Tumgik
#पन्हाळा
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार असून तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र, आकांक्षी जिल्हे आणि तालुके तसंच सीमावर्ती भागांचा विकास, आदी मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. यासोबतच ‘मायभारत’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ‘एक पेड माँ के नाम’ आणि नैसर्गिक शेती या मोहिमांमध्ये राज्यपालांची भूमिका यासह राज्यपालांनी सार्वजनिक संपर्क वाढवणं, आणि राज्यातल्या विविध केंद्रीय संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात राज्यपालांची भूमिका या विषयांवर देखील या बैठकीत चर्चा होईल.
****
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या संकलनात यावर्षी दहा दशांश तीन टक्के इतकी वाढ झाली आहे. हे कर संकलन एक लाख ८२ हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. आतापर्यंतची ही सर्वाधित वाढ आहे तसंच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदी विक्रीमधून सर्वाधिक महसूल प्राप्त झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे.
****
केरळमध्ये वायनाड इथं झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, सात हजारांहून अधिक नागरिकांना निवासी शिबीरांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. तपास  मोहिम अद्यापही सुरु असून आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          
****
हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या घटनांमध्ये ५० जण बेपत्ता आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आपदग्रस्तांना शक्य ती सगळी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी प्रशासनाला दिले आहेत.
****
कोल्हापूर जिल्हयात पंचगंगा नदीला पुराचा धोका अद्यापही कायम आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातले ७३ बंधारे सध्या ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अद्याप बंद आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कोयना आणि वारणा धरणक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग आणि जोरदार पावसामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढली आहे.
****
अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा धरणाचा जलसाठा काल रात्री ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्र दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले, त्यातून नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद ९२ घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
****
स्वराज्य निर्मिंतीत मोलाचं योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ दूर्ग नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,पन्हाळा, लोहगड, खांदेरी, साल्हेर आणि तामिळनाडूतलल्या जिंजी इथल्या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत सिल्लोड इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीं महिलांना लाभ प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज नियोजित पोलिस भरती रद्द करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उमेदवारांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला, तेव्हाच संबंधितांनी भरती रद्द केल्याची सूचना उमेदवारांना द्यायला हवी होती, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. नुकत्याच झालेल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं निर्भेळ यश मिळवलं आहे.
****
0 notes
Text
पन्हाळा मुख्य रस्‍त्‍यावर दरड कोसळली
https://bharatlive.news/?p=155129 पन्हाळा मुख्य रस्‍त्‍यावर दरड कोसळली
पन्हाळा ; पुढारी वृत्‍तसेवा ...
0 notes
marathimajja · 2 years
Text
30 वर्षाच्या शिक्षकाने केली 14 वर्षाची विद्यार्थिनी गर्भवती….
30 वर्षाच्या शिक्षकाने केली 14 वर्षाची विद्यार्थिनी गर्भवती….
    इकडून पोरग..  तिकडून पोरगी रस्त्या रस्त्या ने शाळा… पोरग म्हणत पोरीला.. येती का खंडाळ्याला…लोणावळा झाला खंडाळा झाला कोल्हापूरचा पन्हाळा झाला.. नंतर रिझल्ट हातात आला….  पोरग पास पोरीला…  पोरगी पास पोराला…  शिक्षक मात्र नापास झाल… शिक्षण मात्र नापास झाल…. संस्कार माञ नापास झाले….   मध्यप्रदेश : शहाडव जिल्ह्यातील जयतपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दर्सी या चौकी मध्ये आलेल्या तक्रारीनुसार खंडा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामांना तात्काळ मान्यता द्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामांना तात्काळ मान्यता द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारण विभागांतर्गत प्रस्तावित कामांना तत्काळ मान्यता देऊन ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करावयाच्या कामांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार विनय…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years

rahulmarathiblog · 2 years
Text
' गुडबाय ' प्रेमीयुगुल घाटात गेले अन त्यानंतर , महाराष्ट्रातील खळबळजनक घटना
‘ गुडबाय ‘ प्रेमीयुगुल घाटात गेले अन त्यानंतर , महाराष्ट्रातील खळबळजनक घटना
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना कोल्हापूर इथे समोर आलेली असून आपल्या नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ग्रुप मध्ये गुडबाय असा मेसेज टाकून कागल मधील लिंगनूर गावातील एका तरुणाने त्याच्या नात्यातील तरुणीला पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात नेऊन तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर त्याने स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी संध्याकाळी हे प्रकरण समोर आले समोर आले असून सदर घटनेविषयी संताप व्यक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक - कामकाज सुरळीत ठेवण्याचं आवाहन
तामिळनाडूतल्या जिंजीसह महाराष्ट्रातल्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव
२०२३ सालचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर
परळी इथं बोअरवेलच्या दोन मजुरांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं पतसंस्था घोटाळाप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कोणत्याही अडथळ्याविना चालावं यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं तसंच सभागृहात फलक आणू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष बेरोजगारी, महागाई, देशावरचं वाढते कर्ज यासारखे मुद्दे मांडणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतरामन हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या ९ मार्चपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज चालेल.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यातिथी आज देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. आता सायंकाळीही राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात येत आहे. उपराष्ट्रपती तसंच पंतप्रधानांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित आहेत.
****
नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सिडकोतर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ही अभय योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे.
****
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारनं प्रस्ताव पाठवला आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांचा समावेश आहे.
