Tumgik
#सोडलं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड
इशान किशनने क्रिकेटसाठी १२व्या वर्षी सोडलं घर, मोठ्या भावाच्या जागी झाली होती निवड इशान किशनने India vs Bangladesh सामन्यात १३१ चेंडूमध्ये २१० धावा केल्या. त्याने यावेळी तब्बल २४ चौकार आणि १० सहा षटकार मारले. किशनने १६०.३१ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. एकदिवसीय सामन्यात द्विशतक पूर्ण करणारा इशान चौथा फलंदाज ठरला आहे. सर्वात आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने केला होता. त्याने दक्षिण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 September - 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आगमन झालं. आज कोल्हापूर जिल्ह्यात इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. कोल्हापूर इथं वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहतील. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहतील. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.  उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करतील.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार आजही सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
**
बीड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मांजरा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के इतका झाल्याचं वृत्त आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरीकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, तेव्हा ते बोलत होते, शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यामध्ये ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दहा तालुक्यातल्या ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
**
जालना जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू असून, या पावसामुळे खरीप पिकांचं पंचेचाळीस पूर्णांक वीस टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
**
परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्यामुळे जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून, परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातल्या दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनांनी केलं आहे.
**
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते पंधरा गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून, त्यामुळे काही मजूर अडकले आहेत. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
**
नांदेड इथल्या विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. या धरणाच्या १२ दरवाजातून सध्या १ लाख ६९ हजार ८३ घन��ूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पूजन करून त्यांना कृतज्ञतापूर्वक पुरणपोळीचा घास भरवला जातो. सायंकाळी बैलांची मिरवणूक काढण्याचाही प्रघात आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याला, पुण्याच्या वेस्ट इंडियन शुगर मीलस् असोसिएशनचा ‘‘संशोधन, विकास आणि नाविण्यपूर्ण उपक्रम’’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय नव आणि अपारंपारिक उर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगिता कस्तुरे यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
पॅरिस पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू थुलासिमथी मुरुगेसन हिनं महिलांच्या एसयू पाच बॅडमिंटन प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत तिची लढत चीनच्या यँग क्युझियाशी होईल. दुसरीकडे, उपान्त्य फेरीतल्या पराभवानंतर मनिषा रामदास कांस्य पदकासाठी डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेनग्रीनशी लढत देईल.
तीरंदाजीमध्ये राकेश कुमार याचं कांस्य पदक केवळ एका गुणानं हुकलं. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या हे झिहाओनं त्याचा १४७-१४६ असा पराभव केला.
****
0 notes
vishnulonare · 5 months
Text
श्राद्ध करून गती करायला गेले, अन् कावळा बनवून सोडलं. | Sant Rampal Ji Ma...
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: श्राद्ध करुन गती करायला गेले, अन कावळा बनवून सोडलं | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Pradip आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...
तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...
''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''
Pradip नं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला..
😏😏😏😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 1 year
Text
Bandya आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...
तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...
''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''
Bandya नं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला..
😏😏😏😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
Text
कहर चोरीचा
रातच्यांन आले चोरकेला त्यायान कहर ।आले चोरी कराले नगेले पिऊन जहर । कपाशीवर मारालेऔषिध होत ठीउन ।काय झालं कोणास ठावथेच घेतल पिऊन । चढली असन गुंगीरायले जागीच निजून ।धरले लोकायन मंगकहाडले चांगले शिजून । जन्मभर इसरणार नाहीलयच त्यायले झोडल ।म्हणते नाव चोरीच होशपथ घेऊन सोडलं ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
nbi22news · 2 years
Video
youtube
#nbinewsmarathi: 'हिंदुत्वाला सोडलं नाही' उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि व...
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
“मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही”; उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात विरोधकांना सुनावलं
मुंबईः शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागला. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वया��ी सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
nandedlive · 2 years
Text
"...तर मोदींना मारायला तयार राहा"
Tumblr media
नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पटेरिया एका सभेत बोलताना म्हणाले आहेत की, मोदी धर्म, जात, भाषा या आधारावर जनतेत फूट पाडतील. अल्पसंख्याक,दलित, आदिवासी यांचं पुढील जीवन धोक्यात आलं आहे. संविधान वाचवायचं असेल तर मोदींना मारायला तयार राहा. पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर भाजप(BJP) नेते संतप्त झाले आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तरम मिश्रा यांनी पटेरियांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पटेरिया यांच्या या वक्तव्याला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चौहान म्हणाले आहेत की, भारत जोडा यात्रा करणारे देश तोडण्याची कामं करीत आहेत. असं वक्तव्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही,असा इशाराही यावेळी सिंह यांनी दिला. पटेरिया यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले आहेत की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मांडण्यात आला आहे. मोदींना मारणे म्हणजे निवडणुकीत त्यांना हरवणं, असं मला म्हणायचं होतं. दरम्यान, पवईत काॅंग्रेस नेत्यांना संबोधित करताना पटेरिया यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य रेकाॅर्ड झालेला पटेरिया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मनोज जरांगे म्हणतात, 'आरक्षण मिळेपर्य़ंत पाणी सोडलं, आता पुढच्या प्रकाराची जबाबदारी सरकारवर'
https://bharatlive.news/?p=185008 मनोज जरांगे म्हणतात, 'आरक्षण मिळेपर्य़ंत पाणी सोडलं, आता पुढच्या प्रकाराची ...
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते १५ गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, मजूर अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावात तहसीलदार जीवक कांबळे यांनी पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक लवकरच या लोकांची सुटका करतील, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या विविध प्रकल्प क्षेत्रातपाऊस सुरू असल्यानं विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परभणी जिल्ह्यात दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे विष्णुपरी धरणाचे ११ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून, एक लाख ४६ हजार ४४७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
परभणी जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलू गावात वैद्यकीय पथकांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज कोल्हापूर मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
ऑगस्ट महिन्यात एक लाख ७५ हजार कोटी रूपये, वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे. हे संकलन गेल्यावर्षीच्या तुलनेत, १० टक्क्यानं अधिक आहे. गेल्यावर्षी या काळा दरम्यान, १ लाख ५९ हजार कोटी रूपये जीएसटी संकलनं झालं होतं. ऑगस्ट महिन्यात ३९ हजार केंद्रीय जीएसटी संकलन झालं तर, एसजीएसटी म्हणजेच, राज्य जीएसटी संकलन, ३८ हजार ४०० कोटी इतकं झालं.
****
नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.
****
समतोल आणि पोषक आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. केंद्र शासनानं देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पोषणविषयक नवोन्मेष आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या केंद्राचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल गडचिरोली इथं झालं. या केंद्राच्या माध्यमातून गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांचं आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात गडचिरोली जिल्हा राज्यात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथ���ानं मुळशी तालुक्यात केलेल्या कारवाईत परदेशी मद्यासह एकूण ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथदेणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.
****
भारतीय खेल प्राधिकरण - साई आणि खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशन यांच्यावतीने ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या वुमन्स लीग ज्युदो स्पर्धेचं उद्घाटन काल नाशिक इथं केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. अशा स्पर्धांमुळे युवतींना प्रोत्साहन मिळून त्यांचं सबलीकरण होण्यासही मदत मिळत असल्याचं, खडसे यावेळी म्हणाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह सात राज्यातले ८९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील येरवडा भागातील एक महिला राहत्या घरातून रात्री दीड वाजता निघून गेली होती त्यानंतर येरवडा परिसरात तिला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र अखेर तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी अखेर तपास तडीला नेला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश संतोष हाडवडे ( वय पंचेचाळीस मुळगाव नांदेड ) याला बेड्या ठोकलेल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गीता राजेश कुंभार ( वय 46…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Bandya : काल मी एक रॉकेट सोडलं, सरळ जाऊन सूर्यावर आदळलं.
Pradip : काय सांगतोस काय! मग काय झालं?
Bandya : मग काय होणार? मी मार खाल्ला!
Pradip : कोणी मारलं?
Bandya : सूर्याच्या आईनं!
😃😃😃😉😉😉🥳🥳🥳🤗🤗🤗
0 notes
bandya-mama · 1 year
Text
Bandya : काल मी एक रॉकेट सोडलं, सरळ जाऊन सूर्यावर आदळलं.
Pradip : काय सांगतोस काय! मग काय झालं?
Bandya : मग काय होणार? मी मार खाल्ला!
Pradip : कोणी मारलं?
Bandya : सूर्याच्या आईनं!
😃😃😃😉😉😉🥳🥳🥳🤗🤗🤗
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
पुण्यात खळबळ..मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने रात्री दीडला महिलेने घर सोडलं मात्र..
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील येरवडा भागातील एक महिला राहत्या घरातून रात्री दीड वाजता निघून गेली होती त्यानंतर येरवडा परिसरात तिला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र अखेर तिचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी अखेर तपास तडीला नेला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश संतोष हाडवडे ( वय पंचेचाळीस मुळगाव नांदेड ) याला बेड्या ठोकलेल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गीता राजेश कुंभार ( वय 46…
Tumblr media
View On WordPress
0 notes