Tumgik
#कुडाळ.
kokannow · 2 years
Text
कुडाळमध्ये जल्लोष !
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव कुडाळ : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळालाय. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची आजच सुटका होईल. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत तुरुंगात होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता-सोमवारी मतदान
मुंबईत आज महायुतीची शिवाजी पार्कवर तर महाविकास आघाडीची बीकेसीवर जाहीर सभा
सीमा शुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावरून सुमारे साडे ११ किलो सोनं जप्त
आणि
मराठवाड्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
****
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता होत आहे. राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते मोदी यांच्यासोबत एकत्र सभा घेत आहेत.
महायुती तसंच महाविकास आघाडीकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल -बीकेसीच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे यांनी आज धुळ्यात सभा घेतली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं आज सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. अनिल गोपछडे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली, यामध्ये रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभूत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश असल्याचा दावा गडकरी यांनी केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी तेरा जागा, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारमधल्या आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन जागा आणि केंद्रशासित प्रदेश ���ंदीगडच्या एका जागेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आज ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक तयारीची पाहणी केली. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसंच ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी चोकलिंगम यांना निवडणूक तयारी विषयीची सविस्तर माहिती दिली.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचा अखेरचा भाग आज प्रसारित होणार आहे. आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
सीमा शुल्क विभागाने १३ ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अटल मॅरेथॉन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत अविनाश परीट याने देशात बारावा क्रमांक पटकावला आहे. "कारखान्यांच्या परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणावरील उपाय" अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीतच्या प्रकल्पाची दिल्ली इथं होणाऱ्या 'स्टुडन्ट इंटरप्रन्युअरशिप प्रोग्रॅम'साठी निवड झाली आहे. अटल मॅरेथॉनसाठी देशभरातून शंभर कल्पना निवडण्यात आल्या आहेत.
****
आषाढीवारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावरील तसंच पंढरपूर शहरातील बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या खातेप्रमुखांच्या प्रशासकीय बैठकीत त्या आज बोलत होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे, एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी घेतलेला हा आढावा -
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. जिल्ह्यातल्या ९० गावात १३२ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून ४४७ गावात ८३२ विहिरी आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा होत आहे. यात सर्वाधिक ४० टँकर भूम तालुक्यात तर चार टँकर तुळजापूर तालुक्यात सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील २२६ सिंचन प्रकल्पांपैकी ७१ प्रकल्प कोरडे पडले असून १०६ प्रकल्पात जोत्याखाली तर ३४ प्रकल्पात २५% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा तसंच खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.
महानगरपालिका, नगरपालिका, तालुका ते गावपातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या १ जूनपर्यंत पूर्ण करावीत. संपर्क आणि समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे निर्देश स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.
त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नूतनीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पीक कर्ज देतांना बॅंकांनी संवेदनशीलतेने प्रकरणे हाताळावीत अशी सूचना त्यांनी कहरीप हंगाम आढावा बैठकीत केली.
****
मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे पाच दिवस वादळी वारा, मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या १८ मे नंतर विभागाच्या तापमानातही तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचं, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने कळवलं आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
शेतकऱ्यांनी १ जूनपर्यंत कापसाची लागवड करु नये असं आवाहन बीड कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी ही खबरदारी घ्यावी असं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरणी १६ दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघट��� सुनील घनवट यांनी केली आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा!
https://bharatlive.news/?p=187557 सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा!
कुडाळ, पुढारी ...
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
स्वर्गाच आभाळ जणु हे कुडाळ ❤️ . ✍️📷🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #konkancha_nisarga #kokan_the_heaven_on_earth #busstop #busdepot #kokandiaries #kokan_amchi_shaan #kokani #kudal #konkan_ig #kokanmaharashtra #sindhudurg #lalpari #msrtc #bus #kokanchi_shan #talkokan #bestofdays #clouds #naturestones #colorsofkokan #kokanlovers #tripadvisor #incredibleindia #mhtourism #maharastra #kokanphotography #konkanphotography #kokandiaries🌴 ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and pramotion 🤗 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kudal , Sindhudurg) https://www.instagram.com/p/CotWLsovJjh/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mhlivenews · 4 years
Text
शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष
शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष
  कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ परिसरातील शाळांची घंटा आता वाजणार असून याकरिता गेली चार दिवसांपासून भागातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरूवात झाली आहे. कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून यासाठी योग्य नियोजन केले आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवता येणार असल्याने शिक्षक वर्गात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे निम्यापेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. सद्यस्थितीत…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
आमदार महोदयांना रेशन धान्य दुकानांवरील नागरिकांचे होणारे हाल दिसत नाहीत का ?
आमदार महोदयांना रेशन धान्य दुकानांवरील नागरिकांचे होणारे हाल दिसत नाहीत का ?
आमदार वैभव नाईकांनी प्रथमतः दक्षता समितीचा आढावा घ्यावा : मनसेचा टोला, आमदारांकडून कोविडनंतर एकदाही तालुका दक्षता समितीची बैठकी नाही, जनतेच्या प्रलंबित कामांच्या आढाव्यासाठी गेल्या दोन वर्षात आमसभा का घेतली गेली नाही?, आमदार वैभव नाईकांना मनसेचा खरमरीत सवाल कुडाळ : शासनाच्या रास्त दराच्या दुकानांवर पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या वितरणावर नियंत्रण ठेवणेसाठी शासन स्तरावर तालुका दक्षता समिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
रेशनवर धान्य ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावे !
रेशनवर धान्य ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावे !
अन्यथा आंदोलन करावे लागेल- विजय प्रभू कुडाळ : रेशनवर धान्य हे ऑनलाईन पद्धतीने दिले जाते. सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे अंगठा लावून ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी होण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लोक लांबून पायपीट करत येतात तासनतास थांबतात पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होतो आणि येवढे करून ऑनलाईन नोंदणी होत नाही. यामुळे ब-याच जणांना दिवाळीच्या दिवसात आपल्या हक्काचे धान्य मिळाले नाही.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी कुडाळ पोलीस ठाण्याला अचानक भेट देत येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येथील नवीन पोलीस वसाहत बांधण्यासंदर्भातही माहिती घेतली. तसेच याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभकुमार अग्रवाल यांनी नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी कार्यभार स्वीकारला. यानंतर आज सायंकाळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
एमआयडीसीच्या वेळकाढू कारभाराविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषण करणार
एमआयडीसीच्या वेळकाढू कारभाराविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषण करणार
नेरूर-वाघचौडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे यांची माहिती कुडाळ : तालुक्यातील नेरूर-वाघचौडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम बाळकृष्ण गावडे यांनी जोडरस्ता आणि स्मशानभूमीसाठी भूखंड मिळण्यासंदर्भात अनेकदा प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी कार्यालय-रत्नागिरी यांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, कार्यालयाकडून या मागणीसंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच या पत्रव्यवहाराला कोणतेही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कोचरा येथे परप्रांतीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू
कोचरा येथे परप्रांतीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू
कुडाळ : विजेच्या तारेचा शॉक लागून वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे-आगारवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. लोकनाथ चित्तरंजन सरकार उर्फ छोटू (वय २४) असे त्या कामगाराचे नाव आहे. कोळंबी प्रकल्पाचं नुकसान करणाऱ्या पाणमांजरांना रोखण्यासाठी विजेच्या तारा लावण्यात आल्या होत्या. त्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
स्मार्ट गाव पणदूर आता असणार सीसीटीव्हीच्या नजरेखाली
स्मार्ट गाव पणदूर आता असणार सीसीटीव्हीच्या नजरेखाली
गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी मिळणार पूर्ण वेळ मोफत हायस्पीड इंटरनेट सुविधा, असा अभिनव उपक्रम राबविणारी पणदूर ग्रामपंचायत ठरणार राज्यातील पहिली ग्रामपंचायत कुडाळ : कै.आर. आर. आबा पाटील सुंदर गाव (SMART) स्पर्धेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल ठरलेले कुडाळ तालुक्यातील “स्मार्ट गाव पणदूर” आता अधिकच स्मार्ट होणार आहे.पणदूर ग्रामपंचायत राबवत असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत सर्व मुख्य व अंतर्गत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
पावशी येथील मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पावशी येथील मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
संघर्ष मित्रमंडळ-पावशी, सातेरी क्लिनिक पावशी आणि पूर्वा मेडिकल स्टोअर्स-पावशी यांचे आयोजन कुडाळ : संघर्ष मित्रमंडळ-पावशी, सातेरी क्लिनिक पावशी आणि पूर्वा मेडिकल स्टोअर्स-पावशी आयोजित जागतिक हृदयदिनानिमित्त पावशी ग्रामपंचायत सभागृहात भव्य मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर २९ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडले. सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडलेल्या शिबिरास पावशी गावातील नागरिकांनी उत्स्फ़ुर्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कुडाळमध्ये विद्यार्थ्यांमध्ये 'फ्री स्टाईल'!
कुडाळमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’!
पोलिसांनी पालकांसमक्ष ”त्या” दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना घेतले फैलावर कुडाळ : तालुक्यातील एका मोठ्या विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना मारण्याच्या उद्देशाने दांडे व लोखंडी पाईप घेऊन ”एन्टी” केल्याची घटना काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. दांडे व पाईप आणलेल्या त्या विद्यार्थ्यांनी मग भीतीने पळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून मंदार शिरसाट यांची नियुक्ती
कुडाळ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची निवडणूक येत्या १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. यासाठी चंदगड, राधानगरी आणि कागल या विधानसभा कार्यक्षेत्रासाठी युवासेना प्रतिनिधी म्हणून कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना अध्यक्ष मंदार शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेचा मृत्यू
कुडाळ : तालुक्यातील गोवेरी येथील संचिदा सच्चिदानंद माधव (वय २२) या महिलेला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला गोवा-मणिपाल येथे हलविण्यात येत असताना रात्री २ वाजता वाटेतच तिचा मृत्यू झाला. मेंदूतील रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानुसार आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून विजयोत्सव
कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून विजयोत्सव
कुडाळ : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके लावून आणि जोरदार घोषणाबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आली. कुडाळ शिवसेना शाखेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, उदय मांजरेकर, किरण शिंदे, अमित राणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes