Tumgik
#सरकारसमोर
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
अखंडित वीज सेवेसाठी नागरिकांनी 'आर डी एस एस' योजनेचा लाभ घ्यावा - केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांचं आवाहन
नवरात्र महोत्सवात आज तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानसमोर ३६८ धावांचं आव्हान
****
कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात कंत्राटी भरतीची सुरुवात २००३ साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात सुरु झाली होती, मात्र आता हेच पक्ष कंत्राटी भरतीविरोधात आंदोलन करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. पोलिस दलात कंत्राटी भरती होणार नाही, हे आपण यापूर्वीही स्पष्ट केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलिस दलात नियमित भरती सुरु आहे, १८ हजार ३३१ पोलिस नियमित सेवेत घेतले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आपल्या शासन काळात कंत्राटी भरतीचं धोरण अवलंबून युवकांची दिशाभूल केली, या चुकीबद्दल त्यांनी युवकांची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीने केलेल्या या फसवणुकीसंदर्भात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर उद्यापासून आंदोलनाचा इशारा बावनकुळे यांनी दिला.
****
राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार घेण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दूल सत्तार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. हा जनता दरबार शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार असून शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांना सोमवार ते शुक्रवार या ठिकाणी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
****
राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस प्रोत्साहन पर अऩुदान दिलं जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणं बंधनकारक असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. नंदुरबार जिल्हातल्या नवापूर इथं आज जनरल पॉलीफिल्म या कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या प्रकल्पाचं भूमीपूजन सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी बेरोजगार तरूणांमध्ये कौशल्य विकासित करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण उद्योग विभागाकडून मोफत दिलं जाईल, असं आश्वासन देखील सामंत यांनी यावेळी दिलं.
****
साखरेच्या धर्तीवर संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निर्यात शुल्क अनुदान सवलत जाहीर करावी, तसंच निर्याती अभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करण्यात अडचणी येत असून देशांतर्गत बाजारपेठेत दर मिळत नाही. मुख्यमंत्री, संत्रा उत्पादक संघटना आणि सर्वपक्षीय नेते यांच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारसमोर हा विषय मांडून त्यावर तोडगा काढला पाहिजे, अडचणीत असलेल्या संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
****
अखंडित वीज सेवा मिळवण्यासाठी 'आर डी एस एस' - सुधारित वितरण क्षेत्र योजना उपयुक्त आहे, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी केलं आहे. या योजनेबाबतची आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली, त्यानंतर डॉ कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्याला तीन हजार ८०० कोटी रुपये निधी मिळाला असल्याची माहिती डॉ कराड यांनी दिली. या योजनेअंतर्गत विद्युत उपक्रेंद्रासाठी ६३ ठिकाणी जागा तत्परतेने उपलब्धता करून देण्यात येणार आहे. सदर जागा ज्या विभागांची आहे, त्या विभागांनी सात दिवसाच्या आत ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही डॉ कराड यांनी यंत्रणेला दिल्या.
****
नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट ग्राहकांना कांदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र विक्री केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातलं अशा प्रकारचं पहिलं कांदा विक्री केंद्र दिवाळीच्या सुमारास पुणे जिल्ह्यात सुरु होणार आहे. कांदा लिलावादरम्यान दलाल आणि व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होते; ती टाळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवात सहाव्या माळेला आज धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. भगवान विष्णू क्षीरसागरात शेष शयैवरती विश्राम घेत असताना तुळजाभवानी मातेने यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला, यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मळापासून शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यावेळी देवीने दैत्यांचा वध केला, अशी आख्यायिका आहे. या प्रसंगाचं स्मरण म्हणून, ही शेषशायी पूजा बांधण्यात येते. दरम्यान, काल रात्री देवीची मयुर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आल्याचं आमच्या वार्तहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीनं मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. नऊ वर्ष -'सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची' तसंच 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य' या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात बाल विकास प्रकल्प कार्यालय यांच्या भरड धान्य आणि पोषण आहार पाककृतीचंही सादरीकरण होत आहे. हे प��रदर्शन उद्या २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानसमोर ३६८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. बंगळुरू इथं होत असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. डेव्हीड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने नऊ बाद ३६७ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक पाच तर हरिस रऊफ याने तीन बळी घेतले.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यातलं फुलपाखरांचं गाव अशी ओळख असलेल्या पारपोली गावात आजपासून फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात झाली. संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या या फुलपाखरु महोत्सवाचं उद्घाटन सिंधुदूर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. जिल्ह्याला लाभलेली जैविविधता जपण्याचं आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केलं. या महोत्सवामुळे इथलं पर्यटन वाढेल, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
****
मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय न झाल्सास, येत्या २२ तारखेला आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं, आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं जाहीर सभेत बोलत होते. मराठा समाजाने गावागावात आरक्षणाबाबत जनजागृती करावी, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार असल्याचं, जरांगे यांनी सांगितलं.
****
लोकसेवकांनी सर्वसामान्य नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवून सेवा हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी, अशी सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केली आहे. ते आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. परभणी जिल्ह्यातील लोकसेवकांकडून नागरिकांना सेवा देण्याचं प्रमाण ९३ टक्के असून, ही स्थिती समाधानकारक असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मध्यम तसंच लघुप्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांच्या लाभधारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात शाखा कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता एम.एम.शेख यांनी केलं आहे. कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पाणीपाळी सोडण्यात येणार असल्याचं, शेख यांनी सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नक्षत्रवाडी जवळच्या गेवराई तांडा इथून मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकानं काल रात्री धाड टाकून ताब्यात घेतले. या कारवाई वेळी वाहन चालकांनी वाहन सोडून पळ काढला. खासगी चालकांच्या मदतीने सदरील वाहनं तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते काकिनाडा दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे, ही रेल्वे उद्या २१ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी नांदेडहून तर परतीच्या प्रवासात परवा २२ तारखेला रात्री नऊ वाजता काकिनाडा इथून सुटणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
१० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे नाहीतर... जरांगे पाटलांनी सरकारसमोर मांडल्या 'या' प्रमुख मागण्या
https://bharatlive.news/?p=166978 १० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे नाहीतर... जरांगे पाटलांनी ...
0 notes
darshaknews · 3 years
Text
#Ahmednagar #Congress #bb_thorat केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक : ना.बाळासाहेब थोरात
#Ahmednagar #Congress #bb_thorat केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक : ना.बाळासाहेब थोरात
राज्यात कायदा लागू न करण्याची आडते बाजार व्यापारी असोसिएशनची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी  संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, आशियातील सर्वात मोठे बाजार उघडले, कोरोनामुळे बंद
शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी, आशियातील सर्वात मोठे बाजार उघडले, कोरोनामुळे बंद
लासलगाव कांदा बाजार तुम्हाला माहित असलेच पाहिजे की कोरोनाच्या विध्वंसमुळे संपूर्ण देशात कडकपणाची साखळी सुरू आहे. कोरोनाची ढासळणारी परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढत आहे. आता कोरोना व्यतिरिक्त काळा आणि पांढरा बुरशी देखील लोकांसाठी एक मोठे आव्हान बनत आहे. अशा परिस्थितीत या महामारीच्या काळात आपली आर्थिक कामे कशी निरोगी ठेवता येतील हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. या सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Text
शिक्षक भरती पदकपात : सरकारकडे लक्ष
शिक्षक भरती पदकपात : सरकारकडे लक्ष
रत्नागिरी :तत्कालीन शासन आणि अधिकार्‍यांच्या कारभारामुळे शिक्षक भरतीतील मागासवर्गीयांच्या रिक्त पदांना भरतीवेळी ५० टक्के कात्री लावण्यात आली. केवळ ५० टक्के पदे भरण्यात आली. याविरोधात आंदोलने झाली, उपोषणे झाली, औरंगाबाद खंडपीठात सुनावणीही झाली. तरीही अन्यायाला वाचा फुटलेली नाही. याबाबत डीएड्, बीएड् धारकांनी नवीन सरकारसमोर व्यथा मांडली असून महाआघाडी शासन काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
Budget 2019: आजच्या अर्थसंकल्पात काय असतील तरतुदी ?
Budget 2019: आजच्या अर्थसंकल्पात काय असतील तरतुदी ?
सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते आजच्या बजेटकडे (Budget 2019). मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर होतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट. यावेळी अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. अर्थमंत्री अशा वेळी बजेट सादर करतायत ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही.
बजेटच्या एक दिवस आधी इकाॅनाॅमिक्स सर्वे घोषित केलाय. यात सांगण्यात आलंय…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Budget 2022: मोदी सरकारसमोर बेरोजगारीचं आव्हान; आकडेवारी काय सांगतीये?
Budget 2022: मोदी सरकारसमोर बेरोजगारीचं आव्हान; आकडेवारी काय सांगतीये?
Budget 2022: मोदी सरकारसमोर बेरोजगारीचं आव्हान; आकडेवारी काय सांगतीये? करोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांना करोनाचा कमीत कमी फटका बसला असून त्यांच्या उत्पन स्त्रोतावर फारसा परिणाम झाला नाही. तर दुसरीकडे गरीब आणि खासकरुन स्थलांतरित कामगारांना मात्र लॉकडाउनच्या छळा सहन कराव्या लागल्या. करोना संकटानंतर २०२२ मध्ये दुसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे…
View On WordPress
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
5 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yy88vdby चालू घडामोडी (5 जून 2019) भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणार : चालू वर्षात भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तर सध्या भारत सहाव्या स्थानावर असून ब्रिटन जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु भारत ब्रिटला मागे टाकणार असून पाचव्या स्थानावर झेप घेईल. तसेच 2025 सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 2019 मध्ये भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि देशाचा जीडीपी three लाख कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होणार असल्याचे ‘आयएचएसच्या मार्किट’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंकमध्ये भारत पुढे जाणार असून जागतिक जीडीपीच्या वृद्धीतही भारताचे योगदान वाढेल. तसेच भारत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील एक प्रमुख इंजिन बनेल. आशियाई क्षेत्रातील व्यापार आणिगुंतवणुकीच्या प्रवाहातही भारताचे अमूल्य योगदान असेल, असेही अहलवालात सांगण्यात आले आहे. सध्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 18 टक्के असून 25 टक्क्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यमान सरकारसमोर उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगार वाढवण्याचे आव्हान असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण : ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं.संरक्षण संशोधन व विकास संस्थे(डीआरडीओ)च्या सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलचं परीक्षण आईटीआरमध्ये करण्यात आलं आहे. तर ही जगातील सर्वात व��गवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. जिची मारक क्षमता जबरदस्त आहे. ब्रह्मोस मिसाइलचा जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करू शकतो. या मिसाइलची मारक क्षमता 290 किलोमीटरच्या जवळपास आहे. भारताच्या कूटनीतीसाठी शस्त्रास्त्रं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही मिसाइल निर्णायक ठरत आहे. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या 7 ते 10 वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक 7’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक 2.8’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले होते. तर आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे. अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर कामकरीत आहे. भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे. यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता 450 किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक 7) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता 700 किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सीईटीत विनायक गोडबोले, आदर्श अभंगे राज्यात प्रथम : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत खुल्या गटातून सोलापूरचा विनायक गोडबोले (पीसीबी 100 पर्सेंटाइल), तर नांदेडचाआदर्श अभंगे (पीसीएम 100 पर्सेंटाइल) हा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला. पीसीएम विषयांत खुल्या गटातून मुलांमध्ये धुळ्याचा अमन पाटील, तर मुलींमध्ये रत्नागिरीची मुग्धा पोखरणकर प्रथम आली. राखीव संवर्गातून मुलींमध्ये बीडची गीतांजली वारंगुळे हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. पीसीबी विषयांत खुल्या गटात मुलींमध्ये नांदेडची ऋचा पालक्रीतवार प्रथम आली. याच विषयांत राखीव संवर्गातून प्रथम येण्याचा मान नाशिकच्या अभिषेक घोलप याने मिळविला. पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा : पालघर पोलीस दलाच्या मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रितेश दिनेश प्रजापती यांनी 17 व्या टेनशिप कप इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून four सुवर्ण पदके पटकावली आहेत. तर ही स्पर्धा श्रीलंका देशात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. फस्ट मेन ओपन काता, फस्ट मेन ओपन कृमितो, फस्ट मेन ओपन टीम काता, फस्ट मेन ओपन टीम कृमितो या स्पर्धा प्रकरात पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी four सुवर्ण पदके पटकावले. तसेच या उत्तम कामगिरीबद्दल पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. दिनविशेष : 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म 5 जून 1908 रोजी झाला. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ 5 जून 1980 रोजी टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25  December 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा. **** नागरी सेवा परिक्षेत सहभागी होण्यासाठी वयासंबंधीच्या निकषात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. सामान्य श्रेणी उमेदवारांसाठी नागरी सेवा परिक्षेला बसण्यासाठीची वयोमर्यादा २०२२ - २३ पर्यंत २७ वर्ष केली जाणार असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. नागरी परिक्षेत सामान्य श्रेणी उमेदवारांसाठीची वयोमर्यादा ३२ वर्ष आणि अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उमेदवारांसाठी ३७ वर्ष इतकी आहे. **** माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज देशभरात सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला सुशासन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्याचं महत्व हा दिवस विषद करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येक धोरण आणि कार्यक्रम राबवताना नागरिकांच्या कल्याणाचा विचार झाला पाहिजे, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. **** ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक आणि राष्ट्र निर्माते मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवीय यांना अभिवादन केलं आहे. मालवीय यांनी स्वातंत्र्य आंदोलन आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. **** देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीसंदर्भात आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं, सिंचनासारख्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदीतलं सहकार्य वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हाच उपाय असल्याचं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार आर्थिक तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास व्यक्त करत, महसूल प्राप्तीच्या दृष्टीनं वाहन, दूरसंचार, बांधकाम आणि हवाई वाहतूक क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विक्री कराच्या अनुषंगानं लक्ष ठेवण्यात आलं आहे असं जेटली यांनी सांगितलं. **** सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असून विविध देशांमधून भारतात आलेल्या लोकांनी तो स्वीकारला, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं गुप्तचर विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. देश सुरक्षित करण्यासाठी गुप्तचर विभाग गाजावाजा न करता अथक प्रयत्न करत असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. चौकशी टाळण्यासाठी निर्णयच न घेण्याची प्रवृत्ती नोकरशहांमधे बळावली आहे, याबाबत नाराजी व्यक्त करुन, पारदर्शकता महत्त्वाची आहे, पण त्याच बरोबर कालबद्ध निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीही आवश्यक आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले. **** समाज माध्यमं आणि ऑनलाईन माध्यमांचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारनं माहिती आणि तंत्रज्ञानविषयक नियमावलीत बदल प्रस्तावित केले आहेत. सरकारनं मागणी केल्यास माहितीचा स्रोत उघड करणं समाज माध्यमं तसंच ऑनलाईन माध्यमांना बंधनकारक असेल. कोणत्याही संदेशाचं मूळ जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार सरकारला असेल. समाज माध्यमांनी बेकायदेशीर माहिती वा संदेश ओळखून ते समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्याचं तंत्रज्ञान विकसित करणं आवश्यक आहे, असंही या सुधारित प्रस्तावात म्हटलं आहे. **** वीज वापराची मोजणी करणारी मापनयंत्रं म्हणजेच वीजमीटर आता प्रिपेड करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पुढील वर्षाच्या एक एप्रिलपासून तीन वर्षात स्मार्ट प्रीपेड वीजमापकं उपयोगात आणायचा सरकारचा विचार आहे. यामुळे वितरण आणि वापरामधलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल, आणि ऊर्जा बचत होईल. ग्राहकांना पूर्ण महिन्याचं देयक भरण्याऐवजी वापराएवढं देयक भरण्याची सुविधा या स्मार्ट प्रीपेड वीजमापकांमुळे उपलब्ध होईल, तसंच या मापकांच्या निर्मितीमुळे उद्योगक्षेत्रात रोजगार निर्माण होतील. **** यवतमाळ जिल्ह्यात ट्रक आणि जीपच्या अपघातात नऊ जण ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. अपघातग्रस्त जीपमध्ये पारडी गावातील रहिवासी होते. जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. **** हैदराबाद इथं प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत आज चौथ्या दिवशी हैदराबाद हंटर्स आणि चेन्नई स्म���शर्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल. ***** ***
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
सरकारने नव्हे, न्यायालयाने न्याय दिला!
सरकारने नव्हे, न्यायालयाने न्याय दिला!
मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यांवरून सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2KSpw5y
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरक��रसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एकनाथ शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, राहुल नार्वेकरांनी नरहारी झिरवळांचा निर्णय फिरवला
एकनाथ शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, राहुल नार्वेकरांनी नरहारी झिरवळांचा निर्णय फिरवला
एकनाथ शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, राहुल नार्वेकरांनी नरहारी झिरवळांचा निर्णय फिरवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता बहुमत चाचणीचं आव्हान आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी 7 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता बहुमत चाचणीचं आव्हान आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी 7 आमदार अनुपस्थित होते. यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे लक्ष्मण जगताप…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नागपूर : शिवसेनेचे बंडखोर यशस्वी होणार नाही ; यशोमती ठाकूर
नागपूर : शिवसेनेचे बंडखोर यशस्वी होणार नाही ; यशोमती ठाकूर
नागपूर : शिवसेनेचे बंडखोर यशस्वी होणार नाही ; यशोमती ठाकूर शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकट निर्माण झाले असले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकट निर्माण झाले असले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. ही घटनात्मक लढाई असल्यामुळे त्यात शिवसेनेचे बंडखोर यशस्वी होणार नाहीत, असे मत राज्याच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक' : एमआयएम
‘तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक’ : एमआयएम
‘तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक’ : एमआयएम गेले दोन दिवस सरकारसमोर राजकीय संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना एकामागोमाग एक आमदार जाऊन मिळू लागल्यावर हे संकट अधिकच गहिरे होत गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाइव्हमधून संवाद साधत बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन चर्चा करण्याचा सल्ला दिला.   गेले दोन दिवस सरकारसमोर राजकीय संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना एकामागोमाग…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
वीज प्रश्नावरून आघाडी सरकारसमोर पेच
वीज प्रश्नावरून आघाडी सरकारसमोर पेच
वीज प्रश्नावरून आघाडी सरकारसमोर पेच मित्रपक्षाकडूनच कोंडी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन दयानंद लिपारे, लोकसत्ता  कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल सवलत योजनेला ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला मित्रपक्षांनी वीज प्रश्नावरून आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरू केले…
View On WordPress
0 notes