Tumgik
#देणारे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Airtel ने लाँच केले १८४ देशांमध्ये फ्री डेटा-कॉलिंग देणारे जबरदस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ६४९ रुपये
Airtel ने लाँच केले १८४ देशांमध्ये फ्री डेटा-कॉलिंग देणारे जबरदस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ६४९ रुपये
Airtel ने लाँच केले १८४ देशांमध्ये फ्री डेटा-कॉलिंग देणारे जबरदस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ६४९ रुपये Airtel World Pass plans: एअरटेलने हा प्लान परदेशात प्रवास करणाऱ्यांना लक्षात घेऊन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना जगातील कोणत्याही देशात २४ X ७ कॉल सेंटर सपोर्ट देखील मिळेल. Airtel World Pass plans: एअरटेलने हा प्लान परदेशात प्रवास करणाऱ्यांना लक्षात घेऊन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्‌ में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस्‌ है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९ हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागात���न ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी १०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
mukundhingne · 8 days
Text
"A relationship that causes pain is like a maze you have built for yourself…!"
“वेदना देणारे नाते म्हणजे स्वतःसाठी रचलेले चक्रव्यूह…!“ “If you view a beautiful woman merely as an object of desire, then the path of love is not meant for you. Once you embrace the idea of treating someone with equality, you won’t even need to search for a partner. The partner will come to you on their own. However, if there’s even a slight mistake in the choice, the journey ahead can be…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 18 days
Text
Alandi: राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे, सन्मार्गाची दिशा देणारे हे वारकरी पंथीय आहेत - एकनाथ शिंदे
एमपीसीन्यूज -आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत ह. भ. प गुरुवर्य मारूती महाराज कुऱ्हेकर बाबा (Alandi)यांचा 93 वा व रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा 70 अभिष्टचिंतन व गौरव दिन सोहळा पार पडला.या निमित्त कुऱ्हेकर बाबा यांना शांतीब्रम्ह व ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी  एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची…
0 notes
kamlakar-das · 27 days
Text
Tumblr media
मोक्षज्ञान मंत्र तेच सत्य आहेत जे वेद आणि गीता जी मध्ये लीहले, संकेत केले आहेत..
वेद गीता ज्या गुरूला सतगुरू सांगते तेच मोक्ष मंत्र देणारे अधिकारी संत आहेत..
वेद गीता आणि अन्य धर्म ग्रांथत ही संत रामपाल जी सतगुरू आहेत ह्याचे प्रमाण आहेत.. अस्या गुरूचा शोध स्वीकार व मोक्ष100%. (गिताजी)
ज्ञान गंगा बुक onlin जरुर आयकने www.santrampalji.org
सर्वांचे आई वडील वडील वेळेनुसार मृत्यूला प्राप्त होतात.आपण आणाथ होतो.
त्याच पद्धतीने जे परमात्मा कडून ज्या गुरूंना अधिकार मिळाला नाही ते मरून जाणार, काळाचे भोजन बनणार, आणि भोळ्या भगताना ही काळाचे भोजन बनवणार.. (काळ ब्रह्म चे विधान आहे) प्रमाण:👇🏻 https://www.santrampalji.org
मानव जीवनाचा सौदा चुकायला नाही पाहिजे
84त जाण्या आधी खूप विचारपूर्वक ज्ञान अभ्यासन आवश्यक आहे📚भावानो.
1 note · View note
kvksagroli · 1 month
Text
Tumblr media
बाजारपेठेतील मागणीनुसार भाजीपाला लागवड तंत्रज्ञान: अधिक उत्पन्न, कमी खर्च संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि दिलासा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या "व्यवसाईक भाजीपाला लागवड तंत्रज्ञान" या विषयावर एक दिवसीय प्रक्षिक्षण घेण्यात आले. डॉ. संतोष चव्हाण यांनी भाजीपाला लागवडीच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी बाजारपेठेतील मागणीनुसार पिके निवडणे, विविध प्रकारचे भाजीपाले घेऊन पिकांची विविधता वाढवणे, उच्च उत्पादन देणारे व कीडरोगांना प्रतिरोधक वाण निवडणे, जैविक पद्धतींचा वापर करून खर्च कमी करणे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणातून आपल्याला भाजीपाला लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचे योग्य संयोजन कसे करावे हे सांगितले.सदरील कार्यक्रमास एकूण ४० शेतकरी उपस्थित होते. #भाजीपाला_ #लागवड #जैविकशेती_काळाची_गरज🌱 #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #दिलासाफाउंडेशन #Agriculture #Farming #VegetableCultivation #OrganicFarming #Farmers #YieldImprovement #MarketDemand #cropdiversity
1 note · View note
gitaacharaninmarathi · 2 months
Text
35. ‘कर्मयोग’ हा जगण्याचा मार्ग  
श्रीकृष्ण म्हणतात की, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही (2.47). जर आपल्या जवळच्या कुणावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर आपण एखाद्या चांगल्या शल्यविशारदाशी संपर्क साधू. त्याच्या कौशल्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये नक्कीच यश मिळेल आणि त्याच्या चांगल्या चारित्र्यामुळे तो अनावश्यक शस्त्रक्रिया करणार नाही. थोडक्यात आपण अशा एका शल्यविशारदाच्या शोधात आहोत जो कर्मयोगी आहे. या स्थितीतील दोन संदेश आपल्याला हा श्लोक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करू शकतात.  
आपल्याला सेवा देणारे सगळे कर्मयोगी असावेत आणि त्यांनी आपल्याला सर्वोत्तम सेवा द्यावी अशी आपली अपेक्षा असते. हेच तत्त्व जर आपण आपल्यासाठीच्या समत्वाला लावले तर आपणदेखील इतरांना दैनंदिन सेवा पुरवताना कर्मयोगी होऊ शकू. हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण जे काही करू त्यात सर्वोत्तम काम करू, मग ते काम असो की घरगुती बाबी.
श्रीकृष्ण गीतेमध्ये इतरत्र आपल्याला खात्री देतात की कर्मयोगाच्या सरावातील लहान लहान गोष्टी आपल्याला समत्वाच्या अधिक जवळ आणतात, ज्यातून खरा आनंद मिळू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला पुन्हा कधीही भेटणार नाही अशी खात्री असतानाही जेव्हा सर्वोत्तम सेवा देऊ शकतो, आपण कर्मयोगी बनंण्याच्या मार्गावर आहोत हे समजून घ्यावे.
कर्मफलाची चिंता न करता आपण जेव्हा कर्मामध्ये पूर्णपणे गुंतलो असतो तेव्हा आपण कालातीत अवस्थेत प्रवेश करतो जेथे काळ हा संदर्भहीन आहे. आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरबाहेर वाट बघत असतो, वेळ अगदी संथगतीने पुढे सरकत आहे असे वाटायला लागते. दुसर्‍या बाजूला, कर्मयोगी शल्यविशारद आपल्या कामात वेळेचे भानही विसरून गेला असतो आणि जणू काही काळ त्याच्यासाठी एका जागी थांबलेला असतो.
श्रीकृष्ण आपल्याला दु:खाचे झाड समूळ उपटून काढायला सांगतात, ज्याची मूळे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कर्मफलाची इच्छा असणे हीच आहेत.
0 notes
thedhananjayaparkhe · 2 months
Text
कर्मसिद्धीची आस आणि देवोपासना: एक अध्यात्मिक चिंतन - लेखक: धनंजय पारखे©
  जे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते । मनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥ श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, नाना प्रकारचे हेतू मनामध्ये धरून लोक त्यांनी मानलेल्या निरनिराळ्या देव-देवतांची योग्य उपचारांनी विधिपूर्वक उपासना करतात. जे जे त्यांना हवे असते, ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. खरे पाहता देणारे किंवा घेणारे कर्माशिवाय दुसरे कोणीही नसल्याने या मनुष्यलोकात कर्मापासूनच…
0 notes
atozinformativepage · 3 months
Text
0 notes
imranjalna · 5 months
Text
जालन्यात महायुतीत बिघाडी..जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
शिवसेना भाजपची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण.. भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार.. गोरगरीब कष्टकरी व गायरान जमिनीसाठी लढा देणारे ॲड.मगरे लोकसभेच्या रिंगणात.. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज.. जालन्यात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हाप्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेंच्या अडचणीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जबरदस्त स्पीड देणारे जगातील टॉप १० Fastest Smartphones, स्पीड सोबत इतर फीचर्सही दमदार
जबरदस्त स्पीड देणारे जगातील टॉप १० Fastest Smartphones, स्पीड सोबत इतर फीचर्सही दमदार
जबरदस्त स्पीड देणारे जगातील टॉप १० Fastest Smartphones, स्पीड सोबत इतर फीचर्सही दमदार Fastest Phones : स्मार्टफोन खरेदी करताना युजर्सना अनेक गोष्टींकडे लक्ष देतात. फोनचा कॅमेरा कसा आहे? त्याची बॅटरी लाईफ चांगली आहे ना ? फोन वारंवार चार्ज तर करावा लागणार नाही, हे सगळं युजर्स आवर्जून पाहतात. यासोबतच स्मार्टफोन किती फास्ट आहे, याकडेही युजर्सचे विशेष लक्ष असते. तुम्हीही फास्ट स्मार्टफोन्सचे फॅन असाल…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सरकार मागणी करणार - मुख्यमंत्र्यांची माहिती
बदलापूर प्रकरणी बंद घोषित करणं बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, उद्याचा महाविकास आघाडीचा बंद मागे घेण्याचं शरद पवार यांचं आवाहन
नेपाळमध्ये प्रवासी बस दरीत कोसळून महाराष्ट्रातल्या १४ भाविकांचा मृत्यू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन साजरा
आणि
अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात जालना इथल्या फरार डॉ.दिलीपसिंग राजपूत याला जळगाव जिल्ह्यातून अटक
****
बदलापूर इथं झालेली घटना दुर्देवी असून, यातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सरकार मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं आज महिला सक्षक्तीकरण अभियानाअंतर्गत महाशिबिर घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षीत बहिण योजनाही राबवण्यात येईल, असं सांगताना त्यांनी, बदलापूर प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ३१ ऑगस्ट नंतरही या योजनेचे अर्ज भरता येतील आणि तीन महिन्यांची एकत्रित रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले नाहीत, पात्र नाही झालं, सप्टेंबरमध्ये तुमचे फॉर्म भरले तरीसुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे तिन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार.
ज्या महिलांना अद्याप रक्कम मिळाले���ी नाही, त्यांच्या अर्जातील त्रूटी दूर झाल्यानंतर त्यांना ती दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध योजनांची माहिती देणारे ३० स्टॉल्स उभारण्यात आले होते.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र अशाप्रकारे बंद घोषित करणं बेकायदेशीर असून, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाविकास आघाडीच्या या बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अशाप्रकारे बंद घोषित करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बंद मागे घ्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता, हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेचा कृषी विभाग आणि विदर्भातल्या जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी उंबरकर यांच्याकडे आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी जळगाव इथं येणार आहेत. त्यावेळी ११ लाख लखपती दीदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दीदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील. पंतप्रधान यावेळी राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील.
****
मानवी शरीरावर वाईट परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर केंद्र शासनानं बंदी घातली आहे. यात प्रतिजैविकं, वेदनाशामक आणि जीवनसत्वांच्या औषधांचा समावेश आहे. बंदी घातलेल्या १५६ औषधांमध्ये काही अनुचित मिश्रण असल्याचं निदर्शनास आलं असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या विशेष समितीनं केलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
नेपाळमध्ये एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातल्या १४ भाविकांचा मृत्यू झाला. सुमारे ४३ भाविकांसह ही बस पोखरा इथून काठमांडूला जात असताना मार्सयांगडी नदीत कोसळून हा अपघात झाला. हे सर्व भाविक जळगावचे रहिवासी असून, राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातल्या महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मृतदेह राज्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. यानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसंच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं, कुलकर्णी यावेळी म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार डॉ.दिलीपसिंग राजपूत याला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जळगाव जिल्ह्यातल्या पळसखेडा मिराचे इथून अटक केली. राजपूत याच्या भोकरदन इथल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनानं गेल्या महिन्यात संयुक्तरित्या कारवाई करत सोनोग्राफी मशीनसह रोख रक्कम आणि गर्भपातासाठी वापरलेल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर तो फरार झाला होता. दरम्यान, राजपूत याला आज न्यायालयानं २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्देशानुसार चलनामधून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आता टपाल विभागामार्फत आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा असतील, त्यांनी त्या बदलून घेण्याचं आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि विभाग मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचं उद्घाटन मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते झालं. रोजगार योजनेअंतर्गत मध निर्मिती योजनेचा लाभ गावांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक गाव हे ‘मधाचे गाव’ म्हणून करण्यात येईल, अशी माहिती साठे यांनी दिली. या कार्यशाळेतले प्रशिक्षित कर्मचारी शासनाच्या रोजगार योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आणि उद्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरं होत आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या शिबिरांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज दुसऱ्या दिवशी विविध भागातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन, माहिती जाणून घेतली. कृषी उत्पन्नावर आधारित विविध विषयांवरचे परिसंवाद तसंच चर्चासत्र योवळी घेण्यात आले.
****
धाराशिव इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं “विद्यार्थ्यांचा ग्राम विकासामध्ये सहभाग” या विषयावर सिंधुदुर्ग इथले भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉक���टर प्रसाद देवधर यांचं व्याख्यान झालं. बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची यशोगाथा त्यांनी यावेळी विषद केली.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातल्या २५ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
****
0 notes
vidyamsdiary7 · 6 months
Text
Post 3
फ्लॅट मध्ये दोन प्रकारची माणसं रहातात. माणूस हवा असतो नाहीतर माणूस घाणी यांच्या कडे पैश्याची श्रीमंती असते फक्त मनाची नाही. शेजारी कोण रहात हे पण माहित नसतं. दरवाज्यावर गेलो काम असतं म्हणून शेजारी ला काका काकी म्हणतात की तर आमच्या इथल्या society च्या सेक्रेटरी ची बायको कोण साहेब हवेत का इथपासून सुरुवात ..पाणी वगैरे विचारण तर दूरच.
यांच्या मुलांकडे  मित्र मंडळी नसतात पण कुत्रे असतात फिरवायला   .
आपल्या इथे तसही प्राण्यांना दान देणारे जास्त असतात पण रस्त्यातला गरिबाला मदत करणारे कमीच. का तर तो माणूस म्हणून जन्माला आला.
©
#vidyamslife
0 notes
6nikhilum6 · 30 days
Text
Charholi : सरदार कृष्णाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त चऱ्होलीत वृक्षारोपण
एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान देणारे (Charholi)सरदार दाभाडे घरातील श्रीमंत सुभेदार सरदार कृष्णाजी दाभाडे (सरकार) चऱ्होलीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दाभाडे प्रतिष्ठानने वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सागर दाभाडे, सिद्धेश्वर दाभाडे, सुरज दाभाडे, निलेश आवळे, किरण दाभाडे, सुनील गावडे आदी उपस्थित होते. श्रीमंत सुभेदार सरदार कृष्णाजी दाभाडे (सरकार) चऱ्होलीकर यांच्या 258…
0 notes
Text
IVF Treatment in Marathi? How much IVF Treatment Costs in Navi Mumbai
Tumblr media
वंध्यत्वाच्या समस्यांशी झगडणाऱ्या व्यक्ती आणि जोडप्यांसाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा आशेचा किरण बनला आहे. सुविधा आणि कुशल व्यावसायिकांसाठी ओळखले जाणारे भारत हे IVF उपचारांसाठी शोधलेले ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या लेखाचा उद्देश नवी मुंबईतील आयव्हीएफ उपचारांशी (IVF Treatment in Navi Mumbai) संबंधित खर्चावर चर्चा करणे आणि या तंत्रज्ञानाच्या सुलभतेमध्ये योगदान देणारे घटक विचारात घेणे. IVF उपचार निवडताना, संपूर्ण प्रवासात कार्यक्षम काळजी सुनिश्चित करण्यासाठी नवी मुंबईतील सर्वोत्तम स्त्रीरोगतज्ञ (best gynecologist in Navi Mumbai) ओळखणे आवश्यक आहे. आयव्हीएफ उपचार खर्चाचे लँडस्केप: (The Landscape of IVF Treatment Costs)
वैद्यकीय सल्लामसलत आणि निदान चाचण्या: (Medical Consultations and Diagnostic Tests) पहिल्या टप्प्यात प्रजनन तज्ञांशी सल्लामसलत आणि वंध्यत्वाची मूळ कारणे शोधण्यासाठी चाचण्यांची मालिका समाविष्ट आहे. हे सल्लामसलत आणि चाचण्या खर्चाच्या संरचनेचा एक भाग बनवतात जे तयार केलेल्या उपचार योजनांसाठी पाया घालतात.
प्रजननक्षमता औषधे: (Fertility Medications) IVF मध्ये क्रियाकलाप उत्तेजित करण्यासाठी आणि अंडी पुनर्प्राप्तीची शक्यता वाढवण्यासाठी प्रजननक्षमता औषधे आवश्यक असतात. जननक्षमता तज्ञांनी शिफारस केलेल्या प्रतिसादांवर आणि विशिष्ट उपचार प्रोटोकॉलवर अवलंबून या औषधांची किंमत बदलू शकते.
अंडी पुनर्प्राप्ती: (Egg Retrieval) प्रयोगशाळा प्रक्रिया; गर्भाधान आणि भ्रूण विकास यासारख्या प्रयोगशाळा प्रक्रियांद्वारे अंडी पुनर्प्राप्तीसाठी शस्त्रक्रिया प्रक्रिया IVF उपचारांमध्ये गुंतलेल्या खर्चाचा एक भाग दर्शवते. या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुशल तज्ञ, साधने आणि स्वच्छ सेटिंग आवश्यक आहे.
भ्रूण हस्तांतरण: (Embryo Transfer) IVF दरम्यान भ्रूण गर्भाशयात हलवणे हा एक असा टप्पा आहे ज्यासाठी प्रजनन केंद्रातील आरोग्य सेवा प्रदाते, विशेष नळ्या आणि आवश्यक सुविधांची आवश्यकता असते.
अतिरिक्त प्रक्रिया: (Additional Procedures) वैयक्तिक परिस्थितीनुसार, प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) किंवा इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) सारख्या अतिरिक्त प्रक्रियांची शिफारस केली जाऊ शकते. प्रत्येक अतिरिक्त प्रक्रिया एकूण खर्चात योगदान देते. भारतातील IVF उपचार खर्चावर परिणाम करणारे घटक: (Factors Influencing IVF Treatment Costs in India)
फर्टिलिटी क्लिनिकचे स्थान: (Location of the Fertility Clinic) प्रजनन क्लिनिकच्या स्थानामुळे IVF प्रक्रियेची किंमत खूप भिन्न असू शकते. नवी मुंबईच्या अंतर्गत-शहरातील बाह्यरुग्ण दवाखान्यांमध्ये ऑपरेशनल ओव्हरहेड्स जास्त असू शकतात, ज्यामुळे उपचार खर्चावर अतिरिक्त भार पडतो.
पायाभूत सुविधा आणि सुविधा: (Infrastructure and Facilities) तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रजनन क्लिनिक, उदाहरणार्थ, Yashoda IVF Fertility Centre, नवी मुंबईतील सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानासाठी सर्व उपलब्ध प्रदात्यांपैकी सर्वात समाधानकारक, उपकरणे, प्रयोगशाळा आणि लोकांच्या बाबतीत लक्षणीय उच्च किंमत आहे. या सुविधांची कौशल्ये रुग्णाला बरे होईल की नाही हे ठरवतात, म्हणून खर्चाचा प्रश्न आहे तोपर्यंत आपल्याला क्लिनिकच्या अंतिम खर्चात त्यांचा समावेश करावा लागेल.
यशाचे दर: (Success Rates) कमी किमतीच्या प्रजनन क्लिनिकमध्ये कमी अर्जाचा दर आढळू शकतो ज्यांना अपेक्षित यश जास्त आहे. जोडप्यांसाठी आणि व्यक्तींनी उपचारांच्या यशाचे मूल्यमापन करणे आणि याच्या विरूद्ध चांगले परिणाम मिळण्याच्या शक्यतांचे मूल्यमापन करणे महत्वाचे आहे.
सर्वसमावेशक पॅकेजेस आणि वित्तपुरवठा पर्याय: (Inclusive Packages and Financing Options) काही IVF दवाखाने सर्व एकत्रितपणे उपचार केलेल्या घटकांचे क्लस्टर देतात जसे की IVF उपचार मानक खर्चावर. शिवाय, अनेक दवाखाने ग्राहकांच्या IVF च्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या कर्ज योजना देतात.
प्रजनन तज्ज्ञांचे कौशल्य: (Expertise of Fertility Specialists) तुमच्या उपचाराचा खर्च ठरवताना नवी मुंबईतील सर्वोत्तम स्त्रीरोगतज्ज्ञांसारख्या (best gynecologist in Navi Mumbai) प्रजनन तज्ज्ञांची विश्वासार्हता लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक दर्जाच्या तज्ञांसह डॉक्टरांच्या दवाखान्यांद्वारे आकारले जाणारे शुल्क बरेचदा जास्त असते कारण ते अनुभवी आहेत आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा आहे. परवडणारी आणि सुलभता: (Affordability and Accessibility)
सरकारी उपक्रम: (Government Initiatives) अलिकडच्या वर्षांत, भारत सरकारने पुनरुत्पादक तंत्रज्ञान अधिक सुलभ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही राज्य सरकारे प्रजनन उपचारांसाठी सबसिडी किंवा आर्थिक सहाय्य देतात.
विमा संरक्षण: (Insurance Coverage) IVF साठी विमा संरक्षण व्यापक नसले तरी, काही विमा योजना प्रजनन उपचारांसाठी आंशिक कव्हरेज किंवा विशिष्ट फायदे प्रदान करू शकतात. व्यक्तींनी त्यांचे विमा पर्याय शोधणे आणि कव्हरेजची व्याप्ती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तुलनात्मक खर्चाचा फायदा: (Comparative Cost Advantage) खर्चावर परिणाम करणारे घटक असूनही, अनेक पाश्चात्य देशांच्या तुलनेत नवी मुंबईत IVF उपचार (IVF Treatment in Navi Mumbai) अधिक परवडणारे असतात. या किमतीच्या फायद्यामुळे प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात वैद्यकीय पर्यटनासाठी भारताच्या लोकप्रियतेला हातभार लागला आहे. निष्कर्ष: (Conclusion) सारांश, भारतातील इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या खर्चाचे विश्लेषण करताना वैद्यकीय प्रक्रिया, क्लिनिकची स्थिती आणि प्रजनन तज्ञांची प्रवीणता यासारख्या अत्यंत आवश्यक घटकांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे. आर्थिक परिणाम असूनही, या निर्णयाचे व्होल्टेज कौटुंबिक उद्दिष्टे साध्य करण्यावर अवलंबून असले पाहिजे आणि कदाचित ते मूल होण्याचे स्वप्न देखील असेल. प्रगतीच्या गडबडीत आणि प्रक्रियेतील सरकारच्या सहभागामुळे, प्रजनन उपचार (IVF Treatment in Navi Mumbai) उत्तरोत्तर अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतील ज्यांना त्यांचे कुटुंब तयार करण्याची मोठी आशा आहे.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
देशाच्या स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीला आपल्या बलिदानाने बळ देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes