Tumgik
#संघासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
खडसे-महाजनांमुळे राज्यभर गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान सुरू
खडसे-महाजनांमुळे राज्यभर गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान सुरू
खडसे-महाजनांमुळे राज्यभर गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान सुरू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे नेते व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जळगाव – जिल्हा दूध संघाच्या २० जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला आज सकाळी आठ वाजेपासूनच सुरुवात झाली आहे. महाजन-खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यभरात गाजत असलेल्या या निवडणुकीत दोघांपैकी कोण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
एनडीएचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा-उद्या सायंकाळी नव्या सरकारचा शपथविधी
नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेपासह सुशासनाला प्राधान्य-काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार-नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ४० जणांचे ५३ अर्ज
बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश
आणि
ज्ञानराधा प्रकरणात कुटे दाम्पत्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
****
भाजपचे ज्येष्ठ नेते काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनीही काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षनेतेपदी निवड झाल्याचं, तसंच त्यांना सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं.
काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिर्पेक्ष जनता दल नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलतांना मोदी यांनी, एनडीए फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर राष्ट्र प्रथम या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, काल एनडीएच्या बैठकीनंतर मोदी यांनी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
****
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १७ जागा लढवून १४ जागांवर विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं यश असल्याचं, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य असून, त्यातही असाच लढा देऊ, असा निर्धार चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
****
राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. मनसेतर्फे अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काल मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे, भाजपाचे निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैय्या रिंगणात आहेत. सरैया तसंच डावखरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
**
नाशिक विधान परीषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठ�� काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधीज्ञ संदीप गुळवे यांनी तर शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी अर्ज दाखल केला आहे. काल अखेरच्या दिवसापर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.
****
भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
****
१८ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते २१ जून, दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, पुणे, तसंच कोलकाता इथं केलं जाणार आहे. यंदा या महोत्सवाच्या स्पर्धा विभागात ३८ देशांमधून ६५ भाषांमधील तब्ब्ल एक हजार १८ चित्रपटांची नोंदणी झाली आहे.
****
यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुंडे बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केलं असून आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीच्या उपसरपंचांसह ७० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देऊ नये, असं म्हटलं होतं. जरांगे मात्र आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाच्या निर्णयावर कायम आहेत.
****
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये बीड इथले पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिळे यांनाही राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं.
****
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना न्यायालयानं १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी काल पहाटे कुटे यांच्या पुण्यातल्या हिंजवडी इथल्या घरातून त्यांना ताब्यात घेत, माजलगाव न्यायालयासमोर सादर केलं, न्यायालयानं त्यांना येत्या गुरुवापर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून घेतलेल्या ठेवी परत केल्या नाहीत, या प्रकरणी कुटे यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल आहेत.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर परिसरात एक चारचाकी वाहन मालवाहू ट्रकवर पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात एका टेंपोने चारचाकीला दिलेल्या धडकेत काल दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. उमरगा-लातूर मार्गावरच्या बाबळसुर पाटीजवळ हा अपघात झाला.
****
लातूर जिल्ह्यात पावसाच्या पुरात वाहून गेल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. देवणी तालुक्यातल्या कमालवाडीत गुरुवारी अलेल्या पुरामध्ये ही महिला वाहून गेली होती, काल तिचा मृतदेह सापडला.
****
बीड जिल्ह्यातल्या केज इथं एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थाकडून ३ हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. धनराज सखाराम सोनवणे असं मुख्याध्यापकाचं नाव असून, शाळेच्या दाखल्याची दुसरी प्रत देण्यासाठी त्याने तक्रारदार विद्यार्थाकडे लाचेची मागणी केली होती.
****
महावितरण कंपनीच्या विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं आहे. समाज माध्यमांवर वीजमीटर विरोधात जन समर्थन एकत्रित करण्याचं काम याद्व���रे सुरू करण्यात आलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मीटर विरोधात सविस्तर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या शेतकऱ्यांनी काल नरसी इथल्या वीज उपकेंद्रासमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केलं. या परिसरातील दोन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळं शेतात विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या. मात्र अद्याप हे खांब उचलण्यात आले नाहीत, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतीच्या मशागतीस त्याचा अडथळा निर्माण होत असल्यानं हे आंदोलन केल्याचं, शेतकऱ्यांनी सांगितलं.
