Tumgik
#विश्व चषक
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024    रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेणार आहेत. नवी दिल्ली इथं होणार्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
***
कोलकाता इथल्या आरजीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्त्येच्या पार्श्वभूमीवर  पद्म पुरस्काराने सन्मानित सत्तरहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं आवश्यक असून अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पंतप्रधानांनी कडक पावलं उचलावेत असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली असून  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीशांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ  झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, आरजी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन , सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे. या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोलकात्यात होणारा  ड्युरंड चषक फुटबॉल सामना काल रद्द करण्यात आला.
***
देशातील  पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही करण्यात आलं.
***
जम्मू काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे.या यात्रेमध्ये यावर्षी देशभरातून पाच लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या पवित्र  गुहेचं  दर्शन घेतलं,यावर्षीची भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
***
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.उपराष्ट्र्पती जगदीप धनखड यांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचं आवाहन आपल्या शुभेछा संदेशातून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवाशियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नात्यात गोडवा आणि जीवनात सुख्,समृद्धी आणेल असं पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
***
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते चेन्नईमधील भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं काल उद्घाटन झालं. चेन्नई बंदरावर असलेले प्रदूषण प्रतिसाद केंद्र हे सागरी प्रदूषण व्यवस्थापनातील एक अग्रगण्य पाऊल आहे. किनारपट्टीलगतच्या राज्यांजवळच्या समुद्रात होणाऱ्या तेल आणि रासायनिक गळती सारख्या सागरी प्रदूषणाच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीनं, हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
***
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सव इथं सावित्री नदीच्या पात्रात बुडून  काल ३ जणांचा खाडीमध्ये झाला.हे तिघे महाबळेश्वरहून  सव इथं पर्यटनासाठी आले होते.मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ होते,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
माजी सेना प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं.ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी अनेक महत्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती.पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचही लिखाण केलं होतं.
***
0 notes
darshaknews · 2 years
Text
वर्ल्ड कप सुपर लीग: नेदरलँड्सचा पराभव करून इंग्लंड अव्वल स्थानावर, हे आहे गुणतालिकेत
वर्ल्ड कप सुपर लीग: नेदरलँड्सचा पराभव करून इंग्लंड अव्वल स्थानावर, हे आहे गुणतालिकेत
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण सारणी: नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद करत इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना 232 धावांनी, दुसरा सामना 6 गडी राखून आणि शेवटचा सामना 8 विकेटने जिंकला. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत या विजयाचा फायदा इंग्लंडलाही झाला आहे. आता इंग्लंड 125 गुणांसह गुणतालिकेत अव्वल…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
कपिल देव नाही, मोहिंदर अमरनाथ विश्वचषक SF आणि फायनलमध्ये MOM मध्ये आहे, शेन वॉर्ननंतर, 23 वर्षांपासून कोणीही अशा ठिकाणाला स्पर्श केला नाही 23 वर्षानंतर अशा बिंदूला कोणी स्पर्श केला नाही.
कपिल देव नाही, मोहिंदर अमरनाथ विश्वचषक SF आणि फायनलमध्ये MOM मध्ये आहे, शेन वॉर्ननंतर, 23 वर्षांपासून कोणीही अशा ठिकाणाला स्पर्श केला नाही 23 वर्षानंतर अशा बिंदूला कोणी स्पर्श केला नाही.
क्रिकेटमध्ये अनेकवेळा क्रीडा समीक्षकांचे म्हणणे ऐकायला हवे की, विक्रम बनवल्याबरोबर तोडायचे असतात. मात्र, असे काही विक्रम आहेत जे दीर्घकाळ मोडत नाहीत. येथे आपण अशाच एका एकदिवसीय विश्वचषकाच्या विक्रमाबद्दल बोलू. हा विक्रम 1983 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या नावावर होता. मात्र, त्याचे नाव अष्टपैलू कपिल देव नसून विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ आहे. विश्वचषकाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा आज संपत आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकर इथं सभा घेणार आहेत. तत्पूर्वी नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, महाविकास आघाडीमध्ये योग्य ताळमेळ असून, मित्रपक्षाचे कार्यकर्ते सोबत काम करत असल्याचं सांगितलं.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. तर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आज होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. 
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल, तसंच बीड लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी २७ तारखेला कोल्हापूर इथं जाहीर सभा घेणार आहेत. कोल्हापूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली शहरात आज पहाटे मतदान जनजागृती संदर्भात रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार, यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व नागरीकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली.