****
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज ही माहिती दिली. २०२३-२४ या वर्षापासून राज्यात एक नवीन आरोग्य पुरस्कार देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार तसंच कर्मचारी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आला असून दरवर्षी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
****
२०२३ सालचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून त्यांचं अभिनंदनही केलं. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी सराफ यांचं अभिनंदन करतांना म्हटलं आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी आज रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सग्यासोयऱ्यांसह एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं जनाधिकार जनता दरबार घेतला, या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या विद्यार्थ्याच्या पित्याचा बालपणी मृत्यू झाल्याने बालसंगोपन निधी योजनेअंतर्गत त्याला ही मदत करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी शहराजवळ वाघबेट इथे वीजवाहक तारांशी संपर्क झाल्यामुळे २ मजुरांचा मृत्यू झाला तर २ मजूर गंभीर जखमी झाले. आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे मजूर ओडिसा जिल्ह्यातले असून गोविंदा धवन सिंग आणि संदीप डाक्टर अशी मृत मजुरांची नावं आहेत. बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीचा वीजवाहक तारांशी संपर्क आला आणि वीजेचा प्रवाह गाडीत उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली. जखमी मजुरांवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या १५ पतसंस्था आणि बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, ठेवीदार कृती समितीच्या वतीनं आज विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलकांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला, मात्र आंदोलकांनी आयुक्तालयाच्या प्रांगणात प्रवेश करून पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. खासदार सय्यद इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. विभागीय आयुक्तांनी स्वत: येऊन निवेदन स्वीकारावं, आणि यासंदर्भात कारवाईचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज यांनी लावून धरली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यावेळी उपस्थित होते. विविध बँकेचे तसंच पतसंस्थेचे ठेवीदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जमलेल्या आंदोलकांना प्रशासनाकडून चिक्कीचं वाटप करण्यात आलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत या उपक्रमाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लोकसहभागातून समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वृद्धिंगत व्हावं, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने यांनी दिली. गावकऱ्यांनी जवळपास एक लाख रुपयांची पुस्तकं या वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहेत. गावातल्या सर्व मंदिरांमधून संध्याकाळच्या वेळी भोंग्याद्वारे विद्यार्थ्यां��ा अभ्यासाला बसण्याची सूचनाही करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होत असल्याची भावना लक्ष्मी सोनटक्के या पालक महिलेनं व्यक्त केली -
आमच्या गावामध्ये सहा वाजता भोंगा वाजतो अभ्यासाचा. मुलं वाटच बघत बसतात सहा कधी वाजतात, भोंगा कधी वाजतो, कधी अभ्यासाला बसायचं म्हणून वाट बघत बसतात. आता प्राथमिक शाळेतली मुलं अभ्यासाला बसतात तर माझ्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत, ती सुद्धा दादा बसला की आम्हीपण बसणार असं सांगतात. आणि घरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.
****
नांदेड इथे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील एकशे छप्पन्न मुकबधीर विद्यार्थी, दोनशे वीस अस्थिव्यंग, एकशे पंचेचाळीस अंध, नव्वद मतिमंद अश्या एकूण सहाशे अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
****
परभणी इथे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. उद्या पर्यंत चालणाऱ्या या बालमहोत्सवात ८ मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. तर बुद्धीबळ, वक्तृत्व, यासारख्या स्पर्धाही घेण्यात आल्या. या बालमहोत्सवात जिल्ह्यातले जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभाग घेत असून उद्या गीतगायन, नृत्य, अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करावं अशी मागणी विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे सादर केलं आहे
****
छत्रपती संभाजीनगर इथले प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचं काल मध्यरात्री पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रांसाठी ते प्रख्यात होते. त्यांनी १९८२ मध्ये वेरूळ इथे 'रॉक आर्ट गॅलरी' सुरू केली आणि अजिंठा चित्रांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पन्हाळा गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पन्हाळा गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पन्हाळा गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; दगड कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण Kolhapur Rain News : पन्हाळा गडावरही तुफान पाऊस सुरू असून आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवीन बांधकाम केलेल्या रस्त्याच्या शेजारी भूस्खलन सुरू झाले. Kolhapur Rain News : पन्हाळा गडावरही तुफान पाऊस सुरू असून आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवीन बांधकाम केलेल्या रस्त्याच्या शेजारी भूस्खलन…
View On WordPress
0 notes
jagdamb · 4 years
Photo
Tumblr media
#वीर_शिवा_काशिद_स्मृतिदिन #shivajiraje #shivajimaharajstatus #shivakashid #shivray🚩🚩 #panhala #panhalafort #panhalagad #jagdamb #lovekeshrameshkachi #jagdamb_creative #pune😍 #mandai #shivaji_maharaj_photos #sambhaji_raje #शिवाजीमहाराज_द_ग्रेटेस्ट #पन्हाळा #शिवराय_शंभूराजे @jagdambcreativehub (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CCjFJVihY1O/?igshid=1tjpmsjafas8p
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला, सापांचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या
महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला, सापांचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या
पन्हाळा किल्ल्याचा इतिहास: जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि तुम्ही एखादे रोमांचक ठिकाण शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशी जागा सांगणार आहोत, जिथे फिरणे तुमच्यासाठी खूप छान अनुभव असू शकते. या अतिशय सुंदर, नैसर्गिक सौंदर्य आणि थरारक ठिकाणाचे नाव आहे पन्हाळा किल्ला. होय, हा सुंदर किल्ला महाराष्ट्रात आहे. या किल्ल्याला सापांचा किल्ला असेही म्हणतात. पण का? चला जाणून घेऊया. पन्हाळा किल्ल्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
पन्हाळा तहसीलदार मनसे मार्फत दंडवत मोर्चा   पन्हाळा: गेल्या महिन्यात जो पुर आला तो कोलोली गावातील घराघरात साधारण पाच फुटांपर्यंत पाणी आल्याने बहुतेक घरांचे नुकसान झाले.
0 notes