Tumgik
#भिती
mr-innocent2195 · 2 years
Text
सध्या मन: शांती, मानसिक स्थैर्य, peace of mind या गोष्टी खूप परिचयातल्या आहेत. हे शब्द म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य स्तंभ आहेत, ज्यावर आपल्या आयुष्याचा लेखाजोखा ठरत असतो. सगळ्यात महत्त्वाच काय असेल तर ते मानसिक स्थैर्य. या स्तंभाला डळमळीत करणारा एक जबाबदार घटक म्हणजे भीती. मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात नियतीने सर्व गोष्टींबरोबरच भयही दिले आहे. हे भय सावलीसारखे आपल्याबरोबर असते. भय असते भविष्याचे,ठरवलेली गोष्ट होईल की नाही याचे,घेतलेले निर्णय चुकतील की काय याचे. आपल्या आसपास अनाहुतपणे घडणारे प्रसंग, उद्याचा दिवस काय घेऊन येईल याची धाकधूक. अशा सगळ्या गोष्टींमुळे आज कित्येकजण हळवे आणि कमकुवत झाले आहेत आणि याच गोष्टीचा फायदा भीती घेऊ लागली. ज्या भीतीला आपण आपल्यापेक्षाही अधिक महत्त्व देऊ पाहत आहोत. ती भीती कुणी बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्याकडे आलेली नसून ती आपल्याच अतिविचारांच प्रतिबिंब आहे. हे या भीतीमुळे मनातुन बिथरलेल्या माणसांना कळायला हवं. आपण जेव्हा मी काय करु शकलो असतो पेक्षा मी पुढे काय काय करु शकेन याला अधिक महत्त्व देऊ लागतो तेव्हा भीतीची जागा आपल्याही नकळत आपल्या आत्मविश्वासाने घेतलेली असते. आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे.... 🙂
0 notes
6nikhilum6 · 16 days
Text
Chinchwad : अटक करण्‍याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक
एमपीसी न्यूज – फ्राॅड केसमध्‍ये अटक करण्‍याची भिती दाखवत (Chinchwad)एका ज्‍येष्‍ठ नागरिकाची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे 4 ते 9 सप्टेंबर 2024 रोजी घडली. याप्रकरणी 60 वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिकाने सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम…
0 notes
shrikrishna-jug · 6 months
Text
आयुष्याच्या आकाशामध्ये सापडणारं स्वप्नंरुपी इंद्रधनुष्य
जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून, माझी आई मला नेहमी पावसाळ्याच्या दिवसात पावसानंतर इंद्रधनुष्य शोधण्यासाठी बाहेर घेऊन जायची.वादळाच्या भिती बरोबरच अनेकदा मेघगर्जनेचा आवाजही दूरवर ऐकू यायचा. पावसाच्या शेवटच्या थेंबांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी छत्रीचं शस्त्र घेऊन, इंद्रधनुष्यासाठी आकाश शोधत,आणि त्यात सर्वोत्तम सोयीचा बिंदू शोधत आम्ही अंगणात हळूवारपणे चालत असूं. कधीकधी आम्हाला एखादं इंद्रधनुष्य…
View On WordPress
0 notes
jayantnaiknavare · 9 months
Text
अखेरचा हा तुला बंदोबस्त !
नमस्कार पोलीस बंधू-भगिनिंनो,
मी उदया दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी साडेएकतीस वर्षांच्या पोलीस सेवेनंतर सेवानिवृ्त्त होत आहे. ३० व ३१ डिसेंबर रोजी सु्ट्टी आल्याने आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम होत आहे. मला बरंच काही बोलायचं आहे परंतु नेहमीप्रमाणे वेळेचं बंधन असल्यामुळं मी फक्त माझ्या कारकिर्दिचा आढावा घेणार आहे व मला इतर ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या लिखीत स्वरुपात आपल्या एस पीं कडे पीडीएफ मध्ये पाठवणार आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी वेळ काढून जरुर वाचावं.
एम.पी.एस.सी.ची नागरी सेवा परिक्षा पास होण्यापूर्वी ज्या अनिश्चितेच्या मन:स्थितीतून जात होतो तशाच परंतु थोड्या वेगळ्या भावनाकल्लोळातून आता सेवानिवृत्त होत असताना जात आहे. पायलट, एस्काॅर्ट आणि पी.एस.ओ. काढून घेतलेले व्ही.आय.पी. जसे उसने अवसान आणून मला काय कुणाची भिती आहे असं सांगतात तसं काहीसं झालं आहे.
एकतीस डिसेंबर २०२३ ही ��ारीख कामाला लागल्यापासून अधून मधून कागदपत्रांमधून डोकावत राहायची. ती आता वास्तव बनून समोर उभी आहे. पोलीस विभागातली कारकिर्द संपली आणि आता पुढे कसं होणार हा अनुत्तरीत प्रश्न कसा सोडवायचा याची चिंता सतावू लागली आहे. कितीही उसणं अवसान आणलं तरी डोक्याला टेन्शन झालं आहे हे खरं.
बहुत शादमा थे
हम उनको भुलाके,
अचानक ये क्या हो गया.
के चेहरेपे रंगे मलाल आ गया.
आजूबाजूला होणारे बदल अनाकलनिय आहेत. वर्तमानामध्ये जगणं बरं असं वाटायला लागलं आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरुन असं दिसतं की भविष्याचा अचूक वेध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या कल्पनाशक्तिला मर्यादा आहेत हे वेळोवेळी जाणवतं. आपलं भविष्य कसं असेल याचा अंदाज सर्वसाधारणपणे भूतकाळात घडलेल्या घटना व घडामोडींवर बेतलेला असतो. परंतु चालू घटकेला घडणाऱ्या बदलांशी समरस होत आपली जगण्याची व्यूहरचना पदोपदी बदलत जाते. या वास्तवाकडे चिकित्सकपणे पाहिलं तर दिर्घकालीन नियोजनाला तसा फार काही अर्थ राहात नाही.
आता लाईफस्टाईलमध्ये महत्वाचे बदल करावे लागणार आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे पोलीस विभागातील नोकरीच्या अनुषंगाने अंगवळणी पडलेल्या सोयीसुविधा विसरण्याचा. घर, गाडी, कार्यालय, चालक, मदतनीस, अडली वजा करता शिल्लक उरते स्वावलंबन. अतिशय अवघड ॲडजस्टमेंट असणार आहे. ज्या गोष्टी आपण गेली तीस बत्तीस वर्षे गृहित धरुन चाललो होतो त्या आता संपुष्टात येणार आहेत. दुसरा आणि अतिशय महत्वाचा बदल करावा लागणार आहे तो म्हणजे जमेल तितका व्यायाम करणं. कितपत शक्य आहे हे समजेलंच… परंतु संकल्प सोडायला काय हरकत आहे? संकल्प सोडणं म्हणतो ते अशासाठी की या गोष्टीवर पुढं जगण्याचं सगळं नियोजन अवलंबून असणार आहे. आरोग्य ही आतापर्यंत बाजूला ठेवली तरी निभावलं जाणारी गोष्ट होती परंतु इथून पुढं ही बाब जगण्याच्या केंद्रस्थानी ठेवावी लागणार कारण उत्तम आरोग्य व स्वावलंबन ह्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. जसं काम करून वेळ मिळाला तर आरोग्यासाठी दिला जात होता तसं यापुढं, अगदी त्याच्या विरुध्द, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जे काही करावं लागतं ते झाल्यानंतर उरलेल्या वेळेपैकी काही वेळ काम करायला द्यावा असं असणार आहे.
आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या माझ्या आत्मपर पुस्तकाच्या शेवटच्या भागात सेवानिवृत्तीनंतर काय करणार या प्रश्नावर थोडं विचारमंथन केलं होतं. त्यात चार-पाच मुद्दे नमूद केलेले आहेत. बिहार स्कूल ऑफ योग मध्ये एखादा कॅम्प करुन त्यानंतर योग हा दैनंदिन जिवनाचा भाग करुन टाकायचा, एक कपोलकल्पित (फिक्शन) पुस्तक लिहायचं, भरपूर संगीत ऐकायचं, जमेल तितकं फिरायचं आणि पोलीस शिपायांसाठी काही लिहायचं तसंच शिकवायचं. या संकल्पांवर गांभीर्यपूर्वक विचार करावा लागणार आहे.
मुंबई पोलीसमध्ये उपायुक्त असताना त्यावेळचे पोलीस आयुक्त श्री ए.एन.रॅाय यांनी एका खाजगी कंपनीनं प्रायोजीत केलेलं व्हर्टिकल इंटरॅक्शन वर्कशाॅप ठेवलं होतं. अनेक गोष्टींपैकी "तुमच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या व्यक्ति कोण'' हे इंग्रजीमध्ये एका फाॅर्मवर लिहून द्यायची एक्सरसाईज होती. मी फाॅर्म भरुन दिला. काही वेळाने मला शोधत बिझनेस सूटमधली एक मुलगी आली आणि पु.ल.देशपांडे म्हणाले होते तसं इथे इथे नाच रे मोरा असं पेनाने दाखवत म्हणाली होती की याचा अर्थ समजला नाही. कसा समजणार ? मी गमतीनं लिहिलं होतं: आयुष्यामधल्या तीन महत्वाच्या व्यक्ति : ड्रायव्हर, ॲापरेटर आणि ॲार्डर्ली...
यातला गमतीचा भाग सोडला तरी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय काम करणं अवघड असतं हे वास्तव आहे. पोलीस अधिकारी प्रशिक्षण संपवून कर्तव्यावर रुजू झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत पर्सनल स्टाफ आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. कितीही दुर्गम भाग- कोणतीही वेळ- कसलंही हवामान आणि कसलीही जबरदस्त दंगल किंवा खराब परिस्थिती असो, अवती भवतीच्या पोलीस सहकाऱ्यांमुळे कधी असुरक्षित वाटलं नाही. दंगलीत डायरेक्ट दगड कधी लागलाच नाही. लागलाच तरी आजूबाजूला असलेल्या कुणाच्यातरी हेल्मेटवरुन, शिल्डवरुन रिकोशिएट होऊन आला तरंच. कितीही कठिण परिस्थिती असो कुठूनतरी कुणी देवदूतासारखा मदतीला धावून येणार हे नक्की. पूजेचं ताट घेऊन मागे न बघता देवाचा नवस फेडायला निघालेल्या भक्तासारखं; लाठी हेल्मेटसह मागे न पाहता जमावात घुसायच्यावेळी खात्री असायची की आपल्यामागे सगळेजण असणारंच. मोझेसला समुद्राने दुभंगून जसा रस्ता करुन दिला होता तसे अधिकारी व कर्मचारी तुम्हाला कितीही गर्दी असलेल्या मिरवणूकीतून पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणारंच.
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती
पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या सापेक्ष गोष्टी आहेत. प्रसरण पावणाऱ्या विश्वासारखा त्यांचा अमर्याद आवाका आहे. या चारही बाबी जणू सणासुदीला फेर धरणाऱ्या महिलांसारख्या नेहमी एकमेकींच्या हातात हात धरुन गोल फिरतात. परस्परावलंबी असल्याने त्यांची व्याप्ती जाणीवपूर्वक आटोक्यात ठेवावी लागते नाहीतर एक गोष्ट मिळाली की दुसरी व दुसरी मिळाली की तिसरी प्राप्त करण्याकडे लोकांचा नैसर्गिक कल राहतो.
पहिली व अतिशय मूलभूत गोष्ट म्हणजे आसक्ती होय. आसक्तीला बरेच कंगोरे आहेत. त्यामध्ये वात्सल्य, माया, ओढ, निरपेक्ष प्रेम इत्यादि बाबी येतात. जसे, कोणतीही अपेक्षा न ठेवता आईवडिलांचे मुलांवरील प्रेम. आसक्तीशिवाय पुनरुत्पादन व मानववंश संवर्धन असंभव आहे- निदान नवजात अर्भकाच्या बाबतीत तरी... जीवनाला पूरक बाबींची निसर्गाने सोय करुन ठेवली असली तरी, विशिष्ट काळासाठी परावलंबी राहणं जीवनाच्या रहाटगाडग्याचा भागच आहे. आईवडिल व मुलं, मित्र- मित्र, प्रियकर-प्रेयसी व पती-पत्नी य��� समाजमान्य आसक्ती दिसून येतात. उरलेल्या पैसा, प्रसिद्धी व सत्ता या तीन गोष्टींचा दरएक माणसाच्या आयुष्यात येण्याचा क्रम वेगवेगळा असू शकतो.
इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला तसं पाहिलं तर चपखल बसणारा मराठी शब्द सापडला नाही. त्याअर्थाने जवळचा शब्द म्हणजे सत्ता. परंतु पाॅवर या शब्दाची व्याप्ती सत्ता शब्दापेक्षा बरीच जास्त आहे. नेतृत्व करणं, प्रभाव टाकणं, अनुयायी तयार करणं या व अशा अनेक बाबींचा सामावेश पाॅवर या शब्दात होतो. सत्ता या शब्दातून बऱ्यापैकी औपचारिकता अभिप्रेत होते. म्हणजे शासनकर्ते, निवडून आलेले लोकसेवक, न्यायव्यवस्था, पोलीस व नागरी सेवेतले अधिकारी, सैन्यदले इत्यादिंना कायदे-कानून तयार करुन शासन चालविण्यासाठी, न्यायनिवाडे करण्यासाठी, प्रशासन-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, देशाच्या संरंक्षणासाठी तसेच समाज नियमनासाठी प्रदान करण्यात आलेले कायदेशीर अधिकार वगैरे होत. सत्ता हा शब्द इंग्रजीतल्या पॅावर या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून या पुस्तकात वापरला आहे.
वर म्हटल्या प्रमाणे आसक्ती वगळता पैसा, प्रसिध्दी व सत्ता या उरलेल्या तीन सापेक्ष गोष्टी आयुष्यात कोणत्याही क्रमाने घडू शकतात. काहींना आधी पैसा मिळतो त्यायोगे प्रसिध्दी व सत्ता मिळते. काहींना आधी सत्ता व सत्तेच्या माध्यमातून पैसा व प्रसिध्दी तर इतरांना आधी प्रसिध्दी नंतर पैसा व त्यानंतर सत्ता मिळू शकते. या सर्वांचा क्रम उलट सुलट असला तरी प्रत्येक बाबीची कमाल व किमान मर्यादा प्रत्येकाच्या कर्तृत्वावर, नशीबावर, वारश्याने मिळालेल्या संपत्तीवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ही मर्यादा प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. पैसा, प्रसिद्धी, सत्ता व आसक्ती या गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्यासाठीच्या सततच्या स्पर्धेमुळे जगण्याचे संतुलन बिघडते व त्यामुळे जीवनात बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतात.
व्यापार उद्यम करुन श्रीमंत झालेल्या व्यक्ती त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीमुळे प्रसिध्द होतात व त्यांना इतरांवर प्रभाव टाकता येतो. नेतृत्वगुण अंगी असलेल्या व्यक्ती समाजोपयोगी कामे करतात. संघटना बांधतात किंवा आधी कुणीतरी बांधलेल्या संघटनेत सक्रिय होऊन समाजावर छाप पाडतात व त्यामुळे प्रसिध्द होतात. काही प्रसिध्दी पर्यंत थांबतात तर बरेचजण त्यामाध्यमातून संपत्ती जमा करतात. ज्यांच्या अंगी सुप्तगुण आहेत असे काहीजण खेळ, संगीत, अभिनय, चित्रकला इत्यादिंमध्ये प्राविण्य मिळवून प्रसिध्द होतात त्यायोगे त्यांच्याकडे संपत्ती येते. याउलट समाजविघातक, अनैतिक व गैरकायदेशीर कामे करुन पैसे मिळवणारे व त्यामुळे कुप्रसिध्द झालेले त्याचप्रकारचे मार्ग पत्करुन सत्ता मिळवणाऱ्यांच्या आश्रयाला गेलेले आपण पाहातो.
जगातल्या पंच्याहत्तर टक्के समस्या ह्या पैशांशी निगडीत असतात असं माझं मत आहे. या पृथ्वीतलावर माणसं अनंत काळापासून समूहानेच राहातात आणि तेंव्हापासूनच पृथ्वीतलावर उदरनिर्वाहासाठी बुफे सिस्टिम अस्तितवात आहे. काही लागलं की निसर्गाकडून घ्यायचं. सुरुवातीला शिकार करणं आणि निसर्गाने पिकवलेलं अन्न गोळा करणं ही मुख्य कामं होती. पोटाला लागेल इतकंच घ्यायचं, संचय करायचा नाही. मुख्य प्रश्न होते ते आरोग्य आणि सुरक्षिततेशी निगडीत. आरोग्याच्या प्रश्नावर उपाय म्हणजे हवामानानुसार वस्रं वापरणं आणि उन, पाऊस आणि वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी गुहा खोदून निवारा तयार करणं. सुरक्षेच्या प्रश्नावर छोटे छोटे समूह करुन राहणं, बचावासाठी हत्यारं तयार करणं आणि हवामानानुसार स्थलांतर करणं हा तोडगा काढण्यात आला होता.
युवल नोहा हरारी हा इस्रायली लेखक आपल्या सेपीयन्स या पुस्तकामध्ये लिहितो की सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता तेंव्हा मानवाच्या सेपीयन्स जातीने बुध्दीमत्तेच्या जोरावर जवळच्या निआंन्डरथल आणि तशा इतर सस्तन जातभाईंचा, उत्क्रांतीच्या देव- दानव लढाईत, पराभव केला आणि तेंव्हापासून होमो सेपीयन्स ही एकच मानवजात संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करत आहे. आपल्या कुणाच्याही डी.एन.ए.चे, माॅलमधल्या बारकोड रिडर सारखे स्कॅन करुन, जेंव्हा कधी वाचन शक्य होईल तेंव्हा पृथ्वीतलावरची झालेली सगळी महायुध्दं, लढाया आणि भांडणं ही सत्तर हजार वर्षांपासून चालत आलेली भाऊबंदकीच होती हे स्पष्ट होईल.
हरारी यांच्या मते होमो सेपीयन्सनी ही उत्क्रांतीची लढाई जिंकली ती त्यांच्या आकलनाच्या क्षमतेमुळे. याला ते काॅग्निटीव्ह रिव्हाॅल्यूशन म्हणतात. त्यानंतर सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी दुसरी क्रांती झाली ती होती कृषी क्रांती- किंवा ॲग्रिकल्चरल रिव्हाॅल्यूशन. काही संकल्पना, जसे देव, देश, धर्म, चलन, ज्या आभासी आहेत त्यांवर विश्वास ठेवण्याची होमो सेपीयन्सची ही आणखी एक क्षमता ही अद्वितीय होती. या क्षमतेमुळे मोठ्या संख्येने आपापसात सहकार्य करुन, आभासी बाबी खऱ्या आहेत हे मानून परस्पर विश्वासावर तयार केलेली चलनव्यवस्था त्यांच्या लोकसंख्यावाढीला आणि सृष्टीतील इतर प्रजातींवरील त्यांच्या अधिपत्याला जबाबदार आहेत. शासन आणि अर्थ या दोन्ही व्यवस्था धर्म व्यवस्थेवर बेतलेल्या आहेत असंही हरारी म्हणतात.
पुढे विज्ञानक्रांतीत लागलेले विविध शोध, औद्योगिक क्रांती यामुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाले.
हरारी यांचं म्हणणं विज्ञान, मानववंशशास्र आणि तर्कशास्रावर बेतलं असल्यानं मनाला पटतं. आपल्या जगाबाबत आणि मानव जाती बाबत विचार करण्याच्या पध्दतीवर या बाबींचा सखोल परिणाम होऊ शकतो. देव, देश आणि धर्म ह्या मानवनिर्मित संकल्पना आहेत या पार्श्वभूमीवर असंही म्हणता येईल की या संकल्पना ज्या उद्देशांनी निर्माण करण्यात आल्या ती उद्दीष्टं बऱ्यापैकी सफल झाली तर त्या नष्ट होऊ शकतात किंवा त्यामध्ये काळानुसार बदल होऊ शकतात. याचाच अर्थ असा की या संकल्पनांवर विश्वास ठेवणे ऐच्छिक आहे. वसुधैव कुटुम्बकम्, पृथ्वी हा परिवार आहे ही संसदेच्या प्रवेशद्वारावर लिहिलेली संकल्पना आपल्यासाठी फार महत्वाची आहे. जगाबद्दल विचार करताना काल्पनिक सरहद्दींना जास्त महत्व देण्याचं कारण नाही.
स्वत:च्या मनाला बाहेरच्या जगाचा विचार करताना, किमान विचारात तरी, सरहद्दीच्या बंधनात बांधणे योग्य नाही. तिच गोष्ट धर्माची. व्हिक्टर फ्रॅंकल हे विचारवंत म्हणतात त्याप्रमाणे सहिष्णूता म्हणजे इतरांच्या श्रध्देशी सहमत होणं नसून प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे श्रध्दा ठेवण्याच्या अधिकार असल्याचं मान्य करणं होय.
जगातली आत्ताची अर्थव्यवस्था ही कृष्णविवरा सारखी आहे. एकदा त्यामध्ये ओढले गेलो की त्यातून सुटका नाही. बाहेरुन न कळणाऱ्या या कृष्णविवरातला प्रवेश कुणालाही चुकला नाही.
ब्रासटॅक्स् ॲाफ मनी
पैसा हे मानवाच्या श्रमाचं फलित मानलं जातं. पैशांची उपयुक्तता ही आपल्या कृतींवर अवलंबून असते. आपण उत्पादित केलेल्या अनेक वस्तूंपैकी बऱ्याच वस्तू अशा असतात की त्या सर्वांना या ना त्या कारणास्तव नेहमी लागतात. अशा नेहमी लागणाऱ्या वस्तूंचा प्रथम चलन म्हणून उपयोग होऊ लागला. या मालाची अदलाबदल करुन होणाऱ्या व्यापाराला बार्टर पध्दत म्हणतात. या पध्दतीत वेळेचा अपव्यय जास्त होत असे व आपल्याला नेमकी पाहिजे असलेली वस्तू मिळेपर्यंत थांबायला लागे. तसेच समोरच्याला त्याच्या वस्तूच्���ा बदल्यात नेमकी आपल्याकडील वस्तू पाहिजे असं गिऱ्हाईक मिळायला वेळ लागे. त्याचप्रमाणे आपल्याकडील वस्तूच्या बदल्यात समोरच्याकडील वस्तूचे मूल्य ठरविणं आणखी वेगळीच समस्य़ा होऊ लागली. यावर उपाय म्हणजे सर्वोपयोगी व जास्त मागणी असलेल्या सामान्य वस्तू चलन म्हणून वापरात आणणं. अशा सामान्य वस्तू खरेदी-विक्री व देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यासाठी वापरायचं माध्यम झालं. हीच पैशांची सुरुवात मानायला हरकत नाही.
त्यानंतर वेगवेगळ्या धातूंच्या अंगी असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्यांचा चलन म्हणून वापर करणं सोय़ीचं ठरु लागलं. धातूंचा टिकाऊपणा, तुकडे करुन विभाजन केलं तरी गुणधर्मात काही फरक न पडणं व त्यांना स्वत:ची अशी आंतरिक किंमत असणं इत्यादिंमुळं प्रामुख्यानं तांबा, चांदी व सोनं ही मुख्य चलनं झाली. एकीकडं सोनं व चांदी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांना, त्यांच्या आंतरिक मूल्यामुळे जास्त महत्व प्राप्त झालं, व लोक त्यांचा संचय करू लागल्याने ही मौल्यवान जंगम मालमत्ता सुरक्षित ठेवणं जिकीरीचं होऊ लागलं. तर दुसरीकडं बाजारांमध्ये व्यापार उद्यम जसा वाढू लागला तशी वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी या मौल्यवान धातूंच्या नाण्यांची गरज वाढूच लागली. ही चलनाची मागणी टाकसाळींमध्ये योग्य प्रतिची नाणी पाडून पुरविणं काही प्रमाणात होत होतं परंतु त्यालाही मर्यादा होत्या. एकीकडे लोकांकडे साठवून ठेवलेली परंतु उपयोगात न आणल्याने पडून असलेली मौल्यवान नाण्यांची जंगम मालमत्ता तर दुसरी कडे व्यापारासाठी अधिकाधीक नाण्यांची आवश्यकता ही मागणी विरुध्द पुरवठा अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकांकडील नाणेसंचय वर म्हटल्याप्रमाणे असुरक्षित तर होताच त्यावर भर म्हणजे नुसता साठा करुन ठेवल्याने त्यांच्या किमती मध्ये वाढसुध्दा होत नव्हती. यावर तोडगा म्हणून स्वतः:ची अशी समाजामध्ये प्रतिष्ठा असलेला व लोकांचा विश्वास असलेला प्रामाणिक माणसांचा वर्ग तयार झाला. या व्यक्ती सामान्यांकडून व्याजावर ठेवी स्विकारु लागल्या व व्यापाऱ्यांना थोड्या जास्त व्याजाने हे पैसे पुरवू लागल्या. ठेवीदारांना दिलेले व्याज व व्यापाऱ्यां कडून मिळालेलं व्याज यामधील फरक हा या प्रतिष्ठीत व्यक्तींना मिळालेला नफा त्यांच्या उत्पन्नाचं आणखी एक स्तोत्र झालं.
ठेवीदारांकडून स्विकारलेल्या ठेवींचा पुरावा म्हणून हे समाजात प्रतिष्ठा असलेले विश्वासू लोक ठेवीदारांना पावत्या देऊ लागले. या पावत्यांना विश्वासार्हता असल्याने त्यांचा उपयोग मौल्यवान दस्ताऐवजा सारखा होऊ लागला. प्रारंभी या पावत्या एका व्यक्ती कडून दुसरीकडे व दुसरीकडून तिसरीकडे जात व जेंव्हा केंव्हा ही पावती मोडण्यासाठी प्रतिष्ठीत व्यक्तीकडे जाई तेंव्हा तिच्या पूर्ण मूल्याएवढं चलन मिळू लागलं त्यामुळं या पावत्या हस्तांतरणीय झाल्या. या प्रक्रियेतून दोन बाबींचा उगम झाला. पहिली बाब म्हणजे बॅंका व बॅंकर्स उदयाला आले व दुसरी घडामोड म्हणजे जंगम मालमत्तेच्या ठेवीवर देण्यात आलेल्या पावत्या कागदी चलनं झाल्या.
तरीही खाजगी जंगम मालमत्तेच्या सुरक्षिततेचा मुद्दा येतंच होता. त्यामुळे राजानं ही सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारणं ओघानंच आलं. नुसती जबाबदारीच नाही तर टाकसाळी सुरु करुन नाणी पाडणं व त्यांच्यामध्ये मौल्यवान धातूंचा योग्य अंश राहिल याची दक्षता घेणं हे सुध्दा राजाच्या विश्वासार्हतेचं प्रतिक झालं. राजाच्या दृष्टीनं कर गोळा करणं यामुळं अधिक सोयीचं झालं. वेगवेगळे राजे आपापल्या मुद्रा टाकसाळीत तयार करून चलनासाठी बाजारात आणू लागले. नाण्यांची शुध्दता व त्यामुळे त्यांना प्राप्त झालेलं आंतरीक मूल्य ही राजांच्या सार्वभौमत्वाची व प्रतिष्ठेची लिटमस टेस्ट झाली. अशी मौल्यवान नाणी त्यांच्या आंतरीक मूल्यामुळे राज्याच्या स्थळसीमांच्या बाहेरसुध्दा आंतरराज्य व आंतर्देशीय व्यापारासाठी स्विकृत होऊ लागली. त्याचबरोबर बॅंकर्सनी दिलेल्या पावत्या व हुंडींचा सुध्दा व्यापाऱ्यांच्या विशिष्�� समूहामध्ये वापर वाढू लागला.
जसजशी राजांच्या साम्राज्यांची व्याप्ती वाढू लागली तसतशी आपापल्या हद्दीत आपलीच नाणी वापरावी जावीत याबद्दल आग्रह व सक्ती सुरु झाली. महंमद बिन तुघलक याच्यासारख्या तिरसट परंतु आर्थिक दूरदृष्टी असलेल्या सुलतानाने टोकन म्हणून पहिल्यांदा तांब्याच्या धातूंची नाणी पाडून चलनात वापरायला मुभा दिली. ही तांब्याची नाणी सियासती टाकसाळींमध्ये पाडून मग एकाधिकाराने चलनात आणण्याचं धोरण न ठेवल्यामुळं त्याकाळी घराघरात टाकसाळी सुरु होऊन सर्रास तांब्याची नाणी तयार होऊ लागली होती व चलनाचे अवमूल्यन झाले होते.
युरोपिय देशांनी गोल्ड स्टॅंडर्डवर आधारलेली म्हणजे सुवर्ण मूल्याधारित व्यवस्था सुरु केली. त्यासाठी केंद्रीय बॅंक किंवा रिझर्व्ह बॅंकांची निर्मिती करण्यात आली. या बॅंका शासनाच्या मालकीच्या मौल्यवान धातूंच्या म्हणजे बुलीयनच्या विश्वस्त झाल्या. केंद्रीय बॅंका शासनाचा सोन्याचा साठा आपल्याकडे सांभाळून त्याच्या बाजारमूल्याइतकं चलन छापून व नाणी पाडून अर्थव्यवस्थेमध्ये आणू लागल्या. कायदे करुन नोटा छापणं व नाणी पाडणं ही शासनाची मक्तेदारी करण्यात आली. या एकाधिकारामुळे बनावट चलन बाजारात आणण्याचा मार्ग बंद झाला. शासनाने आपल्याकडील सोन्याच्या साठ्याच्या भरवश्यावर छापलेले चलन म्हणजे गोल्ड स्टॅंडर्ड. आपल्या नोटेवर “मैं धारक को सौ रुपये अदा करने का वचन देता हूँ “ असं लिहून त्याखाली रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची सही असते. हे वचन म्हणजे ज़र कुणा एकाला कधी वाटलं की त्याच्याकडची नोट कुठेच चालत नाही तर तो रिझर्व्ह बॅंकेत ती नोट चालवू शकतो.
पहिल्या महायुध्दापर्य़ंत ही सोन्यावर आधारीत अर्थव्यवस्था व्यवस्थित चालू होती. पहिल्या महायुध्दाच्या प्रचंड खर्चानंतर विकसीत राष्ट्रांवरील कर्जाचा बोजा वाढला. परिणामस्वरूप ही सुवर्ण मूल्याधारित अर्थव्यवस्था सोडून द्यावी लागली. सोन्याच्या पुरवठ्यात तुटपुंजी वाढ झाली परंतु त्या तुलनेत जगभराची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढल्याने मागणी पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे या व्यवस्थेवर असलेला विश्वास समाप्त होऊन ब्रिटीश पाऊंड व अमेरिकन डाॅलर ही जगभराची राखीव चलनं झाली. सगळे देश सोन्याऐवजी ही दोन चलनं व्यापार उद्यमाच्या देण्याघेण्यासाठी आपल्याकडं परदेशी चलन म्हणून साठवू लागली. याचा परिणाम असा झाला की फक्त मोठ्या देशांकडे सुवर्णसाठा वाढला. १९२९ साली जगभरातलं शेयर मार्केट कोसळलं. त्यामुळं ब्रिटननं गोल्ड स्टॅंडर्ड सोडून दिलं. ब्रिटीश पाऊंड सुवर्ण मूल्याधारित व्यवस्थेतून बाहेर गेल्यामुळे फ्रान्स व अमेरिका या दोन देशांकडे सुवर्णसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.
१९३४ साली अमेरिकेने सोन्याचा भाव २०.६७ डाॅलर प्रति औंस (२८.३५ ग्रॅम) वरुन ३५ डाॅलर प्रति औंस असे पुनर्मूल्यांकन करुन वाढवला. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने अमेरिकेने उचलेले हे पाऊल होते. त्यामुळे प्रति औंस सोनं खरेदीसाठी १४.३३ डाॅलर जास्त द्यावे लागू लागले. याचा परिणाम असा झाला की इतर देशांकडील राखीव सोन्याची किंमत अमेरिकन डाॅलरमध्ये वाढली. त्यामुळे अमेरिकन चलनाचे अवमूल्यन झाले. अमेरिकेने सोन्याच्या बाजारावरचा कब्जा वाढवल्यामुळे जगभरातल्या सोन्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. इतकी की १९३९ सालापर्यंत सगळी चल��ं पुन्हा गोल्ड स्टॅंडर्डवर आणता येण्याजोगी परिस्थिती तयार होण्याइतकं सोन्याचं उत्पादन झालं. १९६९ साली अमेरिका व युरोपिय देशांनी लंडनच्या शेअर मार्केटवर सोनेविक्री बंद केली व सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले. १९६९ ते १९७१ या काळात सर्व देशांच्या रिझर्व्ह बॅंका वाणिज्य व्यवहारांसाठी अमेरिकेला सोन्याची ३५ डाॅलर प्रति औंस या भावाने खरेदी विक्री करु शकत होते. १९७१ साली सोन्याचे भाव मुक्तपणे ठरवले जाऊ लागले व रिझर्व्ह बॅंकाना आपापल्या चलन व्यवस्थेची विश्वासाहर्ता राखण्यासाठी सुवर्णसाठे करून ठेवण्याची गरज संपली.
आता जमाना आहे तो फियाट चलनाचा. फियाट म्हणजे शासनाचा वटहुकूम. मध्यवर्ती बॅंकेला आदेश दिला जातो की अमूक तमूक किमतीचं चलन छापा. आगोदर जेवढ्या किमतीचं सोनं शासन ठेवेल त्याच्या पाठबळावर चलन छापून वितरीत केलं जायचं. परंतु फियाट चलनामध्ये शासनाच्या विश्वासावर चलन छापलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार डॅालर्समध्ये चालतो त्यामुळे अमेरिकन डॅालर्सचा परदेशी चलन म्हणून सगळे देश साठा करतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून हे केलं जातं. परंतु अमेरिकेने मोठ्या प्रमाणात चलनफुगवटा केला तर डॅालरच्या किमती घसरु शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना इतर देशांसमोर ही समस्य़ा कायम असते. अजून तरी सगळं नियंत्रणाखाली आहे असं दिसत असलं तर फियाट चलनाच्या दिर्घकालीन संतुलनाबद्दलचे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी हा इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला निर्वासीत इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं. त्याचं असं झालं की, अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. त्याकाळी व्यावसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा पत्र पाठवणारानं देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा अमेरिकेतून युरोपातल्या एखाद्या देशात व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. युरोपातल्या त्याकाळातल्या विकसनशील देशात ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात युरोपातून अमेरिकेत ज्या दराने पत्र पाठविता येईल त्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. हाच प्रकार युरोपातून अमेरिकेमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टपाला बाबत होता होता. यामागील उद्देश असा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. पेसेटा हे त्याकाळी स्पेनचं चलन होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्याच्यामते ४००% नफा झाला.
चार्लसने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्युरिटी आणि एक्सचेंज कंपनी ... आणि ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. एक्क्याणवव्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली तेंव्हा गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूकदारांना दिले होते. हां हां म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघंच लागली. चार्लस् वर्षभरातंच अतीश्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले व रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केला जायचा. त्यामुळे घोषणा केलेल्या या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डाॅलर्स जमा केले. बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिकेनंतर पत्त्यांच्या इमल्यासारखी त्याची ही योजना कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केल्या प्रमाणे पूर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने त्यापैकी कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअल करत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळतं की ती पाॅंझी स्कीम होती म्हणून...
लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया व डॅालर्सचा पाऊस
कोलंबीयन लष्कराच्या हंटर बटालियनचा लेफ्टनंट जॅार्ज सानाब्रिया २००३ साली आपल्या ७२ जवानांसह मिशनवर होता. मिशन होतं कोलंबीयाच्या जंगलात अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या परदेशी न��गरिकांची सुटका करणं. कित्येक आठवडे झाले होते आणि जंगलातली उदरनिर्वाहाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. तशात एके दिवशी सकाळी एक जवान बेस कॅम्पला आला. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण त्याच्या खिशांत आणि हातात ओसंडून वाहणारे १०० अमेरिकन डॅालर्सच्या नोटांचे बंडल्स होते. जॅार्जला वाटलं खोट्या नोटा असतील. पण निट निरखून पाहता सगळ्या खऱ्या नोटा होत्या. सगळा कॅम्प तहान भूक विसरून गेला. नोटांचं रहस्य होतं एफ.ए.आर.सी. या कोलंबीयाच्या दहशतवादी संघटनेनं जमिनीत पुरुन ठेवलेला पैसा. एफ.ए.आर.सी. जरी दहशतवादी संघटना असली तरी कोकेनचा अवैध व्यवसाय करणं त्यांना जास्त फायद्याचं ठरु लागल्यानं क्रांती वगैरे करण्याचं सोडून कोकेनचा व्यवसाय करत होती. काही आठवड्यांपासून हंटर बटालियनच्या या कंपनीचा मुक्काम एफ.ए.आर.सी. च्या कॅम्पवर होता. सगळे जवान या दहशतवादी संघटना कम ड्रग कार्टेलच्या जमिनीत बॅरल्समध्ये पुरुन ठेवलेल्या मध्यवर्ती बॅंकेच्या साठ्यावर अक्षरश: झोपत होते.
