Tumgik
#2021 पर्यंत पंचायत निवडणुका
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** वाहनं भंगारात काढण्याचं धोरण हा देशाच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा - पंतप्रधानांचं प्रतिपादन
** दुसऱ्या फिट इंडिया फ्रीडम रन ला प्रारंभ; येत्या २ ऑक्टोबरपर्यंत ७५ गावं आणि ७५ जिल्ह्यांमधे आयोजन
** उस्मानाबाद इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारलं जाणार
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात इको बटालियनकडून ८७० हेक्टर वनक्षेत्रावर सात लाख वृक्ष लागवड
****
वाहनं भंगारात काढण्यासाठीचं धोरण हे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज वाहनं भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात गुजरातमध्ये गांधीनगर इथं गुंतवणूकदार परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. मुदतबाह्य वाहनं या धोरणात शास्त्रोक्त पद्धतीने मोडीत काढली जातील, यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल आणि रोजगार उपलब्ध होतील, तसंच शहरांमधलं प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचं रक्षण होईल, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. इथेनॉल आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणं आणि इलेक्ट्रिक वाहनं उत्पादीत करणं याला सरकारचं प्राधान्य असून यात औद्योगिक क्षेत्राने सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. या धोरणाद्वारे भारताला आग्नेय आशियातील एक प्रमुख वाहन मोडीत काढण्याचं केंद्र बनवण्याचं ध्येय पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं.
****
आजादी का अमृत महोत्सव अभियानाचा एक भाग असलेल्या दुसऱ्या फिट इंडिया फ्रीडम रन ला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडा संकुलातून आज सुरुवात झाली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि भारतभरातल्या महत्त्वाच्या इतर ९ स्थानांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात एनएसजीचे ३६ कमांडो सहभागी झाले. महात्मा गांधीजींनी १९४२ ला ‘भारत छोडो’चा नारा दिलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून पहिली फ्रीडम रन रवाना झाली. नेहरु युवा केंद्र संघटनेतर्फे राज्यातल्या विविध ऐतिहासिक स्थळांवरून देखील फ्रीडम रन घेण्यात आली. देशभरात ७५ गावं आणि ७५ जिल्ह्यांमधे येत्या २ ऑक्टोबर पर्यंत फीट इंडीया फ्रीडम रनचं आयोजन केलं जाणार आहे.
****
उस्मानाबाद इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पाच कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारलं जाणार आहे. उस्मानाबाद इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात चार नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नियुक्त समितीच्या अहवालाची वाट पाहत असून, त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं सामंत यांनी सांगितलं. श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानद्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत करावं, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सामंत यांना दिलं.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी या दौऱ्यात विद्यापीठ उपकेंद्राला भेट देऊन आढावा घेतला. तसंच कोविड काळात उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सत्कार केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाला १० व्हेंटीलेटर, सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुपूर्द केले.
सामंत यांनी आज बीड इथंही पत्रकार परिषद घेतली. छत्रपती राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्तीपोटी ३११ कोटी रूपये संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यानी आपापल्या शैक्षणिक केंद्रात तत्काळ संपर्क साधावा, अशी सूचना सामंत यांनी केली. बीड जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रिटिंग ट्रेडच्या जागा ६० वरून ३० करण्यात आल्या आहेत, इतरही महत्त्वाच्या ट्रेडमधल्या जागा कमी केल्या आहेत, या बाबत सविस्तर माहीती घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिलं.
****
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जुलै २०१७ मध्ये देशात वन संवर्धनासाठी विविध राज्यात दहा इको बटालियन स्थापन केल्या. यात महाराष्ट्रातली एकमेव इको बटालियन औरंगाबाद इथं डिसेंबर २०१७ मध्ये स्थापन झाली. नऊ अधिकारी आणि १३९ माजी सैनिकांचा समावेश असलेल्या या इको बटालियनने मागील चार वर्षात जिल्ह्यात अब्दीमंडी, विठ्ठलपूर, कोलठाण, निर्गुंडी, आरआरपूर, धामणगाव, शेंद्राबन, सुलतानाबाद आणि वाळूज या ठिकाणी सुमारे ८७० हेक्टर वनक्षेत्रावर सात लाखांच्यावर वृक्ष लागवड केली आहे. या बटालियनने रोपवाटिकाही तयार केल्या आहेत. या इको बटालियनने लावलेल्या सात लाख वृक्षांपैकी ९६ टक्के वृक्ष जगली असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. वृक्षांचे रोपण करत पाच वर्ष त्यांचे जतन आणि संवर्धन करून हे वृक्ष वनविभागाला हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या ठिकाणी शेततळी सुद्धा बांधण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील वर्षी काम सुरु होणार ‌असल्याचं उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भटनागर यांनी सांगितलं
****
केंद्रीय मंत्रिमंडळातले चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ही माहिती दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रक���र परिषदेत ते बोलत होते.  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील तसंच आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदार संघात ६२३ किलोमीटर प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.
****
राज्यातल्या विद्यापीठांच्या आगामी निवडणुका युवासेना लढवणार असल्याची घोषणा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. युवा कौशल्य उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात ५०० हून अधिक तरुणांना रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं सरदेसाई यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशय परिसरात माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचं स्मारक उभारण्यासाठी १३ कोटी २६ लाख रूपयांच्या अंदाज पत्रकास गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. महामंडळाचे अधिक्षक अभियंता एम आर अवलगाकर यांनी ही माहिती दिली.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास म्हणून सिध्द करावं, अशी मागणी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या मागणीचं पत्र त्यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात सादर केलं. राज्य सरकारला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार प्राप्त झालेला असून याबाबत तातडीनं कृती करण्याची विनंती पाटील यांनी या पत्रात केली आहे.
//********//
0 notes
marathinewslive · 3 years
Text
पंचायत निवडणुका 2021 मध्ये थेट मतदान आज 18 जिल्ह्यात पंचायत चुनाव लाईव्ह अपडेट हिंदी
पंचायत निवडणुका 2021 मध्ये थेट मतदान आज 18 जिल्ह्यात पंचायत चुनाव लाईव्ह अपडेट हिंदी
07:50 एएम, 15-एप्रिल -2021 मतदार शंकर कुरील यांनी प्रथम मतदान केले कानपूरमधील कल्याणपूर ब्लॉकमधील कुरसौली गावात मतदान सुरू झाले आहे. मतदार शंकर कुरील यांनी प्रथम मतदान केले. 07:42 एएम, 15-एप्रिल -2021 आग्रा येथे पंचायत निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ आग्रा येथील पंचायत निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. पिन्हाट ब्लॉकमधील टीकमसिंहपुरा गावात मतदार मतदानासाठी रांगेत आहेत. मतदार मुखवटे परिधान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण धोरण योजना जाहीर. - उत्तर प्रदेश: त्रिस्तरीय पंचायतमधील प्रभागांचे आरक्षण धोरण आज दुपारी तीन वाजता जाहीर केले जाईल
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण धोरण योजना जाहीर. – उत्तर प्रदेश: त्रिस्तरीय पंचायतमधील प्रभागांचे आरक्षण धोरण आज दुपारी तीन वाजता जाहीर केले जाईल
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका गुरुवारी दुपारी तीन वाजता त्रिस्तरीय पंचायतीच्या मतदारसंघांच्या (प्रभाग) आरक्षणाच्या धोरणाचा आदेश देण्यात येणार आहे. त्याआधारे ग्रामपंचायत, क्षेत्र पंचायत व जिल्हा पंचायत प्रभागांचे आरक्षण पुढील एक महिन्यात निश्चित केले जाईल. अपर मुख्य सचिव पंचायतीराज मनोजकुमार सिंह दुपारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes