Tumgik
#विश्वचषक २०२२
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून, हे खेळाडू आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं विविध मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. आर्थिक व्यवहार विषयक समितीवर ११ सदस्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सदस्यांमधे समावेश आहे. दहा सदस्यीय संसदीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग असतील, राजकीय व्यवहारविषयक समितीमधे पंतप्रधानांसह १४ सदस्य असतील.
****
भारताने ९६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 5G लहरींचा नवीन लिलाव कालपासून सुरू केला. या लिलावात आठ बँड असून प्रमुख दूरसंचार कंपन्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या रेडिओ लहरी मिळवण्यासाठी लिलावात सहभागी होतील. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सरकारला विक्रमी दीड लाख कोटी रुपये मिळाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाचा जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्‍या हस्‍ते काल करण्‍यात आला. ३१ ऑगस्ट पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेली रसवंती गृहं बंद करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. सर्व रसवंती गृह मालकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विम्बल्डन टेनिसमध्ये काल पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत, भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांनी डच जोडीचा सात - पाच, सहा - चार असा पराभव केला. मात्र भारताचा सुमित नागल आणि त्याचा सर्बियन जोडीदार दुसान लाजोविक यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Lionel Messi Retirement: मेस्सी कधी रिटायर होणार? त्याने स्वत:च सांगितलं
Lionel Messi Retirement: मेस्सी कधी रिटायर होणार? त्याने स्वत:च सांगितलं
Lionel Messi Retirement: मेस्सी कधी रिटायर होणार? त्याने स्वत:च सांगितलं Lionel Messi Retirement, FIFA World Cup Final: फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने मोठे वक्तव्य केले आहे. हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल, असे तो म्हणाला आहे. Lionel Messi Retirement, FIFA World Cup Final: फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अर्जेंटिनाचा…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
ग्रॅम स्वान म्हणाला- 'उमरान मलिकची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड करावी', बुमराहवर हे बोलले
ग्रॅम स्वान म्हणाला- ‘उमरान मलिकची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड करावी’, बुमराहवर हे बोलले
IPL 2022 हंगामातील 40 व्या सामन्यात, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा पराभव केला. पण सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 5 विकेट घेत चांगलीच खळबळ उडवून दिली. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ हा सामना हरला. असे असतानाही 4 षटकात 25 धावा देऊन 5 बळी घेणाऱ्या उमरान मलिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. स्वानने टी-२० विश्वचषकासाठी…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
मलायका अरोराची बहीण अमृताचेही पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफझलसोबत अफेअर होते, दोघेही अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये दिसले होते.
मलायका अरोराची बहीण अमृताचेही पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफझलसोबत अफेअर होते, दोघेही अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये दिसले होते.
मलायका अरोरा बहीण अमृता अरोरा पाकिस्तानी क्रिकेटर डेट: अमृता अरोरा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर उस्मान अफझल याला डेट केल्यामुळे ती शकील लडाकसोबत लग्नाच्या खूप आधी चर्चेत होती. बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, डान्सर आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी आणि सोशल मीडियावर बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करण्यासाठी नेहमीच चर्चेत असते. मलायकाप्रमाणेच तिची धाकटी बहीण अमृता अरोरा देखील सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या ऐवजी राहुल गांधी ओपनिंग बॅट्समन करणार, टीव्ही अँकरचा व्हिडिओ व्हायरल
T20 विश्वचषक टीम इंडिया: टी २० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे विरोधात आता सलामीवीर रोहितसह विजयी मैदानात उतरणार अशा चर्चा रंगत आहेत. यावरून उत्तर देत अलीकडेच रोहित शर्माने के. एल राहुलच सलामीवीर असेल असे सांगितले होते. पण तरीही विजयाचा सुधारित फॉर्म शेवटच्या शेवटच्या क्षणी रोहित भिन्न विचार मांडणी अशी सुरुवात आहे. या चर्चांमध्ये भारतातील एका हिंदी वृत्तवाहिनीवर मात्र…
Tumblr media
View On WordPress
#2022 टी20 विश्वचषक भारताचा संघ#ICC T20 WC 2022#ICC T20 WC भारताचे वेळापत्रक#ICC T20 WC भारतीय संघ#ICC T20 विश्वचषक 2022 टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध#t20 विश्वचषक 2022 भारतीय संघाचे लाइव्ह स्ट्रीमिंग#T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ#T20 विश्वचषक भारताचा संघ#T20 विश्वचषक संघाची घोषणा#आयसीसी#आयसीसी टी २० विश्वचषक#आयसीसी टी २० विश्वचषक २०२२#ऑस्ट्रेलिया टी-२० साठी भारतीय संघ#टी २० विश्वचषक दक्षिण आफ्रिका#टी २० विश्वचषक पत्रकार#टी विश्वचषक ऑस्ट्रेलिया#टीम इंडिया टी-20 विश्वचषक संघ#दक्षिण आफ्रिका टी-२० भारतीय संघ#भारत T20 विश्वचषक 2022#भारत टी20 विश्व��षक 2022 संघातील खेळाडूंची यादी#भारत-पाकिस्तान सामना#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 खेळत आहे 11#भारताचा T20 विश्वचषक संघ 2022 ची घोषणा तारीख#भारताचा T20 विश्वचषक संघ थेट#भारताच्या टी२० विश्वचषक संघ २०२२ चा अंदाज#भारतीय संघ विश्वचषक २०२२#राहुल गांधी#राहुल गांधी क्रिकेट#रोहित शर्मा T20 विश्वचषक#विराट कोहली T20 विश्वचषक
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय जारी-विरोधकांकडून हक्कभंगाचा आरोप
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अंतिम सामना
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या यात्रेबद्दल लवकरच धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जोपर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात काल जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढून विरोधी पक्षनेत्य���ंना दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परवा एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी आज विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, त्यांचे आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला आहे. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळून, शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रिया डावलून मंत्रिमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढून सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला सरकारच्या अनागोंदी आणि गैरकारभारामुळे छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग नोंदवणं सुरू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइनचा व्हाट्सअप क्रमांक ९८-२२-४४-६६-५५ या क्रमांकावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात विधीमंडळ सचिवालयानं केलेली कार्यवाही उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून सभागृहासमोर मांडली. ८ जुलै २०२२ पासून हे पद रिक्त आहे, याबद्दल राज्यपालांना कळवावं, अशा आशयाचा पत्र व्यवहार संसदीय कार्य विभागासोबत केला होता. यासंदर्भात येत्या सोमवारी सर्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेतली जाईल, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा झाली.
पतसंस्थेत ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीना संरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत दरेकर बोलत होते. पतसंस्थेतल्या एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवीना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा ३ कोटी ठेवीदारांना होणार असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
****
सुधारित तीन नवीन फौजदारी कायदे परवा एक जुलैपासून देशभर लागू होत आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने मुंबईत “फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” या विषयावर परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विविध न्यायालयांमधले न्यायमूर्ती, तसंच विधी आणि न्याय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी आज रवाना झाली. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात आज बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची ��क्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वेत रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय;अजित पवार गटाकडून स्वागत तर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार
एसटीच्या पाच हजार बस आता एल एन जी वर धावणार;वार्षिक २३४ कोटी रुपये बचत
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नांदेड जिल्ह्यात प्रारंभ
तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्याची पाणीपुरवठा मंत्र्यांची सूचना
आणि
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विधिमंडळातल्या बहुमताची कसोटी आयोगानं गृहित धरली आहे. पक्षाच्या खासदार आणि आमदार मिळून ८१ लोकप्रितिनिधींपैकी अजित पवार यांना ५७ तर शरद पवार यांना २८ जणांचा पाठिंबा आहे, एक खासदार आणि पाच आमदारांनी दोन्ही बाजूंना पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ते आयोगानं गृहित धरलं नाही.
