Tumgik
#लग्नाच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बघता बघता लग्नाच्या स्टेजचं रुपांतर “कुस्तीच्या आखाड्यात” झालं!
बघता बघता लग्नाच्या स्टेजचं रुपांतर “कुस्तीच्या आखाड्यात” झालं!
बघता बघता लग्नाच्या स्टेजचं रुपांतर “कुस्तीच्या आखाड्यात” झालं! हल्ली लग्नसराईचा सीजन आहे. हा सीझन येताच सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित व्हिडीओजचा पूर येतो. फेसबुक असो वा इन्स्टाग्राम असो वा ट्विटर, सोशल मीडियाच्या अशा सर्व प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतात, त्यातील काही अतिशय गमतीशीर तर काही भावनिकही असतात. विशेषत: वधूचा निरोप घेताना भावनिक दृश्य पाहायला मिळतं. बरं, तुम्ही…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 6 months
Text
लेकीचा साखरपुडा झाला, दुसऱ्याच दिवशी आईचा करुण अंत, जिथे मांडव टाकला, तिथूनच अंत्ययात्रा
धनाजी चव्हाण, परभणी : आईने आपल्या मुलीच्या लग्नासाठी दारामध्ये मांडव टाकला. मुलीचा साखरपुडा देखील धुमधडाक्यामध्ये झाला. साखरपुडा झाल्यानंतर आई रात्री फार खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आईला पॅरालिसिसचा झटका आला. दवाखान्यात जाईपर्यंत आईचा मृत्यू झाला. दोनच मुली असल्यामुळे मुलींनीच आईला अग्नी द्यावा, अशी संपूर्ण धोबी समाजाने निर्णय घेतला. मुलीच्या लग्नासाठी टाकलेल्या मांडवातूनच आईची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला ��ाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवस��ंनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
pandurangkoli · 2 months
Text
0 notes
rohini-0306 · 2 months
Text
0 notes
jadhavs-world · 2 months
Text
0 notes
gorakhnikam · 2 months
Text
0 notes
steadykingchaos · 2 months
Text
लग्नाच्या 7 वर्षानंतर झाली पुत्र प्राप्ती. | Nashik | Sant Rampal Ji Mar...
youtube
0 notes
vishnulonare · 2 months
Text
लग्नाच्या 7 वर्षानंतर झाली पुत्र प्राप्ती. | Nashik | Sant Rampal Ji Mar...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू - लग्नाच्या 7 वर्षानंतर झाली पुत्र प्राप्ती - रुपाली गोरख शिंपी|Nashik|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो
रोहित-रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच चर्चा; पहा शेअर केलेले ‘हे’ खास फोटो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या दोघांचा लग्नबंधनाला सात वर्ष पूर्ण झाले आहेत. या आनंदाच्या क्षणांना साजरा करण्यासाठी रोहित शर्माने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-message-of-plant-trees-live-trees-was-given-from-the-wedding-card-sable-family-is-appreciated-in-parbhani-district/
0 notes
mhlivenews · 7 months
Text
लग्नाच्या ३ महिन्यातच संसार तुटला, एक गोष्ट लपवली अन् प्रकरण कोर्टात, अशी चूक तुम्ही करु नका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विवाहापूर्वीच जडलेल्या आजाराची माहिती न देता तो लपवून ठेवत एखाद्याशी लग्न करणे चूक असून ते घटस्फोटाचे कारण ठरू, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी आणि एम.डब्ल्यू चांदवानी यांनी हे मत नोंदवित पतीच्या बाजूने निकाल देत पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे. हे जोडपे अकोल्यातील आहे. त्यांचे २०१७मध्ये लग्न झाले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sattakaran · 10 months
Text
Prateik Babbar : लग्नाच्या वर्षभरातच वेगळे झाले, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलला प्रतिक बब्बर
0 notes
pandurangkoli · 2 months
Text
0 notes
shrikrishna-jug · 1 year
Text
ऊपवधू आणि ठरवून लग्नाची परंपरा
आठवतं असेल, एकदा तळ्यावर आम्ही श्री. समर्थ यांच्या बरोबर त्यांच्या भगिनी सोबत एकत्र येऊन चर्चा झाली होती.त्यांनी आपला व्यवसाय शिक्षीकेचा असून आपण विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवते असं सांगून थोडक्यात आपल्या व्यवसायाचं वर्णन केलं होतं.आज त्यांच्या बरोबर त्यांची ऊपवधू मुलगी आली होती.तिने आमच्याशी,“ठरवून लग्न करण्याच्या भारतातल्या परंपरे विषयी आणि सद्ध्या तिला तिच्या होऊ घातलेल्या लग्नाच्या…
View On WordPress
0 notes