Tumgik
#उगवण
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत, पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत 
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत, नवी मुंबईतले चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हणत न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असं त्या म्हणाल्या.
****
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून, दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल. आणि नुकसान झाल्यास, पात्रतेनुसार भरपाई दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले.
****
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल, घरांच्या पुर्नविकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली.
****
स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या.
जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने, धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश, हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. आठ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान, काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान' यात्रा येत्या आठ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून, हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समिती इथं आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, 'माझं लातूर, हरित लातूर' अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५१ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
दूध भेसळखोरांविरोधात विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातल्या दूध देणार्या जनावरांचा, किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरुन भेसळखोरांवर आळा बसेल, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून एक तास शहरासाठी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठण गेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना तसंच स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा हजार विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत.
****
भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासाठी यवतमाळ इथले डॉ. अशोक राणा यांना प्रदान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुतमाई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंजकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २१ वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १११ प्रगणक आणि २६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातले शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
kvksagroli · 4 months
Text
Tumblr media Tumblr media
पेरणीपूर्व बीजप्रक्रिया अत्यंत महत्वाची - डॉ. कृष्णा अंभुरे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी पेरणीपूर्व जमीन मशागत, बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया, बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा, बियाणे उगवण क्षमता ���पासणी तसेच हुमणी अळी व शंखी गोगलगाय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंडळ कृषी अधिकारी एन.एस. कुरुंद यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमाला कृषी सहाय्यक सावळे उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मारोती वड्डे यांनी परिश्रम घेतले. #agriculture #KrishiVigyanKendra #पेरणीपूर्व #बीजप्रक्रिया #खरीप #शेतकरी #प्रशिक्षण #हंगाम #बियाणे
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
जिल्हाधिकारी भर पावसात शेत-शिवारात
Tumblr media
उदगीर : तालुक्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी उदगीर तालुक्यातील मागील २ ते ३ दिवसांपासून सतत सुरू असणा-या पावसामुळे सद्यस्थितीत पिकांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी विविध गावातील शेतशिवारात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित शेतक-यांशी चर्चा केली. मादलापुर येथील नागेश गुरुनाथ आंबेगावे यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश सुळे, उदगीर तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळधिकारी शंकर जाधव, तलाठी देव प्रिय पवार कोतवाल ंिज्ांकलवाड, मंडळ कृषी अधिकारी देवनाळे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांंनी सोयाबीन उगवण संदर्भातील तक्रारी, कीड रोग उपाय योजना, गोगलगायीमुळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र व त्यासंदर्भातील केलेल्या उपाययोजना , फळबाग लागवड , बांबू लागवड इत्यादी विषयी आढावा घेऊन कृषी विभागास सूचना कृषी विभागास दिल्या. Read the full article
0 notes
kokannow · 2 years
Text
सावंतवाडीत कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बीज प्रक्रिया मार्गदर्शन
सावंतवाडीत कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बीज प्रक्रिया मार्गदर्शन
बियाणे हा शेतीमधील अत्यंत महत्वाचा घटक असल्याने महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संपूर्ण राज्यात बीजप्रक्रिया अभियान कृषि विभाग राबविले जात आहे. सावंतवाडी तालुक्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत १२० प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून २२५० शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करावी याबाबत प्रात्याक्षिकासहीत मार्गदर्शन करण्यात आले.बियाणेची उगवण चांगली व्हावी, पिकांचे किडी व रोगांपासून संरक्षण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
आंतरमशागत, पिकाला द्या भर...
आंतरमशागत, पिकाला द्या भर…
सध्याच्या काळात आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी, वर खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. नांग्या भरणे पेरणीनंतर बऱ्याच वेळा उगवण नीट न झाल्यामुळे वाफ्यात, साऱ्यात रिकाम्या जागा दिसतात, अशा वेळी टोकण पद्धतीने किंवा रोपांची लागवड करावी. साधारणतः पेरणीनंतर ८-१० दिवसांत नांग्या भराव्यात. जेणेकरून आधीच्या आणि नंतर लावलेल्या पिकांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
agrojayyworld · 4 years
Photo
Tumblr media
अशी तपास बियाण्याची उगवणक्षमता
बीजोत्पादित केलेल्या बियाणांची उगवण क्षमता प्रमाणाकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणाकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेचे पेरणीसाठी वापरावे.
0 notes
indianrootz · 4 years
Text
ऊस पिकासाठी या महिन्यात करायच्या कामांचे नियोजन
सुरू ऊसासाठी रासायनिक खताचा तिसरा हप्ता हेक्टरी २५ किलो नत्र (५५ किलो युरिया) देऊन बाळबांधणी करावी.
ऊस पिकाला ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
शक्य असल्यास ऊसाच्या पाचटाच्या आच्छादनाचा
वापर करा, पाणी कमी असल्यास ऊसाला एक सरी आड पाणी द्यावे.
खोडकिड या किडीचा फार प्रादर्भाव झाल्यास शेतात उगवण विरळ दिसते. अशावेळी एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाण राखण्यासाठी लागणीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?
Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?
Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला? गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. नांदेड : पावसाने ओढ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Kharif Season : शेतकऱ्यांचा सोयाबीनवर भर, पाण्यातले सोयाबीन बहरणार कसे? कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला..!
Kharif Season : शेतकऱ्यांचा सोयाबीनवर भर, पाण्यातले सोयाबीन बहरणार कसे? कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला..!