२०२२ मध्ये झालेल्या पक्षांतर्गंत निवडणुकांवर आयोगानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवार हे या पक्षात कुठलंही पद भूषवू शकत नाहीत, त्यांच्याकडे पक्षात आणि विधीमंडळात बहुमत नसल्याचं आयोगानं काल दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन करुन अनेक निर्णय घेतले, नियुक्त्या केल्या असंही आयोगानं नमूद केलं आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दुपारपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाचे पर्याय सादर करावेत, अन्यथा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपक्ष धरलं जाईल, असंही आयोगानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, या निकालाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
प्रवेश परीक्षेतले घोटाळे रोखणारं विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारच्या विभागांद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये संभाव्य घोटाळे रोखण्यासाठी यात तरतूद आहे. अशा गुन्ह्यासाठी तीन ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र असणार आहेत.
****
‘भारत राइस’ या तांदळाच्या विक्रीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी या विक्रीला सुरुवात केली. प्रतिकिलो २९ रुपये दराने पाच किलो आणि १० किलोच्या पिशवीत हा तांदूळ उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात, पाच लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-कॉमर्स पोर्टलवरही हा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्या आता द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात एल एन जी इंधनावर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल किंग गॅस कंपनीसोबत यासंदर्भातला करार करण्यात आला. राज्यातल्या नव्वद आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. या बदलामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत करण्याची संधी मिळेल, तसंच प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या सव्वादोन लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचा लाभ सात कोटींहून अधिक लाभार्थ्यानी घेतला आहे. देशभरातल्या गावागावात आणि शहरात ही शिबिरं झाली. यातून एक्कावन्न लाखांहून जास्त नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरीत झाली असून, जवळपास पावणेतीन कोटी कार्ड तयार झाली आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला. नवीन कौठा भागात संत बसवेश्वर महाराज पुतळा आणि सिडको भागातल्या बालाजी मंदिर परिसरात ही यात्रा पोहोचली. यावेळी मोठ्या प्रमाणात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पंतप्रधान स्वनिधी योजने��ाठी ही अर्ज घेण्यात आले. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत दीपाली कोरगावकर आणि मधुकर पूर्णेकर यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली...
****
राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं नियोजन करण्याची सूचना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘हर घर जल’ योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, तसंच, निश्चित कालमर्यादेत आणि चांगल्या दर्जाचं, काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २४४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सचिन धस च्या ९६ धावांच्या बळावर ४९व्या षटकात आठ बाद २४८ धावा केल्या. 
****
सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथं काल भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत राज्यातल्या सोळा जिल्ह्यातल्या चाळीस संघानी भाग घेतला असून पुरुष, महिला, किशोर आणि किशोरी अशा गटात या स्पर्धा होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक महिलांना हिमरू शाल निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री संदिपान भुमरे यांची ही संकल्पना असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठीचं एक दिवसाचं शिबिर उद्या आठ तारखेला बिडकीन ग्रामपंचायत कार्यालयात होणार असून, इच्छुक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
****
राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या वीस तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या १०, २०, ३०च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांना वेतन आणि वेतन श्रेणी संरक्षण मिळावं, यासह इतर मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, ते न पाळल्यानं हा निर्णय घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे यांनी काल अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून गोर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
****
राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशानं हिंगोली जिल्ह्यात या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धी मोहिमेचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी, या योजनांच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. हे चित्ररथ जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन योजनांचा प्रचार करणार आहेत.
****
लातूर इथल्या विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात, मुलींच्या वसतिगृहात भौतिक सोयी सुविधांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली. काल मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली, मुंडे यांनी ती मान्य करत, यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
नांदेड जिल्ह्यात पाच केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ - सीसीआय मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु झाली आहे. धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा याठिकाणी ही केंद्रं सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असं आवाहन पणन महासंघानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती: तंत्रे आणि साधने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नांदेड इथं आज जिल्हा भरडधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१० डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
उद्यापासून नवी दिल्लीत होणाऱ्या सत्तावीसाव्या गुंतवणूक संवर्धन एजन्सीजच्या विश्वसंघाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संमेलनाचं यजमानपद भारत भूषवणार आहे. उद्योग संवर्धन तथा आंतरिक व्यापार विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं हे सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संमेलन असेल.
                                    **** गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.
अमरावती इथं काल राज्यातील पाच कर्तृत्ववान महिलांचा राज्यपाल बैस यांच्य��� हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा  पुरस्कारार्थींमध्ये समावेश होता.
                                    **** रंगमंच आणि ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत विदर्भ संस्कार भारतीच्या वतीनं वर्ष २०२१ आणि २०२२ करिता दिल्या जाणारा स्वर्गीय डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, छत्रपती संभाजीनगर इथले दत्ता जोशी, पुण्यातल्या डॉ. श्यामा घोणसे. नागपूर इथले डॉ. राजेंद्र नाईकवाडे, आणि बुलडाण्यातले किरण डोंगरदिवे यांना घोषित झाला आहे.                                     ****
क्वालालांपूर इथं सुरू असलेल्या एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत अंतिम टप्प्यातल्या सामन्यात काल भारतानं कॅनडाचा १०-१ असा पराभव केला. या विजयामुळं भारताचं उपान्त्य फेरीतलं स्थान निश्चित झालं आहे.
                                    **** टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं होणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल. भारतीय संघ दक्षिण आफ्रीकेत तीन टी-ट्वेंटी, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 13 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १३ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
सरकारी सेवांमध्ये नव्यानं भर्ती झालेल्या ७० हजार तरुणांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. देशभरातल्या ४३ ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून सरकारी नोकरीत येणाऱ्या लोकांसाठी ही महत्वपूर्ण वेळ आहे. भारताला पुढील काळात विकसीत राष्ट्र बनवण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मातृभाषेत भरती परीक्षांचा देशातील तरुणांना मोठा फायदा होत आहे, त्यामुळं त्यांना संधी प्राप्त होत आहे. मुद्रा योजनेमुळं कोट्यवधी लोकांना मदत झाली. स्टार्टअप्स आणि अन्य सरकारी मदत मिळालेले तरुण इतरांना नोकरी देत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या वाहन उद्योगानंही मोठी क्रांती केली आहे. दहा वर्षांपूर्वी हा उद्योग पाच लाख कोटी रुपयांच्या आसपास होता, तो आता बारा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 
                                     ***  बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातल्या जाखौ बंदरावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुनागढ, गिर सोमनाथ, पोरबंदर, द्वारका, राजकोट, जामनगर आणि कच्छ जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. गंभीर परिस्थिती पाहता १५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण ३४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषणात राज्यात संभाव्य चक्रीवादळ उद्भवल्यास केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाच्या तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. 
                                      *** भारतात काम करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांनी भारतीय कायद्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं इलेक्‍ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. भारतानं ट्विटर बंद करण्याची धमकी दिली असल्याचं ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचं वक्तव्य खोटं असल्याचं मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितलं. डोर्सी यांच्या नेतृत्वात ट्विटर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यानं भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचं ते म्हणाले. २०२० ते २०२२ या काळात ट्विटरनं अनेकदा भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं आणि अखेर जून २०२२ मध्ये ट्विटरनं या कायद्यांचं पालन करण्यास सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
पंढरपूर मंदिर अधिनियम १९७३ मध्ये सुधारणा करण्यात आली असून या अधिनियमानुसार सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदाचा कालावधी,  श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शासनानं नियुक्त केलेल्या सदस्यांच्या पदाच्या कालावधीइतका असणार आहे. या अधिनियमास पंढरपूर मंदिरे अधिनियम २०२३ असं संबोधण्यात येणार असून, याबाबतची अधिसूचना गेल्या २२ मे रोजी जारी करण्यात आली आहे.
***
मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार असल्यानं ही योजना कामगारांसाठी उपयुक्त असल्याचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेच्या लाभ वितरण कार्यक्रमात काल ते बोलत होते. यानंतर झालेल्या एका बैठकीत डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करुन प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांला घरकुल योजनेचा लाभ देण्���ात यावा, असे निर्देश दिले आहेत.
***
चेन्नई इथं आजपासून विश्वचषक स्क्वॉश स्पर्धेला सुरुवात होणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काल एक्सप्रेस एव्हेन्यू मॉल इथं या स्पर्धेचं औपचारिक उद्घघाटन केलं.
//************//
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
देशभरातली सहकार चळवळ बळकट करण्यासाठी पंचायत स्तरावर दोन लाख सहकारी समित्या स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आजही सुरू राहणार, बहुमत सिद्ध करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा शिंदे गटाचा दावा  
आमच्यात कोणतेही वाद नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच स्पष्टीकरण
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर, चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एक मार्च पासून सुरु होणार
राज्य माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणी बारावी परीक्षेचा वेळ दहा मिनिटांनी वाढवण्याचा निर्णय
आणि
दक्षिण आफ्रिकेतल्या महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर सहा खेळाडू राखून विजय
****
देशभरातली सहकार चळवळ बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं पंचायत स्तरावर दोन लाख सहकारी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या समित्यांमध्ये प्राथमिक कृषी पत समित्या, सहकारी दूध समित्या, तसंच सहकारी मत्स्योत्पादन समित्यांचा समावेश असेल. पुढच्या पाच वर्षात देशभरात सुमारे दोन लाख समित्यांची स्थापना केली जाईल. त्यातून आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी आणि आधुनिकीकरणाला मदत होईल, सहकार क्षेत्र बळकट होईल, तसंच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीसाठी केंद्र सरकार पुरस्कृत वायब्रंट व्हिलेज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यासाठी चार हजार ८०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे चार राज्य आणि पुर्वेतल्या एका केंद्रशासित प्रदेशात चांगल्या पायाभूत सुविधा आणि उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आजही सुरू राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी वर्तमान घटनापीठाकडेच सुरू ठेवायची की सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करायची, याचा निर्णय सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालचं घटनापीठ आज देण्याची शक्यता आहे. कालच्या सुनावणीत शिंदे गटाकडून हरिष साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांनी दिलेला प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला नाही, तत्पूर्वी त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. राज्यघटनेतल्या दहाव्या अनुसूचीचा वापर करुन आमदारांना अपात्र घोषित करता येणार नाही, असं साळवे यांनी सांगितलं. पक्षांतर बंदी कायदा या प्रकरणात लागू होत नाही, नबाम रेबिया निकालाचा या खटल्याशी संबंध नाही, आदी मुद्दे साळवे यांनी मांडले.
****
दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्यानं आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत महामंडळाच्या बैठकीत बोलत होते. महामंडळाला ५०० कोटींचं भाग भांडवल देण्यात आलं असल्यानं, गेली काही वर्ष थांबलेलं कर्जवाटप आता पुन्हा सुरू होईल, त्यामुळे दिव्यांग बांधव स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील, असा विश्वास मुख्यमंत्रयांनी व्यक्त केला.
****
भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यात पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान सुरु करण्यात आलं असून, अमरावती आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीनंतर कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आदी उपस्थित होते. बाळासाहेब थोरात आणि आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र नागपूर आणि अमरावती मधल्या पराभवाकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी भाजपानं आमच्यात मतभेद असल्याचं वातावरण निर्माण केलं, आणि माध्यमांनी त्याला हवा दिली, असंही पटोले म्हणाले. थोरात यांनीही आमच्यात कोणतेही वाद नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं.  
****
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सन २०२२ चे पुरस्कार काल जाहीर झाले. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. श्री. पु. भागवत पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला, डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला, कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार द. ता. भोसले यांना, आणि रत्नागिरीच्या कोकण मराठी ��ाहित्य परिषदेला जाहीर झाला आहे.
****
��पल्या कार्यालयात काम करतो असं भासवून नोकरीचं अमिष दाखवून फसवणूक केलेल्या आणि सध्या अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसंच या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावं समोर आली असून, यापैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नसल्याचं, मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एक मार्च पासून सुरु होणार असल्याचं, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार एक एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क आणि ड वर्गातल्या एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे.
****
राज्य माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी तसंच बारावी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा वेळ दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी दहावी, बारावी परीक्षेमध्ये निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका आकलनासाठी, वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्यानं मंडळानं हा निर्णय या वर्षीपासून रद्द केला. त्यामुळे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. ही मागणी मान्य करत, मंडळाने या संदर्भात सुधारणा परिपत्रक जारी केलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या. देशभरात सात हजार २०० केंद्रांवर पाच एप्रिलपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. यंदा दहावीचे २१ लाख ८० हजार आणि बारावीचे १६ लाख ९० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
****
मुंबईत दादरच्या चैत्यभूमी इथं परभणी ते चैत्यभूमी धम्म पदयात्रेचा समारोप काल  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला. भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातूंच्या दर्शनाचा लाभ महाराष्ट्रातल्या बौद्ध उपासिकांना होण्यासाठी थायलंडमधून आलेल्या बौद्ध भन्ते यांनी परभणी ते चैत्यभूमी अशी धम्म पदयात्रा काढली होती. या यात्रेत थायलंडचे ११० भन्ते आणि बौद्ध उपासक उपसिकांनी परभणी ते चैत्यभूमी हे ५७० किमीचे अंतर  २९ दिवसांचा पायी प्रवास करुन पूर्ण केले.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा इथल्या किल्ल्यातल्या दिवाण-ए-आममध्ये साजरी करण्यास पुरातत्त्व विभागानं अखेर परवानगी दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. याठिकाणी रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे.
आग्रा किल्ल्यातल्या ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जाणार असल्याबद्दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसंच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.
****
राज्यातल्या अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या कर्मचाऱ्यांचा सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कायम ठेवण्यात येईल, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीनुसार अनुज्ञेय थकबाकी देण्यात येईल, कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरणं आणि इतर प्रलंबित मागण्यांसदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.
****
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात काल मुख्य इमारतीसमोर काळ्याफिती लावून निदर्शनं केली. विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचं काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून, २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. राज्यातल्या सर्व विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी यावेळी मांडली.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. भरड धान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. वरी या भरड धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
लातूर इथं काल तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट रॅली काढण्यात आली. कृषी विभाग आणि इतर संलग्न विभागाच्या समन्वयातून काढण्यात आलेल्या या रॅलीत तृणधान्यांच्या कणसापासून वेषभूषा केलेले मिलेट मॅन सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. तृणधान्यांच्या सहाय्याने आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती.
****
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याविरोधात न्यायालय अवमानना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. नळदुर्ग ते अक्कलकोट महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, याचिका दाखल केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल, भूसंपादन तसंच राष्ट्रीय महामार्ग विभागातल्या ११ अधिकाऱ्यांविरोधात ही याचिका दाखल आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं वेस्ट इंडिजवर सहा खेळाडू राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत ११९ धावांचं लक्ष्य दिलं. भारतीय संघानं चार खेळाडूंच्या बदल्यात १८ षटकं आणि एका चेंडूत हे आव्हान पार केलं. ऋचा घोषनं नाबाद ४४, कर्णधार हरमनप्रीत कौरनं ३३ तर शेफाली वर्मानं २८ दावा केल्या. चार षटकांत १५ धावा देत तीन खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामन्यातली सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
****
बब्रुवान रुद्रकंठावार यांच्या येऱ्ही तेऱ्ही मगजमारी या ग्रंथाचं प्रकाशन काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ समिक्षक डॉ. सुधीर रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बब्रुवान रुद्रकंठावार यांनी आगळ्या वेगळ्या लेखनशैलीतून मराठी साहित्यात अस्सल विनोदी मराठवाडी भाषाशेलीचा ठसा उमटवला, असं रसाळ यावेळी म्हणाले.
****
शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धती सोबतच फळबाग, कृषी प्रक्रिया उद्योग तसंच कृषी पर्यटन या माध्यमातून उत्पन्न वाढवावं असं मत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे ��ांनी व्यक्त केलं आहे. भूम तालुक्यातल्या तिंत्रज इथं काल हुरडा महोत्सव आणि हुरडा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर इथल्या ज्वारीला ब्रॅण्डिंग मिळावी या उद्देशाने हा महोत्सव भरवण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून विधिज्ञ हरीश साळवे युक्तिवाद करत आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना त्यांनी, आमदारांना २५ जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असं नमूद केलं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला, असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. कायदा पक्षांतर बंदीसाठी आहे, मतभेदांसाठी नाही, असा युक्तीवाद साळवे यांनी केला. पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही, असं ते म्हणाले. सुनावणीच्या काल पहिल्या दिवशी घटनापीठानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकला. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, नबाम राबिया प्रकरण, आमदारांची अपात्रता या मुद्यांवर हा युक्तिवाद केंद्रीत होता.
***
देशात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण असून, तरुणांनी पुढील पिढीच्या औद्योगिक क्रांतीसाठी नवनवीन शोध घेण्याचं आवाहन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. बंगळूरुमध्ये सुरू असलेल्या एअरो शोच्या मंथन कार्यक्रमात ते आज बोलत होते. मंथन हे व्यासपीठ संरक्षण आणि एअरो स्पेस क्षेत्रातल्या नवकल्पना, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, गुंतवणुकदार या सर्वांना एकाच छताखाली आणत असून, भारत पुढच्या २५ वर्षात जगातली सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनेल, त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर राहील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
***
अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित महागाईच्या वार्षिक दरात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात घट झाली आहे. डिसेंबर २०२२ हा दर चार पूर्णांक ९५ शतांश टक्के होता, तो जानेवारी महिन्यात चार पूर्णांक ७३ शतांश टक्के % झाला आहे. जानेवारी महिन्यात महागाईच्या दरात प्रामुख्याने खनिज तेल, रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, कापड, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू, वस्त्रं आणि अन्न उत्पादनांमुळे घट झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्य इमारतीसमोर काळ्याफिती लाऊन निदर्शनं केली. कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातल्या सर्व विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी यावेळी मांडली.
***
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातल्या महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी तुळजापूर इथल्या स्थानिक महिलांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकार पूजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी दोन दिवसांपूर्वी केली आहे.
***
औरंगाबाद नजिक जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र कचनेर इथं उद्या १६ ते २४ फेब्रुवारी दरम्यान, नऊ जैन तीर्थंकराच्या मूर्तींचा पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव तसंच महामस्तकाभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आर्ष मार्ग संरक्षक प्रज्ञा योगी जैनाचार्य आचार्य गुप्तिनंदी गुरुदेव संघाच्या पावन सानिध्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
***
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात आज सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. "आरोग्यासाठी सायकल, सर्वांगीण निरोगी आरोग्याचं ध्येय निश्चीत गाठू" असं यंदाच्या सायक्लोथॉनचं घोषवाक्य आहे. तुळजापूर तालुक्यातल्या माळंब्रा इथल्या आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात या सायक्लोथॉनचा शुभारंभ करण्यात आला असून, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
***
दुबई मध्ये सुरू असलेल्या यंदाच्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारतानं काल ‘ब’ गटातल्या आपल्या पहिल्या लढतीत कझाकस्तानवर पाच - शून्य असा विजय नोंदवला. भारताचा आजचा सामना यजमान यू ए ई विरुद्ध होईल. तर पीव्ही सिंधू आणि तिचे सहकारी उद्या मलेशियाविरुद्धचा अंतिम सामना खेळतील.
***
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
भारतीय औषध निर्माण क्षेत्रानं कोविड काळात केलेलं कार्य अभिनास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला, आज मुंबईत प्रारंभ
ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार प्रदान
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीबाबत बोलणी पूर्ण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
आणि
हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा भारतावर विजय, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीमधलं सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात
सविस्तर बातम्या
भारतीय औषध निर्माण क्षेत्रानं कोविड काळात केलेलं कार्य अभिनास्पद असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर इथं आयोजित केलेल्या, ७२ व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा समारोप, काल फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड साथीत भारतानं ३० कोटी लसी निर्माण करुन त्या १०६ देशांना निर्यात केल्या. औषध निर्माण क्षेत्रातलं हे यश उत्तरोत्तर वाढत गेलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या बैठकांमध्ये झालेले ठराव राज्य सरकारकडे आल्यानंतर त्यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कर्मचारी निवड आयोग- स्टाफ सिलेक्शन कमिशननं, बिगर - तांत्रिक श्रेणीतील मल्टी-टास्किंग कर्मचारी परीक्षा २०२२, पहिल्यांदाच हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह  उर्दू, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया आणि पंजाबी, या तेरा प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नोकरीसाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देणं, आणि भाषेच्या अडथळ्यामुळे कोणालाही संधी नाकारली जाऊ नये किंवा कोणीही त्यापासून वंचित राहू नये, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हा निर्णय सुसंगत असल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी, ठाण्यात आयोजित सभेत ते काल बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार अनुकूल आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत. मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले. दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एका समारंभात ११ बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळणं आवश्यक आहे, अशा बालकांना भारत सरकारतर्फे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पाच ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांना, सहा विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.  पुरस्कार पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधान, नरेंद्र मोदी उद्या संवाद साधतील.
****
केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला, आज मुंबईत प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. देशभरातून २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी, यामध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण, यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
****
ठाण्याच्या गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशाच्या सीमा ओलांडून भारतीय शास्त्रीय संगीत पोहचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातलं सरकार सर्व घटकांचं असून आपलं सरकार कला प्रेमी आहे असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं `बांसुरी उत्सव` साजरा करण्यात आला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आमची युतीबाबत बोलणी झाली असून, याबाबत ठाकरे यांनी घोषणा करावी, असं आम्ही सांगितल्याचं, वंचित बहुजन आघाडीचे नेते, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत चर्चा करत असून, याबाबत एकत्रित घोषणा करावी अशी ठाकरे यांची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. अमरावती पदवीधर मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक अनिल अमलकर यांच्या प्रचारासाठी, अमरावती इथं आले असता, ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास, आमचा विरोध नाही असं स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले…
त्यांना असं वाटतय की, आपण राष्ट्रवादीला ही बरोबर घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलय की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. राष्ट्रवादीलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, बोलणीच्या संदर्भातला सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करु आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला, उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर म्हणून, अमरावतीचे डॉ. प्रमोद पोतदार, कोल्हापूरचे डॉ. उमेश कदम तर पुणे इथले डॉ. सदानंद राऊत यांना गौरवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार म्हणून दैनिक लोकसत्ताचे ठाण्याचे सहयोगी संपादक संदीप आचार्य यांना, तसंच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हिंगोलीचे प्रशांत संभाप्पा तुपकरी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
भारतीय मानक ब्युरोनं सोन्याच्या दागिन्यांवरील बी.आय.एस. चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये नुकतीच विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह, राज्यातल्या सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतलया झवेरी बाजार इथं सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे दिड कोटी रुपयांचे पावणे तीन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली, त्यात बनावट चिन्हांकित दागिने जप्त करण्यात आले तसंच बी आय एस नं निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई देखील करण्यात आली.
****
मराठवाड्याच्या विकासाची पुनर्रचना करावी लागणार असून, कलम ३७१ अन्वये आसाम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांना केंद्र सरकारनं जशी विशेष आर्थिक मदत केली, त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भाला सहा लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश रत्नपारखी यांनी केली आहे. औरंगाबाद इथं हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृती दिनानिमित्त, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित, `मराठवाडा विकास` या विषयावरच्या व्याख्यानात ते काल बोलत होते. मराठवाड्यासाठी असणारं वैधानिक विकास मंडळ कमकुवत असून, त्याला सक्षम करणं गरजेचं असल्याचंही रत्नपारखी म्हणाले.
****
परभणीच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशनतर्फे काल उपग्रह विषयक कार्यशाळा घेण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेमध्ये आतापर्यंत मोठ्या शहरांची मक्तेदारी होती, ती या कार्यशाळेच्या माध्यमातून मोडीत निघणार असून, परभणीला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करून जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करा, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी केलं. तामिळनाडूत पट्टीपुरम इथून १९ डिसेंबर २०२३ रोजी एकाचवेळी १५० उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार असून, यात परभणीच्या १५ उपग्रहांचा समावेश असेल, ही परभणीकरांसाठी आनंददायी बाब असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात काल परभणीसह नागपूर आणि पुणे इथं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
****
लोकशाहीला पोखरणारी वाळवी पत्रकारांनी उध्वस्त करावी, असं आवाहन माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केलं आहे. नांदेड इथं काल सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार गव्हाणे यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात सर्वसामान्यांची उदरनिर्वाहाची साधने महाग होत असून,अशा वेळी पत्रकारांनी खासगी समूहाचं हित जपायचं की जनहित जपायचं, याचा विचार करणं गरजेचं असल्याचं गव्हाणे म्हणाले. माजी खासदार व्यंकटेश काब्दे यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार विलास बडे यांना प्रदान करण्यात आला.
****
ओडिशामध्ये सुरु असलेल्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा काल न्यूझीलंडकडून चार - पाच असा पराभव झाला. दोन्ही संघाचे समान तीन - तीन गोल झाल्यानंतर पेनल्टी शुटआऊट झाला. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीमधे काल सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात आलं. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना यांच्या जोडीला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत एन. श्रीराम बालाजी आणि जीवन नेदुंचेझियान या जोडीलाही, पराभव पत्करावा लागला.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न यानं पुरुष तर कोरियाच्या ॲन सेयोउंग हिनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. कुनलावूतनं जगातला क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सेल्सनविरुद्ध २२-२०, १०-२१, २१-१२ असा ६४ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. महिलांच्या एकेरीचं विजेतेपद पटकवताना कोरियाच्या आन सियोंगनं अंतिम लढतीमध्ये, जपानच्या ए. यामागुशीवर १५-२१, २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक अकरावी क्रमवारी प्राप्त लिआंग वेई केंग आणि वँग चँग यांची जोडी वि��ेती ठरली. 
****
औरंगाबाद शहरालगत रांजणगाव शेणपुंजी इथं बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचं काल राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून १९९१ आणि १९९५मध्ये ते आमदार झाले होते. १९९१ ते १९९५ या काळात, ते विधानसभा उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दान करण्यात आला.
****
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्ह्यातले ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पाटील यांची निवड झाली आहे. कौन्सिलच्या काल पुणे इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एका कारकुनाने जिल्हाधिकार्यांच्या नावाने असलेल्या विविध योजनांच्या निधीतून सुमारे २२ कोटी ८७ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जलयुक्त शिवाय योजनेतलं देयक जमा न झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर चौकशी केली असता हा गैरप्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारकुनासह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयानं त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
पैठणहून दक्षिण जायकवाडीला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलावरून काल एक मोटारगाडी पाण्यात कोसळल्यानं तीन जण जखमी झाले. जखमींना पैठणमधल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी; देशभरातून कुठूनही मतदान करणं शक्य होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचं निधन;महान फुटबॉलपटू पेले कालवश 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचा आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम
समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किटची घोषणा
सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा-राज्य सरकारचं केंद्राला पत्र
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
आणि
देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश
सविस्तर बातम्या
केंद्रीय निवडणूक आयोगानं रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी केली आहे. यामुळे इतर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आपल्या राज्यात परतण्याची गरज आता राहणार नाही. देशभरातून कुठूनही आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगानं बहु-मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान-यंत्र निर्माण केलं असून, या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रातून बहात्तर मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या यंत्राच्या उपयोगाची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेला सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून, या पक्षांनी येत्या एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतच्या आपल्या सूचना मांडाव्यात, असं त्यांना सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांचं आज पहाटे अहमदाबाद इथं निधन झालं, त्या शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. हिराबा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे परवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं काल कर्करोगानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. २१ वर्षांच्या कारकिर्दीत पेले यांनी १ हजार २८१ गोल केले. त्यांनी ब्राजिल संघाला तीन वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. पेले यांच्या निधनानं क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, ��ुरेश वरपुडकर, अनिल पाटील आदींसह सुमारे ३९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या प्रस्तावाबाबत कल्पना नसल्याचं, वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. त्यापूर्वी काल विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
केंद्राच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम राबवण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली .या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या ड वर्ग महानगरपालिका, ब आणि क वर्ग नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींमधल्या शहरांचा समतोल आणि कालबद्ध सर्वसमावेशक विकास करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी केंद्र सरकारकडे केली असून, ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्रीयांनी व्यक्त केला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सुरू केलेल्या, विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास, या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्राच्या मान्यतेनंतर तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन झाल्यावर, प्रादेशिक असंतुलन शोधून समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठवाडा आणि विदर्भात सत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिल आहे, यातून या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आता या महामार्गामुळे नागपूर आणि औरंगाबाद थेट संपर्क झाला असल्याने, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या धार्मिक आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होणार आहे. याठिकाणीही पर्यटन स्थळांवर सुविधा विकसित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. समृद्धी महामार्ग गडचिरोली मार्गे छत्तीसगड तसंच मध्यप्रदेशाला जोडण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाड्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा औद्योगिक मार्गिकेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले...
Byte …
नागपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर देखील आपण विकसित करतोय. मग त्यात मराठवाड्याला पण न्याय मिळणार आहे. आणि मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे जे काही आहेत, ते ही त्याच्यातून कव्हर होतायत. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टीक सपोर्ट देखील तयार होतील.
****
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चेत बोलताना, मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले,
Byte ..
ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन त्यावेळेस माझी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधीत्व द्या अन् बाकीच्या पण जागा त्या ठिकाणी भरा. कुठल्या घ्यायच्यात त्या भरा.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अधिक बळकट करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं तसंच समुपदेशन उपक्रमात तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार एक नवीन धोरण आखत असल्याची माहिती दिली. ऊर्जा योजनेसाठी केंद्रानं एकोणचाळीस हजार सहाशे दोनकोटी रुपये मंजूर केल्याचं फडणवीस  यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातले किमान तीस टक्के शेतकरी पूर्णपणे सौरऊर्जा वापराकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या प्रकारचा पहिला पथदर्शी फीडर राळेगण सिद्धी इथं बसवण्यात आला असून, या गावातल्या ग्रामस्थांनी अजून एका सौर फीडरची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणं आवश्यक असून, राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करत नाही मात्र काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधलं.
****
पाणीपुरवठा विभागातल्या कामांना गती मिळावी यासाठी या विभागातल्या एक हजार तीनशे तेरा जागा भरण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक उपअभियंता पद भरण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत दिली. बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
राज्यातल्या ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेत दिली.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला पन्नास वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त, पन्नास कोटी रुपये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, त्यापैकी पंचवीस कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, आणि उर्वरित निधी आवश्यकतेनुसार देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत दिली.  कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.
****
सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच निर्यात धोरणात योग्य तो बदल करावा, अशी मागणी करणारं पत्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला या अडचणीतून ब���हेर काढण्यासाठी सोयाबीनला आठ हजार ७०० रुपये, आणि कापसाला १२ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे. सोयाबीन ढेप निर्यातीसंदर्भात धोरणात बदल करावा, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावं, आदी मागण्यांही सत्तार यांनी पत्रातून केल्या आहेत.
****
राज्यातल्या बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसंच अशा डॉक्टरांना अधिकाधिक कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीनं कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला  ते उत्तर देत होते. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात चार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहितीही महाजन यांनी यावेळी दिली.
****
परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या पदवीधारकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं काल देशभरातल्या एक्क्याण्णव ठिकाणी छापे घातले. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, बुलडाणा, पुणे, जळगाव इथल्या वैद्यकीय परिषदांचा, तसंच परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
****
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी १२ जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करता येतील. या जागांसाठी मतदान ३० जानेवारीला होईल आणि २ फेब्रुवारीला निकाल लागतील.
****
देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातल्या शहरांमध्ये मार्च २०२३ पर्यंत 5-जी सेवा सुरू होणार आहे. औरंगाबाद शहराचा या टप्प्यात समावेश करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड अग्रीकल्चर - सीएमआयए संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून सीएमआयएने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात येत्या मार्च महिन्यापासून 5-जी सेवा उपलब्ध होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरसकट सगळ्या दिव्यांगांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचे आदेश, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर, कुटुंबप्रमुख दिव्यांग असल्यास मिळकत करामध्ये मिळणारी पन्नास टक्के सूट, ही कुटुंबाचे प्रमुख नसलेल्या दिव्यांगांनाही मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीनं केली होती, त्यानंतर, ही अट शिथिल करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या शेवाळा इथं मन्याड नदी संवाद यात्रेचा काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मन्याड नदीमधली गाळामुळे बंद पडलेली लिंबा उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गाळ काढण्याची तयारी दाखवल्याबद्दल राऊत यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं.
****
राज्य शासनाच्या २०२१-२२ च्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात उस्मानाबादच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मधले क्रीडा शिक्षक संजय देशमुख यांना विशेष क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मक्रणपूर इथं आज मक्रणपूर परिषद आणि जयभीम दिन स्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान आयोजित या परिषदेची सुरुवात सकाळी दहा वाजता ध्वजारोहणाने होईल. या परिषदेदरम्यान आज विविध कार्यक्रम होणार आहेत.
२०२२ या वर्षाचे अखेरचे २ दिवस शिल्लक आहे. सर्वत्र नव्या वर्षाची तयारी सुरू झाली आहे. या सरत्या वर्षानं आपल्याला काय दिलं, काय शिकवलं याचा आढावा घेणारा कार्यक्रम ‘सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा’ आज रात्री साडे ९ वाजता अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित केला जाईल. राज्यातल्या सर्व केंद्रांवरुन हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.****
राज्य विधीमंडळाचं आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्क्याहून अधिक मतदान, उद्या मतमोजणी
मोरमुगाओ क्षेपणास्त्र- सज्ज विनाशिका भारतीय नौदलात सामील
महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळाव्यास उपस्थित राहण्यास इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांना बंदी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १८८ धावांनी विजय
आणि
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना जगज्जेता  
****
राज्य विधीमंडळाचं आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात २३ विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार आहेत.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दे���ेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. भ्रष्टाचार विरोधी नवीन लोकायुक्त कायदा करण्याच्या विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशिल असून राज्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी मोठे निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी शक्य ते सर्व काही केलं जाईल, असं सांगत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाबाबत राजकारण न करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देतांना ते म्हणाले…
आतापर्यंत जेवढा निधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासाठी सरकारने दिला नव्हता, जवळपास नऊ हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. सात हजार ४०० कोटी मंजुर झाले, चार हजार ८०० कोटी रुपयाचं प्रत्यक्ष वितरण झालंय, आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचं ७५५ कोटी रुपये, त्याचंही वाटप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर एनडीआरएफच्या नॉर्मच्या दुप्पट आम्ही मदत दिली. त्यामुळे शेतकर्यांच्या बाबतमीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणास मंत्रिंडळानं मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी साधारण दोन  हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातल्या ४८  गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनाचं पाणी मिळू शकणार आहे. त्या भागातला दुष्काळ दूर होण्यास या विस्तारित प्रकल्पाची मोठी मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, चालू अधिवेशात भ्रष्ट्राचार विरोधी लोकायुक्त नियुक्तीसंदर्भातील विधेयक मांडलं जाणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…
‘‘लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याच अधिवेशनामध्ये नवीन लोकायुक्ताचं बील मांडणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचं काम हे सरकार करणार आहे. मंत्रिमंडळ देखील आता लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे आणि या कायद्यामध्ये अँटी करप्शन ॲक्ट जो आहे, त्या ॲक्टला देखील आता या कायद्याचा भाग केलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पूर्ण ट्रान्स्परन्सी आणण्याच्या संदर्भात अतिशय महत्वाचं पाऊल हे उचललं गेलेलं आहे.
सीमा भागामध्ये इतर राज्यांमध्ये जाण्याची ही मानसिकता बोलून दाखवली जाते, त्यामागे कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आहेत, याची सगळी माहिती इंटेलिजन्सच्या माध्यमातून आमच्याकडे आली असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. योग्य वेळी ही माहिती जाहीर करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
सर्व क्षेत्रात राज्याच्या हिताचा कारभार करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपुरात वार्ताहत परिषदेत सरकारच्या कारभारावर टीका करत, चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं. अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर या सरकारला आम्ही घेरणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातलं सरकार सत्तेवर येऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरीही या सरकारकडून असलेल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, असं आरोप अजीत पवार यांनी केला. ते म्हणाले---
जे काही अतिवृष्टी झाली ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्यामध्ये शेतकर्यांचं अतोनात नुकसान झालंय, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर धान आणि कापूस आणि सोयाबिन यांचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये पिकविमा मिळत नाहीये, त्याच्यामध्ये खरेदी केंद्र व्यवस्थित केली जात नाहीये, खरेदी केंद्र सुरु करताना ठराविक तोंडं पाहून खरेदी केंद्र सुरु केली जातात. हे तर या सरकारचं अपयश आहे. आम्ही सरकार म्हणून काम करत असताना असा दुजाभाव करत नव्हतो. शेवटी ज्या भागामध्ये पिक जाणार असेल त्या भागामध्ये खरेदी केंद्र सुरु झाली पाहिजेत, ही आमच्या सरकारी भुमिका असायची. मात्र या सरकारची तशा प्रकारची भुमिका असताना दिसत नाही.
