Tumgik
#स्मृतीस
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
सूर्याचे तेज जसे झाकले जाऊ शकत नाही, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार देखील झाकले जाऊ शकत नाहीत. हिंदूतेजसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्य स्मृतीस कोटी कोटी वंदन!
0 notes
Text
Tumblr media
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !
राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!
0 notes
raje7777777 · 9 months
Text
Tumblr media
थोर अध्यात्मिक गुरु, युवकांचे प्रेरणा स्त्रोत स्वामी विवेकानंद जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी जगभरातल्या मराठी माणसांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
दर्पण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.
वृक्ष लागवडीतून पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांच्याकडून व्यक्त; औरंगाबाद इथं नवव्या पक्षी महोत्सवाला प्रारंभ.
आणि
जालना-औरंगाबादसह अनेक शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जालना पोलिसांकडून अटक.
****
महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी जगातल्या मराठी माणसांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत वरळी इथं मराठी तितुका मेळवावा या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते आज बोलत होते. आत्मनिर्भर भारत निर्माणा सोबतच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यात विदेशात असलेल्या भारतीयांचं योगदान मोठं असल्याचं सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी राज्यात गुंतवणूक करुन उद्योजकता वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसंच राज्य सरकारनं विविध क्षेत्रांचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी कालबद्ध नियोजन करावं असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी भाषा आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसी अंतर्गत देशात विद्यालयांना शुल्क रचना आणि प्रवेश प्रक्रिया ठरवण्याची मुभा असेल असं युजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सांगितलं आहे आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, युजीसीनं भारतात परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि विनियम २०२३ साठीच्या तरतुदी तयार केल्या आहेत. यामध्ये विविध पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संस्थांच्या प्रवेशाचे आणि कामकाजाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. यावर येत्या १८ तारखेपर्यंत सूचना आणि अभिप्राय देता येतील, असं आयोगानं कळवलं आहे.
****
राज्याच्या शाश्वत विकासात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज मुंबईत पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात अंमली पदार्थांचा वाढता वापर, दहशतवाद, रो��गार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक भूमिका मांडायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी भाषेतल्या पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं असून, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचं काम केलं, असं भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी म्हटलं आहे. दर्पण दिनानिमित्तानं मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार गौरव सोहळ्यात लोणीकर बोलत होते. दर्पण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने आज चार हजारावर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
राज्यभरात ठिकठिकाणी दर्पण दिनानिमित्त जांभेकरांना अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. सिंधुदुर्ग इथं आकाशवाणीचे वार्ताहर निलेश जोशी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लातूर जिल्हा माहिती कार्यालयात माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली, तर बीड इथं माहिती अधिकारी किरण वाघ यांनी तर परभणी इथं माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लसीचं उत्पादन पुण्यात होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या या लसीचं तंत्रज्ञान पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. ‘लम्पी प्रोव्हॅक’ असं या लसीचं नाव असेल, या लसीचं १० वर्षे व्यावसायिक उत्पादन घेण्याचे अधिकार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
****
सोमय्या कुटुंबियांवर शौचालय घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं, मात्र राऊत शिवडी न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे हे अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं. या प्रकरणी शिवडी न्यायालयात २४ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
****
देशातील महिलांनी स्वबळावर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे, त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्��ावर चर्चा व्हावी, असं आवाहन कोलकाता इथल्या भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक डॉ.द्रिती बॅनर्जी यांनी केलं आहे. नागपुरात भारतीय विज्ञान काँग्रेसध्ये घेण्यात आलेल्या महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं मत सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं. भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये विज्ञान आणि समाज या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारतानं शर्थीचे प्रयत्न सुरु केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी पर्यायी उर्जा स्त्रोत निर्माण करणं, तसंच पर्यावरणपूरक यंत्रणा निर्मिती करणं अशा दोन्ही पर्यायांवर सध्या कामं सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सत्त्याणवावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.
****
पक्षी संवर्धनासाठी वृक्ष लागवड करुन पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र वाढवण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं एन्व्हार्यमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी आणि एमआयटी संस्थेच्या वतीनं नवव्या पक्षी महोत्सवाला आज मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी पूजनाने प्रारंभ झाला, त्यावेळी दिवाण बोलत होते. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.दिलीप यार्दी यांनी आपल्या भाषणात पक्षी निरीक्षण हा चैनीचा नव्हे तर अभ्यासाचा विषय असल्याचं सांगितलं. औरंगाबाद शहरात ३० लाख झाडांची आवश्यकता असून सर्वेक्षणात फक्त चार लाख झाडं निदर्शनास आल्याचं यार्दी यांनी सांगितलं. या तीन दिवसीय पक्षी महोत्सवाअंतर्गत उद्या सात तारखेला सुखना धरण परिसरात तर आठ जानेवारीला जायकवाडी पक्षी अभारण्यात सकाळी सहा ते नऊ या वेळेत पक्षी निरीक्षण होणार असल्याची माहिती डॉ. यार्दी यांनी यावेळी दिली.
****
जालना आणि औरंगाबाद सह अनेक शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. शेख मोहसीन आणि मुस्ताक आरेफ अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी बारा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
****
औरंगाबाद इथं आज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसदर्भात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, किमान वेतन भत्ता, विशेष महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, व्यावसायिक कर, राज्य कामगार विमा, साप्ताहिक सुट्टी, बोनस, सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
लातूर शहरात १९ ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. नागरिकांनी दुसरा डोस तसंच खबरदारीचा तिसरा डोस घ्यावा, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथं मोबाईल मध्ये महावितरण ॲप डाऊनलोड करण्याऱ्यांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली.हे ॲप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या ॲपमुळं ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेणं, वीज बील भरणं आदी सुविधा सहजपणे उपलब्ध होत आहेत. मागील वर्षी या ॲपच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांची वीजबीलं भरण्यात आली आहेत.
****
दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या ९२ वाव्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद इथं ममता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मीना ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
0 notes
sandeshgangurde · 2 years
Photo
Tumblr media
*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत समर्थक, लढवय्ये योद्धे, रिपब्लिकन चळवळीचे झुंझार सेनापती, भूमिहीन शेतमजुरांच्या द���शव्यापी सत्याग्रहाच्या आंदोलनाचे प्रणेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!* https://www.instagram.com/p/CmuNrd2P95k/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
siddharthdthservice · 2 years
Text
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!
बुद्धीच्या बळावर विश्व जिंकणारया अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम !
Siddharth DTH service
Tumblr media
0 notes
nashikfast · 2 years
Text
स्त्री शिक्षणाचे जनक,- महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
स्त्री शिक्षणाचे जनक,- महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
छञपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे, मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विन्रम अभिवादन.. स्मृतिदिन – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
आपल्या दैवीय सुरांनी रसिक जणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन! माझा असा एकही दिवस जात नाही, कि आज लता दीदींच गाणं ऐकलं नाही! लता दीदींचे संगीत आणि देशभक्तीला समर्पित असलेले संगीतमय जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
0 notes
kokannow · 2 years
Text
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मीनाताई ठाकरे यांचे स्मृतिदिन साजरा
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मीनाताई ठाकरे यांचे स्मृतिदिन साजरा
कणकवली : शिवसैनिकांच्या माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कणकवली शिवसेना शाखेमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू राणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना समन्वयक राजू राठोड, उपसरपंच वैदेही गुडेकर, रोहिणी पिळणकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, विलास गुडेकर आदी उपस्थित होते. दिगंबर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये सुरु असलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या दुसर्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. तीन दिवसीय हे संमेलन काल सुरु झालं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या भागीदारीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आहे. या बैठकीत, राज्यांच्या सहभागाने वेगवान आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्याविषयी चिंतन केलं जात आहे.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी भाषेतल्य पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं असून, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नाशिक मधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या ५० पदाधिकार्यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं. मागच्या सहा महिन्यात राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आमचं काम लोकांना आवडला असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येऊ शकतात. मात्र गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचं नियोजन करावं, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असं आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचं परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणं, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणं, यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावं, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे, तसंच शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणं आवश्यक आहे, असं भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता इथल्या केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक, डॉ. बसंत कुमार दास यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं भारतीय विज्ञान अधिवेशनात, शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. देश, परदेशातल�� शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल असं अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी यावेळी सांगीतलं. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या, बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीने भारतातील परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि विनियम २०२३ च्या तरतुदी तयार केल्या आहेत. यामध्ये विविध पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संस्थांच्या प्रवेशाचे आणि कामकाजाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. यावर येत्या १८ तारखेपर्यंत सूचना आणि अभिप्राय देता येतील, असं आयोगानं कळवलं आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या खाजगीकरणाच्या यादीबाबत निती आयोगाच्या नावावरचा बनावट संदेश सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचं आयोगाडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सत्त्याणवावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.
****
परभणीत मांजाच्या खरेदी-विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानदारांविरुध्द जिल्हा पोलिस यंत्रणा विशेष मोहिम राबवणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. रागसुधा यांनी या मोहिमेकरीता पथकं स्थापन केली असून यासंबंधी दोषी आढळण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
//**********//
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
मराठी आ��ि हिंदी चित्रपटांत विविध भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा आज दुसरा स्मृती दिन!💐 आपल्या अभिनयाच्या बळावर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक रमेश देव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻
0 notes
darshaknews · 3 years
Text
Mahaparinirvan : महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन
#Mahaparinirvan : महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन #Mumbai #Maharashtra #DrBRAmbedkar #BabasahebAmbedkar #AjitPawar
Mahaparinirvan : महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन Mahaparinirvan : मुंबई, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज सकाळी दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
शेतकऱ्यांच्या कायमस्वरुपी विकासासाठी विशेष कृती आराखडा-मुख्यमंत्र्यांची घोषणा.
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी बचत गटांच्या निर्मितीला मान्यता.
दीपावलीनिमित्त औरंगाबादसह सहा ठिकाणी “लखलख चंदेरी” कार्यक्रमाचं आयोजन.
आणि
जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहतुकदारांविरुध्द कारवाई करण्याचे बीड उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्देश.
****
शेतकऱ्यांचा कायमस्वरुपी विकास व्हावा यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मदत योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले –
जे तातडीचे पाच हजार रूपये आपण देत होतो, घरांमध्ये नुकसान झालं, धान्य भिजलं, कपडे भिजले, तिथे देखील आपण पंधरा हजार केले. हे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण करतोय. हे तर नुकसान भरपाईचं झालं. परंतू कायमस्वरूपी, शेतकऱ्यांना यामध्ये फायदा झाला पाहिजे यासाठी देखील सरकार आपलं, विशेष कृती आराखडा तयार करतीयेय.
छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाचं उद्‌घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी, तरुणांचे भविष्य घडवण्याचं उदात्त धोरण अंगीकारणाऱ्या सारथी संस्थेला शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं.
****
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांमध्ये न���ीन २ हजार ८०० बचत गटांची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या विशेष मोहिमेत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या १८ वर्षांवरील महिला, माता तसंच गर्भवतींची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांच्या आरोग्याकडेही राज्य सरकार लक्ष देत असल्याचं भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय या तपास यंत्रणेला राज्यात कारवाई करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असा निर्णय शासनानं घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सीबीआयला राज्यात पुन्हा तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
****
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने जामीन अर्जावर निर्णय न देत, पुढची सुनावणी दोन नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत दोन नोव्हेंबरपर्यंत वाढ झाली आहे.
****
१०० कोटी कथित वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे. देशमुख यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयानं ईडी प्रकरणात जामीन मंजूर केला होता. सीबीआयकडे दाखल प्रकरणात देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र देशमुख हे जामीनावर सुटल्यास या प्रकरणातल्या पुराव्याबरोबर छेडछाड करु शकतात असं म्हणत सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. देशमुख यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली आहे.
****
आज पोलिस स्मृती दिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दहा पोलिसांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलिस हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलिस स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.
मुंबईत नायगाव पोलिस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयातील स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या हुतात्मा झालेल्या २६१ पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हवेत २१ फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं.
****
परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी ५० हजार रुपयांची भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी, तसंच, विमा कंपन्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी पीक विम्याची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी परभणी जिल्ह्यात सहा तालुक्यांतल्या आठ मंडळात ७३ हजार ८१४ सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आह लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात झाली असल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
                                   ****
नांदेड जिल्ह्यात हंगामातल्या प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा मंजूर झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसाठी जवळपास ४०० कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दीपावलीनिमित्त राज्यात औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती या सहा ठिकाणी “लखलख चंदेरी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. दीपावली पहाट आणि दीपावली संध्या या स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे. औरंगाबाद इथं २५ आणि २६ तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात २५ तारखेला संध्याकाळी ६ ��ाजता दीपावली संध्या कार्यक्रमात अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, संज्योती जगदाळे यांच्यासह इतर कलाकार सहभागी होणार असून, २६ तारखेला सकाळी ६ वाजता दीपावली पहाट या कार्यक्रमात मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जादा बस भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी बस वाहतुकदारांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिले आहेत. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज जिल्हा प्रवासी बस वाहतूक संघटनेची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाच्या बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारु नये यासोबतच प्रवासी वाहतुक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक करु नये आदी सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या ब गटातील पात्रता सामन्यात आयर्लंड संघानं वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर वेस्ट इंडीज संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ५ गडी बाद १४६ धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या १४७ धावांचं आव्हान आयर्लंडनं १७ षटकं तीन चेंडूत १ गडी गमावून पूर्ण केलं.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन
मुंबई, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन
मुंबई, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाह���बांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes