Tumgik
#स्पेनचा
Text
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन.. दोहा :– फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील महत्वाच्या लढतीत बलाढ्य स्पेनला जपानकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अर्थात विजयी जपानसह पराभूत झालेल्या स्पेननेही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात स्पेन सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा केली जात होती मात्र, जपानने सगळ्यांचे आराखडे खोटे ठरवले व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
जलमार्गांच्या विकासामुळे वाहतुक, व्यापार आणि पर्यटनाला चालना-पंतप्रधानांना विश्वास; गंगाविलास नौका ५१ दिवसांच्या प्रवासावर रवाना
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३१ जानेवारीपासून प्रारंभ
महापारेषणच्या अभियंत्याला मारहाण प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्ष कारावास
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आज भोगी हा दिवस “पौष्टिक तृणधान्य दिन”म्हणून साजरा करावा-कृषी विभागाचं आवाहन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात
आणि
हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनचा दोन-शून्य असा पराभव करत भारताची विजयी सलामी
****
जलमार्गांच्या विकासामुळे वाहतुक, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. वाराणसी इथं जगात नदीतून सर्वात लांबीचा प्रवास करणाऱ्या एम व्ही गंगाविलास या आलिशान नौकेला पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही नौका ५१ दिवसांच्या प्रवासात भारत आणि बांग्लादेशच्या २७ नद्यांच्या पात्रातून तीन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासाअंतर्गत ही नौका ५० पर्यटन स्थळांना भेट देणार असून, या माध्यमातून पर्यटकांना कला, संस्कृती, धर्म, पर्यावरण, नद्या आणि समृद्ध खाद्यपदार्थांची ओळख करून घेण्याची संधी मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. क्रूझ पर्यटनाचा हा नवीन टप्पा या क्षेत्रातल्या तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या नवीन संधी देईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील करण्यात आली.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३१ जानेवारीला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिल पर्यंत दोन टप्प्यात चालणार असून पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल तर दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार आहे. १४ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान अधिवेशनाला सुटी राहणार असल्याचं, संसदीय कामकाजमंत्री प��रल्हाद जोशी यांनी सांगितलं. या काळात संसदेच्या स्थायी समित्यांकडून अनुदान मागण्यांची तपासणी तसंच विविध विभागांशी संबंधित अहवाल तयार केले जातात.
****
महाविकास आघाडीतील तीन पक्ष विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकत्र राहू शकले नाहीत, त्यांच्या ऐक्याच्या गर्जना पोकळ होत्या, हेच यावरून दिसून येतं, अशी टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही टीका केली. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडे उमेदवारच नाही, तर अमरावती पदवीधर मतदारसंघातून लढण्याआधीच काँग्रेसने माघार घेतली आहे. नागपूरमध्ये तीनही पक्षांचे उमेदवार उभे करून महाविकास आघाडीने स्वतःच तिघाडीचा गाशा गुंडाळला, अशी टीका उपाध्ये यांनी केली.
दरम्यान, नाशिक मतदार संघात बंडखोरांना पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षाने दिलेली उमेदवारी डावलून आपले पुत्र सत्यजीत तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, त्या पार्श्वभूमीवर पटोल बोलत होते. ते म्हणाले...
‘‘या सर्व घडामोडींवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. त्याच्यावर हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील, त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे तुम्हाला यानिमित्तानं याठिकाणी स्पष्ट करतो.’’
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निरीक्षक म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत चन्ने यांचं निवासस्थान तसंच संपर्क कार्यालय औरंगाबाद इथल्या शासकीय सुभेदारी विश्रामगृहात असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महापारेषण वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचं काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना केदार यांनी मारहाण केली होती. नागपूर इथल्या केळवद पोलीस स्थानकात केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
****
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी, ‘ऑनलाइन सुरक्षित राहा ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. विद्यार्थी आणि तरुणांसह विविध वयोगटांमध्ये समाजमाध्यमे, डिजिटल आर्थिक व्यवहार आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
****
राज्यात आजपासून २८ जानेवारी या कालावधीत, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. राज्य मराठी भाषा विभागानं एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यानिमित्त मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम या पंधरवड्यात आयोजित करण्याच्या सूचना भाषा विभागानं सर्व कार्यालयांना दिल्या आहेत. २१ आणि २२ जानेवारीला नवी मुंबईतल्या महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
दरम्यान, यानिमित्तानं नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं, ट्विटर मोहिम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानं, ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
****
कोल्हापूर हे विमानसेवेने देशातल्या प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. काल कोल्हापूर - बेंगळूरु विमानसेवेला शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पहिला बोर्डिंग पास जारी करून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आतापर्यंत २५५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, यापुढेही विमानतळ विकासाला प्राधान्य देण्यात येईल असं शिंदे यांनी सांगितलं.
