Tumgik
#करण्यासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, आईचा मृतदेह 5 दिवस पलंगाखाली लपवला! कळलं कसं?
अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, आईचा मृतदेह 5 दिवस पलंगाखाली लपवला! कळलं कसं?
अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, आईचा मृतदेह 5 दिवस पलंगाखाली लपवला! कळलं कसं? गोरखपूर : एका 45 वर्षीय मुलाने आपल्या आईचा मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला होता. घरातून जेव्हा घाणेरडा वास येऊ लागला, तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता त्यांना जे दिसलं, ते भयंकर होता. एका वृद्ध महिलेचा मृतदेह पलंगाखाली सडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. मंगळवारी ही घटना…
View On WordPress
0 notes
rautsatish · 1 year
Text
0 notes
kamlakar-das · 2 months
Text
Tumblr media
अमर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भक्तीचा विधी कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी पवित्र पुस्तक ज्ञानगंगा जरूर वाचा ही पुस्तक तुम्हाला निशुल्क तुमच्या घरपोच पत्त्यावर दिली जाते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता किंवा फेसबुकवरील तुम्ही ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल विचारपूस करू शकता
3 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही कि���मत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
Text
Tumblr media
ब्रम्हाजी यांना तप करण्यासाठी कोणी प्रेरित केले
पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes · View notes
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Tumblr media
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes · View notes
shankar9373 · 2 years
Text
Tumblr एक इंटरनेटवरील एक साधन आहे. जे वापरकर्त्यांना टंबल ब्लॉक किंवा लहान ब्लॉक पोस्ट प्रकाशित करण्याची अनुमती देते हे ॲपप्लीकेशन स्वरूप आहे तसेच वापरकर्त्यांची स्वतःची पुष्टी किंवा पाने मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याची क्षमता प्रदान करते या समाज माध्यमाद्वारे आपण वापरकर्त्या छायाचित्रे संगीत दृश्य श्राव्य आशय लिंक वचने आणि इतर बहुहित माध्यमे शेअर करण्यासाठी मायक्रो ब्लॉक चा उपयोग शेअर केला जातो तसेच यामध्ये प्रतिक्रिया घेण्यासाठी एक स्वातंत्र्य सेक्शन तयार केला आहे.
11 notes · View notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Bandya च्या मित्रानं त्याच्या हाताच्या दहाच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या…
Bandya चकितच झाला! त्याला राहावलं नाही. त्यानं कारण विचारलं…
अरे बाबा, ही कुठली पद्धत दहा बोटांत अंगठ्या घालण्याची?
Pradip म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या ९ अंगठ्या लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत.
Bandya नं मित्राचे पाय धरले…
2 notes · View notes
vinodtawde · 1 year
Photo
Tumblr media
कोल्हापूरला महालक्ष्मी मंदीरात अंबाबाईचे दर्शन हे नेहमीच चांगल काम करण्यासाठी उर्जा देते.   #tawdevinod
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला
सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला
सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर कला क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली. उत्तम चित्रपटांची निवड करुन त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. पण या झगमगत्या दुनियेत विकीने त्याचा साधेपणा कायम ठेवला आहे. विकीचा हा नम्र आणि साधेपणा त्याच्या पालकांकडून आला आहे यात कोणताही वाद नाही. सध्या विकी…
View On WordPress
0 notes
sakarbhar · 2 years
Text
😊🌹🌹🌹👇🏻👇🏻
"ज्ञान गंगा" पुस्तक. अगदी
विनामूल्य ऑर्डर करण्यासाठी
नाव:-......
पत्ता, पिनकोड:- ......
मोबाईल नंबर :-......
पुस्तकाचे नाव :-........
कमेंट बॉक्स मध्ये द्या
संत रामपाल जी महाराज द्वारा लिखित.
Tumblr media Tumblr media
2 notes · View notes
maximumlovenacho · 2 years
Text
Time Importance Quotes In Marathi || तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती.
मित्रानो कोणतेही काम हे वेळेतच पूर्ण करा. मित्रांनो आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल पण गेलेली वेळ मात्र कधीच येणार नाही. Time Importance प्रत्येकाने पाळले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक कामाचं एक नियोजन ठरवा , म्हणजे एखाद काम यशस्वीरीत्या तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर त्या कामाचं नियोजन असला पाहिजे . ते काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे आणि आणि ते सर्वोत्तम कसा होईल याच नियोजन केलं पाहिजे. काम जास्त असल्यास कधी तक्रार करू नका कामाचे योग्य नियोजन केले तर ते ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल.
Read More -
2 notes · View notes
kunallife · 2 years
Text
Tumblr blog:-
हे एक microblogging व समजमाध्यामाचे इंटरनेटवरील एक साधन आहे .जे वापरकर्त्याना ते tamblr ब्लॉग किंवा लहान ब्लॉग पोस्ट प्रकाशित करण्याची अनुमती देते . हे application सारखे website चे स्वरूप आहे. तसेच वापरकर्त्यांची स्वतःची पाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याची क्षमता प्रदान करते. या समजमाध्यामाद्वारे वापरकर्ते छायाचित्रे , संगीत, video-adio visual ,links वचने, आणि इतर बहुहित माध्यमे शेअर करण्यासाठी micro blogging चा उपयोग केला जातो. तसेच यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी एक स्वातंत्र्य section तयार केला आहे . जो नक्की आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो..
4 notes · View notes
airnews-arngbad · 18 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्जमंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पाहणी केली. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात २८ केंद्राचा शुभारंभ झाला. आपले कौशल्य आणखी प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या केंद्राचा उपयोग करावा, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.
परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत धर्मापुरी इथल्या ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सिंग इथं शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम झाला. धाराशिव जिल्ह्यात १८ केंद्राचा शुभारंभ झाला. बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं.
****
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शाह यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, कोल्हापूर इथं भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज जनसंवाद यात्रा काढली. खासदार शिंदे यांनी मालाड, मागाठाणे, कांदिवली, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी इथं जनसंवाद बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
****
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता बांधण्‍यात येत आहे. शामलदास गांधी मार्ग उड्डाणपूल ते वरळीपर्यंतच्या या मार्गाचं ९२ टक्‍के काम पूर्ण झालं आहे. उद्या शनिवारपासून हा रस्ता दररोज सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
****
नंदुरबार शहरात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या वादप्रकरणी ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार विधी संघर्ष त्रस्त बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी फरार ५४ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
****
जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ आज सकाळ�� साडे आठच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील वाहकासह तीन महिला प्रवाशी आणि ट्रकमधील चालक, वाहक असे सहाजण जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३ जणांवर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस गेवराईहून जालन्याला जात असताना बीडकडे जाणाऱ्या संत्र्याच्या भरधाव ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं बसच्या चालकानं सांगितलं.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.
****
चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. आज सकाळी भारताचा पहिल्या डाव ३७६ धावांवर आटोपला, भारतानं कालच्या ३३९ धावांवरुन आज डाव सुरु केला. अवघ्या ३७ धावातच भारताचे चार फलंदाज तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
अहमदनगर इथं माळीवाडा परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेशी शपथ दिली, तसंच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे आज रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कारभारी दिवेकर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होत तीन टन कचरा उचलला. नांदेड इथं विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत डी. आर. एम. कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका आज काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११ नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 23 hours
Link
https://marmikmaharashtra.com/prarthana-behre-joins-castingvibe-in-her-search-for-meaningful-roles/
0 notes
rohini-0306 · 3 days
Text
0 notes