****
सीमावादावर अजून समाधानकारक तोडगा निघत नाही, अनेक उद्योग आणि प्रकल्प महाराष्ट्राबाहेर चाललेत, लक्षावधी युवकांचा रोजगार बुडाला, अशा अनेक प्रश्नांमुळे राज्यात अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेला तोंड फोडण्याचं काम आम्ही या अधिवेशनात करु असं अजित पावर यांनी यावेळी सांगितलं. महापुरुषांबाबत सत्ताधारी पक्षाकडून सतत बेताल वक्तव्य केली जात असून त्याबद्दल क्षमा मागायलाही हे सरकार तयार नसल्यानं जनतेत असंतोष आहे, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच निवडले जाणार असल्यानं या निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली. उद्या मंगळवारी या मतदानाची मोजणी केली जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात २०८ ग्रामपंचायतीसाठी ८६ पूर्णांक ५५ टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात दिनांक ६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झालं. शिरडशहापूर आणि वारंगा फाटा इथं उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
बीड जिल्ह्यात ६६३ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झालं.
जालना जिल्ह्यातल्या २५४ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८५ टक्के मतदान झालं.
उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्क्याहून अधिक मतदान झालं, तर तीन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली.
लातूर जिल्ह्यातही ३३८ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झालं.
कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८४ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९३ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ८० पूर्णांक ४७ टक्के, वाशिम जिल्ह्यातल्या २८० ग्रामपंचायतींसाठी ८० पूर्णांक ५४ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ८० पूर्णांक २४ टक्के मतदान झालं.
सोलापूर जिल्ह्यातल्या १७७ ग्रामपंचायतीसाठी ८१ पूर्णांक १९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७८ पूर्णांक २२ टक्के, पालघर जिल्ह्यातल्या ६१ ग्रामपंचायतींसाठी ७८ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं.
****
मोरमुगाओ ही रडारपासून सुरक्षित असणारी क्षेपणास्त्र- सज्ज विनाशिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल भारतीय नौदलात सामील करण्यात आली. मेक इन इंडिया अंतर्गत मुंबईतल्या माझगाव गोदीत ही युद्धनौका तयार करण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीची ही दुसरी विनाशिका आहे. यावेळी संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल हरीकुमार तसंच माझगाव गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद उपस्थित होते.
****
विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे, जागतिक तापमात वाढ होण्याच्या काळात वन विभागाचं पर्यावरण संवर्धनाचं कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दा�� मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव केला. काल नागपूर इथं वनविभागाच्या वन भवन या इमारतीचं उद्घाटन आणि उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणे या भागात अर्बन फॅारेस्ट ही संकल्पना पुढे येत असून, त्यामुळे प्राणवायु वाढण्यास नक्कीच मदत होईल, असं ते म्हणाले. नुकतंच लोकार्पण करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गावर ३५ लाख झाडं लावण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काल नागपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो, विद्यार्थ्यांचं हित विचारात घेऊन नवीन परीक्षा पद्धत दोन वर्षांनंतर लागू करावी, असं पटोले म्हणाले.
****
जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दुध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या गटाचा पराभव करत विजय मिळवला होता. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. तब्बल सात वर्ष खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची या दूध संघावर सत्ता होती.
****
बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे. मात्र या मेळाव्यास इचलकरंजीचे खासदार आणि राज्य सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना उपस्थित राहता येणार नाही. त्यांना बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावात प्रवेशबंदी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं कारण देत त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. दरम्यान, खासदार माने यांनी बेळगावला महामेळाव्याला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं व्यापाऱ्यांना लावलेल्या आस्थापना कराला स्थगिती देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असं आश्वासन, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिलं आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांच्या अध्यक्षतेखालच्या एका शिष्टमंडळानं यासंदर्भात काल मंत्री भुमरे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. या शिष्टमंडळानं आस्थापना कराच्या मुद्द्यावरती व्यापाऱ्यांच्या भावना बोलून दाखवल्या, यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यावर सकारात्मकपणे विचार करू असं आश्वासन दिलं. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी हे यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं एक ते पाच जानेवारी दरम्यान होणारा राज्यस्तरीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सव शेतकऱ्याला सक्षम करणारा ठरणार असल्याचं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल या महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या महोत्सवात कृषी विभागाचे कार्यक्रम, कृषि विद्यापीठाच्या समन्वयानं विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांमधून, विचारमंथन होईल, असं त्यांनी सांगितलं. शासनाच्या प्रत्येक विभागानं नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मिना उपस्थित होते.
****
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं १८८ धावांनी विजय मिळवत दोन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी बांगलादेशला दुसऱ्या डावात ५१३ धावा करण्याचं लक्ष्य भारतानं दिलं होतं. मात्र त्यांचा संघ केवळ ३२४ धावाच करु शकला. सामनावीरचा किताब फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या भारताच्या कुलदीप यादवला देण्यात आला.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनानं पटकावला आहे. काल रात्री कतार मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊट मध्ये चार-दोन असा पराभव केला. अर्जेंटिना ने तब्बल ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. विश्वचषकात एकूण सात गोल करणाऱ्या मेस्सी ने गोल्डन बॉल तर आठ गोल करणाऱ्या एमबाप्पे याने गोल्डन बूट पटकावला.
****
पायाभूत सुविधांच्या सूत्रबद्ध विकासासाठी केंद्र सरकारनं आखलेला गतिशक्ती कार्यक्रम आणि विविध कल्याणकारी योजना, या विषयावर आधारित मल्टिमीडिया चित्रांचं प्रदर्शन, जालना इथं रेल्वे स्थानकावर भरवण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयानं, दक्षिण मध्य रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं, केंद्र सरकारला आठ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन येत्या २१ तारखेपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात सर्वसामान्य जनतेसाठी खुलं राहणार आहे.
****
राज्य शासनाच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या ६२० लाभार्थी बालकांच्या खात्यात ४७ लाख चार हजार ७०० रुपये अनुदान जमा करण्यात आलं आहे. ही जिल्ह्यातली आतापर्यंतची सर्वोच्च लाभार्थी संख्या असल्याची माहिती, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी दिली. या योजनेअंतर्गत अनुदान थेट लाभार्थांच्या बँक खात्यात जमा केलं जातं.
****
कर्जतमध्ये होणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या प्रख्यात कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे यांची निवड झाली आहे.  येत्या ३ जानेवारी रोजी हे पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन होत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.****
राज्याच्या विविध भागात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना राज्य सरकारची मान्यता
जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यात दुसरा टप्पा सुरु करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठीच्या सलोखा योजनेला मंजुरी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
राज्यात आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय समिती नियुक्त
मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुरचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी  
आणि
भारत - बांगलादेश दरम्यान आजपासून पहिला कसोटी क्रिकेट सामना तर कतारमधल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश
****
राज्याच्या विविध भागात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची चौथी बैठक काल झाली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
यामधे, १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पुण्यातला प्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हरित तंत्रज्ञानावर आधारीत न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्सचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, तसंच गडचिरोली जिल्ह्यात दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कॉस्मो फर्स्ट लिमिटेड, पिरामल फार्मा या दोन कंपन्यांना प्रत्येकी ५०० कोटी रुपये, तर कॉस्मो फिल्म्सच्या ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.  
