Tumgik
#भाविकांकडून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हिंगोली: विघ्नहर्ता चितामणीच्या चरणी भाविकांकडून 45 लाखाचे दान
हिंगोली: विघ्नहर्ता चितामणीच्या चरणी भाविकांकडून 45 लाखाचे दान
हिंगोली: विघ्नहर्ता चितामणीच्या चरणी भाविकांकडून 45 लाखाचे दान हिंगोली – येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील दानपेट्या उघडून त्यातील रक्कमेची तीन दिवस मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ लाख रुपये निघाले आहेत. विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर दानपेट्यांतील रक्कम मागील ३ दिवसा पासून मोजण्यात आली आहे. सर्व दानपेट्या मधील रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. एकूण रक्कम ४८ लाख ३८ हजार ५०० रुपये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नसल्याचं सांगून, काळजी करण्याची गरज नाही असं ते म्हणाले. सध्या सर्वत्र गर्दी आणि राजकीय मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम होत असूनही कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या फारशी वाढत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात लसीकरणही चांगलं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या एक हजार ९५० असून, हा फार मोठा आकडा नसल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुस्टर डोस देण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीर मध्ये पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना - द  रेसिस्टेंस फ्रंटच्या दोन स्थानिक दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही संघटना लश्कर -ए- तय्यबाची शाखा असल्याचं मानलं जातं. पकडलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारं, दारुगोळा, इतर काही आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ८१ हजार ६६८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी ३८ लाख ४५ हजार ६१५ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार २२ कोविड रूग्णांची नोंद झाली, ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ९९ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता पैठण गेट इथून या मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेव्हापासूनची पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
इतर मागासवर्ग-ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनानं नियुक्त केलेल्या समर्पित आयोगानं काल नाशिक इथं पाच जिल्ह्यातल्या विविध संघटनांची एकूण ८७ निवेदनं स्वीकारली. नाशिक इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाचे अध्यक्ष जयंत कुमार बांठि��ा यांच्यासह पाच सदस्यांच्या उपस्थितीत ही निवेदनं स्वीकारण्यात आली. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातून ही निवेदनं आली आहेत.
****
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघानं सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या दीपावली अंकांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. यात संकीर्ण विभागातून नांदेडच्या दैनिक सत्यप्रभाच्या दीपोत्सव या दीपावली अंकाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे. द्वितीय पुरस्कार अमरावतीच्या ज्ञानपथला तर उत्तेजनार्थ सोलापूरच्या लोकमंगल मैत्रला घोषित करण्यात आला आहे.
****
सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा समारोप काल कोल्हापूर इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल असं ते म्हणाले. तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात येत असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
****
चंद्रपूरच्या सीनाळा जंगलात राज्यातल्या सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. तो १७ वर्षांचा होता. वाघडोह नावाने प्रसिद्ध असलेल्या या वाघानं प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवला होता. आज सीनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्यूमुखी पडल्यानं वन्यजीवप्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात ओझर गावाजवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका कंटेनरमधून ७३ लाख रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. काल या मंदिरावर सुवर्ण कलशाचं रोहण करण्याचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कलश सोहळ्यासाठी भाविकांकडून एक कोटी १६ लाख रूपये जमा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
अकराव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा पहिला सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान इंडोनेशियातल्या जकार्ता इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना सुरु होईल. गतविजेत्या भारताला जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशियासह अ गटात स्थान देण्यात आलं आहे.
आशियायी क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानशी भारताचा दुसरा सामना २४ मे तर यजमान इंडोनेशियासोबत २६ मे रोजी होईल.
****
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम... मुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी डोंबिवली : पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने पॉज संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग,साधना सभरकर,उनिशिया वाझ,पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.या उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.वीस लिटर दुध हे साईसेवा वृद्धाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून पोज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले. #webnewswala #paws #pawsdogdaycare #mahashivratri #mahadev #mahakal https://www.instagram.com/p/CMUsxUanjDB/?igshid=1s7tg5m08g7z8
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अयोध्येतील शरयू नदीत दाम्पत्याचे प्रणय, पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण, संतांनी केले मारहाणीचे समर्थन
अयोध्येतील शरयू नदीत दाम्पत्याचे प्रणय, पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण, संतांनी केले मारहाणीचे समर्थन
अयोध्येतील शरयू नदीत दाम्पत्याचे प्रणय, पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण, संतांनी केले मारहाणीचे समर्थन पती-पत्नी नदीत आंघोळ करत आहेत. या घाटावर बाजूला इतर पुरुष आहेत. पण, हे दोघेने तितं रोमांस करताना दिसून येतात. दोघेही एकमेकाच्या जवळ आहेत. त्यामुळं पाहणाऱ्यांना हा सारा प्रकार विचित्र वाटतो. तिथून काही पुरुष दाम्पत्याकडं येतात. पतीला पत्नीपासून वेगळ करण्याच प्रयत्न केला जातो. लखनौ : अयोध्येतील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
पोलीस खात्यातील बदली प्रकरणावरून मुंबईत सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देंवेद्र फडवणीस यांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी पोलिसांचं एक पथक फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झालं आहे.
दरम्यान, फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसनंतर आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर, अकोला, नंदुरबार आदी जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे माणूस असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. राणे बंधुच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २० लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ११६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजारांहून जास्त रुग्ण या आजारातून बरे झाले. कोविड संसर्गातून बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७१ शतांश टक्के इतका झाला आहे.
****
राज्यात काल आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १५ लाख ५० हजारांहून जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून वाहतूक विभागाला ६९ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार काल ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, तीन उच्च न्यायालय विधी सेवा समित्या आणि उपसमित्या तसंच ३०९ तालुका विधी सेवा समित्यांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतींचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण ६९ लाख प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५ लाखांपेक्षा जास्त वाद दाखलपूर्व प्रकरणे, ५० लाखांपेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ७२ हजार ४८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
****
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी असलेली ऑनलाईन बुकिंग-ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना नियमानुसार थेट दर्शन घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं सहा महिन्यापूर्वी कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ई-पासच्या माध्यमातून भाविकांना मंदिरात दर्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आता कोविड निर्बंध हटवल्यानंतर ही सक्ती रद्द करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती.
****
सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १७३ आणि दुसऱ्या टप्प्यात १६३ आदर्श शाळा विकसीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. इस्लामपूर इथं लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आणि ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन पालकमंत्री पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली. काल रात्री ही घटना घडली. साहेब सावंत असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या त्रासातून ही आत्महत्या त्यानं केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
****
जॉर्डन इथं सुरू असलेल्या आशियाई य��वा आणि ज्युनियर मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धा वंशज आणि अमन सिंग बिश्त यांनी युवा पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर आनंद यादव याने कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील महिला खेळाडूंच्या लढती आज होणार आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
विठ्ठल मंदिराला दान मिळालेले दागिने वितळविणार
विठ्ठल मंदिराला दान मिळालेले दागिने वितळविणार
विठ्ठल मंदिराला दान मिळालेले दागिने वितळविणार वीस किलो सोन्यासह सव्वाचारशे किलो चांदीच्या वस्तुंचा समावेश पंढरपूर: येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मातेस भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात आलेले सोन्या-चांदीचे अलंकार वस्तू वितळवल्या जाणार आहेत. श्री विठ्ठल व रुख्मिणी मातेस सन १९८५ ते २०१९ या कालावधीमध्ये भाविकांकडून दान करण्यात आलेल्या या चिजवस्तू आहेत. यामध्ये सुमारे १९ किलो ८२४ ग्रॅम २५६ मिली सोने व ४२५…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. **** ** मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचा दावा ** कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं येत्या सात आणि आठ सप्टेंबरला फक्त दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन ** रायगड जिल्ह्यातल्या महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर ** राज्यात दहा हजार ४२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, तर काल दिवसभरात ३२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ** मराठवाड्यातही २७ बाधितांचं निधन तर ९४५ नवे रुग्ण ** आणि ** औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विनामास्क आलेल्या पाच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड **** मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था - आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. तरुण किंवा वृद्धांमार्फत नव्हे, तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे देशात हा संसर्ग पसरत असल्याचं, त्यांनी स्पष्ट सांगितलं. सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सात आणि आठ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. दोन दिवसांचं हे अधिवेशन विधानसभेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकं आदी कामकाज होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनापूर्वी सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे. ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्षांच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे. या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक अंतराचं नियम पाळून आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे. प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे. **** राज्यातील २५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत विकासासाठी नगरोत्थान योजनेच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले आहेत. राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाव्दारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, बाग बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. **** रायगड जिल्ह्यातल्या महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. या सर्वांचे मृतदेह ���िगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्याचे मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे. काल त्यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. **** कोविड संसर्ग काळात बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली असतांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. विभागानं टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत हा रोजगार उपलब्ध झाला आहे. कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून यांसह आधी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करत असल्याचंही मलिक म्हणाले. **** फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर, त्याचे नातलग अम्मर अली, आणि अब्दुल रऊफ या तिघांसह १९ जणांविरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यापैकी सात दहशतवादी आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत, सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० पोलीस हुतात्मा झाले होते. **** वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणाऱ्या एनईईटी तसंच जेईई च्या परीक्षाकेंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जेईई साठीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ५७० वरून ६६० तर एनईईटीच्या परीक्षा केंद्रांची संख्या २ हजार ५४६ वरून ३ हजार ८४३ करण्यात आली आहे. जेईई १ ते ६ सप्टेंबर दरम्यान, तर एनईईटी १३ सप्टेंबरला होणार आहे. **** कृषी उत्पन्न बाजार समितीवरील उपकर आणि देखरेख खर्च कमी करावा, याबाबत कायदे सुटसुटीत करावेत आदी मागण्यांसाठी काल राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजी-पाला, फळं आणि कांद्याच्या बाजारपेठा वगळण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचपैकी धान्य आणि मसाला बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. **** राज्यात काल दहा हजार ४२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या सात लाख तीन हजार ८२३ एवढी झाली आहे. तर मृतांची संख्या ही २२ हजार ७९४ एवढी झाली आहे. आतापर्यंत या आजारातून पाच लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या एक लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** मराठवाड्यात काल २७ कोरोना विषाणू संसर्गानं बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला तर ९४५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात काल सात बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये ३२१ तर लातूर जिल्ह्यात १४१ नवीन रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात काल पाच रुग्णांचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला, तर कोविड संसर्ग झालेले नवे ७४ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर १२६ नव्या कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे ८५ बाधित रुग्ण आढळून आले. जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात ८१ तर हिंगोली जिल्ह्यात १३ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यातही १०४ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. **** मुंबईत काल ५८७ नवे रुग्ण आढळले तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात एक हजार २२८ नवे रुग्ण आढळले तर ३६ जणांचा मृत्यू झाला. सांगली २९३, सिंधुदुर्ग ४७, रत्नागिरी ८१, वाशिम २० आणि गडचिरोलीत १२ नवे रुग्ण आढळले. **** औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला मास्क न लावता उपस्थित असलेले वैजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्रच्या अधिकारी छाया बाणखेले, वाहन चालक साईनाथ चंदनसे तसंच एका अभ्यागतास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. रोजगार हमी योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीसाठी हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आणि त्यानंतर त्यांना मास्क देण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नुकतेच जारी केले आहेत. **** परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरात सोमवारी जमिनीतून आलेला आवाज हा भूकंपाचा नसून जमिनीखालील वायुंचा असावा असा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागानं व्यक्त केला आहे. हे वायु पाण्याच्या पुर्नभरणामुळं होत असतात असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, काल भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाज आलेल्या परिसराची पाहणी केली. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा काल त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. धरणात अधिक प्रमाणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, सध्या धरणात १२ हजार ९१६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या 'प्रतिसाद कक्षाचं' उद्घाटन काल जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झालं. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड-१९चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक मदत करण्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. **** लातूर महानगरपालिका उद्यापासून शहरातील विविध पाच केंद्रांवर अँटीजेन चाचण्या सुरू करत आहे. यासाठी महापालिकेला रॅपिड अँटिजेन चाचणीचे १६ हजार संच प्राप्त झाले आहेत. कोरोना सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींनी या केंद्रांवर आपली चाचणी करून घेण्याचं आवाहन महानगर पालिका प्रशासनानं केलं आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या या मोहिमेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतिगृह परिसर, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतीगृह, दयानंद महाविद्यालय, जुने यशवंत विद्यालय आणि शिवछत्रपती ग्रंथालयात या चाचण्याची केंद्र असणार आहेत, असं महापालिका प्रशासनानं कळवलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथं स्थापन पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला फुल प्रसादाऐवजी झाडांची रोपटी वाहिली जात आहेत. गेल्या दोन दिवसात भाविकांकडून शंभरापेक्षा अधिक झाडांची रोपं जमा झाली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आह��त, आमचे वार्ताहर कुरुंदा नजीकच्या मातृतिर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून वृक्ष लागवडीचे काम पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे. सिने कलावंत सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत बारा हजार झाडे लावली आहेत. तेथे ५० हजार वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. याच गडावर पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलीय. जळतनाच्या लाकडांपासून ही श्रीं'ची मूर्ती साकारलीय. येथे बेल, फूल, प्रसादाऐवजी बाप्पांना झाडे वाहण्यात येतात. भक्तांकडून दोन दिवसात शंभरापेक्षा अधिक झाडे जमली आहेत . 'झाडे लावा, स्वतःला वाचवा 'हा संदेश मंडळाकडून दिला जातोय. बेल फुल प्रसाद ऐवजी झाड मागणाऱ्या बाप्पाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाल्याने भाविकांचा ओढा वाढलाय. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम ,हिंगोली. **** नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जनांसंदर्भात जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातल्या सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन शक्यतो विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव, हौदांमध्ये करावं. सार्वजनिक गणेशमंडळाच्या ठिकाणी आणि मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी ५० वर्षांवरील नागरिकांना तसंच १० वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. त्याचप्रमाणे कोव्हीड -१९च्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असंही या आदेशात जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला औद्योगिक वसाहतीच्या भूखंडासाठीचं सेवा शुल्क तसंच पाच वर्षांत बांधकामाची अट शिथील करण्यात आली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले. **** हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या गोळेगावमध्ये पोलिसांनी दोन लाख २५ हजार रूपये किमतीचा गुटखा आणि एक दुचाकी जप्त केली. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. या माहितीच्या आधारावर सापळा रचला असता आरोपी दुचाकीवरून गुटख्याची गोणी घेऊन जाताना पोलिसांना आढळला. त्यानंतर घराची तपासणी केली असता गुटख्याचे आठ पोते तसंच दुचाकी जप्त करण्यात आली. **** नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन काल करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** व्हिडिओकॉन उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी उपोषणाला काल एक वर्ष पूर्ण झालं. मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत. या कामगारांनी काल औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांनी काल दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. **** बीड इथं पावडर कोटिंगच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात कंपनी मालकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. संतोष गिराम असं मृताचं नाव आहे. काल दुपारी ही दुर्घटना घडली. **** बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यात काल दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. रोहन मस्के आणि लखन पोटभरे अशी या दोघांची नाव असून, ते अनुक्रमे १० आणि ११ वर्षांचे होते. **** ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला कालपासून प्रारंभ झाला. काल दुपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन, सायंकाळच्या सुमारास त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. आजच्या गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर काल बाजारात हार फुलं भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसून आली. नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून, उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. **** बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. **** सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता ३ लाख ३७ हजार २४० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काल सुपूर्द केला. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 August 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** येत्या सात आणि आठ सप्टेंबरला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ** प्रवासी तसंच मालवाहतुकीला गती दिल्याने अर्थव्यवस्था लवकरच पूर्ववत होईल - केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास ** औरंगाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू; बाधितांची संख्या २१ हजार १७१ आणि ** महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख मदत जाहीर **** विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सात आणि आठ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. दोन दिवसांचं हे अधिवेशन विधानसभेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके असं कामकाज होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनापुर्वी सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे. ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्षांच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे. या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीही शारीरिक अंतराचं नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे. प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट देण्यात येणार आहे. **** फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर, त्याचे नातलग अम्मर अली, आणि अब्दुल रऊफ ���ा तिघांसह १९ जणांविरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यापैकी सात दहशतवादी आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत, सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० पोलीस हुतात्मा झाले होते. **** लोक प्रशासन क्षेत्रात उत्कृष्ट कामकाजासाठी येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिनी, पंतप्रधान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा परिघ वाढवण्यात आला असल्याचं, कार्मिक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोकचळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या तसंच प्राधान्य क्षेत्राला समावेशक कर्जपुरवठ्याची योग्य अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनाही यावेळी पुरस्कार दिला जाणार आहे. **** माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नसल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयातल्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यानं, मुखर्जी यांच्यावर गेल्या दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून मुखर्जी कोमात असून, त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे. मुखर्जी यांना कोविडचा संसर्गही झालेला आहे. **** देशभरात प्रवासी तसंच मालवाहतुकीला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, यामुळे अर्थव्यवस्था लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघ - सीआयआयच्या वतीनं घेण्यात आलेल्या उद्योजकांच्या बैठकीत त्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. कोविड 19च्या प्रतिबंधासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांमध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा समावेश असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या उपाययोजनांमुळे उद्योग क्षेत्र मंदीच्या लाटेतून लवकरच बाहेर पडेल, असं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. **** देशात कोविड -१९ च्या संक्रमणातून बरे होण्याचा दर ७६ टक्के झाला आहे. आतापर्यंत जवळपास २४ लाख लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. मृत्यू दरातही घट झाली असून तो एक पूर्णांक ८४ शतांश टक्यांवर आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ६६ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन ६० हजार रुग्ण आढळले. या सोबतच देशात आता या विषाणूनं संक्रमित लोकांची एकूण संख्या ३१ लाख ६७ हजार ३५४ झाली आहे. तर आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद शहरातल्या गांधी नगर इथला ४० वर्षीय पुरुष आणि जवाहर कॉलनीतल्या ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृतांची एकूण संख्या ६४० झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नवीन १०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात ग्रामीण भागातल्या ३९ आणि महानगरपालिका हद्दीतल्या ६१ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १७१ झाली आहे. त्यापैकी सोळा हजार १५३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर सध्या चार हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** रायगड जिल्ह्यात महाडमधील काजळीपुरा भागात कोसळलेल्या पाच मजली इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता ११ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, बचाव कार्य करत असतांना आपत्ती दलानं तब्बल १९ तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका पाच वर्षाच्या मुलाला सुखरुप बाहेर काढलं. आणखी आठ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पाच जणांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बिल्डर फारूक काझी आणि युनूस शेख हे दोघे फरार आहेत. **** कृषी उत्पन्न बाजार समितीवरील उपकर आणि देखरेख खर्च कमी करावा, याबाबत कायदे सुटसुटीत करावेत आदी मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजी-पाला, फळं आणि कांद्याच्या बाजारपेठा वगळण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचपैकी धान्य आणि मसाला बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथं एक गाव एक गणपती हा पर्यावरणपूरक सोहळा मोठ्या उत्साहात राबवला जात आहे. कुरुंदा नजीकच्या मातृतीर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. याच गडावर पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, सरपणाच्या लाकडांपासून ही गणेशमूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला फुल प्रसादाऐवजी झाडांची रोपटी वाहण्यात येतात. गेल्या दोन दिवसात भाविकांकडून शंभरापेक्षा अधिक झाडांची रोपं जमली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे **** ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज दुपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन, सायंकाळच्या सुमारास प्रतिष्ठापना केली जात आहे. उद्या गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात हार फुलं भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसत आहे. नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून, उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. **** परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे महालक्ष्मीचा सण घरोघरी साध्या पध्दतीने साजरा होत आहे. हार-फुलांसह भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटींचं पालन करून खरेदीला परवाणगी दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन आज करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची एकूण रुग्ण ७ हजाराच्या वर गेली आहे. आतापर्यंत २१५ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला असून एकूण ५ हजार १८९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची उद्या आढावा बैठक घेणार आहे. **** चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या कराव्यात अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केली होती. **** व्हिडिओकॉन उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी उपोषण���ला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत. या कामगारांनी आज औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांनी आज दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
0 notes