****
मकर संक्रांतीचा सण देशाच्या विविध भागात, साजरा होत आहे. लोहरी, माघा बिहू, पोंगल, उत्तरायण, पौष पर्व आणि इतर सणांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ��पराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या विविधतेतून एकतेचं प्रतिक आहेत, या सणांमुळे भारताची संस्कृती टिकून आहे. असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आज भोगी हा दिवस साजरा होत आहे. हा दिवस राज्यात “पौष्टिक तृणधान्य दिन”म्हणून साजरा करावा, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्र, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचं लागवड तंत्रज्ञान, यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
तृणधान्य दिनानिमित्त पुण्यात काल बाजरीच्या विविध पाककृतींची स्पर्धा घेण्यात आली. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेचं तसंच त्याअनुषंगाने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात बाजरीपासून तयार केलेल्या लाडू, शिरा, बर्फी, वड्या, आदी ७५ प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ईश्वर नंदपूरे यांचं ‘नामविस्तार एक दृष्टिकोन’ या विषयावर विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी साडे दहा वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन सभा, भीमगीत गायन आदी कार्यक्रम होणार आहेत.
वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आंतर महाविद्यालयीन भीमगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत मिलिंद चौक ते मकाई गेट हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी नऊ जणांची नियुक्ती केली आहे. यामध्ये औरंगाबाद इथले अरविंद केंद्रे, अरविंद नरोडे, केदार रहाणे आणि मनोज शेवाळे, बीडचे अजय धोंडे आणि डॉ.विवेक पालवणकर, जालन्याचे चत्रभुज गोडबोले आणि रवींद्र ससमकर तर उस्मानाबाद इथले देविदास पाठक यांचा समावेश आहे. औरंगाबाद इथल्या मनपाच्या माजी आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर आणि ’डीआरडीओ’चे माजी संचालक काशिनाथ देवधर यांची यापूर्वीच व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात सिन्नर-शिर्डी महामार्गावर काल सकाळी झालेल्या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान न���ेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काल सकाळी खासगी आराम बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला, तर ३४ जण जखमी झाले. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटली आहे.
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत सोलापूर हद्दीतल्या नऊ गावांतील सत्तावीस किलोमीटर रेल्वेमार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ४५२ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. ८४ किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
****
ओडिशामधल्या राऊरकेला इथं सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा दोन - शून्य असा पराभव केला. अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले. भारताचा दुसरा सामना उद्या १५ जानेवारीला इंग्लंडशी होणार आहे.
काल झालेल्या अन्य सामन्यात अर्जेंटीनानं दक्षिण आफ्रिकेचा एक - शून्य असा, तर ऑस्ट्रेलियानं फ्रान्सचा आठ- शून्य असा पराभव केला.
****
पुणे इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी आणि माती दोन्ही गटाचे अंतिम सामने आज होणार आहेत. माती गटातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी, तर गादी गटातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातून नद्यांचं पुनरुज्जीवन करावं, असं जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं चला जाणूया नदीला आणि नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादच्या खाम नदीचं आणि अकोल्यातील मोरणा नदीचं पुनरुज्जीवन केल्याबद्दल, सिंह यांनी, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. या उपक्रमाचा आदर्श राज्यासह देशातल्या इतर राज्यांनी घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबाद शहरात काल आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात एमपीएसीचे परीक्षार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी काल आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही, तोवर आंदोलन थांबवणार नसल्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला.
****
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात भोईटी गावात एका चारचाकी मधून बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल घेवून जाणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी काल अटक केली. या कारवाईदरम्यान, पोलिसांना चारचाकीत ३ गावठी पिस्तुल, दोन मॅगझीन आणि ६ जिवंत काडतुसं आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत एकुण ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, सहा जणांना अटक केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात प्रत्येक गावात पीकपेरा नोंदणीसाठी आज विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावातल्या किमान २०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक गावासाठी २० स्वयंसेवकांच्या माध्यमातून पीकपेरा नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, सदर मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथं काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. पिक विम्याचा परतावा मिळत नसल्यानं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या लोम्बार्ड कंपनीचं कार्यालयाची नासधूस केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणीच्या परभणी केंद्राच्या संयुक्त विद्यमानं, ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे. १५ ते २१ जानेवारी या कालावधीत सादर होणाऱ्या या कार्यक्रमात, परभणी जिल्ह्याने मुक्ती संग्रामात दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावरून सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या वर्षातल्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये १५ मार्च रोजी संत एकनाथ महाराज कालाष्टमीनिमित्त, २२ सप्टेंबरला खुलताबादच्या जर जरी बक्ष ऊर्सनिमित्त, तसंच १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त सुटी देण्यात आली आहे. न्यायालय, केंद्र प्रशासन तसंच बँक व्यवस्थापनांर्गत असलेल्या कार्यालयांशिवाय इतर सर्व कार्यालयांना या सुट्या लागू राहणार आहेत.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
राफेल नदालने विक्रमी 14व्यांदा अंतिम फेरी गाठली, अलेक्झांडर झ्वेरेव्हने मध्यंतरी सामना सोडला
राफेल नदालने विक्रमी 14व्यांदा अंतिम फेरी गाठली, अलेक्झांडर झ्वेरेव्हने मध्यंतरी सामना सोडला
नदाल फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत: स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालने त्याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. मात्र, या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये जर्मन खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे नदालला वॉकओव्हर मिळाला. त्यावेळी नदाल 7-6, 6-6 असा पिछाडीवर होता. राफेलने कारकिर्दीत 14व्यांदा फ्रेंच…
View On WordPress
0 notes
Text
FIFA WC: आई धुणीभांडी करते तर वडील फेरीवाले; लेकानं चक्क स्पेनला धुळ चारली, अश्रफ हकीमीची स्टोरी
FIFA WC: आई धुणीभांडी करते तर वडील फेरीवाले; लेकानं चक्क स्पेनला धुळ चारली, अश्रफ हकीमीची स्टोरी
FIFA WC: आई धुणीभांडी करते तर वडील फेरीवाले; लेकानं चक्क स्पेनला धुळ चारली, अश्रफ हकीमीची स्टोरी Achraf Hakimi celebration with mother, FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला. या विजयानंतर मोरोक्कोच्या अश्रफ हकीमीने आपल्या आईसोबत सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर वादळ आणले आहे. हकीमी आणि त्याच्या आईचे फोटो सोशल मीडियावर…
View On WordPress
0 notes
Text
फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे?
फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे?
फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे? Author,एम.मणिकंदन स्पर्धेतील अव्वल संघांपैकी एक मानला गेलेला जर्मनीचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. जपानने स्पेनचा पराभव केल्यानंतर जर्मनीच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा संपल्या. जपान आता ग्रुप ई मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.   वरचा फोटो पाहा. तुम्हाला वाटेल की चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. पण याच बॉलवर पुढे जपानने दुसरा गोल केला आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
FIFA WC दरम्यान फुललं प्रेम, स्पेनची राजकुमारी ‘या’ १८ वर्षीय फुटबॉलपटूच्या प्रेमात? पाहा
FIFA WC दरम्यान फुललं प्रेम, स्पेनची राजकुमारी ‘या’ १८ वर्षीय फुटबॉलपटूच्या प्रेमात? पाहा
FIFA WC दरम्यान फुललं प्रेम, स्पेनची राजकुमारी ‘या’ १८ वर्षीय फुटबॉलपटूच्या प्रेमात? पाहा स्पेनचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावी याने गेल्या वर्षभरापासून बार्सिलोना आणि स्पेनच्या चाहत्यांवर चांगलाच प्रभाव पाडला आहे. जागतिक स्तरावर फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटवणारा गावी त्याच्या लूकमुळेही खूप चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. स्पेनचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावी याने गेल्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता
नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता
नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता किंग ऑफ क्ले असे बिरूद असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन चँपियनशिप २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून या वर्षातील … नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता आणखी वाचा The post नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता appeared first on Majha Paper. किंग ऑफ क्ले असे बिरूद असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन चँपियनशिप २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Pique Shakira Breakup: पॉप गायिका शकीरा आणि जेरार्ड पीक 12 वर्षांनंतर वेगळे झाले, कारण बनले अफेअर
Pique Shakira Breakup: पॉप गायिका शकीरा आणि जेरार्ड पीक 12 वर्षांनंतर वेगळे झाले, कारण बनले अफेअर
जेरार्ड पिक आणि शकीरा बातम्या: प्रसिद्ध पॉप गायिका शकीराने स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि तिचा जोडीदार जेरार्ड पिकपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघे 2010 पासून रिलेशनशिपमध्ये असून त्यांना दोन मुले आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेरार्डने शकीराची फसवणूक केली आहे, ज्यामुळे ती त्याच्यापासून विभक्त होत आहे. शकीराने पीकेवर दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अन्वयार्थ : शिखरावरचा माणूस!
