Tumgik
#मनं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rivaba jadeja: बहिणीच्या मैत्रिणीवर जडला जीव, लग्नात चालवल्या गोळ्या, आता पत्नीने जिंकली लाखो मनं
Rivaba jadeja: बहिणीच्या मैत्रिणीवर जडला जीव, लग्नात चालवल्या गोळ्या, आता पत्नीने जिंकली लाखो मनं
Rivaba jadeja: बहिणीच्या मैत्रिणीवर जडला जीव, लग्नात चालवल्या गोळ्या, आता पत्नीने जिंकली लाखो मनं अहमदाबाद: भारतीय ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा लाखो लोकांच मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने रिवाबाला जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली होती. रिवाबा या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. पूर्ण ताकत झोकून दिली रिवाबाच्या या विजयात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 16 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पाकिस्तानी सैन्याने आज जम्मू जिल्ह्यातील अखनूर सीमेवरील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला आणि युद्धविराम कराराचे उल्लंघन केले. या गोळीबारास बीएसएफच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाचा एक जवान या बेछूट गोळीबारात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, सैनिक हाय अलर्टवर आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा तसच नियंत्रण रेषेवर कडक नजर ठेवत आहेत.
****
राज्यातले शेतकरी फळ लागवडीस मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असून भौगोलिक मानांकनं प्राप्त फळांच्या लागवडीस विशेष चालना देण्याच्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना फलोत्पादन मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत काल मंत्री भुसे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना फळांवरील प्रक्रियेच्या माध्यमातून अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने विभागानं नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. डाळिंबाच्या फळापासून रस निर्मितीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी विद्यापीठांनीही या संदर्भात संशोधनाचे पूरक तपशील नवीन उपक्रमासाठी घ्यावं, शेतकऱ्यांना सोयीचं ठरणारं कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्याचं नियोजन करावं, त्या-त्या तालुक्यातील फलोत्पादन पद्धतीनुसार फळ लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.
****
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ३० कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून ३० कोटी रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
****
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम असलेल्या खाजगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्स्प्रेस वे वर दररोज २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. २००८ मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमात दुरुस्ती करुन रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं हा आदेश जारी केला आहे. जीएनएसएस प्रणाली असलेल्या वाहनांनाच २० किलोमीटर इतक्या अंतराच्या प्रवासासाठी ही सवलत असेल. २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पूर्ण अंतराचं शुल्क द्यावं लागेल.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या समारंभाची पूर्वतयारी बैठक बीड इथे निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, जिल्हा पुरवठ��� अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार आणि संबधित विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासंबधी सर्व संबंधित विभागास कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी सूचना दिल्या.
****
एकपात्री, नाट्य, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून गेली पन्नासहून अधिक वर्षे रसिकांचं मनोरंजन करणारे जेष्ठ रंगकर्मी, हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचं काल पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. बंपर लाफ्टर, नजराणा हास्याचा या कार्यक्रमातून त्यांनी रसिकांची मनं जिंकली. एकपात्री कलाकार परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
chalisha · 8 months
Text
सीता राम जपाकर | SITA RAM JAPAKAR LYRICS | PADMASHRI KAILASH KHER
चंचल मनं… सीताराम सीताराम जपाकर राम राम राम राम रटा कर सीताराम सीताराम जपाकर राम राम राम राम रटा कर
Tumblr media
0 notes
nandedlive · 2 years
Text
'मला तू खूप आवडतोस पण...,' तेजस्विनीच्या 'त्या' पोस्टमुळं चर्चांणा उधाण
Tumblr media Tumblr media
नवी दिल्ली | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Movie) अभिनेत्��ी तेजस्विनी पंडीतनं(Tejswini Pandit) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट, मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. तेजस्विनी नेहमीच तिच्या वैयक्तिक किंवा खासगी आयुष्यामुळं चर्चेत येत असते. तसेच तिचे चाहतेही तिच्याविषयी जाणून घेण्यास उस्तुक असतात. नुकतीच तेजस्विनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलयं की, ‘तू मला खूप आवडतोस पण…’ सध्या तिच्या या पोस्टमुळं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु तिनं ही पोस्ट कोणत्या मुलासाठी नव्हे तर तिच्या आगामी ‘बांबू'(Bambu) या चित्रपटाबद्दल केली आहे. तिनं या चित्रपटातील काही व्हिडीओ क्लिप शेअर करून कॅप्शन दिलं आहे की, मला खूप आवडतोस पण…, आणि मग लागतात बांबू, बांबू चा टीझर पाहिला का?, सध्या या बांबूच्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, या चित्रपटात तेजस्विनीसोबत अभिनय बेर्डेही(Abhinay Berde) झळकणार आहे. त्यामुळं हा चित्रपट पाहण्यास त्यांचे चाहते उस्तुक झाले आहेत. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
itssmeswap-blog · 6 years
Text
valentines of our childhood...
7 फेब्रुवारी :- Rose Day
          कधी काळी गुलाब माझ्या पण हातात होत पण द्यायची कधी हिम्मतच झाली नाही , हिम्मत गोळा करता करता गुलाबाच्या एकेक पाकळ्या निसटत गेल्या आणि आठवण म्हणून वहीच्या मधल्या पानावर एकच वाळलेली पाकळी शिल्लक राहिली. माझ्या अव्यक्त प्रेमाची साक्ष देणारी. त्या वेळी गुलाब हातात पकडायला सुद्धा भीती वाटायची पण कशीतरी हिम्मत एकवटली . मनातल्या गोष्टी मनातच राहून गेल्या आणि गुलाब वहीच्या पानात . सगळेच अनुत्तरित प्रश्न ! पण तरीही मन समाधानी. कारण पाहिलेली स्वप्ने तुटायची भीती मनात आजिबात नव्हती, ती एक अशी साखरझोप होती जिला वेळेची किनार नव्हती.
8 फेब्रुवरी :- Propose Day
          आता जे हात गुलाब पकडू शकले नाही ते कुणाचा हात हातात मागण्याची हिम्मत करणे म्हणजे अवघडच . Propose Day म्हणजे काय ते आम्हाला माहीतच न्हवते मुळी. खरं तर आमचा प्रपोज Day म्हणजे  “शाळेचा शेवटचा दिवस” . म्हणजे नुसतीच पोकळ अफवा .म्हणे काय तर “शेवटच्या दिवशी तिला विचारणार “. खरं म्हणायचं झाल तर शेवटच्या दिवशी आम्हा मुलांना केवळ दोनच महत्वाची कामं असायची. एक तर “तिला विचारने” आणि “एखाद्या मास्तर ला मारणे”. ह्यात “मास्तर” तर घावलं पण “ती” काही सापडली नाही. अखेरचा दिवस “अंगभर दौडेल असा दिवभरासाठीचा उत्साह” तर घेऊन यायचा पण संपताना मात्र “ कायम आठवणीत राहील एवढी निराशा पदरात पाडून जायचा”. खरं तर हा Propose Day कधी सफल ठरला नाही म्हणून तर एक आठवणींचा प्रवास अजून कायम चालू आहे आणि शेवटपर्यंत असाच चालू राहील. एक वाट हयानिमित्ताने कायम माझ्या पावलांच्या सोबत घट्ट नाळ रोवून आहे. एक अनुभव हयानिमित्ताने खोल मनात कुठेतरी अजून बहरून आहे .
9 फेब्रुवरी :- Chocolate Day
          Chocolate Day वर आता बोलायचं झालं तर खिशात तर कधी एक रुपया पण नसायचा , आणि 10 रुपये ची Dairy Milk मिळाली तर मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटायचं. Silk , Fruit and nut सारखी भानगड त्या वेळी तर काय नव्हती. त्यावेळी भाव खाण्याचीच मुलींची एव्हढी सवय होती की chocolate day ला Cadbury पण खायची असते हे बहुधा क्वचितच कुनाच्या तरी लक्षात आले असेल. आता तर भाव खाऊन मानणारं पोरींचं मन चॉक्लेट खाऊन पण मानत नाही . खर्च तर पूर्ण होतो , पण अपेक्षा नाहीच .निरपेक्ष मनं आता हरवली आहेत . आता अपेक्षा पूर्ण करण्यात एक वेगळीच मजा वाटू लागतीये. जिथे अपेक्षा आहेत  तिथे आता खरे प्रेमही कुठे दिसेनासं झालंय. एक Chocolate चा गोडवा तर सर्वांनाच ऐकून माहीत आहे पण प्रत्यक्ष  तो गोडवा दोघांमधल्या कडवटपनाला दूर करेल इतका पण “सार्थ” ठरेल काय ?.शेवटी काय ???? “chocolate चं ओ ते !!!”  
 10 फेब्रुवरी :- Teddy Day
          Teddy Day म्हणलं कि सर्रास “तात्या विंचू” ची आठवण यायची. त्या गटात मग हळूहळू  गोंडस अश्या काळ्या बाहुल्यांचा पण समावेश झालं. टेडी असावा तर काळ्या बाहुल्यांसारखा ! स्वतः उलटा लटकून च्या लटकुन दुसर्‍याला दृष्ट लागणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेणारा .एकवेळ माणूस कुत्री पाळनार नाही पण घराघरात उलट्या लटकलेल्या “Teddy” चा Swag एकदम हटके असाच होता . हयापलीकडचा Teddy आम्हाला Reality शो मध्ये दिसायचा .शोची नायिका तिझ्याहून दीड पटीने जड अश्या teddy ला घट्ट मिठी मारून बसलेली असायची. “माहेरची साडी” असं तर ऐकल होतं पण “माहेरचा टेडी” ही संकल्पना आमच्यासाठी नवीनच होती. त्यातल्या त्यात ती नायिका त्या “टेडी “ ला असे काही चिकटून बसायची कि तिझ्या नवर्याच्या “मग आम्ही कुणाचं घोडं मारलं ?” अश्या अविर्भावाच्या मुद्रा काहीश्या त्याच्या चेहेर्‍यावर असायच्या . दोन मन एकत्र येण्याच्या काळात हा “Teddy” मधे उगाच का येतो ? हेच कळत नाही . अश्या वेळी पुन्हा पुन्हा  मला “swag se करेंगे सबका स्वागत “ हे गाणे Background ला वाजताना ऐकू येते आणि समोर  आमचा जिवाभावाचा “ दरवाज्यावर शीर्षासन करत असलेला काळा टेडी” !
11 फेब्रुवरी: Promise Day
          “ एक गोष्ट सांगायची आहे तुला !”, कुणाला सांगणार तर नाहीस?”, एव्हढ्याश्या वाक्यावर एखादी सीक्रेट गोष्ट मनातून बाहेर यायची. “
एखाद्याला शब्द द्यायला एक क्षण सुद्धा लागत नाही , पण निभावताना अक्खं आयुष्य सुद्धा कमी पडेलं अशी परिस्तिथी निर्माण होते. मी सुद्धा केलेलं Promise , स्वतःशीच ! कारण दुसर्‍याला दिलेलं प्रॉमिस जर पूर्ण झाल नाही तर त्या व्यक्तिला गमावून बसण्याची हिम्मत माझ्यात अजिबात नव्हती. स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचं प्रॉमिस सोईच वाटलं. जर स्वतःशीच प्रामाणिक राहिलं तर आपल्या माणसांचा विश्वास गमवायची वेळच येत नाही.
“ At last promises are just another random words” असं वाचलं होतं कुठेतरी ! एखाद्याला शब्दाच्या वचनात अडकवणे म्हणजे एका अर्थी त्या व्यक्तीचा विश्वास आयुष्यभरासाठी विकत घेणे असा होतो तर दुसरीकडे जर तेच बंध आपल्याकडून पाळले गेले नाहीत तर ती व्यक्तिच आपल्यासाठी कायमची अनोळखी बनून राहते. असं काहीसं आपलं प्रॉमिस
“विश्वास न देता विश्वासपात्र बनण्याचं “,” दुनियेच्या नाही तर स्वतःच्याच नजरेत स्वतःलाच शोधण्याच”.
12 फेब्रुवरी :- Hug day
              कधीतरी खरंच वाटायचं, “घट्ट मिठीत एकदा ���री तिला घ्यावे “ .मग सगळ्या जगाचा विसर पडावा. सगळी दुनिया एका बाजूला आणि प्रेमात आकंठ बुडलेले आम्ही दोघे दुसर्‍याच टोकावर. मग अचानक झोपेतून जाग यायची आणि स्वप्नांची मिठी एकदम सुटायची .मग अश्या वेळी पुन्हा आठवायचा तो “Teddy”. आमच्याकडे तर नसायचाच आणि असला तरी केवळ हातात बसेल एव्हढाचं, मग त्याला मिठी कशी मारणार ?? . अश्या वेळी उशी घेऊन गप्प पडून राहायचे . टीव्हीवर नायक –नाईकांची मिठी सुटता सुटत नसायची , काहीही कारण नसले तरी ते मिठीच मारायचे ,दिवसाचा एक तास तरी त्यांना मारलेली मिठी सोडवायलाचं जायचा .अश्या  लोकांना “ Hug day “चं जरातरी कौतुक वाटत असेल का असा विचार मनात यायचा. मग नायकाला बघून कधीकधी वाटायचे अॅक्टिंग च्या क्षेत्राकडे आपले लक्षं वळवावे. अश्या वाटण्या न वाटण्यातच अक्खं बालपण निघून गेल. आमचा “Hug Day” साजरा तर झाला पण केवळ स्वप्नात आणि कल्पनेतंच. वास्तववादी जगात कधी त्याची एंट्री झालीच नाही. असो !! पण तीझ्यासोबतच्या आठवणींना मी मारलेली मिठी ही कधी न सुटणारी आहे . एक एक क्षण आजूनही माझ्या खांद्याभोवती खेळतात ,माझे मलाच घट्ट पकडून ठेवतात.
                अजून काय हवंय ??
13 फेब्रुवरी :- KI## Day
              तेव्हा पण आणि आज पण ,साधा “की#” हा शब्द ऐकलं तरी सुद्धा लाज वाटायची आणि लिहायची गोष्ट झालीच तर मला विनाकारण hashtag का वापरायला लागले ह्यावरून तरी एखादं लगेच समजून जाईल. मग सोयीसाठी ह्याला मी “राष्ट्रीय इमरान हश्मि दिन” म्हणून घोषित करायचो. कारण ki## म्हनलं कि इमरान हश्मिचं नाव आदराने घेतलं जायचं. आता ह्या दिवसाबद्दलच्या आठवणीबाबत बोलायचे झाले तर खूप “Awkward शांतता” माजेल . पुन्हा एकदा तो टीव्हीचा चं संदर्भ द्यायला लागायचा॰ सतत मिठीत असणारे नायक –नायिकांमध्ये तेव्हा क्वचितच “कि#” घडायचा .” इंग्लिश चॅनलवाले खूपचं advance होते हे मला दोन चार इंग्लिश चॅनल पाहिल्यावर कळलं .
      तसं तर ऑन’स्क्रीन कि# होणार आहे ह्याची भणक आम्हाला आधीच लागायची . पण तेव्हा घरातले सगळे जण शेजारी बसलेले असायचे ,मग आम्ही  काहीतरी कारण काढून तिथून निसटायचा प्रयत्न करायचो अन्यथा सर्व काही बघून पण न बघितल्यासारखे करायचो . अश्यात जर इमरान हश्मीचा एखादा मूवी चालू झाला तर आम्ही सोयीनेच पळ काढायचो. अॅक्टिंग खूप जमायची पण अश्या वेळी समोरच्याला अगदी सहज कळेल अश्या प्रकारे चेहेर्‍यावर बारा वाजलेले असायचे . सगळ्या अॅक्टिंग चा फालूदा तो एक प्रसंग करून जायचा. तेव्हा विश्वास बसायचा कि आपला जन्म एकवेळ ki## करण्यासाठी भलेही झाला असेल पण अॅक्टिंग करण्यासाठी अजिबात नाही.
    Ki## day च्या तश्या आठवणी मागे वळून पाहायला गेलं त्याला “रोमॅंटिक ट्च” अजिबात नव्हता.होता तर तो फक्त विनोद ! विनोद ,ते पण चार मित्रांच्यात ,आणि घरात हाच विनोद एक नवीन रूप धारण करायचा. एक “Awkward” रूप, आणि सवयीची ती एक “Awkward” शांतता !!
14 फेब्रुवरी ;- Valentines Day
         आता येतो तो सगळ्यात महत्वाचा दिवस . “व्हॅलेंटाईन्�� डे”.अर्थात प्रेमाचा दिवस . प्रेम म्हणजे नक्की काय ? हयाबाबत अनेक जण स्वतःची मतं मांडून जातात . मी पण मांडतो .माझ्या नजरेत खरं प्रेम म्हणजे नक्की काय?
