Tumgik
#जीवनगौरव
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला Sulochana Chavan Passed Away: लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनाला चटका लावणारी बाब म्हणजे ज्या दिवशी दुपारी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्याच संध्याकाळी त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन ठाण्यामध्ये सन्मानित करण्यात येणार होते. Sulochana Chavan Passed…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही गाड्या आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस धावणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. 
****
देशभरात आज ईद - ए - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल, असं आग्रही मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. राष्ट्रीय अभियंता दिनानिमितत काल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते. यंदाचा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्फेरोकास्टचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांना देण्यात आला.
****
केंद्राच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे. संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते काल पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथल्या शासकीय  तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद आणि बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार ६५३ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता  पवनकुमार कछोट  यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरालगत हर्सूल इथल्या हरसिद्धी माता मंदिरात भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरता २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असं आश्वासन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला आणि मंदिर परिसराची पाहणी केली.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रिकेश मोरे असं या मुलाचं नाव असून, तो गणेशपूर पिंप्री इथला रहीवासी होता. अन्य एका घटनेत गौताळा अभयारण्यातल्या औट्रम घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला आहे. वन्यजीव पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. जखमी बिबट्या धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे घाटातून प्रवास करणार्यांनी सावधानता बाळगावी, असं आवहान वन विभागाने केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Maharashtra News : चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान;महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न
एमपीसी न्यूज – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम, (Maharashtra News )चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023 एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले. वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण  करण्यात…
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण मुंबई, दि. १७:  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार,  गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान…
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Hello
Tumblr media
Filmfare awards 2023 Ceremony Highlights and Winners Updates : नुकताच मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडलाय. या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिला मिळाला आहे.
मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे आयोजन मुंबईतील बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये करण्यात आले. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाने देखील फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बाजी मारलीये. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आज रात्री 9 वाजता हा फिल्मफेअर अवॉर्ड्स कॅलर्स टिव्हीवर बघायला मिळणार आहे. गोविंदाचा धमाकेदार असा डान्स देखील पार पडलाय. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे मैदान हे आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने मारले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे. बधाई दो चित्रपटाने देखील सर्वांना मोठा धक्का देत अनेक अवॉर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा देखील जलवा बघायला मिळाला. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटाला कोणता फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाला आहे. 68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा (Filmfare Awards 2023 Winners List)  सर्वोत्कृष्ट अभिनेता – राजकुमार राव (बधाई दो) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट चित्रपट – (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा सर्वोत्कृष्ट संवाद – प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (जुग जुग जियो) सर्वोत्कृष्ट पटकथा – अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो) सर्वोत्कृष्ट कथा – अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो) Congratulations! The Filmfare Award for Best Film goes to #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/bpJKuXrCm5 — Filmfare (@filmfare) April 27, 2023 आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकून बाजी मारली आहे. फक्त आलिया भट्ट हिला नाही तर चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड्स मिळाला आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स न मिळाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावावर करत एक इतिहास निर्माण केलाय. सोशल मीडियावर चाहते हे फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाल्याबद्दल आलिया भट्ट हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years
Text
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास���त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर…
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 2 years
Text
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. डी. एच. थोरात, डॉ. पांडुरंग पवार, गौतमचंद सोळंकी, मौलाना मोहम्मद रमजान छोटू पटेल यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
0 notes
nashikfast · 2 years
Text
महावीर इंटरनॅशनलचा 47 व्या वर्धापन जीवनगौरव पुरस्कार वितरण
महावीर इंटरनॅशनलचा 47 व्या वर्धापन जीवनगौरव पुरस्कार वितरण
नाशिक : जैन समाजात विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महावीर इंटरनॅशनलचा 47 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्या समाजबांधवांनी सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजनैतिक, खेळ क्रीडा, सहकार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे अशा समाज रत्नांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव करून सन्मानित करण्यात आले. प.सा नाट्यगृह औरंगाबादकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन लोढा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Felicitated | पत्रकार प्रकाश कुलथे व सौ.स्नेहलता कुलथे यांचा जीवनगौरव पुरस्कारप्राप्तीबद्दल सत्कार
#Felicitated | पत्रकार प्रकाश कुलथे व सौ.स��नेहलता कुलथे यांचा जीवनगौरव पुरस्कारप्राप्तीबद्दल सत्कार #Shrirampur #Ahmednagar
Felicitated | श्रीरामपूर (शौकतभाई शेख) –  येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे आणि सौ. स्नेहलता प्रकाश कुलथे यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कारप्राप्तीबद्दल अनेक संस्था, संघटना,व्यक्तींतर्फे सत्कार संपन्न झाला.    ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन प्राचार्य टी.ई. शेळके. साहित्यिक प्राचार्य शंकरराव अनारसे,वाचन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रसिद्ध उर्दू साहित्यिक इर्तेजा निशात यांचा ‘पासबां-ए-अदब’ संमेलनात गौरव
प्रसिद्ध उर्दू साहित्यिक इर्तेजा निशात यांचा ‘पासबां-ए-अदब’ संमेलनात गौरव
प्रसिद्ध उर्दू साहित्यिक इर्तेजा निशात यांचा ‘पासबां-ए-अदब’ संमेलनात गौरव ‘पासबान-ए-अदब’ ट्रस्टच्या ‘मिरास’ साहित्य-संस्कृती मेळाव्यात उर्दू लेखक, कवी इर्तेजा निशात यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘पासबान-ए-अदब’ ट्रस्टच्या ‘मिरास’ साहित्य-संस्कृती मेळाव्यात उर्दू लेखक, कवी इर्तेजा निशात यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध-मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनात सोहळा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची ग्वाही
** व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान
साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासणे यांची तर युवा पुरस्कारासाठी तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर यांची निवड
बोगस अथवा चढ्या दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई-कृषिमंत्र्यांचा इशारा
आणि
उन्हाळी सुट्यांनंतर शाळांमध्ये पुन्हा बालकांचा किलबिला���
चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे. 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन डॉ मुरुगन यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताला आशय निर्मितीचं जगातलं केंद्र म्हणून उभं करण्याचं सरकारचं धोरण असून, माहितीपट, लघुपट, तसंच ॲनिमेशन निर्मात्यांनी भारतात यावं, भारतात चित्रीकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. या महोत्सवात काल प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना प्रदान करण्यात आला. राज्यमंत्री मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, अभिनेता रणदीप हुडा आदी मान्यवरांच्या हस्ते सुब्बय्या यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात 'बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला. यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथं ५९ हून अधिक देशातल्या ६१ भाषांमधल्या ३१४ चित्रपटांचं चित्रपटांचं प्रदर्शन केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना काल परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार काल जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर आणि भूत बंगला' या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यक देविदास सौदागर लिखित 'उसवण' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, सौदागर यांनी, उसवण कादंबरीच्या माध्यमातून कष्टकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. ग्रामीण भागातल्या वास्तवाची पुरस्काराच्या रुपाने दखल घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली...
“पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे आणि एकूण राष्ट्रपती झाल्यासारख वाटत आहे आजवर जे लिखाण केलं जे काय आपलं लग्न मांडलं त्याची नोंद घेतली असं वाटत आहे पुरस्कार देणार आहे आपलं एकूण जगण्याचे लग्नाची नोंद घेतली असे वाटते”
****
विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण संस्थांमध्ये घेतलेला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्य संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. सरकारी उच्चशिक्षणसंस्था, आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था, तसंच अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित���णे लढवत, प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण तसंच विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यात बी- बियाणांची चढ्या भावानं विक्री किंवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी यांची आढावा बैठक मुंडे यांनी काल घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी २५ दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेर पर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट ७५ टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.  
****
उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा काल पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गाडीवाट इथं आदर्श प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजावट केलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. महापालिकेच्या मराठी तसंच उर्दू अशा एकूण ५६ शाळांमध्येही काल प्रवेशोत्सव साजरा झाला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.
****
परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मिष्टान्नाचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिलं पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये काल जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला, त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार होते. मात्र शाळा सुरू झाल्या, तरीही अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शालेय गणवेश शिऊन घेण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचं, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अनेक शाळांमधून गणवेश वाटपाला प्रारंभ झाला असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
 टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद��द झाला.आणि उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्रदान करण्यात आला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४१ धावांनी पराभव केला. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामना सुरू आहे. स्कॉटलंडच्या दोन बाद १०७ धावा झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या  हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार टी.पी.कांबळे यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षातर्फे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लक्कड जवळगा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.   
****
महेश नवमी काल साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं वाद्यांच्या गजरात सजीव देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे हर घर पौधा निसर्गसंवर्धन उपक्रमाचा प्रारंभ या निमित्तानं करण्यात आला.
बीड शहरातूनही मिरवणूक काढण्यात आली, आबालवृद्धांचा यात लक्षणीय सहभाग होता.
हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १११ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी आज घंटानाद आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही याबाबत काहीही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल ‘श्री शिवराज्याभिषेक - नव्या युगाचा प्रारंभ’ या केदार फाळके लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय समाजाचे स्वत्व रक्षण करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं प्रतिपादन फाळके यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी आजपासून पाच दिवस तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
****
मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नांदेड वगळता, विभागात सर्व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
kokannow · 2 years
Text
मराठी पत्रकार परिषदेचा १५ मे रोजी विरार येथे पुरस्कार वितरण सोहळा
मराठी पत्रकार परिषदेचा १५ मे रोजी विरार येथे पुरस्कार वितरण सोहळा
पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणार खरे, कैतके, नानिवडेकर, प्रभावळकर, काळे,दगडू, रांजवणकर, पाटील या जेष्ठ पत्रकारांचा होणार गौरव सावंतवाडी : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण १५ मे रोजी वसई तालुक्यातील विरार येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे..ज्येष्ठ पत्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कारांकरिता खेळाडुंनी नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत
खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कारांकरिता खेळाडुंनी नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत
मुंबई, दि. 15 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार…
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक 'दिव्य लोकप्रभा' चे उपसंपादक सुदर्शन रापतवार यांना केज झुंझार पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0 notes
nashikfast · 2 years
Text
विद्यार्थी व शिक्षकांचा एकत्र सन्मान म्हणजे संस्कृतीची जपणूक : कडलग
विद्यार्थी व शिक्षकांचा एकत्र सन्मान म्हणजे संस्कृतीची जपणूक : कडलग
कोचिंग क्लासेस संघटना व सपकाळ नॉलेज हबचा संयु��्त उपक्रम ४०० गुणवंत विद्यार्थी व २१ शिक्षकांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान! यांचा झाला सन्मान :जीवनगौरव पुरस्कार : सुधीर गायधनी ( उद्धव अकॅडमी ) आदर्श शिक्षक पुरस्कार : सुषमा परांजपे ( परांजपे संस्कृत क्लासेस), विशाखा काबरा ( नील काबरा अकॅडमी), अमिर शेख ( ब्रिलीयंन्स अकॅडमी ), कौस्तुभ परांजपे ( परांजपे प्रोफेशनल अकॅडमी ), विनीत पिंगळे ( आयडियल…
Tumblr media
View On WordPress
0 notes