीचे दिवस असल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी १९७२ मध्ये ,१९९६ मध्ये आणि २००७ मध्ये संप केले होते. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे कर्मचारी संपावर गेले असून निधीअभावी ही मागणी पूर्ण करणं शक्य नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. **** नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिध्द अष्टंबा यात्रेला कालपासून सुरुवात झाली. महाभारताशी निगडीत अश्वत्थामाचं स्थान असलेल्या या देवस्थानाला दरवर्षी दिवाळीत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातले हजारो भाविक भेट देतात. **** नाशिक जिल्ह्यात येत्या तेवीस ते एकोणतीस तारखेदरम्यान कीटकनाशकांच्या वापराबाबत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. कीटकनाशकांची फवारणी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सप्ताह साजरा करण्याचे आदेश महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. **** वीज ग्राहकांकडून २० जानेवारी २००५ ते ३० एप्रिल २००७ या कालावधीत सेवा जोडणी आकार आणि मीटर आकारापोटी घेतलेली रक्कम वीज ग्राहकांना परत करण्याची प्रक्रिया महावितरणनं सुरु केली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं ही रक्कम ग्राहकांना व्याजासह परत करण्याचे आदेश जारी केले आहेत. **** ठाणे इथला तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली. जमीन अकृषक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी भदाणे यानं लाच मागितली होती, वाहन चालक राम उगले याच्यामार्फत ही लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. **** वस्तू आणि सेवा कराचा वात्पुरता प्रतिकूल परिणाम आता संपला असून, ऑगस्ट महिन्यात उत्पादन क्षेत्रात तीन पूर्णांक एक टक्के, इतकी वाढ नोंदली गेली असल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव एस.सी गर्ग यांनी दिली आहे. दोन महिन्यांच्या खालावलेल्या दरानंतर ही वाढ नोंदली गेल्याचं गर्ग यांनी म्हटलं आहे. **** अमेरिकन लेखक जॉर्ज सॉंडर्स यांना यावर्षीचा मॅन बुकर पुरस्कार घोषित झाला आहे.’ लिंकन इन द बारडो’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मानाचा बुकर पुरस्कार मिळवणारे ते दुसरे अमेरिकन लेखक आहेत. **** ओडेन्स इथे खेळल्या जाणा-या डेन्मार्क खुल्या सुपरसीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह चौदा खेळाडूंचे पहिल्या फेरीचे सामने होणार आहेत. द्वितीय मानांकित सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेयीशी, तर सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मारीनशी होणार आहे. **** बांगलादेशात ढाका इथे खेळल्या जात असलेल्या एशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतल्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणारी आहे. या फेरीतला भारताचा पुढचा सामना उद्या मलेशियाशी तर शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे. अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन संघांचा सामना येत्या रविवारी होणार आहे. ****
0 notes