****
नाशिक जिल्ह्यात अंध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचल्यावर सहायकांच्या मदतीने मतदान करता येईल यासाठी मशिनवर ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरवण्यात येणार आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड ही संस्था ब्रेल लिपीतल्या मतपत्रिका तयार करुन देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
****
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था - एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला, ‘सनफ्लावर्स वेअर फर्स्ट वन टू नोज’ या चित्रपटाची फ्रान्स मध्ये होणाऱ्या ७७व्या कान चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. संस्थेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. १५ ते २४ मे दरम्यान होणार्या या महोत्सवामध्ये स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव, मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चीनमध्ये शांघई इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्व चषक स्पर्धा २०२४ मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिने महिला कंपाउंड पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत दुसरा क्रमांक मिळवला. आदिती स्वामीने ७०४ गुणांसह आठवा, तर परनीत कौर आणि अवनीत कौर या अनुक्रमे ७०३ आणि ६९६ गुणांसह १४ आणि २३ व्या क्रमांकावर पोचल्या. या खेळाडूंमुळे भारतीय महिला संघ एकूण दोन हजार ११८ गुणांसह पात्रता फेरीतला सर्वोत्कृष्ट संघ ठरला आहे.
****
भारतानं जागतिक ॲथलेटिक्स साखळी स्पर्धेसाठी १५ खेळाडुंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी चार आणि पाच मे रोजी बहामास मध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुरुष, महिला आणि मिश्र गटात हे स्पर्धक ४०० मीटर रिले प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
जी ट्वेंटी परिषदेची सांगता;एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्याचा मार्ग सुखद-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन
ठाणे इथं ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू
प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटारा आणि जलद न्यायासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध-न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांचं प्रतिपादन
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल पावसामुळे थांबलेला भारत-पाकिस्तान सामना आज पुढे सुरू होणार
****
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा मार्ग सुखद असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. १८ व्या जी ट्वेंटी परिषदेच्या शिखर परिषदेची काल नवी दिल्ली इथं यशस्वी सांगता झाली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. १४० कोटी भारतीयांच्या मंगलमय शुभेच्छांसह आपणा सर्वांचे खूप-खूप आभार या शब्दांत मोदी यांनी सर्व सहभागी देशांच्या सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले...
‘‘मै G-20 Summit के समापन की घोषणा करता हूं। वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर का रोड मॅप सुखद हो। स्वस्ति अस्तू विश्वस्य। यानी संपूर्ण विश्व मे आशा और शांती का संचार हो। एक सौ चालीस करोड भारतीयों की इसी मंगल कामना के साथ आप सभी का बहोत बहोत धन्यवाद।’’
दरम्यान पुढची जी ट्वेंटी परिषद ब्राझील इथं होणार आहे. ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-२० ची सामायिक उद्दिष्ट साध्य होतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदाचं प्रतीक असलेला हातोडा ब्राझीलचे राष्‍ट्रपति लुईस इनासियो लूला डी सिल्‍वा यांच्याकडे औपचारिकपणे सोपवला. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी ही सूत्रं स्वीकारल्यानंतर बोलताना सध्या जगात संपत्तीचं केंद्रीकरण झालं आहे, तर दुसरीकडे लाखो माणसं अजूनही भुकेच्या समस्येनं त्रस्त आहेत, याकडे लक्ष वेधलं.
दरम्यान, या शिखर परिषदेत निर्णय झालेल्या मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला दूरदृष्यप्रणालीमार्फत सत्र आयोजित करणयाचा प्रस्ताव मोदी यांनी मांडला. ते म्हणाले...
‘‘इन दो दिनों में आप सभी ने अनेक बातें यहां रखी है। सुझाव दिये है। बहोत सारे प्रस्ताव रखे है। मेरा प्रस्ताव है की हम नवंबर के अंत मे G-20 का एक व्हर्चुल सेशन और रखे। उस सेशन मे हम इस समीट के दौरान तय विषयों की समीक्षा कर सकते है। मै उम्मीद करता हूं की आप सब इससे जुडेंगे।’’
****
प्रमुख जागतिक परिणामांसाठी जी ट्वेंटी संवादाद्वारे धोरणात्मक आणि व्यापक जागतिक परिणाम साध्य केल्याबद्दल कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज- सीआयआयनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. उद्योजकांच्या या प्रमुख संघटनेचे अध्यक्ष आर. दिनेश यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं.
IMC- चेंबर ऑफ कॉमर्स अँड आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष समीर सोमय्या यांच्याकडून जी ट्वेंटी बैठकीच्या जाहीरनाम्याचं स्वागत करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे १४ महिन्यांमध्ये १३ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवलं आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये आता अनेकविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
****
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य शासनानं आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल ही माहिती दिली. आरक्षणाबाबत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी होणाऱ्या या बैठकीत सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या प्र��ुख नेत्यांना बोलावण्यात आल्याचं, पवार यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, मराठा आरक्षण ही आता न्यायप्रविष्ट प्रक्रिया आहे. मात्र विरोधक राजकारण करुन दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते काल नवी मुंबई इथं एका मेळाव्यात बोलत होते. जालन्यात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेला सरकारचा पाठिंबा आहे, मात्र, आंदोलकांनी तसंच समाजाने राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांपासून सावध राहावं असंही दरेकर म्हणाले. मराठा समाजाला विद्यमान सरकारच, आरक्षण देईल असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
****
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी डॉक्टर, औषधविक्रेते आणि वैद्यकीय तंत्रज्ञ कार्यकर्त्यांनी काल आंतरवाली सराटी इथं आंदोलन परिसरात पदयात्रा काढली. उपोषण स्थळी झालेल्या लाठीमाराचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. बीडसह गेवराई, माजलगाव, शहागड, अंबड, जालना इथले कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
बीड जिल्ह्यातल्या कुटेवाडी गावात रस्त्यावर काल सकाळी दोन युवकांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं घोषणा देत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरीकांनी पोलिसांच्या सहाय्यानं त्यांना रोखल्यानं अनर्थ टळला.
****
राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री - शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे नाशिकरोड-देवळाली मतदार संघाचे २५ वर्षे आमदार होते.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पर्यावरण विघ्नहर्ता - २०२३’ स्पर्धेच्या भित्तीचित्राचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात करण्यात आलं. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभाग नोंदवाण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षासोबत ‘पंचवीस वर्ष युती होती तरीही शिवसेनेची भाजप झाली नाही, तसंच काँग्रेससोबत गेलो, म्हणून शिवसेनेची काँग्रेस होणार नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल जळगाव इथं वचनपूर्ती सभेत बो���त होते. जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आणि महापालिकेच्या आवारात उभारलेला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचं अनावरण काल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं.
****
ठाणे इथं बांधकाम सुरू असलेल्या ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. छतावरील काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्यानं हा अपघात झाला. याबाबत अधिक तपास करण्यात येत असून यातील मृतांची ओळखही पटवण्यात येत आहे. उत्तरीय तपासणीसाठी सर्व मृतदेह काल ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. विशेष अभियान पथकाच्या जवानांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलं. हे तिघेही विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा तसंच जलद न्यायासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर आणि हदगाव या दोन्ही ठिकाणच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
बीड जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोक न्यायालय अर्थात लोक अदालत घेण्यात आली. यावेळी अठरा कोटी रूपयांची सहा हजार नऊशेपेक्षा अधिक प्रकरणं निकाली काढण्यात आली.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल कोलंबो इथं सुरु असलेला भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवावा लागला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं ५६ आणि शुभमन गिलनं ५८ धावांची आकर्षक खेळी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पंचविसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर दोन बाद १४७ धावसंख्येवर पावसामुळे सामना थांबवावा लागला तेव्हा विराट कोहली आठ आणि के.एल.राहुल ही १७ धावांवर नाबाद होते. आज हा सामना २६ व्या षटकापासून दोन बाद १४७ धावसंख्येवरून पुढे सुरू होईल. आजही पावसामुळे सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक- एक गुण देण्याचा निर्णय आशियायी क्रिकेट परिषदेनं घेतलेला आहे.
****
सोळा वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. भूतानची राजधानी थिंफू इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशचा दोन शून्य असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं.
****
इंडोनेशियात झालेली मास्टर्स सुपर हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धा भारताच्या किरण जॉर्जने जिंकली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात किरणने जपानच्या प्रतिस्पर्ध्याला २१-१९, २२-२० असं सरळ दोन गेममध्ये पराभूत केलं.
****
मॅक्सिकोत झालेल्या जागतिक तीरंदाजी स्पर्धेत बुलडाण्याच्या प्रथमेश जावकरने रौप्यपदक पटकावलं. डेन्मार्कच्या तीरंदाजाकडून निसटता पराभव झाल्यानं, प्रथमेशला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आज पहाटे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत जोकोविचने रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा ६-३, ७-६, ६-३ असा पराभव करत विजय मिळवला.
****
संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त औरंगाबाद इथल्या संत सेना भवनात काल `इतर मागासवर्ग -ओबीसी समाज दशा आणि दिशा' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य विधिज्ञ बी एल सगर, बारा बलुतेदार महासंघांचे राज्य अध्यक्ष कल्याण दळे, ज्येष्ठ पत्रकार स.सो खंडाळकर, माजी महापौर बापू घडामोडे यांनी या चर्चासत्रात भूमिका मांडल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात काल आयुष्यमान भव अभियान अंतर्गत महा आरोग्य शिबीर घेण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य तसंच कुटुंब कल्याणमंत्री आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे याचं उदघाटन केलं. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि प्रशांत चेडे यांच्या हस्ते यावेळी स्वास्थ्य रथाचं उदघाटन करण्यात आलं. काल पहिल्या दिवशी या महा आरोग्य शिबीराचा ५ हजार २१४ रुग्णांनी लाभ घेतला.
****
परभणी जिल्ह्यात केंद्र सरकारच्या देशव्यापी ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गंत अमृत कलश यात्रेस प्रारंभ होत आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवल्या जाणाऱ्या या यात्रेत एक ते तेरा ऑक्टोबर दरम्यान तालुकास्तारावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
यात्रेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेनं काटेकार पालन करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी दिले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या निल्लोड जवळ काल पहाटे एका चारचाकी गाडीच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. जळगावकडे जाणाऱ्या या वाहनावरचा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडली. पाण्याने भरलेल्या या खड्ड्यातून नजिकच्या गावकऱ्यांनी कारचालकाची पत्नी आणि मुलाला बाहेर काढलं, कारचालकाचा मात्र यात मृत्यू झाला.
****
वाशिम ते हिंगोली महामार्गावर चिंचाळा पाटीजवळ काल संध्याकाळी अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवली. अमरावतीहून नांदेडकडे निघालेली एसटी बस चिंचाळा पाटीजवळ सायंकाळी नादुरुस्त झाल्यानं सर्व प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर चालक आणि वाहक बसचं काम करत असतांना दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी बस पेटवून दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात मौजे पिंपळकौठा मगरे इथं विजेचा धक्का लागून एका इसमाचा आणि त्याच्या मुलाचा काल मृत्यू झाला. बालाजी मगरे आणि दत्ता बालाजी मगरे अशी या पिता पुत्राची नावं आहेत. ते काल शेतात बांधावर काम करत असतांना त्या दोघांना विजेचा धक्का लागला त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.  
****
बीड जिल्हा प्रशासनातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या १४ सप्टेंबर रोजी विविध उपक्रम सुरू होत आहेत. यादिवशी सकाळी सत्रात प्रभात फेरी-गीत गायन तर संध्याकाळी मुक्ती संग्राम विषयक व्याख्यान आणि पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. १५ सप्टेंबरला मॅरेथॉन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सकाळी ध्वजारोहण तर संध्याकाळी दीपोत्सव सोहळा आणि त्यानंतर हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम या नाटकाचं सादरीकरण होणार आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त औरंगाबाद इथं दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे. तेरा सष्टेंबरला पहिल्या दिवशी ही परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तर १४ सष्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या सभागृहात होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकारानं ही परीषद होत आहे. प्राध्यापकांचा सहभाग असलेल्या या परिषदेत मुक्ती संग्राम लढ्याबाबतच्या विविध पैलूंवर विचारमंथन होणार आहे.
****
बीडच्या  छत्रपती राजर्षी शाहू नागरी सहकारी बँकेला औरंगाबाद विभागातून उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेसाठीचा "कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार" प्राप्त झाला आहे. काल, नाशिक इथं या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण झालं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बालकांमधील बहिरेपणा या आजाराचं निदान करण्यासाठी मोफत तपासणी शिबीर नांदेड इथं घेण्यात आलं. या आजाराचं लवकर होणारं निदान आणि त्यावरील शस्त्रक्रियेचे उत्तम परिणाम असल्यानं पालकांनी याकडे लक्ष देण्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 November 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा, मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे दाम्पत्याला मान
महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प मंजूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यामध्ये पात्र उमेदवारांना विभाग निहाय नियुक्तीपत्रांचं वाटप  
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत ३१ पूर्णांक ७४ टक्के मतदान
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, आठ डिसेंबरला मतमोजणी
बुलढाणा जिल्ह्यात मोटार चालवण्यास शिकवताना नियंत्रण सुटून मोटार विहीरीत कोसळली. दोन जणांचा पाण्यात बुडून तर विहीरीतल्या गाळात फसून अन्य एकाचा मृत्यू
आणि
टी -ट्वेंटी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघावर ३३ धावांनी विजय मिळवत पाकिस्तान संघाचं स्पर्धेतलं आव्हान कायम
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड खुर्द गावातले उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. या यात्रेसाठी दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. सध्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी रांग असून, दर्शनासाठी १० ते १२ तासांचा अवधी लागत आहे. राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावं, वारकरी, भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचं पुनर्वसन करण्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे, अन्नदाता शेतकरी राजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असं साकडं त्यांनी विठ्ठलचरणी घातलं आहे.
****
केंद्र सरकारनं महाराष्ट्रात दोन लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प मंजूर केले असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याच्या महासंकल्प योजनेतल्या पहिल्या टप्प्यातली नियुक्ती पत्रं, काल मुंबईत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधानांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. यावेळी रोजगार मिळालेल्या तरुणांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले.
नमस्कार. मी सर्वात आधी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्यापैकी काही लोकांना नियुक्तीपत्र प्रदान होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. मी यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो.
महाराष्ट्र शासन राज्यातला बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्यानं सोडवत असून, अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी युवकांसाठी उपलब्ध करुन देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढले. देशभरात दहा लाख रोजगार देण्याच्या उपक्रमात महाराष्ट्र शासनानं कमी वेळात केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.
