Tumgik
#काँग्रेसचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
शिंदे-फडणवीसांनी ‘समृद्धी महामार्ग’ वरून प्रवासासाठी वापरलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप
शिंदे-फडणवीसांनी ‘समृद्धी महामार्ग’ वरून प्रवासासाठी वापरलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप
शिंदे-फडणवीसांनी ‘समृद्धी महामार्ग’ वरून प्रवासासाठी वापरलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप samruddhi highway : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ट्रायल घेतली. या महामार्गावरून फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे सारथ्य करताना जी गाडी वापरली तिच्या मालकावरून काँग्रेसने निशाणा…
View On WordPress
0 notes
Video
youtube
आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला..
0 notes
6nikhilum6 · 28 days
Text
Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच – माजी महापौर कविचंद भाट
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाची सत्ता (Pimpri) आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा आमदार निवडून आणणारच हा संकल्प करावा, असे मत माजी महापौर कविचंद भाट यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड…
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
१८ व्या लोकसभेची स्थापना प्रक्रिया पूर्ण-निवडणूक आचारसंहिता समाप्त 
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय पक्षांच्या बैठकांची सत्रं सुरू
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी २७ जूनपासून
छत्रपती शिवाजी महाराजांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेचा पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय
आणि
नैर्ऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं १८ व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया काल पूर्ण केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या खासदारांची यादी सुपूर्द केली. त्यानंतर आयोगानं निवडणूक आचारसंहिता समाप्त झाल्याचं घोषित केलं. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्विरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाल्यानं, मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
****
देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल ही सुधारित आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून, ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
केंद्रात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी काल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. जनता दल संयुक्तच्या नेत्यांची काल दिल्लीत नीतीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे.
****
शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत चर्चा केली. निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलो याचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर�� यांची मुंबईत त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनीही मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काल मुंबईत बैठक झाली. यानंतर वार्ताहरांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलं. या निकालांची सर्वस्वी जबाबदारी आपण स्वीकारली आहे, मात्र, या अपयशानं खचून न जाता नव्या उमेदीनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल नवनिर्वाचित खासदारांसह मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या विरोधात मतदारांमध्ये अधिक नाराजी असून, येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसेल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र त्यांना सोपवलं.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी २७ जूनपासून सुरू होणार आहे. मुंबईत काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक वेगानं तोडगा काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावं यासाठी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे यांना विनंती केल्याची चर्चा मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एक आणि केरळच्या तीन जागांसाठी काल अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधल्या तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यात १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार असून, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा काल राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
**
कोल्हापुरात महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार देखील अनुभवायला मिळाला.
**
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही पार पडलं.
**
नांदेड जिल्हा परिषदेच्‍यावतीने भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महाराजांच्या पुतळयास पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणी इथंही जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी भागवी पताका उभारुन शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन केलं.
दरम्यान, नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल टेक्सास इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने निर्धारित षटकात सात बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या संघाने देखील २० षटकात १५९ धावा केल्यानं, सुपर ओव्हर घेण्यात आली. यामध्ये अमेरिकेनं १८ तर पाकिस्ताननं १३ धावा केल्या.
अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं ओमानचा ३९ धावांनी, तर युगांडानं पापुआ न्यू गीनीचा तीन गडी राखून पराभव केला. भारतीय वेळेनुसार आज पहाटे बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात स्कॉटलंडनं नामिबियावर पाच गडी राखून विजय मिळवला.
****
जर्मनी मधल्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगने सुवर्णपदक पटकावलं. त्याने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४२ पूर्णांक सात गुण मिळवत ही कामगिरी केली.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पाऊस पोहचला असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात आज पहाटे जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या तळणी इथं वीज पडून शंकर धर्मेकर या तरुणाचा मृत्यू झाला. शंकर हा त्याच्या भावासह पाऊस पडत असल्यानं एका शेतात झाडाखाली थांबला असताना ही घटना घडली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. बाजारात जर बियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस किंवा अनधिकृत विक्री तसंच साठा केल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत दिले.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आठ जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते काल दहा रास्तभाव दुकानदारांना नविन ई-पॉस मशिनचं वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे उपस्थित होत्या.
****
परभणी जिल्ह्यात काल पिता पुत्राचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या जीपला भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागलेल्या प्रत्येक गावात जलसमृद्ध गाव अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, यासाठी भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यात किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार झाडं लावण्यात आली. भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
****
0 notes
mhlivenews · 7 months
Text
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता देशमुख बंधूंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष
लातूर: राज्यात विखे पाटील यांच्या नंतर काँग्रेचे निष्ठावंत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत कमळ हाती घेतले. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत आमदार देशमुख बंधूं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या निर्णयावर लातूरमधील भाजपचे माजी मंत्री आमदार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 year
Text
0 notes
knowledgenews1 · 1 year
Text
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी त्यानंतर लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
' बरं झालं गेलो नाही ' , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Election | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महविकास आघाडीचा डंका; पहा सविस्तर आकडेवारी...
Tumblr media
Election | राज्यात काल (ता.२९) शनिवार या दिवशी १४७ समित्यांपैकी १४५ समित्यांचे निकाल हाती आले आहेत. अशातच आता ७९ बाजारसमित्यांमध्ये महाविकास आघाडीचा डंका पिटला जातो. तसेच भाजप – शिवसेना युतीला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच ३७ जागांवर इतर आघाड्यांवर यश मिळालं आहे. अशातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. बीड आणि लातूरमध्ये पंकजा मुंडेंना अपयश बीडमधील परळी येथे झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत पराभव केला. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारसमितीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. १८ जागांपैकी १५ जागांवर मविआने बाजी मारली. यावर आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे अभिनंदन केलं. तसेच लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राहिला. उदगीरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत पॅनलने झेंडा फडकविला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा गड कायम बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बारामती हे समीकरण नवीन नाही. अशातच काल झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. भाजपच्या चारी मुंड्या चित केलं. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांमध्ये काल बाजारसमित्यांमध्ये चुरस रंगली आहे. विखे पाटलांकडून एकही पॅनेलचे खाते उघडले गेले नाही. या ठिकाणी बाळासाहेब थोरात विजयी झाले. खानदेशात दादा भुसेंवर ब्रेक नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीत दादा भुसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव करण्यात आला होता. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना सत्ता गमवावी लागली. येवल्यात छगन भुजबळ वरचढ पहायला मिळतात. चंद्रपूर येथे काय झालं सात समित्यांवर काँग्रेस, दोनवर भाजप चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने, तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून, तर चिमूर बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत रवी राणा चारी मुंड्या चित अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चीत केले. कर्जतमध्ये टाय टाय फिश अहमदनगर आणि कर्जतमधील बाजारसमितीच्या निवडणुकीत १८ काहीच निकाल हाती आला आहे. दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला ९ आणि रोहित पवार गट यांना ९ जागा मिळाल्या आहेत. संभाजीनगरात शिंदे – भाजप गटाचा डंका संभाजीनगरमध्ये शिंदे आणि भाजप गटाचा डंका पिटला आहे. १५ पैकी ११ जागांवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
पक्षातील नेते आक्रमक : ‘या’ पक्षाचं थेट निवडणूक आयोगालाच आव्हान
कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पक्षाच्या यादीत टीएमसीचा समावेश नसणार. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा टीएमसीने निषेध व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, टीएमसी आता या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहे. त्यामुळे टीएमसी आणि सत्ताधारी हा वाद विकोपाला जाण्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं
काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं
काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं नाना पाटेकर यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं. “काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं,” अशी माहिती नाना पाटेकरांनी दिली. तसेच हे फक्त गडकरीच करू शकतात, असंही नमूद केलं. ते खासदार (संसद) सांस्कृतिक महोत्सव…
View On WordPress
0 notes
Video
youtube
काँग्रेसचा गमचा ठाकरेंच्या गळ्यात..
0 notes
punerichalval · 2 years
Text
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही - काँग्रेसचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही – काँग्रेसचा सवाल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून, भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण, आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार
निवडणुकीसाठी काँग्रेसचा न्यायपत्र हा जाहीरनामा प्रसिद्ध
देशाच्या न्यायिक क्षेत्रांमध्ये महिलांचं वाढतं प्रमाण ही खूप अभिमानाची बाब - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन
आणि
छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. यामध्ये राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण ३५२ पैकी २९९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात ६६, तर परभणी इथं ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. हिंगोली लोकसभा मतदार संघात ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. या मतदारसंघात विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून, त्यांचा हा अर्ज वैध ठरला असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २५,  अकोला - १७,  अमरावती - ५६,  वर्धा - २६, तर  यवतमाळ-वाशिम मतदरासंघात २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आठ एप्रिल ही असून, या मतदारसंघांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. न्यायपत्र या नावानं हा जाहीरनामा काढण्यात आला असून, त्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटीचा उल्लेख केला आहे. युवक, शेतकरी, महिला, आणि कामगार या वर्गांसाठी विविध घोषणा काँग्रेसनं यात केल्या आहेत. युवकांना रोजगार न मिळाल्यास वार्षिक एक लाख रुपये बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना वार्षिक एक लाख रुपये अर्थसहाय्��, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव, मनरेगामार्फत किमान ४०० रुपये दररोज मजुरी, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जाति आधारित जनगणना, संवैधानिक संस्थांचं जतन, आदी मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.
****
मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी काल नवी दिल्लीत घेतली, त्यात ते बोलत होते. या बैठकीमध्ये राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे या पालिकांचे आयुक्त सहभागी झाले होते. मतदान करण्याचा अभिमान वाटावा अशा प्रकारे जागृती करण्याचं आवाहन कुमार यांनी यावेळी केलं.
****
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले असून, राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी २०, धाराशिव १६, बीड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी सहा, जालना पाच, तर परभणी जिल्ह्यात चार मतदान केंद्र महिला नियंत्रित असणार आहेत.
****
मुंबईतल्या चेंबूर आणि गोवंडी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोनशेहून जास्त पदाधिका-यांनी, काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग सातव्यांदा रेपो दर साडे सहा टक्के ठेवला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. बँकेत रक्कम जमा करण्यासाठीच्या यंत्रांमध्ये युपीआयचा वापर करून पैसे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच परवानगी देणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय, होईल आणि बँकांमध्ये पैसे हाताळण्याची प्रकिया अधिक कार्यक्षम होईल असं दास यांनी सांगितलं.
****
भारताच्या न्यायिक क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण वाढत असून, गेल्या दहा वर्षात अनेक महिला वकील उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत, ही खूप अभिमानाची बाब असल्याचं, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या, शतकोत्तर समारंभात ते बोलत होते. कुठल्याही बार असोसिएशनची भूमिका ही न्यायालयामध्ये न्यायप्रक्रियेला सामान्य माणसाला सहज बनवण्याची असावी, असं सांगतानाच सरन्यायाधीशांनी, नागपूर बार असोसिएशन तर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘न्याय दूत’, या निःशुल्क न्यायिक सहायता करणाऱ्या उपक्रमाचं कौतुकही केलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यावेळी उपस्थित होते.
****
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठीचं आरक्षण विचारात घेऊन नव्यानं आरक्षण निश्चिती करून, लवकरच परिक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कळवलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम, २०२४ मधल्या तरतुदीनुसार, २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या, किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवण्यात आले आहेत मात्र निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन नव्यानं आरक्षण निश्चिती करून घेणं गरजेचं असल्यानं, आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
****
मतदार जागृती कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या किराडपुरा भागातल्या, मनपा केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, काल रहीम नगर, बारी कॉलनी, किराडपुरा, सेंट्रल नाका या विभागात फेरी काढून जनते‌ला मतदान करण्याबाबत आवाहन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीबाबत पथनाट्यही सादर केलं. याशिवाय, माझे आई बाबा मतदान करणारच, माझे आजी आजोबा मतदान करणारच, या घोषवाक्याचे फलक विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात चिकटवले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं, पैठण आणि फुलंब्री विधानसभा क्षेत्रनिहाय केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडलं. निवडणूक कामकाजाकडे सकारात्मकतेने पहा आणि कामकाज करा, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं.
****
परभणी लोकसभा मतदार संघाच्या ‘स्वीप’ कक्षामार्फत १८ वर्षावरील युवक-युवतींसाठी, मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या विषयावरील रिल्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला असून, पुढचे काही दिवस प्रशासन आणि पोलिसांनी अत्यंत दक्षतेनं एकत्रितपणे काम करावं, असं आवाहन, सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी केलं आहे. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कठोरपणे हाताळण्याचे, आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही, मिश्र यांनी यावेळी दिले.
****
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांच्या वीस टोळ्यांमधल्या साठ जणांना हद्दपार तर चौदा जणांना तुरुंगात स्थानबद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या ८२ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात पाणटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल माजलगाव धरणाची पाहणी केली. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पाणीटंचाई असून, नीट व्यवस्थापन करून पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना कमी पोहोचतील अशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन अभियान अतिशय दक्षतेनं राबवण्यात येत असून, यंदाच्या लग्नसराईत बाल विवाह लावून दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सुधीर ढाकणे यांनी दिला आहे. मंगल कार्यालय मालक तसंच धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांनी वधुवरांच्या वयाची खात्री कागदपत्रांवरून करून घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. बाल विवाह होत असल्यास नागरिकांनी, एक शून्य नऊ आठ, या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
रासायनिक खतांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती करण्यासाठी, आणि सेंद्रीय खतांची माहिती देण्यासाठी, विश्व संवाद केंद्राच्या ग्रामविकास गतीविधी अभियानाच्या वतीनं, गुडीपाडवा ते अक्षय्यतृतीया दरम्यान, भूमी सुपोषण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे देवगिरी प्रांत कार्यकारणी सदस्य भालचंद्र कानडे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं ही माहिती दिली. या अभियानात सेंद्रीय खताची माहिती देणारे जनजागृतीपर कार्य़क्रम घेतले जाणार आहेत.
****
हिट अँड रन केस मध्ये अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याबाबतचा निपटारा जलद व्हावा, असे निर्देश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. बीड इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं यावर्षी १२ जानेवारीला दिलेला निर्णय सर्वच संबंधित यंत्रणांना लागू असून, या निर्णयाची नीट अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
हवामान
राज्यात काल सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात सरासरी ४१ अंश सेल्सिअस, बीड इथं ४०, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, आजपासून येत्या नऊ तारखेपर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
0 notes
mhlivenews · 7 months
Text
परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?
मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी या निमित्तानं भाजपनं करुन पाहिली. भाजपनं तिसरा उमेदवार देत निवडणूक चुरशीची केली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेगवार संजय पवारांचा पराभव झाला होता. गेल्या दीड वर्षांत परिस्थिती बरीच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के...’! : केशव उपाध्ये
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…’! : केशव उपाध्ये
अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के’ असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes