Tumgik
#महाराष्ट्र मराठी संस्कृती
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 10 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह तसंच पी व्ही नरसिंहराव यांना भारतरत्न;कृषीतज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांचाही सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क माफ
राज्य शासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार जाहीर;दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार तर कौतिकराव ठाले पाटील यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
समृद्धी महामार्गावर वैजापूर परिसरात कार आणि कंटेनरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नांदेड इथं नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह, दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, तसंच हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत डॉ एम एस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही घोषणा केली. पी व्ही नरसिंह राव यांनी देशात परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं, तर चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. डॉ एम. एस. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण केलं तसंच देशात कृषी क्षेत्राचा कायापालट केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांकडे अवैध मार्गाने बंदुका येत असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असून, याला राजकीय रंग देण्यात येऊ नये, असं फडणवीस म्हणाले.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल जळगाव इथं ही घोषणा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभाग आणि शिक्षणशास्त्र विभाग इमारतीचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्या सुरू असलेल्या ६४२ आणि नव्याने सुरु होणारे २०० अभ्यासक्रम अशा एकूण ८४२ अभ्यासक्रमांसाठी ही शैक्षणिक शुल्क सवलत लागू असेल. जर्मन देशाला कौशल्य असलेल्या ४ लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकवण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे २०२३ साठीचे विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ रवींद्र शोभणे यांना विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेला श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ प्रकाश परब तसंच बेळगावच्या वाङ्गमय चर्चा मंडळाला अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉ कौतिकराव ठाले पाटील आणि नाशिकच्या कुसूमाग्रज प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. विविध वाङमय पुरस्कार यावेळी जाहीर झाले. यामध्ये कवी दासू वैद्य यांच्या गोलम्‌गोल या बालकाव्य संग्रहाला बालकवी काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
मुंबईत भरवण्यात आलेल्या ओटीएम प्रदर्शनात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं दालन आंतरराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या दालनात राज्यतले गड किल्ले, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, कोकण यासह विविध पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दालनाला विविध पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ लाभावी अशी अपेक्षा गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आयोजित प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी ते काल बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १४ जिल्ह्यातल्या बचत गटांनी सहभाग घेतला असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांचे ७५ स्टॉलस इथं उभारण्यात आले आहेत.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भरधाव कार कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर जवळ काल रात्री हा अपघात झाला. जालना जिल्ह्यातले भाविक शिर्डीला जात असताना, कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात चारचाकी वाहन पुलावरून कोसळल्याने एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री हाळदा - मोघाळी रस्त्यावर हा अपघात झाला. जखमींवर भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसात सहाशे नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला असून, सहा ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकशे शेहेचाळीस नागरिकांनी पीएम स्वनिधीसाठी अर्ज दाखल केले, तर दोनशे एकतीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, ही यात्रा काल शहरातल्या सांगवी भागात बुद्ध विहार परिसर आणि तरोडा भागात तथागतनगर इथं पोहोचली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या लाभार्थी महिलांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले... 
****
नांदेड इथं गुर��द्वारा बोर्ड कायद्याच्या प्रस्तावित संशोधनाला शीख बांधवांनी विरोध दर्शवत काल गुरुद्वाऱ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात अनेक शीख बांधव सहभागी झाले होते.
दरम्यान, सचखंड गुरुद्वारा व्यवस्थापकीय समितीतले सर्व सदस्य हे शीख समुदायातीलच असतील असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. याबाबत विधानसभेत विधेयक मांडून चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, तरी कोणत्याही अपप्रचारास बळी पडू नये, असं आवाहनही राज्य शासनाने केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: बदलती राजकीय आव्हाने आणि समकालीन परिदृश्य' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात "भारतीय लोकशाहीवरील वाढती आक्रमणे आणि प्रसारमाध्यमांची भूमिका", या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी, तर दुसऱ्या सत्रात "स्वातंत्र्योत्तर भारतातील पक्षीय, प्रादेशिक, राष्ट्रीय राजकारण  आणि निवडणुकी समोरील आव्हाने", या विषयावर डॉ सुनिल पिंपळे यांनी मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बीड इथं काल आधुनिक समुपदेशन केंद्राचं उ‌द्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
नांदेड रेल्वेस्थानक परिसरात २२ तंबाखू विक्रेत्यांना जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने काल साडे दहा हजार रुपये दंड ठोठावला. 
****
जालना जिल्ह्यातल्या कार्ला इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पाच हजार रूपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. श्रीनिवास घुगे असं या अधिकाऱ्याचं नाव असून मंजूर झालेल्या घरकुल योजनेचं काम करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. 
****
ग्रंथोत्सव हे समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी लाभदायक ठरतील असा विश्वास हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. काल हिंगोली शहरात जिल्हा ग्रंथोत्सवाचं उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. या ग्रंथोत्सवांमुळे विद्यार्थ्यी तसंच तरुण पिढी पुस्तकांकडे आकर्षित होईल असं ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश गेवराई न्यायालयानं दिले आहेत. अनेक मुदत ठेवीधारकांना जादा व्याजदराचं आमिष दाखवून ठेवी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणं, आणि त्या ठेवीची परतफेड न करणं, या कारणासाठी न्यायालयानं हे आदेश दिले.
****
संपावर असलेल्या आशा स्वयंसेविका कामावर रुजू न झाल्यानं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं ४४० स्वयंसेविकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत स्वयंसेविकांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काल दिवसभरात केवळ ७१ स्वयंसेविकाच कामावर रुजू झाल्या, त्यामुळे इतर स्वयंसेविकांवर कारवाईचे आदेश प्रशासकांनी जारी केले.
****
धाराशिव जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ च्या प्रारूप आराखड्यासाठी शासनाने ४०८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. पाणीटंचाई आणि जनावरांना चाराटंचाई वर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव निधी आवश्यक असल्याची विनंती पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
नवी दिल्ली, 13 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे  ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
नवी दिल्ली, 13 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे  ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन
महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेला दोन वर्षांपूर्वी साठ वर्षे पूर्ण झाली. या हीरक महोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ने तीन महत्त्वपूर्ण खंडांची निर्मिती केली आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे हे खंड आहेत. सोमवार, 27 जून 2022 रोजी ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Link
0 notes
momsprincesspari · 4 years
Text
महिला दिनाच्या शुभेच्छा
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
View On WordPress
0 notes
jutecraft · 2 years
Photo
Tumblr media
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा.. आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा.. आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी:
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
SP Jute Craft Enterprises
Phone: 9112233520 / 8208493417 Email: [email protected] Add: 3rd Floor Ghole Building ,Beside Trillium Mall, Medical Square Nagpur
 https://www.indiamart.com/sp-jutecraft-enterprises/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चर्चा : मराठी वाचविण्याचे प्रयत्न
चर्चा : मराठी वाचविण्याचे प्रयत्न
चर्चा : मराठी वाचविण्याचे प्रयत्न प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी – [email protected]महाराष्ट्राची बोली आणि प्रमाणभाषा मराठी. मराठी भाषा वाचविण्यासाठी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी वैयक्तिक, संस्थांत्मक आणि शासनस्तरावरही आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी कोश मंडळापासून महाराष्ट्र साहित्य…
View On WordPress
0 notes
khabar24 · 3 years
Text
शिवसेना प्रमुखाच्या जयंती दिनी फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथे सामना वाचन प्रेरणा दिवस : Khabar24 Express
शिवसेना प्रमुखाच्या जयंती दिनी फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथे सामना वाचन प्रेरणा दिवस : Khabar24 Express
हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी 2021 रोजी साजरी होणारी जयंती ‘सामना’ वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी होणार आहे. मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.आजच्या तरुण पिढीने शिवसेना प्रमुख पासून वाचनाची प्रेरणा घेऊ वाचन हा छंद म्हणून जोपासावा हा या उपक्रमा मागचा हेतू आहे.संभाजीनगर जिल्हा21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंहराव, आणि कृषीतज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान जाहीर
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क माफ
राज्य शासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार जाहीर;दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार तर कौतिकराव ठाले पाटील यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
आणि
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
देशाचे दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह, दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, तसंच हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत डॉ एम एस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा केली. पी व्ही नरसिंह राव यांनी देशात परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं तर चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. डॉ एम. एस. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण केलं तसंच देशात कृषी क्षेत्राचा कायापालट केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
पुरोगामी लोकशाही आघाडीच्या काळातल्या दहा वर्षांच्या गैरकारभारातून अर्थव्यवस्था सावरण्याकरता केंद्र सरकारला दहा वर्ष लागली, असं केंद्रीय अर्थमंत्री ��िर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. सरकारने देशाच्या आर्थिक स्थितीवर सादर केलेल्या श्वेतपत्रिकेवर लोकसभेत झालेल्या चर्चेत त्या आज बोलत होत्या. दरम्यान, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी हे श्वेतपत्र सरकारचं राजनैतिक घोषणा पत्र असल्याचं सांगत टीका केली. काँग्रेसचे गौरव गोगोई, भाजपचे निशिकांत दुबे, रविशंकर प्रसाद, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजनसिंह, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आदींनी या श्वेतपत्रिकेवर आपले विचार मांडले.
****
मुंबईत आयोजित ओटीएम प्रदर्शनात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं दालन आंतरराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माहितीचा, राज्यातील पर्यटन वाढीसाठी नक्कीच लाभ होईल असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी यावेळी उद्धाटन प्रसंगी सांगितलं. या दालनात राज्यतले गड किल्ले, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, कोकण यासह विविध पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दालनाला विविध पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांकडे अवैध मार्गाने बंदुका येत असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव इथं ही घोषणा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभाग आणि शिक्षणशास्त्र विभाग इमारतीचं उदघाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्या सुरू असलेल्या ६४२ आणि नव्याने सुरु होणारे २०० अभ्यासक्रम अशा एकूण ८४२ अभ्यासक्रमांसाठी ही शैक्षणिक शुल्क सवलत लागू असेल. जर्मन देशाला कौशल्य असलेल्या ४ लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकवण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिले जाणारे २०२३ साठीचे विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि प्रकाशन संस्थेस दिला जाणारा श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक डॉ रवींद्र शोभणे यांना विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेला श्री पु भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ प्रकाश परब तसंच बेळगावच्या वाङ्गमय चर्चा मंडळाला अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉ कौतिकराव ठाले पाटील आणि नाशिकच्या कुसूमाग्रज प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. विविध वाङ्गमय पुरस्कार यावेळी जाहीर झाले. यामध्ये कवी दासू वैद्य यांच्या गोलम्‌गोल या बालकाव्य संग्रहाला बालकवी काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ लाभावी अशी अपेक्षा गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आयोजित प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी ते आज बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १४ जिल्ह्यातल्या बचत गटांनी सहभाग घेतला असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांचे ७५ स्टॉल उभारण्यात आले आहेत.
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसात सहाशे नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला असून सहा ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकशे शेहेचाळीस नागरिकांनी पीएम स्वनिधीसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर दोनशे एकतीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, ही यात्रा आज शहरातील सांगवी भागातील बुद्ध विहार परिसर आणि तरोडा भागात तथागतनगर इथं पोहोचली. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या लाभार्थी महिलांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले.
बाईट - सुनीता कटोरे आणि मनिषा बंगेवार, जि.नांदेड
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातले प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. पंढरपूर इथं यासंबंधी कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. शहरात येणाऱ्या भाविकांना तसंच स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. याठिकाणी एकशे आठ मंजूर कामांपैकी सहासष्ट कामं पूर्ण झाली तर सोळा कामं प्रगतीपथावर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात चारचाकी वाहन पुलावरून कोसळल्याने एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. काल रात्री भोकर इथून उमरीला जात असताना हाळदा - मोघाळी रस्त्यावरील शिवारात हा अपघात झाला. जखमींवर भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
तरुण पिढीतील कलाकारांनी अक्षर सौंदर्य आणि त्यामध्ये दडलेले अर्थशास्त्र समजून घ्यावे असं मत सुप्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपनकर यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाच्या वतीनं अक्षर सौंदर्य अर्थात टायपोग्राफी या विषयावर आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेत ते आज बोलत होते.
****
नांदेड इथं गुरुव्दारा बोर्ड कायद्याच्या प्रस्तावित संशोधनाला शीख बांधवांनी विरोध दर्शवत आज गुरुद्वाऱ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात अनेक शीख बांधव सहभागी झाले
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: बदलती राजकीय आव्हाने आणि समकालीन परिदृश्य' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात "भारतीय लोकशाहीवरील वाढती आक्रमणे आणि प्रसारमाध्यमांची भूमिका" या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी तर दुसऱ्या सत्रात "स्वातंत्र्योत्तर भारतातील पक्षीय, प्रादेशिक, राष्ट्रीय राजकारण आणि ���िवडणुकी समोरील आव्हाने" या विषयावर डॉ सुनिल पिंपळे यांनी मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बीड इथं आज आधुनिक समुपदेशन केंद्राचं उ‌द्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
0 notes
Photo
Tumblr media
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा.. आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा.. आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा For More Inquiry Visit Our Website : www.bloomingtravels.com Mail Us : [email protected] [email protected] Contact Us : Deep : +91-98868 08206 Ashish : +91-96867 60517 Anup : +91-98247 79947 Dixita : +91-95742 84000 Zainab : +91-8866 362526 Blooming Travel Solutions Pvt.Ltd. #BloomingTravelSolutionsPvtLtd #maharastraday #maharstrafoundationfoundationday2020 #stayhome #stayblessed #coronaeffect #qurantine #selfcare #selfisolation #covid19 #besttoursandtravelsinSurat #toursandtravelsinSurat #toursandtravelsinBengaluru #besttravelinbengaluru #besthimachaltourpackageinSurat #himachaltourism #himachaltourpackagesfromSurat #domestictourpackagesfrombengaluru #domestictourpackagesfromkarnataka #besttimefortourism #BestTourOperatorinSurat #ilovetravels #BestTourOperatorinBengaluru #HoneymoonTourPackgesfromSurat #DomesticHoneymoonTourPacakges #InternationalHoneymoonTourPackages #HoneymoonTourSpecialist https://www.instagram.com/p/B_o-VV6HHni/?igshid=12y192inq9cmi
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम - तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
मुंबई दि. १२ : प्रौढ वाङ्मय अनुवादित या प्रकारातील ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात येत असून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी गठित केलेली परीक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम - तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
मुंबई दि. १२ : प्रौढ वाङ्मय अनुवादित या प्रकारातील ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात येत असून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी गठित केलेली परीक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय…
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
लोकमान्यवर येळ्ळूरवासीयांनी दाखविला विश्वास बैठक घेऊन अफवा पसरविणाऱयांचा केला निषेध प्रतिनिधी/ बेळगाव कोणतीही सोसायटी लहान असो किंवा मोठी असो त्यांच्या कामकाजाची तपासणी होतच असते. लहान सोसायटींची येथील साहाय्यक नोंदणी कार्यालयाकडून होते. तर मोठय़ा असलेल्या सोसायटय़ांची बेंगळूर येथील नोंदणी कार्यालयामधून त्याची तपासणी केली जाते. त्या तपासणीला सोसायटय़ांनी सहकार्य करणे हे गरजेचे आहे. मात्र या तपासणीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही संस्थेबद्दल अफवा पसरविणे हे समाजाच्यादृष्टिने धोक्मयाचे आहे. त्याचा येळ्ळूरमध्ये तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. येळ्ळूरमधील शेतकरी कृषी पत्तीन सोसायटी, महाराष्ट्र मैदान समिती व विविध गणेशोत्सव मंडळांनी बैठक घेऊन त्याचा निषेध केला. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. केवळ बेळगावात नाही तर महाराष्ट्र, गोवा आणि दिल्लीतही त्यांनी हे नाते जोडले आहे. केवळ सहकार क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात त्यांनी जे कार्य केले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. दरवषी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्याचे काम लोकमान्यने केले आहे. लोकमान्य गणेशोत्सव सांस्कृतीक स्पर्धेत महागणपती विजेता म्हणून 1 लाखाचे बक्षीस दिले जाते. प्रथम क्रमांकाला 75 हजार तर व्दितीय क्रमांकाला 50 हजार, तृतीय क्रमांक 25 हजार, स्पर्धेमध्ये भाग घेणाऱया प्रत्येक स्पर्धकाला 10 हजार रुपये अशी बक्षिसे दिली जातात. ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशी अनेक मंडळे आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत. याचबरोबर शिवजयंतीच्यावेळी प्रथम क्रमांक, व्दितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या शिवजयंती मंडळांना देखील बक्षिसे दिली जातात. यासाठी बेळगाव, शहापूर, वडगाव असे विभाग करुन बक्षिसे दिली जात आहेत. कारण प्रत्येक मंडळाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हाच यामागचा लोकमान्यचा उद्देश आहे. #tarunbharatnews #tbdsocialmedia #lokmanyasociety #yallurpeople #faith #rumours (at Belgaum) https://www.instagram.com/p/B5CbAjZhkR_/?igshid=xnejeqnjsb1k
0 notes
darshaknews · 3 years
Text
#Maharashtra #Marathi #Sahitya #Solapur महाराष्ट्र साहित्य आणी संस्कृती मंडळावर मुस्लिम मराठी साहित्यकांचा समावेश होणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी निवेदन
#Maharashtra #Marathi #Sahitya #Solapur महाराष्ट्र साहित्य आणी संस्कृती मंडळावर मुस्लिम मराठी साहित्यकांचा समावेश होणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी) दि ४ जुन २०२१ : महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे नुकतेच गठण करण्यात आले व यात एक ही मुस्लीम साहित्यकाचा समावेश करण्यात आला नांही या मुळे साहित्य क्षेत्रात सरकाशी नाराजगी निर्माण झाली आहे कृपया ही नाराजगी लवकरात लवकर दूर करावी व मुस्लीम तथा अल्पसंख्याक. आदिवासी साहित्यकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी विनंती आहे.   …
Tumblr media
View On WordPress
0 notes