****
पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळण्यासह इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११ जूनपर्यंत धर्माबाद-मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-eight-applications-filed-by-five-candidates-on-the-fourth-day/
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
kokannow · 2 years
Text
कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी समस्यांबाबत वेधले नगराध्यक्षांचे लक्ष
कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी समस्यांबाबत वेधले नगराध्यक्षांचे लक्ष
नगरपंचायत चे सत्ताधारी म्हणून आम्ही व्यापाऱ्यांच्या पूर्णता पाठीशी – समीर नलावडे व्यापारी संघासाठी कणकवली शहरात 15 गुंठे जागा आरक्षित करा कणकवली : कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र .६६ च्या उभारणीमुळे कणकवलीतील व्यापारी वर्गाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कणकवली मुळातच औद्योगिक केंद्र नसून व्यापारी केंद्र असल्याने व्यापारी वर्गाला गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सातत्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"रोहित शर्माला एक खाली आणा": माजी पाकिस्तानी फिरकीपटूची टीम इंडियासाठी सूचना | क्रिकेट बातम्या
“रोहित शर्माला एक खाली आणा”: माजी पाकिस्तानी फिरकीपटूची टीम इंडियासाठी सूचना | क्रिकेट बातम्या
IND vs AUS: रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1ल्या T20I मध्ये बाद झाल्यानंतर परतला.© एएफपी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न सोडले गेले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 208/6 धावा करूनही हा सामना चार गडी राखून गमावला. गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, तर रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज अँड विराट कोहली मोठी धावसंख्या गाठता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
इमाम उल हकचे विराट कोहली किंवा रोहित शर्मावर मोठे विधान कोणाकडे फलंदाज म्हणून अधिक प्रतिभा आहे
इमाम उल हकचे विराट कोहली किंवा रोहित शर्मावर मोठे विधान कोणाकडे फलंदाज म्हणून अधिक प्रतिभा आहे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची फलंदाजीतील खराब कामगिरी हा भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेचा विषय आहे. कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2022 मध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना, त्याने ओव्हल येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले. कोहलीचा फॉर्म सतत घसरत राहिला. इंग्लंडविरुद्धच्या दोन T20 सामन्यांमध्ये तो फक्त 12 धावा करू शकला आणि नंतर दुखापतीमुळे तो पहिल्या एकदिवसीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
ऋषभ पंत बाद झाल्याने सामना इंग्लंडच्या कोर्टात गेला, बेन स्टोक्सने उघडले गुपित
ऋषभ पंत बाद झाल्याने सामना इंग्लंडच्या कोर्टात गेला, बेन स्टोक्सने उघडले गुपित
भारत विरुद्ध इंग्लंड: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंडच्या संघाने भारतावर ७ विकेट्सने मात केली आहे. पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने संघाच्या यशाचे रहस्य उघड केले आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला बाद करणे आपल्या संघासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचे बेन स्टोक्सने सांगितले. बेन स्टोक्सने ऋषभ पंतच्या विकेटला सामन्याचा टर्निंग पॉइंट…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rohit Sharma: संघासाठी काय पण! ९व्या क्रमांकावर येऊन हिटमॅननं बांगलादेशला झोडपलं
Rohit Sharma: संघासाठी काय पण! ९व्या क्रमांकावर येऊन हिटमॅननं बांगलादेशला झोडपलं
Rohit Sharma: संघासाठी काय पण! ९व्या क्रमांकावर येऊन हिटमॅननं बांगलादेशला झोडपलं Rohit Sharma IND Vs BAN 2nd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्या २६६ धावाच करू शकला. Rohit Sharma IND Vs BAN…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
१८ व्या लोकसभेची स्थापना प्रक्रिया पूर्ण-निवडणूक आचारसंहिता समाप्त 
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय पक्षांच्या बैठकांची सत्रं सुरू
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जू�� ऐवजी २७ जूनपासून
छत्रपती शिवाजी महाराजांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेचा पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय
आणि
नैर्ऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं १८ व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया काल पूर्ण केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या खासदारांची यादी सुपूर्द केली. त्यानंतर आयोगानं निवडणूक आचारसंहिता समाप्त झाल्याचं घोषित केलं. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्विरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाल्यानं, मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
****
देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल ही सुधारित आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून, ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
केंद्रात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी काल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. जनता दल संयुक्तच्या नेत्यांची काल दिल्लीत नीतीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे.
****
शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित ��ासदारांशी मुख्यमंत्री एकना�� शिंदे यांनी काल मुंबईत चर्चा केली. निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलो याचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनीही मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काल मुंबईत बैठक झाली. यानंतर वार्ताहरांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलं. या निकालांची सर्वस्वी जबाबदारी आपण स्वीकारली आहे, मात्र, या अपयशानं खचून न जाता नव्या उमेदीनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल नवनिर्वाचित खासदारांसह मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या विरोधात मतदारांमध्ये अधिक नाराजी असून, येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसेल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र त्यांना सोपवलं.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी २७ जूनपासून सुरू होणार आहे. मुंबईत काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक वेगानं तोडगा काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावं यासाठी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे यांना विनंती केल्याची चर्चा मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एक आणि केरळच्या तीन जागांसाठी काल अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधल्या तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यात १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार असून, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा काल राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
**
कोल्हापुरात महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार देखील अनुभवायला मिळाला.
**
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही पार पडलं.
**
नांदेड जिल्हा परिषदेच्‍यावतीने भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महाराजांच्या पुतळयास पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणी इथंही जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी भागवी पताका उभारुन शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन केलं.
दरम्यान, नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल टेक्सास इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने निर्धारित षटकात सात बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या संघाने देखील २० षटकात १५९ धावा केल्यानं, सुपर ओव्हर घेण्यात आली. यामध्ये अमेरिकेनं १८ तर पाकिस्ताननं १३ धावा केल्या.
अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं ओमानचा ३९ धावांनी, तर युगांडानं पापुआ न्यू गीनीचा तीन गडी राखून पराभव केला. भारतीय वेळेनुसार आज पहाटे बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात स्कॉटलंडनं नामिबियावर पाच गडी रा���ून विजय मिळवला.
****
जर्मनी मधल्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगने सुवर्णपदक पटकावलं. त्याने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४२ पूर्णांक सात गुण मिळवत ही कामगिरी केली.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पाऊस पोहचला असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात आज पहाटे जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या तळणी इथं वीज पडून शंकर धर्मेकर या तरुणाचा मृत्यू झाला. शंकर हा त्याच्या भावासह पाऊस पडत असल्यानं एका शेतात झाडाखाली थांबला असताना ही घटना घडली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. बाजारात जर बियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस किंवा अनधिकृत विक्री तसंच साठा केल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत दिले.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आठ जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते काल दहा रास्तभाव दुकानदारांना नविन ई-पॉस मशिनचं वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे उपस्थित होत्या.
****
परभणी जिल्ह्यात काल पिता पुत्राचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या जीपला भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागलेल्या प्रत्येक गावात जलसमृद्ध गाव अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, यासाठी भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यात किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार झाडं लावण्यात आली. भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
****
0 notes
krantinewsin · 3 years
Text
बार्शीच्या आनंद शेलार यांची क्रिकेट प्रशिक्षकपदी निवड
0 notes
gajananjogdand45 · 10 months
Link
https://marmikmaharashtra.com/vinshree-gadgile-and-laxman-rathore-felicitated-it-is-a-matter-of-pride-for-hingoli-that-students-from-ordinary-farming-families-are-selected-for-the-national-games-khat-hemant-patil/
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
hallomanojposts · 4 years
Text
कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला!
कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला!
कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला कडा दि 25 जानेवारी, प्रतिनिधी चाळीसगांव तालुका जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कडा येथील जैन जिमखानाने कोल्हापूर च्या प्रिन्स अकॅडमीचा पराभव करून राज्यस्तरीय चषक आणि 25 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. चाळीसगांव जिल्हा जळगाव येथे वाय एन चव्हाण कॉलेज ने निमंत्रित संघासाठी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
भारताचं प्रदर्शन खूप चांगलं आहे मात्र ब्रिसबेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विजयाच्या वाटेवर
भारताचं प्रदर्शन खूप चांगलं आहे मात्र ब्रिसबेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विजयाच्या वाटेवर
ब्रिसबेन भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या टेस्टची घमासान सुरू आहे. सीरीज १-१ अशी बरोबरी केल्यामुळे आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या संघाला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू जखमी असून सगळे खेळाडू हे युवाच आहेत. भारताचं प्रदर्शन खूप चांगलं आहे मात्र ब्रिसबेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विजयाच्या वाटेवर आहे. गाबाचं मैदान ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप खास आहे. या संघाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"कोणताही मार्ग नाही...": मॅथ्यू हेडन या स्टारने भारतासाठी T20I मध्ये का ओपन करू नये यावर | क्रिकेट बातम्या
“कोणताही मार्ग नाही…”: मॅथ्यू हेडन या स्टारने भारतासाठी T20I मध्ये का ओपन करू नये यावर | क्रिकेट बातम्या
मॅथ्यू हेडनचा फाइल फोटो© ट्विटर 2022 च्या T20 विश्वचषकाची उलटी गिनती सुरू झाली आहे. सर्व संघांनी आपापल्या संघांची नावे जाहीर केली असून तयारीचा अंतिम टप्पा आतापासूनच सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाला मार्की स्पर्धेच्या तयारीच्या टप्प्यात एक अडचण आली कारण आशिया चषक अंतिम फेरीसाठी पात्र न होता बाहेर पडला. तथापि, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक मोठी सकारात्मक होती विराट कोहली त्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes