Tumgik
#मुळीक
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सांगली: १९६७ पूर्वी ज्यांच्या नावावर शेती, त्यांना कुणबी दाखला द्या: अॕड. संदीप मुळीक
https://bharatlive.news/?p=186462 सांगली: १९६७ पूर्वी ज्यांच्या नावावर शेती, त्यांना कुणबी दाखला द्या: अॕड. ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं कामकाज आज सलग बाराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काळे कपडे घातलेले विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. प्रतिस्पर्धा कायदा सुधारणा विधेयक सदनानं विरोधकांच्या गदारोळातच संमत केलं. परवा शुक्रवारी ३१ मार्च रोजी कामकाज होणार नसल्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. जैवविविधता सुधारणा विधेयक तसंच वन सुधारणा विधेयकही सदनासमोर सादर करण्यात आलं. दरम्यान वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. बापट हे १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. १९८३ ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते. बापट यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पुणे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १३ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येतील, असं कुमार यांनी सांगितलं. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले वयोवृद्ध मतदार आपल्या घरूनच मतदान करू शकणार आहेत.
****
प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री या योजनेसाठी शिक्षण मंत्रालयानं देशभरात नऊ हजार शाळांची निवड केली आहे. देशभरातले केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालयांसह दोन लाख ५० हजार शाळांमधून पीएमश्री योजनेतल्या शाळांची निवड करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. अभ्यासक्रम, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधा, मानवी साधनसंपत्ती आणि लिंगभाव समानता यांच्यासह सहा ठळक निकषांनुसार ही निवड करण्यात आली आहे.
****
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी या उद्देशाने फिरत्या एलईडी वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाला कालपासून नांदेड इथं सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवून या वाहनांना रवाना केलं. विविध योजनांची माहिती असलेली ही पाच वाहनं जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनावर आधारित चित्रफित दाखवण्यात येत आहे.
****
रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं आज मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सामाजिक सौहार्द जपूण हे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर इथं कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कांद्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. या सततच्या पडत्या दरांमुळे आज सकाळी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव थांबवला. कांद्याची किंमत प्रति किलो दोन ते चार रुपये झाल्यानं कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
****
रेल्वे विभागाच्या भुसावळ यार्डातल्या कामामुळे नांदेड-अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. उद्या ३० आणि परवा ३१ तारखेला नांदेड ���थून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे धावण्याऐवजी अकोला, भुसावळ कोर्ड लाईन, खांडवा मार्गे धावेल. त्याचप्रमाणे उद्या अमृतसर इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस देखील खांडवा, भुसावळ कोर्ड लाईन, अकोला, पूर्णा मार्गे धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
kokannow · 2 years
Text
श्रद्धा सावंत-राणे मॅडम यांचा उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार
श्रद्धा सावंत-राणे मॅडम यांचा उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार
सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी मुख्याध्यापिका सौ श्रद्धा सावंत-राणे मॅडम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचनालयाचे संचालक तथा मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्काराबद्दल सावंत-राणे मॅडम यांनी वाचनालयाचे आभार व्यक्त केले. त्यांनी वाचनालायाला आर्थिक स्वरूपाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य
सिंधुदुर्गनगरी  दि. 26 (जि.मा.का.) -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती  मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज ओरोस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rwarlekar · 4 years
Photo
Tumblr media
सर्व समाज घटकांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प : जगदीश मुळीक ; Learn More : http://indiareal.in/?p=50617&lang=mr&feed_id=23984&_unique_id=604729537aa9c
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
डॉ. दिपक मुळीक परब यांचा सत्कार https://www.headlinemarathi.com/citizens-news/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%ac-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%a4/?feed_id=46134&_unique_id=6014e398d6d0a
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सांगली: १९६७ पूर्वी ज्यांच्या नावावर शेती, त्यांना कुणबी दाखला द���या: अॕड. संदीप मुळीक
https://bharatlive.news/?p=186462 सांगली: १९६७ पूर्वी ज्यांच्या नावावर शेती, त्यांना कुणबी दाखला द्या: अॕड. ...
0 notes
aajlatur · 5 years
Photo
Tumblr media
ज्‍येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे आवाहन #AajLatur #Share #ProudLaturkar #Comment #MH24 #LaturNews
0 notes
kokannow · 2 years
Text
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल जाहिर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल जाहिर
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली. यावेळी सूरज देसाई, संतोष परब, श्रीकृष्ण मुळीक, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर, विठ्ठल मालंडकर हे उमेदवार विजयी झाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 years
Text
करोना च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले. केले 78 रक्तदात्यांनी रक्तदान
करोना च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले. .
भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 2 तर्फे आज डॉ नानासाहेब पुरळेकर शाळा येथे करोना च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीशभाऊ मुळीक यांनी केले तसेच त्यांनी करोना काळातील रक्तदानाचे महत्व व रक्ताची असलेली गरज ह्या विषयावर मार्गदर्शन सुद्धा केले. कोरोनाच्या या काळात डॉक्टर, पोलीस, सफाई…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 May 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मे २०१९ सकाळी ७.१० मि. ****  लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात  सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या विविध नेत्यांसोबत बैठका  बुद्धपौर्णिमा देशभरात भक्तीभावानं साजरी  नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानात दाखल  आणि  उस्मानाबाद तसंच परभणी जिल्ह्यांतल्या दुष्काळी स्थितीचा पालक सचिवांकडून आढावा **** लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांतल्या ५९ मतदारसंघांमध्ये थोड्या वेळापूर्वीच मतदानाला प्रारंभ झाला. यामध्ये उत्तरप्रदेश आणि पंजाबातल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आणि मध्यप्रदेश प्रत्येकी आठ, हिमाचल प्रदेशातल्या सर्व चार, झारखंडमधल्या तीन आणि चंदीगडमधल्या एका मतदारसंघांचा समावेश आहे. येत्या २३ मे रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे. **** सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल नवी दिल्लीत, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन, मतदानोत्तर राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे. सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी तयार करण्यासंदर्भात नायडू यांनी या नेत्यांशी चर्चा केली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए बहुमतापर्यंत पोहोचली नाही, आणि तरीही एनडीए ने सत्ता स्थापनेचा दावा केला, तर विरोधी आघाडीकडे पर्यायी धोरण तयार असायला हवं, असंही नायडू यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा, पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भाजप आणि शिवसेना तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार मुख्य पक्षांनी युती तसंच आघाडी करून, लोकसभा निवडणूक लढवली आहे, या निवडणुकीत युती किंवा आघाडीमधला जो पक्ष, मित्रपक्षाच्या तुलनेत अधिक जागा जिंकेल, त्याला विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात झुकतं माप मिळेल, या वृत्ताला भाजप तसंच काँग्रेस पक्षानंही दुजोरा दिला असल्याचं, पीटीआयनं म्हटलं आहे. **** बुद्धपौर्णिमा काल देशभरात भक्तीभावानं साजरी झाली. बिहारमध्येही बुद्धगया इथं ज्या बोधीवृक्षखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या महाबोधी मंदिरात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक बौद्ध विहारांमध्ये यानिमित्तानं बुद्धवंदनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. लातूर इथं ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅयण्ड इंडस्ट्री - डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना आळंदीचं विश्वशांती केंद्र आणि माईर्स एमआयटीचा तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. **** शेतीतल्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होणं आवश्यक असल्याचं, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी म्हटलं आहे. परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त काल आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कुलगुरू डॉ.अशोक ढवण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गटशेतीमुळे बाजारात शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढीस लागते, असंही डवले यांनी नमूद केलं. **** नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानात पोहोचला. मोसमी पावसानं दक्षिण अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटं, तसंच बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला आहे. यंदाचा मोसमी पाऊस समाधानकारक राहणार असून, पावसाळ्याच्या ४ महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज ही हवामान खात्यानं यापूर्वीच व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात आज काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवमान विभागानं वर्तवली आहे. **** आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग, लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अधिकृत कल तसंच निकालाचं सलग ४० तास प्रसारण करणार आहे. २३ मे रोजी सकाळी सात वाजेपासून २४ मे च्या रात्री ११ वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेतून हे प्रसारण करण्यात येईल. ‘विशेष जनादेश २०१९’ या नावाच्या या कार्यक्रमात, राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील. आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्यूब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यातल्या सव्वीस धरणांची पाणीपातळी शून्याच्या खाली गेली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यातल्या एकशे तीन मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांत सध्या अकरा पूर्णांक चौऱ्यांशी शतांश टक्के पाणी शिल्लक आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण तेवीस पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के एवढं होतं. औरंगाबाद विभागातल्या जायकवाडी, मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सीना कोळेगाव आणि निम्न दुधना या धरणांमध्ये सध्या शून्य पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणांमध्ये २३ पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के पाणी शिल्लक होतं. **** उस्मानाबाद तसंच परभणी जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी, काल जिल्ह्यातल्या पाणी तसंच चारा टंचाईचा आढावा घेतला. उस्मानाबाद इथं झालेल्या बैठकीला पालक सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपस्थित होत्या. जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी १४२ गावातल्या १७१ विंधन विहिरी तर टॅंकर व्यतिरिक्त पाणी पुरवठ्यासाठी ३२७ गावांतल्या ६६० विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, तर ८७ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. परभणी इथं झालेल्या बैठकीत पालक सचिव विनिता सिंघल यांनी, टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातल्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय पथकानं काल पहाटे सेलू तालुक्यात नागठाणा आणि देवगाव इथं दुष्काळी भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** निम्न दुधना प्रकल्पातून परभणी साठी दुधना नदीत पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी काल मानवत रोड इथं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. **** बीड जिल्ह्यात साडे आठशेपेक्षा अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, जनावरांसाठी पाचशे नव्व्याण्णव चारा छावण्या सुरू केलेल्या आहेत. रोजगा�� हमी योजनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… ऊस तोडणीसाठी गेलेले ऊसतोड कामगार हे वापस आले असून, या कामगारांना हाताला काम मिळावं याकरिता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये ३९८ कामे सुरू करण्यात आली आहे. या कामावर बत्तीस हजार १४२ एवढे मजूर सध्या काम करीत आहेत. तर बाराशे ९७ येवढी कामं अजून मंजूर करण्यात आली आहे. पाणीटंचाई निवारणासाठी पाण्याचे स्त्रोत हे राखीव करण्यात आली आहेत. विहीर अधिग्रहण, तलावात बोरवेल घेणे यासारखी टंचाई निवारणाची कामे देखील हाती घेण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्या साठी शशी केवडकर बीड. **** ***
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
मुख्यमंत्री म्हणतात, लोकसभेसाठी पुण्यातून बापट - शिरोळे नको?
मुख्यमंत्री म्हणतात, लोकसभेसाठी पुण्यातून बापट – शिरोळे नको?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमकडून नवीन चेहऱ्यांबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाबाबत विचार सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांची ही चाचपणी गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. कारण या जोडीचं पुण्यातील भाजपवर कायमच वर्चस्व राहिलं आहे. मागील लोकसभा…
View On WordPress
0 notes
rwarlekar · 4 years
Photo
Tumblr media
राज्य शासन सूडबुद्धीने कारवाई करीत आहे : शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका ; Learn More : http://indiareal.in/?p=49603&lang=mr&feed_id=22962&_unique_id=60363f8dae595
0 notes
ashishsawant · 6 years
Photo
Tumblr media
आजची खरेदी 1 माझ्या मुलासाठी @arjunsawant महाराष्ट्र देशा @ HOME मिलिंद मुळीक दास्तान - सुहास शिरवळकर #book #bookread #bhovra (at Thane)
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
खानापूरमधील इंडिया आघाडीच्या बैठकीत सत्ताधारी हल्लाबोल : राष्ट्रवादीच्या मुळीक यांनी मांडली गंभीर समस्या
https://bharatlive.news/?p=178912 खानापूरमधील इंडिया आघाडीच्या बैठकीत सत्ताधारी हल्लाबोल : ...
0 notes
aajlatur · 5 years
Photo
Tumblr media
रुई रामेश्वरमध्ये बुधाजीराव मुळीक आणि मिलिंद कांबळेंना बुद्ध विश्वशांती पुरस्कार #AajLatur #Share #ProudLaturkar #Comment #MH24 #LaturNews
0 notes