Tumgik
#अभिषेक सिंग
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जामखेड, श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याची जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आज झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
prabudhajanata · 2 years
Text
भिलाई । HTC के डायरेक्टर इन्द्रजीत सिंह उर्फ छोटू भैय्या को धमकी भरा पत्र भेजने वाले दो आरोपी गुरूमुख सिंग उर्फ गावू एवं गुरूवीर सिंग उर्फ रूबी को पुलिस ने गिरफ्तार कर किया है। इन आरोपियों से पूछताछ से यह बात सामने आई है कि व्यवसायिक प्रतिस्पर्धा के चलते धमकी भरा पत्र भेजे थे। हैवी ट्रांसपार्ट कंपनी (HTC) के इंद्रजीत सिंग उर्फ छोटू हथखोज ने 5 जनवरी को लिखित रिपोर्ट दर्ज कराया था कि 3 जनवरी को पोस्ट के माध्यम से उसे एक डॉक लिफाफा प्राप्त हुआ। लिफाफा फाड़ कर देखा तो अंदर पत्र था जिसमें भेजने वाले का ना नही था लिफाफे के अंदर अज्ञात व्यक्ति द्वारा पत्र में जान से मारने की धमकी देते हुये कुछ चेतावनी लिखी हुई थी जिससे प्रार्थी की रिपोर्ट पर अपराध क्रमांक 11 / 2023 धारा 507 भादवि का पंजीबद्ध कर विवेचना में लिया गया है। पुलिस अधीक्षक डॉक्टर अभिषेक पल्लव ने बताया कि घटना की गंभीरता को देखते हुए टीम गठित कर मामले विवेचना शुरू की गई टीम द्वारा पोस्ट ऑफिस के आस-पास के सीसीटीव्ही फुटेज प्राप्त किये गये, फुटेज के अवलोकन उपरांत आरोपी की पहचान सुनिश्चित की जाकर पूर्व में आरोपी राजेश गुप्ता एवं सहयोगी सोनू उर्फ सतवीर सिंग को गिरफ्तार किया जा चुका है, प्रकरण में तकनीकी आधार पर प्रकरण से संबंधित अन्य लोगों के संबंध में साक्ष्य एकत्रित किये जा रहे थे। जिसके परिणाम स्वरूप गुरूमुख सिंग उर्फ गावू एवं गुरुवीर सिंग उर्फ रूबी की संलिप्तता भी परिलक्षित हुई जिससे उक्त दोनो व्यक्तियों से तकनिकी आधार पर पूछताछ करने पर व्यावसायिक प्रतिस्पर्धा के चलते घटना को अंजाम देना स्वीकार किया जिससे आरोपियों को विधिवत गिरफ्तार किया गया।
0 notes
darshaknews · 3 years
Text
पटना पायरेट्सकडून पराभूत झाल्याने हरियाणा स्टीलर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
पटना पायरेट्सकडून पराभूत झाल्याने हरियाणा स्टीलर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
प्रो कबड्डी लीग सीझन 8, पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या 132 व्या सामन्यात पटना पायरेट्सने शनिवारी बेंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे हरियाणा स्टीलर्सचा 30-27 असा पराभव केला. पाटणा पायरेट्सने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. दुसरीकडे, हरियाणा स्टीलर्स या पराभवामुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. संघाची मोहीम लीगमध्येच संपली. या…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग त्यांच्या मामा गोविंदाबद्दल बोलतात
कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग त्यांच्या मामा गोविंदाबद्दल बोलतात
विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने सर्व कॉमेडी रिअॅलिटी शो आणि द कपिल शर्मामध्ये लोकांना खूप हसवले आहे. तिथे त्याची बहीण आरती सिंग ती एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि बिग बॉसमध्येही दिसली आहे. कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग यांचे स्वतःचे मामा आणि अभिनेता गोविंदा त्यांचे एकमेकांशी फारसे चांगले संबंध राहिले नाहीत पण दोघांनीही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कपिल शर्माला मोठा धक्का,आणखी एका कलाकारानं सोडला शो
कपिल शर्माला मोठा धक्का,आणखी एका कलाकारानं सोडला शो
कपिल शर्माला मोठा धक्का,आणखी एका कलाकारानं सोडला शो द कपिल शर्मा शो लवकरच छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकही त्यासाठी आतुर झाले आहेत. परंतु कार्यक्रमाच्या चाहत्यांची एक धक्कादायक बातमी आली आहे. ती म्हणजे भारती सिंग, कृष्णा अभिषेक पाठोपाठ आणखी एक कलाकार कार्यक्रमातून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे या कलाकारानं कार्यक्रमाच्या नवीन पर्वाच्या प्रोमो शूटमध्येही सहभागी झाला…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
"एमआयटीएम" चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
“एमआयटीएम” चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
सायबर सिक्युरिटीवर सर्वात कमी वयात लिहिले पुस्तक ; विश्वविक्रमाची नोंद ब्युरो । सिंधुदुर्ग : सुकळवाड येथील मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर शाखेच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक शिवप्रकाश सिंग या विद्यार्थ्याने सर्वात कमी वयात सायबर सिक्युरिटीवर पुस्तक लिहून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम... मुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी डोंबिवली : पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने पॉज संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग,साधना सभरकर,उनिशिया वाझ,पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.या उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.वीस लिटर दुध हे साईसेवा वृद्धाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून पोज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले. #webnewswala #paws #pawsdogdaycare #mahashivratri #mahadev #mahakal https://www.instagram.com/p/CMUsxUanjDB/?igshid=1s7tg5m08g7z8
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो.....
द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो…..
द कपिल शर्मा शो हा लवकरच पुनरागमन करणार आहे. द कपिल शर्मा शो प्रचंड गाजला होता. त्यामुळे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार तसेच कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गां��ी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जा��खेड, श्रीगोंदा शेव��ाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याची जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आ��� झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
5 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yy88vdby चालू घडामोडी (5 जून 2019) भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणार : चालू वर्षात भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तर सध्या भारत सहाव्या स्थानावर असून ब्रिटन जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु भारत ब्रिटला मागे टाकणार असून पाचव्या स्थानावर झेप घेईल. तसेच 2025 सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 2019 मध्ये भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि देशाचा जीडीपी three लाख कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होणार असल्याचे ‘आयएचएसच्या मार्किट’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंकमध्ये भारत पुढे जाणार असून जागतिक जीडीपीच्या वृद्धीतही भारताचे योगदान वाढेल. तसेच भारत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील एक प्रमुख इंजिन बनेल. आशियाई क्षेत्रातील व्यापार आणिगुंतवणुकीच्या प्रवाहातही भारताचे अमूल्य योगदान असेल, असेही अहलवालात सांगण्यात आले आहे. सध्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 18 टक्के असून 25 टक्क्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यमान सरकारसमोर उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगार वाढवण्याचे आव्हान असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण : ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं.संरक्षण संशोधन व विकास संस्थे(डीआरडीओ)च्या सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलचं परीक्षण आईटीआरमध्ये करण्यात आलं आहे. तर ही जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. जिची मारक क्षमता जबरदस्त आहे. ब्रह्मोस मिसाइलचा जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करू शकतो. या मिसाइलची मारक क्षमता 290 किलोमीटरच्या जवळपास आहे. भारताच्या कूटनीतीसाठी शस्त्रास्त्रं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही मिसाइल निर्णायक ठरत आहे. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या 7 ते 10 वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक 7’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक 2.8’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले होते. तर आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे. अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर कामकरीत आहे. भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे. यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता 450 किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक 7) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता 700 किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सीईटीत विनायक गोडबोले, आदर्श अभंगे राज्यात प्रथम : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत खुल्या गटातून सोलापूरचा विनायक गोडबोले (पीसीबी 100 पर्सेंटाइल), तर नांदेडचाआदर्श अभंगे (पी���ीएम 100 पर्सेंटाइल) हा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला. पीसीएम विषयांत खुल्या गटातून मुलांमध्ये धुळ्याचा अमन पाटील, तर मुलींमध्ये रत्नागिरीची मुग्धा पोखरणकर प्रथम आली. राखीव संवर्गातून मुलींमध्ये बीडची गीतांजली वारंगुळे हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. पीसीबी विषयांत खुल्या गटात मुलींमध्ये नांदेडची ऋचा पालक्रीतवार प्रथम आली. याच विषयांत राखीव संवर्गातून प्रथम येण्याचा मान नाशिकच्या अभिषेक घोलप याने मिळविला. पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा : पालघर पोलीस दलाच्या मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रितेश दिनेश प्रजापती यांनी 17 व्या टेनशिप कप इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून four सुवर्ण पदके पटकावली आहेत. तर ही स्पर्धा श्रीलंका देशात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. फस्ट मेन ओपन काता, फस्ट मेन ओपन कृमितो, फस्ट मेन ओपन टीम काता, फस्ट मेन ओपन टीम कृमितो या स्पर्धा प्रकरात पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी four सुवर्ण पदके पटकावले. तसेच या उत्तम कामगिरीबद्दल पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. दिनविशेष : 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म 5 जून 1908 रोजी झाला. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ 5 जून 1980 रोजी टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
darshaknews · 3 years
Text
हरियाणा स्टीलर्सकडे PKL-8 प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शेवटची संधी आहे
हरियाणा स्टीलर्सकडे PKL-8 प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शेवटची संधी आहे
प्रो कबड्डी लीग सीझन 8, पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, शनिवारी बेंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या 132 व्या सामन्यात पटना पायरेट्सचा सामना हरयाणा स्टीलर्सशी होणार आहे. पाटणा पायरेट्सने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. दुसरीकडे, हरियाणा स्टीलर्स 21 पैकी 10 सामने जिंकून 63 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तथापि, पुणेरी पलटण आणि गुजरात…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
कपिल शर्मा शो टीव्हीवर परत येण्यासाठी सज्ज आहे कारण कपिल शर्माच्या शोला लॉन्चची तारीख मिळाली टीव्ही ताज्या बातम्या
कपिल शर्मा शो टीव्हीवर परत येण्यासाठी सज्ज आहे कारण कपिल शर्माच्या शोला लॉन्चची तारीख मिळाली टीव्ही ताज्या बातम्या
कपिल शर्मा शो: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या धमाकेदार शो ‘द कपिल शर्मा शो’ने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो सातत्याने लोकांची मने जिंकत असल्याचे दिसत आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चे सर्वसामान्यांसोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सही चाहते आहेत. पण काही दिवसांपूर्वी कपिल शर्मासह इतर कलाकारांच्या दौर्‍यामुळे हा शो बंद करण्यात आला आणि त्याची जागा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक
पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक
पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या आमिषाने तरुणाची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अभिषेक सिंग आणि त्याचा साथीदार संजू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी…
View On WordPress
0 notes
Text
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात
ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात, माउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच��या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे. शुभम गिलच्या तडाखेबंद 90 धावा आणि हार्विक देसाईचं संयमी अर्धशतक या जोरावर टीम इंडियानं 22 व्या षटकातच विजय साकारला. 14 चौकार आणि एक षटकार ठोकून शुभमनं 59 चेंडूतच 90 धावा तडकावल्या, तर दुसरी बाजू लावून धरणाऱ्या हार्विकनं 8 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 73 चेंडूत 56 धावांची खेळी केली.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सलामीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवून पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा 'खेळ खल्लास' करून टाकला होता. स्वाभाविकच, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. याआधी भारत आणि झिम्बाब्वेच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये चार सामने झाले होते आणि टीम इंडियानं विजयाचा चौकार लगावला होता. या लौकिकाला साजेशी कामगिरी करतच, भारतानं झिम्बाब्वेला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. आधी अनुकूल रॉय (4 विकेट), अर्शदीप सिंग (2 विकेट) आणि अभिषेक शर्मा (2 विकेट) या गोलंदाज त्रिकुटाने झिम्बाब्वेला 154 धावांत गुंडाळलं आणि मग हार्विक-शुभम जोडीनं या पायावर विजयाचा कळस चढवला. तीनही सामने जिंकल्यामुळे भारत 'ब' गटात अव्वल स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.,,http://www.maharashtracitynews.com/icc-u-19-world-cup/
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Text
‘केदारनाथ’ चा मोशन पोस्टर रिलीज
‘केदारनाथ’ चा मोशन पोस्टर रिलीज
मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. अभिषेक कपूरचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत भूमिका साकारणार आहे. सारा खान या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचे समजल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता असतानाच ‘केदारनाथ’चा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
‘केदारनाथ’च्या…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
बैरी, बेईमान, बागी सावधान...!‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर प्रदर्शित....
बैरी, बेईमान, बागी सावधान…!‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर प्रदर्शित….
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. काही वेळापूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला.  ‘सोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खो-यात दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे.
इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या…
View On WordPress
0 notes