Tumgik
#अपघातग्रस्तांना
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Indor Amalner Bus Accident : इंदूरहून-अमळनेर बस अपघातग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्या; जखमींचा सर्व खर्च राज्य सरकारने करावा; अजित पवारांनी केल्या या तीन मागण्या
Indor Amalner Bus Accident : इंदूरहून-अमळनेर बस अपघातग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्या; जखमींचा सर्व खर्च राज्य सरकारने करावा; अजित पवारांनी केल्या या तीन मागण्या
Indor Amalner Bus Accident : इंदूरहून-अमळनेर बस अपघातग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्या; जखमींचा सर्व खर्च राज्य सरकारने करावा; अजित पवारांनी केल्या या तीन मागण्या अजित पवार यांनी सांगितले की, बसमधून कोण कोणत्या परिसरातील नागरिक प्रवास करत होते, त्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या अपघाताविषयी बोलताना सांगितले की, आम्ही सरकारकडे तीन प्रकारच्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
बालासोर रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या २८८; पंतप्रधानांकडून मदत आणि बचावकार्याचा आढावा तसंच जखमींची विचारपूस.
नवीन शैक्षणिक धोरण लोकल अभ्यासक्रमाला ग्लोबल करणारं - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.
औरंगाबाद जिल्ह्यात बचत गटांसाठी बचत भवन तसंच सभागृह उभारण्यात येणार.
आणि
वटपौर्णिमेचा सण आज राज्यात विविध उपक्रमांनी साजरा.
****
ओडिशातल्या बालासोर इथं काल झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या वाढून २८८ झाली आहे, तर ८५५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत. बचाव कार्य अद्याप सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं. ओळख पटलेले मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सात तुकड्या, ओडिशा आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या, अग्निशामक दलाच्या २४ गाड्या, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यानं हे मदतकार्य सुरू आहे. या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार सिग्नल यंत्रणेशी संबंधीत बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघात स्थळाची भेट देऊन पाहणी केली. हा अपघात अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. ओडिशा सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी अपघातग्रस्तांना केलेली तातडीची मदत मोलाची असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी बालासोर इथं रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसंच जखमींवर योग्य त्या उपचारांची आरोग्य विभागाला सूचना केली.
काल झालेल्या या रेल्वे अपघाताबद्दल जगभरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, संयुक्त अरब अमीराती चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांच्यासह अनेक देशांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधे अडकलेल्या अडीचशे प्रवाशांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी आज चेन्नईकडे रवाना झाली. काल झालेल्या अपघातामुळे ३९ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आजचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी काल रात्री रिकामीच मुंबईकडे रवाना झाली. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असं कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरण लोकल अभ्यासक्रमाला ग्लोबल करणारं असेल, असं माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहात ते आज एका कार्यक्रमात बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणं सोयीचे होणार असल्याचं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इमारतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आलं. पाटील यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठात संत गाडगेबाबा संदेश शिल्प इथं भेट देऊन अभिवादन केलं. आदिवासी विकास केंद्राकरिता मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचं भूमीपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
सर्व शासकीय बांधकामांसाठी क्रश सॅण्ड अर्थात रेती चुरा वापरण्याचे धोरण शासन स्वीकारणार असल्याचं, महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून हा निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी सांगितलं.
****
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. एका मुख्याध्यापकाकडून संस्थेत नियुक्तीसाठी सुनिता धनगर यांनी पन्नास हजार रुपये आणि लिपीक नितीन जोशी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित मुख्याध्यापकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. धनगर यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. दरम्यान, सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यात ८५ लाख रुपयांची रोकड, ४५ तोळे सोनं, तसंच दोन घरं आणि एका भूखंडाची कागदपत्रे सापडल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
“जनसंपर्क अभियान” अंतर्गत सामाजिक संपर्क माध्यमातली प्रभावशाली मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज औरंगाबाद इथं संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या ३० जून दरम्यान हे अभियान जिल्हाभरात राबवण्यात येत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात, बचत गटांसाठी एक बचत भवन आणि बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी एक सभागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं "कृषी माल प्रक्रियेतून ग्रामीण विकास " या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेचं डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅँक - नाबार्ड आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, साकारल्या जात असलेल्या या प्रकल्पाला २७५ कोटी रुपये खर्च येणार असून बचत गटातील उत्पादित वस्तूंसाठी मॉल उभारण्याची संकल्पना असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे राज्य कामगार रुग्णालयात परिचर्या महाविद्यालय सुरु करावं आणि कामगारांसाठी ५०० खाटांचं नवीन रुग्णालय सुरु करण्याची मागणी केली असल्याचं डॉ.भागवत कराड यांनी यावेळी सांगितलं. ओडिशा दुर्घटनेतील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
वटपौर्णिमेचा सण आज राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून, त्याला धागा गुंडाळून पारंपारिक पद्धतीने पूजा केली.