माझ्या मते “प्रेम करनं हे आपल्या हातात असतं पण प्रेमात पडनं हे आपल्या हातात अजिबात नसतं “.
“जीव लावणं हे आपल्या हातात असतं पण एखाद्यावर जीव जडणे हे आपल्या हातात कधीच नसतं”,
“ती कायमची माझीच झाली पाहिजे ह्याला प्रेमापेक्षा महत्वाकांक्षा म्हणावं लागेल”,
आणि “काही जरी झालं तरी मी आयुष्याभर तिझाच आहे असे म्हणून स्वतःशीच वचनबद्ध होणे हे खरे “प्रेम” म्हणेन “,
शेवटी काय ?? ,
तर ,”कुणीतरी कायम सोबत असणे “ हयापेक्षा
“दूर गेल्यावर कुणाची तरी कायम उणीव भासणे “ हे खरे प्रेम.!!
         प्रेम तर सर्वच जणं करतात. काहींना आपले प्रेम मिळते काहींना  नाही, तर काहीचे प्रेम अव्यक्तच राहते. माझ्यासारखे..
 मग सुरू होतो एक प्रवास , एकाच उत्तराच्या शोधात,
“ती सध्या काय करते??”!!
आणि त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मन पुन्हा आतुर होते . हे वेड असं असतं की ह्यात क्षितिज मिळवण्यापेक्षा त्यापर्यंत केलेला प्रवासच खूप काही न विसरण्याजोगे अनुभव देऊन जातो. कधीकधी आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा मोकळेपनाणे हवेत तरंगण्याची मजा अनुभवणे गरजेचे असते . कारण त्यातच खरा आनंद दडलेला असतो.
    मागे वळून जर पहिले तर “आपण एकत्र आलो ह्याचे नवल आपल्याला
क्वचितच कधीकधी वाटते” पण “एकत्र येण्यासाठी आपण काय काय केले हे आयुष्यभर आठवणीत राहते !!”.
“ खरे प्रेम ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळे असते का ??”
!!  समाप्त !!
2 notes · View notes
loksutra · 2 years
Text
VIDEO: भुकेल्या कुत्र्यांना म्हशीचे दूध दिले, महिलेच्या या व्हिडिओने जिंकली मनं
VIDEO: भुकेल्या कुत्र्यांना म्हशीचे दूध दिले, महिलेच्या या व्हिडिओने जिंकली मनं
हा आश्चर्यकारक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ @MahantYogiG या आयडी नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘केवळ आई जेव्हा भुकेली असते तेव्हा त्याची आठवण येते…’. अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कुत्र्यांना म्हशीचे दूध पाजणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter सामाजिक माध्यमे हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
'टाईमपास ३' ची ४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई
‘टाईमपास ३’ ची ४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई
मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास ३’ नेही प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाईमपास ३’ ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून फुल्ल धुमाकूळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मनं जिंकली
महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मनं जिंकली
नवी दिल्ली, दि. 12 : दलखाई, सिंगारीनाचा आणि बजासाल या ओडिशातील लोकनृत्यांचे बहारदार सादरीकरण, जोडीला महाराष्ट्राच्या लोककलांचे लेणे असणाऱ्या लावणी, भारुड, वासुदेव आदि लोककलांच्या तितक्याच आकर्षक सादरीकरणाने आज उभय राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार दर्शन दिल्लीकरांना घडले. प्रसंग होता, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मनं जिंकली
महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मनं जिंकली
नवी दिल्ली, दि. 12 : दलखाई, सिंगारीनाचा आणि बजासाल या ओडिशातील लोकनृत्यांचे बहारदार सादरीकरण, जोडीला महाराष्ट्राच्या लोककलांचे लेणे असणाऱ्या लावणी, भारुड, वासुदेव आदि लोककलांच्या तितक्याच आकर्षक सादरीकरणाने आज उभय राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार दर्शन दिल्लीकरांना घडले. प्रसंग होता, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Full Respect ! शहीद कर्नलच्या मुलासोबत घेतला सेल्फी.. अभिनेता रामचरणने जिंकली चाहत्यांची मनं Video
Full Respect ! शहीद कर्नलच्या मुलासोबत घेतला सेल्फी.. अभिनेता रामचरणने जिंकली चाहत्यांची मनं Video
Full Respect ! शहीद कर्नलच्या मुलासोबत घेतला सेल्फी.. अभिनेता रामचरणने जिंकली चाहत्यांची मनं Video मुंबई – अनेकदा साऊथ स्टार आपल्या अभिनयासोबत त्यांच्या दिलदार स्वभावासाठी देखील ओळखले जातात. अभिनेता रामचरण हे त्यातीलच एक नाव. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असूनही रामचरण नेहमी साधा आणि ग्राउंड टूअर्थ असल्याचे पाहायला मिळते. रामचरणच्या याच साधेपणाचा अनुभव नुकताच एका शोदरम्यान पाहायला मिळाला. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये ‘बिट्टा’ची व्यक्तिरेखा निभावणाऱ्या चिन्मय मांडलेकरने ‘त्या’ चर्चांवर केले वक्तव्य; म्हणाला, “लोक माझा तिरस्कार करत आहेत…”
‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये ‘बिट्टा’ची व्यक्तिरेखा निभावणाऱ्या चिन्मय मांडलेकरने ‘त्या’ चर्चांवर केले वक्तव्य; म्हणाला, “लोक माझा तिरस्कार करत आहेत…”
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि बहुचर्चित चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाने चांगलीच कमाई देखील केली आहे. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी आपला उत्तम अभिनय साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र एकाच भूमिकेचा तिरस्कार केला जात आहे तो म्हणजे फारूक मलिक बिट्टाच्या व्यक्तिरेखेचा. या चित्रपटामध्ये बिट्टाची भूमिका मराठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
समांथा सामना करतेय ‘या’ गंभीर आजाराचा, चित्रपटाच्या शूटिंगमधूनही घेतला ब्रेक
Tumblr media Tumblr media
Photo Credit - facebook/ Samantha मुंबई | दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu)आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. परंतु समांथाला सध्या एका आजारानं ग्रासलं आहे. त्यामुळं समांथा लोकांमध्ये येणंही टाळत आहे. समांथाला त्वचेशीसंबधित एक आजार झाला आहे. या आजाराचं नाव ‘पाॅलीमाॅर्फ्स लाइट इरप्शन’ असं आहे. या आजारामुळं सुर्यप्रकाशात आल्यानंतर त्वचेला खाज सुटते, वेदना होतात आणि चट्टेही पडतात. समांथाला या आजाराने ग्रासल्यानं समांथा तिच्या शूटिंगमधून वेळ काढून उपचारासाठी अमेरिकेला गेली आहे. यामुळं तिनं तिच्या ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखाही पुढं ढकलल्या आहेत. या आजारामुळं समांथा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही फारशी सक्रिय दिसत नाही. तसेच ती बऱ्याचदा कार्यक्रमांना जाणंही टाळत होती. दरम्यान, समांथा लवकरच बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. Read the full article
0 notes
darshaknews · 3 years
Text
नोरा फतेहीचे नाव ऐकताच भारती सिंग कॅमेऱ्यासमोर रडली.
नोरा फतेहीचे नाव ऐकताच भारती सिंग कॅमेऱ्यासमोर रडली.
भारती सिंग मजेदार क्षण: लाफ्टर क्वीन भारती सिंग हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. भारतीला तिच्या चाहत्यांची मनं जिंकायची आहेत हे तिला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच, मीडियाशी झालेल्या संवादातही भारती मनोरंजनाचा टच टाकते आणि भारती सिंगचा हा व्हायरल व्हिडिओ त्याची साक्ष देतो. नोरा फतेहीचे नाव घेताच भारती रडू लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यापासून तो व्हायरल होत आहे. भारती…
View On WordPress
0 notes
apdaga-dumpbox · 3 years
Text
youtube
Mann tashi Prakruti - मनं तशी प्रकृती | Dr Yojana Ambadkar | Akola Akashvani FM102.4 - Vanita Mandal
0 notes
loksutra · 2 years
Text
इटलीमध्ये बेबीमून एन्जॉय करून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत परतले, अभिनेत्रीच्या लुकने जिंकली मनं
इटलीमध्ये बेबीमून एन्जॉय करून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत परतले, अभिनेत्रीच्या लुकने जिंकली मनं
इटलीमध्ये बेबीमून एन्जॉय करून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत परतले, अभिनेत्रीच्या लुकने जिंकली मनं ,
Tumblr media
View On WordPress
0 notes