महाराष्ट्रासाठी ७५ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. असे प्रकल्प उभे राहिले की रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतात. मुद्रा योजनेद्वारे तरुणांना २० लाख कोटी रुपयांचं कर्ज यापूर्वीच वितरित केलं आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनाही त्याचा लाभ झाला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
या कायर्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यामध्ये पात्र उमेदवारांना विभाग निहाय नियुक्तीपत्रं देण्यात येणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले:
तरुणांना रोजगार द्यायचं आणि म्हणून हा रोजगार मेळावा आपण सुरू केला आहे. एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यात आपण जवळपास दोन हजारांपेक्षा जास्तीच्या नोकऱ्या नियुक्त्या आपण या ठिकाणी देत आहोत. सहाशे नियुक्त्या इथं होतील. बाकी विभागवाईज आपल्या त्याठिकाणी होतील. आणि जसं पो���िस खात्यामधील देखील अठरा वीस हजार नोकऱ्या. ग्रामविकासमध्ये जवळपास दहा हजारांच्यापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आपण सगळ्याचं विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय एमपीएससीच्या माध्यमातून देखील आणि इतर ज्याकाही महत्वाच्या दोन एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागवाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे.
लवकरच १८ हजार ५०० उमेदवारांची पोलीस विभागात, तर १० हजार ५०० उमेदवारांची ग्रामविकास विभागात भरती करण्यात येणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३१६ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. नाशिक विभागात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ४५६ उमेदवारांना, औरंगाबाद विभागात रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते २३८ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
****
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल ३१ पूर्णांक ७४ टक्के मतदान झालं. २५६ मतदान केंद्रांवर हे मतदान करण्यात आलं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारानं यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.
****
गुजरात राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची काल केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. राज्यात दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असून आगामी १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर आठ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी दिली. निवडणूक वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात गुजरातच्या पूर्व आणि दक्षिण भागातील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात मध्य गुजरातमधील विधानसभेच्या ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.
****
व्यवसाय शिक्षण तसंच प्रशिक्षण संचालनालयाकडून एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत, `सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आणि अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आय टी आय मध्ये संपर्क साधावा, असं आवाहन लोढा यांनी केलं आहे.
****
महिला पत्रकारानं कपाळाला टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा सादर करण्याबाबत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, शिवप्रतिष्ठान संघटेने अध्यक्ष संभाजी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असतो, आपलं वक्तव्य स्त्री सन्मानता आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचवणारं आहे, आपल्या वक्तव्याबाबत समजातल्या सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतली असून, या संदर्भातल्या आपल्या भूमिकेचा खुलासा महिला आयोग कायद्यानुसार तात्काळ सादर करावा, असं चाकणकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारचे महिलांच्या हिताचे विविध निर्णय राज्यातल्या महिलापर्यंत पोहचवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ, असं वाघ यांनी या नियुक्तीनंतर म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर आजपासून शिर्डी इथं सुरु होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या शिबिरात उपस्थित राहणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खरीप पिकांचं परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यानं, जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन सादर केलं. मागील तीन - चार वर्षांपासून मराठवाडा सातत्यानं अतिवृष्टीचा सामना करत आहे. यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं विभागातली १९ लाख हेक्टरवरची पिकं बाधित झाली असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
****
जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामध्ये जालना जिल्ह्यातल्या सहा हजार ८९८ शेतकऱ्यांचं दोन हजार ३११ हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीपिकांचं नुकसान झालं. तर ऑक्टोबरमधल्या अतिवृष्टीत चार लाख २४२ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून, पाच लाख ९८ हजार ६९६ शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम अहवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नुकताच विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला आहे. जुलै आणि ऑगस्टमधल्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून ३७१ कोटी ८४ लाख प्राप्त झाले असून त्याचं वितरण सुरु आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर क्षेत्राशी संबंधित विकास कामांना गती देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांची जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामं विहित कालावधीत आणि दर्जेदार होण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा वार्षिक योजनेतून अतिरिक्त ५० वीज रोहीत्रांची खरेदी करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, आदी सूचना महाजन यांनी यावेळी दिल्या.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या बहादरपूरा ते फुलवळ मार्गावरची वाहतूक मन्याड नदीवरील पुलाचं काम सुरु असल्यानं बंद करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. येत्या १९ तारखेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
****
बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा इथं अनियंत्रित चारचाकी विहिरीत कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. काल दुपारी हा अपघात झाला. देउळगावराजा इथले शिक्षक अमोल मुरकुट हे त्यांची पत्नी स्वाती मुरकुट यांना मोटार चालवण्यास शिकवत होते. चिखली रोडवर स्वाती यांनी ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यानं मोटारीवरचं त्यांचं नियंत्रण सुटून कार ९० फूट खोल विहिरीत पडली. यात स्वाती मुरकुट आणि कारमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमोल मुरकुट जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत करार करण्यात येणार असून, येत्या सहा महिन्यात शहरात ३५ इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात येतील, असं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी सांगितलं आहे. हा करार दहा वर्षांसा���ी असून, त्यानंतर त्या वेळच्या परिस्थितीनुसार अजून दोन वर्ष वाढवता येऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद महानगर पालिकेअंतर्गत होणाऱ्या विकास कामांचा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आढावा घेतला. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत फुलसे यांचं काल अल्पशा आजारामुळे निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. उस्मानाबाद शहरातल्या समर्थ अर्बन बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष तसंच नगर वाचनालयाचे संचालक आणि समता सोसायटी चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. समता प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे  नगरसेवक म्हणून ते विजयी झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर उस्मानाबाद शहरातील कपिलधार स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी -ट्वेंटी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिका संघाचा ३३ धावांनी पराभव करून स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. सिडनी इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं २० षटकात ९ बाद १८५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या ९ षटकात ४ बाद ६९ धावा झाल्या असताना पावसानं व्यत्यय आणला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १४ षटकांत १४२ धावांच लक्ष्य देण्यात आलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १०८ धावाच करु शकला.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यापीठ विकास मंचनं एका निवेदनाद्वारे काल केली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुका आणि त्या संदर्भातली प्रक्रिया विद्यापीठानं सुरू केली आहे. मात्र विद्यापीठाचे कुलसचिव आणि निवडणूक विभाग यांच्यात विसंवाद असल्यानं मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ओडिशातल्या ब्रह्मपुर ला जाण्याकरता नांदेड ते ब्रह्मपुर दरम्यान चालू महिन्यात विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. ५, १२, १९ आणि २६ तारखेला नांदेड रेल्वेस्थानकातून दुपारी तीन वाजून २५ मिनिटानी ही विशेष रेल्वे रवाना होईल, आणि दुसऱ्या दिवशी अडीच वाजता ब्रम्हपूर ला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ६, १३, २० आणि २७ नोव्हेंबर ला ब्रम्हपूर रेल्वेस्थानकातून दुपारी साडे चार वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी पावणे चार वाजता नांदेडला पोहोचेल.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
फुटबॉल विश्वचषकातही दिसणार महिला शक्ती, ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेफ्री बनले
फुटबॉल विश्वचषकातही दिसणार महिला शक्ती, ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेफ्री बनले
फिफा WC कतार 2022: या वर्षाच्या अखेरीस कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा होणार आहे. हा विश्वचषक ऐतिहासिक असणार आहे. या स्पर्धेत प्रथमच अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. फिफा विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेत होणार आहे. हा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. यादरम्यान, स्पर्धेत प्रथमच महिला पंचाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी फिफा विश्वचषक 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. FIFA…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
फिफा विश्वचषक : आखाती देशात प्रथमच; मनोरंजक ड्रॉ, अमेरिका आणि इराण फुटबॉलच्या मैदानावर भिडतील - फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक : आखाती देशात प्रथमच; मनोरंजक ड्रॉ, अमेरिका आणि इराण फुटबॉलच्या मैदानावर भिडतील – फिफा विश्वचषक
फुटबॉल विश्वचषक 2022 चा ड्रॉ शुक्रवारी म्हणजेच 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. ड्रॉ मनोरंजक होता. यामध्ये ब गटात अमेरिकेचा सामना इराणशी होणार आहे. आता फुटबॉलच्या मैदानावर अमेरिका आणि इराणची भिडणे मनोरंजक आहे कारण दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. आपणास सांगूया की कतारमध्ये या वर्षी 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. फिफा विश्वचषक आखाती देशात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
विश्वचषकाचे स्वप्न भंगले
मैदानावरील त्याची कामगिरी हे कोणत्याही क्रिकेटपटूचे भांडवल असते. आकडे त्याची साक्ष देतात. किती धावा केल्या, किती शतकं किंवा अर्धशतकं झळकावली, किती विकेट घेतल्या, या सगळ्याची इतिहासात नोंद आहे. पण या कामगिरीला महत्त्व प्राप्त होते जेव्हा मोठ्या विजेतेपदांसह जोडले जाते. भारतीय महिला क्रिकेटमध्ये असे काही आहे. या दशकांच्या प्रवासात एकही विश्वविजेतेपद नाही. टीम इंडिया दोनदा इतिहास रचण्याच्या जवळ आली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
IND W vs ENG W मिताली राज पुन्हा अपयशी स्मृती मंधानाचा टॉप-2 मध्ये प्रवेश, टीम इंडिया 134 वर घसरली
IND W vs ENG W मिताली राज पुन्हा अपयशी स्मृती मंधानाचा टॉप-2 मध्ये प्रवेश, टीम इंडिया 134 वर घसरली
स्मृती मानधना, मिताली राज: महिला विश्वचषक 2022 च्या चौथ्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 134 धावांवर ऑलआऊट झाला. मिताली राजला 4 डावांपैकी तिसऱ्यांदा दुहेरी आकड��� गाठता आला नाही, तर स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी ठरली. महिला विश्वचषक 2022 च्या चौथ्या सामन्यात भारतीय संघ गतविजेत्या इंग्लंडसमोर 134 धावांत गारद झाला. अनुभवी महिला फलंदाज आणि भारताची कर्णधार मिताली राज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
मलायका अरोराची बहीण अमृताचेही पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफझलसोबत अफेअर होते, दोघेही अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये दिसले होते.