जाॅर्जच्या कंपनीची चांदीच झाली. अतिरेक्यांच्या तावडीतून ओलिसांची सुटका वगैरे करायचं काम कंपनीनं थांबवलं आणि खजिन्याच्या शोध घ्यायचं काम सुरु झालं. जाॅर्जने कंपनी कमांडर म्हणून निर्णय घेतला की सापडलेल्या पैशांबद्दल बटालियन हेडक्वार्टरला काही सांगायचं नाही. साधा सोपा हिशेब ठेवला; जो जितके डाॅलर शोधून काढेल तितके त्याचे. एका बॅरलमध्ये ८० लक्ष अमेरिकन डॅालर अशी वीस पेक्षा जास्त बॅरल्स जवानांनी उकरुन शोधून काढली. सुमारे १५ कोटी अमेरिकन डाॅलर्स होते. भारतीय चलनामध्ये ७५ रुपये प्रती डाॅलर हा हल्लीचा भाव धरला तर ११२५ कोटी रुपये होते.
जवानांचं स्वप्नरंजन सुरु झालं. अर्धपोटी असणं सगळे विसरुन गेले. दोन आठवडे असेच गेल्यानंतर सापडलेल्या डाॅलर्सचा वापर दैनंदिन गोष्टींसाठी करत छोटी अर्थव्यवस्था सुरु झाली. शंभर डाॅलरला एक टाॅयलेट पेपर, बॅटरीसह रेडिओ एक हजार डाॅलरला, नविन टूथब्रशची कितीही किंमत दिली तरी एकजण विकायला तयार नव्हता असे प्रसंग घडू लागले. मंडळी कोट्याधिश होती पण खायला काही नव्हतं. आर्मीची हेलिकाॅप्टर्स् इतर महत्वाच्या ॲापरेशन्समध्ये गुंतली असल्यानं या कंपनीच्या जवानांना हेडक्वार्टरला परत न्यायला येऊ शकत नव्हती त्यामुळं हंटर बटालियनच्या कंपनीचे जवान जंगलातच अडकून पडले होते.
शेवटी एकदाची हेलिकाॅप्टर्स आली आणि जितके होतील तितके डाॅलर्सचे बंडल्स घेऊन जवान हेलिकाॅप्टर्स् मध्ये चढले. ठासून हॅवरसॅक्स भरल्या तरी सगळ्यांना मिळून ४ कोटी ६ लक्ष डाॅलर्सच सोबत नेता आले. बाकीचे १०-११ कोटी डाॅलर्स परत बॅरल्समध्ये भरून पुरुन ठेवायला लागले. जवानांचं अवजड लगेज पाहून पायलटना पण आश्चर्य वाटलं. कुणाला काही सांगू नका आणि पैसे खर्च करु नका हा जाॅर्जचा सल्ला मानतील तर ते तरुण जवान कसले? पोपोयान या टाऊन जवळच्या हेडक्वार्टरला परत आल्या आल्या जवानांनी उन्माद सुरु केला. कासा द कॅम्बियो या परदेशी चलन कोलंबियन चलनात बदलून देणाऱ्या ॲाफिसमधलं कोलंबियन चलन संपलं. कुणी महागड्या गाड्या, कुणी मोटारसायकली, कुणी बारमध्ये प्रचंड पैसे उडवायला सुरुवात केली. ही बातमी बटालियनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या कानावर न जाईल तरच नवल. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या जवानांना फाॅलइन व्हायचा आदेश निघाला. जे परेडवर हजर झाले त्यांना अटक करण्यात आली. जे पसार झाले त्यांचा शोध सुरु झाला.
पळुन गेलेल्यापैकी एकजण वेस्ट इंडिजच्या एका बेटावर पोहोचला. तिथं त्यानं नविन ओळख धारण करुन लहानसे हाॅटेल खरेदी करुन ते चालवू लागला. दुसऱ्याने अर्जेंटिनाची एक बस कंपनी विकत घेतली आणि जवळ जवळ रिकाम्या बसेस चालवून काळ्याचं पांढरं करायला लागला. लेनिन नावाच्या तिसऱ्याने इक्वॅडोरला जाऊन लिंगबदल सर्जरी केली आर्मेनिय़ा नावाच्या शहरात ब्यूटी पार्लर उघडून आणि एका पोलीसाशी लग्न करुन राहू लागला. जरी कोलंबियन सरकारनं या सर्वांना गुन्हेगार घोषित केलं असलं तरी सामान्य लोकांमध्ये हे सगळे आख्यायीकांतले हिरो झाले होते. त्यांच्या मते या जवानांनी जिवावर उदार होऊन अतिरेक्यांशी मुकाबला केला आणि योगायोगानं त्यांना ही संपत्ती सापडली होती. तसं पाहिलं तर ही युध्दात मिळालेली संपत्ती होती आणि त्यामुळे त्यांनी ती स्वत:कडे ठेवण्यात काही गैर नव्हतं.
कालांतराने अटक झालेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आणि काहींना त्यांच्याकडून जप्त केलेलं पैसेही परत मिळाले. परंतु ही शापीत दौलत होती. त्यापायी कित्येकांच्या हत्या करण्यात आल्या. कित्येकांच्या कुटुंबातील लोकांचं अपहरण करुन खंडण्या मागण्यात आल्या तर कित्येकांना सरळ सरळ धाक दाखवून लुटण्यात आलं.
टन ॲाफ लक हा सिनेमा या घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर रिग्रेसो अ ला वुआका (खजिन्याकडे परत) ही स्पॅनिश भाषेत सिरीयल पण आली आहे.
पैशांबद्दलच्या दहा गोष्टी
आपल्याकडे असलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी. थोडक्यात काय तर पैसे कमावणं आणि कमावलेले पैसे सांभाळूणं वाढवणं या दोन वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पगारदार तसेच ज्यांची मासिक आमदानी ठरलेली असते अशांना पैसे बॅंकेत टाकता येतात त्यामुळं सांभाळायचे कसे हा प्रश्न राहात नाही. परंतु त्यामुळे त्यांच्यापुढे कमाईवृद्धी कशी करायची ही मोठी समस्य़ा असते. दुर्देवानं याकरीता मूलभूत गरजांना आणखी कात्री मारुन बचत वाढविणं हाच पर्याय राहतो. दुर्देवानं अशासाठी की सकस आहार, रोजच्या जिवनातले छोटेमोठे आनंद इत्यादिंना यांना व यांच्या कुटुंबीयांना जास्त बचतीपायी मुकावं लागतं. देशापुरताच विचार केला तर गृहिणींनी केलल्या बचतीमुळे बहुतांश मध्यम आणि गरीब वर्ग तग धरुन आहे असं आय.आय.एम.बंगळूर अर्थशास्राचे प्राध्यापक डाॅ. आर. वैद्यनाथन म्हणतात ते खरंच आहे. या उलट व्यापार उद्यमाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पैसे येतात ते पुन्हा उद्योगधंद्यात योग्यप्रकारे गुंतवूण वाढवणं हे सुध्दा मोठं आव्हान असतं.
पैसा कुणाचा? तर जो उपयोगात आणेल त्याचा, असं बेंजामिन फ्रॅंक्लीन म्हणंत. पैसे मिळविण्यातल्या व्यस्ततेत कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्याचं राहूनंचं जातं. पैसे बँकेत, शेअर मार्केट, रिअल इस्टेट वगैरेमध्ये अडकून किंवा दुर्लक्ष झाल्याने पडून राहतात. गुंतवणूक केलेल्या समभागांच्या कल्पनारम्य (नोशनल) मूल्यामध्येच समाधानी राहावं लागतं. नोशनल मूल्य म्हणजे समभागांचे बाजारमूल्य. शेअरबाजाराच्या निर्देशांच्या वाढ किंवा घटीप्रमाणे समभागांचे मूल्य कमी जास्त होत राहाते. पुन्हा प्राध्यापक आर. वैद्यनाथन यांच्या मिश्कील शब्दात सांगायचं तर शेअर बाजारामध्ये लक्षावधी अभिमन्यू गुंतवणूकदार आहेत ज्यांनी शेअरबाजाराच्या चक्रव्यूहात प्रवेश तर केला परंतु त्यातून सहीसलामत बाहेर कसं पडायचं हे माहित नसल्याने आतंच अडकून पडलेले आहेत. काहींची मोठे परतावे कमी वेळेत देतील अशा आकर्षक परंतु फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक होते. बाजारात प्रचलीत असलेल्या व्याजदरापेक्षा गुंतवणूकीवर जास्त व्याज देणाऱ्या बऱ्याच योजना बनवाबनविच्या असतात. जेष्ठ ��ागरिक ठराविक मासिक उत्पन्न मिळेल या आशेने या योजनांमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे गुंतवतात. फसवणूक करणं हे अशा खाजगी कंपन्यांचं पहिल्यापासून बिझनेस मॅाडेल असल्यानं पश्चाताप करण्याशिवाय गुंतवणूकदारांच्या हातात काही शिल्लक उरत नाही.
काही बनेल रिअल इस्टेटवाले मोठ्या परताव्याचं अमिष दाखवून दरमहा अमूक तमूक व्याज देऊ असं सांगून रोकड उचलतात. दरमहा व्याज योग्य रितीनं मिळत असल्यानं गुंतवणूकदार समाधानी असतात आणि आपल्या गुंतवणूकीच्या वृध्दिबद्दल निश्चिंत होतात. एके दिवशी रिअल इस्टेटवाला झटका देतो आणि जाहिर करतो की मार्केट फार डाऊन आहे. इथूनपुढे व्याज काही देऊ शकत नाही. इतकंच नाही तर मुद्दल सुध्दा द्यायला मार्केटची परिस्थिती सुधारेपर्यंत थांबाव लागेल. यामुळं गुंतवणूकदारांचं धाबं दणाणतं. वाटाघाटी होतात, प्रश्न काही सुटत नाही. कसा सुटणार ? तो रिअल इस्टेट वाल्यानं मुद्दाम तयार केलेला असतो. वादावादी वाढते. दिवाणी कोर्टात जावं तर बरीच वर्ष लागतील म्हणून पोलीसात जातात. पोलीस स्टेशनला रिअल इस्टेटवाला कबूल करतो की अमूक वर्षांपूर्वी अमूक रोख रक्कम कच्च्या कागदावर लिहून घेतली होती. त्याचबरोबर प्रत्येक गुंतवणूकदाराला दरमहा दिलेल्या व्याजाची यादी देतो. गुंतवणूकदारांच्या आश्चर्याला तेंव्हा पारावार राहात नाही जेंव्हा त्यांना समजतं की व्याजाची रक्कम जवळपास मुदलाएवढी झालेली असते. पोलीसांकडील जबाबात हे नमूद केलं जातं. खोट्या नम्रतेने आपण प्रामाणिक आहोत आणि मार्केट डाऊन असल्यानं हतबल असल्याचं रिअलइस्टेटवाला सांगतो. त्यावेळी समजून जायचं की पैसे घेताना मुदलाएवढं व्याज देऊन झालं की हात वर करायचे हे ठरवूनच रिअल इस्टेट वाल्यानं व्यवहार केलेला आणि प्रत्यक्षात कुठलंही व्याज न देता तीन चार वर्षे गुंतवणूकदारांचे पैसे वापरलेले असतात. गुंतवणूकदारांची फक्त मुदलावरंच बोळवणं होते.
पैसे तात्पुरते उसणे दिलेल्या नातेवाईक किंवा मित्रांनी ऐनवेळी धोका दिला तर आपल्या पैशांवर त्यांना मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. या उलट उत्पन्न तुलनेनं कमी असलं तरी आहे त्याचा पुरेपुर उपयोग करणारे काहीजण असतात. वेळोवेळी देश विदेशात पर्यटन करणारे. कुटुंबासोबत सणासुदीला एकत्र राहणारे सदैव पैसे मिळवण्यात व्यग्र राहात नाहीत. आयुष्यातले छोटे छोटे आनंद वेचण्याची मजा घेतात. खऱ्या अर्थानं पैसा त्यांचा असतो.
मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. पैसे कमावणं हे जुगाराच्या आहारी गेल्यासारखं होऊन बसतं. आजच्या समाजव्यवस्थेमध्ये पैसे हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं महत्वाचं एकक झालं आहे. पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येकाची कामं आणि त्याबाबत मिळणारा मोबदला परंपरागत रितीने ठरलेला होता. परस्परावलंबी असल्याने कुणाकडे किती द्रव्यसंचय व्हावा याला मर्यादा होत्या. सततच्या युध्दांमुळं शांततेचा अभाव, करांचा बोजा आणि स्थावर मालमत्तेच्या मालकीबद्दलची संदिग्धता असल्याने फक्त व्यापारीवर्ग चोरुन लपवून थोडेफार पैसे बाळगून असायचा. त्यांच्यापुढेही पैशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होता. चोर लुटारुंची नेहमीची भिती आणि त्यांच्यापासून वाचवला तरी तात्कालीन राज्यकर्त्यांपासून धोका होताच. त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणावर द्रव्यसंचय होण्याची परिस्थिती नव्हती. सध्याच्या समाज व अर्थव्यवस्थेत या सर्व समस्यांवर खुबीनं मात करण्यात आली. त्यामुळं जगण्यासाठी पैसा हे सूत्र दुर्देवानं मागं पडलं व पैशाकरीता जगणं सुरु झालं. आनंदी जिवन जगण्यासाठी संतुलन आवश्यक आहे. ते ज्यांना साधलं ते नशिबवान.
प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा काॅईनबाॅक्स पॅटर्नवर बेतलेल्या असतात. नाणं टाकल्याशिवाय पूर्वी टेलिफोन लागत नसत तशा. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुध्दा पैशाशी निगडीत असतात. या गरजा पुरविण्यासाठी बचत फार आवश्यक ठरते. मुलांच्या शिक्षणाबाबत सुरुवातीपासूनच फार जागरुक राहायला लागतं. चांगल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण देणं क्रमप्राप्त ठरतं. कुणी काहीही म्हणो परंतु चांगलं शिक्षण नसेल तर चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. तीच परिस्थिती आरोग्यसेवांची आहे. कोरोना महामारीच्या काळात याची सर्वांना चांगलीच जाणीव झाली. आरामदायी जिवनशैली, व्यायामाचा अभाव, नोकरी व्यवसायाच्या मागे लागल्यामुळे प्रकृतीची हेळसांड झाल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर मृत्युच्या थैमानामुळं सर्वांचंच धाबं दणाणलं होतं.
फॅमिली डॅाक्टर ही संस्था आता वैद्यकीय व्यवसायातल्या वेगवेगळ्या विशेष तज्ञांमुळे जवळ जवळ लयास गेली आहे. रुग्णाची स्टेथेस्कोप लावून तपासणी आणि लक्षणांबाबत विचारपूस करुन रोगनिदान जवळ जवळ कालबाह्य झालं आहे. डॅाक्टर थोडा नावारुपाला आला की ज्युनिअर डॅाक्टर्स सोबत ठेवतो. पेशंटच्या रोगाबद्दल व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल हे ज्युनिअर डॅाक्टर्स पेपर्स तयार करुन ठेवतात. मग एकामागोमाग एक पेशंट नामवंत डॅाक्टरांच्यापुढे पाठवले जातात. एक किंवा दोनच मिनिटात फॅार्म बघून गोळ्याऔषधांचं प्रिस्क्रिप्शन सांगितलं जातं. गमतीची गोष्ट अशी की पेशंटशी हे निष्णात डॅाक्टर कधी कधी डायरेक्ट बोलत सुध्दा नाहीत. किमान रक्त व मूत्र तपासणी केल्याशिवाय रोगनिदान केलं जात नाही. क्लिनिक, लॅब्ज, डायग्नोस्टिक सेंटर्स आरोग्यविमा कंपन्या व औषध कंपन्याच्या साट्यालोट्यात रुग्णांची ससेहोलपट व पिळवणूक होते. आंतररुग्णांसाठी तर आरोग्यविमा ही अत्यावश्यक गरजच झाली आहे. कधी कधी जेवढा विमा मोठा तेवढ्या वेगवेगळ्या तज्ञ डॅाक्टरांच्या भेटी जास्त आणि करायच्या टेस्ट्सची संख्या मोठी. विम्याच्या देय पैशांइतका आंतररुग्णाचा रुग्णालयातला मुक्काम वाढतो. बेजार झालेल्या नातेवाईकांना रोगनिदाना बद्दल काही शंकासुध्दा घेता येत नाही कारण सगळे रिपोर्ट हे पुरावे असतात. तसं पाहिलं तर विशिष्ट वयानंतर शरीरातल्या व्याधी शोधायच्याच म्हटलं तर ते काही फार अवघड काम नाही.
दैनंदिन गरजांचा विचार करता पूर्वी सामानाची यादी करून वाण्याकडे दिली की किराणा भरला जायचा. आता कुणी याद्या वगैरे तयार करायच्या भानगडीत पडत नाही. मॅालमध्ये बास्केट किंवा ट्रॅाली फिरवत कशावर काय फ्री, किती सूट हे बघायचं आणि आवश्यक वस्तूंबरोबर गरज नसलेल्या वस्तूंचं शाॅपींग करायचं. मॅालवाले ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन भुलभुलैय्ये तयार करतात व ग्राहकांना भुरळ पडेल अशी वस्तूंची मांडणी करुन ठेवतात. सरकत्या जिन्यांवरुन चढताच अवतीभोवती सगळ्या वस्तू आकर्षक पध्दतीने लावलेल्या दिसतात. ज्या वस्तूंच्या किमती बद्दल गृहिणी जागरुक असतात अशा वस्तूंचे भाव कमी ठेवले जातात व त्यांच्यावर आणखी सवलती, छोट्यामोठ्या वस्तू फ्री देऊ केल्या जातात. मोठे दुकानदार आपला नफा ग्राहकांना किमतीचा अंदाज नसलेल्या इतर आकर्षक वस्तू व ब्रॅंडच्या माध्यमातून वसूल करतात.
असो... शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजा भागविताना येणाऱ्या समस्या बचतीच्या पैशामुळं पूर्णपणे सुटल्या जरी नाहीत तरी सुसह्य होतात.
गुंतवणूकीत एक्झिट पाॅलीसी, म्हणजे कधी बाहेर पडायचं याची वेळ महत्वाची असतं. आधी म्हटल्याप्रमाणे अर्थविषयक जागरुकता व नियोजन या दोन्ही गोष्टींकडे बहुतेकांचं सर्रासपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. कोणत्या ठेवी कधी परिपक्व होतात, किती व्याज मिळालं, व्याज योग्यरित्या आकारुन दिलं आहे का या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. योग्यप्रकारे पाठपुरावा न केल्यानं ठेवींना बॅंक आपोआप मुदतवाढ देते. प्रथमदर्शनी व्याज बुडाले नाही तरी त्याला तसा फार अर्थ नसतो. एखाद्या ठेवीची मुदत संपताच रोखीकरण करून गुंतवणूक विश्राम घेणं बरं. त्या व्यवहारात मिळालेले व्याज किंवा झालेला नफा आपल्या कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकणं योग्य. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. बचतीच्या बाबतीत असं म्हणतात की खर्चकरून शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे बचत असं न समजता आधी बचत किती करता येईल हे पाहावं व तेवढी बचत करायचं नियोजन करून शिल्लक राहिलेले पैसे खर्च करावेत. मिळकत वृध्दीच्या प्रमाणात बचतीची टक्केवारी तसं पाहिलं तर वाढायला पाहिजे. परंतु तसं नेहमी होत नाही. कित्येकवेळा या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबूनही राहात नाहीत. त्यामुळे बचतीसाठी काटकसर, साधी राहाणी हाच पर्याय आपल्यासमोर शिल्लक राहातो.
बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या लिखाणात क्रेडिटर्सच्या म्हणजे पैसे उधारीनं देणाऱ्यांच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. पैसे उधार देणारी माणसं ज्याला पैसे दिलेले असतात त्याच्या राहणीमानाकडे कायम लक्ष ठेऊन असतात. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तूपेक्षा महागडी वस्तू कर्जदाराने घेतल्याचं उधार देणाऱ्याच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या दारात, आपले ठरलेल्या व्याजासह पैसे परत मागायला आलाच म्हणून समजा. कर्जदार जर मेहनत करताना आढळला तर तोच उधार देणारा शाश्वत होऊन आपल्या पैशांबाबत निश्चींत राहातो. कुणाकडून कर्ज घेतलं तर आपल्याकडे पैसे येताच जेवढे शक्य असतील तेवढे परत करावेत. पैसे कमी आहेत म्हणून कसे द्यावे असा संकोच करू नये. उधार देणारा त्याला योग्य प्रकारे आग्रह केल्यास ते स्विकारतो. थोडं थोडं करून कर्ज उतरवित जावं असा मोलाचा सल्ला बेंजामिन फ्रॅंक्लिन यांनी देऊन ठेवला आहे.
इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थाॅट या तत्वज्ञानात मानलं जातं. अस्तित्व, सत्य आणि ज्ञान या त्रिसूत्रीशी निगडीत अध्यात्माचा शोध घेण्याची एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिका व ब्रिटनमध्ये एक चळवळ सुरु झाली. राल्फ वाल्डो इमरसन यांच्या अच्च्युतम व अलौकिक अनुभवाच्या तत्वज्ञानाचा या चळवळीवर प्रभाव आहे. शारिरीक व मानसिक व्याधींची उत्पत्ती आधी मनात होते त्यामुळे सकारात्मक विचार मनात आणले तर यावर मन:शक्तीने मात करता येऊ शकते असं ही विचारधारा म्हणते. ख्रिस्ती विचारसरणी वर बेतलेली असली तरी वेगवेगळ्या अतिप्राचीन विचारांची एकत्र मोट बांधून न्यू थाॅट तयार झाल्याचं दिसतं. ध्यान, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि जे मिळेल त्याच्याबद्दल कृतज्ञता असेल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्राप्त होऊ शकतात असंही या विचारसरणीत सांगितलं आहे. वॅलेस डी वॅटल यांचं "सायन्स ॲाफ गेटींग रिच" (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं "द सिक्रेट" ही दोन पुस्तकं न्यू थाॅट विचारसरणीवर आधारीत आहेत.
गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. सिकटा पटी या लेखिकेनं पायोनियर या वर्तमानपत्रातील गरीबीच्या उदात्ती करणाची मिमांसा करताना लिहिलं होतं की भारतात चांगलं विरुध्द वाईट या अनुभूतींशी गरीबी श्रीमंती विनाकारण जोडले गेले आहेत. पौराणिक कथा, रामायण- महाभारतातले प्रसंग आणि हल्ली सिनेमातून दाखवण्यात येणाऱ्या महिलांच्या व्यक्तिरेखा या ध्रुविकरणाला जबाबदार असाव्यात. कुटंबासाठी कष्ट उपसून मुलांना नावारुपाला आणणारी महिला साध्या कपड्यात, साध्या राहणीमानाने त्यांना नितीमत्तेचे, परोपकाराचे आणि चांगुलपणाचे धडे देत मोठं करते. शेवटी तिचा विजय होतो आणि वार्धक्यात ती सुखी होते. या उलट श्रीमंत महिलेची पाश्चिमात्य वेषभूषा, लाईफस्टाईल, घमेंडी स्वभाव आणि आरामदायी सुखसोयींचा उपभोग घेणारी प्रतिमा दाखवली जाते. गरिबी म्हणजे प्रामाणिकपणा, साधेपणा, त्याग तर श्रीमंती म्हणजे अप्रामाणिकपणा, लोकांचे शोषण आणि गर्व असं दाखवलं जातं. प्रामाणिकपणे कामधंदा करून श्रीमंत होताच येत नाही अशी लोकांची धारणा करुन देण्यात आली आहे. एक योगिनी तर दुसरी भोगिनी. असं चित्रण केल्यामुळे काळ्या पांढऱ्यांमधल्या विविध छटा स्पष्टपणे दिसतंच नाहीत. श्रीमंतीतली माणसं प्रामाणिक, दयाळू आणि पापभिरू तर गरिबीतली माणसं क्रूर, अनैतिक आणि बेईमान असंही असू शकत हे आपल्या सहजासहजी पचनी पडत नाही. गरीबीतून सगळा समाजंच बाहेर काढणं हे राष्ट्रांचं धेय्य असायला हवं. विकसीत राष्ट्रांमध्ये ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात वास्तवात आल्याचं दिसतं.
कोडिपेंडन्सी
कर्तृत्ववान माणूस सेंच्युरी मिल्स च्या लोगो मधल्या हर्क्युलस सारखा दिसतो. जणू खो-खो खेळायला बसला आहे. दोन्ही हातांनी पृथ्वीगोल मानेवर तोलून धरलेला आणि त्यामुळे सदैव सतर्क राहून जणू खो ची वाट पाहाणारा. गोदीतली वॅगन खाली करणाऱ्या माथाडी कामगारासारखा पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांमुळे झुकलेला. हाच तो कोडिपेन्डन्ट. मराठी भाषेत याला काय शब्द आहे ते माहित नाही परंतु या लेखापुरतं को-डिपेन्डन्टला आपण हर्क्युलस म्हणू.
