Tumgik
#नांदेडमध्ये
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो नांदेडः चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या लेकीनं आत्महत्या (Suicide)केल्याचा दावा केला जातोय, तिने वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून लावला, पलंगाला गळफास घेतल्याचं म्हटलं जातंय. पण इवल्याशा लेकीचा साडे ६ फूट दरवाजाच्या कडीला हातही पुरत नाही तर ती आतून कडी लावून आत्महत्या कशी करेल,…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 21 days
Text
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड(अर्जुन राठोड): जिल्हात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवष्टीमुळे दोन लाख हेक्टरहुन अधिक शेतीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
नांदेडमध्ये प्रतिबंधित गुटखा साठवणाऱ्या दोन गोदामावर अन्न औषध प्रशासनाने...
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
 एक - शून्यनं आघाडी
सविस्तर बातम्या
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
***
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.
****
राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्य���त आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.  या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण प्रकरणी कुणबी नोंदी बाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या  आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.
****
नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख समिक्षक तसंच वक्ते म्हणून  संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी ���े होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
नांदेडमध्ये तपास यंत्रणाची तस्करीवर करडी नजर; ४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त
नांदेड दि. 20 : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य व 16 लाखाचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, शिवसेनेच्या माजी महिला आमदारासह जिल्हा प्रमुख आणि 19 जणांना 5 वर्षाची शिक्षा
नांदेड : नांदेडमध्ये 2008 साली महागाई विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या तत्कालीन आमदारांसह एकूण 19 जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी 19 जणांना प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.आंदोलन कर्त्यांनी 8 एसटी बसेस आणि एका महापालिकेच्या बसची तोडफोड केली होती. या प्रकरणी अतिरिक्त न्यायाधीश एस.ई.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
‘या’ कृतीने राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Tumblr media
नांदेड | केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची ((Rahul Gandhi) )भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीये. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. राहुल गांधी यांची यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. यात्रेत त्यांना असंख्य नागरिक भेटायला येत आहेत. यात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण आहेत. यात नांदेडचा चिमुकला सर्वेश हाटणे देखील राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता. सर्वेशदेखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. भविष्यात तुला काय बनायचंय, हे विचारलं. त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय, असं सांगितलं. राहुल गांधींनी त्याला कंप्यूटर येतं का?, असं विचारलं असता, त्याने नाही असं उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी संवेदनशीलता दाखवत आज त्याला कंप्यूटर भेट म्हणून दिलं. राहुल गांधींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. Congress President Shri @Kharge, in the presence of Shri @RahulGandhi handed over a PC to Sarvesh Hatne, a young tech enthusiast & Padyatri. A little gesture from our end to help him discover more.#BharatJodoYatra pic.twitter.com/5mS78HRp7p — All India Mahila Congress (@MahilaCongress) November 11, 2022 Read the full article
0 notes
nbi22news · 2 years
Video
youtube
#nbinewsmarathi17.09.22 नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य...
0 notes
loksutra · 2 years
Text
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात 14 गावांचा संपर्क तुटला, हिंगोली-नांदेडमध्ये रस्ते वाहून गेले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
��ुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात 14 गावांचा संपर्क तुटला, हिंगोली-नांदेडमध्ये रस्ते वाहून गेले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्रात पावसामुळे ठिकठिकाणी परिस्थिती बिघडली (फाइल फोटो) नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असून या गावांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. आसन नदी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. राज्यातील महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (महाराष्ट्राचा पाऊस)ने कहर केला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नांदेडमध्ये गोरक्षकाची हत्या, काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्ला; अनेक जखमी
https://bharatlive.news/?p=106514 नांदेडमध्ये गोरक्षकाची हत्या, काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्ला; अनेक ...
0 notes
samarthnews · 3 years
Text
नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह.
नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह.
  नांदेड- नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सीन्गसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे ओमायक्रोनचा धोका आता नांदेडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमायक्रोनचा अतिधोका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची पंतप्रधानांची घोषणा
समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या बंदला जालना आणि परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत एक - शून्य अशी आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक पेड माँ के नाम, स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
 ****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधनं हटवा, नांदेडच्या मूर्तीकारांची मागणी
गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधनं हटवा, नांदेडच्या मूर्तीकारांची मागणी
नांदेड़- महेंद्र प्रधान कोरोनामुळे गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आहेत, त्यामुळे मुर्तिकार मोठया अडचणीत सापडले आहेत. मात्र नांदेडमध्ये बनविलेल्या गणेश मूर्त्यांना शेजारच्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मागणी वाढल्याने मूर्तिकारांना काही अंशी दिलासा मिळालाय. गणेश मूर्ती तयार करणारे नांदेडमध्ये शेकडो कुटुंब आहेत, या मूर्तिकारांना गणेश मूर्तीच्या उंचीवरचे बंधन हटवण्याची प्रतीक्षा आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
One Billion Dollar ची बनावट नोट | 750 कोटींची किंमत भासवत विक्रीचा प्रयत्न, नांदेडमध्ये टोळी जेरबंद
One Billion Dollar ची बनावट नोट | 750 कोटींची किंमत भासवत विक्रीचा प्रयत्न, नांदेडमध्ये टोळी जेरबंद
नांदेड : अमेरिकन डॉलरची बनावट नोट (Fake Currency) दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीआहे. वेळप्रसंगी भारतीय चलन देणाऱ्यावर हल्ला करुन रक्कम पळवणे, असाही त्यांचा हेतू होता. नांदेडमध्ये (Nanded Crime) आलेल्या तेलंगणातील या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त करण्यात आली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
आज नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा धम्म मेळावा पार पडला
Tumblr media
भारत_जोड़ो_यात्रा सुरू आहे. चांगलं आहे. पण, जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. जातींचा अंत झाला नाही, तर एक दिवस जातींमधलं भांडण इतकं वाढेल की कोणताच नेता ते सोडवू शकणार नाही. आजही आपल्याकडे केवळ जातीचे किंवा धर्माचे नेते आहेत, पण देशाचा नेता नाही. आज नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा धम्म मेळावा पार पडला. लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. चळवळीच्या विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी आमच्या उत्कर्षाच्या मार्गावर आम्ही ठाम आणि एक आहोत. हे आजच्या मेळाव्यातून तुम्ही जगाला दाखवून दिले.! सर्वांचे धन्यवाद... From Wall of Adv. Balasaheb Ambedkar Read the full article
0 notes
amhikastkar · 3 years
Text
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयच नाही...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयच नाही…
नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काम दिले आहे. परंतु कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप स्वतंत्र कार्यालयच नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात केवळ औपचारिकता म्हणून एक टेबल-खुर्ची थाटली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत.    नवा मोंढा भागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एक टेबल खुर्ची मांडून कंपनीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes