Tumgik
#आदित्य ठाकरे
rebel-bulletin · 1 year
Text
‘महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही’, आदित्य ठाकरे मुंबईतील वज्रमूठ सभेत कडाडले
मुंबई :  छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
Rahul Gandhi, Aaditya Thackeray Are Capable Of Leading Country: Sanjay Raut
Rahul Gandhi, Aaditya Thackeray Are Capable Of Leading Country: Sanjay Raut
हाल ही में जेल से रिहा हुए संजय राउत ने कहा कि शिवसेना भारत जोड़ो यात्रा का हिस्सा थी. मुंबई: राज्यसभा सांसद संजय राउत ने शुक्रवार को कहा कि कांग्रेस नेता राहुल गांधी और शिवसेना नेता आदित्य ठाकरे देश का नेतृत्व करने में सक्षम दो “प्रमुख युवा नेता” हैं। ठाकरे ने दिन में गांधी की भारत जोड़ो यात्रा में भाग लिया। उन्होंने कहा, “दो प्रमुख युवा नेता, राहुल गांधी और आदित्य ठाकरे, भारत जोड़ो के लिए एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बेळगावी सीमा वादावर आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले
बेळगावी सीमा वादावर आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले
बेळगावी सीमा वादावर आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे सरकारला मदत करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आज आदित्य ठाकरे यांचे वक्तव्यही समोर आले आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तिथेच सोडवायला हवे, हिंसाचार होता कामा नये, असे आदित्य ठाकरे यांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला राज्यभरात प्रारंभ-गणेश स्थापनेसाठी सर्वत्र भाविकांची लगबग
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ पदमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारातल्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
आणि
पॅरिस पॅरालिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला आजपासून प्रारंभ झाला. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथे गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गणेश चतुर्थीला मुंबईच्या लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
****
पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार ८६७ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत असून १२२ सार्वजनिक गणपती विराजमान होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. सकाळच्या सुमारास घरोघरी गणपती स्थापना झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण, तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, गणेश भक्तांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच श्री गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. शहरातल्या वीर सावरकर चौक, फुले मार्केट, गांधी चमन चौक, नूतन वसाहत या भागात भाविकांची गणेश मूर्तीसह पूजेचं साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, यावर्षी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीनं चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसच यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू इथं एका प्रचार सभेत ते बोलत होते. कलम ३७० हटवल्यानंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक असल्याचं शहा यांनी नमूद केलं.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून तत्काळ पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे ५०० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा सुमारे पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
****
धुळे शहराजवळच्या मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी तिघांकडून विदेशी बनावटीचं पिस्तुल आणि ४ जिवंत काडतूसं हस्तगत केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंघ सुरेंद्रसिंघ कालो असं या युवकाचं नाव आहे. अफिम आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या पोगझरा गावात नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन आणि दीड वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या वणी-पिंपळगाव रस्त्यावर आज चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमधे दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्या समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. उद्याच्या समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी १२ अंतिम फेरीत, दिलिप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी ४७ अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारात खरेदी- विक्री करणाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. जालना इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
0 notes
dyanmevaarutm · 19 days
Text
Tumblr media
0 notes
imranjalna · 20 days
Text
आदित्य ठाकरे ने बदनापुर में फसल नुकसान का जायज़ा लिया, सरकार पर लगाए आरोप
जालना: शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने जालना जिले के बदनापुर तहसील के अंबडगांव का दौरा किया और भारी बारिश से प्रभावित किसानों से मुलाकात की. उन्होंने राज्य सरकार पर आरोप लगाया कि उनके दौरे की घोषणा के बाद ही सरकार ने सर्वेक्षण के आदेश दिए हैं. शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने बदनापुर में बारिश से प्रभावित किसानों से मुलाकात की और उनकी समस्याएं सुनीं. उन्होंने सरकार पर किसानों की अनदेखी का आरोप लगाया और…
0 notes
Video
नाशिक आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 34 हजार झाडांचे वृक्षारोपण..
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
icnnetwork · 8 months
Text
#Maharashtra : ‘हिंदुत्व’ को लेकर BJP कर रही राजनीति ! ‘बाल ठाकरे’ का जिक्र कर आदित्य ने कही बड़ी बात!
#BJP4India #ShivsenaUBT #AdityaThackeray #RamMandirPranPrathistha
0 notes
sattakaran · 10 months
Text
31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
0 notes
trendingwatch · 2 years
Text
यदि सीएम अनुमति देते हैं और उपचुनाव का सामना करते हैं तो सप्ताह के भीतर इस्तीफा दे सकते हैं: महा मंत्री सत्तार ने आदित्य ठाकरे से कहा
यदि सीएम अनुमति देते हैं और उपचुनाव का सामना करते हैं तो सप्ताह के भीतर इस्तीफा दे सकते हैं: महा मंत्री सत्तार ने आदित्य ठाकरे से कहा
आखरी अपडेट: नवंबर 01, 2022, 22:51 IST आदित्य और शिवसेना के अन्य नेता (उद्धव बालासाहेब ठाकरे) शिंदे खेमे के 40 विधायकों को इस्तीफा देने और चुनाव का सामना करने की चुनौती दे रहे थे। (फाइल फोटो/पीटीआई) सत्तार ने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की औरंगाबाद जिले में बारिश से प्रभावित किसानों के “ढाई घंटे” के दौरे की आलोचना की महाराष्ट्र के कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने मंगलवार को शिवसेना विधायक आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?  रोहा, रायगडः मैदान कौंनसा भी हो साथ में खेलना है ओर साथ मे जितना है. मातीत खेळण्याची मजा वेगळीच असते; आताच्या काळात आर्टिफिशियल मैदानं आहेत. आपण आपली माती आपली माणसं म्हणतो, तेच चित्र मैदानात असतं, असं वक्तव्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील रोहा आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर-उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
केंद्रीय मंत्रिमंडळाची देशात १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता-राज्यातल्या दिघीचा समावेश
हिंगोली जिल्ह्यात आडगावच्या तलाठ्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू
आणि
१७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना १ सुवर्णासह ४ रौप्य पदकं
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर येत आहेत. उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्यावतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याची माहिती लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. राज्य शासनाने उदगीर नगरपरिषदेला दिलेल्या निधीतून तळवेस इथं बुध्द विहाराची उभारणी करण्यात आली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक दर्जाच्या १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे २८ हजार ६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प असून, त्यातून दहा राज्यांमध्ये सहा मुख्य औद्योगिक मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. नव्यानं तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी या शहराचा समावेश आहे. २०३० पर्यंत भारताची निर्यात दोन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्यासाठी या औद्योगिक मार्गिकांचा मोठा उपयोग होणार आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमातल्या या प्रकल्पातून सुमारे दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं आज रेल्वे मंत्रालयाचे सुमारे सहा हजार चारशे छप्पन्न कोटी मूल्याचे तीन प्रकल्पही मंजूर केले. या प्रकल्पांमुळे देशातले आतापर्यंत रेल्वेनं जोडले न गेलेले भाग जोडले जाऊन पुरवठा साखळीची आणि वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या चार राज्यातल्या सात जिल्ह्यांतून जाणाऱ्या या तीन प्रकल्पांमुळे देशातंर्गत रेल्वेच्या जाळ्यामध्ये तीनशे किलोमीटर्स लांबीच्या रेल्वेमार्गाची भर पडणार आहे. या प्रकल्पांमुळे देशातली तेराशे गावं आणि अकरा लाख लोकसंख्या रेल्वेनं जोडली जाईल. हे प्रकल्प पीएम गती शक्ती, या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. मातृभाषांमधल्या स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकारण करणं थांबवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हा पुतळा नौदलानं उभारला होता, राज्य सरकारनं नाही, तरीसुद्धा या घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि भव्य पुतळ्याची उभारणी, या तीनही पातळीवर राज्य सरकार काम करत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –
नेव्ही यासंदर्भात चौकशी करून उचित कार्यवाही करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती. किंवा त्याच्यामध्ये काय चुका राहिल्या, यासंदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी पी डब्‍ल्यू डी विभागाने एक एफ आय आर केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस विभाग देखील कार्यवाही करेल. आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्याठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत.
या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला असे दोन जण जखमी झाले.
महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक देत, मोर्चा काढला. या मोर्चात विधान सभा तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं निदर्शनं करणार आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुपारी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नांदेड इथं आगमन झालं. ते लातूर मार्गे हिंगोलीला रवाना झाले. नांदेड विमानतळावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांनी तर लातूर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा उद्या सकाळी बीड शहरात दाखल होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव-रंजेबुआ इथल्या तलाठ्याचा आज कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष पवार असं या तलाठ्याचं नाव असून, प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत धारदार चाकूने वार केले. पवार यांना उपचारासाठी परभणीला नेत असतांना, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, एका हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. प्रतीक्षा गवारे हुंडाबळी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी डॉ. प्रीतम शंकर गवारे याला पोलिसांनी आज अटक केली. डॉ प्रतीक्षा यांनी गेल्या शनिवारी आत्महत्या केली होती, तेव्हापासून सदर आरोपी फरार होता.
****
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिव देहावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. विविध चित्रपट, नाटकं तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून असंख्य भूमिका साकारलेल्या देशपांडे यांना कला क्षेत्रातल्या योगदानासाठी राज्य शासनाच्या ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकं पटकावली आहेत. यंदा १७ ते २६ ऑगस्ट या काळात या स्पर्धा झाल्या. बेंगळुरूच्या दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांनी आज फुलंब्री तालुक्यात पाथ्री इथल्या राजश्री शाहू विद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. सगळ्या मुलींनीही आपल्या आई-वडिलांसोबत आणि शाळेतल्या शिक्षकांसोबत संवाद साधावा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांना सांगाव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी विद्यार्थिनींना यावेळी केलं.
****
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर महाविकास आघाडी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने उद्या २९ रोजी सकाळी १० वाजता दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. क्रांती चौक परिसरातल्या झाशी राणी पुतळ्यास अभिवादन करून या दुचाकी फेरीला सुरुवात होणार असून औरंगपुरा भागात सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ या फेरीचा समारोप होणार आहे.
****
0 notes
sharpbharat · 10 months
Text
jharkhand visit of aditya thakrey : शिवसेना के पूर्व मंत्री आदित्य ठाकरे पहुंचे झारखंड, मुख्यमंत्री हेमंत सोरेन से की मुलाकात
रांची : शिवसेना के महाराष्ट्र के विधायक और पूर्व मंत्री आदित्य ठाकरे झारखंड के दौरे पर पहुंचे. श्��ी ठाकरे ने यहां आने के बाद मुख्यमंत्री हेमंत सोरेन से मुलाकात की. मुख्यमंत्री की ओर से बताया गया कि यह शिष्टाचार मुलाकात है. आदित्य ठाकरे शिवसेना के प्रमुख उद्धव ठाकरे के बेटे है. हाल के दिनों में हुए विवाद के बाद वे उभरते राजनीतिक चेहरा के रुप में सामने आये है.(नीचे भी पढ़े) आदित्य ठाकरे की यह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 1 year
Text
माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजयुमो तर्फे आंदोलन
**माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या छत्रपती शिवाजी महाराजा बद्दलच्या बेताल वक्तव्याचा भाजयुमो तर्फे आंदोलन व निदर्शने* रविवार कारंजावर निदर्शने … ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी.. .नाशिक – महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंड येथून परत आणण्याच्या घोषणा केली यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखे खरंच शिवाजी महाराजांची आहेत काय.. तसा पुरावा काय.. अशाप्रकारे बेताल प्रश्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
40 चोरांना जनतेत फिरू द्यायचे नाही आदित्य ठाकरे चिडले..
0 notes