को-डिपेन्डन्सी हा गेल्या काही वर्षात इंग्रजी भाषेत प्रचलित झालेला शब्द आणि मानसिक आजार आहे. आपल्या माणसांना म्हणजे लाभार्थीना गरज असो वा नसो त्यांना सदैव मदत करणारा. त्यांच्या विचित्र, बेजाबदार आणि हेकट वागण्यापुढे मान तुकवून त्यांची काळजी घेणारा, आपल्या वैयक्तिक गरजा, आनंद इत्यादि बाबी गौण माननारा, सदैव आपल्या माणसांना वाचवणारा त्यांच्यासाठी लढणारा ग्लॅडिएटर ही को-डिपेन्डन्टची म्हणजे आपल्या हर्क्युलसची स्वप्रतिमा असते. या इमेजमध्ये तो दंग आणि खुष असतो. इतका की एखाद्या जुगाऱ्यासारखा आपल्या माणसांना मदत करणं हे व्यसन होऊन बसतं. चुकून कुणाला नाही म्हणायची जर वेळ आली तर त्याला ओशाळल्यासारखं व्हायला लागतं.
खेडेगावी एक साधा पत्यांचा जुगार चालायचा. दोन प्रतिस्पर्धी समोरा समोर बसायचे. एकजण पत्ते पिसायचा व दुसरा बोली लावायचा. समजा बोली लावली की कोणताही गुलाम पत्ता ज्याच्याकडे पहिला येईल तो जिंकला... आणि यावर एक रुपयाची बोली. पत्ते पिसणाऱ्याने बोली स्विकारली की दोेघे एक एक रुपया टेबल टाकायचे. मग पत्ते पिसणारा एक समोरच्याकडे आणि दुसरा स्वत:कडे असे पत्ते उघड करायचा. ज्याच्याकडे गुलाम पत्ता पहिल्यांदा येईल तो डाव जिंकायचा. मग पुढची बोली आणि पुढचा डाव. पत्त्याचा हा जुगार खेळणारे जरी दोघे असले तरी भोवती कोंडाळं करुन पहाणारे दहाबारा असायचे. मग अवती भोवतीचे पाहणारे त्याच डावावर जोड्या करुन पाच-दहा पैशांच्या लहान लहान पैजा लावायचे. अशा प्रकारे हर्क्युलसच्या डावावर अवलंबून राहणारी बरीच माणसं त्याचं कौशल्य गृहित धरु लागतात आणि आपल्या पैजा हर्क्युलस जिंकून देईल या विश्वासावर निर्धास्त जगतात. हर्क्युलसला मानसिक त्रास होईल, समाजामध्ये त्याची पत घसरेल, त्यांच्यावतीने इतरांना विनंत्या करताना त्याला ओशाळल्यासारखं होईल याचीसुध्दा काहींना फिकीर नसते. हर्क्युलसनं दहा पैजा जिंकल्या आणि अकरावी मोठी पैज हरला तर त्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात.
को-डिपेन्ड्न्सी हे व्यसन प्रयत्नपूर्वक संपवणं महत्वाचं आहे. कोणत्याही नात्यामध्ये सकारात्मक देव-घेव असणं नात्याला पोषक असतं. ज्यावेळी एकतर्फी आवक बारनिशी चालू होते त्यावेळी आपल्यातल्या ग्लॅडिएटरला थोडा आवर घालणं गरजेचं ठरतं. इतरांचे प्रश्न आपण तयार केलेले नसतात, त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं आणि ते सोडवणं नेहमीच काही शक्य नसतं. नेहमीच जिंकून देऊ न शकल्यानं येणारी गिल्ट प्रयत्नपूर्वक संपवावी, कोणत्या रास्त गोष्टींबाबत मदत करू शकतो आणि कोणत्या नाही याची सीमारेषा स्पष्ट करावी, आपल्या सौख्याला प्राथमिकता देण्यामध्ये काही गैर नाही ही भावना जोपासणं गरजेचं ठरतं.
त्यांनी “ मी लाभार्थी” नाही म्हटले तरी फारसा फरक पडू नये. दातृत्वाचा मूलभूत नियम आहे की देणाऱ्याने कुवतीपेक्षा थोडं जास्त द्यावं आणि घेणाऱ्यानं गरजेपेक्षा कृतज्ञतापूर्वक थोडं कमी घ्यावं. जिथं घेणारा हा नियम मोडेल तिथं देणाऱ्यानं भविष्यातलं देण्याघेण्याचा विषय संपवावा.
नात्यागोत्यांच्या बाबतीत आतापर्यंत सांगेन तिथं कडाडून विरोध होतो अशी ��ाझी एक पक्की धारणा आहे. ती म्हणजे आपल्यावर सदैव निस्पृह प्रेम करणारी नाती दोनचं- आई आणि मुलगी- बाकीं नात्यांमध्ये काहीना काही स्वार्थ दडलेला असतो. आईकडे हवंतेवढं लक्ष न देणारा मी अपराधी आहे. त्यामुळं मुलांनी माझी अपेक्षेएवढी काळजी घेतली नाही तरी तक्रार करणार नाही असं ठरवतो आहे.
पोलीसींगच्या बाबतीत इतक्या वर्षांच्या नोकरीनंतर सुपरकाॅप, गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे फिक्शन असतं असं माझं मत आहे. पोलीस दलामध्ये सिनेमाच्या लार्जर दॅन लाईफ व्हायरस पासून जे स्वत:ला दूर ठेवतात, यशाचं श्रेय सहकाऱ्यांना देतात आणि तत्वज्ञान हा फक्त विद्यापीठातच शिकवायचा विषय आहे अशी ज्यांची धारणा असते अशीच माणसं नेतृत्व देतात. खोटं वाटत असेल तर ब्रिटीश फिल्ड मार्शल माँटगोमेरी यांचं लिडरशीप हे पुस्तक वाचावं.
पोलीसासारखी इंटरेस्टिंग दुसरी नोकरी नाही. खात्यात आल्यापासून नोकरीबद्दला कधीही पश्चाताप झाला नाही. उलट कित्येक वेळा वाटायचं, खरंच आपण गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्यकर्म केलं असावं. काही सहकाऱ्यांना पोलीस विभागाबद्दल नाराजीचा सूर लावताना आणि स्वत:वर कसा नेहमी अन्याय होत आला याचा पाढा वाचताना पाहतो तेंव्हा मला आश्चर्य वाटतं की हे असं का बोलत आहेत? कितीही खडतर पोस्टींगवर काम करायची वेळ आली तरी तिथंही असेच उल्हासाने काम करणारे सहकारी मिळतातंच. त्यामुळं पोलीसींग एन्जाय करायला शिकलो. पोलीस स्टेशन म्हटलं की तिथं समाजात घडणाऱ्या वाईटसाईटाचं रिपोर्टिंग होणारंच. कायदा सुव्यवस्थेचे मोठमोठे प्रश्न निर्माण होणारंच आणि त्यामुळे कधी काळी आपल्याला शारीरिक इजा किंवा मानसिक त्रास होईल असं वाटलं तरी योग्य प्रकारे तयारी करुन दोन हात केले तर तसा काही धोका वगैरे होत नाही असं मला जाणवलं आहे. या गोष्टींकडे आपल्यावर आलेली संकट म्हणून न बघता दैनंदिन पोलीसींगचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलं तर त्रास होत नाही.
सेवानिवृत्तीची आतापर्यंत ऐेकलेली भाषणं आठवता सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा कंठ दाटून येणं, डोळ्यांत टचकन पाणी येणं या गोष्टी होताना पाहिल्या आहेत. आपल्या बाबतीतही असं काही होणार नाही याचा भरवसा नसल्यामुळं हे सगळं लिहून ठेवावं असं मनात आलं.
जयंत नाईकनवरे. (९८९२००२५००)
३० डिसेंबर, २०२३
1 note · View note
dixitsantosh · 9 months
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठ���ली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
Text
मोदींना वॅग्नर ग्रुपची भिती दाखवत ठाकरे गट मुफ्तींसोबतची निकटता झाकू शकेल?
https://bharatlive.news/?p=107707&wpwautoposter=1687839032 मोदींना वॅग्नर ग्रुपची भिती दाखवत ठाकरे गट मुफ्तींसोबतची निकटता झाकू ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सरकारवर शिक्कामोर्तब केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आणि
महिलांच्या पुर्नवसनासाठी राज्यात पन्नास ठिकाणी शक्तीसदन सुरु करणार.
****
सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सरकारवर शिक्का मोर्तब केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले –
आम्ही सरकार जे स्थापन केलं. ते पूर्णपणे कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करुन आम्ही सरकार स्थापन केलं. आणि बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार अशा प्रकारे म्हणून मानसिक समाधान आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. परंतू त्यांना आज सुप्रीम कोर्टाने एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले –
मला असं वाटलं की, ज्यांना सगळं देऊन सुद्धा हपापलेली लोकं ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हापापल्यापणावर मी पुरेसा पडू शकणार नाही. कारण आणखी काय देणार तर अशा लोकांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखवणे हे मला मंजूर नव्हतचं, ते मंजूर नाही मी कदापीही ते मान्य करणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. तसं एव्हढं आता सर्वोच्च न्यायालयानं फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला सामोरं जावं.
राज्यपाल असावे की नसावे, ही चर्चा आता सुरू व्हायला हवी, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळं लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे. या निकालानं आपलं सरकार घटनात्मक ठरवलं आहे, असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खुर्ची करता विचार सोडला, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विचाराकरता खुर्ची सोडली असं म्हणत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांनी नैतिकतेपोटी नाही तर भिती आणि लाजेपोटी राजीनामा दिला होता अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
****
नियमांचं पालन करुन घटनात्मक बाबींचा विचार करत आमदार अपात्रते संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ते लंडन दौऱ्यावर असून तिथून त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रतिक्रीया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. घटनात्मक लोकशाहीला बळकट करणारा हा निर्णय आहे, असंही नार्वेकर यांनी सांगितलं.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं दिलं आहे, त्यामुळं नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नैतिक भूमिका म्हणून तत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलीच्या गुणवत्ता वाढीवरून झालेल्या आरोपावरून राजीनामा दिला होता. तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं शिंदे -फडणवीस यांनी ज्या प्रकारे सरकार स्थापनेसाठी पद्धत वापरली ती पूर्ण अयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे, असंही दानवे म्हणाले.
****
राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयानं तीव्र भूमिका मांडली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर दिली आहे. नैतिकता आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे, असं वाटत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप यायचा असून राज्यपाल या प्रकरणी चुकलेच, असंही पवार म्हणाले.
****
शिंदे सरकार वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्यानं विधानसभेतल्या शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे, असं ते म्हणाले. हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात केलेली कृती चुकीची होती. यात घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातल्या जनतेला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे, असं पाटील म्हणाले.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरिक्षणानंतर, भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सिद्ध झालं असल्याचं ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी निष्पपक्षपातीपणे घेणं अपेक्षित असल्याचं पटोले यावेळी म्हणाले.
****
राज्यातलं शिंदे -फडणवीस सरकार हे घटनात्मकरित्या स्थापन झालं असल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं शिक्कामोर्तब झालं असल्याची प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकारांशी बोलत होते.
****
महिलांच्या पुर्नवसनासाठी राज्यात पन्नास ठिकाणी शक्तीसदन सुरु करणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी मुंबईत नेरुळ इथं महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सावली या प्रकल्प इमारतीचं उद्घाटन, निर्भया पथकाचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी फडणवीस बोलत होते. या शक्तीसदनात पिडीत महिलेला तीन वर्ष राहता येणार असून त्यांना विशेष भत्ता दिला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात पुढल्या सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार आहे, असं पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी यावेळी जाहीर केलं.
****
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याकरता ही भेट होती, असं नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष��ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादवही या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.
****
येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मुबलब प्रमाणात बियाणं आणि खतं वाटप व्हावेत असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक घेतली, त्यावेळी हे निर्देश दिले.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून धावणाऱ्या काही विशेष गाड्यांना जून महिन्यात मुदतवाढ दिली आहे. यामध्ये तिरूपती अकोला तिरूपती, पूर्णा तिरूपती पूर्णा, विजयवाडा नगरसोल विजयवाडा, हैदराबाद तिरूपती हैदराबाद, सिकंदराबाद तिरूपती सिकंदराबाद आणि हैदराबाद नरसापूर हैदराबाद या विशेष गाड्यांचा समावेश आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात एका मुख्याध्यापकाला चाळीस हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकानं आज अटक केली. वसमत इथं पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहतीतल्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात कार्यरत भगवान लहाने या मुख्याध्यापकला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या विद्यालयात अनुकंपा तत्वातर नोकरीला असलेल्या तक्रारदाराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यासाठी लहाने यानं लाचेची मागणी केली होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
0 notes
survivetoread · 1 year
Text
Soda Stereo - En la Ciudad de la Furia (Marathi Translation)
सोडा स्टिरियो - एन ला स्युदाद दे ला फुरिया (त्वेषाच्या शहरात)
मला उडताना बघशील त्वेषाच्या शहरातून जिथे कोणाला माझ्याबद्दल माहीत नाही आणि जिथे मी सगळ्याचा भाग आहे
काहीही बदलणार नाही वळणाच्या चेतावणीने त्यांच्या चेहर्‍यांवर पाहतो भिती आता कथा नाहीत त्वेषाच्या शहरात
मला खाली येताना पाहशील शिकारी पक्षाप्रमाणे मला खाली येताना पाहशील उजाड गच्च्यांवर
तुला नगवे करेन निळ्या रस्त्यांमधून आश्रय घेईन सगळे जागे व्हायच्या आधी
देशील तू मला झोपायला पहाटेपर्यंत तुझ्या पायांच्या मध्ये तुझ्या पायाच्या मध्ये येईल तुला मला चांगलंच लपवून गायब व्हायला धुक्याच्या मध्ये धुक्याच्या मध्ये
पंख असलेला माणूस जमिनीची आठवण काढतो
मला उडताना बघशील त्वेषाच्या शहरातून जिथे कोणाला माझ्याबद्दल माहीत नाही सूर्याच्या प्रकाशासह
वितळतात माझे पंख फक्त मिळतं अंधारात मला जोडतं ते त्वेषाच्या शहराशी
मला खाली येताना पाहशील भलत्याच बाणाप्रमाणे मला खाली येताना पाहशील क्षणिक उड्डाणांच्यामध्ये
बुएनोस आयरेस दिसतं किती संवेदी त्वेषाचं नशीब आहे जे चेहर्‍यांवर कायम राहतं ते आहे
तू देशील मला झोपायला पहाटेपर्यंत तुझ्या पायांच्या मध्ये तुझ्या पायाच्या मध्ये तुला येईल मला लपवून गायब व्हायला धुक्याच्या मध्ये धुक्याच्या मध्ये
पंख असलेल्याला माणसाला रात्र जास्त आवडते
मला परतताना बघशील मला परतताना बघशील त्वेषाच्या शहरी
1 note · View note
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
बाया काळीज काढून फेकतात तेव्हा......
अलंकार नाकारून बाया अलंकार होतात तेव्हा...बाया बाया रहात नाहीत त्या फुत्कार होतात...बाया बहिर्या काळाचा चित्कार होतात...
काळजात काळजी वाहणार्या बाया..
काळीज काढून फेकलेल्या बाया,... ह्या बाया फार मोठी क्रांतीची व्याख्या असतात.. ह्याच बाया संघर्ष जगतात... त्याच बाया चमकतात... त्या ज्यालाज्याला स्पर्शून जातात ते चकाकतात....बायाच एकमेव सूर्यावर संस्कृतीची बिजलेणी कोरणार्या..उजेडाचं पिक घेणार्या महाधाडसी निवृत्त्या होतात...बाया लढाऊ वृत्त्या होतात..
बाया वरच्या आवाजात बोलतात, तेव्हा पुरूषाची पुरूष पेशी हादरते,बाया हस्तक्षेप करतात तेव्हा, मनूव्यवस्थेने त्यांची निश्चित केलेली वचकाची जागा खिळखिळी होते..बाया सदेह लढतात तेव्हा दास्यत्व गुंफण्यात मश्गूल झालेले हे मनूचे हमाल ठेचण्यासाठी पुढे सरसावतात...ते नको तिथे चावततात...तरी
बाया प्रत्येक गोष्टीचा बिमोड करून तडजोडीला जेव्हा थारा देत नाहीत तेव्हा हे जनावर बळजबरीने हल्ला करते...
बाया गुलामी तोडत चाकोरी मोडून चालतात, म्हणजे पाय वाकडा टाकताच.. यांच्या व्यवस्थेचा डोलारा वाकतो, झुकतो तुटतो कोलमडतो...
बाया बिनतोड पुढे पुढे न विचारता विचार करुन जातात तेव्हा यांची स्पर्धा मरणखाईला लागते...शह मागते..
बाया चुल्ह मुल संभोग बिगूल नाकारतात धिक्कारतात.. जेव्हा रात्री नाकारून बाया दिवसाला कुरवाळतात, तेव्हा परंपरागत पात्र शेवाळतात... त्या तरीही कोसळत नाहीत..
तेव्हा त्या विद्रोही होतात..त्या समाजदोषी होतात?
बाया पती परमेश्र्वराची खरडपट्टी काढतात तेव्हा, देव देव्हारा आणि सात जन्माचा तोच नवरा पतिव्रतेचा पुण्य फेरा बंद पाडतात... तेव्हा पुरुष मक्तेदारी शिरजोरी, दिवाळखोरी प्रथा अघोरी पंरंपररेची पिढीजात श्रृंखला कायमची उद्ध्वस्त होते... म्हणून बाया जाळल्या जातात,बुडवल्या जातात,तुडवल्या जातात.भोगल्या जातात, विटंबवल्या जातात.. त्या देवदासी होतात, त्या सती जातात, त्या वेश्या होतात... त्या दास होतात..तरीही बाया जेव्हा जेव्हा काळीजातली काळजी अन् काजळी फेकून संघर्ष करतात तेव्हा त्या विजा होतात त्या चकाकतात... त्या लखाकतात...
बाया जेव्हा गर्भ टाळतात तेव्हा त्या फार भयंकर स्त्रीवादी वाटतात,कारण त्या संग संभोग टाळतात, त्या व्यंग टाळतात, त्या निर्भय होतात... आणि या व्यवस्थेला निर्भय बायांच्या संखेची भयंकर भिती वाटते...या व्यवस्थेची गांड फाटते....
म्हणून बाया योनीसुचीतेत कोंडलेल्या असतात... त्यांचे अगं प्रत्यांगावर ताबा मिळवणे, त्यावर अत्याचार करणे, त्याचीच विटंबना करणे.. त्यांतूनच आनंदाचे घृणास्पद फवारे काढणे.. त्याला कुरतडणे, त्याला ओरबाडून काढणे,बाया दबत नसतील,ऐकत नसतील जुमानत नसतील..तर बलात्कार करणे, मारुन टाकणे, पुरुन टाकणे..फासावर लटकवणे,अविरत भटकवणे हा पुरुषार्थ आहे...हाच प्रेमाचा आडून केला जाणारा सर्वार्थ स्वार्थ आहे..... बायांच्या उंबरा ओलांडण्याच्या पाऊलखुणात वेदनेचा भावार्थ आहे...बाया जात्याभोवती भणभणत राहतात...बाया आतल्या आत किणकिणत राहतात... मिणमिणत राहतात... उरात निखारा घेऊन फणफणत राहतात...बाया बोलताच आग निघते..बाया चालताच आग लागते...
कारण बाया,एकदा का चारित्र्याचे निकष मोडून पुढे सरसावल्या तर कसोशीने तुटून पडतात.. त्या विकृतीचे लचके तोडतात...
त्या व्यवस्था पाडतात,रूढी गाडतात, त्या परंपरागत गुलामी जाळतात.. त्या स्वायत्त स्वतंत्र होऊन वेगळा पायंडा पाडतात..हे पुरुष आणि त्यांची व्यवस्था श्रेष्ठ कनिष्ठ निर्णय घेणारी देणारी अन्याय यंत्रणा जाणते....
म्हणून बाया दैवी देव्या, देवराया भोवती भक्तीनी जोग्तीनी म्हणून भक्त केल्या जातात.. त्या पाप पुण्य यांच्या मधे खोळंबतात... त्या परंपरागत पद्धतीने मानसिक गुलाम केल्या जातात.. बाया दैववादाची देवसाखळी तोडून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या फार बंडखोर होतात... त्या सत्ता धर्म अर्थ हातात घेतात...हे ते जाणतात...बायांच्या काळजाचा व्यापार करून त्यात प्रेमाच्या ढोंगाने गुलामिची बिज पेरता येतात हे ते चांगले समजतात... म्हणून ते बायांना करूणेचा झरा भक्कम चिरा.. मुलाबाळांचा पाझर,कमरेवर घागर पावित्र्याची झालर, समर्पणाचा पदर... मातृत्वाचे शिखर, संस्कृतीचे मखर बाया...बाया असंख्य नात्याच्या जाळीने व्यापलेल्या असतात...फार थकलेल्या असतात बाया...बाया आई बहीण भावजया लेकीबाळी,माम्या सुना,आत्या मावश्या सासा, अक्का, अम्मी अम्मा,खाला, आजी अन् सुनवायर्या असतात बायका... आईची घडी उकलुन पाहीलु की नात्यांच्या गुंत्यात गुंफलेल्या असतात बायका...बायका सर्व व्यापी असतात...बायका कोणत्याही धर्मापेक्षा सुंदर असतात.. तरीही बायकांना अशा अनेक खोट्या प्रतिकरुपालंकारात गुंडाळून मऊ पण जखड प्रेतासारखं न लक्षात येऊ देताही नियंत्रणात ठेवलेल्या असू शकतात बायका.....बायांचा काळीज कब्जा हा गुलामी वाढवण्याचं गर्भाकार आहे हे ते फार चाणाक्षपणे वापरतात.. त्यावर प्रेमाची मखमली चादर ओढून सजवतात...ते बाया घरातल्या घरात कुजवतात.....पण बाया फार सुक्ष्म वेदणेच्या वाहक आहेत... त्या डोळ्यातून फूटून वाहतात, त्या नद्या होतात,
त्या लेखणीतून उतरतात त्या विश्वभर पसरतात... त्या कलेच्या आदीनिर्मात्या आहेत.. त्या अकलेच्या जन्मदात्या आहेत.. त्या ज्ञात्या आहेत.. त्याच बी शोधतात... त्याच पेरतात त्याच उगवतात, त्याच अंकुरतात.. त्याच गगणाला भिडतात... त्या आभाळाला डिवचतात, त्याच विजा होऊन कडकडतात.. त्या ढग होऊन गडगडतात..
त्याच पाउस होऊन पडतात....बाया जोवर काळजाच्या बाजूने आहेत तोवर
काळजी करतात ममतेचा विस्तार करतात.. निर्माण परिवार करतात.....पण बाया जेव्हा किळीज काढून फेकतात, तेव्हा त्या त्यांना परावलंबी करणार्या परंपरेच्या नरडीचा घोट घेतात...
बाया जातवर्णवर्ग स्र्तीदास्यत्वाच्या साखळीला नष्ट करतात...बाया स्वताच स्वताचे पंख होऊन भरार्या घेतात..बाया अटकेपार स्वतंत्र मुक्त अस्तित्वाचा हुंकार पेरतात...बाया प्रत्येक लढाई जिंकतात... म्हणून ते पुरूषप्रधानतेचा दगड कायम देहांवर ढकलून देतात.... हातात बांगड्या भरतात...ते हात मोकळे ठेवतात...बाया हे नक्कीच एक दिवस हेरतील... असत्याला बेजार करतील.....बाया निर्भय होतील.. तेव्हा भयाची झोप उडालेली असेल......
- वैभव वैद्य....
0 notes
cinenama · 2 years
Text
कराटेवीर झाले लाटांवर स्वार...
आत्मविश्वास वाढवत, मनातील भिती घालवत, स्वतःला प्रेरित करण्यासाठी मिरामार समुद्र किनारी ‘द वर्ल्ड शोतोकान कराटे डो- फेडरेशन’ने आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक जपानी वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 6 months
Text
माझा आवडता तारा शुक्रतारा
असंच एकदा शेतातून घरी यायला उशीर झाला होता.रात्र अमावास्येची होती.मला अंधाराची भिती वाटायची.पण धीर येण्यासाठी मी वाटेत मधून मधून वर आकाशाकडे पहात होतो.तारे मला धीर देत होते.घरी आल्यावर जेवण झाल्यावर बिछान्यावर पडलो असताना,ताऱ्यांना उपकृत मानूनमाझ्या वहित चार ओळी लिहिल्या त्या वाचत होतो. “ प्रत्येकाकडे कुणावर ना कुणावर विश्वास ठेवण्यासारखी एखादी गोष्ट असते.काहींसाठी ती गोष्ट धर्म असू शकते,किंवा…
View On WordPress
0 notes
rohan11 · 4 years
Text
नाम जेव्हा मुखी। येई तव रामा।
भय-भिती छाया। लोपतसे।।
नाम जेव्हा मुखी। येते तव श्याम।
राग लोभ काम। शांत करी।।
नाम तुझे मुखी। येई धूम्रवर्णा।
हरि दैत्या सार्या। अंतरिच्या।।
नाम तुझे मुखी। येता पांडुरंगा।
वात्सल्याचा गाभा। लाभतसे।।
नाम तुझे आई। गूंजता ह्रदयी।
सर्व दर्शने मनी। प्राप्त होती।।
-रोहन
1 note · View note
Text
मोदींना वॅग्नर ग्रुपची भिती दाखवत ठाकरे गट मुफ्तींसोबतची निकटता झाकू शकेल?
https://bharatlive.news/?p=107707 मोदींना वॅग्नर ग्रुपची भिती दाखवत ठाकरे गट मुफ्तींसोबतची निकटता झाकू ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 October 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हाचं औरंगाबाद इथल्या शिवसैनिकांनी स्वागत केलं आहे. शहरातल्या क्रांतीचौक इथं पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी हातात मशाल घेऊन रॅली काढली आणि मशालीचं पूजन केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ आठ नोव्हेंबरला संपत आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल पाच लाख तीन हजार ५७६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१९ कोटी चार लाख ७६ हजार २२० मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ९५७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ६५४ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २७ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची दहा लाख ८५ हजार हेक्टरवर, हरभऱ्याची २१ लाख ५८ हजार हेक्टरवर, तर ज्वारीची १७ लाख ३६ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातल्या एक कोटी ६६ लाख ५० हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी खरीप हंगामात एक कोटी ५१ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरण्या होतात. रब्बी हंगामात साधारणपणे ५१ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या होतात. मागील काही वर्षांपासून रब्बी हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वेगानं घट होत आहे. यंदाच्या हंगामातही तेलबियांच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम राहण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. प्राधान्यानं मराठवाडा आणि विदर्भात घेतली जाणारी भुईमूग, करडई, सूर्यफूल आणि जवस ही रब्बीतील तेलबियांची पिकं आहेत. यंदा करडई आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
****
औरंगाबाद इथल्या ‘हिमायत बाग’ परिसराला ‘जैवविविधता वारसा स्थळ’ घोषित करण्यासाठी नागपूरच्या महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळानं काही बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत फळ संशोधन केंद्रानं मालकी हक्काचे दस्तऐवज सादर करावे, हिमायत बाग क्षेत्राचा जो परिसर जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करावयाचा आहे त्या परिसराचे अक्षांश, रेखांश सादर करावे, त्याच्या चतु:सिमा स्पष्ट कराव्यात असं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना सूचित करण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातल्या गादेगाव इथला ग्रामसेवक विनोद भुरकाडे याला दहा हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या गावच्या गावठाण्यात असलेल्या घराचा नमुना आठ अ तयार करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ही बाब निदर्शनास आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, या योजनेकडे जिल्हा प्रशासन तसंच संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आवाज उठवून प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामान्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीत खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ एक - एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात आज खुलताबाद, पंढरपूर, चित्तेगाव आणि सिल्लोड तालुक्यातल्या आमसरी आणि शिवना परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.
धुळे शहरातही आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांची पाणी पातळी वाढत असून, पुराची भिती व्यक्त केली जात आहे.
पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्याच्या काही भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील. विदर्भात पाऊसमान तुलनेनं कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
//**********//
0 notes
survivetoread · 2 years
Text
Dracula Daily Marathi Vocabulary - 1
Somehow, it didn't occur to me to make vocab list based on everyone's favourite bloodsucker and the Victorian polycule he torments. So here goes!
Tumblr media
English - Marathi [Romanisation] (gender)
journey - यात्रा [yātrā] (f.)
blood - रक्त [rakta] (n.)
coffin - शवपेटी [śavpeṭī] (f.)
night - रात्र [rātra] (f.)
midnight - मध्यरात्र [madhyarātra] (f.)
wolf - लांडगा [lāṅḍgā] (m.)
fear - भय [bhay] (m.), भिती [bhitī] (f.)
darkness - अंधार [aṅdhār] (m.), काळोख [kāḷokh] (m.)
horse - घोडा [ghoḍā] (m.)
carriage - घोडागाडी [ghoḍāgāḍī] (f.)
castle - किल्ला [killā] (m.)
mirror - आरसा [ārsā] (m.)
guest - पाहुणा [pāhuṇā] (m.), पाहुणी [pāhuṇī] (f.)
house - घर [ghar] (n.)
letter - पत्र [patra] (n.)
lizard - सरडा [sarḍā] (m.)
madness - वेडेपणा [veḍepaṇā] (m.)
moonlight - चंद्रप्रकाश [caṅdraprakāś] (m.)
tooth - दात [dāt] (m.)
neck (back) - मान [mān] (f.)
neck (front) - गळा [gaḷā] (m.)
window - खिडकी [khiḍkī] (f.)
horror - अतिभय [atibhay] (m.)
English loanwords
count - काउंट [kāuṅṭ]
diary - डायरी [ḍāyrī]
paprika - पापरिका [pāprikā]
vampire - व्हॅम्पायर [vhămpāyar]
train - ट्रेन [ṭren]
sofa - सोफा [sofā]
"माझ्या घरी तुमचे स्वागत आहे! मोकळेपणाने व स्व इच्छेने प्रवेश करा!"
“Welcome to my house! Enter freely and of your own will!”
29 notes · View notes
Text
मला आवडलेला लेख..
वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आल तुमच्या बघा येत का वाचुन.....
अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट,
एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.
अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला.
गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पान टपरी.
सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता.
नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खुप प्रसन्न , हिरवगार वाटतं होतं.
तरीही आभाळ थोड दाटलेलच होत .
बसस्टाँप वर दुसर कोणीही नव्हतं.
तेवढयात एक ५०-५५ वर्षाचे गृहस्थ हातात लाल पिशवी , खिशाला पेन , पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले. चप्पल थोडी फाटलेली , तुटलेली... पण तशीच शिवलेली. शेतात काम करुन टाचा उललेल्या.चेहरा माञ चिंतेने ग्रासलेला. डोळ्यात कसलतरी दुःख दाटलेलं. पिशवी खाली टेकवुन ते गृहस्थ वडाखाली बसले.
तशी सागरने त्यांच्याकडे एक नजर टाकली. आणि त्यांच्या बाजुला थोडी जागा राखुन तो ही बसला.
मोबाईल वर गेम खेळण्यात तो गुंतला. कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे असेच गेले असतील... पाखरांची किलबिल...निरव शांतता...थंडगार वारा.
अचानक मुसुमुसु रडण्याचा आवाज आला.
सागरने लगेच बाजुला वळुन पाहिले.
बाजुचे गृहस्थ , हुंदके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते. डोळ्यातुन माञ असंख्य धारा घळाघळा वाहत होत्या.
सागर त्यांना बघुन अस्वस्थ झाला. मोबाईल खिशात ठेवुन तो त्यांच्याकडे सरकला.
सागर - काका, काय झालं ?तसे ते गृहस्थ भानावर आले. डोळे पुसुन काहीनाही काहीनाही असा चेहरा करु लागले. सागर - काका , कुणी काही बोलल का ? भांडण झालय का ? तरीही काका नुसती मान हलवत होते. सागर -कुणाची आठवण येतेय का ? यावर गृहस्थ अजुनच रडायला लागला.
सागर - काही मनात असेल तर बोलु शकता. बोलल्याने दुःख हलक होतं. गृहस्थ भरल्या डोळ्याने सागर कडे बघु लागले. सागर कडे बघुन त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. पण तोंडातुन शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते घडाघडा बोलु लागले. कधीकधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्वकाही सांगुन जातो. गृहस्थ - अवघड असतं स्वतः चे स्वप्न दुसर्यासाठी सोडुन आयुष्यभर जगणं.
रोज थोड थोड काळीज झिजतं.
वडिल अचानक वारले,
मी मोठा...
छोटी बहिण भाऊ..आई.
खाणारी चार तोंड.
आठवीतच शाळा सोडली. मिळेल ते काम करायला लागलो.
पैसे कमवायला लागलो.
म्हटल आपण नाही शिकलो तरी बहिण भावाला शिकवु. ते शिकले काय अन मी शिकलो काय ? एकच आहे.
दोघांनाही शिक्षक बनवलं.
लग्न लावुन दिलं.
पण नंतर ते फिरकलेच नाहीत.
अवघड असतय दुसऱ्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करुन पै पै जोडणं.
मला गायक व्हायच होतं पण होता आल नाही.
म्हटल मुलाला गायक बनवु.
तो गायक झाला..
मुंबईतच शिकला तिकडेच राहीला.
परवा त्याला अँवाँर्ड मिळाला.
त्यात म्हणाला,
याच सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं.
त्याच्या बोलण्यात मी कुठच नव्हतो रे...
मला पण वाटायच इस्ञीचे कपडे घालावे पाँश रहावे. पर रोज इस्ञिला ४ रुपय महिण्याचे १२०. ते मुलाला खर्चायला होतील म्हणुन कधीच इस्ञीचे कपडे घातले नाहीत.
मला बी वाटायच गाडी घ्यावी पर पोराला काँलेज ला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणुन त्याला गाडी घेवुन दिली.
कसली चैन..मोज केली नाही.
सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये , ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा.
आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात ?
काहीच नाही..
फक्त मन मारत जगत आलो.
आता वय झालयं.,.
मरणाची भिती झोप लागु देत नाही.
आणि अर्धवट स्वप्न चैन पडु देत नाहीत.
सारखे विचार येतात.
मग बसतो समाधी लावुन.
तर लोक म्हणतात वेड लागलयं.
पण मी वेडा नाही रे...
खरचं. एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकच.
बाकी काही नाही.
माझा आवाज ऐकवु का तुला ? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण मेलेल्या स्वप्नांच दुःख च इतक जड असत की वेडं होवुनच ते पेलण्याची ताकत येते.
बोलताना अश्रु वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
घुसमट बाहेर पडत होती.
सागरला त्यांची तळमळ बघुन गहीवरुन येत होतं.
सागर - हो ऐकवा ना..
हो ऐकताच ते खुप खुश झाले.
वर्षानुवर्षे होरपळलेल्या , घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती न स्विकारावी तर नवलच.
गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले.
आजवर त्यांच गाण कुणीही ऐकल नव्हत.
" तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं
जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
तुझसे..."
त्यांचा आवाज खरच अफलातुन होता.
त्यातले चढ उतार मधुरता.. कणखरपणा अगदी परफेक्ट.
जणुकाही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा..
जो योग्य जोहरी न मिळाल्याने प्रसिद्धी पासुन कोसो दुर कड्या कपारीत दगडांमध्ये पडुन होता.
एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणुन.
आवाजाची किमया इतकी होती की झाडं ..पानं..फुलं..वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते.
इतकावेळ दाटलेल ढग सुद्धा बरसायला लागले.
जणुकाही एका सच्च्या रसीकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते.
गृहस्थाचे दुःख , त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकुन वड सुद्धा रडत होता.
पारंब्यातून अश्रुंच्या सरी बरसत होत्या.
आभाळ कोसळत होतं.
सागर आवाजात हरवला होता.
तेवढयात बसच्या आवाजाने तो भानावर आला.
गृहस्थ - चल पोरा माझी बस आली.. येतो. लय बरं वाटलं बोलुन.
गृहस्थ बस मध्ये बसुन निघुन गेले.
सागर बसकडे बराच वेळ बघत होता.
जणुकाही ती बस एका अज्ञात अवलीयाला घेवुन जात आहे ,
स्वतःच्या नकळत.
आणि जाता जाता तो अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतुन आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता.
सागरच्या मनात वादळ सुरु झालं.
काही आठवणी आठवु लागल्या.
त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम.
हातावरच पोटं.
मुलगा - मुलगी असा भेद नव्हता,
पण..
आई वडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता.
' आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करु शकतो.
तुम्ही दोघांनी आपआपसात ठरवा..
कुणी शिकायचं ते ?
त्यावर बहिण म्हणाली , सागरला शिकवुया.
तिचेही स्वप्न होते.
ती सागर इतकीच हुशार होती
पण
तिने त्याग केला स्वप्नांचा...
भावासाठी.
सागरच्या मनात एकच वाक्य घोळत होत ,
" वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते,"
सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला.
बहिण - हा सागर बोल बाळा..
सागर शांत... तिचा आवाज ऐकत
बहिण - हँलो... बोल ना आवाज येतोय का ??
सागर - ताई.... Thank you..! I respect you.
बहिण - कशासाठी ?
सागरने फोन कट केला.
पाऊस उतरला होता.
मोबाईल च्या स्क्रिन वरील पावसाचे थेंब त्याने पुसले .
आणि
जुना हिरोईनचा वाँलपेपर काढुन ताईचा फोटो सेट केला .
फोटोकडे बघुन गोड स्माईल केली.
फोटोवर मायेने ओठ टेकवले.
आणि
मोबाईल परत खिशात टाकला.
तेवढयात काँलेज ला जाणारी बस आली आणि तो गेला.
*आपल्या आजुबाजुला*
*घरात अशी असंख्य माणसं असतात*
*जी नेहमी इतरांसाठी जगतात.*
*सोप्प नसतं इतरांसाठी झुरणं*
*आणि जगणं*
*सोप्प नसत समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं*
1 note · View note