चंद्रपूर जिल्ह्यात महानगरपालिका, नागपूर इथल्या नटराज निकेतन संस्था आणि मैत्री परिवार यांच्यावतीनं आज वटवृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुलाच्या आवारात वटवृक्षाची लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसंच सामूहिक जलप्रतिज्ञाही यावेळी घेण्यात आली. या मोहिमेत देशभरातील ३०० संस्था सहभाग घेणार असल्याची माहिती मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिली.
****
धुळे तालुक्यातील निमगुळ इथल्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते दिलीप खिवसरा यांनी वडाच्या रोपट्यांचं वाटप केलं, आपल्या परिसरात वृक्षलागवड करण्याचं आवाहन त्यांनी या महिलांना केलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरातली काही पुरुष मंडळी गेल्या १४ वर्षांपासून वट पोर्णिमेचे व्रत करत आहेत. यंदाही महिलांच्या बरोबरीनं या पुरुषांनी वटवृक्षाला फेऱ्या मारून वटपोर्णिमा साजरी केली.
****
शासनाच्या योजना तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ३५ योजनांचा समावेश असून, सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एक लाख २३ हजार २१२ लोकांना याचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, लोकांनी सर्वांत जास्त ३८ हजार ३७३ लोकांनी जातप्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे.
****
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्षे या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख घरापर्यंत केंद्र सरकारचे काम पोहोचवलं जाणार आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संपर्क से समर्थन या अंतर्गत एक हजार कुटुंबांना भेटी देऊन मोदी सरकारचे काम सांगितलं जाणार आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला शनिवारी झालेल्या अपघातात जखमी व मृतांच्या वारसांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. तसेच ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. शनिवारी झालेल्या बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी डॉ. भारती  पवार यांनी जिल्हा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला शनिवारी झालेल्या अपघातात जखमी व मृतांच्या वारसांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. तसेच ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. शनिवारी झालेल्या बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी डॉ. भारती  पवार यांनी जिल्हा…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे अपघातात दोघे ठार
मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे अपघातात दोघे ठार
सावंतवाडी : बांदा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघेजण जागीच ठार तर इतर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी संपर्क साधत बांदा येथील 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
बस दरीत कोसळली, २ ठार, ४० जखमी
Tumblr media
सुरत : गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सपुतारानजीक ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २ ठार, तर ४० जण जखमी झाले आहेत. भीषण दुर्घटना घडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. सुरतनजीकच्या अमरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल डांगमध्ये आली होती. सापुतारापासून काही अंतरावर डांगच्या घाटात अडीचशे फूट दरीत ही बस कोसळली. या बसमध्ये ५० जण होते. परतीचा प्रवास करीत असताना बस दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी ही सहल नेण्यात आली होती. जखमींना अहवा आणि सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. Read the full article
0 notes
darshaknews · 2 years
Text
Blood Donation : आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो ही भावना सर्वाधिक आनंददायी : ईश्वर बोरा
#Blood Donation : आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो ही भावना सर्वाधिक आनंददायी : ईश्वर बोरा #Ahmednagar
Blood Donation : अहमदनगर (दि १७ जानेवारी २०२२) : करोना महामारीच्या काळात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने अत्यवस्थ रूग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ वाढली आहे. विव��ध शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आजार, अपघातग्रस्तांना रक्ताची नितांत गरज असते. यासाठी रोटरी सेंट्रलने पुढाकार घेत रक्तदान शिबीर घेतले. या शिबिरात रोटरीच्या पदाधिकारी व सदस्यांनीही रक्तदान करून इतरांना यासाठी प्रेरित केले. रक्तदान हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krantinewsin · 3 years
Text
अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेल्यास मिळणार 5000 रुपये बक्षीस - केंद्र सरकारची नवीन योजना
0 notes
jansamparknews · 3 years
Text
अपघातग्रस्त जोडप्यांना संगीता साळुंखे यांनी दिला माणुसकीतून दिलासा
अपघातग्रस्त जोडप्यांना संगीता साळुंखे यांनी दिला माणुसकीतून दिलासा
जनसंपर्क न्यूज – मसूरः अपघातग्रस्त जोडप्यांना प्रसंगावधान राखून पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ संगीता ताई साळुंखे (माई) यांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्तांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करून दिलासा देत माणुसकीचे दर्शन घडवले…….! याबाबत अधिक माहिती अशी की चिखली येथे काल सकाळी अवजड वाहनांची व दुचाकी गाडीची धडक होऊन दुचाकी वरील जोडपे गंभीर जखमी झाले होते याच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 8 months
Text
विमा : अपघातग्रस्तांना पोस्टाचं ‘सुरक्षाकवच’
https://bharatlive.news/?p=155573 विमा : अपघातग्रस्तांना पोस्टाचं ‘सुरक्षाकवच’
पॉलिसीधारकाचा अपघाती ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी, कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मदत मिळणार
·      नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबतचं सुधारणा विधेयकं विधानसभेत मंजूर
·      शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तसंच शेतीच्या नुकसानाबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा
·      राज्यातल्या तीन हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश जारी
·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करणार, आरक्षणाची स्थिती पाच आठवडे जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
·      शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवरची आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार १८३ रुग्ण, मराठवाड्यात २३ बाधित
·      समर्थ रामदास स्वामींच्या जांबसमर्थच्या राममंदिरातल्या मूर्तीं चोरीच्या शोधासाठी पाच पथकं रवाना
आणि
·      झिम्बॉब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात १३ धावांनी विचय मिळवत भारतानं तीन सामन्यांची मालिका जिंकली
  सविस्तर बातम्या
राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत देण्यासंबंधीचा शासन निर्णय काल जारी झाला. या निर्णयानुसार कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत दिली जाईल, असं महसूल विभागानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबतची सुधारणा विधेयकं काल विधानसभेत मंजूर झाली. लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारासाठी लोकांमधून नगराध्यक्ष थेट निवडून येणं योग्य असून, त्यांना वाढीव अधिकार देण्याबद्दल विचार केला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. या विधेयकांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. दरम्यान, हे विधेयक लोकशाहीला घातक असून, सर्वसामान्य लोक इथे निवडून येऊ शकणार नाहीत, आर्थिक पाठबळ आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना यामुळे मोकळं रान मिळणार असल्यानं, हे विधेयक मागं घेण्याची मागणी, विरोधी पक्षनेत�� अजित पवार यांनी या विधेयकाच्या चर्चेत केली.
या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ हजार ग्रामपंचायतींनी थेट सरपंच निवडून देण्याची मागणी केल्याचं सांगितलं.
दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीत जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याची तरतूद असणारं विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या कारभारात स्थैर्य आणणं हा याचा मुख्य उद्देश आहे असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं केलेल्या उपाययोजना लागू करण्यासंदर्भातलं, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, २०२२ काल विधान परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं.
****
शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असून, शेतीच्या नुकसानाबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये, शंखी गोगलगायी मुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान नेमकं किती आहे, तसंच नुकसान भरपाई किती द्यावी लागेल याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असं सत्तार यांनी सांगितलं.
****
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. एका लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक वाढली असून, या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ मिळेल असं त्यांनी सांगितलं. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा विकसित करण्यात येईल असं सांगून अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्यासाठी लवकरच राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या सर्व २२ वैद्यकीय महाविद्यालयातील ही रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत असल्याचंही महाजन यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या तीन हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, विधान भवनातील दालनात जारी करण्यात आले. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं बदल्या करण्यात आल्या असल्याचं महाजन यांनी सांगितलं. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसंच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेले योग्य निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतल्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदल्यासाठी एकूण  ११ हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले होते, ३४ जिल्हा परिषदेअंतर्गत या बदल्या करण्यात आल्या.