मलायका अरोराची बहीण अमृताचेही पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफझलसोबत अफेअर होते, दोघेही अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये दिसले होते.
मलायका अरोरा बहीण अमृता अरोरा पाकिस्तानी क्रिकेटर डेट: अमृता अरोरा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर उस्मान अफझल याला डेट केल्यामुळे ती शकील लडाकसोबत लग्नाच्या खूप आधी चर्चेत होती. बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, डान्सर आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी आणि सोशल मीडियावर बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करण्यासाठी नेहमीच चर्चेत असते. मलायकाप्रमाणेच तिची धाकटी बहीण अमृता अरोरा देखील सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
भारताचा कर्णधार होताच रोहितसमोर दोन मोठी आव्हाने आहेत, आगरकरने कारण सांगितले
भारताचा कर्णधार होताच रोहितसमोर दोन मोठी आव्हाने आहेत, आगरकरने कारण सांगितले
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फिटनेस चॅलेंज: भारताच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मासमोर पुढील २४ महिन्यांत होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त राहणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी व्यक्त केले. विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
ज्युनियर हॉकी विश्वचषक: भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर सर्वत्र 'उत्साह' लिहिलेला आहे | हॉकी बातम्या - टाइम्स ऑफ इंडिया
ज्युनियर हॉकी विश्वचषक: भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर सर्वत्र ‘उत्साह’ लिहिलेला आहे | हॉकी बातम्या – टाइम्स ऑफ इंडिया
भुवनेश्वर: जर एखाद्या भारतीय हॉकीप्रेमीला भारतीय संघाने अलीकडच्या आठवणीत, वरिष्ठ किंवा कनिष्ठ अशा सर्वात शांत आणि संकलित केलेल्या बचावात्मक नाटकांपैकी एक पाहायचे असेल, तर त्याला बुधवारी येथील कलिंगा स्टेडियमवर असणे आवश्यक होते. 1 डिसेंबर ही तारीख भारतीय हॉकीच्या आठवणींमध्ये स्मरणात ठेवणारी तारीख नाही. या तारखेला 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून 1-7 असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महिला क्रिकेट विश्वचषक 2022 फायनल: आम्ही आमच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला नक्कीच हरवू शकतो, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन म्हणाली | क्रिकेट बातम्या
महिला क्रिकेट विश्वचषक 2022 फायनल: आम्ही आमच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला नक्कीच हरवू शकतो, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन म्हणाली | क्रिकेट बातम्या
महिला WC: सोफी एक्लेस्टोनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संधींबद्दल सकारात्मक वाटले.© एएफपी स्पर्धेतील आघाडीची यष्टिरक्षक सोफी एक्लेस्टोनने म्हटले आहे की इंग्लंड त्यांच्या दिवशी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यास सक्षम आहे, असा इशारा दिला की तिची बाजू चालू आहे. विश्व चषक सर्वोत्तम क्रिकेट न खेळता फायनल. रविवारी हॅगले ओव्हलवर अंतिम सामना खेळवला जाईल. ESPNcricinfo नुसार ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया वेगानं सुरु -केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल
·      दहावी -बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईन होणार- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण
·      मनमाड - मुदखेड - ढोन  रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी २२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर
·      राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, कोविड संसर्गाचे १५ हजार २५२ नवे रुग्ण, मराठवाड्यात १२ जणांचा मृत्यू तर एक हजार ४६९ बाधित
·      नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं आवाहन
आणि
·      एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत विजेतेपदासाठी उद्या भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध सामना  
****
मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, यासाठीची प्रक्रिया वेगानं सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देतांना मेघवाल यांनी ही माहिती दिली. यासाठीचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्तावावरचा भाषा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे पाठवला होता. तिथे या अहवालातल्या त्रुटींची पूर्तता झाली आहे. आणि आता हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजपाचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनीही या विषयावर झालेल्या चर्चेत भाग घेतला.
****
राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिलदरम्यान होणार आहे, त्याची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा चार ते ३० मार्च दरम्यान होणार असून, १४ फेब्रुवारी ते तीन मार्च प्रात्यक्षिक परीक्षा होईल, अशी माहिती गोसावी यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, तिथेच त्यांना ��ेखी परीक्षा देता येईल, असं ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परिक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धातास, तर ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. सर्व परिक्षा केंद्रांवर, कोरोना विषाणू संसर्गामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल. एखादा विद्यार्थी आजारी पडला, किंवा अपरिहार्य कारणामुळे तोंडी परीक्षा, अंतर्गत तसंच तत्सम मूल्यमापन, प्रात्यक्षिक- सादर करु शकला नाही, तर लेखी परीक्षेनंतर त्याला यासाठी पुन्हा संधी दिली जाईल. संसर्गामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या काळात पुन्हा परीक्षा देण्याची संधी देणार असल्याचंही गोसावी यांनी सांगितलं. बोर्डाच्या परिक्षेसाठी कोविड प्रतिबंधक लस बंधनकारक नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.  
****
मनमाड - मुदखेड - ढोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं २२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी दिली. त्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना, अर्थसंकल्पातल्या तरतुदींची माहिती दिली. रेल्वे मार्ग विद्युतीकरणासाठी पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजनाथ या मार्गासाठी १२९ कोटी रुपये, परळी वैजनाथ - विकाराबादसाठी १०९ कोटी रुपये, पुर्णा - अकोलासाठी १०३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिणमध्य रेल्वेसाठी नऊ हजार १२५ कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असल्याचं किशोर यांनी सांगितलं.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ झाली असून, यापैकी एक हजार ९२९ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १५ हजार २५२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७७ लाख ६८ हजार ८०० झाली आहे. काल ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ८५९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल ३० हजार २३५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७४ लाख ६३ हजार ८६८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ०७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख ५८ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ४६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर  १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, नांदेड आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३३२ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात २२७, नांदेड २०५, उस्मानाबाद २००, जालना १४४, हिंगोली १२९, परभणी १२२, तर बीड जिल्ह्यात १४९ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा, असं  आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल काल औरंगाबाद दौऱ्यावर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाड्याचं वनक्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, ‘इको-बटालियन’च्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल म्हणाले. मानव विकास कार्यक्रम, मराठवाडा विकास मंडळ, रेड क्रॉस सोसायटीने केलेलं सामाजिक कार्य, जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेले उपक्रम आदींचं सादरीकरण राज्यपालांसमोर यावेळी करण्यात आलं.    
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अवैध परवाने, बनावट जात प्रमाणपत्र आणि आर्यन खान प्रकरणात सतत आरोप केल्यामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.    
****
किराणा दुकानात वाईन विक्री कारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात, `ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमीन` `एमआयएम`च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरातल्या क्रांतीचौक इथं काल धरणे आंदोलन केलं. राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकावत या कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनं केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू, इतर गौण खनिज संपत्तीची चोरी थांबवण्यासाठी महसूल प्रशासन आता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत या संपत्तीवर लक्ष ठेवत आहे. या भागातली ही चोरी रोखण्यासाठी `ड्रोन` कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरू आहे. तहसीलदार महेंद्र गिरमे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह या भागातल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी `ड्रोन` द्वारे नदी पात्राची निगराणी करत आहेत.
****
शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती, वेतनासह अन्य सर्व प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी, संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या विभागातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत कार्यक्रमनिहाय बाबींचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ आणि शिधापत्रिकेचं वाटप काल करण्यात आलं. नोंदणीकृत असलेल्या देह विक्रय करणाऱ्या ४५ महिलांना शिधापत्रिकेचं वाटप, तसचं ४० महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात या महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी शासकीय बालगृह, वसतीगृहामध्ये मोफत व्यवस्था, विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांना कायदेशीर मदत दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघाची लढत उद्या इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतानं उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी सहज मात करत अंतिम लढतीत स्थान मिळवलं. इंग्लंड संघानं उपांत्य सामन्यात अफगाणीस्तानवर विजय मिळवला आहे. भारतीय एकोणीस वर्षाखालील संघ सलग चौथ्यांदा विश्र्व चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.  
****
लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते पानगाव मोड या सिमेंट मार्गाला तडे गेल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित संस्थेला नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासंबधी काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित एजन्सीला पत्र पाठवून तात्काळ खुलासा करण्यास सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या सुलीभंजन रस्त्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागानं एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. सुलीभंजन हे जवळपास ४०० फुट उंच असलेलं थंड हवेचं ठिकाणं म्हणून ओळखलं जातं. मात्र खुलताबाद ते सुलीभंजन या सहा किलोमीटर असलेल्या रस्त्याची चाऴणी झाल्यानं पर्यटकांची संख्या घटत चालली असल्याचं, आमदार चव्हाण यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. या पर्यटनस्थळाच्या विकासाला चालना देण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती.
****
परभणी जिल्ह्यातल्या नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पात्र अनुदानासाठी शासनाला शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर योजना सन २०२१-२२ या वर्षासाठी राबवण्यात येणार आहे.
****
0 notes