****
राज्यातल्या शाळांना अनुदान देण्याचा आणि त्यासाठी अकराशे कोटी रुपये मान्यता देण्यास निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. सहा हजार दहा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना, तसंच १४ हजार ८६२ तुकड्यांना हे अनुदान मिळणार असून, या निर्णयाचा लाभ राज्यातल्या सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना होणार आहे.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी २०१५ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आलं होतं, त्यामाध्यमातून ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्यानं सुरु होणाऱ्या या अभियानात येत्या तीन वर्षात सुमारे पाच हजार गावं नव्याने समाविष्ट केली जातील. 
राज्याच्या ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्याची तरतूद असलेल्या सलोखा योजनेलाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल. शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात, ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आहे.
राज्यातल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतल्या एक हजार ५८५ रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालून राज्यातल्या ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारं, सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी बँकेस रक्कम देण्याचा, तसंच राज्यात‍व्यवसायानुकूल वातावरण निर्माण करण्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी करण्याचा, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ करून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचा, तसंच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा आणि कालबाह्य तरतुदी काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेचं लक्ष वेधलं. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत असल्याचं सांगतं, दुसरीकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत असल्याचं ते म्हणाले. सरकारचे श्रीमंत आणि गरीबांसाठी नियम वेगवेगळे असल्याचा आरोपही जलील यांनी केला.
****
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रकरणी दखल घेण्याचं विनंतीपत्र सादर केलं. या प्रकरणी केंद्र सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर योग्य तो तोडगा काढावा, अशी विनंती शेवाळे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न केले परंतू बेळगावातल्या संघटना आणि अन्य राजकीय पक्ष जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांची एकत्रित बैठक बोलावली आहे. सायंकाळच्या सुमारास ही बैठक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल अचानक बेळगाव दौरा केला. मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत, असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी तसंच नागरिकांशी आपण चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण खासदार शरद पवार यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर वातावरण बदलून गेल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षावर आता येत्या दहा जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मात्र काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वक���ल कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना या मुद्द्यावर आपलं म्हणणं थोडक्यात लेखी मांडण्याची सूचना केली. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल आणि महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सिब्बल यांच्या या मुद्यावर आपले लेखी म्हणणे मांडण्यास सहमती दर्शवली आहे.
****
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका, तसंच इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणासंबंधी सर्व याचिकांसंबंधी सर्वोच्च न्यायालय येत्या १७ जानेवारीला निकाल देणार आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी १७ जानेवारीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राज्यात आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय समिती नेमण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडासारखे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन ही समिती आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणार्या मुलींची तसंच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यात समन्वय घडवून आणणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एका अज्ञाताने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पवार यांच्या निवासस्थानातल्या दूरध्वनीवर मोबाईलवरून २ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान सातत्याने फोन करून धमकी देण्यात आल्याचं, टेलिफोन ऑपरेटरने या तक्रारीत म्हटलं आहे. हा फोन बिहारमधून आला असून ती व्यक्ती हिंदीत बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
मराठवाडा, विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुरचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावं, अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल विधान भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनकाळात नागपूर इथल्या पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. मराठवाड्यासह राज्यातल्या नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरु व्हावं, आदी मागण्याही अजित पवार यांनी केल्या.
****
‘चला जाणूया नदीला’ या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवना, दुधना आणि खाम नदीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, त्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियाजन करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत होणाऱ्या या अभियानासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी खाम नदीच्या पुनरुजीवन अभियानाची ध्वनिचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.
****
औरंगाबाद - अहमदनगर - पुणे महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी झाली आहे. औरंगाबाद तालुक्यातल्या सात, तर पैठण तालुक्यातल्या १७ गावांतून या महामार्गासाठी भूसंपादन करावं लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
****
’इंडियन कॉमर्स असोसिएशन’च्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचं यजमानपद, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात २२ ते २४ डिसेंबर दरम्यान ही परिषद होणार असल्याची माहिती, वाणिज्य परिषदेचे सदस्य सचिव तथा अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली. या परिषदेत सात परिसंवाद होणार आहेत. देशभरातून सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होत असलेल्या या परिषदेत, विविध विषयांवर मंथन होईल, तसंच विविध पारितोषिकांचं वितरण तसंच स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आजपासून चट्टग्राम इथं सुरु होणार आहे. आज सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या पहिल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनानं क्रोएशियाचा तीन - शून्य असा पराभव केला. उपान्त्य फेरीचा दुसरा सामना आज रात्री साडे बारा वाजता फ्रान्स आणि मोरोक्को दरम्यान होणार आहे.
****
राज्यातल्या कृषी वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याच्या निषेधार्थ, उस्मानाबाद इथं काल वीज कर्मचारी आणि संघटनानी निदर्शनं केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतला तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
****
आठवा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या ११ ते १५ जानेवारी दरम्यान औरंगाबाद इथं होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं औरंगाबाद जिल्हा केंद्र, यांच्यावतीनं आयोजित हा महोत्सव शहरातल्या प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जगभरातल्या ४० चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच, परिसंवाद, चर्चासत्र तसंच विशेष व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. १५ जानेवारीला समारोप सोहळ्यात विजेत्या चित्रपटाला सुवर्ण कैलास सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार तर चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल एका मान्यवराला, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं एक ते पाच जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल या महोत्सवाचा एका बैठकीत आढावा घेतला. शासनाच्या विविध विभागांनी आपआपल्या योजनांची अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाची माहिती स्टॉलच्या माध्यमातून शेतकरी, नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, त्यांनी केल्या. या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनाबरोबरच ‘पुस्तकदान’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांकडून पुस्तक जमा करुन ते पुस्तके गरजू वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या अध्यापक,  व्यवस्थापन प्रतिनिधी,  प्राचार्य,  विद्यापीठ अध्यापक,  विद्यापरिषद गटाच्या निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलनं ४४  पैकी ३५  जागांवर विजय मिळवला. विद्यापीठ विकास मंचनं सात जागांवर विजय मिळवला, तर स्वाभिमानी मुप्टा आणि परिवर्तन पॅनलनं प्रत्येकी एक ���ागा जिंकली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात गायरान आणि गावठाण जमिनीवर दीर्घकाळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सामावून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत नियमित करण्याचा आणि घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून मागच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्याला कालच्या बैठकीत पुष्टी मिळाल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत गोवर आजाराचे शंभरच्या वर रुग्ण आढळून आले असून, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून उद्यापासून जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. पालकांनी गोवर प्रतिबंधक लस देऊन आपल्या बालकांचं संरक्षण करण्यासाठी पुढे यावं असं आवाहनजिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी काही भागात पाऊस झाला. वसमत शहरासह परिसरात रिमझिम पाऊस झाला. तर आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, रामेश्वर तांडा या परिसरात अर्धा तास पाऊस झाला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Morocco FIFA WC: मोरोक्कोत विजयाचा महाजल्लोष! लोक रस्त्यावर; शकीरा, इम्रान खानची रिअ‍ॅक्शन पाहाच!
Morocco FIFA WC: मोरोक्कोत विजयाचा महाजल्लोष! लोक रस्त्यावर; शकीरा, इम्रान खानची रिअ‍ॅक्शन पाहाच!
Morocco FIFA WC: मोरोक्कोत विजयाचा महाजल्लोष! लोक रस्त्यावर; शकीरा, इम्रान खानची रिअ‍ॅक्शन पाहाच! Shakira tweet after morocco win, celebration in country: FIFA विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत पोहोचून मोरोक्कोने इतिहास रचला आहे. मोरोक्कोत या महान विजयाचा आनंद साजरा केला जात असून लोक रस्त्यावर जमा झाले आहेत. Shakira tweet after morocco win, celebration in country: FIFA विश्वचषक २०२२ च्या उपांत्य…
View On WordPress
0 notes