****
कोरोनामुळे दोन्ही पालकांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचं, वैद्यकीय, अभियांत्रिकी अथवा अन्य कोणताही सुरू असलेला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत केली. यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोविडमध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं पदवी तसंच पदव्युत्तरपर्यंतचं संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी आतापर्यंत २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रूपये वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या पुढील पाच आठवडे आरक्षणाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला, मात्र ज्या ९२ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया या निर्णयापूर्वीच सुरू झाली होती, अशा नगरपालिकांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्याबाबत सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
****
शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालायत आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातल्या पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन आणि पुरवणी कार्यसूचीत काल रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीबाबतही अनिश्चितता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईतल्या विशेष पी एम एल ए न्यायालयानं काल हा निर्णय दिला. ३१ जुलै रोजी राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली, त्यानंतर आठ ऑगस्टपर्यत ते संचालनालयाच्या कोठडीत होते, नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या सेवालय बालगृह या संस्थेनं एच आय व्ही बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचं प्रातिनिधिक अनावरण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल मुंबईत  झालं. या कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसंच सूर्योदय फाउंडेशनच्या संस्थापक अनुराधा पौडवाल, ॲम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी आणि प्रवीण छेडा, 'सेवालय'चे संस्थापक रवी बापुटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी मुलं उपस्थित होते. यावेळी एच आय व्ही बाधित मुलांनी सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखवणारं लघुनाट्य सादर केलं. सूर्योदय फाउंडेशन तसंच एम्पथी फाउंडेशन या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम करण्यात आलं आहे.
****
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग -सी आय डी कडून, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक -ए टी एस कडे वर्ग करण्यात आला आहे. कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर कोल्हापूर इथं, १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान पानसरे यांचं चार दिवसांनी २० फेब्रुवारी रोजी निधन झालं. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. हत्येला सात वर्षे उलटूनही सीआयडीच्या विशेष तपास पथकाचा तपासात अपेक्षित प्रगती नसल्याने, हा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती, त्यानुसार एटीएसच्या पुणे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १८३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८५ हजार ५६६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ९८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २५ हजार ६४५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १२, लातूर सहा, औरंगाबाद तीन, तर नांदेड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ इथल्या राममंदिरातल्या मूर्तींची चोरी प्रकरणी पोलिसांची पाच तपास पथकं रवाना करण्यात आली आहेत. घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी काल ही माहिती दिली. श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत आणि जांबुवंत या देवतांच्या पंधराव्या शतकातल्या पंचधातूच्या सहा ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. समर्थ रामदास स्वामी स्वत: या मूर्तींची पूजा करत होते. या घटनेचे पडसाद काल विधीमंडळातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता .
****
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं काल यजमान झिम्बॉब्वे संघावर १३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. काल हरारे इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं आठ बाद २८९ धावा केल्या. शुभमन गिलच्या १३० धावांना इशान किशनच्या ५० आणि शिखर धवनच्या ४० धावांची साथ लाभल्यानं, भारत ही धावसंख्या उभारू शकला. कर्णधार के एल राहुलने ३० धावा केल्या. संजू सॅमनसच्या १५ धावा वगळता, इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला झिम्बॉब्वेचा संघ २७६ धावांवर सर्वबाद झाला. शतकवीर शुभमन गील सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी पावणे दहा वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरच्या हिरवळीवर ध्वजारोहण होईल, त्यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात जीवनसाधना पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना प्रदान केला जाणार आहे. प्रसिध्द साहित्यिक बाबा भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आल्याचं, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १३० ग्रामपंचातींच्या इमारतींचं बांधकाम, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना - मनरेगा च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी मनरेगा आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी कुशल अकुशल कामगार आणि पंचायत समिती गणावरती एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीओटी अर्थात बांधा, वापरा, हस्तांतरीत करा यामाध्यमातून काही ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनासाठी गाळे काढण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळणार असल्याचं गटणे या���ेळी म्हणाले.
****
शेवटच्या श्रावणी सोमवारमुळे काल ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
नाशिकमध्ये श्री त्रंबकेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळच्या घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथाच्या दर्शनासाठी काल पहाटेपासूनच शिवभक्त मोठ्या संख्येनं दाखल झाले होते.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास��थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास्थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! कोंबडीची पिल्ले लुटण्यासाठी गर्दी
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! कोंबडीची पिल्ले लुटण्यासाठी गर्दी
पुणे : अहमदनगर-पुणे-नाशिक राष्ट्रीयमहामार्गावर गुंजाळवाडी शिवारात आज शनिवारी पहाटे कोंबड्यांची पिल्ले घेऊन चाललेल्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मात्र यावेळी तोबा गर्दी केलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी पिल्लांची लूट केल्याचा प्रकार घडला. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला.पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात संगमनेरकडे कोंबडीची पिल्ले घेवून जाणारा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
मालाड : अपघातग्रस्तांना आदित्य ठकरे यांच्याकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला | #Malad #MUmbai #BuildingAccident #4lakh #aadityathackeray http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/4-lakh-rs-each-to-the-families-of-the-victims-of-the-malad-building-accident-says-aditya-thackeray/?feed_id=2724&_unique_id=5f112d3e88233
0 notes
Link
0 notes