अन्वयार्थ : शिखरावरचा माणूस!
अन्वयार्थ : शिखरावरचा माणूस! तसे पाहायला गेल्यास स्पेनचा राफेल नदाल ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू लागला अगदी २००५ पासून. त्या वर्षी फ्रेंच स्पर्धेचे अजिंक्यपद त्याने पटकावले. परंतु तोपर्यंत स्वित्र्झलडचा रॉजर फेडररही विम्बल्डनसारखी सर्वात लोकप्रिय टेनिस स्पर्धा सातत्याने जिंकत होता. मातीच�� कोर्ट वगळता नदालला इतरत्र जिंकता येत नव्हते. तर फेडरर तेवढे एक कोर्ट सोडून इतरत्र जिंकत होता. बहुपैलुत्व,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राफेल फायर है फायर..! सचिन, सेहवागसह क्रिकेटविश्वानं ‘नदाल’ला ठोकला सलाम; पाहा त्यांचे ट्वीट!
राफेल फायर है फायर..! सचिन, सेहवागसह क्रिकेटविश्वानं ‘नदाल’ला ठोकला सलाम; पाहा त्यांचे ट्वीट!
राफेल फायर है फायर..! सचिन, सेहवागसह क्रिकेटविश्वानं ‘नदाल’ला ठोकला सलाम; पाहा त्यांचे ट्वीट! स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन २०२२च्या रूपाने २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकून इतिहास रचला. मेलबर्नच्या रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या अंतिम फेरीत दोन सेटमध्ये पिछाडीवर पडूनही नदालने शानदार पुनरागमन केले आणि ५ तास २४ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा २-६,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : विक्रमादित्य राफेल; नदालचा २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात गेल्या वर्षी पायाच्या दुखापतीमुळे सहा महिने टेनिस कोर्टापासून दूर राहावे लागल्याने स्पेनचा तारांकित खेळाडू राफेल नदालच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मात्र, लढवय्या नदालला अशा पद्धतीने टेनिसला अलविदा करणे मान्य नव्हते. त्याने मेहनत घेत केवळ टेनिस कोर्टावर पुनरागमन केले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ जुलै २०२१ दुपारी १.०० वा. ****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, अकाली दल यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी, विविध मुद्यांवरुन अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी गदारोळ न करता महत्वाच्या मुद्यांवर काम होऊ द्यावं, अशी विनंती अध्यक्षांनी केली, मात्र तरीही गोंधळ सुरुच राहील्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेत कामकाज सुरु होताच पेगॅसस, कृषी कायदे या मुद्यांवर विरोधकांनी आणलेले स्थगन प्रस्ताव, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आजही फेटाळले. त्यामुळे विरोधकांनी सभागृहाच्या मधोमध येऊन गदारोळ करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही सुरवातीला एका तासासाठी, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या नागरीकांच्या वारसांना, नऊ लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सरकार योजना तयार करत असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाला आज भेट दिल्यानंतर, ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री मदत निधीतून दोन लाख रुपये, तर केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे दुर्घटना बीमा योजनेतून प्रत्येकी दोन लाख रुपये, मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.  
****
राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये पुरामुळे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान झालं असून, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागतं, ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीची कोविड चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम, जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत ज्या शासकीय कार्यालयाचा आणि सेवावर्गात मोडणाऱ्या व्यावसायिकांचा, अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो, अशा व्यक्तींची कोविड चाचणी युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.
****
केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या पुणे विभागाअंतर्गत, औरंगाबादला सप्टेंबर महिन्याअखेर पर्यंत औषधोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु असून, या केंद्रामुळे औरंगाबाद शहर आणि आसपास राहत असलेल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा तसंच औषधांचा पुरवठा करणं सहज शक्य होणार आहे. या योजनेच्या पुणे विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अनुराधा सोंडूर यांनी ही माहिती दिली.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज ६९ किलो वजनी गटात भारताची मुष्टीयोद्धा लवलिना बोरगैईनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत तीने जर्मनीच्या नादिन एपेट्ज चा पराभव केला.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं ब्रिटनच्या जोडीचा पराभव केला.
भारताच्या पुरुष हॉकी संघानं स्पेनचा तीन - शून्य असा सहज पराभव केला. आज सकाळी झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथमपासूनच वर्चस्व राखलं होतं.
नेमबाजीमध्ये दहा मीटर एयर मिश्र सांघिक प्रकारात, ई वेलारेविन आणि दिव्यांश पवार, तसंच अंजुन मुद्गिल आणि दीपक कुमार यांची जोडी, पात्रता फेरीत बाद झाली. तर दहा मीटर एयर पिस्टल मिश्र प्रकारात मनु भाकेर आणि सौरभ चौधरीची जोडीही बाद झाली.
टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या अचंता शरथ कमलला चीनच्या एम ए लाँग कडून पराभव पत्करावा लागला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७ जुलै २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं स्पेनचा तीन - शून्य असा सहज पराभव केला. आज सकाळी झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथमपासूनच वर्चस्व राखलं होतं.
दरम्यान, ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू यांना मणिपूर सरकारने पोलिस विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी प्रवेशासाठीची जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा तीन ऑक्टोबरला होणार असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी जाहीर केलं आहे. सर्व कोरोना नियमांचं पालन करत ही परीक्षा आयोजित केली जाईल, असं प्रधान यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. यदियुरप्पा यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव जाहीर होईल, याबाबत उत्सुकता आहे.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने एक कोटींचा टप्पा पार केला आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचं कौतुक केलं.
****
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघाची काल बैठक झाली. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार, वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ आणि अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी कृती दल स्थापन करणार असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस ठाण्यातला पोलिस उपनिरिक्षक राहुल पांडुरंग लोखंडे यास ८० हजार रुपये लाच घेतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराचा अटकपूर्व जामीन रद्द करू नये आणि गुन्ह्यातली वाहनं जप्त करू नये, यासाठी लोखंडे यानं लाच मागितली होती.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 OCT. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
**** ऐतिहासिक वारशांची, वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासियांची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ३७वा भाग प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संवादात चंद्रपूर इथल्या इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्यात राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. **** गेल्या महिन्यात मन की बात कार्यक्रमात गांधी जयंतीच्या अनुषंगानं खादी वापरण्याचं आवाहन केल्यामुळे दिवाळीच्या दिवसात खादीच्या विक्रीत वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. खादी आणि हातमाग गरीबात��्या गरीब व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन साधून त्यांना सक्षम, सशक्त, शक्तिशाली होण्यासाठीचं साधन बनत असून, ग्रामोद्योगासाठी ही मोठी भूमिका असल्याचं मोदी म्हणाले. **** यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नागरिकांनाही जवानांसोबत वेळ घालवण्याचं आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याचं आवाहन केलं. भारतीय जवान आणि महिलांनी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली असून, ८५ देशांत भारत शांती - अभियानाचं प्रशिक्षण देत असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भगिनी निवेदिता यांची दिडशेवी जयंती काल साजरी झाली, परवा ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, येत्या चार नोव्हेंबरला गुरुनानक यांची जयंती, तसंच येत्या १४ नोव्हेंबरला देशाचे पहिले पंतप्रधान जावहरलाल नेहरु यांची जयंती, असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या महान व्यक्तींचं स्मरण केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशात एकता दौडचं आयोजन केलं असून, नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. लहान मुलांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आयुर्वेद आणि योग याकडे केवळ उपचाराच्या माध्यमातून न पाहता, ते आपल्या जीवनात अंगीकारावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आशिया चषक जिंकल्याबद्दल हॉकी संघाचं, डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू के श्रीकांतचं, तसंच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचं पंतप्रधानांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. **** जम्मू काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत विशेष कारवाई बलाचा एक पोलिस हुतात्मा झाला. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि विशेष कारवाई दलानं शोधमोहीम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला. या चकमकीदरम्यान पोलिस जवानाला वीरमरण आलं. या परिसरात दोन दहशतवादी लपले असून, चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथं भेट देऊन शनीदर्शन घेतलं. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गडकरी आज शिर्डी इथं ही भेट देणार असून, त्यानंतर ते औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. चित्ते पिंपळगाव इथं छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्रीयश शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमालाही ते हजर राहणार आहेत. **** बीड जिल्हा येत्या महिनाभरात शंभर टक्के उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी काम करावं, तसंच परळी बाह्यवळण रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. परळी इथं विविध खात्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हयाची पाणंदमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख शौचालयं बांधून पूर्ण झाली असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. **** औरंगाबाद महापालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले, काँग्रेसकडून अय्युब खान तर एमआयएमकडून अब्दुल नायकवाडी हे रिंगणात उतरले आहेत. **** १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ विजेता ठरला आहे. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं स्पेनचा पाच दोन असा पराभव केला. **** फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत आज भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत आणि जपानच्या केंटा निशिमोटो यांच्यात पॅरिस इथं होणार आहे. श्रीकांतनं उपांत्यफेरीत भारताच्याच एच एस प्रणयचा, पराभव केला. ****
0 notes