Tumgik
#मनिंदर सिंग
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 October 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं उद्घाटन
आमदार अपात्रतेबाबत निर्णयासाठी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभाध्यक्षांना निर्देश
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
आणि
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही बैठक भारतात होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी काल आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वखाली केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे, आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.
दरम्यान, जी-20 परिषदेअंतर्गत संसदीय अध्यक्ष शिखर परिषद म्हणजे पी-20 चं काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या परिषदेत विविध देशांच्या संसदांचे २५ सभापती आणि दहा उपसभापती, तसंच ५० संसद सदस्य सहभागी झाले आहेत.
****
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी, विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करावी, अन्यथा न्यायालयाला कालमर्यादा निश्चित करुन द्यावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकांवर सुनावणीला विधानसभा अध्यक्ष उशीर करत असल्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. आगामी निवडणुकांपूर्वी या याचिकांवर निर्णय व्हावा, अन्यथा विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातली क्युरेटिव्ह याचिका योग्य वेळी सूचिबद्ध केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. तेव्हा सरन्यायाधीशांनी, क्युरेटिव्ह याचिकेवर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या २१ जागा लढवणार असून, यापैकी मुंबईतल्या सर्व सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यातल्या पथकरासंदर्भात काल सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढचे १५ दिवस राज्यांत पथकर नाक्यांवर कॅमेरे बसवून गाड्यांची मोजणी केली जाईल, कराच्या रक्कम आणि आकारणीबाबतचा तपशील प्रत्येक नाक्यावर मोठ्या डिजिटल फलकावर लावणं सक्तीचं असेल, इत्यादी मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
****
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ काल गडकरी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वदेशी, स्वातंत्र्य, स्वावलंबित्व यातून आर्थिक संपन्नता साधण्याचा सल्ला गडकरी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले...
या समाजातून विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही त्याच्या गुणाने मोठा आहे. तर व्यक्तिगत आचरणातून आपल्या सगळ्यांना या विचारातून अनुकरण करण्याची गरज आहे. या समाजातल्या दलित, पिडीत आणि शोषित माणसाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रतिष्ठा मिळेल तो आपल्यासाठी सोन्याचा दिवस राहील. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. पण शिक्षणाची गुणवत्ताही मेंटनेन झाली पाहिजे. स्वदेश, स्वालंबन आणि स्वातंत्र्य या मुलभूत आधारावर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट - आर्थिक विकास करण्यात येईल. याचं मॉडेल गांधीजींच्या स्पिरीटमधून आलं आहे. 
या कार्यक्रमात महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान करण्यात आली, कर्डक यांच्या कुटुंबियांनी ही पदवी स्वीकारली. ८६७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आलं.
****
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात स्थापन समिती परभणी जिल्ह्यात नियोजित १६ तारखेऐवजी १९ तारखेला येणार आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, सनदी तसंच राष्ट्रीय दस्तावेज दुपारी २ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात समितीकडे सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात अतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निर्मितीच्या कार्यवाहीला गती देण्यात येणार असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं या विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. एमआयडीसीतल्या विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा सामंत यांनी केली. उदगीर, चाकूर इथंही एमआयडीसी उभारण्यात येणार असून, जळकोट इथं मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात येत असून चाकूर एमआयडीसीसाठी २६६ हेक्टर जमीनीचा प्रस्ताव लवकरच उच्चस्तरीय समिती समोर मांडला जाईल असं सामंत यांनी सांगितलं.
****
‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या दहा पंचायत समित्यांमधून आलेल्या कलशांचं, काल उद्योगमंत्री उदय सामंत तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या मातीचे १२ अमृत कलश मुंबईला रवाना होणार आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं काल मेरी माटी मेरा द��श अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. तुळजापूर तालुक्यातल्या १०८ ग्रामपंचायतींमधून प्रत्येक घरातली माती गोळा केलेला कलश काल पंचायत समितीत आणण्यात आला.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल न्यूझीलंडनं बांग्लादेशचा आठ गडी राखून पराभव केला. चेन्नई इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २४५ धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघानं हे लक्ष्य ४२व्या षटकात पूर्ण केलं.
****
नळदुर्ग इथं झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत जालन्याच्या मत्स्योदरी विधी महाविद्यालयाच्या कांचन थोरवे हिनं सुवर्णपदक पटकावलं. या यशाबद्दल मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे, प्राचार्य तरन्नुम शेख आदींनी कांचन हिचं कौतुक केलं.
****
मुस्लिम आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर इथून काल पायी मोर्चा मुंबईकडे निघाला. विविध शहरं आणि गावातून जाणारा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचं, या मोर्चेकऱ्यांचे नेते जावेद कुरेशी यांनी सांगितलं.
****
कंत्राटी भरती विरोधात सुशिक्षित बेरोजगारांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्यावतीनं काढलेल्या या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
मराठा आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या दरम्यान, काही अनुचित प्रकार आढळल्यास पोलीस प्रशासनाला कळवण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्हा रुग्णालयात काल शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या संशयित १३० हृदयरोग विद्यार्थ्यांची टूडी इको तपासणी करण्यात आली. यापैकी तीस विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलं. संशयित विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात वेळोवेळी तपासणी करून घेण्याचं आवाहन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी यावेळी केलं.
****
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक औषधांची मदत करण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे आभार व्यक्त केले.
****
धाराशिव जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्पोकन इंग्लीश या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शाळेतल्या मुलांना फक्त पंचवीस तासांमध्ये इंग्रजी बोलण्याचा सराव आणि कौशल्य याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
****
लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ इथं ‘संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ सुरू करण्यात आली आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेऊन दिव्यागांनी आत्मनिर्भर व्हावं, असं आवाहन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. पात्र विद्यार्थ्यांनी १५ तारखेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावेत असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Pro Kabaddi League : गतविजेत्या बंगालकडून जयपूरचा धुव्वा; कॅप्टन मनिंदर सिंग चमकला!
Pro Kabaddi League : गतविजेत्या बंगालकडून जयपूरचा धुव्वा; कॅप्टन मनिंदर सिंग चमकला!
Pro Kabaddi League : गतविजेत्या बंगालकडून जयपूरचा धुव्वा; कॅप्टन मनिंदर सिंग चमकला! प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ७५व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा ४१-२२ असा पराभव केला. या विजयासह ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग याने प्रो कबड्डी लीगमध्ये आपले ९०० रेड पॉइंट पूर्ण करत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारा तो परदीप नरवाल, राहुल चौधरी, दीपक…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.. 
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी जोरदार फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितले आहे. उदयपूरमधील एका शिंप्याची हत्या झालेल्या दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
मनिंदर सिंग ठरला इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी चढाईपटू, बंगालचा प्रवास मुंबाकडून पराभूत झाल्याने संपला
मनिंदर सिंग ठरला इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी चढाईपटू, बंगालचा प्रवास मुंबाकडून पराभूत झाल्याने संपला
प्रो कबड्डी लीग सीझन 8, यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स, प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या 111 व्या सामन्यात शनिवारी बेंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे यू मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा 37-27 असा पराभव केला. या विजयासह मुंबाने अव्वल 6 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे, तर गतविजेता बंगाल वॉरियर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मनिंदर सिंग या सामन्यात 6 गुण मिळवून 968 रेड पॉइंटसह इतिहासातील दुसरा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
आमदार अपात्रतेच्या मुद्यावर निर्णयासाठी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभाध्यक्षांना निर्देश
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या २१ जागा लढवणार - राज ठाकरे यांची घोषणा
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
आणि
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशचं न्यूझीलंडसमोर विजयासाठी २४६ धावांचं आव्हान
****
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करावी, अन्यथा न्यायालयाला कालमर्यादा निश्चित करुन द्यावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकांवर सुनावणीला विधानसभा अध्यक्ष उशीर करत असल्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयानं हे निर्देश दिले. आगामी निवडणुकांपूर्वी या याचिकांवर निर्णय व्हावा, अन्यथा विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही न्यायालयानं म्हटल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातली क्युरेटिव्ह याचिका योग्य वेळी सूचिबद्ध केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. तेव्हा सरन्यायाधीशांनी, क्युरेटिव्ह याचिकेवर प्रक्रिया सुरू असून, ती सुनावणीसाठी योग्यवेळी सूचीबद्ध करू, असंही वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या २१ जागा लढवणार असून, यापैकी मुंबईतल्या सर्व सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यातल्या पथकरासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढचे १५ दिवस राज्यांत पथकर नाक्यांवर कॅमेरे बसवून गाड्यांची मोजणी केली जाईल. कराच्या रक्कम आणि आकारणीबाबतचा तपशील प्रत्येक नाक्यावर मोठ्या डिजिटल फलकावर लावणं सक्तीचं असेल. टोल भरणा करताना रांगेत पिवळ्या रेषेच्या अलिकडे थांबावं लागल्यास वाहनांना टोल भरावा लागणार नाही, इत्यादी मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
****
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ आज गडकरी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वदेशी, स्वातंत्र्य, स्वावलंबित्व यातून आर्थिक संपन्नता साधण्याचा सल्ला गडकरी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले -
या समाजातून विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही त्याच्या गुणाने मोठा आहे. तर व्यक्तिगत आचरणातून आपल्या सगळ्यांना या विचारातून अनुकरण करण्याची गरज आहे. या समाजातल्या दलित, पिडीत आणि शोषित माणसाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रतिष्ठा मिळेल तो आपल्यासाठी सोन्याचा दिवस राहील. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. पण शिक्षणाची गुणवत्ताही मेंटनेन झाली पाहिजे. स्वदेश, स्वालंबन आणि स्वातंत्र्य या मुलभूत आधारावर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट - आर्थिक विकास करण्यात येईल. याचं मॉडेल गांधीजींच्या स्पिरीटमधून आलं आहे. 
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विकास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महाकवी वामनदादा कर्डक यांना यावेळी मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान करण्यात आली, कर्डक यांच्या कुटुंबियांनी ही पदवी स्वीकारली. ८६७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आलं.
****
‘आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिवस’ आज जगभरात पाळण्यात आला. मुंबईत मंत्रालयात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची शपथ दिली.
आपत्कालीन परिस्थितीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसंच विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीचं प्रशिक्षण देण्यात यावं, असं पाटील यावेळी म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन सभागृहात आज 'आपत्ती धोके निवारण दिवस' साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी आपत्ती धोके निवारण दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जागतिक 'आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीनं महानगरपालिका अग्निशमन दलामार्फत प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसंच उंच इमारतींवरून सुरक्षित सुटकेचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं.      
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज चेन्नई इथं न्यूझीलंड आणि बांग्लादेश दरम्यान सामना सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशनं पन्नास षटकात नऊ गडी बाद २४५ धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी २४६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. उद्या अहमदाबाद इथंल्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
****
‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांमधून आलेल्या कलशांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या मातीचे १२ अमृत कलश मुंबईला रवाना होणार आहेत.
'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत धुळे शहराच्या विविध भागातून संकलित करण्यात आलेल्या मातीचा अमृत कलश आज महापालिकेमार्फत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
****
मुस्लिम आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर इथून आज पायी मोर्चा मुंबईकडे निघाला. विविध शहरं आणि गावातून जाणारा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचं, या मोर्चेकऱ्यांचे नेते जावेद कुरेशी यांनी सांगितलं.
****
कंत्राटी भरती विरोधात सुशिक्षित बेरोजगारांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्यावतीनं काढलेल्या या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्हा रुग्णालयात आज शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या संशयित १३० हृदयरोग विद्यार्थ्यांची टूडी इको तपासणी करण्यात आली. यापैकी तीस विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलं. सं��यित विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात वेळोवेळी तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी यावेळी केलं.
****
धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्पोकन इंग्लीश या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शाळेतील मुलांना फक्त पंचवीस तासांमध्ये इंग्रजी बोलण्याचा सराव आणि कौशल्य याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत संभाषणाचा आत्मविश्वास निर्माण या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. अशा विविध उत्कृष्ट उपक्रमांसाठी जिल्हा पातळीवर तीन शाळांना आणि तालुका पातळीवरील एका शाळेला दर महा ओपन लिंक्स फाउंडेशनकडून बक्षिसं देण्यात येणार आहेत.
****
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी बीड जिल्हा लोहार - गाडी लोहार समाज विकास संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना सादर केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
आमदार अपात्रतेच्या मुद्यावर निर्णयासाठी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभाध्यक्षांना निर्देश
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या २१ जागा लढवणार - राज ठाकरे यांची घोषणा
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
आणि
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशचं न्यूझीलंडसमोर विजयासाठी २४६ धावांचं आव्हान
****
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करावी, अन्यथा न्यायालयाला कालमर्यादा निश्चित करुन द्यावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकांवर सुनावणीला विधानसभा अध्यक्ष उशीर करत असल्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयानं हे निर्देश दिले. आगामी निवडणुकांपूर्वी या याचिकांवर निर्णय व्हावा, अन्यथा विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही न्यायालयानं म्हटल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातली क्युरेटिव्ह याचिका योग्य वेळी सूचिबद्ध केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. तेव्हा सरन्यायाधीशांनी, क्युरेटिव्ह याचिकेवर प्रक्रिया सुरू असून, ती सुनावणीसाठी योग्यवेळी सूचीबद्ध करू, असंही वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या २१ जागा लढवणार असून, यापैकी मुंबईतल्या सर्व सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यातल्या पथकरासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढचे १५ दिवस राज्यांत पथकर नाक्यांवर कॅमेरे बसवून गाड्यांची मोजणी केली जाईल. कराच्या रक्कम आणि आकारणीबाबतचा तपशील प्रत्येक नाक्यावर मोठ्या डिजिटल फलकावर लावणं सक्तीचं असेल. टोल भरणा करताना रांगेत पिवळ्या रेषेच्या अलिकडे थांबावं लागल्यास वाहनांना टोल भरावा लागणार नाही, इत्यादी मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
****
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासोबतच शिक्षणाची गुणवत्ता राखण्याची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ आज गडकरी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वदेशी, स्वातंत्र्य, स्वावलंबित्व यातून आर्थिक संपन्नता साधण्याचा सल्ला गडकरी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले -
या समाजातून विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही त्याच्या गुणाने मोठा आहे. तर व्यक्तिगत आचरणातून आपल्या सगळ्यांना या विचारातून अनुकरण करण्याची गरज आहे. या समाजातल्या दलित, पिडीत आणि शोषित माणसाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रतिष्ठा मिळेल तो आपल्यासाठी सोन्याचा दिवस राहील. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. पण शिक्षणाची गुणवत्ताही मेंटनेन झाली पाहिजे. स्वदेश, स्वालंबन आणि स्वातंत्र्य या मुलभूत आधारावर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट - आर्थिक विकास करण्यात येईल. याचं मॉडेल गांधीजींच्या स्पिरीटमधून आलं आहे. 
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विकास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महाकवी वामनदादा कर्डक यांना यावेळी मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान करण्यात आली, कर्डक यांच्या कुटुंबियांनी ही पदवी स्वीकारली. ८६७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आलं.
****
‘आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिवस’ आज जगभरात पाळण्यात आला. मुंबईत मंत्रालया��� मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची शपथ दिली.
आपत्कालीन परिस्थितीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसंच विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीचं प्रशिक्षण देण्यात यावं, असं पाटील यावेळी म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन सभागृहात आज 'आपत्ती धोके निवारण दिवस' साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी आपत्ती धोके निवारण दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जागतिक 'आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीनं महानगरपालिका अग्निशमन दलामार्फत प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसंच उंच इमारतींवरून सुरक्षित सुटकेचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं.      
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज चेन्नई इथं न्यूझीलंड आणि बांग्लादेश दरम्यान सामना सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशनं पन्नास षटकात नऊ गडी बाद २४५ धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी २४६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. उद्या अहमदाबाद इथंल्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
****
‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांमधून आलेल्या कलशांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या मातीचे १२ अमृत कलश मुंबईला रवाना होणार आहेत.
'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत धुळे शहराच्या विविध भागातून संकलित करण्यात आलेल्या मातीचा अमृत कलश आज महापालिकेमार्फत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
****
मुस्लिम आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर इथून आज पायी मोर्चा मुंबईकडे निघाला. विविध शहरं आणि गावातून जाणारा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचं, या मोर्चेकऱ्यांचे नेते जावेद कुरेशी यांनी सांगितलं.
****
कंत्राटी भरती विरोधात सुशिक्षित बेरोजगारांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्यावतीनं काढलेल्या या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्हा रुग्णालयात आज शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या संशयित १३० हृदयरोग विद्यार्थ्यांची टूडी इको तपासणी करण्यात आली. यापैकी तीस विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलं. संशयित विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात वेळोवेळी तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी यावेळी केलं.
****
धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्पोकन इंग्लीश या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शाळेतील मुलांना फक्त पंचवीस तासांमध्ये इंग्रजी बोलण्याचा सराव आणि कौशल्य याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत संभाषणाचा आत्मविश्वास निर्माण या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. अशा विविध उत्कृष्ट उपक्रमांसाठी जिल्हा पातळीवर तीन शाळांना आणि तालुका पातळीवरील एका शाळेला दर महा ओपन लिंक्स फाउंडेशनकडून बक्षिसं देण्यात येणार आहेत.
****
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी बीड जिल्हा लोहार - गाडी लोहार समाज विकास संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना सादर केलं.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"सोपे होणार नाही": दीपक चहरच्या पुनरागमनावर भारताचा माजी फिरकीपटू NDTV ला | क्रिकेट बातम्या
“सोपे होणार नाही”: दीपक चहरच्या पुनरागमनावर भारताचा माजी फिरकीपटू NDTV ला | क्रिकेट बातम्या
केएल राहुल-नेतृत्वाखालील टीम इंडिया 18 ऑगस्टपासून हरारे येथे सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळणार आहे. ज्येष्ठ साधकांना आवडेल विराट कोहलीरोहित शर्मा, ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी सर्वांना विश्रांती देण्यात आली आहे. दीपक चहरदुखापतीमुळे यावर्षी क्रिकेटमधील बहुतांश खेळांना मुकलेल्या त्याला संघात स्थान देण्यात आले असून आगामी मालिकेत…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हरियाणा स्टीलर्सने गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा पराभव करून चौथ्या स्थानावर पोहोचले
हरियाणा स्टीलर्सने गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा पराभव करून चौथ्या स्थानावर पोहोचले
प्रो कबड्डी लीग सीझन 8, हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स: प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या 92 व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बेंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाईटफील्ड येथे शुक्रवारी बंगाल वॉरियर्सचा 46-29 असा पराभव केला. या विजयासह हरियाणा स्टीलर्स चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या सामन्यात मनिंदर सिंग हा सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू होता, तर मोहित, रण सिंग आणि रवी कुमार यांना प्रत्येकी 3…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
माजी क्रिकेटपटूंना वाटते की विराट कोहलीने विश्वचषकानंतर T20I कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करायला हवा होता | क्रिकेट बातम्या
माजी क्रिकेटपटूंना वाटते की विराट कोहलीने विश्वचषकानंतर T20I कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करायला हवा होता | क्रिकेट बातम्या
नवी दिल्ली: विराट कोहलीचालू ICC T20I विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे एक महिना अगोदर झाल्यानंतर तो भारतीय T20I कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा. आणि यामुळे क्रिकेटच्या बंधुत्वाचा भाग असलेल्या आणि त्याच्या बाहेरील अनेकांना आश्चर्य वाटले. माजी क्रिकेटपटूंना आवडते मनिंदर सिंग | आणि माँटी पानेसर असे वाटते की भारतीय कर्णधाराने घेतलेल्या निर्णयाने, तोही मोठ्या स्पर्धेपूर्वी, सकारात्मक संदेश गेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
विजय हजारे ट्रॉफी: महाराष्ट्राने पुडुचेरीला १77 धावांनी पराभूत केले
विजय हजारे ट्रॉफी: महाराष्ट्राने पुडुचेरीला १77 धावांनी पराभूत केले
अनन्य | कुलदीपला त्याच्या क्रियेत या मोठ्या सुधारणाची गरज आहेः माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंग कोहली इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्सला स्पर्श करणारा पहिला आशियाई बनला आहे IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार पळ काढला, पहा व्हिडिओ भारताचा माजी फिरकीपटू असा विश्वास ठेवतो की, पत्राप्रमाणे कोणीही सरळ चेंडू टाकू शकत नाही . Source link
Tumblr media
View On WordPress
0 notes