Kharif Season : शेतकऱ्यांचा सोयाबीनवर भर, पाण्यातले सोयाबीन बहरणार कसे? कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला..! गेल्या 10 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. खरिपातील पिके ही पावसाळ्यातली असली तरी उगवण होताच पिके पाण्यात गेल्याने नुकसान अटळ आहे. बुधवारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?
Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?
Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती? खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडत आहेत तर पिकांची वाढही खुंटत आहे. पिकांची उगवण होताच मुसळधार पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने पाणी साचून राहिलेले आहे. निचरा होणाऱ्या जमिनीतील पिके ही सुस्थितीमध्ये आहेत. मात्र, अशाच प्रकारे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Kharif Season : पेरणी होताच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांजवळच रामबाण उपाय पण ऐकतो कोण?
Kharif Season : पेरणी होताच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांजवळच रामबाण उपाय पण ऐकतो कोण?
Kharif Season : पेरणी होताच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांजवळच रामबाण उपाय पण ऐकतो कोण? खरिपातील पेरण्यांना वेग येत असतानाच बाजारपेठेत महाबीजच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानदार हेच बियाणे तयार करीत आहेत. शिवाय त्याची उगवण क्षमता आणि इतर प्रक्रिया न करताच शेतकऱ्यांना ते विक्री करीत आहेत.त्यामुळे सध्या कधी नाव न ऐकलेले बियाणे देखील बाजारपेठेत पाहवयास मिळत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Kharif : वाह रे बहाद्दर..! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे, काय आहे अनोखा उपक्रम?
Kharif : वाह रे बहाद्दर..! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे, काय आहे अनोखा उपक्रम?
Kharif : वाह रे बहाद्दर..! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे, काय आहे अनोखा उपक्रम? सबंध मृग नक्षत्र हे कोरडे गेले होते. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ तर दिली होतीच पण अल्पशा पावसावर जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ही ठेवलीच होती. पेरणीनंतरही पाऊस हा गायब आहे. जमिनीतील ओलीमुळे पिकांची उगवण तर झाली पण वाढ खुंटली अहे. तर काही ठिकाणी अधिकच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते. नांदेड :…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, जनता दल संयुक्त पक्षानं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. जनता दल संयुक्त, द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचं स्वागत करत असल्याचं, या पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. लोक जनशक्ति पक्षाच्या - रामविलास गटानेही मुर्मू यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. राष्ट्रीय जनता दलानं मात्र विरोधी पक्षाचे उमेद्वार यशवंत सिंह यांचं समर्थन केलं आहे.
****
राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, असा खुलासा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असं ते म्हणाले. शिवसेनेतल्या बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील म्हणाले.
****
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाईदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची नोंदणी प्रक्रिया आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ वायु डॉट सी डी ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही प्रक्रिया या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया एक जुलैपासून सुरू होणार आहेत.
****
खेळाडुंची विविध स्पर्धांमधली कामगिरी कशी उंचावेल, क्रीडा सुविधांचा विस्तार कसा करता येईल, पहिल्या दहा अग्रणी देशांमध्ये स्थान पटकावेल, जास्तीत जास्त पदके पटकावेल, यासाठी सर्व राज्यं एकत्र येऊन एक राष्ट्रीय रोडमॅप तयार करतील, असं केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या केवाडिया इथं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज अनुराग ठाकुर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, ट्रायबल गेम्स अशा स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्यास खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळेल, खेळाडूंसाठी सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती या विषयांवर राज्यांसोबत या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याचं ठाकुर यांनी सांगितलं.
****
ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन या विभागाचं नाव बदलून, आता सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन असं करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं २१ जून रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार मुख्यालय पातळीवर आता हा विभाग सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन या नावाने ओळखला जाईल.
****
राज्यातल्या १४ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधल्या तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमात, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी, विशेष तुकडी सुरु करण्यात येणार आहे. या तुकडीमध्ये ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, प्रवेशासाठी ३० जून पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आलं आहे. हिंगोली, जालना, अंबड, लातूर, नांदेडसह आठ शहरांमधल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि मुंबईतल्या शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था इथं या तुकड्या सुरु होत आहेत. या विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी एक हजार १५५ जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना निय��ित विद्यार्थी म्हणूनही वार्षिक सात हजार ७५० रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाचा मार्ग उपलब्ध आहे.
****
शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं पेरणी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी, असं आवाहन, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केलं आहे. प्रति हेक्टरी बियाणं दर ७५ किलोवरुन ५० ते ५५ किलोवर आणावं. यासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचं बियाणं पेरणीसाठी वापरण्यात यावं, असंही मोटे यांनी सांगितलं.
****
डब्लिन इथं सुरू असलेल्या युनिफार कनिष्ठ पाच देशांच्या हॉकी मालिकेत काल भारतीय महिला संघानं अमेरिकेच्या संघावर चार - एक असा विजय मिळवला. भारताकडून अन्नूने दोन तर निकिता टप्पो आणि वैष्णवी फाळके यांनी प्रत्येकी एक गोल केला.
****
फ्रान्स इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य फेरीत भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भाकत आणि सिमरनजीत कौर यांच्या संघानं तुर्की संघाचा पाच - तीन असा पराभव केला.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
वेलवर्गीय पिकासाठी मंडप उभारणी
वेलवर्गीय पिकासाठी मंडप उभारणी
 मंडपामध्ये वेली ६ त��� ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात. मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes