Tumgik
#सकस
Text
IND vs SL: केएल राहुल का ये शॉट जीत लेगा बेहतरीन सिक्स के लिए घुटने टेककर, देखें वीडियो
IND vs SL: केएल राहुल का ये शॉट जीत लेगा बेहतरीन सिक्स के लिए घुटने टेककर, देखें वीडियो
भारत बनाम श्रीलंका पहला वनडे: भारत और श्रीलंका के बीच खेली जा रही तीन मैचों की वनडे सीरीज का पहला मैच आज गुवाहाटी में खेला जा रहा है. इस मैच में बांग्लादेश ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। वहीं, पहले बल्लेबाजी करने उतरी भारतीय टीम ने 7 विकेट के नुकसान पर 373 रन बनाए। भारतीय टीम की पारी में जहां विराट कोहली ने शतक जड़ा वहीं केएल राहुल ने भी कुछ दमदार शॉट खेले. केएल राहुल ने लगाया शानदार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी विशेष निरीक्षकांची नियुक्‍ती
वीस दिवसांमध्ये निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रचारासंबंधी विविध परवानग्या काढण्यासाठी ७३ हजाराहून अधिक अर्ज दाखल
डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या १ लाख शस्त्रक्रियांची नोंद आढळल्यास पद्मश्रीसाठी प्रयत्‍न करणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची ग्वाही
आणि
आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर २३५ धावांचे आव्हान
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं, महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलिस सेवेतले माजी अधिकारी एनके मिश्रा यांची पोलिस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं, आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हे विशेष निरीक्षक, कर्मचारी, सुरक्षा दलं आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील. ते स्वत: राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकता भासली तर संवेदनशील आणि जिथे समन्वयाची गरज आहे अशा भागांना भेट देतील, असं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्‍थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातुन प्रचार सभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडण, घरो-घरी जाऊन प्रचार, हेलीकॉप्टर, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थावर सुरुवातीच्या २० दिवसांमध्ये तब्बल ७३ हजाराहुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर तर ११ हजार २०० अर्ज नामंजूर केले आहेत. तर १० हजारहून अधिक अर्ज रद्द केले असून, काही अर्ज प्रक्रियाधीन आहेत. सर्वाधिक २३ हजार अर्ज तामिळनाडू, १२ हजार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेशातून १० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपुरात भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे. मोरवा विमानतळाजवळच्या १६ एकराच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे १० वर्षांनी चंद्रपूरमधे सभा घेणार आहेत. या सभेच्या दृष्टीनं भाजपातर्फे जय्यत तयारी होत असून सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पा���ील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिल्याची माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त जनजागृती म्हणून नाशिक इथं आज गोदावरी नदीच्या काठावर ५ हजार सहाशे २५ चोरस फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्त्व सांगतानाच त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता आरोग्यासाठी उपयुक्त, सशक्त आणि सकस आहार समृद्धीचे भांडार हा संदेश देण्यात आला. तब्बल शंभर महिलांनी चार तासांत ही महारांगोळी साकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांनी केलेल्या एक लाख प्‍लास्टिक शस्त्रक्रियांची नोंद मिळाल्यास त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं आज मराठवाड्यातले पहिले प्‍लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर अविनाश येळीकर- सर्जन गरीबांचा, मैत्र जीवांचा या त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथांचं प्रकाशन झालं, त्यावेळी कराड बोलत होते. दरम्यान, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला एमजीएम संस्थेचे अंकुशराव कदम, गौरव ग्रंथाचे संपादक डॉक्टर सुधीर गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
****
निवडणूक कामकाजात सजगता महत्त्वाची असून, हे काम करतांना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं मतदारसंघातल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने औरंगाबाद पश्चिम, सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस आहे. ज्या लोकशाहीमुळे आज आपणा सर्वांना पद, मान, सन्मान, चरितार्थाचं साधन, अशा सर्व गोष्टी मिळत आहेत, त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे, असंही स्वामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आज सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसच मतदान शांततेत पार पडावं, यासाठी जिल्ह्यात ७ मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात येण्यात यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेंतर्गत अहमदनगर जिल्‍ह्यातल्या ६७ हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने ६१ कोटी रुपये अनुदान जमा केले. राज्‍य सरकारच्‍या वतीनं दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्‍यात वर्ग करण्यात आले नव्हते. दूग्‍ध व्‍यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीनं अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये आता शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होण्‍यास मदत झाली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या बेंद्री इथं काल पतीच्या अपघाती अपघाती निधनानंतर पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरुण बाबुराव केंद्रेकर हे विष्णुपुरी इथून आपल्या कर्तव्यावरून परत येत असतांना त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला, ही माहिती त्यांच्या कुटूंबीयांना कळवल्यानंतर पत्नी स्नेहा केंद्रे यांनी घरामध्ये गळफास घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण-उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांसह शहरातील ठाणे अधिकारी, विविध धर्मांचे धर्मगुरू, एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचीही यात मोठ्या संख्येन उपस्थिती होती.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील २२ केंद्रांवर आज घेण्यात आली. या परीक्षेला ८ हजार १०५ विद्यार्थ्यां��ी हजेरी लावली.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा ४९, इशान किशन ४२ धावा काढून बाद झाले. त्‍यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं ३९ धावांची खेळी केली. टीम डेव्‍हीड ४५ धावा काढत नाबाद राहिला. रोमारिओ शेफर्ड यानं १० चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद ३९ धावा फटकावल्या. मुंबई इंडियन्स संघानं २० षटकात ५ गडी बाद २३४ धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आठ षटकात एक बाद ६९ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आजच्या दिवसातील दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्पोर्ट सिटी मैदानावार लखनऊ सुपर जायंटस आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात खेळला जाईल.
****
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना आज दुपारी पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-२ असा पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
samaya-samachar · 8 months
Text
अन्ततः फिल्म खेलेरै छाडिन् नीति शाहले 
काठमाडौँ १ माघ नेपालमा मिस नेपालसँग जोडिएका युवतीलाई फिल्ममा डेब्यु गर्न रत्ति पनि गाह्रो काम थिएन । तर पूर्व मिस इन्टरनेसनल नीति शाहलाई भने पहिलो फिल्म खेल्न साह्रै सकस पर्यो । मोडलिङ गर्दा ताका फिल्मको अफर लिएर जाने निर्माता निर्देशकलाई नीतिले फिल्ममा रुचि नभएको जवाफ दिएर फर्काउने गरेकी थिइन् । तर एउटा हाई प्रोफाइल ब्रेकअप पछि अचानक उनलाई फिल्म खेल्ने हुटहुटी चल्यो । आफैँ फिल्म बनाउनेदेखि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सकस अन्न, संपन्न शेतकरी | डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा अतिवापर, त्यामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानवी आरोग्य  तसेच परिसृष्टिचे बिघडत चाललेले संतुलन यामुळे  सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते. बदलत्या परिस्थितीत शेतीसाठी लागणारा मशागत, आंतरमशागत, काढणी इ. सर्व टप्प्यांवर यांत्रिकीकरण वाढले असून खर्चात वाढ झाली आहे. (जैविक शेती मिशन) शेतीवरील भांडवली खर्च कमी करून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nepalvani · 2 years
Text
जाँदाजादै मुख्यमन्त्रीले भने, ‘संघीयताको अभ्यासलाई निरन्तरता चूनौतीपूर्ण छ’
जाँदाजादै मुख्यमन्त्रीले भने, ‘संघीयताको अभ्यासलाई निरन्तरता चूनौतीपूर्ण छ’
गोविन्द महतो / जनकपुरधाम मधेशका मुख्यमन्त्री लालबाबु राउतले राजनीतिक उपलब्धिको रक्षा, सुदृढीकरण र विकासका साथ आर्थिक, सामाजिक तथा सांस्कृतिक रुपान्तरणको पथमा जनताको सर्वोत्तम हितलाई सरकारले प्राथमिकतामा राखेर काम गरेको दाबी गरेको छ । संघीय र प्रदेशमा नयाँ सरकार गठन सकस भईरहदा मुख्यमन्त्री राउतले विभिन्न चुनौतीका बावजुद प्रदेश र संघियतालाई सुदृढीकरणको दाबी गरे । ‘मधेश सरकारसँग श्रोत साधनको अभाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
meromechinagar · 2 years
Photo
Tumblr media
प्रदेश १ मा दलको नेता चयन शुरु : अन्य दलमा सर्वसम्मत, काँग्रेसमा सकस
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Year Ender 2022: ‘या’ वर्षात हे पदार्थ होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या फायदे
Year Ender 2022: ‘या’ वर्षात हे पदार्थ होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या फायदे
Year Ender 2022: ‘या’ वर्षात हे पदार्थ होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या फायदे नवी दिल्ली – लवकरच हे वर्ष संपून नव्या वर्षाची सुरूवात होईल. आजकालचे व्यस्त जीवन आणि खराब जीवनशैली यामुळे लोक त्यांच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. अशा वेळी नियमित व्यायाम पौष्टिक व सकस आहार (healthy food diet) घेणेही खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आहारात अशा अनेक सुपरफूड्सचा (superfoods) समावेश करू शकता जे पोषक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू-काश्मीरमध्ये पूँछ जिल्हयात थानामंडी इथं काल लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार सैनिकांना वीरमरण आलं, तर दोन जण जखमी झाले. डेरा की गली इथं रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरु होती. काही दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन वाहनांमधून लष्कराचे सैनिक कारवाईसाठी जात असताना हा हल्ला झाला. या परिसरात अद्यापही शोधमोहिम सुरु आहे. 
****
फौजदारी कायद्यात सुधारणा करणारी तीन विधेयकं संसदेत मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशाच्या अमृतकाळात होत असलेले कायद्यातले बदल, कायद्याची चौकट कालानुरुप आणि समान अनुभूती पूर्ण करणारे असून, या सुधारणा विधेयकांमुळे वसाहतवाद कालीन कायदे संपुष्टात आणले असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
मेरा युवा भारत पोर्टलसाठी आतापर्यंत २६ लाखांपेक्षा अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथावरुन यासंदर्भात आवाहन केलं होतं, त्याला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. या पोर्टलद्वारे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं आणि युवकांच्या विकासासाठी, तंत्रस्नेही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या सोडे इथं शासकीय आश्रमशाळेतल्या आणखी ३३ विद्यर्थिनींना काल जेवणातून विषबाधा झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन, अन्नधान्य आणि इतर बाबींची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
****
लातूर जिल्ह्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत असून, यामध्ये विविध औद्योगिक संस्था, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, कर्मचारी तसंच अधिकारी यांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केलं आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये सकस आहार उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत केलं.
****
0 notes
samaya-samachar · 9 months
Text
एसपी बढुवामा प्रहरी महानिरीक्षक कुँवर माैन, प्रचण्ड-ओलिकाे पुर्व पिएसाेका कारण सकसमा
काठमाडौं, २३ पुस  । नेपाल प्रहरीका सात जना प्रहरी उपरीक्षक (एसपी) पदमा १२ प्रतिस्पर्धी भए पछि बढुवा प्रक्रिया लम्बिएको छ।   न्यून सिट संख्यामा प्रतिस्पर्धी बढी भएका कारण प्रहरी प्रधान कार्यालयलाई बढुवामा सकस परेको जनाइएकाे छ ।   अहिले नेपाल प्रहरीमा प्रहरी उपरीक्षक रिक्त संख्या सात जना हो तर यो बढुवामा १२ जना प्रहरी नायब उपरीक्षक (डिएसपी) हरू प्रतिस्पर्धामा छन्। उनीहरू सबै बढुवाका हकदार भएकाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 2 years
Text
भेडाबाख्रा पाल्न चरन क्षेत्रको अभाव
भेडाबाख्रा पाल्न चरन क्षेत्रको अभाव
टङ्कीसिनवारी, १६ मङ्सिर । जमिनलाई टुक्रा–टुक्रा गरेर घडेरीमा बिक्री वितरण गर्ने चलन बढेपछि भेडाबाख्रा पालनका लागि चरन क्षेत्रको अभाव भएको छ । कृषियोग्य जमिन कम हुँदै गएपछि भेडा चराउने ठाउँको कमी भएको हो । चरन क्षेत्रको अभावका कारण भेडापालकलाई भेडा चराउन र भेडा बचाउन सकस पर्न थालेको छ । सुनसरीको हरिनगरा गाउँपालिका–४ का दयानन्द पाल, सदानन्द पाल र खिलानन्द पाल भेडा चराउन सयौँ भेडा लिएर महिनौँ घर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years
Photo
Tumblr media
सकस अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन वेदनादायी आहे. धीरोदत्त आवाज व अभिनयकौशल्याने अनेक कलाकृतींवर आपली मोहर त्यांनी उमटवली. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी साकरलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.
0 notes
mhlivenews · 2 years
Text
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
मुंबई, दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
मुंबई, दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी…
View On WordPress
0 notes
mithilanchaltoday · 2 years
Text
एमाले र जसपा दुबैलाई सकस , मौकामा धोका दिने ?
एमाले र जसपा दुबैलाई सकस , मौकामा धोका दिने ?
एमाले र जसपा दुबैलाई सकस , मौकामा धोका दिने ? – Bara Dainik Home राजनीति एमाले र जसपा दुबैलाई सकस , मौकामा धोका दिने ? Source link
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
REN बनाम सिक्स ड्रीम 11 भविष्यवाणी: मेलबर्न रेनेगेड्स बनाम सिडनी सिक्सर्स ड्रीम 11 टीम, प्लेइंग 11, आज की बिग बैश लीग के फैंटेसी क्रिकेट टिप्स
REN बनाम सिक्स ड्रीम 11 भविष्यवाणी: मेलबर्न रेनेगेड्स बनाम सिडनी सिक्सर्स ड्रीम 11 टीम, प्लेइंग 11, आज की बिग बैश लीग के फैंटेसी क्रिकेट टिप्स
REN बनाम SIX ड्रीम 11 भविष्यवाणी: मेलबर्न रेनेगेड्स और सिडनी सिक्सर्स बिग बैश लीग 2022 के मैच 21 में GMHBA स्��ेडियम, साउथ जिलॉन्ग, विक्टोरिया में 01:00 PM IST पर एक-दूसरे के खिलाफ हॉर्न बजाएंगे। दोनों टीमें खुद को अंक तालिका के ऊपरी मध्य भाग में पाती हैं और शीर्ष 2 में जगह बनाने के लिए उत्सुक होंगी। आज के मैच के लिए रेन बनाम सिक्स ड्रीम11 ड्रीम11 टीम भविष्यवाणी मेलबर्न रेनेगेड्स बनाम सिडनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
studycarewithgsbrar · 2 years
Text
दिलजीत दोसांझ की 'सेक्सी एंड ही नोज़', गायक-अभिनेता की नवीनतम तस्वीर ने इंस्टाग्राम पर लगाई आग
दिलजीत दोसांझ की ‘सेक्सी एंड ही नोज़’, गायक-अभिनेता की नवीनतम तस्वीर ने इंस्टाग्राम पर लगाई आग
ट्रिब्यून वेब डेस्क चंडीगढ़, 11 सितंबर दिलजीत दोसांझ के पूरी दुनिया में फैन हैं और यह गायक-अभिनेता जो कुछ भी करते हैं वह निश्चित रूप से अपने अनुयायियों का दिल जीत लेते हैं। इस बार भी दिलजीत इंटरनेट पर आग लगाने में कामयाब रहे हैं, लेकिन यह कोई फनी वीडियो या साहसी टिप्पणी नहीं है, यहां तक ​​कि काइली जेनर के प्रति उनका जुनून भी नहीं है। दिलजीत ने इस बार एक ऐसी फोटो शेयर की है जिसे देखकर आप भी हैरत…
View On WordPress
0 notes